पुणे- शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहराने भरभरून शिक्षण दिल्यानंतर या शहराला ,या राज्याला आणि या देशाला विसरू नका ,तर स्वकीयांसाठी या शिक्षणाचा उपयोग होईल असे कार्य स्वदेशातच करत राहा असा सल्ला देत शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या कार्याचे कौतुक आज शिवसेनेचे संपर्कप् रमुख आमदार उदय सामंत यांनी येथे केले .
अॅड.अश्विनी संजय भोसले आणि संजय भोसले यांनी आयोजित केलेल्या १० वि आणि १२ वि च्या उत्तीर्ण ,गुणवंत कौतुक सोहळ्यात आ. सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ९५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. संजय भोसले यांच्या सातत्याने २५ वर्षांपासून होणाऱ्या अशा महत्वाकांक्षी उपक्रमाचे कौतुक करून यावेळी ते म्हणाले, कोणतीही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हे शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरु ठेवले आहे . अशा स्थानिक लोकांचाच विधानसभेला विचार शिवसेनेत होत असतो . हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे .
संजय भोसले यांनी यावेळी आपल्या भाषणातून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि वातावरण निर्माण करून देणाऱ्या पालकांची प्रशंसा केली आणि या उपक्रमाबाबत माहिती दिली.
या वेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर नंदू मोझे, ,माजी नगरसेवक हरणावळ , नगरसेविका संगीता ठोसर ,विशाल धनवडे,पल्लवी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते .येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती .
शिक्षणाचा फायदा स्वकीयांसाठी करण्याचे विसरू नका -आ. उदय सामंत
‘वर खाली दोन पाय’ या प्रायोगिक नाटकाचा प्रीमियर सोहळा संपन्न
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे, दि. 19 : जिल्हा प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी जा.मा. गोसावी, सामान्य प्रशासनाच्या उपआयुक्त कविता व्दिवेदी, सामान्य प्रशासनाच्या तहसीलदार मनीषा देशपांडे, सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार मीनल कळसकर यांनी मा. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासनाच्या उपआयुक्त कविता व्दिवेदी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
” पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ” अकरा जणांना स्वतःच्या मालकीची रिक्षा
पुणे-बजाज ऑटोचे अधिकृत डिलर व्होरा ऑटो डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि. यांनी ” पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत ” बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळणेकामी सहाय्य केले . या योज़नेअंतर्गत अकरा जणांना स्वतःच्या मालकीची रिक्षाची चावी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व पी. एम. पी. एल. चे संचालक सिद्धार्थ अनिल शिरोळे यांच्याहस्ते देण्यात आल्या . या कार्यक्रमास व्होरा ऑटो डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि. चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर तरमिंदरसिंग व्होरा , डायरेक्टर दशमितसिंग व्होरा , युनियन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर शैलेश कुमार सिंग , चीफ मॅनेजर कौशिक कुमार, बजाज फायनान्सचे प्रतिनिधी श्रीरंग पंडित , दलजितसिंग रँक,बजाज ऑटोचे विक्री व्यवस्थापक अनुराग गौरव, मुख्य व्यवस्थापक बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
हा कार्यक्रम व्होरा ऑटो डिस्ट्रिब्युटर्स , ७३२ ,/बी , पुणे सातारा रोड , हॉटेल लोकेश समोर , अरण्येश्वर कॉर्नर , पुणे येथे संपन्न झाला . व्होरा ऑटो डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि.च्या मार्फत नवीन परमिट वितरणामध्ये रिक्षा ग्राहकांना ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून कर्ज सुविधा व गाडी देण्यापर्यंत सहकार्य विनामूल्य देण्यात आलेली आहे . आतापर्यंत ११०० ऑटो रिक्षांची विक्री करण्यात आलेली आहे . त्या माध्यमातून ११०० जणांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे . आम्ही महिन्याला ५०० वाहने विक्री करण्याचे उद्दिष्ट उद्दिष्ट ठेवले आहे . तसेच पुणे शहरात ५ सेल्स आणि सर्व्हिस सेंटर ग्राहकांच्या सुविधेसाठी आम्ही सुरु करणार आहोत , अशी माहिती व्होरा ऑटो डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि. चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांनी दिली .
पर्युषण पर्वानिमित्त पालकमंत्री बापटांकडून जैन बांधवांना शुभेच्छ्या
जिल्ह्यातील समस्याग्रस्त महिलांसाठी ‘महिला आयोग तुमचे दारी’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, दि. 19 : पुणे जिल्ह्यातील समस्याग्रस्त पिडित महिलांना स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी याकरिता मंगळवार दि. 22 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 2 वाजता अल्पबचत भवन, पुणे येथे महाराष्ट्र राज्य, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला जन सुनावणी ‘महिला आयोग तुमचे दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुनावणी कार्यक्रमास तक्रारदार, पिडित महिलांनी उपस्थित राहून आपल्या समस्या लेखी स्वरुपात आयोगा पुढे मांडाव्यात, असे आवाहन प्रादेशिक महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत अनावरण सोहळा
नामवंतांची उपस्थिती आणि शब्द-सुरांच्या सुरेल वातावरणात ‘विठ्ठला शप्पथ’ या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सिनेमाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव तसेच कलाकारांनी सादर केलेल्या स्कीटसने या सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली. ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातही सुमधुर गीतांची मेजवानी आहे. चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन आजवर अनेक चित्रपटांतून करण्यात आलं आहे. १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातून विठू माऊलीचं त्यांच्या भक्तांशी असलेलं अतूट नातं पहायला मिळणार आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
चांगल्या कथेच्या कॅनव्हासवर चित्रपटातील गीतांनी सुरेख रंग भरले आहेत. मंगेश कागणे व क्षितीज पटवर्धन या लोकप्रिय गीतकारांच्या शब्दांनी यातील चारही गीते सजली असून चिनार-महेश या युवा संगीतकार जोडीचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे, गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘ठाई ठाई माझी विठाई’ तसेच आदर्श शिंदे यांनी गायलेलं ‘देव कोंडला’ हे भक्तीगीत प्रेक्षकांना समाधानाची अनुभूती देईल. स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजातील ‘बोले तुना तुना’ हे प्रेमगीत व ‘झक्कास छोकरा’ हे प्रवीण कुँवर यांनी स्वरबद्ध केलेलं धमालगीत नक्कीच ठेका धरायला लावणार आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ या म्युझिक कंपनीने ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.
मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, केतन पवार, विजय निकम, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसह विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही नायक–नायिकेची नवी जोडी या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे.
१५ सप्टेंबरला ‘विठ्ठला शप्पथ’ प्रदर्शित होणार आहे.
जागतिक मधुमक्षिका दिना निमित्त – मध वाटप
पुणे-:- जागतिक मधुमक्षिका दिन निमित्त केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन व प्रशिक्षण संस्था ह्यांच्या सहकार्याने बाल शिक्षण मंदीर , भांडारकर रस्ता शाळेत आज खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या हस्ते शाळेतील मुलांना प्रत्येकी ५० ग्राम मधाचे वाटप करण्यात आले. दररोज एक चमचा मध हे शरीराला अत्यंत लाभदायक असल्याचे शिरोळे ह्याप्रसंगी बोलताना म्हणाले. शहर भा. ज प चिटणीस सुनील पांडे ह्यांनी आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक नीलिमा खाडे, सिद्धार्थ शिरोळे, स्वाती लोखंडे, ज्योत्स्ना एकबोटे आदी उपस्थित होते
’ गायनाचे समर्पित आयुष्य हेच मंगेशकर कुटुंबियांचे जीवन’ ! : रचना खडीकर - शहा
रिदम वाघोलीकर, आशय वाघोलीकर आयोजित
लेखिका रचना खडीकर-शहा यांच्या ‘रचना: क्रिएटिंग पॉसिबिलीटीज’ या कार्यक्रमाचे !
हा कार्यक्रम सुमंत मुळगावकर सभागृह ,आयसीसी टॉवर येथे झाला. रचना खडीकर -शहा यांच्याशी
गीता सिंग-परवेझ
यांनी संवाद साधला.
पुण्यातील युवक रिदम वाघोलीकर
अतिथी संपाद
क
‘स्वरलता’
कॉफी टेबल बुक
! ‘ असं दीदी घरी सांगतात.
त्यामुळे त्या स्टेजवरून गातानाही अगदी रेकॉर्डिंग रूममध्ये गात असल्यासारखं फिलिंग यायचं
तेवढीच उत्कृष्ट चित्रकार (आर्टिस्ट) आहे. त्यांची चित्रकला चांगली की गायकी अधिक चांगली,
हे सांगणं कठीण आहे. सर्व इमारतीतील लहान मुलांचे लाड करणे त्यांना आवडते.
च्या घरातही आशा मावशीने ती जपली आहे.
नाव तुकाराम मुंड्यांचे ..काम महापौर आणि चेअरमन चे .. चेतन तुपे पाटलांची टिका…
पुणे- पीएमपीएमएल च्या बस पास दरवाढीवरून मुन्ड्यांसह विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी महापौर आणि चेअरमन यांनाही लक्ष्य केले आहे . पहा आणि ऐका नेमके चेतन पाटील काय म्हणाले ….
पीएमपीएमएल बस पास दरवाढी विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार-उपमहापौर
पुणे- पीएमपीएमएल च्या बस पास दरवाढी ला आपली संमती नसून, हि दरवाढ चुकीची आहे. या विरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू असे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी म्हटले आहे . पहा आणि ऐका नेमके उपमहापौरांनी काय म्हटले आहे .
पुणे कॅन्टोन्मेंट भागातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच संस्थांचा सत्कार
पुणे-
स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे मीडिया वॉच व १५ ऑगस्ट चौक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅन्टोन्मेंट भागातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच संस्थांचा स्मृतींचिन्ह देउन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रोडवरील १५ ऑगस्ट चौक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा झाला . या सोहळ्यास पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर , १५ ऑगस्ट चौकाचे अध्यक्ष निलेश कणसे , नगरसेवक दिलीप गिरमकर , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , ऍड. प्रशांत यादव , पूनम बोराटे , जाकीर कुरेशी , अझीम गुडाकूवाला आदी मान्यवर उपस्थित होते .
या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हिंद तरुण मंडळ व श्रीकृष्ण तरुण मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सन्मान करण्यात आला .तसेच , कर्तव्य फाऊंडेशन , मिशन ऑफ आंबेडकर तर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सुरेश रेड्डी , परेश गायकवाड ,हर्षद बोराटे , गणपत मोरे काका , निवास लादे, दशरथ कणसे , उमेश शेडगे , प्रकाश अरगडे , डॉ. अझीम विकार , डॉ. राज , अविनाश शिंदे , फैयाज युसूफ खान आदींचा स्मृतिचिन्ह , तिरंगी शाल , पुष्पगुछ देयून सन्मान करण्यात करण्यात आला .
५व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सृष्टी हेलंगडी,, प्रिथा वर्टीकर, सिद्देश पांडे यांना अग्रमानांकन
पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सृष्टी हेलंगडीला जुनिअर व युथ या दोन्ही गटात, तर हविश असराणी व प्रिथा वर्टीकर यांना कॅडेट गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मिडजेट मुलांच्या गटात हृदय जैनला तर, मुलींच्या गटात देवयानी कुलकर्णीला अग्रमानांकन देण्यात आले आहे. सब-ज्युनियर मुलांच्या गटात दिपीत पटेलला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेत १०७१ हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती आणि पारितोषिके मिळून एकूण पारितोषिक रक्कम ५,५०,०००/- ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद मराठे व बी.यू भंडारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतूल कलूसक यांच्या हस्ते होणार आहे.
*स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणेः
मिडजेट गटः मुलेः १. हृदय जैन, २. देव हिंगोरानी, ३. युवराज यादव, ४. पियुष जाधव, ५. धृवील पाटील, ६. पार्थ देशपांडे, ७. रिषिकेश जगताप, ८. स्वरूप भांडलकर
मिडजेटः मुलीः १. देवयानी कुलकर्णी, २. जेनिफर व्हरगिस, ३. रिया कोठारी, ४. उर्वी चुरी, ५. वेदा राजे, ६. जान्हवी फणसे, ७. गरिमा जलन, ८. अंशीता ताम्हणकर
कॅडेट गटः मुलेः एकेरीः १. हविश असराणी, २. अमिश आठवले, ३. कुशल पटेल, ४. चैतन्य आहुजा, ५. राज कोठारी, ६. निल मुळे, ७. दक्ष जाधव, ८. मोहित शेजवले
कॅडेट गटः मुलीः एकेरीः १. प्रिथा वर्टीकर, २. आर्या सोनगडकर, ३. राधिका सकपाळ, ४. पिअरल अमलसाडीवाला, ५. तनिशा कोटेचा, ६. सायली वाणी, ७. जूई पेंढारकर, ८. अनन्या चांदे
सब-ज्युनियर गटः मुलेः एकेरीः १. दिपित पाटील, २. मानव मेहता, ३. रिषिकेश मल्होत्रा, ४. राजवीर शहा, ५. करण कुकरेजा, ६. मानव शहा, ७. सोहिल जोशी, ८. रित्विक नागले
सब-ज्युनियर गटः मुलीः एकेरीः १. विधी शहा, २. संपदा भिवंडकर, ३. आर्या सोनगडकर, ४. शिफा शेख, ५. खेया शहा, ६. भाविका मुलरजनी, ७. समृद्धी कुलकर्णी, ८. अर्पिता जोशी
ज्युनियर गटः मुलेः एकेरीः १. शौर्य पेडणेकर, २. दिपित पटेल, ३. रेगन ए, ४. गौरव लोहपात्रे, ५. रिषिकेश मल्होत्रा, ६. विपुल नंदकर, ७. जश जोबालीया, ८. जितेंद्र यादव
ज्युनियर गटः मुलीः एकेरीः १. सृष्टी हेलंगडी, २. दिशा हुलावले, ३. अदिति सिन्हा, ४. श्रेया देशपांडे, ५. मानसी चिपळूणकर, ६. स्वस्तिका घोष, ७. विधि शाह, ८. ईशा जोशी
युथ गटः मुलेः एकेरीः १. शुभम आंब्रे, २. सिध्देश पांडे, ३. मंदार हार्डीकर, ४. रेगन ए, ५. शौर्य पेडणेकर, ६. सनत बोकील, ७. तेजस कांबळे, ८. युगंध झेंडे
युथ गटः मुलीः एकेरीः १. सृष्टी हेलंगडी, २. अश्लेशा त्रेहान, ३. श्रेया देशपांडे, ४. मानसी चिपळूणकर, ५. मानसी देशपांडे, ६. ईशा जोशी, ७. रेवती महाजन, ८. कादंबरी भांडारकर
पुरूषः एकेरीः १. सिध्देश पांडे, २. मंदार हार्डीकर, ३. रविंद्र कोठीयान, ४. शुभम आंब्रे, ५. युगंध झेंडे, ६. पुनित देसाई, ७. अजिंक्य शिंत्रे, ८. शौर्य पेडणेकर,
महिलाः एकेरीः १. मल्लीका भांडारकर, २. श्वेता पार्टे, ३. श्रेया देशपांडे, ४. चार्वी कावळे(एफसीआय), ५. दिशा हुलवळे, ६. अश्लेशा त्रेहान, ७. सृष्टी हालेयनगडी, ८. मृण्मयी म्हात्रे
पालकांनो…विद्यार्थ्यांवर त्यांचे भवितव्य लादू नका
गोयल गंगा फाउंडेशनच्या राष्ट्रीय परिषदेत शिक्षण तज्ज्ञांचा सूर
पिंपरी १८: शिक्षण क्षेत्रातील समस्यांना सामोरे जाताना,पालकांची मानसिकता बदलणे हे प्रमुख आव्हान आपल्या देशासमोर आहे. विद्यार्थ्यांना स्वइच्छेनुसार शिक्षण घेण्यासाठी पालक प्रवृत्त झाले पाहिजे. पुढची यशस्वी तरुण पिढी घडवण्यासाठी पालकांनी मुलांवर त्यांचे भवितव्य लादू नये, असा सूर शिक्षण तज्ज्ञांनी येथे व्यक्त केला. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने गोयल गंगा इंटनेशनल स्कुलमध्ये झालेल्या शिक्षण क्षेत्राविषयक राष्ट्रीय परिषदेचे.
अनेक अनुभवांचे दाखले देत शिक्षण क्षेत्रातील गंभीर समस्यांवर हळुवार भाष्य करणारे जेरोनिनो अल्मेडा, विग्यानआश्रम संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून अनेक यशस्वी उद्योजक घडवणारे डॉ. योगेश कुलकर्णी, विविध उपक्रमाच्या माध्यमातून चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याचा सकारात्मक दृष्टीकोन जागृत करणाऱ्या आत्मन अकॅडमीच्या मंजुषा पाटील, नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळांचे स्मार्ट शाळेत कायापालट करणारे संदीप गुंड या अनुभवी तज्ज्ञानी या परिषदेच्या माध्यमातून आपली मते मांडली.
यावेळी जेरोनिनो अल्मेडा म्हणाले की, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे एकीकडे सांगताना दुसरीकडे मात्र अपयशी होऊ नकोस असा धाक पाल्याला दाखवतो, यातून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास विद्यार्थ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गुणांचे पालकांकडून अप्रत्यक्षपणे खच्चीकरण केले जाते हे कुठेतरी थांबायला हवे.’ तर ग्रामीण भागात शिक्षणातून उदयोग, उद्योगातून रोजगार निर्मिती करणे, हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करताना आलेल्या समस्या, त्यांवर केलेली मात आणि त्याचा झालेला फायदा याचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून डॉ. योगेश कुलकर्णी यांनी घेतला. तर संकोचित मानसिकता दूर करून चौकटीबाहेर विचार करण्याची मानसिकता शिक्षण क्षेत्रात वृद्धिंगत झाली तर अनेक सकारात्मक बदलाचे आपण साक्षीदार असू मत मंजुषा पाटील यांनी व्यक्त केले. पहिल्या सत्राच्या समारोहाला संदीप गुंड यांनी मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण अभियानाचा अवलंब करून घडवून आणलेला आमूलाग्र बदल सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितां पुढे उलगडला. तसेच मुलांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण करण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार शिक्षण पद्धतीत बदल घडवावा असे आवाहनही उपस्थित शिक्षकांना गुंड यांनी केले.
प्रमुख व्यक्तांच्या मार्गदर्शनानंतर ‘नेतृत्व घडवताना’ यांवर चर्चासत्र पार पडले. यामध्ये भूषण पटवर्धन, भरत अगरवाल, सुधीर सिन्हा आणि ऑलिव्ह दास आणि अतुल गोयल यांनी सहभाग घेतला होता. ‘शिक्षण क्षेत्रात केवळ नेतृत्व असून चालणार नाही त्या जोडीला प्रोत्साहनही आवश्यक आहे. चांगला शिक्षकच चांगले नेतृत्व घडवू शकतो.’ असे मत यावेळी सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
या परिषदेत फाउंडेशनच्या विश्वस्त सोनू गुप्ता, जी. जी इंटरनैशनल स्कूलच्या मुख्यध्यापिका भारती भागवानी यांच्यासह सर्व शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्रातील बदल, नाविण्यपूर्णता यासंदर्भात प्रामुख्याने या परिषदेत चर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर कार्यक्रमाचा समारोह झाला.
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी 22 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन
पुणे, दि. 18 : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम-2013 कायद्यांतर्गत स्थानिक तक्रार निवारण समितीस सक्षम करण्यासाठी पुणे विभागीय स्तरावर शासकीय कर्मचाऱ्यांकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा अल्पबचत भवन सभागृह, पुणे येथे मंगळवार 22 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 10-30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच या दिवशी दुपारी 3 वाजता जनसुनावणी ठेवली आहे,यात पीडित महिला थेट तक्रार दाखल करू शकतात.
या कार्यशाळेमध्ये पुणे जिल्ह्यात जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या तसेच प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीस त्यांची जवाबदारी,कर्तव्ये आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम-2013 मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी, या विषयी समिती सदस्यांना या समस्येची कारणे व स्वरूप याविषयी संवेदनशील बनविणे,या कायद्याच्या तरतुदीबाबत मार्गदर्शन केलं जाईल.
तसेच सदस्यांची सकारात्मकता वाढविणे, समिती सदस्य म्हणून जवाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्य व जवाबदारीची माहिती देणे,दाखल प्रकरणांच्या चौकशीची कार्यपध्दती, प्रक्रिया स्वरुप आणि व्याप्ती, स्थानिक व अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्यांची भूमिका, जबाबदारी आणि आवश्यक कौशल्य यावर माहिती देण्यात येणार आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग प्रशांत शिर्के यांनी केले आहे.

