लीला पूनावाला फाऊंडेशनने आपल्या वार्षिक पदवी आणि पदव्युत्त शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. १९९६ साली सुरू झालेल्या फाउंडेशनचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाश्वभूमी असलेल्या मुलींना शैक्षणिकदृष्ट्या मदत करून पाठिंबा देणे हा आहे. आपल्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या कालावधीत फाऊंडेशनने शिष्यवृत्तीसाठी पात्र अश्या ५८४८ मुलींना शिष्यवृत्ति देऊन त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार केले आहे. आश्या प्रकारे केल्या जानार्या मदतीचे हे २२ वे वर्ष आहे.
मुलींना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यास मदत करणे आणि त्यांना शिक्षित करणे हा ह्यामागिल उद्येश्य आहे. दुर्बल आर्थिक स्थितीमुळे बर्याचश्या हुशार मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत परंतु लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ)ने अश्या मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले आहे.
पुणे जिल्हातील खाली नमुद केलेल्या कोणत्याही शाखेत पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची इच्छा असलेल्या उमेदवार मुली शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. ह्यात इंजिनियरिंगचे कोणतेही सेमिस्टर(डिप्लोमा नंतर इंजिनियरिंगचे दूसरे वर्ष), सायन्स, फार्मसी (प्रथम वर्ष आणि आणि डी.फर्म नंतरचे दुसरे वर्ष) आणि नर्सिंग अश्या अभ्याक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.
ज्या प्रथम शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये आहेत केवळ त्या विद्यार्थीनी ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी दिली जाते. ह्यासाठी पात्रतेची काही मापदंडाने निर्धारित केलेली आहेत. येथे शिष्यवृत्तीबरोबरच मुलींमध्ये आत्मविश्वास विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात.
प्रथम येणार्यांस प्रथम सेवा तत्वावर अर्ज उपलब्ध आहेत, युजी-पीजी मधील सर्व श्रेणींसाठी समाप्तीची तारीख पाहने गरजेचे आहे.
फॉर्म उपलब्धता शेवटची तारीख–
पदव्युत्तर शिक्षण-गुरुवार १० ऑगस्ट
विज्ञान-बुधवार १६ ऑगस्ट
फार्मसी-गुरुवार २४ ऑगस्ट
अभियांत्रिकी (बी.ई)-शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट
डिप्लोमा इन इंजिनियरिंग-बुधवार १६ ऑगस्ट
डिप्लोमा नंतर अभियांत्रिकी शिक्षण-शनिवार दिनांक २६ऑगस्ट
नर्सिंग-मंगळवार १२ सप्टेंबर
कार्यालयाशी संपर्कासाठी पत्ता –
लीला पूनावाला फाउंडेशन
‘फीली व्हिला’, १०१/१०२, सर्वे नं. २३,
बालेवाडी, बनेर, पुणे – ४११०४५
(कार्यालयापर्यंत येण्यासाठी दिशानिर्देश वेबसाइटवर दिले जातात)
वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते दुपारी ४:००
कोणत्याही प्रश्नासाठी प्रियंकाशी संपर्काचा क्रमांक आणि ई-मेल आयडी:
लँडलाईन: ०२० – ६५६००४६१/ ६२
मोबाईल: ९७६६७२८५३५/७०५७९८५६६५
ईमेल: priyanka@lilapoonawallafoundaiton.com
वेबसाइट: www.lilapoonawallafoundation.com