Home Blog Page 3309

येणाऱ्या काळात चाळीस लाख शेतीपंप सौरऊर्जेवर चालविण्यात येणार-ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

पुणे :राज्य शासन नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कटीबद्ध्‍ आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज असून पुढील दहा वर्षाच्या कालावधीत जवळपास चाळीस लाख शेती पंप सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जा तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जातर्फे दरवर्षी ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थांना व व्यक्तींना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. २०१५-१६ या  वर्षात ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ७४ संस्था आणि व्यक्तींना आज ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र  देऊन गौरविण्यात आले त्यावेळी ऊर्जा मंत्री बोलत होते. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार जगदिश मुळीक, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष धनंजय गंधे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धेारण जाहिर केले आहे. राज्य ऊर्जा संवर्धन धोरणाच्या अंमलबजावणीमुळे सन २०२०-२१ पर्यत कोळश्यापासून निर्माण करण्यात येणारी सुमारे १००० मे.वॅट ऊर्जेची बचत होणार आहे. ऊर्जा संवर्धन धोरणात सर्व प्रकाच्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या धोरणामध्ये व्यावसायीक क्षेत्रातील शॉपींग मॉल, मल्टिफलेक्स्, मोठे हॉस्पीटल, शासकीय इमारती, नगरपालिका, महानगरपालिका, घरगुती क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य ऊर्जा संवर्धन धोरण राबविल्यामुळे राज्याचा ऊर्जा प्रश्न सुटणार असल्याचेही ते म्हणाले. महाऊर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्र घडविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापनात सहभागी झालेल्या सर्व घटकांनी ऊर्जा बचतीसाठी सुमारे ५७७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली व त्यापासून सुमारे ४२१ कोटी एवढी वार्षिक ऊर्जा बचत साध्य झाल्याचे सांगितले. त्यामुळे या योजनेतून २६४० दशलक्ष युनिट म्हणजेच ३८६ मे.वॅट विद्युत ऊर्जेची बचत झाली आहे, अशी माहिती दिली.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष धनंजय गंधे यांनी यावेळी पुरस्कार निवड पारदर्शक पध्दतीने केल्याचे सांगितले. ऊर्जेच्या बाबतीत देश स्वयंपूर्णतेकडे जात असून ऊर्जा संवर्धनात गुणात्मक  वाढ झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. पुरस्कार निवड समिती सदस्यांचा यावेळी ऊर्जा मंत्रयांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप महाऊर्जेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी केला.

मराठी चित्रपट महामंडळाचे चित्रकर्मी पुरस्कार जाहीर (व्हिडीओ)

0

पुणे- निर्मात्यांपासून स्पॉटबॉय पर्यंत भारतीय सिनेमात योगदान देणाऱ्या 17 कलावंतांचा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने चित्रकर्मी पुरस्कार पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे . चित्रकर्मी पुरस्कार सोहळा येत्या २४ जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे . संचालिका निकिता मोघे या सोहळ्याचे दिग्दर्शक माधव अभ्यंकर ,खजिनदार संजय ठुबे,समारंभ समिती प्रमुख गिरीश कोळपकर आदी या समारंभाचे नियोजन करीत असून यंदा पहिल्यांदाच समारंभाचे काम इव्हेंट कंपनीकडे देण्यात आलेले नाही .  याबाबत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिलेली माहिती (पहा व्हिडीओ)

अरविंद शिंदेंच्या फटकाऱ्यांनी तुकाराम मुंडेंचे अधिकारी गारद -पहा व्हिडीओ

0

पुणे- महापालिकेच्या सभागृहातील धडाडणारी तोफ म्हणून अरविंद शिंदे ,चेतन तुपे पाटील ,सुभाष जगताप ,आबा बागुल ,अविनाश बागवे अशा नावांचा प्रामुख्याने उल्लेख होतो . आज हे नमूद करण्याचे कारण तसेच आहे . पीएमपीएमएल चे तुकाराम मुंडे कधी सभागृहात येतील आणि या तोफांच्या माऱ्याचा मुकाबला करतील … असा मुकाबला महापालिकेच्या मुख्य सभेच्या इतिहासात नोंदला जाणारा ठरेल काय ? मुंडे यांच्यात सभागृहात येण्याची हिम्मत आहे काय ? असे अनेक प्रश्न चर्चीले जात असतात .
आज हा विषय पुन्हा निघाला तो ..मुख्य सभेत आलेल्या

पीएमपीएमएल च्या विषयावरून …कदाचित धारूरकर सारखे जुने जाणते अधिकारी आले असते तर असा ऐरनीवर विषय कोणी आला  नसता… पण मुंडे यांनी मुख्य सभेत पाठविलेले अधिकारी बिच्चारे कच्चे निघाले … अन घोटाळा झाला . त्यातील एक तर नुकतेच बदलून आलेले होते अन दुसरे जरी मुख्य लेखा अधिकारी असले तरी अपूर्ण तयारी अभावी कदाचित  गांगरून गेलेले  होते .
पीएमपीएमएलला येणाऱ्या तुटी मुळे महापालिका दरमहा १२ कोटीचा निधी पीएमपीएमएलला देते .त्यातील मासिक हप्ता १२ कोटीचा अदा करण्याबाबतचा हा विषय होता . अर्थात हि देय रक्कम मुख्यसभेने अडविली नाही संमत केली . पण पुढचा निधीचा हप्ता देण्यापूर्वी सीएमडी यांनी खूप चांगल्या योजना तुट कमी करण्यासाठी अंमलात आणल्या आहेत त्यांचे सादरीकरण करावे आणि त्याबाबतचा जुलै महिन्यातील अहवाल हि मुख्यसभेपुढे ठेवावा अशा उपसूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे ….. पहा या प्रसंगाची ही पहावी अशी  झलक .

तिजोरीत 302 कोटीची तरतूद असताना 200 कोटीचे कर्ज कशाला?

0

पुणे-बहुचर्चित चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात जलवाहिनी टाकण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात 302 कोटी रुपयांची तरतूद असताना,दरमहा दीड कोटींचे व्याज देऊन 200 कोटींचे कर्जरोखे काढलेच कशाला? असा सवाल मुख्यसभेत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला.हि तरतूद खर्च झाल्यानंतर कर्जरोखे काढावेत असा ठराव असताना आयुक्त  कुणालकुमार यांनी अगोदरच कर्ज रोखे कसे काढलेअसा सवाल ही त्यांनी  केला  

प्रश्न उत्तराच्या तासात काँग्रेस नगरसेवक आबा बागुल यांनी अर्थसंकल्पामध्ये समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या कामासाठी किती कोटींची तरतूद केली आहे? असा प्रश्‍न बागूल यांनी उपस्थित केला असता, 302 कोटींची तरतूद असून त्यापैकी 4 कोटी खर्च झाले असल्याचे शिल्पा कळसकर यांनी सांगितले. त्यावर यंदाच्या अंदाजपत्रकातील तरतुदींपैकी 298 कोटी रुपये शिल्लक असताना 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे काढलेच कशाला?

सभासदांच्या विचारलेल्या प्रश्‍नावर प्रशासन निरुत्तर झाले. गरज भासेल तसे कर्जरोखे उभारण्यास मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. मात्र, बँकेत ठेवी, अनामत रक्कमा आणि अंदाजपत्रकातील तरतूद शिल्लक असताना कर्जरोखे काढण्याची परवानगी कोणी दिली? असा सवालही यावेळी उपस्थित झाला. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर महापौर मुक्ता टिळक यांनी हस्तक्षेप करत आयुक्त कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा करण्याची ग्वाही सभासदांना दिली.

..गोष्ट गमतीची आणि गंभीरतेची …सहजतेची..पालिका मुख्य सभेची

0

पुणे- मानला तर देव,नाही तर दगड म्हणतात.. तसेच काही तरी , मानली तर गोष्ट गमतीची किंवा गंभीरतेची … पण झलक पहायलाच हवी म्हणून .. महापालिका मुख्य सभेतील हा प्रसंग जरूर पहा आणि निट ऐका ..

पालिकेची मुख्य सभा सुरु झाली कि आयुक्तांनी किंवा डायस वरून कोणीही वरिष्ठ अधिकारी महापौर यांनी कुठे जायचे झाल्यास परवानगीने जाणे आवश्यक  असते . महापौर अशा  सभागृहाच्या परवानगीने किंवा सांगून जावू शकतात तर आयुक्त ,नगरसचिव महापौरांच्या परवानगीने जाऊ शकतात … पण नेमके काही मुद्दे उपस्थित होतात आणि काहीजण गायब होतात अशा तक्रारी पूर्वी नगरसेवकांच्या बाबत जशा बोलल्या जात तशा आता आयुक्तांबद्दल ऐकायला आल्यास नवल वाटणार नाही ,आबा बागुल आणि अविनाश बागवे यांचे महत्वाचे प्रश्न आज उपस्थित होणार असताना त्यावर आयुक्तांनी उत्तरे देणे आवश्यक असताना … आयुक्त सभागृहातून गेल्याने मोठे आश्चर्य वाटू लागले आहे . पहा एक अशीच गमतीदार झलक …

ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, विधवा महिला यांना पेन्शनसाठी शिवसेनेचे आंदोलन

0

पुणे -महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोर ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, विधवा महिला यांना पेन्शन अजूनही सुरू न केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने हा विषय लावून धरला अखेर महापौर मुक्त टिळक यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना स्थायी समिती समोर या बाबतचा सविस्तर प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले. पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांचा यावेळी निषेध करण्यात आला.

पालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, प्रमोद नाना भानगिरे, बाळा ओसवाल, विशाल धनवडे, संगीता ठोसर, श्वेता चव्हाण, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट,  श्रीशेठ चव्हाण, नंदु माझे, संजय वाल्हेकर, राजेंद्र शिंदे, राजू सावंत, यशवंत शिर्के, संजय डोगरे, राजू विटकर, रुपेश पवार, मकरंद पेठकर, चंद्रकांत साठे, भाऊसाहेब कापडी, संतोष थोरात, राजेश परदेशी, सुरेश पवळे, संतोष भोसले, दिलीप महादे, शांताराम जावळे, पंकज जावळे, मुकुंद चव्हाण, शैलेंद्र मोझे आदी या आदोंलनात सहभागी झाले होते.

पुणे महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, अंध आणि अंपग व्यक्तीसाठी पेन्शन योजना सुरू केली. पण या योजनेसाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद नसल्यामुळे त्यांची अमंलबजावणी होत नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने या योजनेसाठी आर्थिक तरतूद लवकर उपलब्ध करून दयावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, या आंदोलनानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी अंध आणि अंपगांना पेन्शन देण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादीचे दिलीप बराटे, भाजपचे गोपाळ चिंतल यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर या पेन्शनसाठी कमी असणारी रक्कम देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समिती पुढे आणावा, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

‘4 इझी स्टेप्स टु स्विच फ्रॉम जॉब टु सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअरशिप’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

0

पुणे : युनायटेड किंग्डममधील (मूळ पुणेकर) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक व ब्रँडिंग तज्ज्ञ, तसेच प्रसिद्ध सक्सेस कोच निलेश (उर्फ निलेश वाघचौडे) यांनी लिहीलेल्या 4 इझी स्टेप्स टु स्विच फ्रॉम जॉब टु सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअरशिप’ या पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. सक्सेस कोच निलेश यांनी याआधी ‘हाऊ टु बिकम ए सक्सेसफुल आंत्रप्रेन्युअर’ या विषयावरील अनेक कार्यशाळा घेतल्यानंतर हे पुस्तक लिहीले आहे. ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेले हे पुस्तक एखाद्याला नोकरी काळजीपूर्वक सोडून यशस्वी उद्योजक बनण्यास मदत करण्यासाठी निर्माण केलेले बहुधा पहिलेच आणि सर्वाधिक प्रात्यक्षिक पुस्तक असावे.

 

यासंदर्भात सक्सेस कोच निलेश म्हणाले, “अनेक लोकांना नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याची इच्छा असते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्यापैकी मोजकेच लोक यशस्वी होतात. एखाद्या नोकरीत आयुष्यभर काम करत बसण्यापेक्षा उद्योजकतेकडे नवे करिअर म्हणून बघण्याचा वाढता कल आजच्या व्यावसायिकांमध्ये दिसून येत आहे. माझ्या पुस्तकामधून मी अशा सर्वांना त्यांच्या साहसात यशस्वी बनण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करुन मदतीचा दृष्टीकोन ठेवला आहे. त्याचबरोबर नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या चुका करणे टाळावे व त्यांच्या पैशाची बचत व्हावी यासाठी मी त्यांना योग्य व्यवसायाची व्यूहरचनाही दिली आहे, जी त्यांचा नफा वाढवेल.”

 

ते पुढे म्हणाले, “उद्योजकता हा समाजात गरजेचा असलेला बदलाचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. समाजातील सर्वसाधारण कल म्हणजे आपण लोकांना डॉक्टर, इंजिनिअर बनण्यास प्रोत्साहन देतो, परंतु फार थोडे लोक इतरांना उद्योजक बनण्यासंदर्भात मदत करतात, हे दुर्दैव आहे. उद्योजकता व्यक्तीला नोकरीच्या अनेक संधी निर्माण करण्यास, जीवने बदलून टाकण्यास आणि अभिनवता व आर्थिक प्रगतीकडील मार्ग खुला करण्यास सक्षम बनवते. उद्योजकता समाधान, स्वातंत्र्य आणि हे जग उत्तम ठिकाण बनवण्यासाठी योगदानाची भावना देते. जगाची एक-तृतियांश लोकसंख्या मूलभूत उर्जेपासून वंचित आहे आणि जागतिक लोकसंख्येचा ७१ टक्के हिस्सा आजही दिवसाला १० डॉलरपेक्षा कमी उत्पन्नावर गुजराण करतो. या स्थितीत मानवी संस्कृतीसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांवर उत्तरे शोधून काढण्यात उद्योजकता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. एकंदरीत आपल्या समाजाला किंवा जगाला अशा व्यक्तींची गरज आहे, जे अत्यंत आवश्यक असा बदल घडवण्याचे स्वप्न बघतात आणि धाडस दाखवतात.”

३५ शाळेमधील अडीच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार

0

पुणे-दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने पुणे शहर व जिल्ह्यामधील ३५ शाळेमधील अडीच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार नगरसेवक रफिक शेख यांच्याहस्ते करण्यात आले .

भवानी पेठमधील गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार  , दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , बंधू भाव भाईचारा संघटनेचे अध्यक्ष शब्बीर शेख , मुस्लिम को ऑप. बँक संचालक एस. ए. इनामदार व विद्यानिकेतन एजुकेशन ट्रस्ट सिमा फरीद तुंगेकर उपस्थित होते .

या कार्यक्रमात सेवा निवृत्त शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देउन सत्कार करण्यात आला . पुणे शहरामधील उर्दू माध्यमातील शाळांमधील दहावीमधील शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व भेटवस्तू सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गोल्डन ज्युबली एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शाहिद इनामदार  यांनी सांगितले कि ,   दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कौतुकास्पद असून पुढील वर्षी प्रमाणे मुलांना माहिती तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी लॅपटॉप आणि आयपॉड गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश प्राप्त होत असल्याने त्यांचे व पालकांचे कौतुक केले . मागील वीस वर्षांपासून दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे . सोसायटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे .

नगरसेवक रफिक शेख  यांनी दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी भविष्यकाळात मदत करण्याचे आश्वासन दिले . गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल , पुणे महापालिकेकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत दि मुस्लिम वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी यांनी केले तर सूत्रसंचालन अहमद बागवान यांनी केले तर आभार मोहंमद मुतलिब मोहम्मद मुख्तार यांनी मानले .

या कार्यक्रमास हाजी गुलाम एजुकेशन ट्रस्टचे शाहिद मुनीर शेख , अब्दुल वहाब (पार्टी), आफिया मोहमदअली , अब्दुल सत्तार , खान फिरोज गुलशेर, मतीन शेख , अमीन शेख , व समाजातील अन्य मान्यवर , मुख्याध्यापक , पालक आणि शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते

एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयामध्ये आमदार निधीमधून सहा संगणक प्रदान

0

पुणे-रास्ता पेठमधील एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयामध्ये  विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून सहा संगणक प्रदान करण्यात आली . या संगणक संगणक कक्षाचे उदघाटन आमदार अनंतराव गाडगीळ यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले .

यावेळी एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयाच्या  मुख्याध्यापिका  प्रतिभा म्हंकाळे , विल्सन मॅसी ,अनिल गडकरी सुजया पुणेकर , गोपाळराव पायगुडे , सर्वेश्वर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी  विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , राजीव गांधी यांनी संगणकाच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाची क्रांती आणली . त्या क्रांती मुळे आज आय टी उद्योगात तरुणांना रोजगार मिळाले . यासाठी आपण आपला आमदार निधीतून शैक्षणिक क्षेत्रात देत आहोत . जेणे करून आपण संगणकाचे ज्ञान प्राप्त करावे .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत एथेल गॉर्डन अध्यापिका महाविद्यालयाच्या  मुख्याध्यापिका प्रतिभा म्हंकाळे यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा पंडित यांनी केले तर आभार मनिषा गडकरी यांनी मानले .

क्यूरिक्स कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कॅबला ” आय एस ओ ९००१ : २०१५ सर्टिफिकेशन ” चे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र

पुणे-क्यूरिक्स  कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज  प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ” आय एस ओ ९००१ : २०१५  सर्टिफिकेशन ”  हे  आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र  आय एस ओ सर्टिफिकेशन्स कंपनीचे संचालिका शोभा माळी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुरेश दामोदर माळी यांच्याहस्ते क्यूरिक्स  कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज  प्रायव्हेट लिमिटेड कॅबच्या  संचालिका  सरस्वती अशोक नाझरे व संचालक अशोक कृष्णराव नाझरे याना प्रदान करण्यात आली .

क्यूरिक्स  कॅलिब्रेशन  लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कॅबला   प्रथमच इन्स्ट्रुमेंट रिपेरिंग फिल्डमध्ये ” आय एस ओ ९००१ : २०१५  सर्टिफिकेशन ”   पंधरा महिन्याच्या आत अथक प्रयत्नांने प्राप्त झाले . अशी माहिती  आय एस ओ सर्टिफिकेशन्स कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुरेश दामोदर माळी यांनी सांगितले .

क्यूरिक्स  कॅलिब्रेशन  लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कॅब  ही संस्था भारतातील  सर्वात पहिली प्रायव्हेट अंशाकनं संस्था आहे . या संस्थेची स्थापना सन १९८९ मध्ये सर्वप्रथम पाषाणमध्ये सुरु झाली . आद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांना लागणाऱ्या सूक्ष्म मापन करणाऱ्या उपकरणांचे  अंशाकनं

 (कॅलिब्रेशन) येथे केले जाते . पण वापरात असलेली उपकरणे ही  पाहिजे तेवढी अपेक्षित शुध्दतेत व यथार्थतेत नसल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचीही गरज भासते . म्हणून या संस्थेने सर्व यांत्रिक , विद्युत व तापीय  उपकरणांचे दुरुस्तीचेही  काम सन १९८९ पासूनच सुरु केले . तेव्हा ही  संस्था उपकरणे दुरुस्ती व अंशाकनं करणारी भारतातील पहिली संस्था म्हणून गौरविली गेली . उपकरणांची शुध्दता व विश्वसनीयता  यामध्ये भारतातील इंडस्ट्रीजचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या संस्थेने या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता ही  प्राप्त करून घेतल्या आहेत . आंतरराष्ट्रीय मान्यता पत्रक देणाऱ्या संस्था एन ए बी एल १७०२५ : २००५ दिल्ली आणि ए. सी. सी. ए. बी. मुंबई अशा होत . क्यूरिक्स  कॅलिब्रेशन  लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कॅबला ” आय एस ओ ९००१ : २०१५  सर्टिफिकेशन ”  या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र  मिळण्यामागे आमचे सिनियर मॅनेजमेंट सिस्टीम कन्सल्टन्ट  सुहास नारायण गोळे व  क्यूरिक्स कॅबचे क्वालिटी मॅनेजर वर्गीस चेरियन यांचे मार्गदर्शन लाभले . असे  क्यूरिक्स  कॅलिब्रेशन  लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कॅबचे संचालक अशोक कृष्णराव नाझरे यांनी सांगितले .

‘अनुबद्ध’ मैफलीतून घडणार अभिजात नृत्यशैलीचे दर्शन

0

नृत्यभारतीच्या ७० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजन

 

पुणे ता. २१: नृत्यभारती डान्स अकॅडमीच्या ७०व्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या २७ तारखेला ‘अनुबद्ध’ या कथक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ६.३० ते १०.३० या दरम्यान ही मैफल  रंगणार असून संस्थेच्या जगभरातील शाखांमधील ५० निपुण नर्तकींचा नृत्यविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची अनोखी संधी यानिमित्ताने रसिक पुणेकरांना लाभणार आहे.

 

पं. रोहिणीताई भाटे यांच्या शैलीत नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ रचनांचे सादरीकरण हे ‘अनुबद्ध’ मैफलीचे प्रमुख आकर्षण ठरेल. कथक केंद्र, दिल्लीच्या अध्यक्षा कमलिनी अस्थाना यादेखील या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहणार असून प्रसिद्धतबलावादक पं. अरविंदकुमार आजाद आणि संगीतकार अजय पराड यांच्या सुरेल साथीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढेल.

 

या महासोहळ्याच्या औचित्याने संस्थेच्या शाखांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘मति अमित गति ललित’, ‘संचित आणि सृजन’, ‘आवर्तन’, ‘अनुग्रह’, ‘अनाहत’ एकल विद्या’, ‘उजवी बाजू’ आदी मैफलींना रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. तसेच या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठही उपलब्ध झाले.

 

कथक कलेचा आणि पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्याविष्काराचा वारसा नृत्यभारती संस्था गेली ७० वर्षे अव्याहतपणे जपत आहेे. ‘अनुबद्ध’ मैफल म्हणजे या अथक मेहनतीचे मूर्त रूप असून याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

अविनाश भोसलेसह विश्वजित कदमांच्या वर आयकर खात्याचे छापे ..

0

पुणे-  बहुचर्चित  उद्योजक अविनाश भोसले तसेच काँग्रेस नेते ,भारती विद्यापीठाचे पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले

अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम या दोघांच्याही निवासस्थान आणि कार्यालयांवर हे छापे पडले .आयकर विभागाचे अधिकारी सध्या तपासणी करत आहेत. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन काढून घेतले आहेत. अशीच तपासणी विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातही सुरू आहे. अविनाश भोसले आणि विश्वजीत कदम यांच्या कोण-कोणत्या कार्यालयांवर छापेमारी झाली आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

इदगाह मैदानातील प्रलंबित कामे पूर्ण करू : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : इदगाह मैदानातील प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून देवू तसेच लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. इदगाह मैदानात आज पालकमंत्री गिरीश बापट तसेच सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव, अभियंते सोपान गायकवाड, मौलाना निजामुद्दीन,नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर,रुपाली बिडकर, मनिषा लडकत, जैनुल काजी, इसाकभाई चाविवाले, ताहेर आसी अहमद शेख, रफिक शेख, युसुफ बागवान, तनवीर सय्यद, शैलेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

इदगाह मैदानात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाण्याची टाकी बांधावी, तसेच या मैदानाची पडलेली भिंत बांधून मिळावी, या मैदानात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात यावे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. ही प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्याची ग्वाही श्री बापट यांनी दिली. यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. यावेळी मंत्री दिलीप कांबळे यांनीही समाजकल्याण मंत्रालयाकडून निधी देण्याचे मान्य केले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही प्रत्येक व्यक्ती आणि समूहाची सार्वजनिक जबाबदारी आहे. त्यामुळे इदगाह मैदानात करण्यात येणारे वृक्षारोपण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.  भविष्यात या झाडांचे संगोपन आणि संवर्धन ही निश्चितच होईल याची मला खात्री आहे. असही ते यावेळी म्हणाले.

पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या तुपे पाटलांची टीका (व्हिडीओ)

0

पुणे-मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जुन्या कामांची उद्घाटने झालेली असताना पुन्हा  पुनरुदघाटणे करून मुख्यमंत्र्यांना  शिळ्या कढीची भेट देण्याचा प्रकार करून महापालिकेतील भाजपा पदाधिकारी पुणेकरांचा पैसा अनाठायी उधळत आहे असा आरोप आज येथे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते ,राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे पाटील यांनी केला आहे . पहा आणि ऐका .. नेमके तुपे पाटील काय म्हणाले …

प्रियदर्शन व कुशलची खडाजंगी

0

प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘बाहुबली २’ चित्रपटामुळे सगळीकडे बाहुबली फिवर पहायला मिळत आहे. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री सुद्धा यात मागे नाही. यंदाच्या झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स सोहळ्यातही याचा प्रत्यय आला. अभिनेता प्रियदर्शन जाधवने बाहुबलीचा तर कुशल बद्रीकेने भल्लालदेवचा अवतार धारण करत केलेली खडाजंगी चांगलीच रंगली. एकमेकांना नामोहरम करण्यासाठी या दोघांनी कोणत्या नवनव्या चाली रचल्या हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. यात नेमकं काय घडलं? व कोणी कोणावर मात केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रविवार ३० जुलैला सायं. ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स मध्ये पहायला मिळतील.