Home Blog Page 3306

स्मार्ट सिटीचा कारभार ‘खाजगी ‘नाही ,डंका वाजवणारच..

0

पुणे- स्मार्ट सिटी कंपनी जरी खाजगी असली तरीही लोकहितासाठी हि कंपनी स्थापन झालेली असल्याने या कंपनीचा कारभार खाजगी ठेवू देणार नाही , कारभाराचा डंका आम्ही वाजवणारच ..तुम्ही चांगले  काम करा, चांगला डंका वाजेल ,चुकलात तर टीकेचा भडीमार होईल..पण ‘आळी मिळी गप गिळी’असा कारभार आम्ही चालू देणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यानंतर आज स्मार्ट सिटी ने आपल्या संचालकांना वाटल्यास ते मीडियाशी कारभाराची माहिती देणे अगर कारभाराबाबत प्रतिक्रिया देणे असा व्यवहार करू शकतील .आणि स्मार्ट सिटीचा कारभारासाठी एक पीआरओ नेमला जाईल असा निर्णय घेतल्याची माहिती येथे मिळाली आहे . यासंदर्भात महापालिकेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे यांना विचारले असता ..पहा ते काय म्हणाले ..ऐका ..पहा …

हरकानगरमध्ये चार निशाणाची स्थापना

0

पुणे-येथील भवानी पेठ हरकानगरमध्ये चार निशाणाची स्थापना करण्यात आली . यामध्ये पुरुषोत्तम भगत निशाण आखाडा कालू भगत  भगत निशाण आखाडा , रामलाल  भगत निशाण आखाडा या चार निशाणांची स्थापना करण्यात आली . यावेळी निशाणांची स्थापना हरकानगर , नवा मोदीखाना , सोलापूर बाजार न्या भागात भव्य मिरवणूक काढण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते . यावेळी हरकानगर तरुण मंडळाच्यावतीने सर्व निशाण प्रमुखांचे स्वागत श्रीफळ आणि हार देउन मंडळाचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी केले . यावेळी गोपी वाघेला , गोपाळ वाघेला , हेमराज साळुंके , नितीन रहिस्वाल , गणेश चव्हाण , योगेश कंडारे , महेश जाधव व भक्त सहभागी झाले होते . यावेळी सर्व निशाणांची पूजा करून स्थापना करण्यात आली . त्यानंतर सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला . रात्री भजन झाले .

नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नांना यश; राजाराम पुलाच्या रुंदीकरणाला सुरुवात ।

0

पुणे-धायरी कडून राजाराम पुलाकडे वळणाऱ्या वाहनांची गैरसोय कमी होऊन, तसेच राजाराम पूल चौकातील वाहतूक कोंडी टळावी, यासाठी चौकातील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची भिंत 15 फूट आत घेण्याच्या कामाला आज सौ.नागपुरे यांच्या प्रयत्नातून सुरुवात करण्यात आली.
पाणीपुरवठा विभाग, व मनपा प्रशासन यांच्यात समानव्य साधून, पाठपुरावा करून या कामास सौ.नागपुरे यांनी गती दिली .मनपा अधिकारी श्री.बोनाला साहेब तसेच वाहतूक अधिकारी.श्री.कर्पे साहेब यांच्याबरोबर 23 जून रोजी प्रत्यक्ष पाहणी सौ.नागपुरे यांनी केली व आज कामास सुरुवात करण्यात आली. पर्यायी रस्ते, प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस, चौक रुंदीकरण, सनसिटी भाजी मंडई येथील पूल, या माध्यमातून सिंहगड रस्ता वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सौ.नागपुरे यांनी सांगितले.

‘विश्वासमत’मधील लिखाण विश्वासार्ह – मुख्यमंत्री दोन खंडाचे थाटात प्रकाशन

0

मुंबई – विश्वास पाठक लिखित “विश्वासमत” या पुस्तकातील लिखाण हे विश्वासार्ह असून सर्वसामान्यांना संदर्भग्रथ म्हणून उपयोगात येणारे या पुस्तकाचे दोन्ही खंड असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज सायंकाळी कार्पेरेट क्षेत्रातील “टर्न अराऊंड मॅन” म्हणून ओळख असलेले व मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक, भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्या “विश्वासमत” या पुस्तकाच्या दोन खंडाचे प्रकाशन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

व्यासपीठावर राज्याचे ऊर्जा व राज्य उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, भाजपाचे विदेश विभाग प्रभारी डॉ.विजय चौथाईवाले व अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आ.आशिष शेलार, आ.मेधा कुलकर्णी, माजी आ.आशिष जयस्वाल, आ.मल्लिकार्जुन रेड्डी, चरणसिंग ठाकूर, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले- विश्वास पाठकांनी समाजाला काही देण्याच्या भावनेतून हे लिखाण केले आहे. या लेखनावरून व्यवस्थापन क्षेत्रातील लेखकाचा मूळ व्यवसाय लेखनाचा असल्याचे वाटून जाते, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- आव्हाने स्वीकारणे आणि आव्हानांना समोर जातांना उत्तमच काम करावे हा पाठकांचा स्वभावगुण आहे. मनाच्या संवेदनशिलतेचा परिचय वाचकांना या लिखाणातून होईल. तसेच घटनेची अचूक फोड करून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या लेखनातून केला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. एक सिध्दहस्त लेखकच अशा प्रयत्नात यशस्वी होतो असेही ते म्हणाले.

हृदयस्पर्शी पुस्तक: ऊर्जामंत्री

विश्वासमतचे दोन खंड चाळतांना लक्षात येते की सर्वसामान्य माणासाच्या मनाला भिडणारे हे एक हृदयस्पर्शी पुस्तक आहे, अशा शब्दात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पुस्तकातील लिखाणावर आपली पावती दिली. अष्टपैलू गुणांचे धनी असलेल्या विश्वास पाठक यांच्यात कोणत्याही विषयावर भाष्य करण्याची ताकद असल्याचा अनुभव या पुस्तकातून वाचकांना येईल असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

बहुआयामी व्यक्तिमत्व: डॉ.चौथाईवाले

विश्वासमत वाचतांना लेखक विश्वास पाठक हे बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी असल्याचे लक्षात येते, अशी भावना भाजपाचे विदेश विभाग प्रभारी डॉ.विजय चौथाईवाले यांनी व्यक्त केली. केवळ शब्दच्छल नसलेले व सामाजिक जाणिवेची भान ठेवून केलेले हे लिखाण असून अत्यंत क्लीष्ट असलेले विषय सोप्या शब्दात त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. मातीशी, समाजाशी जोडला असेल तोच असे लिखाण करू शकतो, असेही डॉ.चौथाईवाले म्हणाले.

परिणामकारक : मदन येरावार

वृत्तपत्रे आणि ब्लॉगचा माध्यमातून केलेल्या लिखाणाचे 128 लेख या पुस्तकाच्या दोन्ही खंडात असून परिणामकारक व अभ्यासपूर्ण असे लिखाण विश्वास पाठक यांनी केल्याचे प्रतिपादण ऊर्जाराज्यमंत्री मदन येरावार यांनी केले. या लिखाणातून पाठक यांनी वाचकांशी संवाद साधला आहे असेही ते म्हणाले.

आपल्या मनोगतातून विश्वास पाठक यांनी लिहिण्याची प्रेरणा आपल्याला वाचकांपासून मिळाली असून वाचकांनीच लिखाणाला प्रवृत्त केले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमेय प्रकाशनचे मकरंद जोशी यांनी मानले. अनेक चाहत्यांनी आणि रसिक वाचकांनी या कार्यक्रमाला चांगली गर्दी केली होती.

कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्यांना जिल्हास्तरावर नोंदणी करणे अनिवार्य

0

नोंदणी विनाशुल्क करण्यात येणार

पुणे, दि. 29 : जिल्ह्यातील कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्या सहकारी दुध संस्था, शासकीय संस्था, खाजगी दुध संघ यांचेकडील सर्व कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्या पदवीधर व पदवीधारक तंत्रज्ञांना पशुसंवर्धन खात्याच्या मागदर्शक सुचनेनुसार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, खडकी, पुणे-3 येथे नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.

केंद्र शासनाने राज्यातील पैदासक्षम गायीं व म्हशींना 100 टक्के दर्जेदार कृत्रीम रेतन सेवा पुरविणे निश्चित केले आहे. त्या करीता महाराष्ट्र राज्याची पथदर्शी राज्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्यांनी नोंदणी करुन घेणे बंधनकारक आहे. नोंदणी न केल्यास कायद्याचे उल्लंघन असून संबंधीत व्यक्तींवर, इंडीयन पिनल कोड 1860, कलम 128 अन्वये कार्यवाही करण्यात येईल. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

कृत्रीम रेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतनाचा स्त्रोत योग्य असावे व सेंट्रल मॉनीटरींग युनीटव्दारे ‘अ’ व ‘ब’ मानांकन असलेल्या गोठीत रेतन प्रयोगशाळेत तयार झालेले असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, खडकी, पुणे-3 व पशुसंवर्धन खात्याच्या टोलफ्री क्रमांक-18002330418 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी  प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

एलपीएफ शिष्यवृत्ती – आपल्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याची संधी

0

 

लीला पूनावाला फाऊंडेशनने आपल्या वार्षिक पदवी आणि पदव्युत्त शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. १९९६ साली सुरू झालेल्या फाउंडेशनचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाश्वभूमी असलेल्या मुलींना शैक्षणिकदृष्ट्या मदत करून  पाठिंबा देणे हा आहे.  आपल्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या कालावधीत फाऊंडेशनने  शिष्यवृत्तीसाठी पात्र अश्या ५८४८  मुलींना शिष्यवृत्ति देऊन त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार केले आहे. आश्या प्रकारे केल्या जानार्या मदतीचे हे २२ वे वर्ष आहे.

मुलींना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यास मदत करणे आणि त्यांना शिक्षित करणे हा ह्यामागिल उद्येश्य आहे. दुर्बल आर्थिक स्थितीमुळे बर्याचश्या  हुशार मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत परंतु लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ)ने अश्या मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले आहे.

पुणे जिल्हातील  खाली नमुद केलेल्या कोणत्याही शाखेत पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची इच्छा असलेल्या उमेदवार मुली शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात.  ह्यात इंजिनियरिंगचे कोणतेही सेमिस्टर(डिप्लोमा नंतर इंजिनियरिंगचे दूसरे वर्ष), सायन्स, फार्मसी (प्रथम वर्ष आणि आणि डी.फर्म नंतरचे दुसरे वर्ष) आणि नर्सिंग अश्या अभ्याक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

ज्या प्रथम शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये आहेत केवळ त्या विद्यार्थीनी ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी दिली जाते. ह्यासाठी पात्रतेची काही मापदंडाने निर्धारित केलेली आहेत. येथे शिष्यवृत्तीबरोबरच मुलींमध्ये आत्मविश्वास  विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात.

प्रथम येणार्यांस प्रथम सेवा तत्वावर अर्ज उपलब्ध आहेत, युजी-पीजी मधील सर्व श्रेणींसाठी समाप्तीची तारीख पाहने गरजेचे आहे.

फॉर्म उपलब्धता शेवटची तारीख

पदव्युत्तर शिक्षण-गुरुवार १० ऑगस्ट

विज्ञान-बुधवार १६ ऑगस्ट

फार्मसी-गुरुवार २४ ऑगस्ट

अभियांत्रिकी (बी.ई)-शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट

डिप्लोमा इन इंजिनियरिंग-बुधवार १६ ऑगस्ट

डिप्लोमा नंतर अभियांत्रिकी शिक्षण-शनिवार दिनांक २६ऑगस्ट

नर्सिंग-मंगळवार १२ सप्टेंबर

कार्यालयाशी संपर्कासाठी पत्ता

लीला पूनावाला फाउंडेशन

‘फीली व्हिला’, १०१/१०२, सर्वे नं. २३,

बालेवाडी, बनेर, पुणे – ४११०४५

(कार्यालयापर्यंत येण्यासाठी दिशानिर्देश वेबसाइटवर दिले जातात)

वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते दुपारी ४:००

कोणत्याही प्रश्नासाठी प्रियंकाशी संपर्काचा क्रमांक आणि ई-मेल आयडी:

लँडलाईन: ०२० – ६५६००४६१/ ६२

मोबाईल: ९७६६७२८५३५/७०५७९८५६६५

ईमेल: priyanka@lilapoonawallafoundaiton.com

वेबसाइट: www.lilapoonawallafoundation.com

अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन ‘अ ब क’ चित्रपटासाठी गायले गीत

0

 

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी  अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी  – टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.

 

या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल. अशी भावना व्यक्त अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे हे असून चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे आहे. पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ या गीताचे अनावरण ५ ऑगस्ट रोजी श्री. श्री. श्री. रविशंकर यांच्या बेंगलोरच्या आश्रमात श्री. श्री. श्री. रविशंकर, किरण बेदी, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत  होणार आहे.

पुणे परिमंडलात जुलैमध्ये 23 हजार नवीन वीजमीटरचे वितरण तर 17400 उपलब्ध

0

पुणे : पुणे परिमंडलातील नवीन वीजजोडण्या तसेच सदोष वीजमीटर बदलण्यासाठी या महिन्यात सिंगल फेजच्या 23 हजार नवीन वीजमीटरचे संबंधीत कार्यालयांना वाटप करण्यात आले असून सद्यस्थितीत 17400 नवीन मीटर भांडार विभागात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुणे परिमंडलामध्ये वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या खोट्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात नवीन वीजजोडणी, सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी गेल्या एप्रिल 2017 पासून आतापर्यंत एकूण सिंगले फेजचे 64,750 नवीन वीजमीटर परिमंडल अंतर्गत कार्यालयांना वितरीत करण्यात आलेले आहेत. तर जुलै महिन्यातील मागणीनुसार गणेशखिंड मंडल व पुणे ग्रामीण मंडलमध्ये प्रत्येकी 8000 व रास्तापेठ मंडलमध्ये 7000 असे सिंगल फेजचे एकूण 23,000 नवीन वीजमीटर देण्यात आलेले आहेत. दि. 22 जुलैला गणेशखिंड – 5595, रास्तापेठ – 6031 व पुणे ग्रामीण मंडलमध्ये 9186 असे एकूण 20812 मीटर उपलब्ध असताना मागणीनुसार मंगळवारी (दि. 25) आणखी प्रत्येकी 5 हजार मीटर वितरीत करण्यात आले आहे. दि. 10 जुलैपर्यंत या तिनही मंडलमध्ये सिंगलफेज पेडपेडींगच्या नवीन वीजजोडण्यांसाठी 19,219 मीटरची आवश्यकता होती.

शिवाय या व्यतिरिक्त नवीन वीजजोडणी किंवा सदोष मीटर बदलण्यासाठी सद्यस्थितीत पुणे परिमंडलासाठी सिंगल फेजचे 17,400 नवीन वीजमीटर भांडार विभागात उपलब्ध आहेत. मुख्यालयातूनसुद्धा वीजमीटरचा मागणीनुसार पुरवठा होत असल्याने वीजमीटरचा कुठलाही तुटवडा नाही. महावितरणने मटेरियल मॅनेजमेंटची प्रक्रिया ही ‘ईआरपी’च्या (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) माध्यमातून ‘ऑनलाईन’ झालेली आहे. त्यामुळे साधनसामग्रीची उपलब्धता व पुरवठा ही प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक गतिमान झालेली आहे. वीजमीटरचा तुटवडा असल्यामुळे ते उपलब्ध नाही, अशा खोट्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शिवसृष्टी कि मेट्रो कि दोन्हीही … सकारात्मक तोडगा काढू –महापौर

पुणे- शिवसृष्टी प्रकल्प होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मेट्रोच्या डेपोसाठी डीपीआरमध्ये असलेले स्थान याचा विचार करता महामेट्रोचे अधिकारी, पालकमंत्री, इतर पक्षांचे नेते, गटनेते यांना बोलवून चर्चा करूया व त्यातून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी शिवसृष्टी विषयावर आयोजित करण्यात आलेल्या महासभेत स्प्ष्ट केले.

पुणे महापालिकेत कोथरूड येथील जागेवर शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याबाबतच्या विषयावर खास सभेचे आयोजन केले होते. संबंधित 9 एकर जागेवर स्टेशन उभे करायचे की शिवसृष्टी यावरून 2009 सालापासून वाद सुरू आहे. त्यावरून अनेकदा स्थानिक नगरसेवक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. याच विषयावर जवळपास साडेचार तास चाललेल्या या सभेननंतर बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निश्चित झाले.

आंदोलनाची वेळ येवू देणार नाही … सभागृहनेते (व्हिडिओ)

पुणे- शिव् सृष्टीसाठी दीपक मानकर यांच्यावर आंदोलनाची वेळ येवू देणार नाही असे आश्वासन आज पालिकेच्या खास सभेत  सभागृहनेते भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी दिले ..नेमके काय म्हणाले भिमाले ..ऐका आणि पहा ..

तर मेट्रो होऊ देणार नाही …. (व्हिडीओ)

पुणे-कोथरूडच्या जागेत जिथे शिवसृष्टी चा प्रकल्प मंजूर झाला आहे , तिथे शिवसृष्टीचे भूमिपूजन झाल्याशिवाय .. मेट्रो चा दगड लावू दिला जाणार नाही असा इशारा आज माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी येथे दिला

त्यांच्याच पुढाकाराने आणि आग्रहाने बोलाविण्यात महापालिकेच्या शिवसृष्टी या विषयावरील खास सभेत ते बोलत होते …

कोथरूड मध्ये आधी शिवसृष्टी नंतर मेट्रो -चेतन तुपे पाटील (व्हिडीओ)

पुणे- महापालिकेच्या शिववसृष्टीवरील खास सभेत विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी कोथरूड मध्ये शिवसृष्टी आणि मेट्रो दोन्ही होतील. यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी .. मात्र आधी शिवसृष्टी नंतरच मेट्रो अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली . कोथरूड यथे शिवसृष्टी आणि मेट्रो दोन्ही होऊ शकतात . असे ते म्हणाले . कोथरूडमधील कचरा डेपोची  सुमारे 28 एकर पाच गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच याच जागेवर मेट्रोचे टर्मिनस ही प्रस्तावित आहे.

कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरावा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाबाबत आज (28 जुलै) खास सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानुसार महापालिका भवन परिसरात शिवसृष्टी बनवण्याचे फ्लेक्स व झेंडे लावण्यात आले आहेत. सभागृहाच्या बाहेर रांगोळी व शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. यावेळी सभेपूर्वी सर्व विरोधकांनी तीव्र आंदोलन करीत शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मेट्रोची निंतात गरज आहे. त्यामुळे मेट्रोचे भुयारी स्थनाक करून तिथे शिवसृष्टी उभारावी अशी मागणी होत आहे .

सभागृहात अवतरले मावळ्यांसह महाराज… अखेर पर्यावरण खास सभा तहकूब

0

आज पुणे महापालिकेत दुपारी 3 वाजता पर्यावरणावरील खास सभा आणि 3-05 वाजता शिवसृष्टी वर खास सभा आयोजित करण्यात आली होती ..
यावेळी पहिली सभा सुरु होताच नगरसेवक साईनाथ बाबर शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तर योगेश ससाणे ,महेंद्र पठारे ,भैया जाधव ,वसंत मोरे हे मावळ्यांच्या वेशभूषेतच साभागृहात दाखल झाले आणि घोषणाबाजीत च विरली पहिली सभा ……..
शिवसृष्टीसाठी मनसे, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सर्व विरोधकांनी एकत्र येत खास सभेपूर्वी मावळ्यांच्या वेशभूषेत पुणे महापालिकेत तीव्र आंदोलन केल. यावेळी शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातच सभागृहात प्रवेश केला. तर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे, महिंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव यांनी मावळ्यांचा वेश केला होता.

कोथरूडमधील कचरा डेपोची सुमारे 28 एकर पाच गुंठे जागेत शिवसृष्टी उभारण्यास मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. त्यातच याच जागेवर मेट्रोचे टर्मिनस ही प्रस्तावित आहे.

कोथरूड शिवसृष्टी प्रकल्प पाठपुरावा करून देखील प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने या प्रकल्पाबाबत आज (28 जुलै) खास सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यानुसार महापालिका भवन परिसरात शिवसृष्टी बनवण्याचे फ्लेक्स व झेंडे लावण्यात आले आहेत. सभागृहाच्या बाहेर रांगोळी व शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. यावेळी सभेपूर्वी सर्व विरोधकांनी तीव्र आंदोलन करीत शिवसृष्टी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मेट्रोची निंतात गरज आहे. त्यामुळे मेट्रोचे भुयारी स्थनाक करून तिथे शिवसृष्टी उभारावी अशी मागणी होत आहे .

टेंडर संगनमत प्रकरणी महापालिकेला सीबीआय चे निर्देश

पुणे- २४ तास पाणीपुरवठा योजनेतील टेंडर प्रकरणी रिंग झाल्याची ,संगनमत झाल्याची तक्रार आल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश सीबीआय ने महापालिका आयुक्त कुणालकुमार यांना दिल्याची माहिती येथे कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिली… याबाबत पहा आणि ऐका ..नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले …..

महापालिकेची खास सभा live पहा ..फेसबुक वरील mymarathi.net च्या पेजवर

0

पुणे — आज पुणे महापालिकेची सुरु असलेली खास सभा फेसबुक वरील मायमराठी .नेट च्या पेजवर लाइव्ह पहा….

https://www.facebook.com/MyMarathiNews/