Home Blog Page 3314

44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात बंगाल संघाला विजेतेपद महाराष्ट्र संघाला रौप्य पदक

पुणे, 6 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत
वॉटरपोलो प्रकारात अंतिम फेरीत मुलांच्या गटात बंगाल संघाने महाराष्ट्र संघाचा 8-6 असा, तर मुलींच्या गटात बंगाल संघाने कर्नाटक संघाचा 8-3 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात बंगाल संघाने महाराष्ट्र संघाचा 8-6असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. विजयी संघाकडून अंकित प्रसादने दोन गोल, तर सौरभ सरदार, विशाल यादव, सागर मोंडल, दिपांकर सरदार यांनी प्रत्येकी एक गोल केला. निर्धारित वेळेत सामना 6-6असा बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूटआऊट पद्धतीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूट आऊट मध्ये बंगाल संघाने दोन गोल केले.

महाराष्ट्र संघाकडून भागेश कुठे व वैभव गुप्ता यांनी प्रत्येकी 2 गोल तर,भूषण पाटील, अभिषेक गुप्ता यांनी प्रत्येकी एक गोल केला.3 व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सीबीन वर्घसे याने नोंदविलेल्या सहा गोलांच्या जोरावर केरळ संघाने कर्नाटक संघाचा 16-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात बंगाल संघाने कर्नाटक संघाचा 8-3 असा पराभव विजेतेपद पटकावले. बंगाल कडून अनुश्री दासने 4 गोल, जास्मिन जतूनने 3गोल, तमाली नस्करने एक गोल केला. पराभूत संघाकडून नयना मनुर, शिवानी रेड्डी, शिवानी एस यांनी प्रत्येकी एक गोल केला. 3 व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा 9-6 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र कडून पायल घनकरीने सर्वाधिक 5 गोल, राधिका कडूने 2 गोल, नम्रता व्यवहारे व महिमा मोसेस यांनी प्रत्येकी एक गोल केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुले:
बंगाल: 8(सौरभ सरदार 1, अंकित प्रसाद 2, विशाल यादव 1, सागर मोंडल 1, दिपांकर सरदार 1)वि.वि.महाराष्ट्र: 6(भागेश कुठे 2, भूषण पाटील 1, अभिषेक गुप्ता 1, वैभव गुप्ता 2);

3 व 4थ्या क्रमांकासाठी:
केरळ: 16(सीबीन वर्घसे 6, मिधुन एजे 2, संदीप डिएस 2, अप्पू एनएस 2, विष्णू आर 2, रोहित एजे 1, क्रिशन उन्नी 1)वि.वि.कर्नाटक: 1(हर्षथ एस 1);

मुली:
बंगाल: 8(तमाली नस्कर 1, अनुश्री दास 4, जास्मिन जतून 3)वि.वि.कर्नाटक: 3(नयना मनुर 1, शिवानी रेड्डी 1, शिवानी एस 1);

3 व 4थ्या क्रमांकासाठी:
महाराष्ट्र: 9(राधिका कडू 2, नम्रता व्यवहारे 1, पायल घनकरी 5, महिमा मोसेस 1)वि.वि.केरळ:6(द्रिश्या एव्ही 1, सूर्या व्हीएस 2, कृपा आर आर 1, अक्षयवरली आर 2).

44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाला सर्वसाधारण विजेतेपद

अव्दैत पागे, परम बिरथरे, श्रीहरी नटराज, वेदांत बापना, विकास पी यांना विक्रमासह सुवर्णपदक

  • महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीस, निल रॉय, रेना सलढाणा, केनिशा गुप्ता यांना सुवर्णपदक

 

पुणे, 6 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाने 558 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेशच्या अव्दैत पागे व परम बिरथरे, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज, महाराष्ट्राच्या वेदांत बापना व तामिळनाडूच्या विकास पी यांनी विक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीस, निल रॉय, रेना सलढाणा व केनिशा गुप्ता यांना सुवर्णपदक पटाकावले.

 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 1500मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात मध्य प्रदेशच्या अव्दैत पागेने 16.06.43सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले.अव्दैतने कर्नाटकच्या सौरभ सांगवेकरचा 2011 सालचा 16.08.80सेकंदाचा विक्रम मोडला. महाराष्ट्रच्या सुश्रुत कापसेने 16.19.62सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर  दिल्ली कुशाग्रा रावतने 16.46.92 सेकंदासह कांस्य पदक पटकावले.

200मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात मध्य प्रदेशच्या परम बिरथारेने 2.11.27सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. परमने कर्नाटकच्या अ‍ॅरन डिसुझाचा 2006 सालचा अकरा वर्षापुर्वीचा विक्रम मोडीत काढला. तर कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु व प्रसिधा कृष्णा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या राहूल एम याने 2.10.83सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्या वेदांत खांडेपारकरने 2.10.93सेकंद व मिहिर आंब्रेने 2.11.13सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

100मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आपलाच 57.99सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 57.33सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. गोव्याच्या झेविअर डिसुझा व दिल्लीच्या अनुराग दगर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलांच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्राच्या वेदांत बापनाने कर्नाटकच्या एन.श्रीहरीचा 2015 सालचा 1.02.70सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 1.02.41सेकंदासह सुवर्णपदक पटकावले. वेदांत बॅम्बे स्कॅस्टीश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून अमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक अकादमी येथे प्रशिक्षक पीटर गारट्रेल व भुषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दिल्लीच्या तन्मय दास व महाराष्ट्रच्या आर्यन भोसले यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

100मी बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने 1.05.13सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले.  कर्नाटकच्या मयुरी लिंगराज व राजस्थानच्या फिरदुश कयामखानने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात आसामच्या आस्था चौधरी 1.07.25सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. तर  तमिळनाडूच्या प्रियांगा पुगाझारासू व दिल्लीच्या रिंकी बोरदोलोई यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

100मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्राच्या निल रॉयने 53.16सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. गोव्याच्या झेविअर डिसुझाव तामिळनाडू गोकुळनाथ व्ही.एस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या विकास पी याने 55.38सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. विकासने कर्नाटकच्या संजय सी.जे याचा 2015 सालचा 55.47सेकांदचा विक्रम मोडला. कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु व हरियाणाच्या वीर खाटकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

100मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने 1.00.13सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर साध्वि धुरीने 1.00.87सेकंदासह रौप्य पदक पटकावले. मध्य प्रदेशच्या अ‍ॅनी जैन 1.01.03सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने 1.00.26सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. केनिशाचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपद आहे.  कर्नाटकच्या खुशी दिनेश व आसामच्या आस्था चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जून पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव, आणि महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल

1500मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1.अव्दैत पागे( मध्य प्रदेश,16.06.43से), 2. सुश्रुत कापसे(महाराष्ट्र,16.19.62से), 3.कुशाग्रा रावत(दिल्ली,16.46.92से)

 

200मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. परम बिरथरे(मध्य प्रदेश,2.11.27से), 2. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 2.12.29से), 3.प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 2.12.80से)

200मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. राहूल एम(कर्नाटक,2.10.83से), 2.वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र,2.10.93से), 3.मिहिर आंब्रे(महाराष्ट्र,2.11.13से)

 

100मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1.श्रीहरी नटराज(कर्नाटक, 57.33से), 2. झेविअर डिसुझा(गोवा, 1.00.65से), 3. अनुराग दगर(दिल्ली, 1.02.29से)

 

100मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. वेदांत बापना(महाराष्ट्र, 1.02.41से), 2. तन्मय दास(दिल्ली, 1.02.51से), 3. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 1.02.68से)

 

100मी बटरफ्लाय मुली(15-17 वयोगट)- 1. त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 1.05.13से), 2. मयुरी लिंगराज(कर्नाटक, 1.05.95से), 3. फिरदुश कयामखान(राजस्थान, 1.07.71से)

 

100मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1.आस्था चौधरी(आसाम, 1.07.25से), 2. प्रियांगा पुगाझारासू(तमिळनाडू, 1.08.65से), 3. रिंकी बोरदोलोई(दिल्ली, 1.09.58से)

 

100मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1.निल रॉय(महाराष्ट्र, 53.16से), 2. झेविअर डिसुझा(गोवा, 53.47से), 3. गोकुळनाथ व्ही.एस(तामिळनाडू, 53.62से)

 

100मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1.विकास पी(तामिळनाडू, 55.38से), 2. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 55.54से), 3. वीर खाटकर(55.98से)

 

100मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 1.00.13से), 2. साध्वि धुरी(महाराष्ट्र, 1.00.87से), 3. अ‍ॅनी जैन(मध्य प्रदेश, 1.01.03से)

 

100मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1.केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 1.00.26से), 2. खुशी दिनेश(कर्नाटक, 1.02.80से), 3. आस्था चौधरी(आसाम, 1.03.05से)

 

1500मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. अभिशिक्ता पी.एम(तामिळनाडू,18.35.65से), 2. धृती मिर्लीधर(कर्नाटक, 18.47.47से), 3. प्राची टोकस(दिल्ली,18.54.26से)

4x200मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. कर्नाटक(अर्नव दिवाकर, हेमंत जेनुकल, राहूल एम, श्रीहरी नटराज, 7.57.07से), 2.महाराष्ट्र(निल रॉय, अनिकेत चव्हाण, वेदांत खांडेपारकर, एरॉन फर्नांडीस, 7.58.69से), 3.तामिळनाडू(आदित्य डी, अहमद अझाक, चरण एम.एस, गोकुळनाथ व्ही.एस, 8.19.70से)

4x200मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. कर्नाटक(प्रसिधा कृष्णा, लितेश गौडा, अभय कुमार, तनिश मॅथ्यु, 8.35.44से), 2.महाराष्ट्र(आर्यन भोसले, आरमान सिक्का, वेदांत बापना, साहिल गंगोटी, 8.37.45से), 3. आसाम(राजदिप गोगई, अनुध्यान हजारीका, ज्ञान दश्यप,बिक्रम चंगमई, 8.46.39)

4x100मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. कर्नाटक(सुवाना भास्कर, पुजीता मुर्ती, रचना राव, खूशी दिनेश, 4.45.53से), 2. महराष्ट्र(केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सिया बिजलानी, कनिष्का शौकीन, 4.50.14से), 3. गोवा(श्रृंगी बांदेकर, वैष्णवी एच, तनिशा मुर्गुड, मिहिका करापुरकर, 5.01.45से)

400मी मिडले मुली(15-17 वयोगट)- 1.फिरूदुश कयामखान(राजस्थान, 5.31.18से), 2. जहंती राजेश(कर्नाटक, 5.31.52से), 3. ऋतूजा तळेगावकर(महाराष्ट्र, 5.31.80से)

400मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. जान्हवी गोली(तेलंगणा, 5.35.88से), 2. सिया बिजलानी(महाराष्ट्र, 5.40.25से), 3.साची जी(कर्नाटक, 5.42.14से)

800मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. आर्यन नेहरा(गुजरात, 9.00.56से), 2. झीदाने सय्यद (गोवा, 9.16.55से), 3. राज राळेकर(कर्नाटक, 9.24.70से)

सर्वोत्कृष्ट जलतरणपटू मुले- श्रीहरी नटराज- 27गुण, 3विक्रम आणि 2सर्वेत्कृष्ट भारतीय

मुली- रेना सलढाणा- 33गुण

केनिशा गुप्ता-35गुण, 1विक्रम

सांघिक विजेतेपद मुले- 1.कर्नाटक- 132गुण, 2. कर्नाटक-142गुण

मुली- महाराष्ट्र-1. 141गुण, 2. कर्नाटक 144गुण

सर्वसाधारण विजेतेपद- कर्नाटक 558गुण

नवीन विक्रम- 25

कोथरूडमध्ये अगोदर शिवसृष्टी ..नंतर मेट्रो ..दीपक मानकर (व्हिडीओ)

पुणे- कोथरूड मध्ये अगोदर शिवसृष्टीचे काम सुरु करा नंतरच मेट्रो चे काम सुरु करून देवू ..असा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिला आहे … राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील तसेच रेखा टिंगरे ,प्रिया गदादे,नाना भानगिरे ,आनंद आळकुंटे या नगरसेवकांनी कोथरूडच्या शिव् सृष्टीसाठी तातडीने खास सभा बोलाविण्याची मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे ..पहा आणि ऐका ..या संदर्भात दीपक मानकर यांनी काय म्हटले आहे …..

वंदना चव्हाण यांचा वाढदिवस साजरा- विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप

पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुणे शहर सेवादलचे अध्यक्ष योगेश जगताप यांच्या हस्ते खा.वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
यावेळी कलेश्‍वर घुले, अशोक राठी, हेमंत येवलेकर, शंकर शिंदे, दिनेश घुले, योगेश वराडे, संजय गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप
‘चंद्रकांत दरोडे प्राथमिक शाळा’ (बीएमसीसी रस्ता) मध्ये खा.वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी रवि चौधरी, अ‍ॅड. औदुंबर खुने- पाटील, शैलेश बडदे, दिलीप शहा, अमित कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अत्रे आदी उपस्थित होते.
————————————

राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार – २०१७ ची नामांकने पाठविण्याचे आवाहन.

0

पुणे, दि.६ जुलै : विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणे  व भारत अस्मिता फाऊंडेशन, पुणे तर्फे राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड  यांची स्मृती जपण्याच्या आणि विविध क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या नावाने २०१० पासून राज्यस्तरीय पुरस्कार दिले जात आहेत. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे.

कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सामाजिक, प्रसारमाध्यमे, ग्रामविकास (आदर्श गाव व बचतगटप्रमुख) व अध्यात्म  अशा  विविध क्षेत्रांमध्ये ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीला हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 

या पुरस्कारासाठीचे नामांकने प्रति- मा. जनसंपर्क अधिकारी, जनसंपर्क विभाग, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी कॉलेज, स.नं. १२४,  पौड रोड, कोथरूड, पुणे – ४११ ०३८ या पत्त्यावर किंवा mitpro1@gmail.com किंवा maeerpro1@gmail.com  या ई-मेलवर शनिवार, दि. २९ जुलै २०१७ पर्यंत  पाठवावीत, असे नम्र आवाहन आम्ही करीत आहोत.

 

‘व्हिडिओ पॅलेस’च्या ‘झगा’ म्युझिक अल्बमचा प्रकाशन सोहळा संपन्न

मराठी चित्रपट गीतांना, अल्बमसना व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘व्हिडिओ पॅलेस’ने नव्या गुणवंतांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आजवर अनेक अल्बमकरिता पुढाकार घेतला आहे. ‘ब्रेक अप के बाद’, ‘तोळा तोळा’, ‘यारिया’, ‘मला लगीन करायच’, ‘पाऊस छत्री आणि ती’ च्या यशानंतर आता झगा हा  अल्बम प्रस्तुत केला असून नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा म्युझिक टीमच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या अल्बमची निर्मिती रईस लष्करिया प्रोडक्शनने केली आहे. अमितराज यांचा संगीतसाज लाभलेलं हे गीत, गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलं आहे. अल्बमचं दिग्दर्शन विशाल घाग यांनी केलं आहे.

‘फिगर टंच सॅण्डल उंच टकमक टकमक बघा’ असे बोल असलेलं हे गीत प्रेक्षकांना नक्कीच ठेका धरायला लावेल. गायिका माधुरी नारकर यांनी ते आपल्या सुमधुर आवाजात गायलं असून अभिनेत्री मीरा जोशी व माधुरी नारकर यांच्यावर ते चित्रित करण्यात आलं आहे. या अल्बमचे छायाचित्रण लॉरेन्स डिकोना यांनी तर संकलन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. या अल्बमचे नृत्यदिग्दर्शन अमित बाईंग यांचं आहे. हे लग्नसराईतल्या संगीत पार्टीचं गीत असून कुटुंबातल्या सर्वांना या गीताचा आस्वाद घेता येईल, तसेच प्रत्येक संगीत पार्टीत हे गीत नक्की वाजेल असा विश्वास म्युझिक टीमने याप्रसंगी व्यक्त केला.

आपल्या या इनिंगबद्दल बोलताना माधुरी सांगते की, ‘लहानपणापासून केवळ आवड म्हणून गाणं शिकले, पण नंतर या आवडीचं करिअरमध्ये रुपांतर व्हावं असं मला जाणवू लागलं. यासाठी या क्षेत्रात काम करायला हवं या जाणीवेतून अल्बममध्ये गाण्याची इच्छा निर्माण झाली. प्रत्येकालाच त्याचं नाव आणि काम रसिकांपर्यंत पोहचावं असं वाटतं. ही माझी इच्छा या अल्बममुळे पूर्ण झाली. यासाठी मला ‘व्हिडिओ पॅलेस’ व रईस लष्करिया प्रोडक्शनची चांगलीच साथ मिळाली. प्रेक्षकांनाही हा झगा निश्चितच आवडेल असा विश्वास माधुरी नारकर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक हरिनामाचा गजर … मंत्रीगणांनी केला जयघोष

0

 

पंढरपूर :
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मिणी यांची शासकीय महापूजा तर केलीच पण दोघांनी टाळ वाजवीत ठेका धारांत हरिनामाचा गजर केला आणि मंत्रीगणांनी हि त्यांना साथ देत आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी केली यावेळी राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल आणि रूक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. त्यानंतर विठ्ठल मंदिराच्या सभागृहात मानाचे वारकरी दांपत्य परसराम उत्तमराव मेरत आणि सौ. अनुसया परसराम मेरत यांचा सत्कार करण्यात आला. श्री. मेरत (वय 54 वर्षे) आणि श्रीमती मेरत (वय 45 वर्षे) रा. बाळसमुद्र ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

मुख्यमंत्री म्हणाले, मागील वर्षी मी श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून पाऊस पाडण्याचे साकडे घातले होते. गेल्यावर्षी श्री विठ्ठलाच्या कृपेने राज्यभरात भरभरून पाऊस पडला. शेतकऱ्यांचे उत्पादनही भरभरून आले. राज्य शासनाने नुकताच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सहाय्य देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाला बळ द्यावे अशी मागणी विठ्ठल चरणी केली.

विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील काही सदस्यपदे रिक्त आहेत. या पदावरील नियुक्ती करताना वारकरी संघटनांशी चर्चा करूनच केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी परसराम मेरत यांचा तर अमृता फडणवीस यांच्या हस्ते अनुसया मेरत यांचा सत्कार करण्यात आला. पंधरा हजार रूपयाचा धनादेश, वर्षभर प्रवासासाठी एसटीचा पास त्यांना प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला तर दिपाली भोसले यांनी अमृता फडणवीस यांचा सत्कार केला. यावेळी मंदीर समितीचे नूतन अध्यक्ष अतुल भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, पाणीपरुवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्षा साधना भोसले, आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आदी उपस्थित होते.

 

चातुर्मासनिमित्त सादडी सदनमध्ये मंगल प्रवेश संपन्न

चातुर्मासनिमित्त  गणेश पेठमधील सादडी सदनमध्ये वर्धमान स्थानाकवासी जैन श्रावक संघ येथे प. पुज्य प्रियदर्शनाजी  म. सा.  , प. पुज्य रत्नज्योतीजी म. सा. आदी ठाणा ७ चा   मंगल प्रवेश संपन्न झाला . शनिवारवाडा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेमध्ये सादडी युवक मंडळ , सादडी बहू मंडळ , सादडी स्वाध्याय मंडळ , सादडी महिला मंडळ , सेवा संघ , वितराग सेवा संघ आदी सहभागी झाले होते .

या शोभायात्रेमध्ये  महापौर मुक्ता टिळक , नगरसेविका विशाल धनवडे , नगरसेविका सुलोचना कोंढरे , नगरसेवक वनराज आंदेकर , संघाचे अध्यक्ष खुबीलाल सोलंकी  , अशोक कावेडिया , उपाध्यक्ष केवलचंद तेलीसरा , सुरेंद्र पुनमिया , विजयकांत कोठारी , पोपटशेठ ओस्तवाल , मांगीलाल मांडोत , नगराजी पुनमिया, दिनेश  पुनमियारतनचंदजी पुनमिया, नगरसेवक प्रविण चोरबेले , नितीन पुनमिया, जितेंद्र पुनमियाविनोद कावेडिया , पोपटशेठ सोलंकी आदी मान्यवर सहभागी झाले होते . यावेळी सूत्रसंचालन नरेंद्र सोलंकी यांनी केले .

चार महिने साध्वीचे रोज सकाळी ९ ते १० धार्मिक प्रवचन होणार आहे . दुपारी अडीच वाजता धार्मिक अध्यायन , रात्री आठ वाजता स्तुती , मंगल पाठ होणार आहे .

मातृप्रेम दर्शवणारे ‘भिकारी’चे गाणे प्रदर्शित

‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या आगामी सिनेमातील शीर्षकामध्ये, मराठीच्या एका प्रचलित म्हणीचा वापर करण्यात आला आहे.  ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ अशी हि प्रचलित म्हण असून, याचा अर्थदेखील तितकाच गहिरा आहे. ‘आई’ चे हेच महत्व पटवून देणारे भिकारी चित्रपटातील ‘मागू कसा’ हे बोल असलेले गाणे, काळजाचा वेध घेते. मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित ‘भिकारी’ या बहुचर्चित सिनेमातील ह्या गाण्याचे नुकतेच अंधेरी इथे सॉंग लॉंच करण्यात आले. विशेष म्हणजे, या सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या आईंनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. गणेश आचार्य दिग्दर्शित ‘भिकारी’ ह्या सिनेमात आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची नाजूक गुंफण आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘मागू कसा’ हे गाणे याच धाग्यातले असून, हे गाणे प्रत्येकांना आपल्या आईची आठवण करून देईल.
संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडीमध्ये गणल्या जाणा-या अजय-अतुलमधील अजय गोगावलेचा या गाण्याला आवाज लाभला आहे. प्रसिद्ध गीतलेखक गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे.
आईसाठी देवाला आर्त हाक मारणाऱ्या मुलाचे हे गाणे असून, स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात स्वप्नीलचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आईसाठी सर्व काही सोडून, रस्त्यावर आलेल्या मातृभक्त मुलाचे हे गाणे पाहणा-यांच्या डोळ्यात अश्रू आणतील इतके भावनिक आणि हृदयस्पर्शी झाले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. यात स्वप्नील जोशी ची मध्यवर्ती भूमिका असून, रुचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर,  सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांची देखील विशेष भूमिका असणार आहे.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेने मोडला वीरधवल खाडेचा नऊ वर्षापुर्वीचा विक्रम

  कर्नाटकच्या तनिश मॅथ्युचा विक्रमासह सुवर्णवेध

महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीस, साध्वि धुरी, केनिशा गुप्ता यांना सुवर्णपदक

 

पुणे, 5 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेने वीरधवल  खाडेचा नऊ वर्षापुर्वीचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या तनिश मॅथ्युने  गोव्याच्या झेविअर डिसुझाचा 2015 सालचा विक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीस, साध्वि धुरी व केनिशा गुप्ता यांनी सुवर्णपदक पटकवले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 100मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेची चमकदार कामगिरी केली. मिहिरने 55.65सेकंद वेळ नोंदवत 2008सालचा विरधवल खाडेचा नऊ वर्षापुर्वीचा 55.96सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक पटकावले. गोवाच्या झेविअर डिसुझाने 57.17सेकंद तर कर्नाटकच्या राहूल एम याने 57.58सेकंदासह अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॅथ्युने 58.37सेकंद वेळ नोंदवत गोव्याच्या झेविअर डिसुझाचा 2015 सालचा 59.23सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकच्या प्रसिधा कृष्णा व मध्यप्रदेशच्या परम बिरथारे यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

????????????????????????????????????

 

800मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या खुशी दिनेशने 9.42.12सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर कर्नाटकच्या पुजीता मुर्ती व आसामच्या आस्था चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

200मी बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने 2.24.46सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. राजस्थानच्या फिरदुश कयामखानी व आसामच्या अनुभूती बरूआ यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या साची जी हीने 2.33.52सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. तर दिल्लीच्या रिंकी बोरदोलोई व महाराष्ट्राच्या सई पाटील यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

100मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीसने आपल्या सुवर्ण कीमगिरीत सातत्य राखत 1.07.90सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर ओडीशाच्या प्रत्येशा राय व कर्नाटकच्या झानती राजेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलींच्या 13-14 वयोगट दिल्लीच्या तनिशा मावीयाने 1.07.77सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले तनिशाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तर कर्नाटकच्या सुवाना भास्कर व गोव्याच्या शृंगी बांदेकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात उत्तर प्रदेशच्या आलिया सिंगने 35.47सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर  कर्नाटकच्या सलोनी दलाल व रिध्दी बोहरा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलींच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या अदिती बालाजीने 36.69सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. अदितीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. कर्नाटकच्या तर  मधुरा बी.जी व रचना राव यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

50मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात तमिळनाडूच्या दानुष एस याने 30.76सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. कर्नाटकच्या मानव दिलिप व आसामच्या मिलांथो दत्ता यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत 33.07सेकंद वेळेसह स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक पटकावले. तामिळनाडूच्या अथिश एम व कर्नाटकच्या हितेन मित्तल यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

50मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात  महाराष्ट्रच्या साध्वी धुरीने 27.89सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. साध्वी एम.एम.सी.सी महाविद्यालयात बारावी इयत्तेत शिकत असून हर्मनी अॅकेवॅटीक अकादमी येथे प्रशिक्षक भुपेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तामिळनाडूच्या प्रिती बी व मध्य प्रदेशच्या अॅनी जैन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.  मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत 27.94सेकंद वेळेसह स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक संपादन केले. केरळच्या लायाना उमेर व बिहारच्या माही राज यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले.

50मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात  महाराष्ट्रच्या मिहिर आंब्रेने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत 24.41सेकंदासह सुवर्णपदक संपाद केले तर महाराष्ट्राच्याच निल रॉयने 24.57सेकंदासह रौप्य पदक पटकावले. दिल्लीच्या समित सेजवालने 24.63सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या विकास पी याने 24.76सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर हरियाणाच्या वीर खाटकर व कर्नाटकच्या प्रसिधा कृष्णा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

800मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1. खुशी दिनेश(कर्नाटक, 9.42.12से), 2. पुजीता मुर्ती(कर्नाटक, 1.47.77से), 3. आस्था चौधरी(आसाम, 9.48.67से)

200मी बटरफ्लाय मुली(15-17 वयोगट)- 1.त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 2.24.46से), फिरदुश कयामखानी(राजस्थान,2.32.25से), 3.अनुभूती बरूआ(आसाम,2.32.37से)

200मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1. साची जी(कर्नाटक,2.33.52से), 2. रिंकी बोरदोलोई(दिल्ली, 2.33.68से) 3.सई पाटील(महाराष्ट्र, 2.36.71से)

100मी बॅकस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1.त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 1.07.90से), 2.प्रत्येशा राय (ओडीशा,1.09.11से), 3.झानती राजेश(कर्नाटक,1.09.52से)

100मी बॅकस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1.तनिशा मावीया(दिल्ली,1.07.77से), 2.सुवाना भास्कर(कर्नाटक,1.08.95से), 3. शृंगी बांदेकर(गोवा,1.09.31से)

100मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. मिहिर आंब्रे(महाराष्ट्र,55.65से), 2. झेविअर डिसुझा (गोवा,57.17से), 3. राहूल एम(कर्नाटक,57.58से)

100मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 58.37से), 2.प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 59.55से), 3.परम बिरथारे(मध्यप्रदेश, 1.00.56से)

50मी ब्रेसस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1. आलिया सिंग(उत्तर प्रदेश,35.47से), 2. सलोनी दलाल(कर्नाटक, 35.59से), 3.रिध्दी बोहरा(कर्नाटक, 35.67से)

50मी ब्रेसस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1.अदिती बालाजी(तामिळनाडू,36.69से), 2. मधुरा बी.जी(कर्नाटक,37.05से), 3.रचना राव(कर्नाटक, 37.31से)

50मी ब्रेसस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. दानुष एस(तमिळनाडू, 30.76से), 2. मानव दिलिप(कर्नाटक, 30.91से), 3. मिलांथो दत्ता(आसाम, 31.02से)

50मी ब्रेसस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 33.07से), 2. अथिश एम(तामिळनाडू,33.79से), 3.हितेन मित्तल(कर्नाटक, 33.81से)

50मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. साध्वी धुरी(महाराष्ट्र, 27.89से), प्रिती बी(तामिळनाडू, 28.13से), 3. अॅनी जैन(मध्य प्रदेश, 28.16से)

50मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 27.94से), 2. लायाना उमेर(केरळ, 28.60से), 3.माही राज(बिहार, 28.60से)

50मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. मिहिर आंब्रे(महाराष्ट्र, 24.41से), 2. निल रॉय(महाराष्ट्र, 24.57से), 3. समित सेजवाल(दिल्ली, 24.63से)

50मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. विकास पी(तामिळनाडू, 24.76से),2. विर खाटकर(हरियाणा, 25.74से), 3. प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 25.91से)

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, 5 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत
वॉटरपोलो प्रकारात साखळी फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांनी, तर मुलींच्या गटात पश्चिम बंगाल, कर्नाटक या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत कर्नाटक संघाचा  10-0असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्र संघाकडून भागेश कुठेने 6 गोल, तर भूषण पाटील, अभिषेक गुप्ता यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पश्चिम बंगाल संघाने केरळ संघाचा 5-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून विशाल यादव व दिपांकर सरदार यांनी प्रत्येकी दोन गोल तर सागर मोंडलने एक गोल केला.अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना पश्चिम बंगाल संघाशी होणार आहे.

मुलींच्या गटात उपांत्य फेरीत पश्चिम बंगाल संघाने केरळ संघाचा 7-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पश्चिम बंगाल कडून जस्मिन खाटूनने 4 गोल तर, अनुश्री दासने दोन गोल आणि अनीश शहाने एक गोल केला.

कर्नाटक संघाने महाराष्ट्र संघाचा 7-4 असा पराभव केला. अंतिम फेरीत पश्चिम बंगाल संघाचा सामना कर्नाटक संघाशी होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: वॉटरपोलो: उपांत्य फेरी: मुले:
पश्चिम बंगाल: 5(विशाल यादव 2, सागर मोंडल 1, दिपांकर सरदार 2) वि.वि.केरळ: 1(रोहित एजे 1);

महाराष्ट्र: 10(भागेश कुठे 6, भूषण पाटील 1, अभिषेक गुप्ता 1, वैभव कुठे 2)वि.वि.कर्नाटक: 0;

मुली:
पश्चिम बंगाल: 7(अनीश शहा 1, अनुश्री दास 2, जस्मिन खाटून 4)वि.वि.केरळ: 3(सुर्वा व्हीएस 2, कृपा आर आर 1);

कर्नाटक: 7(स्वरणा रचना 3, कांकना भिडे 1, आर्या दीक्षित 1, शिवानी रेड्डी 2)वि.वि.महाराष्ट्र: 4(नम्रता व्यवहारे 1, महिमा मोझेस 3)

निष्कलंक चारित्र्याने देशाची उभारणी होईल- अण्णा हजारे

पुणे-“शुद्ध अचार, शुद्ध विचार,निष्कलंक जीवन, त्याग आणि सहिष्णुता या पाच गुणांच्या जोरावर नवे प्रशासकीय अधिकारी देशात परितर्वन घडविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.,”असे मार्गदर्शन थोर समाजसेवक, लोकपाल आंदोलनाचे अग्रणी, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी यूपीएससी परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग)तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१६ मधील यशस्वितांच्या ९व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे झालेल्या या सोहळ्यात देशातून पहिली आलेली नंदिनी के आर आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरुप होते. दोघांना अनुक्रमे ५१०००/- व २१०००/- असे रोख पारितोषिकही देण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  होते. तसेच,तेलंगणा राज्यातील राचकोंडा येथील पोलिस आयुक्त महेश भागवत, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त व एमआयटी सीएसटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष एन.गोपालास्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) माजी चेअरमन डी. पी. अगरवाल, मेजर जनरल दिलावर सिंग, यशवंत मानखेडकर, अरूण पवार,माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटीसीएसटीचे कार्यकारी संचालक प्रा. सुजीत धर्मपात्रे, मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास, प्रा. गौतम बापट आदी उपस्थित होते.
अण्णा हजारे म्हणाले,“ नव्या प्रशासकीय अधिकार्‍याची कथनी आणि करनी एक असेल तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. ७० वर्षात देशात जे कार्य झाले नाही ते कार्य चारित्र्यशील अधिकार्‍यांमुळे १० वर्षात होवून देश उभा राहू शकतो. प्रत्येकाने जीवनात पैशाला अधिक महत्व देण्यापेक्षा जीवनाचे ध्येय निर्धारित करावे. राष्ट्र एक मंदिर आहे, या मंदिरात विराजमान समाज हा भगवान आहे असे समजून प्रत्येकाने या भगवंताची पूजा करावी. गाव, समाज आणि देशासाठी सेवा करण्याची वृत्ती महत्वाची आहे. त्यासाठी मनात सेवाभावी संकल्प यायला हवे, मनात उमटणार्‍या चांगल्या विचारांमुळे समाजाला दिशा मिळते.”
डी. पी. अगरवाल म्हणाले,“ समाजाकडून तुमच्याबद्दल भरपूर अपेक्षा आहेत. यंत्रणेमध्ये काम करताना अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करावे. आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येवू शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. ”
एन.गोपालास्वामी म्हणाले,“प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून चांगले प्रशासन निर्माण करावे. सतत नवीन गोष्टी शिकून आपल्या कामाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे आपला अधिक कल असायला हवा.”
मेजर जनरल दिलावर सिंग म्हणाले,“नेशन फस्ट कॅरेक्टर मस्ट, हा मंत्राला अनुसरून देशसेवा करण्याचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. स्वप्नातील भारत निर्माण करण्याची शक्ती केवळ युवकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी बहुसंख्येने पुढे यावेे.”
महेश भागवत म्हणाले,“ मानव सेवा हीच माधव सेवा असे धोरण अवलंबून कार्य करावे.यूपीएससीमध्ये निवड होण्यासाठी अनेक प्रकारे गुणवत्ता दाखवावी लागते. ”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान आणि अध्यात्माच्या जोरावर देशात परिवर्तनाची लहर आली आहे.जीवनात त्याग, समर्पण करण्यास धर्म शिकवितो. प्रशासनात काम करताना आपली मूल्ये जपली पाहिजेत. भारतीय संस्कृती, परंपरेला अनुसरुन काम केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. समाजाचे सर्व प्रश्‍न सोडविण्याचे व कठिण परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य तुमच्या अंगी असले पाहिजेे.”
सत्काराला उत्तर देताना नंदिनी के आर म्हणाली,“ प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल जिकडे असेल त्या क्षेत्रात यश प्राप्तिसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन दयावे.”
गोपालकृष्ण रोनांकी म्हणाला, “ यूपीएससी परीक्षेत तिन्ही परिक्षांना खूप महत्व आहे. पूर्व परीक्षा पास झाल्यावर आपल्यातील आत्मविश्‍वास वृद्धिंगत होतो. तसेच, पुढील दोन्ही परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे पर्सनालिटी टेस्टला अधिक महत्व आहे. त्यामुळे चहूअंगाने विचार कराण्याची सूचना त्याने युवकांना दिली .”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुजीत धर्मपात्र यांनी आभार मानले.

44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, स्वदेश मोंडल यांना विक्रमासह सुवर्णपदक

पुणे,भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटकच्या श्रीहरी नटराज व पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल यांनी नव्या विक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्राच्या रेना सलढाणा, त्रिशा कारखानीस, आर्यन भोसले, केनिशा गुप्ता, निल रॉय यांनी सुवर्णपदक पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 400मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने 4.45.42सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर तामिळनाडूच्या अभिशिक्ता पी.एम व दिल्लीच्या प्राची टोकस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या खुशी दिनेशने 4.41.73सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर आसामच्या आस्था चौधरी व कर्नाटकच्या पुजीता मुर्तीने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

4×100 मी मिडले रिले प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात 1 कर्नाटक संघाने 4.14.69सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर महाराष्ट्राच्या संघाने 4.24.81सेकंद वेळेसह रौप्य पदक पटकावले. पश्चिम बंगाल संघाने 4.26.73सेकंदासह कांस्य पटकावले.

200मी फ्रीस्टाईल प्रकारात कर्नाटकचे वर्चस्व मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या राहूल एम याने 1.56.25सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर दिल्लीच्या कुशाग्रा रावतने रौप्य पदक पटकावले तर महाराष्ट्रच्या आरोन फर्नांडीसला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॅथ्युने 2.01.46सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तामिळनाडूच्या लिओनार्ड व्ही व हरियाणाच्या वीर खाटकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

 

200मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने 2.27.53सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले तर पश्चिम बंगालच्या सौब्रीती मोंडल व कर्नाटकच्या झानती राजेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या तनिशा मालवीयाने 2.28.98सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर कर्नाटकच्या सुवाना बस्कर व गोव्याच्या शृंगी बांदेकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

200मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आपलाच 2.05.18 सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 2.04.11सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. श्रीहरीने सकाळच्या सत्रात झालेल्या प्राथमीक फारीत 2.05.18सेकंदाचा विक्रम केला होता. मध्य प्रदेशच्या अव्दैत पागे व गोव्याच्या झेविअर डिसुझा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगट महाराष्ट्राच्या आर्यन भोसलेने 2.11.97सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. आर्यनने सकाळच्या सत्रात झालेल्या प्रथमीक फेरीत 2.13.77 सेकंदाचा विक्रम केला होता. तर महाराष्ट्राच्याच वेदांत बापनाने 2.13.50सेकंदासह रौप्य पदक संपादन केले. पंजाबच्या आकाशदिप सिंगने कांस्य पदक पटकावले.

 

200मी मिडले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी बाजी मारली. मुलींच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने 2.29.88सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या तन्वी तांत्री व झानती राजेश यांनी 2.33.55सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगट महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने 2.31.34सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तेलंगणाच्या जान्हवी गोली व महाराष्ट्रच्या सिया बिजलानीने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

 

200मी मिडले प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या निल रॉयने 2.11.16सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. निल जमुनाबाई शाळेत अकरावी इयत्तेत शिकत असून खार जिमखाना येथे प्रशिक्षक देवदत्त लेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. गतवर्षी त्याने बेस्ट स्विमरचा पुरस्कार पटकावला होता. तर वेदांत खांडेपारकरने 2.13.56सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले. कर्नाटकच्या सीवा एस याने 2.14.43सेकंदासह रौप्य पदक पटकावले.

 

200मी मिडले प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने 2.15.28सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्राच्या निल रॉयचा 2015 सालचा 2.17.20सेकंदाचा विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्रच्या आर्यन भोसलेने 2.18.79सेकंदासह रौप्य तर गुजरातच्या आर्यन नेहराने कांस्य पदक पटकावले.

100मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलींच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या रिध्दी बोहराने 1.16.67सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर सलोनी दलालने 1.16.90सेकंदासह रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या आलिया सिंगने कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात तामिळनाडूच्या आदिती बालाजीने 1.17.97सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर कर्नाटकच्या रचना राव व शानीया शिरोमणी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

100मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात तामिळनाडूच्या दानुश एस याने 1.05.84सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर आसामच्या मिलांतोन दत्ता व कर्नाटकच्या मानव दिलिप यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने 1.10.50सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर कर्नाटकच्या लिथिश गौडा व उत्तर प्रदेशच्या अभिषेक कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-

400मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 4.45.42से), 2. अभिशिक्ता पी.एम(तामिळनाडू, 4.47.62से), 3. प्राची टोकस(दिल्ली, 4.47.94से)

400मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1. खुशी दिनेश(दिल्ली, 4.41.73से), 2. आस्था चौधरी(आसाम, 4.46.91से), 3. पुजीता मुर्ती(कर्नाटक, 4.50.91से)

4×100 मी मिडले रिले मुले(13-14 वयोगट)-1. कर्नाटक(शिवांश सिंग, लितेश गौडा, प्रसिधा कृष्णा पी.ए, तनिश मॅथ्यु, 4.14.69से), 2. महाराष्ट्र(वोदांत बापना, सुदर्शन हर्शित, यश गल्हानी, आर्यन भोसले, 4.24.81से), 3. पश्चिम बंगाल(नितेश भौमिक, आरिंदम दास, स्वदेश मोंडल, साकील सरदार, 4.26.73से)

200मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. राहूल एम(कर्नाटक, 1.56.25से), कुशाग्रा रावत(दिल्ली, 1.56.35से), 3. आरोन फर्नांडीस(महाराष्ट्र, 1.57.26से)

200मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. तनिश मॅथ्यु (कर्नाटक, 2.01.46से), लिओनार्ड व्ही(तामिळनाडू, 2.04.65से), 3. वीर खाटकर(हरियाणा, 2.04.95से)

200मी बॅकस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1. त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 2.27.53से), 2. सौब्रीती मोंडल(पश्चिम बंगाल, 2.30.13से), 3. झानती राजेश(कर्नाटक, 2.30.27से)

200मी बॅकस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1. तनिशा मालवीया(दिल्ली, 2.28.98से), 2. सुवाना बस्कर(कर्नाटक, 2.31.19से), 3.शृंगी बांदेकर(गोवा, 2.31.81से)

200मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. श्रीहरी नटराज(कर्नाटक, 2.04.11से), 2.अव्दैत पागे(मध्य प्रदेश, 2.09.29से), 3. झेविअर डिसुझा(गोवा, 2.11.94से)

200मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 2.11.97से), 2. वेदांत बापना(महाराष्ट्र, 2.13.50से), 3. आकाशदिप सिंग(पंजाब, 2.18.51से)

200मी मिडले मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 2.29.88से), 2. तन्वी तांत्री(कर्नाटक, 2.31.73से), 3. झानती राजेश(कर्नाटक, 2.33.55से)

200मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 2.31.34से), 2. जान्हवी गोली(तेलंगणा, 2.33.08से), 3. सिया बिजलानी(महाराष्ट्र, 2.34.48से)

200मी मिडले मुले(15-17 वयोगट)- 1. निल रॉय(महाराष्ट्र, 2.11.16से), 2. वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र, 2.13.56से), 3.सीवा एस(कर्नाटक, 2.14.43से)

200मी मिडले मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 2.15.28से), 2. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 2.18.79से), आर्यन नेहरा(गुजरात, 2.20.30से)

100मी ब्रेसस्ट्रोक मुली(15-17 वयोगट)- 1. रिध्दी बोहरा(कर्नाटक, 1.16.67से), 2.सलोनी दलाल(कर्नाटक, 1.16.90से), 3. आलिया सिंग(उत्तर प्रदेश, 1.18.79से)

100मी ब्रेसस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1.आदिती बालाजी(तामिळनाडू, 1.17.97से), 2. रचना राव(कर्नाटक, 1.19.65से), 3. शानीया शिरोमणी(कर्नाटक, 1.21.43से)

100मी ब्रेसस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. दानुश एस(तामिळनाडू, 1.05.84से), 2. मिलांतोन दत्ता(आसाम, 1.08.17से), 3. मानव दिलिप(कर्नाटक, 1.08.22से)

100मी ब्रेसस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 1.10.50से), 2. लिथिश गौडा(कर्नाटक, 1.12.73से), 3. अभिषेक कुमार(उत्तर प्रदेश, 1.13.29से)

4X100 मी मिडले मुले(15-17 वयोगट)- 1. कर्नाटक(श्रीहरी नटराज, अनिरुध्द एच.एम, पृथ्विक डी.एस, राहूल एम, 4.01.31से), 2. महाराष्ट्र(दिविज टेकवडे, मिहिर आंब्रे, आभिनंदन दळवी, निल रॉय, 4.03.72से), 3. तामिळनाडू(कौशिक विक्टो, आदित्य डी, धनुष एस, गोकुळनाथ व्ही.एस, 4.03.76)

आपल्या देशाची विविधता आणि एकता ही खरी ताकद असून ती बिघडवण्याचे काम सध्या सुरु आहे..खासदार दिग्विजय सिंह

पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक देशातील पंतप्रधानाची गळाभेट घेतात. यातून सर्व प्रश्न सुटतील असे वाटत नाही. उलट आपल्या देशाची विविधता आणि एकता ही खरी ताकद असून ती बिघडवण्याचे काम सध्या सुरु आहे. देशात नथुराम गोडसेचे मंदिर आणि मुर्त्या बनल्या जातात. त्यावर भाजप आणि आरएसएस काही बोलत नाही यातून त्यांची या प्रकाराला मूक संमती असल्याचे स्पष्ट होते.

“आपला देश चालवण्यासाठी केवळ ५६ इंच छाती असणा-या व्यक्तीची गरज नसून ५६ इंचाचे ह्रदय असणा-या पंतप्रधानाची गरज आहे, मोदींचे ह्रदय छोटे आहे” अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

सिंह पुढे म्हणाले, केंद्र सरकारने तीन दिवसांपूर्वी जीएसटी देशभरात लागू केला. यासाठी देशभर जल्लोष देखील करण्यात आला. मात्र यापूर्वी या विषयाला विरोध करण्यात मोदीच आघाडीवर होते, आता तेच त्याचा सोहळा करत आहेत. जीएसटीतून पेट्रोल आणि अल्कोहोल वगळले आहे. काळे धन समाप्त करण्यासाठी जीएसटी आणल्याचे सांगितले जात असले तरी रिअल इस्टेट आणि अल्कोहोल या सर्वांत जास्त काळ्या पैशाचे व्यवहार चालणाऱ्या व्यवसायांना जीएसटीतून बाहेर काढले आहे. यातून सरकारची कार्यपध्दती दिसून येते. कोणत्याही प्रकारची तयारी न करता मोदी सरकारने ज्याप्रकारे नोटबंदी केली. त्याप्रमाणे कुठलीही पूर्वतयारी न करता जीएसटी लागू केला आहे.
भाजप यापूर्वी मोठ्या दंगली घडवत होते. आता लव्ह जिहाद, बीफ यांसह अन्य विषयांवरून देशात दंगल घडवण्याचे काम चालू आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी भाजपवर केला.

 

श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ससून रुग्णालयातील बालकांना खाऊ- भेटवस्तूचे वाटप

पुणे-श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ससून रुग्णालयातील सोफोशमध्ये बालकांना खाऊ , फळे , बिस्कीट व भेटवस्तूचे वाटप महापालिका स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ , नगरसेवक धीरज घाटे . नगरसेवक योगेश समेळ , नगरसेविका पल्लवी जावळे व नगरसेविका स्वाती लोखंडे  यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन सतीश गायकवाड यांनी केले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संदीप खर्डेकर , अरविंद कोठारी , चरणजितसिंग सहानी , मनीष साळुंके , लक्ष्मी घोडके , निलेश आल्हाट , गणेश लांडगे , किशोर कुटे , गोरख दुपारगुडे , सुनील महाजन , भिकन सुपेकर , दीपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सोफोशच्या  प्रशासकीय अधिकारी शर्मिली सय्यद यांनी हा खाऊ आणि भेटवस्तू स्वीकारल्या .

या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतीश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन दिलीप उंबरकर यांनी केले तर आभार नगरसेवक  धीरज घाटे  यांनी मानले .

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी सांगितले कि , सोफोश या संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले . यावेळी नगरसेवक धीरज घाटे यांनी सांगितले कि , मालोजीराजे यांच्या वाढदिवशी  सामाजिक संस्थेस मदत करून एक चांगला सामाजिक उपक्रम  दिलीप उंबरकर आणि सतीश गायकवाड यांनी राबविला आहे