पुणे- कोंढवा येथे भाजपच्या पुढाऱ्याकडून ‘डोंगर घोटाळा’ झाल्याचा घणघणाती आरोप करणारा मुद्दा आज शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत केला. मात्र या प्रकरणी अवघ्या मिनिटभरात लक्ष हटवून सभा तहकूब करण्यात आली पहा आणि नीट ऐका .. नेमके काय आहे हे प्रकरण … (व्हिडीओ)
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सॅट अॅट बी व्ही’ चर्चासत्राचा चे आयोजन आत्मपरीक्षण करणे गरजेचे : अनिल जठार
आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द – आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा
पुणे दि. 9: आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. “पेसा” कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कट्टीबध्द असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज केले.
येथील बालगंधर्व रंगमंदिरात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार,तसेच संकेतस्थळ व मोबाईल ॲपचा शुभारंभ श्री.विष्णू सवरा यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास व वन विभागाचे राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय जनजाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आमदार डॉ. अशोक ऊइके, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार पास्कल धनारे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, आदिवासी विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश जगदाळे उपस्थित होते.
श्री. विष्णू सावरा म्हणाले, आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आदिवासी मुलांना शासनाच्यावतीने प्रत्येक शहरातील नामांकित शाळेत संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने त्यांचा विकास होत आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या वसतिगृहात राहण्याची सोयी करुन दिल्या जात आहेत. स्पर्धा परिक्षेसाठी आदिवासी मुलांसाठी विशेष वर्गांचे आयोजन करण्यात येते. तसेच आदिवासी मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शासनाच्यावतीने सत्कार करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आदिवासी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्याचे आवाहन श्री. सवरा यांनी केले.
राजे आम्ब्रीशराव म्हणाले, आदिवासी मुलांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. मुलांमधील गुणवत्ता हेरून त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची गरज आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामुळे आदिवासी मुले विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. सर्व समाजाच्या उत्थानासाठी ही आवश्यक आहे.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, माया इवनाते, आमदार डॉ. देवराज होळी, आमदार डॉ. अशोक ऊइके यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी रेला, तारपा आणि किंगरी ही पारंपारिक नृत्य सादर केले. यावेळी 10 वी, 12 वी सह विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या 122 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच www.mahatraibal.gov.in या संकेत स्थळासह “आदिवासी विकास ॲप” हे मोबाईल ॲप व आदिवासी विकास विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा वर्मा यांनी केले. तर आभार रामंचद्र कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आदिवासी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
शिक्षण संस्थांनी परस्पर सामंजस्य ठेवावे डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे
‘हज’ला जाणार्या यात्रेकरूंचा सत्कार
‘आनंद डोह’ देहु येथे ‘नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेचे स्वागत
9 वा तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017 अमेरिकेतील एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना जाहीर
पुणे,दि.9 ऑगस्ट: ‘डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि विश्व शांती केंद्र (आळंदी)पुणेतर्फे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठेचा, ऐतिहासिक स्वरूपाचा व नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवरील 9वा ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017’ अमेरिकेतील चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची जयंती व गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून, सोमवार दि.14 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.00 वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे प्रदान करण्यात येणार आहे.
सदरील आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विश्व शांती पुरस्कार, नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ.मायकेल नोबेल आणि महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते आणि पुण्याच्या मा. महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या सन्माननीय उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.ए. माशेलकर (एफआरएस), जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर, विख्यात गीतकार आणि पटकथा लेखक श्री जावेद अख्तर, इंडियन मर्चन्टस चेंबरचे माजी अध्यक्ष श्री नानिक रूपानी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
अमेरिकेतील मान्यवरांची उपस्थिती
विशेष बाब म्हणजे, सदरील संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती पुरस्कार प्रदान समारंभासाठी अमेरिकेतील जगविख्यात विद्यापीठांचे अध्यक्ष मा. डॉ. स्टीफन मॉर्गन, डॉ. मॅथ्यू हॉलंड, डॉ. डिनीस हुफ्तालिन तसेच उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे अध्यक्ष डॉ. रिचर्ड नेल्सन आणि अनेक जगविख्यात शास्त्रज्ञ, आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ, कुलगुरू, कुलपती, उद्योजक, अमेरिकेतील काही जाणकार पत्रकार, डिजीटल आणि प्रिंट मिडीयाचे प्रमुख अशा विविध क्षेत्रातील सुमारे 60 मान्यवर व्यक्तींचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान व सिद्धांत पहिल्यांदाच जगासमोर मांडण्याच्या हेतूने, हा जागतिक स्तरावरील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार दिला जात आहे.
हा प्रतिष्ठेचा ‘जागतिक शांतता पुरस्कार’ यापूर्वी आदरणीय माता श्री अमृतानंदमयी देवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकरजी, जपानच्या गोई पीस फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. हिरू सायोंजी – श्रीमती मासामी सायोंजी, साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरू पूज्य दादा जे. पी. वासवानी, अक्षरधामचे प्रमुख स्वामीजी, तसेच, मानव एकता मिशनचे संस्थापक-अध्यक्ष महायोगी गुरू श्री. एम.(श्री.मुमताज अली खान) यांना प्रदान करण्यात आला आहे.
21 व्या शतकात भारत देश ‘ज्ञानाचे दालन / विश्वगुरू’ म्हणून उदयास येणार!
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये भाकित केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान व शांती नांदेल व 21वे शतक हे भारताचे शतक असेल आणि आपला भारत देश ‘ज्ञानाचे दालन व विश्वगुरु’ म्हणून जगासमोर उदयास येईल, हे भाकित खरे होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या विषयावर दोन दिवसीय
जागतिक शिखर परिषद
भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान व अध्यात्मशास्त्र हे धर्म व अंधश्रद्धेवर आधारित असल्याच्या चुकीच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी, या संत ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार प्रदान समारंभाचे औचित्य साधून, ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या विषयावर दोन दिवसीय जागतिक शिखर परिषद रविवार, दि.13 ऑगस्ट 2017 आणि सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 या दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदरील जागतिक शांतता परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून दि. 13 ऑगस्ट रोजी उपस्थित राहणार आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. 13 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.00 वा. होणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण जी.माधवन नायर यांच्या शुभहस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. मायकेल नोबेल हे विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, वेस्ट मिन्स्टर कॉलेजचे अध्यक्ष डॉ. स्टीफन मॉर्गन, सुप्रसिद्ध पत्रकार डॉ. फिरोज अहमद बख्त व साल्ट लेक कम्युनिटी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. डेनिसी हफ्तालिन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरील जागतिक शांतता परिषदेस ब्ल्यूपाल सोल्यूशन्स प्रा.लि.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजू मंथेना, उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचर्ड आर. नेल्सन, एलएलसी क्लार्क कॅपिटल पार्टनर जेम्स क्लार्क, स्विझरलँन्ड मधील जिनीव्हा येथील इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. लारा श्रीवास्तव, पुण्याच्या लाइफ स्कूलचे संचालक नरेंद्र गोइंदानी, सामाजिक विचारवंत आणि तत्त्वज्ञ आर्य समाजी विद्वान स्वामी अग्निवेशजी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी-साल्ट लेक कम्यूनिटी कॉलेजच्या प्रा.जेनीफर क्लेन्क, राज्य सभेचे माजी खासदार जमियत उलेमा ए हिंदचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद मदानी, उत्तर प्रदेश मधील मथुरा वृंदावन येथील श्रीमान मध्व गौडेश्वर वैष्णव आचार्य श्री पुंडरिक गोस्वामीजी हे आपले विचार मांडतील.
या परिषदेचा समारोप समारंभ सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 03.00 ते 4.30 या दरम्यान होणार आहे.
अशी माहिती डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, एमआयटी डब्ल्यपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे आणि मिटसॉटचे संचालक डॉ. मिलींद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे उपस्थित होते.
जातीवाद मुक्त भारतासाठी कसबा भाजपची सामुहिक शपथ
त्या ‘बोगस कर्मचाऱ्या’मागील सूत्रधार कोण?
पुणे- कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ,नगरसेवक अविनाश बागवे आणि माय मराठी ने केलेल्या धडक कारवाईत ‘त्या’ बोगस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडून तर देण्यात आले. त्याच्यावर आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हाही दाखल झाला . पण त्याला तिथे बसविणारे कोण होते ? कोण कोण या कटात सामील होते ? या सर्वांचा बुरखा खेचण्याची गरज निर्माण झाली आहे. एकटा ‘तो ‘ कर्मचारी दोषी होता काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यामगे नाही असेच उत्तर येईल . त्याला कोणी कोणी सामील करून घेतले होते ? नेमके हि मंडळी कशासाठी अशा बोगस कर्मचाऱ्यांची मदत घेत होती ? या सर्व प्रश्नांची उकल आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवेदनातून होणार काय ? असा प्रश्न आता पुढे आहे .
दरम्यान गेल्या महिन्यातील १९ जुलै रोजी झालेल्या या प्रकरणाचे नेमके पुढे झाले काय ? महापालिकेच्या आणि पोलिसांच्या तपासात नेमके काय निष्पन्न झाले ? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत . याची उत्तरे अर्थातच येत्या काही दिवसातच मिळण्याची अपेक्षा आहे.
आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करत आहेत : महापौर मुक्ता टिळक
क्रांतीदिन-मशाल मार्च (व्हिडीओ)
पुणे-शहर कॉंग्रेसच्या वतीने क्रांती दिनानिमित्त क्रांती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . काल क्रांतिदिना निमित्त चलेजाव चळवळीचा इतिहास जागवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन सुरु केल्यानंतर आज क्रांतिदिनाच्या पूर्व संध्येला मशाल मार्च काढून शहर कॉंग्रेसने पुन्हा पुन्हा १९४२ च्या लढ्याच्या स्मृती जागृत करण्याचा प्रयत्न केला . पहा या मोर्चाची एक अल्पशी झलक
१५ ऑगस्ट पासून १ लाख ४५ हजाराची वाशिंग मशीन बाजारात …
पुणे – सॅमसंग इंडियाने आज वॉशर व ड्रायरची सोय असलेली फ्लेक्सवॉश ही क्रांतीकारी यंत्रणा लाँच केली. उच्च दर्जाची कामगिरी करणाऱ्या या उपकरणामध्ये दोन वॉशर्स आणि एक ड्रायरचा समावेश करण्यात आला आहे. या उपकरणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपयुक्तता व कलात्मक रचना यांचा मेळ घालण्यात आला आहे.
सॅमसंगच्या मूलभूत लाँड्री तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या फ्लेक्सवॉश उपकरणात लोकप्रिय अॅडडोअर वापरण्यात आले आहे, ज्यामुळे ग्राहकाला लाँड्रीसाठी ते वापरताना पूर्ण स्वातंत्र्य आणि लवचिकता मिळतेच, शिवाय कपडे दीर्घकाळ टिकावे म्हणून त्यांची आवश्यक काळजीही घेतली जाते.
सतत व्यग्र असलेल्या लोकांना कमीत कमी वेळेत कपडे धुता यावेत यासाठी तयार करण्यात आलेल्या या वॉशिंग मशिनमध्ये २३ किलोपर्यंतचे वजन स्वीकारण्याची क्षमता आहे. हे बहुपयोगी मशिन सॅमसंगच्या तीन मूलभूत तंत्रज्ञानांचा वापर करते. त्यात इकोबबल, बबल सोक आणि व्हायब्रेशन रिडक्शन टेक्नॉलॉजी (व्हीआरटी प्लस) यांचा समावेश आहे. इकोबबल पाणी व हवेचा वापर करून वॉशिंग पावडर विरघळवते आणि स्वच्छतेचे काम अधिक जलद व परिणामकारक होण्यासाठी बबल अॅक्शन तयार करते.
युनिट्स आयओटीवर आधारित आणि स्मार्ट कंट्रोलचा समावेश असलेले आहेत, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे मशिनवर कुठूनही आणि कोणत्याही वेळेस लक्ष ठेवता येते. मशिन कोणत्याही वेळेस सुरू किंवा बंद करण्याचं नियंत्रण अक्षरशः त्यांच्या तळहातात असतं. कलात्मक रचना आणि सोयीस्कर डिझाइनमुळे भारतीय ग्राहकाच्या वेळेची आणखी बचत होते. आयओटीवर आधारित उपकरणे भविष्यात जास्त प्रचलित होणार असून या तंत्रज्ञानाचे प्रवर्तक असलेली सॅमसंग आपल्या सर्व उत्पादन श्रेणींमध्ये त्याचा वापर करण्याच्या तयारीत आहे.
‘ग्राहकाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॅमसंगने कायमच नाविन्यपूर्णतेत आघाडी राखत नवनवीन उत्पादने तयार केली आहेत. फ्लेक्सीवॉशच्या लाँचसह कपडे धुण्याचे काम जास्त सोपे आणि सोयीस्कर करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या नाविन्यपूर्णतेतील प्रत्येक वैशिष्ट्य हे ग्राहकाला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आले आहे,’ असे अलोक पाठक, उपाध्यक्ष, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग इंडिया यांनी सांगितले. ‘ग्राहकाच्या मानसिकतेत मोठा बदल पाहायला मिळत असून ड्युएलवॉलश आणि अडवॉशसारख्या तंत्रज्ञानांना त्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या क्षेत्रातील आघाडीचे स्थान मजबूत करण्यास आम्हाला मदत होत आहे,’ असेही ते म्हणाले.
किंमत आणि उपलब्धता
फ्लेक्सवॉश १५ ऑगस्ट २०१७ पासून सॅमसंगच्या सर्व दालनांत आणि प्रमुख रिटेलर्सकडे १,४५,००० रुपयांत उपलब्ध होणार आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि. आपल्या परिवर्तन घडवू शकणाऱ्या संकल्पना आणि तंत्रज्ञानांच्या मदतीने जगाला प्रेरणा देते व त्याचे रूपही बदलते. कंपनी टीव्ही, स्मार्टफोन्स, वेअरेबल उपकरणे, टॅब्लेट्स, डिजिटल उपकरणे, नेटवर्क यंत्रणा आणि मेमरी, सिस्टीम एलएसआय व एलईडी सोल्यूशन्स या क्षेत्रांतील समीकरणे नव्याने प्रस्थापित करत आहे.
कर्ज रोख्यांचे २०० कोटी एफ डी करणार
पुणे- कर्ज रोख्यांतून मिळालेल्या २०० कोटीच्या रकमेवरील व्याजाचा दरमहा बसणारा सव्वा कोटीचा झटका कमी करण्यासाठी हि संपूर्ण रक्कम राष्ट्रीय बँकेत 6 महिन्यासाठी एफडी म्हणून गुंतविण्याचा निर्णय आज महापालिकेतील स्थायी समितीने घेतला . ८ विरुद्ध 5 अशा मतदानाने हा निर्णय घेण्यात आला .यामुळे 1 कोटी १० लाखाचे व्याज महाप्लीकेला मिळणार आहे .
२४ तास पाणीपुरवठा योजनेतील १८०० कोटीचे टेंडर रद्द करून फेर टेंडर काढण्याचा निर्णय झाल्यानंतर , या कामासाठी कार्जरोख्यांतून उभारलेली रक्कम .. आणि व्याज याबाबत प्रश्न निर्माण झाला होता . आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाएल्य निर्णयाची माहिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली .पहा आणि ऐका ..नेमके मोहोळ काय म्हणाले ….
सव्वाशे वर्षाच्या गणेश उत्सवाचे शाही सिलेब्रेशन ; उद्घाटन १२ तारखेला…
पुणे- सव्वाशे वर्षांची परंपरा पूर्ण करणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त यंदा महापालिकेच्या वतीने सुमारे महिनाभर चालणाऱ्या महा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यासंदर्भात महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली संक्षिप्त माहिती ..
अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर येथे ‘नमामि चंद्रभागा’ यात्रेचे स्वागत
यांची व्याख्याने झाली. प्राचार्य पांडुरंग गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
संदीप चोडणकर उपस्थित होते. यात्रा मार्गावर जलसंरक्षण समित्या स्थापन करण्यात येत आहे.
