पुणे-श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त ससून रुग्णालयातील सोफोशमध्ये बालकांना खाऊ , फळे , बिस्कीट व भेटवस्तूचे वाटप महापालिका स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ , नगरसेवक धीरज घाटे . नगरसेवक योगेश समेळ , नगरसेविका पल्लवी जावळे व नगरसेविका स्वाती लोखंडे यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन सतीश गायकवाड यांनी केले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संदीप खर्डेकर , अरविंद कोठारी , चरणजितसिंग सहानी , मनीष साळुंके , लक्ष्मी घोडके , निलेश आल्हाट , गणेश लांडगे , किशोर कुटे , गोरख दुपारगुडे , सुनील महाजन , भिकन सुपेकर , दीपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सोफोशच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिली सय्यद यांनी हा खाऊ आणि भेटवस्तू स्वीकारल्या .
या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतीश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन दिलीप उंबरकर यांनी केले तर आभार नगरसेवक धीरज घाटे यांनी मानले .
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी सांगितले कि , सोफोश या संस्थेला मदत करण्याचे आश्वासन दिले . यावेळी नगरसेवक धीरज घाटे यांनी सांगितले कि , मालोजीराजे यांच्या वाढदिवशी सामाजिक संस्थेस मदत करून एक चांगला सामाजिक उपक्रम दिलीप उंबरकर आणि सतीश गायकवाड यांनी राबविला आहे