पुणे : क्षमा करायला शिकवणाऱ्या जैन धर्मियांच्या अत्यंत पवित्र पर्युषण पर्वाच्या जैन बांधवांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जैन धर्मियांच्या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहात साजरे करतात. जगभरातील अनेक देशात हा सण साजरा करतात. दहा दिवस चालाणाऱ्या या उत्सवास जैन धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्युषण चा अर्थ कर्म नाहीसे करणे असा होतो. आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे हा या पाठीमागील मुख्य उद्देश आहे. या पर्वामध्ये मोक्ष मार्गासाठी प्रयत्न केले जातात.
या कालवधित आत्मशुद्धि करिता ३/८/१५/३० दिवस केवळ उकळलेले पाणी सूर्योदय ते सूर्यास्त सेवन करुन उपवास केले जातात.तपस्वीना वंदन आणि शुभेच्छा.
भारतीय संस्कृती चे मुळ आधार तप, त्याग, सत्य, अपरिग्रह आणि संयम आहे. याच आधारावर हा सण साजरा करतात. या काळात दान, शील , तप व भाव अशा विविध रुपात धर्माची आराधना करतात. तसेच उपवास धरून देवाची आराधना करतात. वर्षभर केलेल्या पपाच प्रायश्चित करून पुढील काळात या पापांपासून मुक्त राहण्याची प्रतिज्ञा या पर्वात करतात. पर्युसन आत्मजागृतीद्वारा आपल्या आत्म्याला जागृत करण्याचा संदेश देते. हा एक शांततेचा आणि सदभावनेचा उत्सव असल्याने यास क्षमा उत्सव असेही संबोधतात. या काळात संपूर्ण सजीवांच्या प्रती क्षमाभाव व्यक्त केला जातो. भेदभाव विसरून सर्वांच्या प्रती क्षमा भाव ठेवा हीच शिकवण या पर्वात सांगितली जाते. या पर्वातील क्षमा वाणीच्या कार्यक्रम जैन धर्मा शिवाय इतर धर्मियांना ही प्रेरणा देण्यासारखा आहे. असं ही पालकमंत्री बापट यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.