Home Blog Page 3536

खडक पोलिसांकडून दुष्काळग्रस्तांसाठी १० हजार किलो धान्य रवाना…

0

index1

पुणे- खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळे आणि कार्यकर्ते  यांच्या मदतीने खडक चे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि त्यांच्या  पोलीस सहकार्यांनी यांनी १० हजार किलो धान्य गोळा करून अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी रवाना केले आहे . संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे , उप आयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी तसेच आनंद सराफ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

रणबीर -दीपिकाचा रेल्वे ‘तमाशा’ … पहा फोटो ..

0

2 4 5 6 7 8 9 10 11 index1

“तमाशा‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणनेरेल्वेने प्रवास करण्याचा मार्ग निवडला  आहे  , दिग्दर्शक इम्तियाझ अली यांच्यासोबत ते चक्क रेल्वेने दिल्लीला प्रवास -म्हणजे सुविधा एक्‍स्प्रेसमधून बडोदा, कोटा येथे थांबा घेतल्यानंतर ते थेट राजधानीतजायचे आणि परत ययाचे  . दरम्यान, अभिनेत्यांनी रेल्वेतून चित्रपट प्रमोशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रवासाबाबत मी खूप उत्साही असल्याचे दीपिकाने सांगितले. आम्ही आधी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता, पण ऐनेवळी दीपिकाच्या आग्रहामुळे आता रेल्वेने जातो आहोत, असे रणबीरने स्पष्ट केले.

index index2 index3 index

पुणे म.न.पा मार्फत सी.एन.जी. किट बसविलेल्या रिक्षांसाठी ५ वर्षात साडे अठरा कोटी चे अनुदान वाटप

0

पुणे –

पुणे महानगरपालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे  महापौर दत्तात्रय

धनकवडे यांच्या हस्ते अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक  विनायक हनमघर आणि

रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हवेतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे मनपाच्या वतीने तीन चाकी रिक्षांकरिता प्रदूषण रोखणेसाठी

आणि सी.एन.जी.इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सी.एन.जी. किट बसविलेल्या परमिट धारकांना प्रत्येकी

१२०००/- रू.चे अनुदान देण्यात येते. सी.एन.जी किटकरिता प्रत्येक रिक्षा मालकाच्या नावे रक्कम   रुपये  १२,००० /-

सहाय्यक अनुदान देणेबाबत  मुख्य सभेने ठराव क्र.३६७ दि.२३/०८/२०११ अन्वये मान्यता दिली आहे.

ज्या रिक्षांना सी.एन जी किट बसविलेले आहे व त्याची नोंद आर.टी.ओ.मध्ये केलेली आहे, अशा रिक्षा या

अनुदानास पात्र आहेत. सी.एन.जी.अनुदानाच्या फॉर्मसोबत १)रिक्षांचे आर.सी. चे पुस्तक, २)सी.एन.जी. किट

बसविल्याबाबतची पावती, ३)लायसन्स,४)परमीट,५)फिटनेस सर्टिफिकेट, ६)पी.यू.सी ७) आर.टी.ओ.ओळखपत्र या

कागदपत्रांची तपासणी केली जाते व सदरची यादी आर.टी.ओ. मार्फत तपासणी करून घेण्यात येते.

मागील चार वर्षापासून ही योजना राबविण्यात येत आहे. पुणे मनपातर्फे आजतागायत खालीलप्रमाणे

अनुदान देण्यात आलेले आहे.

आर्थिक वर्ष रिक्षांची संख्या खर्च रु. अनुदान तरतूद

आर्थिक वर्ष -रिक्षांची संख्या- खर्च रु. -अनुदान तरतूद

२०११  १२         १६६०           १,९९,२०,०००/- रु. २ कोटी

२०१२ -१३         ८७३९           १० ,४८,६८०००/- रु. १२ कोटी

२०१३ – १४          १६५०              १,९८,००,०००/- रु. २ कोटी

२०१४ १५             २१६१                २,५९,३२,०००/- रु.२.६० कोटी

२०१५ – १६            ११४०              १,३६,८०,०००/- १.४४ कोटी
एकूण-१५३५० रिक्षा – एकूण खर्च अनुदान १८,४२,०००००/-  अनुदान तरतूद -२0कोटी 4 bmI

पुण्यातील सी.एन.जी. किट  बसविलेल्या तीन चाक़ी  ऑटो  रिक्षांना  सहाय्य अनुदान देणेबाबत पुणे

म.न.पा.च्या सन २०१५-१६ च्या बजेटमध्ये र. रु. एक कोटी चव्येचाळीस लाख इतकी तरतूद उपलब्ध केलेली आहे.

या वर्षीच्या तरतुदीमध्ये एकूण ११४०  ऑटो रिक्षांना या अनुदानाचा  लाभ  होणार आहे.

मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षा सी,एन.जी.वापर करीत असल्याने शहरात होणाऱ्या हवेतील प्रदुषणाचे प्रमाण

कमी होण्यास मदत झाली आहे.

‘शिनमा’ हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबरला … पहा , चिमणी उडाली.. भुर्र.. पोपट पिसाटला …

0

index1 index2

अनिल जोशी यांच्या वेदांत एन्टरटेनमंट निर्मित ,मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘शिनमा’ हा सिनेमा येत्या २७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटातील ‘तुझी चिमणी उडाली … पोपट पिसाटला’ हे गाणं लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी आणि कविता निकम यांनी गायलं आहे. तर या गाण्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासोबत गरलीन चोप्रा ही दिसत आहे. या गाण्याच्या ऑडियो ने आत्ता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे अजिंक्य देव, किशोरी शहाणे, गुरलीन चोप्रा, यतिन कार्येकर, विजय पाटकर, संस्कृती बालगुडे, आनंदा कारेकर, अंशुमन विचारे, गणेश यादव, सौरभ गोखले, अरूण कदम, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, आशिष पवार, जयवंत वाडकर, निशा परूळकर अशी कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात आहे. मिलिंद कवडे, अशोक झगडे आणि प्रकाश भागवत यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. मिलिंद कवडे यांनी स्वत: ‘शिनमा’ची पटकथा लिहिली असून संवादलेखन सागर वानखेडे आणि दीपक ठुबे यांनी केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅमेरामन सॅन्टोनिओ टेरेझिओ यांनी या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे.

 

दुगडांचे कार्य कौतुकास्पद -खा. सुप्रिया सुळे

0

index12239893_1054216007943729_6743722939951422609_n

पुणे:-उद्योजक माणिकचंद दुगड यांनी कित्तेकांचे संसार उभे करतानाच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले.
   राष्ट्रवादी कॉंग्रेस  अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्शभूमीवर दुगड यांचा विशेष सन्मान खा.सुळे यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी त्या  होत्या. बिबवेवाडीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर दत्तात्रय धनकवडे,जि. पी अध्यक्ष  कंद आदीसह नगरसेवक अप्पा रेणुसे, विशाल तांबे,शिवलाल भोसले,डॉ सुनिता मोरे  उपस्थिती होती.
पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने शहरातील अनेक नामवंत जेष्टांचा सत्कार करण्यात आला.उद्योग व धार्मिक शेत्रात कार्य करणाऱ्या दुगड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या वेळी दुगड परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.प्रमोद दुगड यांनी सर्वांचे स्वागत केले.

प्रीती व्हिक्टर यांचा पुरस्काराने सन्मान

0


पुणे- मानवाधिकार संघटनेच्या सरचिटणीस  आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रीती व्हिक्टर यांना साई महाराष्ट्र गौरव पुरस्काराने येथे सन्मानित करण्यात आले .
वडगाव शेरी येथील श्री साई प्रतिष्ठान आणि नगर रोड लायन्स क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या साई महाराष्ट्र  गौरव २०१५ या कार्यक्रमात प्रकाशक प्रमोद आडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रीती यांना प्रदान करण्यात आला . यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे ,
विपश्यना केंद्राचे संचालक दत्ता कोहिनकर साईप्रतिष्ठान चे  संजय चौधरी ,लायन्स क्लब चे प्रांतपाल श्रीकांत सोनी आदी मान्यवर उपस्थित होते .

२७ नोव्हेंबरला ‘उर्फी’चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार

0

1 2

 

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट प्रेमावरती भाष्य करणारे आलेले आहेत. किशोरवयीन अल्लड प्रेमकथा, तारुण्यातील हळूवार प्रेम असणारे शाळा, फँन्डी, टाईमपास अशा चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अशा चित्रपटांना रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि या चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांवर चांगलाच गल्ला जमवला. टाईमपास या चित्रपटातून घराघरात आणि तरुणाईच्या मनात ठाण मांडून बसलेला दगडू शांताराम परब या नावाने प्रत्येकाच्या ओठावर रुळलेले हे नाव म्हणजेच प्रथमेश परब पुन्हा एकदा त्याच उत्साहात त्याच्या आगामी ‘ उर्फी ’ चित्रपटातून रसिकप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री मिताली मयेकर व प्रथमेश परब हि जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मिताली या अगोदर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शन यांच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटात आपणास ती बालकलाकार म्हणून आपण तिला पाहिले आहे. ‘उर्फी’ या चित्रपटात उपेंद्र लिमये, कविता लाड, मिलिंद पाठक हे कलाकार आहेत. मनोरंजनाचा फूल ऑन तडका ‘उर्फी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाबरोबरच श्रवणीय गीतांची मेजवानी ही ‘उर्फी’ चित्रपटात आहे. मंगेश कांगणे आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गीतांना चिनार-महेश यांनी संगीतसाज चढवला आहे.उमेश जाधव यांनी या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.

एनबीएस एण्टरटेन्मेंट प्रा. लि. या बॅनरखाली निर्माते युवराज वर्मा, सरताज मिर्झा आणि महेलका शेख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्ना प्रधान यांची सहनिर्मिती असून दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. चित्रपटाची कथा विक्रम प्रधान यांची असून संवाद आशिष पाथरे यांचे आहेत. प्रथमेश परब याच्यासह ही प्रेमकथा असली तरी तिला विनोद आणि थराराचा तडका आहे. २७ नोव्हेंबरला ‘उर्फी’चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. असे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत नुकतेच जाहीर करण्यात आले.

खो -खो सहित भारतीय खेळांना राजाश्रय ,समाजाश्रय हवा ! डॉ सतीश देसाई

0
index1
मुंबई :
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ :क्रीडा संस्कृती ,क्रीडा धोरण ‘ या विषयावरील चर्चासत्रात महाराष्ट्राचे खो खो चे शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि आता राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील नेतृत्व असलेले डॉ सतीश देसाई यांचे जोरदार भाषण मुंबईत झाले .

डॉ देसाई म्हणाले ,’ देशाचा संरक्षण मंत्री असतानाही यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या विजेत्या खो खो टीम बोलावून देशभर खो खो चा प्रसार करण्याचे प्रोत्साहन दिले आणि स्वत : मैदानात महाराष्ट्राच्या कर्णधाराला खो देवून  रस दाखवला !  शरद पवार यांनी बारामतीसह अन्यत्र खो खो स्पर्धा आयोजन करून खो खो पुढे नेला ,
असे नेते आणि राजाश्रय असण्याची आज आवश्यकता आहे
ते म्हणाले ,’ ज्या खेळात वेग आहे ,आणि तरी कुठे थांबायचे याचे भान सांगतो ,अशा खो खो खेळाचे पुनरुज्जीवन करायचे तर फार मोठे नियोजन करण्याची गरज आहे
३-३ वर्षे अर्जुन ,शिव छत्रपति पुरस्कार दिले जात नाहीत ,
राजकीय नेत्यांकडे २०-२० सदनिका शासनाच्या १० टक्के सवलतीत असताना ,खेळाडूना मिळत नसतील तर परिस्थिती भीषण आहे
रक्त ,घाम ,अश्रू  देवून खेळाडूंनी हा खेळ टिकवला . आता मोजके संघ वगळता इतरांची अवस्था बिकट आहे ,
पी एम आर डी ए सारख्या पुण्याच्या विस्तारित योजनेत जर खेळाला मैदाने नसतील ,राजकीय व्यवस्थेत जर खेळाची बाजू मांडणारे चाहते नसतील ,खेळाडूंना पेन्शन मिळाली नाही ,मैदानाबाद्द्दल प्रेम निर्माण झाले नाही ,खो खो मध्ये चौकात (खांबावर ) खेळण्याच्या आत्म्यावर नियमातून  निर्बंध आले , तर भविष्यात परिस्थिती अवघड होईल
सर्व सामान्य घरातील खेळाडूंनी हा खेळ पेलून धरला आहे ,आता, चांगल्या घरातील खेळाडू खो खो मध्ये पुन्हा येतील ,माध्यमांसह समाजातील सर्व घटक त्यांच्या खेळाची ,नोकरीची ,राहण्याची काळजी वाहतील ,क्रीडा धोरण वेळेत येवून त्याची अमलबजावणी होईल ,तेव्हा राज्यातील खो खो ला उर्जितावस्था येईल ‘
 या चर्चासत्रात भीष्मराज बाम,अंजली भागवत ,जया शेट्टी ,आदिल सुपारीवाला यांनी विचार मांडले
प्रतिष्ठान च्या वतीने सरचिटणीस शरद काळे ,हेमंत टकले यांनी विचार मांडले . शरद पवार यांच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित चर्चासत्र मालेत गुंफलेले हे सत्र आज सकाळी वानखडे स्टेडीयम गरवारे लाउंज मध्ये पार पडले .
 पद्माकर शिवलकर ,उमेश झिरपे ,प्रवीण ठिपसे ,चित्रा वाघ ,निलेश राउत ,आनंद परांजपे उपस्थित होते
विजय साळवी यांनी सूत्र संचालन केले

रेशीम गाठी “बंध नायलॉनचे” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ….

0
index1
सध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट,सोशल मिडिया यांचा वापर वाढत चाललेला आहे त्यामुळे आजची पिढी  टेक्नोसॅव्ही होत चाललेली आहे. मात्र या वाढत्या टेक्नोसॅव्हीपणामुळे नात्यांमधले रेशमी बंध हळू हळू विरळ होत चालले आहे. माणसाच्या नातेसंबंधात टेक्नॉलॉजीचा वाढता प्रभाव यावर भाष्य करणारा ‘बंध नायलॉनचे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.  जतीन वागळे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध  नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोशल मिडिया, मोबाईल यांच्या मायाजाळात गुरफटलेल्या माणसाची येणाऱ्या दहा वर्षात टेक्नॉलॉजीमुळे होणारी अवस्था सिनेमात मांडली आहे.  निर्माते सुनील नायर यांच्या  झिरो हिट्स प्रा. लि. या बॅनरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता  महेश मांजेरकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, सुबोध भावे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे, प्रांजळ परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  कोकण, सासवड यासारख्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरणाने या सिनेमातील व्यक्तीरेखात आपलेच कुटुंब प्रेक्षकांना पाहता येईल. सिनेमाला अमितराज याचे संगीत आणि मंदार चोळकर आणि सचिन पाठक यांनी मिळून सिनेमाची गाणी लिहिली आहेत.  शिरीष देसाई यांनी छायाचित्रीकरण केले असून मोहित टाकळकर यांनी सिनेमाचे  संकलन केले आहे. नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारीत प्रदर्शित होणार असून सिनेमाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला.

गद्रे सी फुड्स भारतीय बाजारपेठेत लक्ष केंद्रित करणार ..

0

1 2 3 4

गद्रे सी फूड आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असून यामुळे आता खवय्यांना नवी पर्वणी लाभणार आहे . दीपक गद्रे यांनी 1978 मध्ये स्थापना केलेली हि कंपनी गोठविलेल्या सागरी उत्पादनांवर प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिट करणारी कंपनी म्हणून प्रसिध्द आहे .1994 मध्ये भारतातील पहिला सुरमई उत्पादन प्रकल्प रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आला . गद्रे मरीन … तेव्हापासून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सुरमई मधील निर्मिती उद्योग मानला जातो .व्यवस्थापकीय संचालक  श्री अर्जुन गद्रे यांच्या नेतृत्वाखाली  मासे शिजविणे आणि  साफ, कच्चे मासे कापून सुरमई मूल्यवर्धित उत्पादने बनवणे ती विकणे यात कंपनी अग्रेसर  राहिली आहे . कोलंबी , लॉबस्टर बाइट, खेकडा आदी सागरी खाद्य पदार्थांचे विविध उत्पादने गद्रे मरीन प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने  जपान, तैवान, मलेशिया, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया येथे  मोठ्या प्रमाणात  निर्यातकरण्यात येतात  कंपनी सध्या 3  गुजरात आणि कर्नाटक सह  रत्नागिरी येथे प्रकल्प  चालवत आहे. यशस्वीरित्या परदेशात निर्यात केल्यानंतर, गद्रे यांनी आता भारतीय बाजारपेठेत लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मुंढवा येथे 71 हजारांची वीजचोरी उघड

0

qqq

पुणे : मुंढवा येथील घरगुती वीजग्राहकाने महावितरणची अधिकृत वीजजोडणी नसताना चोरीच्या विजेचा वापर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात 6411 युनिटस्‌ची म्हणजे 71 हजार 340 रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 20) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, बंडगार्डन विभाग अंतर्गत मुंढवामधील सुतारवाडा येथील रामचंद्ग तुकाराम सुतार यांच्या घरात महावितरणची अधिकृत वीजजोडणी नाही. तथापि, त्यांच्या घरात जवळच असलेल्या लघुदाबाच्या खांबावरून केबलद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु असल्याचे दिसून आले. यात एकूण 6411 युनिटस्‌च्या म्हणजे 71,340 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.

याप्रकरणी पंचनामा करून रामचंद्ग तुकाराम सुतार विरुद्ध रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये शुक्रवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला.

नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ प्रदान

0
पुणे:
आंतरराष्ट्रीय किर्तीचे पुण्यातील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ ने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार “महाराष्ट्र ऑफ्थॉल्मॉलॉजिकल सोसायटी’च्या वतीने गोव्यात घेण्यात आलेल्या “मॉस्कॉन 2015′ या 35 व्या वार्षिक परिषदे दरम्यान प्रदान करण्यात आला. परिषदेचे उद्‌घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. या परिषदेमध्ये 1500 नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते.
डॉ. रमेश मुर्ती यांना नेत्ररोग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  “बेस्ट ऍकॅडमीक प्रायव्हेट प्रॅकिटशनर ऍवॉर्ड’ ने  गौरविण्यात आले.
डॉ.वर्धमान कांकरीया यांनी या परिषदेचे नियोजन केले होते. पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी जीवन लाडी (अध्यक्ष, एम.एस.ओ), उमा प्रधान , प्रकाश कान्कर्ला, उदय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रृतिका कांकरिया आणि डॉ. दिपाली मोहोले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ. अनिल सिंह यांनी आभार मानले.
unnamed unnamed

नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या मंचावर

0

1 2 3 4

आपल्या राजकीय नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने जनमाणसांवर आपली छाप सोडणारे आणि राज्यातच नाही तर देशभरात वेगळी ओळख निर्माण केलेले नेते म्हणजे नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई. तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे हे नेते आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेत राहतात. असे हे तीन दिग्गज नेते प्रथमच एखाद्या मनोरंजक कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. झी मराठीवरील लोकप्रिय असलेला आणि महाराष्ट्राच्या घऱाघरात पोहचलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हे नेते सहभागी होणार आहेत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा झी मराठीवरून हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत.

प्रेक्षकांना भरभरून हसविणारा आणि काही वेळा डोळ्यांच्या कडाही ओला करणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. थुकरटवाडी गावातील अतरंगी पात्र या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटतात आणि त्यांचं मनोरंजन करत निखळ आनंद देतात. ‘चला हवा येऊ द्या’च्या या मंचावरून या पात्रांना घेऊन आजवर विविध चित्रपट आणि नाटकांची प्रसिद्धी करण्यात आली. ज्यात प्रामुख्याने त्या चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचाही समावेश असायचा. याशिवाय काही विशेष भागांमधून अनेक कलाकारांचे, अभिनेत्यांचे अभिनेत्रींचे वेगळे पैलू, अंतरंगही जाणून घेता आले. आजवर सिनेक्षेत्राशी संबंधित व्यक्तिंना भेटण्याची त्यांना जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळाली पण आता प्रथमच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत राजकीय पटलावरील काही मान्यवर व्यक्तिमत्व. येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागात नारायण राणे, रामदास आठवले आणि नितीन सरदेसाई या राजकीय नेत्यांचे काही नवे पैलू ‘चला हवा येऊ द्या’ मधून बघायला मिळणार आहेत.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते म्हणजे नारायण राणे. कोकणभूमीचे सुपुत्र असलेले राणे राज्यात ओळखले जातात ते त्यांच्या बेधडक वक्तव्य आणि निडर वृत्तीमुळे. मुख्यमंत्री असताना अनेक लोककल्याणाचे आणि विकासाचे निर्णय त्यांनी असेच बेधडकपणे घेतले. त्यांच्या याच कार्याच्या आठवणी जाग्या करणारं एक (काल्पनिक) पत्र या भागात ऐकायला मिळणार आहे जे लिहिलंय मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यांनं. थुकरटवाडीतील पोस्टमन काका हे पत्र वाचत असताना स्वतः राणेही भावूक झाले होते. यावेळी रंगलेल्या गप्पांमधून राणे यांनी राजकीय जीवनातील संघर्षाच्या आठवणीसोबतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणीही सांगितल्या.

कार्यक्रमात धम्माल आणली ती रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कविता आणि अभिनयाने. खुमासदार राजकीय वक्तव्यांसोबतच आपल्या खुसखुशीत आणि उत्स्फुर्त राजकीय कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी शोलेतील गब्बरच्या भूमिकेचं एक प्रहसन रंगवलं शिवाय काही कविताही सादर केल्या.

आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव

मीच जिंकणार आहे आजचा डाव

आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव

कारण आठवले आहे माझं नाव

अशी कविता सादर करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

मराठी अस्मितेचा लढा पुकारणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासाठी थुकरटवाडीच्या बॅंडने ‘पळते भैय्ये पाहूया मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं सादर करत धम्माल उडवून दिली. याशिवाय अनेक गमती जमती या कार्यक्रमात घडल्या आहेत. येत्या २३ आणि २४ नोव्हेंबरला रात्री ९.३० वा. ‘चला हवा येऊ द्या’ चे हे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळतील.

राजकुमार हिरानी जन्मदिन पर भी रहना चाहते है काम में व्यस्त

0

जानी मानी फिल्म ‘मुन्नाभाई’, ‘३ ईडियट्स’, और पिछले साल की सबसे बड़ी हिट फिल्म ‘पीके’ के बाद अब इनकी आने वाली फिल्म ‘साला खडूस’ है, यहाँ बात हो रही है बॉलीवुड के सबसे ऊम्दा निर्देशक और फिल्म मेकर राजकुमार हिरानी की जिनका आज जन्मदिन है। इस दिन भी वह अपने आप को अपनी आने वाली फिल्म ‘साला खडूस’ के काम में व्यस्त रखा है| वो सेलिब्रेशन से ज्यादा काम करने में ही विश्वास रखते है|

‘साला खडूस’ की रिलीज़ डेट नज़दीक आ रही है, जो अगले साल जनवरी महीने की 29 तारिख को रिलीज़ होने वाली है, इसी वजह से राजकुमार हिरानी अपने जन्मदिन के सेलेब्रेशन से ज्यादा, इस फिल्म के काम को महत्व देना चाहते है। इस दिग्गज निर्देशक और फिल्म मेकर को सभी जगहों से लोगो का प्यार और जन्मदिन की शुभकामनाये मिल रही है|

29 जनवरी को उनकी फिल्म ‘साला खडूस’ रिलीज होने वाली है|

मराठीतला ..दर्दभरा संगीतकार …..

0

धग ” या चित्रपटाला ऑस्करच्या  पाश्चिमात्य प्रादेशिक भाषा चित्रपटाच्या नामावलीत  समाविष्ट करण्यात आले आणि , महाराष्ट्राच्या शिरपेचात वैश्विक सन्मानाचा तुरा खोवला गेला,  राष्ट्रीय पुरस्कार ते ऑस्कर चा प्रवास…. धग ने केला आणि मराठीतला  एक दर्दभरा गीतकार रसिकांपुढे आला !!!जग जळतं,जळतं … राख होतं …. या गाण्याने आणि ‘ उधळले तुझ्यावर गाव , जिव्हारी … या वाडकरांच्या आवाजातील गाण्याने हा दर्द रसिकांच्या मनामनात जागविला . फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी “आणि आता येणाऱ्या “खैन्दुऴ” ने या संगीतकाराचे अष्टपैलू गुण रसिकांसमोर येणार आहेत
मराठी चित्रपटाच्या ह्या भरारीत आणि काफिल्यात , संगीत दिग्दर्शक म्हणून शामिल होणे हे  माझ्यासारख्या सामान्य पार्श्वभूमी असलेल्या   व्यक्तीसाठी एक  वेगळे वळण होते  असे नम्रपणे नमूद करणारा एक साधा आणि व्रतस्थ प्रतिभावान संगीतकार म्हणजे आदि रामचंद्र,  पूर्ण नाव “आदित्य रामचंद्र पटाईत”, जन्म गाव : धर्माबाद , जिल्हा : नांदेड
वडील कै .रामचंद्र विनायकराव पटाईत, धर्माबाद येथील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते.पण उत्कृष्ठ गायक आणि सर्व संगीत प्रकारांची उत्तम जाण असलेल्या पटाईत सरांनी आपल्या मुलाला सांगीतिक वारसा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही याचाच परिणाम आणि जवाबदारी म्हणून कि काय “आदि रामचंद्र” हे नाव आज राष्ट्रीय पुरस्कारांच्या  यादित जावून पोचले आहे.
असे संगीतकार आदि रामचंद्र याचे हे मनोगत :
संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला , लहान असतांनापासून सतत वडिलांनी सवाई गंधर्व महोत्सवास न्यायला सुरुवात केली ज्या योगे पं  वसंतराव देशपांडे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं भीमसेन जोशी , वडाळी बंधू , या  सारख्या दिग्गज कलावंतांचे श्रवण संस्कार घडवून आणले ,
१ ९ ९ ४ या वर्षी वडिलांच्या अकाली निधना नंतर आम्ही धर्माबाद सोडले,आई श्रीमती सुधा रामचंद्र पटाईत यांचा कठीण परिस्थितीत भक्कम आधार,  त्याला अनुकंपा धर्तीवर वडिलांच्या जागी नोकरी मिळत असतांना पण आईच्या आग्रहास्तव औरंगाबाद गाठले, सरस्वती भुवन कला महाविद्यालयात संगीत विभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला, तेथे पहिले  गुरु पं शिवराम गोसावी गवसले. हळू हळू रियाझ वाढू लागला, पं शिवरामजींनी   पं. नाथ नेरळकर यांचेकडे गायकी आणि नायकी च्या अभ्यासासाठी पाठवले, तेथे गुरुजी ८ तास रियाझ करून घ्यायचे , भरपूर मेहेनत घेतली, दरम्यान नाट्यशास्त्र विभागात अनेक नाटकांना त्याने संगीत दिले, शिव कदम या घनिष्ठ मित्राने दिग्दर्शित केलेल्या मोहन राकेश लिखित ” आषाढ का एक दिन”, महानिर्वाण, इडीयट, सये तुझे डोळे, चि.त्र्य. खानोलकरांच्या गूढ गर्भ कवितांवर आधारित “मी म्हणावे” अश्या अनेक नाटकांना संगीत देण्या -पाठोपाठ, नाट्यदर्पण या मुंबईतील गाजलेल्या एकांकिका स्पर्धेतील ” अरविंद जगताप” लीखित “शुक्राणू” या विजेत्या नाटकास पण संगीत दिले.
औरंगाबाद येथे स्वतंत्र गाण्याच्या मैफिलीना  सुरुवात केली, १९९८ या वर्षी मुंबई गाठले, कुणाच्या हि शिफारशी विना सरळ सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना माझ्या चाली ऐकविल्या, त्यातून ” बेजुबान” या हिंदी अल्बम ची निर्मिती केली, आणि सुरेश वाडकरांच्या आवाजात १९९९ साली या अल्बमची रेकॉर्डिंग केली, तिथपासून सुरेश वाडकरांचा आशीर्वाद आणि सानिद्ध्य सतत लाभले, आदित्य च्या प्रतिभेवर  फिदा असणारी अनेक दिग्गज व्यक्तीनी मला साथ दिली, घरच्या जीम्मेदारीमुळे १२ वर्षे नौकरीत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकापर्यंतचा प्रवास लीलया पेलवला, या नोकरीच्या प्रवासात नांदेडला २००५ ते २००८ या काळाtे कधी नांदेड कधी औरंगाबाद परिक्षेत्रात नौकरी सुरूच होती , महाराष्ट्र केबल न्यूज नेटवर्क चा संपादक सचिन अनर्थे  या मित्राने अनेक जिंगल्स संगीतबद्ध करण्यास दिल्या, कठीण परिस्थितीशी दोन हात करत असतांना व नातेवाईकांची कुठली हि मदत नसतांना केवळ अशा वरिष्ठ मित्रांच्या भरघोस प्रतिसादाच्या जोरावर आज मार्गक्रमण सुरु आहे.
चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी घनिष्ट मित्र समीर रावसाहेब याने सतत प्रोत्साहन दिले, नौकरी सुरु असतांना माझा सृजनशीलतेचा दिवा तेवत ठेवला , त्याचा हा आग्रह होता कि माझे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात माझी उर्जा खर्च होऊ नये , आणि इतरही मित्रांचे असेच मत बनत गेले, मग एके दिवशी निर्णय घेतला ,   विभागीय व्यवस्थापक पदाची नौकरी सोडून  २०१० या वर्षी पुण्यात स्थायिक झालो  आणि मला  “धग” या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून बोलावणे आले, गाणे संगीतबद्ध झाल्यानंतर निर्माते विशाल गवारे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी ते सुखविंदर सिंग या सुप्रसिद्ध हिंदी गायकाच्या आवाजात रेकॉर्ड  करावे  असा सल्ला दिला, मी स्वतःच्या आवाजात जेंव्हा रेफरन्स रेकॉर्डिंग केले तेंव्हा अभिनेता उपेंद्र लिमये याच्या डोळ्यात पाणी तरळून आले, आणि असे ठरले कि माझाच आवाज हा योग्य आहे, आणि त्याचे डॉल्बी मिक्स माझ्याच  आवाजात झाले, अशारितीने मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पदार्पण आणि त्यात राष्ट्रीय पुरस्कार.

धग नंतर समीर रावसाहेब दिग्दर्शित ” जागरण” या मराठी चित्रपटाला मी  संगीत दिले ज्यात ” हरिहरन” ” सुरेश वाडकर ” ” वैशाली सामंत” यांनी गाणी गायिली ,शिव कदम , प्रसन्ना देशमुख या  गीतकारांना घेऊन त्याचा हा प्रवास सुरु आहे एवढेच नव्हे तर जागरण मधील एक गाणे गायिले आहे, www.dhingana.com वर ही गाणी डिजिटलि लॉंच केली गेली, आजवर या गाण्यांचे लाखांमध्ये डाउनलोडस आहेत.

यानंतर पुण्यात आर्चिस साउंडप्रो प्रा.लि. हा   स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडीओ थाटला, २०१३- २०१४ या कालखंडात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी फ.मुं. शिंदे यांच्या गझलांवर आधारित ” फकिराची मुशाफिरी ” या ध्वनिमुद्रीकेस संगीतबद्ध केले व या ध्वनिमुद्रीकेची निर्मिती सुद्धा केली.

तानाजी घाटगे दिग्दर्शित , अरविंद जगताप लिखित ” विनाकारण राजकारण” ,  आशिष पुजारी दिग्दर्शित ” अतिथी ”   व “खैन्दुऴ” या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले,

“भगवा” या विवेक आपटे लिखित ऐतिहासिक नृत्य नाट्य अविष्कारात तब्बल १२ गाणी संगीतबद्ध केली

आज गुगल सर्च वर आदि रामचंद्र असे टाईप केले कि त्याची कारकीर्द आपल्याला दिसून येते.
त्यात ऑस्कर साठी नामांकन म्हणजे उत्तुंग भरारीच आहे
त्याला त्याच्या ह्या यशाबद्दल विचारले असता तो ” अजून खूप काम  करायचे आहे, ज्यासाठी जन्म झालाय त्या भूमिकेस न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहेत ” अशी प्रांजळ प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.