Home Blog Page 3545

मनमोहक पुष्परचनेतून फुलली रसिकांची मने- ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे महिलांसाठी स्पर्धा व प्रदर्शन

0

unnamed1

पुणे :-विविधरंगी आकारांमध्ये करण्यात आलेली आकर्षक पुष्परचना… फुलांचा

मनमोहक दरवळ… मनाला प्रसन्नता प्रदान करणाऱ्या गुलाबापासून ते

अॅस्टरपर्यंत मांडण्यात आलेल्या फुलांनी रसिकांची मने अक्षरश: फुलून गेली

होती. निमित्त होते ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे भरवण्यात आलेल्या

पुष्परचना प्रदर्शनाचे.   .गुलाब, ऑर्किड, जरबेरा, लास्पर, शेवंती, आदी फुलांचा तसेच

लिलीची पाने, सायकस, केवडा यांची अचूक सांगड घालून केलील्या

मनमोहक कलाकृती पाहण्यास सर्वांनी एकच गर्दी केली.

या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन पुष्परचना सादर केल्या.  सरोज

जोशी आणि शीला वाघोलीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.  स्पर्धेतील पुष्परचना

पाहण्याची सर्वांनी संधी मिळावी यासाठी स्पर्धेनंतर लगेचच प्रदर्शनही भरवण्यात

आले. ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. अश्विनी देशपांडे, सौ.

भाग्यश्री कुलकर्णी व सौ. तन्वी कुलकर्णीयादेखील उपस्थित होत्या.डॉ. चारुलता

बापये यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी त्यांनी प्रत्येक स्पर्धकाकडून

आपल्या आपल्या पुष्परचनेमागची संकल्पना समजून घेण्यावर भर दिला.

डॉ. चारुलता बापये यावेळी म्हणाल्या, महिलांनी आपल्या कल्पकतेतून या

दर्जेदार कलाकृती केल्या आहेत ,याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पुष्परचना

दिसायला सोपी वाटते परंतु यात अनेक बारकावे असतात ते समजून घेवून

त्याकडे छंद म्हणून पाहण्यापलीकडे जाऊन या क्षेत्राचे व्यावसायिक दुष्टीकोनातून

वाढलेले महत्व लक्षात घेऊन त्यासाठी स्वत:ला अधिकाधिक तयार करणे गरजेचे

आहे.

कला सादर करताना मिळणारा आनंद महत्वाचा त्यातून आपण काय शिकलो

आणि कुठे कमी पडलो हे जाणून घेणे म्हणजेच खर्या अर्थाने प्रगती करणे

आहे.  पुष्परचना करताना मिळाला आनंद हा पुरस्कारापेक्षा कितीतरीपट प्रेरणा

देणारा असतो. अशी भावना परिक्षक सरोज यांनी व्यक्त केली.

ज्योती कुलकर्णी यांनी समाजातील इतर महिलांसाठी विविध संधी देण्यासाठी

त्यांनी परिश्रम घेतले होते. त्यांचा कार्याला पुढे नेण्यासाठी आम्ही ह्या फौंडेशनची

स्थापना केली आहे.दैनंदिन आयुष्यातून आपल्या छंदासाठी  एक व्यासपीठ

मिळावे या उद्देशाने खास महिलांसाठी हा खास उपक्रम राबविला होता.   अशी

भावना सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यापुढे

म्हणाल्या ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कृषी, उद्योग, पर्यावरण या

क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणा-या महिलांनाही २७ ऑक्टोबरला पुरस्कार देऊन

सन्मानित करण्यात येणार आहे.  स्त्रियांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी घेण्यात

आलेल्या ज्योती फुलराणी या स्पर्धेतील विजेत्या महिलांनाही त्याच

दिवशी  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत .

कल्पना कृतीत उतरवल्याशिवाय त्याला परिपूर्णता मिळत नाही त्यामुळेच प्रत्येक

स्त्रीने आपल्यातील कलागुणांना ओळखून त्या जोपासून स्वत:चे अस्तित्व

निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे असा मोलाचा सल्ला यावेळी  सौ. तन्वी

कुलकर्णी यांनी दिला.  सूत्र संचालन सौ. दीपाली जोशी यांनी केले.

‘ ये है साई का दरबार’ने केले वातावरण भक्तिमय

0

पुणे- शिर्डीच्या साईबाबांवर रचलेल्या विविध रचनांचे,त्यांच्या हयातीतील अनेक प्रसंगांचे नाट्यरूपी

सादरीकरण यामुळे श्री गणेश कला क्रीडा रंगमंचाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी रात्री बबलू दुग्गल दिग्दर्शित ‘ये है

साई का दरबार’ हा श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाबांच्या

हयातीत शिर्डीमध्ये घडलेल्या प्रसंगांचे नाट्यरूपी सादरीकरण व त्याला बाबांच्या नामस्मरणाची जोड यामुळे

सर्व प्रेक्षकांना १८ व्या शतकात गेल्याचा भास होत होत होता. ‘जब खिडकी खोलु  तो तेरा दर्शन हो जाये ’..,,,

‘ओम साई नमो नम:..श्री सद्गुरू साई नमो नमः.., असा साईबाबांचा जयजयकार, खंडोबा रायाचा अविष्कार,

स्पृश्य- अस्पृश्यतेचा भेद नष्ट करणारा प्रसंग, विविध चमत्कार आणि बाबांचा ‘ सबका मलिक एक’चा संदेश

देणाऱ्या नाट्यरूपी  प्रसंगांशी  समरस  होऊन  व  टाळ्या वाजवून दाद प्रेक्षकांनी दिली.

पुणे  नवरात्रौ  महोत्सवाचे कोषाध्यक्ष  नंदकुमार बानगुडे व राजेंद्र बागुल यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार

करण्यात  आला.

पुणे  नवरात्रौ  महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत यांनी सुत्रसंचालन  केले.

राजकारणाचा नव्याने पट मांडावा लागेल —-भाई वैद्य

0

पुणे- वाजपेयींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारसह सन २०१४ पूर्वीचे राजकारण आणि २०१४ नंतरचे राजकारण

या मध्ये जमीन अस्मानाचा फरक असून आता देशातील राजकारणात काळाकुट्ट नभ दाटून आले आहे असे सांगत आता

राजकारणाचा संपूर्ण पटच बदलला आहे असे मत जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर आपला

देश वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरु झाला मात्र  त्याला आता वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरुअ सून

राजकारणाचा नव्याने पट मांडावा लागेल असेही ते म्हणाले.

पुणे नवरात्रौ महोत्सवामध्ये दिला जाणारा यंदाचा ‘महर्षी पुरस्कार’ जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना राज्याचे माजी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन

पाटील, जेष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजाक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल,

माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, विठ्ठल लडकत, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, गोपाल

तिवारी, नरेंद्र व्यवहारे, प्रा. प्र.ल. गावडे, डॉ. विनोद शहा, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्य्क्षा कमल व्यवहारे, पुणे

नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा  सौ. जयश्री बागुल, डॉ. अभिजित वैद्य व सौ. वैद्य आदी यावेळी उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, चांदीची श्री महालक्ष्मीची मूर्ती, मानपत्र व रोख ११ हजार रुपये असे या पुरस्क्राचे स्वरूप

आहे.

भाई वैद्य म्हणाले, सध्या नवरात्रौ महोत्सव सुरु आहे. देवी दैत्याला मारते हे राजकारणच आहे. राजकारणातही दैत्य

आहेत. त्यामुळे मी राजकारणावर भाष्य करीत आहे. स्वातंत्र्याच्या काळात राजकारणाने संपूर्ण वातावरण भारलेले होते.

तेव्हापासून मी राजकारण पहातोय, अनुभवतोय. आत्ताच्या राजकारणाचा संपूर्ण पटच बदलला आहे. आता अल्पसंख्यांक

भयभीत झाले आहेत. फादर दिब्रिटो, नसुरुदिन शहा यांना भीती वाटणे ही लज्जास्पद बाब आहे. आता तुम्ही आमच्याकडे

या आम्ही तुमच्याकडे येतो असे राजकारण न करता एका  उजवी विचारसरणीविरुध्द   व दुसर्या बाजूला सर्वांना एकत्र

येवून आघाडी करावी लागेल. काही पक्ष हे सिद्धांतवाडी पक्ष आहेत, कॉंग्रेसलाही त्यांच्या वागण्यातील विचारांचा

फेरविचार करावा लागेल असे ते म्हणाले. कॉंग्रेसला उदारमतवादी धोरणाचाही फेरविचार  करावा  लागेल. गेल्या तीन

वर्षात १.२५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असेच धोरण राहिले तर पुढच्या तीन वर्षांत १ कोटी शेतकर्यांनी

आत्महत्या करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे खाजगीकरण झाल्याने त्यामाध्यमातून शिक्षण क्षेत्रात

पुन्हा चातुर्वर्ण पद्धती दुसर्या मार्गाने येऊ घातली आहे. त्याचा कॉंग्रेसने विचार करायला पाहिजे. काळ मोठा

आव्हानात्मक आहे. संपूर्ण वातावरण, दडपशाही, भीतीचे झाले आहे. त्याची जाणीव साहित्यिकांना झाल्याने त्यांनी

आपले पुरस्कार परत केले. राजकारण्यांना उशिरा जाग येते .नेतृत्वासाठी पक्ष हा विचार बाजूला टाकला पाहिजे व या

वातावरणा विरोधात सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाई वैद्य यांनी केलेला काळ्या ढगांचा उल्लेख ही गंभीर बाब आहे. त्यावर विचार व चिंतन

केले पाहिजे. देशात समतेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला मात्र, त्याला छेद दिला जात आहे.

त्याविरुध्द सर्वांनी एकत्र येवून आंदोलन करावेच लागेल.

भाई वैद्य यांनी आपल्या राजकीय जीवनात वावरताना विचारांशी प्रतारणा केली नाही. तसे केले असते तर त्यांना

राजकीय लाभ उठवत सत्तेपासून खूप काही मिळवता आले असते मात्र त्यांनी तसे केले नाही. सामान्य माणसाच्या

अन्यायाविरुध्द  लढण्यासाठी आयुष्य खर्ची करणारे भाई वैद्यआजही  आंदोलने करतात. त्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ

नसतो. समाजाचे वाईट होऊ नये असे विचार करणारे भाई वैद्य हे अजातशत्रू आहेत असे गौरोदगार त्यांनी काढले.

उल्हास पवार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिलेले भाई वैद्य हे व्यक्तिमत्व आहे. ते अजूनही आंदोलने

करतात. ते एक उत्तुंग व स्वच्छ चारित्र्य असलेले नेते आहेत. आंदोलन कोण करतो याला महत्व असते. भाई वैद्य यांनी

आंदोलन केल्यानंतर शत्रूदेखील त्यांच्याबद्दल शंका घेणार नाही. संघटन, प्रबोधन आणि मग आंदोलन या तीन गोष्टी

महत्वाच्या असतात. भाई वैद्य यांनी आयुष्यभर प्रबोधन केले, संघटन केले व मग आंदोलने केली असे ते म्हणाले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले भाई वैद्य हे पुण्याचे वैभव आहे. निष्कलंक,

चारित्र्यवान असलेल्या भाई वैद्यांना निष्कलंक असलेल्या माजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे

हा दुग्ध शर्करा योग आहे.

मोहन जोशी, अंकुश काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या प्रास्ताविकपर  भाषणात आबा बागुल म्हानले, विचार, संघर्ष व संघटन अशा त्रिसूत्रीचे दर्शन भाई वैद्य यांच्या

व्यक्तीमत्वात होते. त्यांना हा पुरस्कार देताना आपल्याला मनस्वी आनंद होतो आहे.

मानपत्राचे वाचन प्रा. सविता महाजन यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केल तर आभार घनश्याम

सावंत यांनी मानले. शेवटी संपदा वाळवेकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

ते आठ दिवस’ चे फर्स्ट लूक लॉन्च

0
लग्नासारखा एक मजेदार आणि धमाकेदार विषय असलेल्या ‘ते आठ दिवस’ या सिनेमाचं फर्स्ट लूक लॉन्च नुकतंच मोठ्या दिमाखात करण्यात आलं. या सिनेमातून एक वेगळा आणि चांगला विषय मोठ्या कलाकारांसह बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूक लॉन्चला यावेळी सिनेमातील स्टारकास्ट आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नव्या कलाकारांचा बहारदार अभिनय यातून बघायला मिळणार आहे. येत्या ३० ऑक्टोबरला हा सिनेमा महाराष्ट्रातील विविध सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे.
unnamed unnamed2
ही कथा आहे एका स्त्रीची जी अठरा वर्षांनंतर परत येते. आपल्या मुलीसाठी…एका अशा स्त्रीची जी आपल्या नव-याची, आपल्या मुलीची, आपल्या कुटुंबाची क्षमा मागून पुन्हा त्यांच्यासोबत राहण्यास आली आहे. आणि ही गोष्ट आहे एका मुलीची, जी अचानक लग्नाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तिच्या मनात आपल्या भविष्याविषयी असंख्य प्रश्न आहेत.
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातला एक असा सोहळा आहे, ज्याच्या चांगल्या आणि वाईट आठवणी नेहमीसाठी मनात घरून राहिलेल्या असतात. अशाच एका लग्नाची गोष्ट धमाकेदार गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मस्त कथेला उत्तम कलाकारांचीही साथ मिळाली आहे. श्याम स्वर्णलता धानोरकर दिग्दर्शित या सिनेमात लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे, तुषार दळवी, आरोह वेलणकर, दिपाली मुचरीकर, सुनील जोशी, अतुल तोडणकर, मीना सोनवणे, अभिलाषा पाटील, सुहासिनी परांजपे, अभिषेक देशमुख, आशय कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी, रमेश सोळंकी यांच्या भूमिका असून आशुतोष गायकवाड या बालकलाकाराचीही भूमिका आहे.
सिनेमाची निर्मिती श्वेता स्नेहल सुधीर जाधव, किशोर धारगलकर आणि शेखर प्रधान यांनी केली असून शशांक केवळे यांनी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. सिनेमातील गीतांना विकास भाटवडेकर यांनी संगीत दिले असून सौमित्र यांची गीते आहेत. तर पार्श्वसंगीत पंकज पडघन यांनी दिले आहे. सिनेमातील गाण्यांची कोरिओग्राफी आदेश वैद्य यानी केली असून छायाचित्रण नवनीत मिसार यांचं आहे. तर कला दिग्दर्शन चेतन शिकरखाने यांचे आहे.

कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये सी.एस. आर. सर्टिफिकेट अभ्यासक्रम

0
 
पुणे :
कर्वे समाजसेवा संस्थेच्या सी. एस. आर. विभागातर्फे सर्टिफिकेट प्रोग्राम इन सी.एस.आर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी ही माहिती दिली.
कंपन्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत नफ्याच्या दोन टक्के भाग सामाजिक उपक्रमासाठी देण्यास सुरुवात झाली आहे. नव्या कायद्यानुसार अंमलबजावणी होताना सी. एस. आर. कार्यक्रमांचे देखरेख, मूल्याकंन, अहवाल याविषयी काम करू शकणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याची गरज आहे.
‘मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स’द्वारा स्थगित संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्पोरेट अर्फअर्स’च्या संयुक्त विद्यमाने कर्वे समाजसेवा संस्था हा सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू करीत आहे.
9 महिन्यांचा हा अभ्याक्रम ऑनलाईन स्वरूपाचा आहे. क्षेत्रकार्य, प्रशिक्षण, मार्गदर्शन, संवाद याचाही समावेश आहे.
नोंदणीसाठी 30 नोव्हेंबर 2015 ही अंतिम तारीख असून, 020-65007565  किंवा csrcellkinss@gmail.com संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
rsz_1logo-for-portal

‘ऐलमा पैलमा गणेश देवा……’ ‘निवारा’ वृध्दाश्रमातील महिलांनी चतुःशृंगीच्या यात्रेत धरला फेर…

0

पुणे ‘ऐलमा पैलमा गणेश देवा….’, ‘कारल्याचा वेल लावं गं सुने….आता तरी जाऊ का माहेरा’ आणि ‘असं कसं झाल माझ्या नशिबी आलं….’ अशा पारंपरिक गीतांवर ‘निवारा’ वृध्दाश्रमातील महिलांनी चतुःशृंगीच्या यात्रेत फेर धरला आणि त्या बालपणीच्या आठवणीत रमून गेल्या. गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळ आणि चतुःशृंगी देवस्थान ट्रस्टने हा ‘आजीबाईंच्या भोंडला’ आयोजित केला होता. उपक‘माचे हे पाचवे वर्ष होते. नंतर सर्व महिलांसाठी देवीच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
स्मरणरंजन आणि आनंदाने आजीबाईंच्या चेहर्‍यावर कृतार्थाची भावना होती. ‘निवारा’च्या व्यवस्थापिका निर्मला सोवनी म्हणाल्या, ‘नवरात्रीची चाहूल लागली की सगळ्याच महिलांना भोंडल्याच्या दिवसाची चाहूल लागते. देवीच्या दर्शनाला येण्यासाठी त्या उत्सुक असतात. भोंडल्याचा आनंद घेतात. बालपणीच्या आठवणी दाटून आल्याची भावना आणि आनंद त्यांच्या चेहर्‍यावर तरळत असतो. ’
सारीका धुमाळ, नंदा माने, दीपा सुपेकर, नंदा मोहीते, सुवर्णा कानिटकर, माया वाईकर, सरला नांगरे, रंजना पवार यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.

आईस फॅक्टरीमध्ये 10 लाखांची वीजचोरी उघडकीस; गुन्हा दाखल

0

पुणे : मामुर्डी (ता. हवेली) येथील मे. दीपक आईस फॅक्टरीमध्ये 71 हजार 213 युनिट्‌सच्या 10 लाख 48 हजार

350 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत मामुर्डी येथील प्लॉट क्र. 371 मधील मे. दीपक आईस फॅक्टरी

हा कारखाना वीजग्राहक शिरीष हिराचंद शाह यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण

झाल्यानेᅠवीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटरच्या संचातील सीटी ही वीजयंत्रणा परस्पर व

वीजचोरीच्या हेतूने बदलल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणची जुनी व फेरफार केलेली सीटी यंत्रणा गायब केल्याचे

आढळून आले. मे. दीपक आईस फॅक्टरीमधील वीजमीटर व सिटी यंत्रणा पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे. सदर

कारखान्यात 71 हजार 231 युनिट्‌सच्या 10 लाख 48 हजार 350 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.

या वीजचोरीप्रकरणी मे. दीपक आईस फॅक्टरीचे मालक शिरीष हिराचंद शाह विरुद्ध बुधवारी (दि. 16 ऑक्टो.)

रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135अन्वये गुन्हा दाखल

झाला आहे.

‘वास्तु प्रदर्शनाचा ग्राहकांना लाभ’ – महेश झगडे

0

पुणे: “सर्व प्रकारच्या वास्तु  या प्रदर्शनामुळे एकाच मंचावर उपलबद्ध झाल्याने ग्राहकांना वास्तु निवडण्यास सोपे होईल. तसेच अधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून वास्तु घेणे हे केव्हाही हिताचेच आहे  व क्रेडाई सारख्या अधिकृत संघटनेने या प्रदर्शनाचे आयोजन केल्यामुळे ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. ” असे मत प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी उदघटनाच्या वेळी व्यक्त केले. 
 
क्रेडाई पुणे – मेट्रोचे पुण्यातील पश्चिम विभागीय वास्तु प्रदर्शनाचे ऑंर्कीड हॉटेल, बालेवाडी येथे प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. ‘आदित्य बिल्डर्स’ , ‘बी. यु. भंडारी लॅण्डमार्क्स’, ‘फरांदे प्रोमोटर्स अॅण्ड बिल्डर्स’, ‘अमित ऋजुता व्हेनच्युअर्स’,  ‘गोयल गंगा कंस्ट्रक्शन्स’  अशा ९० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, ५०० हून अधिक वास्तू आणि देशातील अग्रेसर बँकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. आजच्या ट्रेंडला साजेल असे हे प्रदर्शन असल्याने, वास्तू घेण्यासाठी किंवा पैशांची गुंतवणूक करण्यासाठी ही मोठी संधी येथे उपलब्ध झाली आहे. १७ व १८ ऑक्टोबर असे दोन दिवस सुरु असणाऱ्या या प्रदर्शनात सदनिका, प्लॉट्स, शॉप्स आणि बंगलोज अशा विस्तृत पर्यायामधून ग्राहक आपल्यासाठी योग्य वास्तू निवडू शकणार आहेत.
“आपले स्वतःचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते परंतु आपण नेमके कुठे व कशी गुंतवणूक करावी हे अनेकांच्या ध्यानात येत नाही. आज ग्राहकांसाठी या प्रदर्शना मार्फत अनेक मोठे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये वास्तूंवर व्याजाच्या तसेच इतर सवलती असल्यामुळे ग्राहकांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा.” असे मत क्रेडाई पुणे- मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल फरांदे यांनी व्यक्त केले.

हास्य, वेदना, सामाजिक प्रबोधन आणि राजकीय विडंबनाने गाजले हास्यधारा

0

 

पुणे—राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला

लावणारे राजकारणातील वास्तव, पाणी, जमिनीच्या प्रश्नावरून काव्याद्वारे मांडलेली वेदना, तंत्रयुगात संपत

चाललेले मानवी संबंध, बदललेली परिस्थिती, यांवर केलेल्या रचना, श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या

कडकडाटात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत

केलेले सूत्रसंचालन यामुळे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी पुणे नवरात्रौ महोत्सवातील ‘हास्य धारा’

या मराठी कवी संमेलनाचा कार्यक्रम गाजला.

विद्रोही कवी संभाजी भगत यांच्या

बया पहाटेच्या ग बारी

कुणी नव्याने गाणी गातो…

नव्याने गाणे गातो अन,

धक्का चावडीला देतो ग माझे माई… या खेड्यातील आणि शहरातील काम करणाऱ्या

महिलांवरील रचनेला आणि

‘नाही हिंदू मारिला, नाही मुस्लीम मारिला

माणूस मारिला त्यांनी माणूस मारिला…

या धर्मद्वेषावर आधारीत रचनेला तसेच

सालो साल पेरलं आणि मातीतच जिरल

पाटीवर पेरलं तर त्याची फुलं होतात

पुस्तकं पैशांची झाडे होतात.

ही प्राचार्य सुरेश शिंदे यांनी शिक्षणामध्ये झालेले बदल व संगणीकरण यावर आधारित दोन पिढ्यांच्या

कवितेला  तर

भारत दौंडकर यांच्या

गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आला गळ्यात

पण, एक प्लेट मातीचा वास हुंगण्यासाठी रक्त येईल डोळ्यात

या अंतर्मुख करायला लावलेल्या ‘गोफ’ या रचनेने प्रेक्षकांनी दाद दिली.

अशोक नायगावकर यांनी त्यांच्या नेहेमीच्या विनोदी शैलीत

सतत मुलांमध्ये वावरल्याने, शिक्षक बाल बुद्धीचेच राहतात

अशा प्रकारच्या रचना व किस्से सादर करून प्रेक्षकांची माने जिंकली.

साहेबराव ठाणगे यांनी जागतिकीकरनामुळे झालेल्या परिस्थितीच्या बदलावर रचलेल्या

हरवला माझा गवताचा गाव, साधा भोळा माणसांचा

कुलदेवतांचा आंधळा अंगारा, नात्यांचा निवारा देशोधडी

या  अभंगाला

तर अरुण पवार यांच्या

पांढरं सोन पिकवलं  ते मातीमोल विकू

आणि विकतं ते पिकवलं  तर म्हणता तुम्ही अफू

मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू..

या मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर बदललेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या रचनांनी प्रेक्षकांना

अंतर्मुख केले.

प्रकाश बोडके यांच्या

गढूळल्या दाही दिशा, कडू झाली सारी बारी  आणि

धुवून वापरा घरी पावसाचे पाणी …

या सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या रचनेला आणि

नारायण सुमंत यांच्या

सावळ्या तनुवर, तुझ्या हिरवी पैठणी

सोनसळी बंद, वर गच्च टपोरे असे फुलांचे गेंद

ही काळ्या मातीला मातेची उपमा देवून केलेली लावणी  तसेच

अरुण म्हात्रे यांच्या

कवीला कधीही आपले म्हणू नये

नात्यामध्ये ही त्सुनामी आणू नये

जातात पक्षी उडुनी पहा शेवटी

काळीज कातून घरटे विनू नये

या रचनेला प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

तुकाराम धांडे यांच्या भूगोल या जमिनीचे महत्व सांगणाऱ्या कवितेला व अस्मिता जोगदंड यांच्या स्रीचे महत्व

सांगणाऱ्या ‘बाई’ या कवितेलाही प्रेक्षकांनी दाद दिली.

शाहीर संभाजी भगत यांचा जेष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार व नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष

उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. इतर सर्व कवींचा सत्कार नरेंद्र व्यवहारे,

बंडू नलावडे, संजय निकम, मनोजशेठ कुदळे, वसंत दुर्गे, अॅड. चंद्र्शेखर पितळे, नामदेव बारापत्रे, रमेश भंडारी,

अमित बागुल, विकी खन्ना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घन:श्याम सावंत

यांनी केले.

कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

0
 
पुणे :
‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट (तएऊअ) आणि‘स्कूल ऑफ आर्ट’ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘विंटर शो’ कलाप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले होते. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम यांनी उद्घाटन केले.
‘विंटर शो’ नावाने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे मांडण्यात आली होती. विविध राज्यांतून 600 जणांनी स्पर्धेत भाग घेतला. त्यातून 150 चित्रे निवडण्यात आली.
पारितोषिक वितरण 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती ऋषी आचार्य (‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(तएऊअ) महाविद्यालयाचे प्राचार्य ), प्रा. भारत लोंढे यांनी दिली.

झी मराठी अवॉर्ड २०१५ चा भव्य सोहळा थाटात संपन्न नऊ पुरस्कार पटकावत ‘का रे दुरावा’ ने मारली बाजी

0

आपल्या अनेकविध दर्जेदार कार्यक्रमांनी मराठी रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणजे झी मराठी. या वाहिनीवर आणि इथे सादर होणा-या कार्यक्रमांवर त्यातील कलाकारांवर रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. आपल्या आवडत्या मालिकांबद्दल, कलाकारांबद्दल प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया कळवतच असतात पण त्यांच्या पसंतीची पावती ख-या अर्थाने मिळते ती झी मराठी अवॉर्डच्या माध्यमातून. ‘उत्सव नात्यांचा अतूट मैत्रीचा’ या संकल्पनेने यावर्षीच्या झी मराठी अवॉर्डच्या नामांकनाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती आणि याच उत्सुकतेने आणि उत्साहाने याही वर्षीचा हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यंदा तब्बल नऊ पुरस्कार पटकावत बाजी मारली ती ‘का रे दुरावा’ या मालिकेने . तर ‘जय मल्हार’मधील खंडोबाने सर्वोत्कृष्ट नायकाचा आणि म्हाळसा व बानूने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा मान ‘दिल दोस्ती दुनियादारी’ च्या माजघरातील सदस्यांना मिळाला तर या वर्षातील सर्वोत्कृष्ट मालिका ठरली का रे दुरावा.

3

अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडलेला झी मराठी अवॉर्डचा हा भव्य सोहळा येत्या १ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रेक्षकांना बघता येणार आहे.

2 4 5 6

झी मराठीवरील मालिका असो की यातील व्यक्तिरेखा या सर्वांवरच रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. अनेकांसाठी तर ह्या व्यक्तिरेखा म्हणजे आपल्या घरातील सभासदच असतात. कार्यक्रमातील कुटुंबांचा प्रेक्षकही नकळत भाग बनतात त्यामुळेच त्यात घडणा-या घटनांची चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळते. त्यामुळेच श्री जान्हवीसोबत गोखले कुटुंबियांवर रसिक जेवढे प्रेम करतात तेवढाच शशीकलाचा तिरस्कार करतात. जय अदितीच्या दुराव्यातील प्रेमाचं लोकांना अप्रुप वाटतं तर त्यांच्यामध्ये येणा-या रजनीला असं न करण्याचा सल्लाही घरबसल्या देतात. खंडेराया, म्हाळसा, बानू यांची मनोभावे आराधना करतात तर ‘चला हवा येऊ द्या’ च्या थुकरटवाडीत जाऊन मनमुरादपणे हसतात. प्रेक्षकांच्या या प्रेमाने त्या व्यक्तिरेखांना आणि कलाकारांनाही नवीन उर्जा मिळते. याच प्रेमाचा आणि उर्जेचा अनोखा संगम बघायला मिळाला तो झी मराठी अवॉर्डमध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धा अतिशय चुरशीची होती आणि प्रेक्षकांसाठीही ती एकप्रकारे कसोटीच होती. नायकामध्ये श्री, जय, नील आणि खंडोबा समोरोसमोर उभे ठाकले होते तर आपल्या लोभस अभिनयाने सर्वांना भुरळ घालणा-या जान्हवी, अदिती, स्वानंदी, म्हाळसा आणि बानू सर्वोत्कृष्ट नायिकेच्या स्पर्धेत होत्या. पण यात बाजी मारली ती खंडोबा आणि म्हाळसा व बानूने.

एकत्र कुटुंबव्यवस्था आणि त्यातील मूल्यांची जपवणूक करणे या गोष्टी कायम झी मराठीच्या सर्वच मालिकांमधून बघायला मिळतात. यामुळेच यातील प्रत्येक कुटुंबावर रसिक मनापासून प्रेम करतात. यावर्षी जहागिरदार आणि देशपांडे कुटुंब (नांदा सौख्य भरे), खानोलकर कुटुंब(का रे दुरावा) गोखले कुटुंब (होणार सुन मी ह्या घरची) ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या माजघरातील कुटुंब आणि ‘चला हवा येऊ द्या’ कुटुंब यांच्यामध्ये स्पर्धा होती. यामध्ये दिल दोस्ती दुनियादारीच्या कुटुंबाला सर्वाधिक पसंती देत सर्वोत्कृष्ट कुटुंबाचा मान प्रेक्षकांनी दिला. या स्पर्धेत सर्वात जास्त उत्सुकता होती ती लोकप्रिय मालिकेची. ‘का रे दुरावा’, ‘जय मल्हार,’ ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अस्मिता’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ अशा सहा मालिका यंदा स्पर्धेत होत्या. यासाठी ख-या अर्थाने चुरशीची स्पर्धा रंगली. खरं तर ही प्रेक्षकांसाठीही मोठी कसोटी होती कारण या सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये तेवढ्याच लोकप्रिय आहेत शिवाय त्यांच्या जिव्हाळ्याच्याही आहेत. या सर्वांत बाजी मारत ‘का रे दुरावा’ मालिकेने यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा बहुमान मिळवला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा मान ‘चला हवा येऊ द्या’ने मिळवला.

झी मराठी अवॉर्डचा हा देखणा कार्यक्रम याहीवर्षी रंगतदार ठरला तो कलाकारांच्या बहारदार आणि रंगतदार परफॉर्मन्सने. यातही सर्वांचं आकर्षण ठरला तो कपल अॅक्ट. झी मराठीवरील लोकप्रिय जोड्यांनी रोमॅंटिक गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय सर्वात धम्माल आणली ती नवरे, ललिता, वच्छी आत्या, संपदा आणि रजनी यांनी सादर केलेल्या धम्माल नृ्त्याने. सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘कल्लुळाचं पाणी’ आणि ‘शांताबाई’ या गाण्यांवर या सर्वांनी ठेका धरला आणि त्यांच्या सोबतीने सर्व प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले. माजघरातील दोस्तांनी ‘जिंदगी जिंदगी’ आणि ‘करूया आता कल्ला कल्ला’ म्हणत प्रेक्षागृह दणाणून सोडले. कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते आशू आणि कैवल्यचे धम्माल निवेदन. केवळ पोडीयमच नव्हे तर संपूर्ण रंगमंचावर आणि सभागृहावर ताबा मिळवत या दोघांनी या सोहळ्यात आपल्या निवेदनाने, हजरजबाबीपणाने धम्माल रंग भरले.

अतिशय देखण्या आणि रंगतदार पद्धतीने पार पडलेला हा नेत्रदीपक सोहळा येत्या १ नोव्हेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

कारखान्यात रिमोटद्वारे होणारी दुसरी वीजचोरी उघडकीस 27 लाखांच्या वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

0

पुणे, : वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीजवापराची नोंद थांबविणार्‍या चोरीचा दुसरा

प्रकार महावितरणने उघडकीस आणला. नांदेड येथे कमोदिनी आईस प्लँट या बर्फ तयार करणाच्या कारखान्यात रिमोट

कंट्रोलद्वारे होणारी वीजचोरी आढळून आली. या कारखान्यात तब्बल 1 लाख 91 हजार 918 युनिट्‌सच्या 26 लाख 98

हजार 970 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 14) फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, की नांदेड येथील सर्व्हे क्र. 10/11/1/अ मधील मे. कमोदिनी आईस प्लँट हा बर्फाचा कारखाना

वीजग्राहक इंद्गजित बाबासाहेब घुले यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत अद्यावत तंत्रज्ञानाच्या

माध्यमातून केलेल्या विश्लेषणातून संशय निर्माण झाला. त्यामुळे कारखान्यातील वीजयंत्रणेची तपासणी करण्यात आली.

सदर कारखान्यात असलेल्या वीजमीटरच्या यंत्रणेत फेरफार केल्याचे आढळून आले. सिटी सर्कीटमध्ये फेरफार करून त्यात

रिमोट कंट्रोल सर्कीट समाविष्ट केल्याचे दिसून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे

मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून आले. रिमोट कंट्रोलचे सर्कीट अत्यंत छुप्या

पद्धतीने लावल्यानंतरही महावितरणच्या अभियंता व कर्मचार्‍यांनी या वीजचोरीचा छडा लावला. गेल्या 22 महिन्यांच्या

कालावधीत मे. कमोदिनी आईस प्लँटमध्ये 1,91,918 युनिट्‌सच्या 26 लाख 98 हजार 970 रुपयांची वीजचोरी झाल्याचे

सदर कारखान्यातील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक

अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. उदय चामले, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त

कार्यकारी अभियंता श्री. दिलीप कोकणे, श्री. विजय सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता शिवलिंग बोरे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ शैलेश

बनसोडे, राम पवार आदींनी योगदान दिले.

वीजचोरीप्रकरणी कमोदिनी आईस प्लँटचे मालक इंद्गजित बाबासाहेब घुले विरुद्ध बुधवारी (दि. 14 ऑक्टो.) रास्तापेठ

(पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 135 व 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

फोटो नेम व ओळ –  Power Theft Detected 16/10/2015/वीजचोरीसाठी वीजमीटरच्या यंत्रणेत

छुप्या पद्धतीने रिमोट कंट्रोल सर्कीट बसवून केलेल्या वीजयंत्रणेची पाहणी करताना मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे,

अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे व महावितरणचे अभियंता. (फोटो इमेल केला आहे.)

चतुःशृंगी देवीला हिरेजडीत नथ

0

पुणे,  ः पुण्याचे ग‘ामदैवत असणार्‍या चतुःशृंगी देवीला नवरात्रीमध्ये एका भाविकाने हिरेजडीत नथ अर्पण केली. या नथीची किंमत सुमारे सात लाख रुपये इतकी आहे. पु. ना. गाडगीळ आणि कंपनीने ही नथ घडविली.
——

तुमच्याकडे स्टार होण्याचे कौशल्य आहे का ? स्टार बनण्याचा मार्ग झाला आता अधिक सुकर!!

0

लेखक – दर्शन मुसळे  यांच्याकडून …

भारताच्या भविष्याची पुनर्बांधणी करणे हे उद्दिष्ट असणाऱ्या ‘भारत पुनर्निर्माण ‘ यांनी रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. आज भारतापुढील सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे ‘बेरोजगारी ‘. मनोरंजन उद्योगात लाखो महत्वाकांक्षी अभिनेते ,गायक ,लेखक ,नर्तक ,संगीतकार ,कला दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ असे आहेत की ज्यांच्याकडे कौशल्य आहे पण ते सिद्ध करण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. याच क्षेत्रातील या समस्येवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे . ‘मिशल ‘ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या हॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपट निर्मात्या नंदिता सिंघा यांनी ‘भारत पुनर्निर्माण’ च्या माध्यमातून होतकरू आणि योग्य कौशल्याला खरोखरच संधी देण्याची प्रतिज्ञा घेतली आहे . याच संकल्पनेतून त्यांनी ‘ रेड ‘चित्रपटातील प्रमुख कलाकारांपैकी एक कलाकार संजय मौर्य याची निवड केली आणि ‘ रेड ‘ चित्रपट स्वीकारल्यानंतर  त्याची अनेक चित्रपटांसाठी ‘नायक ‘म्हणून निवड झाली. या वर्षी ‘गांधी जयंती”च्या निमित्ताने नंदिता सिंघा यांच्या ‘रेड ‘ चित्रपटाचा टीझर जगभरात प्रदर्शित झाला .हा टीझर म्हणजे  ‘गुन्हा अन्वेषण पत्रकारिता ‘ अर्थात ‘क्राइम जर्नलिझम ‘च्या माध्यमातून महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाला वाहिलेली  आदरांजली आहे. हा चित्रपट बनविताना नंदिता सिंघा यांना एक गोष्ट लक्षात आली की भारतातील विविध भागात खूप उत्तम दर्जाची कला आहे ,कौशल्य आहे आणि अशा लोकांना त्यांच्या चित्रपटात देखील संधी मिळू शकते .
‘नुक्कड नाटक ‘ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जुन्या पारंपरिक पथनाट्य कलेला सुद्धा त्यांना पुनरुज्जीवित करायचे आहे . ‘नुक्कड नाटक ‘ हा आपला पारंपरिक वारसा आहे कारण त्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो . अशा प्रकारे ‘प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील ‘बेरोजगारी ची समस्या सोडवली जाऊ शकते . जे पथनाट्य आणि लोकनाट्य या माध्यमातून आपली कला  सादर करू शकतात त्यांना त्यांचे उपजीविकेचे साधन उपलब्ध होऊ शकते आणि अशा प्रकारे उत्कृष्ट अभिनेत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हॉलीवूड ,बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते .
‘भारत पुनर्निर्माण ‘ या उपक्रमाची संकल्पना नंदिता सिंघा यांची असून त्यांचा भारतातील दिवितीय आणि तृतीय  स्तरातील शहरे ,चतुर्थ स्तरातील नगरे आणि तळागाळातील सर्व गावे येथून खरे कला कौशल्य शोधून काढण्यावर ठाम विश्वास आहे . जी गावे उपजीविका ,आरोग्य ,कुटुंब नियोजन ,स्त्री भ्रूणहत्या ,जातीयता वाद ,हुंडा ,जादूटोणा ,रोगराई अशा सामाजिक  समस्यांशी संबंधित आहेत ,त्यांच्यापर्यंत पोचण्याचा हा पहिलाच उपक्रम असेल .
जे तरुण पदवीधर असून सुद्धा बेरोजगार आहेत आणि दिशाहीन  झाल्याने गोंधळलेले आहेत ,त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो यावर त्यांचा विश्वास आहे. अभिनयाची नैसर्गिक देणगी असणारे अनेक अभिनेते आपण पाहिले आहेत की जे आता या क्षेत्रात मोठे झाले आहेत ,पण लोकांपर्यंत नुसते माहित होण्यास त्यांना दहा वर्षांहून अधिक वर्षे संघर्ष करावा लागला आहे आणि त्यानंतर त्यांना बॉलीवूड मध्ये चांगली भूमिका मिळाली आहे . पथनाट्यात काम करायची संधी देऊन अशा लोकांचा या क्षेत्रातील प्रवास आपण सोपा करूया आणि जर ते खूप चांगले कलाकार असतील ,तर आपल्या अनेक चित्रपटात आपण त्यांना संधी देऊया. त्यामुळे त्यांना जास्त वर्षे या क्षेत्रात संघर्ष करावा लागणार नाही . अभिनयाचे कौशल्य असणाऱ्या  आणि प्रसार माध्यमाच्या विविध  क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अठरा वर्षावरील सर्वाना त्या व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतात आणि मासिक वेतन तत्वावर पगारपत्रिकेवर सुद्धा नियुक्त करू शकतात .तसेच त्यांची टीम या सर्वांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन सुद्धा करू शकते. तेव्हा पालकांनो ,जर तुमचे मुल हे शाळेतील ‘टीनएजर ‘असेल आणि त्यांनी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करावे असे तुम्हाला वाटत असेल तर ‘गेट कनेक्टेड ‘हे त्याचे उत्तर आहे . जर तुमच्या मुलाच्या अंगी अभिनय,गायन ,नृत्य ,कला ,लेखन या क्षेत्राशी संबंधित कोणतीही कला असेल तर तुमची चिंता संपली असे समजा . तुमच्या मुलाच्या कलाकौशल्याला स्टारडम पर्यत नेण्याकरिता जो मार्ग आहेत ,त्यात कोणतेही मध्यस्थ नाहीत . मग वाट कसली पाहता ?’लेट्स गेट कनेक्टेड ‘. कदाचित हे जग ज्या पुढल्या स्टारची प्रतीक्षा करत आहे ,ते तुमचे मुल असू शकते. आम्ही ज्या गोष्टीचा प्रचार करतो ,ते प्रत्यक्षात आणण्याकरिता आम्ही आमच्या दोन्ही वेबसाईट्स अर्थात आमची दोन्ही संकेतस्थळे ‘भारत पुनर्निर्माण ‘ आणि ‘गेट कनेक्टेड ‘ launch करत आहोत.
ही संकेतस्थळे आहेत – www.bharatpunarnirman.com ‘and ‘ www.getconnectedindia.com‘. ‘गेट कनेक्टेड ‘प्रोग्राम साठी ,भ्रमणध्वनी app सुद्धा उपलब्ध आहे .

कव्वाली व सुफी गाण्यांच्या महेफिलीने रंगला पुणे नवरात्रौ महोत्सव

0

पुणे- शेरो शायरी, आवाज, धून ,संगीत आणि विविध भावना व्यक्त करणाऱ्या रचनांनी घायाळ करणाऱ्या फिल्मी

कव्वाली व सुफी गाण्यांच्या महेफिलीने पुणे नवरात्रौ महोत्सवात रंगत आणली.

पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गुरुवारी संध्याकाळी संदीप पंचवाटकर निर्मित फिल्मी

कव्वाली व सुफी गाणांच्या महेफिलीचा ‘जुनून’ या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. गायकांनी गायलेल्या

कव्वाली व सुफी गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत व रुमाल उडवत दिलेली साथ, शिट्या आणि वन्समोअरने रंगमंच

दणाणून सोडले.

‘जमाने मे कहा, तुटी हुई तसबीर बनती है…,’ या कव्वालीने या  कार्यक्रमाचा आरंभ झाला आणि त्यानंतर ‘निगाहे

मिलाने को जी चाहता है ..’, ‘देखते रहेते तुझको सांज सबेरे…’, ‘ दिलने पुकारा और हम चले आये…’, ‘ख्वाजा मेरे

ख्वाजा…दिल मे समा जा..’, ‘ किसी नजर को मेरा आजभी इंतजार है..’,   या प्रेमाचा अविष्कार व्यक्त करणाऱ्या कवाली

व सुफी गीतांनी रसिकांचे कान तृप्त केले.   ‘पडदा है…पडदा है…’,  ‘यारी है ये इमान मेरा यार मेरी जिंदगी…’, ‘झुमका

गिरा रे..’, हे लोकसंगीतावर आधारित गीत, मैत्रीची महती व्यक्त करणारी ‘ यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी..’, ही

कव्वाली, विरह व्यक्त करणारे ‘ओठो पे आई तेरी जान … लंबी जुदाई..’, तर ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो…’, अशा

गीतांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

राजू जाधव, विवेक पांडे या गायकांनी व मेधा परांजपे, सोनाली नांदुरकर या गायिकांनी ही  कव्वाली व सुफी गाणी

गायली. त्यांना तबल्यावर गोविंद कुडाळकर, ढोलकीवर राजन साळवी, ड्रम मशीनवर आसिफ इनामदार तर कीबोर्डवर

सईद खान यांनी साथ दिली.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ.

जयश्री बागुल यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पोस्ट व टेलिकॉम सोसायटीच्या सचिव

सौ. रेखा दैठणकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत,नंदकुमार

कोंढाळकर,  कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, राजू बडगे, अमित बागुल, सागर आरोळे, श्रीकांत बागुल, राजेंद्र

बागुल हे उपस्थित होते.