Home Blog Page 3518

संकल्प-२०१६ :पुढील वर्षाची सुरवात प्रेस्टीजीयस जर्नीने सुरु होणार अभिनेत्री – उर्मिला कोठारे

0

२०१६ वर्षाच्या सुरवातीला २२ जानेवारी रोजी गुरु सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या माध्यमातून माझी प्रेस्तीजीयस जर्नी सुरु होईल. त्यामुळे वर्षाची सुरवात खूप स्पेशल होणार आहे. त्याचबरोबर कटाक्षाने काळजी घेईन की पाण्याचा अपव्यय होणार नाही. मी आणि आदिनाथ काही कामानिमित्त मराठवाड्यात गेलो असताना तिकडे दुष्काळाची परिस्थिती पहिली आणि धक्काच बसला. म्हणूनच मी व्यक्तीकरित्या संकल्प केलाय शक्य होईल तितकी पाण्याची बचत करायची.

संकल्प २०१६ :स्वच्छ परिसर सुंदर देश’ मोहिमेसाठी स्वतः प्रयत्न करेन-अभिनेत्री रीना वळसंगकर – अगरवाल

0

नवीन वर्ष म्हंटले तर संकल्पाना उधान येतंच. मी देखील येणा-या प्रत्येकवर्षी वेगवेगळे संकल्प करते, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. यावेळी मी ‘स्वच्छ परीसर सुंदर देश’ ही मोहीम राबवणार असून माझ्या अवतीभोवतालच्या लोकांनाही तसे करण्यास मी प्रवृत्त करणार आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रत्येकाला एकजुटीने काम करायला हवे, आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रत्येकांनी आपापल्या घरातून सुरवात करायला हवी, असे मला वाटते. शिवाय येत्या नवीन वर्षातील मराठी आणि हिंदीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील माझ्या प्रोजेक्टवर देखील मी लक्षकेंद्रित करणार आहे. तसेच ‘स्टे फिट, स्टे हेल्दी’ हा माझा नेहमीचा फंडा मी आगामी वर्षीदेखील सुरु ठेवणार आहे.

संकल्प २०१६:रिजोल्यूशन पेक्षा छोटी गोल्स करणं पसंत करते – श्रुती मराठे

0

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या उत्साहात आपण रिजोल्यूशन करतो आणि काही कारणास्तव ती बारगळतात देखील त्यामुळे मला असं वाटतं त्यापेक्षा वर्षभरात आपण छोटी छोटी गोल्स करावी जी आपण पूर्ण करु शकू. मी तर हाच फंडा फॉलो करते. येत्या वर्षातील एक महत्वाचं गोल म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे. २०१६ मध्ये माझे काही सिनेमे रिलीज होतायत काही सिनेमाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे खूप धावपळ हि ओघाने आलीच म्हणून मी फिटनेस आणि फिजिकल स्ट्रेन्थकडे अधिक लक्ष्य देणार आहे. ‘बंध नायलॉनचे’ हा येत्या वर्षात रिलीज होतोय तर एका हिंदी सिनेमाचं चित्रीकरण देखील सुरु केलंय.

संकल्प २०१६ -संकल्प जास्तीत जास्त काम करण्याचा :गायिका योगिता चितळे

0
न्यू ईयर रिजोल्यूशन पेक्षा नव्या वर्षाचे प्लेनिंग करण्यात मी जास्त विश्वास ठेवते . आता माझे जे शोज होत आहेत ते पुढच्या वर्षी देखील सुरु राहणार आहेत, या शोजमधून अधिक जोमाने काम करण्याचा माझा मानस आहे. नुकताच माझा नचिकेत आणि गुरु ठाकूर सोबत कुवेत मध्ये एक यशस्वी कार्यक्रम झाला आहे. तसेच नवीन वर्षात माझे काही आगामी प्रोजेक्ट देखील आहेत, आम्ही एप्रिल महिन्यात एमस्टरडॅम मध्ये युरोपियन मराठी संमेलनात कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षातील हा माझा मोठा प्रोजेक्ट असणार आहे, शिवाय २०१६ ला माझा अपकमिंग मुंबई टाईम सिनेमा देखील येत आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तो प्रदर्शित होत असल्याकारणामुळे मी त्याबद्दल खूप उत्सुक आहे. त्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच आगामी वर्षातील काही सिनेमांचेदेखील मी संगीत दिग्दर्शन करणार आहे.

संकल्प-२०१६ : २०१५ वर्ष खूप लकी गेलं २०१६ ची आतुरतेने वाट बघतेय -अभिनेत्री प्रार्थना बेहरे

0

गेली काही वर्ष मी इंडस्ट्री मध्ये करतेय. माझ्या करियरमध्ये योग्य संधी आणि वेळ उत्तम जुळून आली. ज्यामुळे मी करत असलेल्या मेहनतीचं रुपांतर प्रगतीत होत गेलं. २०१५ वर्षात घडत गेलेल्या घडामोडी त्याचं उत्तम उदाहरण आहे.त्यामुळेच मी २०१६ ची आतुरतेने वाट पाहतेय.  न्यू इअर रिजोल्यूशन करत नाही तर प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं पसंत करते. ज्यात येत्या वर्षात मला करायच्या असलेल्या १० गोष्टी नमूद करते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. त्यातील काही पूर्ण होतात तर होत काही होत नाही. त्यामुळे माझं मलाच कळून येत नेमकी मेहनत कुठे करायची आहे ते. माझ्या मते न्यू इअर रिजोल्यूशनचा उद्देश्य देखील हाच असतो. २०१५ माझ्यासाठी खूप लक्की गेले, कारण या वर्षीच्या ‘मितवा’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’  या सिनेमामुळे मला ख-या अर्थाने लोक ओळखू लागले, आता माझी हि दरमजल आगामी वर्षात येणाऱ्या ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ या सिनेमातून पुढे सुरु होणार आहे. या सिनेमातून माझा अभिनय प्रेक्षकांना अजून आवडेल अशी मी आशा करते.  ५ जानेवारीला असणारा माझा वाढदिवस नेहमीच माझी नवीन वर्षाची सुरवात स्पेशल करते. त्यामुळे नवीन वर्षासाठी मी नेहमीच एक्साईट असते.  

संकल्प -२०१६ : हे नवीन वर्ष मला ट्वीन फन देणार -गयिका नेहा राजपाल

0

नवीन वर्ष माझ्यासाठी नेहमीच उत्साह आणि आनंद घेऊन येणारा असतो. येत्या वर्षात हाच उत्साह २०१६ मध्ये दिव्गुणीत झाला आहे. प्रत्येक वर्ष माझ्यासाठी नवीन संकल्पनेचा असतो. माझे मन मला नेहमीच काहीतरी नवीन करायला प्रवृत्त करत असते आणि ती गोष्ट पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न देखील करते. येत्या वर्षात मी माझी म्युझिक अकॅडमी सुरु करण्याचा विचार करत आहे तसच चॅरिटी दवाखाना सुरु करणार आहे जेणेकरून माझा मेडिकलचा अभ्यास सुरु राहील. येत्या २०१६ मध्ये नेहा राजपाल प्रॉडक्शन निर्मित ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे, या सिनेमाला घवघवीत यश मिळेल ही आशा करते. १ जानेवारीला माझ्या लग्नाचा वाढदिवस देखील असतो, दरवर्षी मी आणि आकाश दोघे कुठेतरी लांब जाण्याचा प्लान करतो पण यंदा फोटोकॉपीच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु असल्यामुळे या वर्षी आम्ही मुंबईत आहोत. या वर्षीचा डमल धमाका मी प्रेक्षकांसोबत अनुभवणार आहे.

संकल्प २०१६ – पाणी बचत आणि स्वच्छ परिसर -नर्तिका, अभिनेत्री – अदिती भागवत

0

मी २०१६ ची आतुरतेने वात पाहते आहे असे सांगत अभिनेत्री आदिती भागवत म्हणाली … न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. इट्स अनदर डे फॉर मी. आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी ठरवतो त्या होतातच असं नाही. त्यामुळे रिजोल्यूशन पेक्षा मी संकल्प टप्पा टप्याने करणं पसंत करते. संकल्प करायचा झालाच तर सध्याची परीस्थिती पाहता मी पाणी बचत आणि निदान माझ्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. येत्या नवीन वर्षात माझा पहिल्यांदा एखादा सिनेमा प्रदर्शित होतोय त्यामुळे मी जास्त २०१६ वर्षाची आतुरतेने वाट बघतेय. १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा शासन सिनेमा आणि १८ जानेवारी माझा वाढदिवस अशा दोन्ही महत्वाच्या गोष्टी या वर्षात आल्यामुळे हे वर्ष मझ्यासाठी खूप स्पेशल आहे. गजेंद्र आहिरे दिग्दर्शित शासन सिनेमातील माझी भुमिका वेगळी असून आव्हानात्मक आहे. त्यात प्रेक्षकांना मी एक नर्तिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून पाहायला मिळेल.

पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी दिले व्यसनमुक्तीचे संदेश…

0
index1
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) च्या वतीने हजरत महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अल्पसंख्यंक विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी आयोजित या मिरवणुकीचे उद्घाटन सकाळी संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार व युनानी मेडिकलचे अध्यक्ष डॉ.एन.वाय.काझी यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या 29 विद्यालये व महाविद्यालयामधील पाच हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी या मिरवणुकीचे नेतृत्व केले.
मिरवणुकीत 2 घोडा बग्गी, दरबार ब्रान्झपथक, ढोलताशा यांचा समावेश होता. अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हजरत महंमद पैगंबर यांनी दिलेल्या शिक्षण, व्यसनमुक्ती संदर्भात संदेशाचे फलक हाती धरले होते. अ‍ॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे विद्यार्थी अरबी वेश परिधान करून घोडागाडीमध्ये विराजमान झाले होते, हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांबरोबर शाहिद इनामदार, महम्मद हनीफ शेख, वाहाब शेख, वाहिद बियाबानी, सिकंदर पटेल, अरीफ सय्यद, डॉ. शैला बूटवाला, मुमताझ सय्यद, रबाब खानल रूमाना शेख, आयेशा शेख, प्रा.डॉ.भूषण पाटील, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवर्ग, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीस डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट येथून प्रारंभ होऊन ट्रायलॅण्ड हॉटेल, गायकसाब मशीद, बाबाखान दर्गा, सरबतवाला चौक, जुना मोदीखाना, क्वाटरगेट, मॉर्डनबेकरी चौक, इस्लामपुरा, ए.डी.कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत टॉकीज, भगवानदास चाळ, चुडामण तालिम अशी मार्ग क्रमणा करून पुना कॉलेज गेट नं.2 येथे समारोप झाला. भगवानदास चाळ, केंजळे चाळ येथील नागरिकांनी विद्यार्थ्यांना वेफर्सचे वाटप केले. दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

आली रे आली..आता प्रियांका ची बारी आली … पहा ‘जय गंगाजल ‘चा प्रोमो …

0

अजय देवगण चा गंगाजल अजूनही कितीही वेळा लोक टीव्ही वर पाहतात … आता ‘जय गंगाजल’येतो आहे जो ४ मार्च ला रिलीज होणार आहे .त्याचा प्रोमो काळ रिलीज झाला .

निर्माता -दिग्दर्शक प्रकाश झा , सह निर्माता मिलिंद दाबके असून मुरली शर्मा जो गंगाजल मध्ये होता तो यात असणार आहे या शिवाय पूर्वीच्या गंगाजल मधील कोणी आहेत कि नाही ? नेमका हा चित्रपट त्या गंगाजल ची बरोबरी तरी करील कि नाही ? अजय देवगण ची जागा प्रियांका सांभाळू शकेल कि नाही ?हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत …

आज समाज में उसकी इज्जत होती है, जो कानून तोडता है…

जाब खाकी का रंग सही हो ना, चाहे उसे मर्द पहनो , या औरत…

 अशा संवादाची झलक आणि अजय देवगण ऐवजी प्रियांका चोप्राची झलक दाखविणारा पहा हा प्रोमो …

 

पोश्टर गर्लचा टीझर लॉँच संपन्न!

0

मुंबई : 12 फेब्रुवारीला पोश्टर गर्ल प्रदर्शित होत असलेल्या पोश्टर गर्ल या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे 

प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचं फळ सध्या  त्यांना मिळालं प्रोमोच्या रुपात ते झी टॉकीज आयोजित महाराष्ट्राचा फेवरेट कोण? च्या मंचावर, जेव्हा या चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटाच्या अनुशंगाने जाणारं सादरीकरण केलं. मराठीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि तिचे सहकलाकार जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ मेनन आणि हेमंत ढोमे हे या सादरीकरणाचा भाग होते.या छोटेखानी सादरीकरणानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शमवणारा टिझर लॉँच करण्यात आला. हा टीझर लॉँच चित्रपटातल्या कलाकारांबरोबरच दिग्दर्शक समीर पाटील आणि निर्माते पुष्पांक गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉँच झाल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांच्या ओठावर बसलेली पोश्टर गर्ल ची टॅगलाइन ‘संपूर्ण
गावासाठी येकच बस’ नंतर आता या चित्रपटातली रूपाली ‘फक्त नाव लक्षात ठेवायचं’ म्हणत प्रेक्षकांच्या मनावर
अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

index1 index2 index3index

सुका कचरा जाळू नका – अन्यथा कारवाई .. महापालिकेचा इशारा …

0

पुणे- सुका कचरा जाळू नका – अन्यथा कारवाई अशा लोकांविरुध्ह कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे .

या संदर्भात महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि , पुणे शहरामध्ये व उपनगरांमध्ये व हिवाळ्यात पालापाचोळा, प्लॅस्टिक, कागद इ. जाळण्याच्या घटना दिसून येतात. ही बाब पर्यावरणास हानीकारक असून मे. राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण (पश्चिम विभाग) यांनी न्यायालयीन सुनावणी दरम्यान अशा प्रकारच्या घटनांबाबत तीव्र नाराजी
व्यक्त केली असून सुका कचरा जाळणाèया व्यक्तींविरोधात दंडात्मक व कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचित केले आहे
यानुसार नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पालापाचोळा, प्लॅस्टिक, थर्माकोल, कागद इ. सुका कचरा या वस्तु विलगीकरण करुन महापालिकेच्या यंत्रणेस देऊन  सहकार्य करावे. कोणी व्यक्ती सुका कचरा जाळताना आढळून आल्यास कायद्यातील तरतूदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व प्रदुषण विरहीत वातावरणात राहण्याचा मुलभुत अधिकार प्रदान केला आहे. तसेच हा एक मुलभूत मानवी अधिकार आहे. नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २०००, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ व हवा प्रदुषण अधिनियम १९८७ मधील तरतूदीनुसार पालापाचोळा, प्लॅस्टिक, कागद इ. सुका कचरा
जाळण्यास प्रतिबंध केला आहे.

अहो … साहित्य परिषदेचा निवडणूक कार्यक्रम बेकायदा आहे हो ….(व्हिडीओ)

0

पुणे- अहो … साहित्य परिषदेचा निवडणूक कार्यक्रम बेकायदा आहे हो ….अशी हाकोटी आता खुद्द परिषदेचे कायदा सल्लागारऍड. प्रमोद आडकर यांनी आज सायंकाळी घाईघाईत पत्रकार परिषद घेवून दिली आहे . साहित्य परिषदेचे काही महिन्यांपासून  राजकारण म्हणजे ऐकावे  ते नवलच… अशा पद्धतीने शिजत असल्याचे स्पष्ट झाले आहे .घटनेचा पेच निर्माण झाला असला तरी त्यावर मार्ग आहे पण मी तो का सांगू ?  आता निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी यावर मार्ग काढावा असे सांगून …  अवमान करणे, डावलण्याचे राजकारण करणे असे आरोप ही आडकर यांनी यावेळी केले आहे .

काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे असे सांगत परिषदेचे अध्यक्ष ; कार्याध्यक्ष  ‘प्रमुख कार्यवाह यांनी कार्यकारी मंडळाच्या वतीने निवडणुकीसाठी मतदानास पात्र असलेल्या सभासदांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी ऍड. प्रताप परदेशी यांना दिली. परदेशी यांच्यासह ऍड. सुभाष किवडे व प्रा. सुधाकर जाधवर हेही निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.असेही जाहीर केले त्यानंतर परिषदेचे कायदा सल्लागार प्रमोद आडकर यांनी आज हि प्रक्रियाच बेकायदा असल्याचे म्हटले आहे . पहा ते काय म्हणतात त्यांच्याच शब्दात  …

जर्मननंतर ‘दी सायलेंस’ चित्रपटाची ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भरारी

0

index1 index2 index3 index4 index5 index6

पुणे-

ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गजेंद्र अहिरेंच्या ‘दी सायलेंस’ची वर्णी लागली आहे.

मेक्सिको, बेल्जियम, पराग्वे, जर्मनी, बल्गेरिया, क्यूबा, अर्जेंटीना या देशातल्या चित्रपटांबरोबर यंदा

पहिल्यांदा भारत स्पर्धा करणार आहे. एस.एम.आर प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘दी सायलेंस’ ने हा मान

भारताला मिळवून दिला आहे. एकंदर आठ चित्रपटांची स्पर्धा या ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट

महोत्सवात होणार आहे. 6 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ब्राझीलमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात

प्रेक्षकांना ‘दी सायलेंस’चा आनंद घेता येणार आहे. नेहमीचं काहीतरी नवीन देऊ पाहणाऱ्या गजेंद्र

अहिरेंचा ‘दी सायलेंस’ अशाच एका वेगळया विषयावर भाष्य करतो. हाचं वेगळेपणा ‘दी सायलेंस’

चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत वाह…! वाह..! मिळवून देत आहे.

याआधी ‘दी सायलेंस’ने जर्मनमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मान मिळवला आहे. या

चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार ऑफ इंडिया 2015 च्या ‘डायरेक्टर्स व्हिजन’ पुरस्काराने

गौरवण्यात आले आहे.

हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. कोकणात राहणाऱ्या चिनीची व्यथा या चित्रपटात मांडण्यात

आली आहे. आपल्या बाबांबरोबर राहणाऱ्या चिनीच्या आयुष्यातील एक काळा दिवस आणि आयुष्याच्या

प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या त्या आठवणी दी सायलेंसमध्ये चित्रित करण्यात आल्या आहेत.

दुष्कृत्य करण्यासाठी हपापलेले हात आणि त्यामुळे कोवळ्या जीवांची अकारण होणारी फरफट गजेंद्र

अहिरेंचा ‘दी सायलेंस’ सांगून जातो.

समाजात वाढत चाललेल्या दुष्प्रवृत्तींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात नागराज मंजुळे, कादंबरी कदम

आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. हिंदीत नाव मिळवल्यानंतर अंजली पाटील पहिल्यांदाचं दी

सायलेंस चित्रपटातून मराठी सिनेमात येत आहे. त्याशिवाय हिंदीतला गाजलेला चेहरा रघुवीर यादव

आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘दी सायलेंस’ च्या निमित्ताने मुग्धा चाफेकर आणि

वेदश्री महाजन हे नवीन चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

अश्विनी सिद्वानी, अर्पण भुखनवाला आणि नवनीत हुल्लड मोरादाबादी यांनी या चित्रपटाची निर्मिती

केली असून अश्विनी सिद्वानी यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. पटकथा, संवादलेखन आणि

दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत गजेंद्र अहिरे आपल्याला दिसणार आहेत. छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा

सोरेन यांचं असून चित्रपटाचं संकलन मयुर हरदास यांनी केले आहे. या चित्रपटाची जमेची बाजू

म्हणजे त्याचं संगीत…’दि सायलेसं’ च्या निमित्ताने इंडियन ओशन हा रॉक बँड मराठी सिनेसृष्टीत

पदार्पण करतो आहे.

दि. 24 ते 27 डिसेंबरला वीजबील भरणा केंद्रे सुरु रहाणार…

0

power_big_10

वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन

 

पुणे : वीजग्राहकांना वीजबील व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशी, दि. 24 ते 27 डिसेंबरला महावितरणचे व इतर अधिकृत वीजबील भरणा केंद्रे   सुरु राहणार आहेत.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मुळशी व मंचर विभागातील वीजग्राहकांना वीजबीलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महावितरणचे आणि इतर अधिकृत वीजबील भरणा केंद्ग सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजे गुरुवार (दि. 24) ते रविवार (दि. 27) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

तसेच वीजबील भरण्याची मुदत संपल्यानंतरही दंडाच्या रकमेसह वीजबील ‘ऑनलाईन’ भरणाची सोय महावितरणने वीजग्राहकांना www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. सर्व लघुदाब वीजग्राहकांना क्रेडीट किंवा डेबीट कार्ड किंवा नेटबंॅकींगद्वारे वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुदतीनंतर ऑनलाईन वीजबीलांचा भरणा करणार्‍या ग्राहकांनी देयकाची पावती महावितरणच्या संबंधीत कार्यालयात दाखवावी आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे परिमंडलातील थकबाकीदार वीजग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत वीजबीलांचा भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी. तसेच ज्या ग्राहकांना वीजबीलांबाबत काही तक्रार असेल त्यांनी महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांच्या “मराठी काव्यसप्ताह- 2015′ चे आयोजन

0
index
पुणे :
मराठीमधील ज्येष्ठ कवी रमेश गोंविंद वैद्य हे दरवर्षी काव्यसप्ताह’ साजरा करतात. कवितावाचनाचे कार्यक्रम जनमानसात अधिक रुजावेत, नवोदितांना उत्तेजन मिळावे या उद्देशाने कवी रमेश वैद्य यांनी सुरू केलेला ‘काव्यसप्ताह’ हा उपक्रम एव्हाना पुणेकरांना सुपरिचित झाला आहे. यंदा हा उपक्रम 16 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. ‘काव्य सप्ताहर्-2015’ 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत भारत स्काऊट अ‍ॅण्ड ग्राउंड सभागृह, उद्यान प्रसाद कार्यालयसमोर, सदाशिव पेठ, पुणे 30  येथे सायंकाळी 7 वाजता साजरा होईल, अशी माहिती संयोजक राजेंद्र देशपांडे आणि माध्यम समन्वयक दीपक बिडकर यांनी दिली .
‘काव्यसप्ताह’ आणि कवी रमेश गोविंद वैद्य हे एक अजोड नाते आहे. पुण्यात सातत्याने 14 वर्षे या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पंधरावा काव्यसप्ताह (2014 चा) मुंबईत दादरमध्ये घ्यावा, असे वैद्यांच्या मनात आले. ही कल्पना त्यांनी काही प्रस्थापित व नवोदित कवी-कवयित्रणींनी बोलून दाखवताच त्यांनी ती उचलून धरली. हे स्वप्न साकार करायचेच या जिद्दीने वैद्यांनी मार्च 2014 पासूनच पाऊले टाकण्यास सुरुवात केली.
पुण्यातील काव्यप्रतिभेचे दर्शन मुंबईकरांना घडवण्यासाठी गतवर्षीचा काव्यसप्ताह मुंबईमध्ये चक्क दादरमध्ये घेण्याचे यशस्वी साहस वैद्यांनी करून दाखविले.
सलग सात दिवस काव्यासंबंधी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे, नव्या-जुन्या कवींना कार्यक्रमात संतुलित स्थान देणे, सगळ्या लहान-मोठ्या तपशीलांकडे लक्ष पुरवित काव्य मैफलींचे नियोजन करणे आणि हे सर्व स्वत:कडे कुठलेही श्रेय न घेता करणे हे रमेश गोविंद वैद्यांचे वैशिष्टय आहे.