Home Blog Page 3546

ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनतर्फे महिलांसाठी पुष्परचना स्पर्धा व प्रदर्शन

0
पुणे : महिलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनतर्फे पुष्परचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (दि. १८)रोजी  म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स, डी. पी. रोड येथे ९ ते ११ या वेळेत हि स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांची कलाकृती लोकांसमोर यावी  या उद्देशाने ११ ते ७ या वेळेत या पुष्प रचनांचे प्रदर्शनही आयोजित केले आहे अशी माहिती सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी दिली. डॉ. चारुलता बापये यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
 
कुलकर्णी यांनी सांगितले की, या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेतीना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हि स्पर्धा विनामुल्य असून १८ वर्षाच्या पुढील कोणत्याही वयोगटातील महिला यात सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेत भाग घेऊ इच्छीणारयांसाठी  १७ ऑक्टोबर २०१५ रात्री ८ वाजेपर्यत नावनोंदणी करण्याची मुदत आहे. स्व. सौ. ज्योती कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ज्योती कुलकर्णी रिसर्च फौंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. ज्योती कुलकर्णी यांनी समाजातील इतर महिलांसाठी विविध संधी देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यांचा कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही ह्या फौंडेशनची स्थापना केली आहे. 
 
  महिलांमधील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठीचा स्पर्धेमागील हेतू आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग घ्यावा, तसेच इछुकांनी यात ०२०-६६०४७१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.    
rsz_1logo-for-portal

‘जनता दरबार’ पुस्तकाचे प्रकाशन

0

पुणे, स्वाती पाटणकर यांनी लिहिलेल्या ‘जनता दरबार’ या पुस्तकाचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्य हस्ते करण्यात येणार आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता ‘यशदा’च्या ‘संवाद’ सभागृहात होणार आहे. जलसंधारणचे सचिव प्रभाकर देशमुख, मुंबई दूरदर्शनचे उपमहानिदेशक मुकेश शर्मा, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, माजी मंत्री मधुकर पिचड, शिवाजीराव मोघे, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिलिंद लहानगे या कातकरी आणि जयपूर घराण्याच्या तरुण गायकाचे शास्त्रीय संगीत हे कार्यक‘माचे खास आकर्षण असणार आहे.
जनता दरबार ही दूरदर्शनवरील मालिका. सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी या मालिकेत समाजातील सकारात्मकतेने काम करणार्‍या व्यक्तींचा आणि संस्थांचा या कार्यक‘मात परिचय करुन देण्यात येतो. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेच्या पहिल्या ५३ भागांविषयीचे हे पुस्तक असल्याची माहिती कमलेश चंगेडिया यांनी दिली.
या कार्यक‘मात शिलिंद लहानगे, संदीप गुंड, गोकुळ देवरे, डॉ. राजेंद्र व सुनिता धामणे, डिंभेगाव महिला बचत गट, लोधवडे गाव, श्री. सकट आणि सचिन पवार यांचा सकारात्मक कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यानंतर बारीपाडा पॅटर्न, जलसंधारण, डिजिटल स्कूल, मतिमंदांवर वैदिक उपचार, साबळे मान्सून मॉडेल, आयुर्वेद उपचार, मनोरुग्ण महिला पुनर्वसन, जलविद्युत, साहसी खेळ, उत्तराखंड मदतकार्य या विषयांवरील व्या‘याने होणार आहेत.

rsz_1logo-for-portal

 

‘सत्यम शिवम सुंदरम’ने उलगडले जीवनातील सौंदर्य स्थळं

0

पुणे- सुख,दु:ख,शांती, प्रेम, विरह, संस्कार, मातृ- पितृ प्रेम, पती-पत्नी प्रेम, भक्ती अशी मानवाच्या जीवनातील

विविध सौंदर्य स्थळांचा उलगडा करणारी हिंदी, मराठी व भक्ती गीते आणि त्याला साजेश्या निवेदनाने एका

उंचीवर नेलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ‘स्वर निनाद’ या संस्थेच्या ‘सत्यम शिवम

सुंदरम’ या कार्यक्रमाचे बुधवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आले होते. विविध विषय, विचार

मनोरंजनाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

‘जिंदगी कैसी है पहेली हाय…’, ‘ तारो मे सजके, अपने सुरजसे धरती चली मिलने…’, ‘ झिलमील सितारोंका

आंगण होगा…’, ‘मा तुझे सबकुछ पता है ना मा..’, ‘सांगायची आहे दमलेल्या बापाची कहाणी तुला..’, ‘तुम्ही

मेरी मंझील, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो…’, ‘ये तो सच है की भगवान है.. यांसारखी एकापेक्षा एक सरस

गीते, ‘माउली..माऊली..’, हे भक्ती गीत, ‘ दही दुध लोणी, घागर भरली..नेऊ कशी बाजरी…’, ही गवळण तर

एकाच वेळी राधा- कृष्णामधील प्रेम तर कृष्ण आणि मीरा मधील विरह व्यक्त करणारे ‘एक राधा, एक

मीरा…दोनोने श्याम को चाहा..’,  तर ‘ईश्वर सत्य है..सत्य ही शिव है.. शिव ही सुंदर है…’, या सुख आणि

शांतीचा मागोवा घेणाऱ्या गीतांनी रसिकांना चिंब केले.

गायक रणजीत गुगले, विजय वळवडे, गायिका अनघा नवरे, वैदेही जाधव, स्मिता कुलकर्णी या कलाकारांनी

आपल्या मधुर आवाजाने रसिकांची माने जिंकली. या कार्यक्रमाचे निर्माते सुनील सुतार हे असून दिग्दर्शन प्रा.

सुरेश शुक्ल यांनी केले आहे. तर निवेदन भारतभूषण  शेंबेकर यांनी केले.

जेष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते प्रा. सुरेश शुक्ल यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात

आला. या प्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी सत्याचा आग्रह

धरीत शांतीमय जीवन जगण्यासाठी चांगल्या विचारांचा संकल्प अंगी बाळगला पाहिजे असे आवाहन केले. पुणे

नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घन:श्याम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित

बागुल  हे यावेळी उपस्थित होते.

आपला स्नेहांकित

रिमोट कंट्रोलद्वारे वीजमीटरमधील नोंदी सोयीनुसार थांबवून कारखान्यात होणारी वीजचोरी महावितरणकडून उघडकीस

0

पुणे, :वीज चोरी कशी होवू शकते याचा जबरदस्त पराक्रम आता उघड झाला आहे . चक्क रिमोटने विजेच्या मीटरवर नियंत्रण ठेवणारी  क्लुप्ती पुण्यात वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे

नांदेड गाव येथे अक्षय इंडस्ट्रीज या बर्फ तयार करण्याच्या कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने

रिमोट कंट्रोलद्वारे होणारी वीजचोरीची क्ल्युप्ती महावितरणने उघड केली आहे. पुणे शहरात असा वीजचोरीचा प्रकार

प्रथमच  आढळून आला आहे. या बर्फाच्या कारखान्यात तब्बल 83 हजार 138 युनिट्‌सच्या 11 लाख 92 हजार 738 रुपयांची

वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की नांदेड येथील सर्व्हे क्र. 10 मधील मे. अक्षय इंडस्ट्रीज हा बर्फाचा कारखाना वीजग्राहक

आशा यशवंत धनकुडे यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातील वीजवापराच्या विश्लेषणातून संशय निर्माण झाल्याने

कारखान्यातील वीजयंत्रणेची तपासणी करण्यात आली. सदर कारखान्यात असलेल्या वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार केल्याचे

आढळून आले. सिटी सर्कीटमध्ये फेरफार करून त्यात रिमोट कंट्रोल सर्कीट समाविष्ट केल्याचे दिसून आले. या सर्कीटच्या

सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे वीजमीटरमधील नोंदी सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून

आले. रिमोट कंट्रोलचे सर्कीट बेमालुमपणे व छुप्या पद्धतीने लावल्याने वीजचोरी शोधून काढणे आव्हान होते. तथापि

महावितरणच्या अभियंता व कर्मचार्‍यांनी रिमोट कंट्रोलद्वारे सुरु असलेल्या वीजचोरीचा कौशल्याने छडा लावला. गेल्या 24

महिन्यांच्या कालावधीत अक्षय इंडस्ट्रीजमध्ये 83,138 युनिट्‌सच्या 11 लाख 92 हजार 738 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे

सदर कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक

अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. उदय चामले, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त

कार्यकारी अभियंता श्री. दिलीप कोकणे, श्री. विजय सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता शिवलिंग बोरे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ शैलेश

बनसोडे, राम पवार आदींनी योगदान दिले.

वीजचोरीप्रकरणी अक्षय इंडस्ट्रीजचे मालक आशा यशवंत धनकुडे विरुद्ध मंगळवारी (दि. 13 ऑक्टो.) रास्तापेठ (पुणे) येथील

महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

 

पालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई

0

पुणे- महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ व झोन क्र. ६ च्या वतीने

अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन सुमारे १६८००  चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

संबंधित मिळकतदारांना महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम ४७८(१) नुसार नोटीस देण्यात आल्या होत्या.

झोन क्र. ४ च्या वतीने लोहगाव परिसरात स.नं. २५३ खेसे पार्क लोहगाव येथील ४ मिळकतदारांनी

केलेल्या आरसीसी पक्क्या स्वरुपाच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली

सदर कारवाईत २ पोलिस गट, २५ बिगारी, १ जेसीबी, २ कटर, २ ब्रेकर यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली

बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ व औंध महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने

बोपोडी स.नं. २ए/८ येथील विनापरवाना बांधकामावर दिलेल्या नोटीसांच्या अनुषंगाने एमआरटीपी अ‍ॅक्ट

कलम ४७८(१) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत आली.

सदर कारवाई अंतर्गत सी.पी. कामा व राजेंद्र कोठारी यांचे २२५० चौ. फुट तसेच अन्य अनुक्रमे ८

मिळकती  यानुसार एकूण १०८०० चौ. फुट पक्के पत्र्याचे शेड इ. बिगर परवाना बांधकाम पाडण्यात आले.

बांधकाम घरपाडी विभागाकडील बिगारी १०, पोलिस कर्मचारी १ गट, १ जेसीबी इत्यादीच्या सहाय्याने

बांधकाम खात्यामार्फत कारवाई करण्यात आली.

PMC-building

आता रस्त्यावर थुंकणाऱ्याकडूनही होणार वसुली …

0

मुंबई :कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी नाही-लघुशंकेसाठी स्वच्छतागृहे नाहीत अशा अवस्थेत आता रस्त्यावर थुंकणाऱ्या वर किती दंड आकारायचा याचा विचार सरकार करू लागले आहे अर्थात  पिकदाणी ठेवण्याचा मात्र अजिबात विचार नाही . दुष्काळामुळे पेट्रोल -डीझेल वर कर वाढविणाऱ्या भाजप -सेनेच्या सरकारकडून आता अशाप्रकारेही नागरिकांकडून लवकरच वसुली सुरु होण्याची शक्यता  आहे एकीकडे चौकाचौकात  उभ्या असलेल्या वसुली पंटर पोलिसी टोळक्यांना शहरवासी वैतागले असताना आता थुंकलात तर किती दंड घ्यायचा …आणि द्यायचा ? यावरून हि वैताग वाढणार आहे.थुंकी आलीच तर ती गिळून टाकण्याशिवाय अर्थात नागरिकांना पर्याय उरणार नाही .रस्त्यावर थुंकण्यास पूर्वीपासूनच कायद्याने प्रतिबंध करण्यात आलेला आहे थुंकणे त्रासदायक असले तरी त्यातही अनेक प्रकार आहेत .काहीवेळा चांगल्या ..निर्व्यसनी माणसाला थुंकी येते …याबाबतचा विवाद टाळणार कसा हा प्रश्न आहे .तर काहींच्या तंबाखू खावून किंवा पान खाऊन थुंकण्याला मात्र शासन झाले पाहिजे असा प्रवाह आहेच आहे . 

  तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यापूर्वी याची तपासणी आणि छाननी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. हे लक्षात घेऊनच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक वाहनांमध्ये थुंकण्याच्या सवयीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य रक्षण आणि थुंकी प्रतिबंध अधिनियम, 2015 तयार करण्यात येत आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यापूर्वी या अधिनियमाची तपासणी/छाननी करण्यासाठीची समिती गठीत करण्यात आली.
समितीच्या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित तीनही मंत्रीमहोदयांनी हा अधिनियम करण्यापूर्वी या अधिनियमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात येईल, तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला पकडल्यास किती रक्कम दंड म्हणून वसुली करण्यात येईल, तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकू नये यासाठी कशा पद्धतीने सामाजिक प्रबोधन करता येईल, याबाबत चर्चा केली.
भारताच्या राज्य धोरणाची निदेशक तत्वे यामधील अनुच्छेद 47 मध्ये अधोरेखित केलेल्या निदेशक तत्वांपैकी इतर गोष्टीबरोबरच एक तत्व म्हणून सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे एक प्रमुख कर्तव्य आहे. नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचण्यास प्रतिबंध व्हावा यादृष्टीने हे पाऊल राज्य शासनामार्फत उचलण्यात येत आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे.

राज्यात परकीय गुंतवणुकीसाठी शासन प्रयत्नशील – सुभाष देसाई

0

मुंबई : राज्यात उद्योगधंदे वाढीस लागावे यासाठी परदेशातील उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शासन निश्चितच प्रयत्न करेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

युरोपियन बिझनेस ग्रुपच्या ‘इबीजी पोझिशन पेपर 2015’ या पुस्तिकेचे प्रकाशन श्री. देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमीत मलिक, इबीजी नॅशनल कौन्सिलचे अध्यक्ष रमण सिद्धू, इबीजी मुंबईचे सदस्य ॲन्टोनिया फस्यानो तसेच युरोपियन बिझनेस ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, राज्यामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी यापूर्वी विविध प्रकारच्या 76 परवानग्या घ्याव्या लागत असत. त्याचे प्रमाण 37 वर आणण्यात आले असून त्या 25 पर्यंत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यामध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध असून यासाठी युरोपियन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.

‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे शानदार उद्घाटन

0

 

unnamed

पुण्यातील मानाचा मानला जाणारा ‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे ’ स. प. महाविद्याल्याचे प्राचार्य दिलीप सेठ यांच्या हस्ते  नुकतेच उद्घाटन करण्यात आले. फटाक्यांच्या आतिशबाजी व ढोल पथकाच्या गजरात   देवीच्या मूर्तीची  मिरवणूक काढून  प्राणप्रतिष्ठा करण्यात आली . या प्रसंगी लोकमान्य फेस्टीव्हल चे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते, आनंद आगरवाल, नरेश मित्तल, बिपीन मोदी, महेश महाले, आदित्य सातपुते, शुभांगी सातपुते, रेणुका शिंदे, संगीता मित्तल, असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे गौरवशाली १८ वे वर्ष असून या वर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहणार असून दांडिया व रावण दहन हे दोन मोठ्या कार्यक्रमांचे आकर्षण असणार आहे. असे लोकमान्य फेस्टीव्हलचे संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.

 

 

 

८९व्या साहित्य सम्मेलनाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांनी केले अनावरण- ‘युवा साहित्य सम्मेलन’ सुरू करण्याची राज्यपालांची सूचना

0

unnamed1 unnamed3

पुणे- जगभरात विखुरलेल्या मराठी लोकांना जोडण्यासाठी प्रवासी भारतीय दिवसाच्या धर्तीवर ‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार करतानाच युवा शक्तीला मराठी भाषा संवर्धनाच्या कार्यात जोडण्यासाठी ‘युवा साहित्य सम्मेलन’ सुरू करण्याची सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केली.

जानेवारी महिन्यात पिंपरी- चिंचवड येथे होत असलेल्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज राज्यपालांच्या हस्ते राज भवन येथे झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.

‘एकम सत, विप्र: बहुधा वदंती’ या वचनाचा आधार घेत साहित्यिकांनी विचार-स्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य व श्रद्धा-स्वातंत्र्याचा आदर करणार्‍या आपल्या थोर परंपरेचे जतन व संवर्धन केले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

देशात दिवाळी एकदाच साजरी होते; मात्र महाराष्ट्रात साहित्य सम्मेलन दिवाळी इतक्याच उत्साहात संपन्न होते हा मराठी भाषेचा गौरव असल्याचे विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी चिंचवडची ओळख आतापर्यंत औद्योगिक नगरी, सांस्कृतिक नगरी व पेन्शनरांचे शहर अशी ओळख होती. साहित्या सम्मेलनामुळे मात्र शहराची ओळख साहित्य नागरी म्हणून निर्माण होईल असे उद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यावेळी काढले.

मराठी साहित्याची परंपरा मोठी असून मराठी भाषा व इतर भाषा यांमधील सेतु अधिक बळकट झाला पाहिजे अशी अपेक्षा घुमान येथे झालेल्या अठ्ठयांशीव्या साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद  मोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी पिंपरी चिंचवड साहित्य सम्मेलनासाठी समर्पक बोधचिन्ह तयार करणार्‍या इरावती मालेगावकर व पद्मा इराणी या कलाकार भगिनींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सममेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ पी डी पाटील यांचे स्वागतपर भाषण झाले तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्क्यक्ष डॉ माधवी वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.

unnamed123

एकविसाव्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे शानदार उद्घाटन

0

unnamed unnamed1 unnamed3 unnamed4 unnamed5unnamed6

पुणे- कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाप असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जेष्ठ

अभिनेते व खासदार राज बब्बर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. महोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष आहे.

‘मै नही जानता अच्छे दिन कब आनेवाले है, मगर हसने  वाले दिन मैने पुना मे कई बार देखे है’,  असे

म्हणत त्यांनी आपल्या राजकीय व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले.

श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी माजी आमदार उल्हास पवार,

महापौर दत्तात्रय धनकवडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे,

माजी आमदार मोहन जोशी माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, म्हाडाचे(पुणे) माजी अध्यक्ष अंकुश काकडे,

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल उद्योगपती सुभाष सणस, वीरेंद्र किराड, नरेंद्र

व्यवहारे, विठ्ठल लडकत  तसेच सिनेतारका शर्वरी जमेनीस, अश्विनी एकबोटे, गिरीजा जोशी, तेज देवकर

आणि तेजस्विनी लोणारी आदी मान्यवर  उपस्थित होते.

राज बब्बर यांच्या हस्ते यावेळी शिक्षणतज्ज्ञ कर्नल बालसुब्रमण्यम, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, ज्येष्ठ

कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे, लावणी नृत्यांगना आरती नगरकर आणि अभिनेते शिवराज वाळवेकर

यांना श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.  प्रत्येकी ११

हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जेष्ठ सनई वादक महादेव तुपे यांच्या सनई वादनाने उद्घाटन सोहळ्यास आरंभ झाला. त्यानंतर सर्व

मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि देवीच्या आरतीने २१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन

झाले. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर अंजली मनोहर आणि अनिरुद्ध नारवेलकर यांची सतार आणि तबला

जुगलबंदी, नृत्यगुरु शमा भाते याच्या नादरूप संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या नेत्रदीपक गणेश वंदना-

इशास्तुती या विशेष नृत्याविष्काराने, त्यापाठोपाठ विनोद धाकटे व सहकारी यांनी सदर केलेला येळकोट

येळकोट जय मल्हार हा लग्नसोहळा व देवीचा गोंधळ, कोंदण ग्रुपने सदर केलेला मंगळागौरिचा बहारदार

खेळ आणि रत्नाकर शेळके डान्स अॅकेडमीच्या युवा कलावंतांनी सदर केलेल्या फ्युजनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध

केले. पायाल वृंदच्या निकिता मोघे यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेतारका सर्वारी जमेनीस, अश्विनी एकबोटे,

गिरीजा जोशी, तेजा देवकर, आणि अश्विनी लोणारी यांच्या दिलखेचक बहारदार लावणी नृत्याने उद्घाटन

सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरेल. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद देत रंगमंच दणाणून सोडले. या

उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंग जल्लोष हा मराठी गीतांचा कार्यक्रम

सारेगामा फेम सुजित सोमण, सायली कुलकर्णी व इतर कलाकारांनी सादर केला.

मै नही जानता अच्छे दिन कब अने वाले है…

राज बब्बर यांनी व्यासपीठावर मागच्या बाजूला लावलेल्या कै. सुधीर फडके, सरस्वतीबाई राणे. ग. दि.

माडगुळकर, जोत्स्ना भोळे यांच्या नावाचा उल्लेख करत साहित्य, संस्कृती, कला जपणाऱ्या या महान

व्यक्तींना देशाला काय अपेक्षित आहे हे चांगले माहिती होते असे गौरोद्गार काढले. आपल्या शैलीमध्ये ‘मै

नही जानता अच्छे दिन कब आणेवाले है, मगर हसने वाले दिन मैने पुना मे कई बार देखे है’ असा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. तुलसीदास नंतर गीतरामायणाने आपल्या मनात

घर केले व ते  कै. सुधीर फडके यांनी ते आपल्या पर्यंत पोहचविले असे त्यांनी सांगितले. पुण्याचे

उपामहापौर आबा बागुल यांनी सुरु केलेल्या महोत्सवाच्या मंचावर नगर पालिकेच्या शाळांमधील

विद्यार्थ्यांपासून ते अनेक जेष्ठ व प्रख्यात कलावंतांनी आपली कला सादर केली ही खरोखर अभिनंदनीय

बाब असल्याचे नमूद करून त्यांनी आबा बागुल यांचे कौतुक केले.

उल्हास दादा पवार म्हाणाले, आबा बागुल यांच्या रूपाने  झपाटून काम करणारा, आपल्या प्रभागाचा आणि

शहराच्या विकासाचा ध्यास असलेला आणि मनपा कायद्याचा अभ्यास असणारा नगरसेवक पुणे शहराला

मिळाला आहे.  पुणे नवरात्रौ महोत्सवाचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. शिक्षणतज्ज्ञ कर्नल

बालसुब्रमण्यम, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे, लावणी नृत्यांगना

आरती नगरकर आणि अभिनेते शिवराज वाळवेकर यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उल्लेख

करत त्यांनी त्यांचा गौरव केला. तसेच राज बब्बर यांच्या चित्रपट सृष्टीतील कामापेक्षाही त्यांच्या

संसदेतील, त्यांच्या मतदार संघातील कामाचा लेखाजोखा मांडत त्यांचे कौतुक केले.

बालसुब्रमण्यम म्हणाले, आपल्या देशाची संस्कृती काय आहे हे पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून

बघायला मिळते. अशा प्रकारचे महोत्सव नेहेमी झाले तर देशात नक्की शांतता नांदेल.

शमा भाटे म्हणाल्या, पुणे नवरात्रौ महोत्सवाचा दरवर्षी वाढत जाणाऱ्या दिमाखदारपनाची मी गेली १८ वर्षे

साक्षीदार आहे. शास्त्रीय संगीत व नृत्य भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते आणि आबा बागुल यांनी

पुणे नवरात्र महोत्सवात त्याला मनाचे स्थान दिले आहे.

माहापौर दत्तात्रय धनकवडे, मोहन जोशी, डॉ. विश्वजित कदम यांनी आबा बागुल यांनी त्यांच्या प्रभागात

तसेच त्यांच्या कल्पनेतून शहरात झालेल्या विकास कामांची प्रशंसा केली. तसेच पुणे नवरात्र महोत्सव हा

केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातला ख्याती मिळवलेला महोत्सव असल्याचे नमूद केले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आबा बागुल यांनी राज बब्बर यांच्याबद्दल असलेल्या त्यांच्या मनातील

भावना व्यक्त केल्या. माझ्या वाढदिवसापेक्षाही जास्त आजच्या दिवसाची मी वाट पाहत होतो अशा

भावना व्यक्त करून बागुल यांनी राज बब्बर यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला उजाळा दिला. तसेच

बब्बर यांच्या संसदेतील व राज्यसभेतील कामकाजाचा गौरव केला.

अभिनेते शिवराज वाळवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आभार घनश्याम सावंत यांनी मानले.

क्रेडाईच्या निषेध मोर्चात बिल्डर्सच्या एकीचे प्रदर्शन 18 हजारांहून अधिक जणांचा रॅलीत सहभाग

0

unnamed unnamed2

पुणे- सरकारी औदासीन्य आणि धोरणांमुळे ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांनी अलीकडेच केलेल्या आत्महत्येची तीव्र प्रतिक्रिया म्हणून बांधकाम व्यावसायिक समुदायाने आज आपल्या एकीचे प्रदर्शन घडविले. त्यांनी  लालफीतशाही, मान्यतेला लागणारा विलंब, ब्लॅकमेल आणि बांधकाम उद्योगासाठी परवानगीच्या प्रक्रियेतील सर्वच आव्हानांच्या विरोधात आवाज उठविला. क्रेडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेल्या निषेध मोर्चामध्ये महाराष्ट्रातील 18 हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी नोंदविला.

हा मोर्चा पूना क्लब ग्राउंडपासून सकाळी 10.30 वाजता सुरू झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी विभागीय आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदने दिली.

या मोर्चामध्ये प्रामुख्याने  क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, रोहित गेरा, अनिल फरांदे, किशोर पाटे, मनीष जैन, मानदचिटणीस अनुज भंडारी, मानद संयुक्त चिटणीस अनुज गोयल, खजिनदार नितीन न्याती डी.एस. कुलकर्णी व अन्य मानवरांचा समावेश होता. क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनीजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात एकूण रिअल इस्टेट उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 5 कलमी कार्यक्रमाचीअंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

  1. सर्व मंजुरी प्रक्रियेतीलभेदाभेद नष्ट करा. मंजुरी, वहिवाट प्रमाणपत्रे, , चौथरा तपासणी प्रमाणपत्रे इ. अनावश्यकपणे स्थगित करणे संपवा. मनानुसार निर्णय घेण्याच्या अधिकारांना आळा घालायला हवा कारण यामुळे मंजुरीला विलंब लावण्याची अधिकाऱ्यांना खुली मुभा मिळते.
  2. अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरा. एखाद्या वेळेस त्यांनी फायलीला विलंब लावला किंवा निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लावला, तर त्याला उत्तरदायी धरावे आणि अशा चुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी.
  3. विकासकांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही तक्रारीची हाताळणी करण्यासाठी कालबद्ध प्रक्रिया निश्चित करा. सर्व तक्रारींची हाताळणी एकाच अधिकाऱ्याद्वारे / चमूद्वारे करावी आणि त्याने तक्रारीच्या संदर्भात निष्कर्ष लेखी मांडावेत. मूल्यांकनाची प्रक्रिया चालू असताना, प्रकल्प / अनेक प्रकल्प आणि मान्यता प्रक्रिया बंद करण्यात येऊ नये.
  4. औपचारिक सुनावणी न करता आणि नैसर्गिक न्यायाचे तत्त्व न पाळता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कोणत्याहीविकसक किंवा प्रकल्पाला काम थांबविण्याची नोटीस देता कामा नये.
  5. बांधकामपरवानगी विभागातील राजकीय सहभाग संपूर्णपणे नष्ट करा. नकाशे मंजूर होण्याआधीच ब्लॅकमेलर्स आणि नगरसेवकांना विकसकांच्या फायली मिळण्याचे काही कारण नाही. समान नागरिक म्हणून निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनाही कागदपत्रे मिळण्यासाठी माहिती अधिकार वापरावा लागेल आणि प्रकल्पांच्या योजनांची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट बोलविण्याचे अधिकार त्यांना नसावेत.

 

“क्रेडाईने असंख्य प्रसंगी हे सांगितले आहे, की प्रकल्प सुरू करण्यापूर्वी, प्रकल्पाचे बांधकाम करताना तसेच वहिवाट प्रमाणपत्र मिळविताना परवानगीसाठी लागणाऱ्या विलंबामुळे होल्डिंग कॉस्ट वाढून रिअल इस्टेट आणि सदनिकांचे खर्च वाढत आहेत. आमचे मुद्दे मांडण्यापूर्वी उच्च स्तरावर अनेकदा बैठका झाल्या तरीही एक खिडकी परवानगी हे अद्याप स्वप्नच वाटत आहे. अशी धोरणे आणि सरकारी अनास्था यांमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये वैफल्य आणि तणाव वाढत आहे. असा ताण आत्महत्येकडे घेऊन जातो. एक विकसक म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यायची आहे आणि अखेर सामान्य माणसावर परिणाम करणाऱ्या अशा मुद्द्यांसाठी संघर्ष करायचा आहे,” असे मत शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, की राष्ट्रीय क्रेडाई, महाराष्ट्र क्रेडाई आणि क्रेडाई पुणे मेट्रो तसेच क्रेडाईच्या विविध शाखा एकत्र बसून पुढील कृतीची दिशा ठरवू.

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल के. एस. बी. पम्पस लिमिटेडमधील कामगार भगवान मारुती वायाळ सन्मानित

0

unnamed unnamed1

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिनानिमित विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल के. एस. बी. पम्पस लिमिटेडमधील कामगार भगवान मारुती वायाळ यांचा सन्मान करण्यात आला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भक्ती शक्ती स्मारकाचे स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .

   भगवान मारुती वायाळ यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे ” गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ” मिळाल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले . भगवान वायाळ हे युनिटी फॉर फ्रीडम फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष , एकता तरुण मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते . तसेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते .  गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतात , तसेच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , गुणवंत कामगार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे . स्वछता अभियान , वृक्षारोपण कार्यक्रम देखील घेण्यात आलेले आहे .

  या सन्मान सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे  , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शंकुतला धराडे , आझम पानसरे , आमदार महेश लांडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते .

रंगूनवाला फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक संधिवात दिनानिमित्त मोफत ‘फिजिओथेरपी’ शिबिराचा 76 रूग्णांना लाभ

0
पुणे :
 ‘एम.ए.रंगूनवाला फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये जागतिक संधिवात दिन साजरा करण्या आला. या दिना निमित्त मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये 76 रूग्णांनी लाभ घेतला.  या शिबिरा अंतर्गत फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांनी रूग्णांना मोफत सल्ला व व्यायामाबाबत मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये मान दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, अर्धांगवायू आदी प्रकारच्या व्याधी असलेल्या रूग्णांना व्यायामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर ‘महाराष्ट्र मेडिकल आणि रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ.एन.वाय.काझी आणि डॉ.अरीफ मेनन (सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रोनिका अगरवाल (‘एम.ए.रंगूनवाला फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्याल) यांनी शिबिराचे संंयोजन केले.
शिबिरामध्ये रूग्णांना मार्गदर्शन करताना डॉ.एन.वाय.काझी म्हणाले, ‘संधिवात ही एक सामाजिक समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात मधूमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या विविध आरोग्य समस्या वाढल्या आहे. या बरोबरच लहान वयात संधिवात ही व्याधी देखिल वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये तासन्तास एकाच जागी बसून काम करणे, जंकफूडचे वाढते प्रमाण यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. यालठ्ठपणामुळे सांध्याची झीज लवकर होते.यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराचे योग्य प्रमाण याचा समतोेल आवश्यक आहे.’
rsz_1logo-for-portal

“श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार” डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रदान

0
कुंभार समाजातर्फे दिला जाणारा “श्री  संत शिरोमणी गोरोबा काका  पुरस्कार” बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते विश्वशक्ति इंटरनॅशनल फाउंडेशन चे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रदान करण्यात  आला.यावेळी आ.मेधा कुलकर्णी,आ.बाळा भेगडे,सौ.टिळेकर,संतोष कुंभार यांची उपस्थिती होती .

नऊचा पाढा नवरात्रीचा झी मराठीची अनोखी स्पर्धा

0

गणेशोत्सवाचा जल्लोष संपला की सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे. दुर्गामातेच्या पुजेचा हा सण आपण स्त्रीशक्तीचं प्रतिक म्हणून साजरा करतो. घटस्थापना ते दस-यापर्यंत सर्वत्र धामधूम असते ती देवीच्या जागराची. सुख, समृद्धी आणि मांगल्याच्या या सणात अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात, नव्या वस्तूंची खरेदी, व्यवहार या मुहूर्तावर करण्यात येतात. अशा या शुभमूहुर्ताच्या सणाप्रसंगी आता झी मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार आहे दररोज पैसे जिंकण्याची संधी ‘नऊचा पाढा नवरात्रीचा’ या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला सुरूवात होत असून यामध्ये ६.३० ते ११ या वेळेत दर अर्ध्या तासाला एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. हा प्रश्न त्यावेळी सुरू असलेल्या कार्यक्रमाशी संबंधित असेल ज्यासाठी दोन पर्यायही देण्यात येतील. यातील अचूक उत्तर देणा-या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे ९९९९ रूपयांचं बक्षिस.

नवरात्रीचा हा सण झी मराठीवर अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे. झी मराठीवरील विविध मालिकांमधून स्त्रीशक्तीचं आणि देवीच्या विविध रूपांचं दर्शन तर घडणार आहेच सोबतच ही स्पर्धाही रंगणार आहे. झी मराठीवर संध्याकाळी ६.३० ते रात्री ११ या वेळेत प्रसारित होणा-या मालिकांमध्ये म्हणजेच ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘का रे दुरावा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘अस्मिता’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांदरम्यान एक प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्न त्या दिवशी प्रसारित होणा-या भागांशी संबंधित असेल. नवरात्रीमध्ये १३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दर दिवशी असे ९ प्रश्न विचारले जातील ज्याच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी प्रेक्षकांना ९९९९ रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड होणार असून त्यांच्या नावांची घोषणा दस-याच्या दिवशी झी मराठीवरून करण्यात येईल.