लीला पुनवाला फाऊंडेशनमध्ये दुहेरी उत्सव
एफसी पुणे सिटी संघ व प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास यांच्यातील करार संपुष्टात
पुणे: राजेश वाधवान यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघ व संघाचे मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास यांच्यातील करार संपुष्टात आला आहे. फ्रॅंचाईजीने परस्पर सामंजस्याने मुख्य प्रशिक्षक हब्बास तसेच सहाय्यक प्रशिक्षक मिग्युएल मार्टिनेझ गाेन्झालेझ यांचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.
हब्बास दीड वर्ष एफसी पुणे सिटी संघाचे प्रशिक्षक हाेते. या कालावधीत त्यांनी केलेले काम नक्कीच समाधान देणारे हाेते. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा. नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड लवकरच केली जाईल, असेही फ्रॅंचाईजीने कळवले आहे.
हब्बास म्हणाले,एफसी पुणे सिटीबराेबरचा अनुभव विलक्षण हाेता. आता आयएसएलचा माेसम नव्या कार्यक्रमानुसार खूप लांबणार आहे. मी अन्य काही जणांना शब्द दिला असल्यामुळे मी एफसी पुणे सिटी संघासाेबत राहू शकणार नाही. दीड वर्षाच्या कालावधीत कंपनीते पदाधिकारी, व्यवस्थापन, खेळाडू या सगळ्यांनीच सहकार्य केले. मी त्यांचा सदैव आभारी राहिन. नव्या माेसमासाठी क्लबला माझ्या शुभेच्छा.
शिल्पा तुळसकर एका नवीन आगळ्या-वेगळ्या भूमिकेत
सार्वजनिक बांधकाम खात्याप्रमाणे महापालिका , नगरपालिका , नगरपरिषदा व मिलिटरी इंजिनिअर्स सर्व्हिसेस यामध्ये अभियंत्यांना कामे वर्ग करून लॉटरी पध्दतीने कामे देण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटना
पुणे शहर अध्यक्ष प्रकाश अरगडे यांची मागणी
पुणे-सार्वजनिक बांधकाम खात्याप्रमाणे महापालिका , नगरपालिका , नगरपरिषदा व मिलिटरी इंजिनिअर्स सर्व्हिसेस यामध्ये अभियंत्यांना कामे वर्ग करून लॉटरी पध्दतीने कामे देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटना पुणे शहर अध्यक्ष प्रकाश अरगडे यांनी केली .
शनिवार पेठमधील ओंकारेश्वर घाटाजवळील महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेच्या कार्यालयात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंतीनिमित्त अभियंता दिनी संघटनेच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी संघटनेचे सरचिटणीस अनिल साप्ते ,उपाध्यक्ष शैलेश दिवाकर , चिटणीस अविनाश शिंदे ,खजिनदार शाम कोठावळे , सदस्य अनिरुध्द घाटपांडे , तानाजी थोरात , रमेश खंडेलवाल , जितेंद्र बंब, रवि तक्ते , विवेक कुदळे , श्रीकांत डके , राहुल तुपे , गौतम शिंदे , रवि तिवारी , समीर कोपर्डे आदी उपस्थित होते .
यावेळी बैठकीत महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटना पुणे शहर अध्यक्ष प्रकाश अरगडे यांनी सांगितले कि , अभियंत्यांना रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने लॉटरी पध्दतीने काम देण्याचे ठरविले होते . गेली अनेक वर्षांपासून अशा पध्दतीने कामे अभियंत्यांना दिली गेलेली नाहीत . त्यामुळे अभियंत्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे . अकुशल कामगार दिवसाला ५०० ते १००० रुपयापर्यंत रोजची हजेरी घेतो , त्याउलट अभियंत्यांना दहा ते बारहजार रुपयांच्या मासिक वेतनावर काम करावे लागते . हि अभियंत्यांच्या दृष्टीने शरमेची बाब आहे . शासनाने धनाढ्य कंपन्यांना काम दिले आहे . अभियंत्यांना ना काम नाही ना नोकरी नाही त्याचे रजिस्ट्रेशनची मर्यादा छोटी असल्यामुळे त्याला छोटे कामे करता सुध्दा येत नाही . मोठ्या कामामध्ये मोठमोठ्या कंपन्यांची आपले पाय रोवले असल्यामुळे त्याचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून गेले आहे . शासनाने किमान अभियंत्याला त्याच्या दर्जाचे साजेसे कामे दिली पाहिजेत . बांधकाम , जलसंधारण , विद्युत , महावितरण , जिल्हापरिषदमध्ये कामे अभियंत्यांना देउन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा . महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अभियंत्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी निवेदने देयूनही शासनदरबारी ठोस पाऊले उचलली गेली नाहीत .
आशिया-पॅसिफीक रॅली मालिका 2017 – जपान रॅली; वेगवान कारचे आव्हान पेलण्यास संजय टकले सज्ज
पूर्वी भावेचा नृत्याविष्कार
सूत्रसंचालक, डान्सर आणि अभिनेत्री अशी तिहेरी रूपं अत्यंत सहजरित्या हाताळणाऱ्या पूर्वी भावेला
सगळेच ओळखतात. लहानपणापासूनच कलाक्षेत्रात काहीतरी करून दाखवायची जिद्द असणाऱ्या
पूर्वीने या क्षेत्रात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ती सूत्रसंचालन आणि अनेक
नाटकांमध्ये काम करून उत्तम कलाकार म्हणून नावारूपास आली. भरतनाट्यम संपूर्णपणे
आत्मसात करून ती एक उत्तम डान्सर आहे हे हि तिने दाखवून दिलं आहे. डॉ. संध्या पुरेचा ह्या
तिच्या गुरु आहेत. भरतनाट्यमच संपूर्ण शिक्षण तिने तिच्या गुरूंकडून घेतलं. विशेष म्हणजे
त्यातील एक विशिष्ट नृत्य प्रकार असलेले मार्गम ह्याचे धडे तिने घेतले. नुकतंच मार्गम
लोकांपर्यंत पोहचावा आणि ते नक्की काय आहे हे लोकांना कळावं म्हणून एक कार्यक्रम
आयोजित केला होता ज्यात पूर्वीने हे मार्गम नृत्य करून लोकांना त्याचे वैशीष्ट्य आणि त्यातील
विविधता समजवून दिली. सध्याचा काळात सगळेच पाश्चिमात्य डान्सकडे वळत असताना पूर्वीने
मात्र आपल्या मातृभूमीतील नृत्य स्वीकारण्याचा निर्णय घेऊन आजच्या युवा पिढी समोर एक
आदर्श मांडला आहे. तिच्या मते आपल्या देशात विविध नृत्य प्रकार आहेत जे आपणच
जोपासायला हवे. मार्गम या पूर्वीच्या नृत्याविष्कारमुळे तिचा हा वेगळा पैलू देखील प्रेक्षकांसमोर
आला आणि प्रेक्षकांना ती सूत्रसंचालक, अभिनेत्री इतकीच एक नृत्यांगणा म्हणून देखील भावली
यात शंकाच नाही.
सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने हिंजवडी परिसराचा विकास साधणार -पालकमंत्री गिरीश बापट
पुणे,दि. 15: एम.आय.डी.सी हिंजवडी परिसरातील रस्त्यांची तसेच हिंजवडी-म्हाळुंगे दरम्यानच्या मुळा नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करून, सद्यस्थितीचा आढावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज घेतला. हिंजवडी परिसरातील वाहतूक व्यवस्था जलद, सुरक्षित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पालकमंत्री बापट यांनी संबंधितांना दिल्या.
वाहतूक व्यवस्था जलद, सुरक्षित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतीने करा. हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा, कचऱ्याचा प्रश्न ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच एमआयडीसी क्षेत्रातील लोकांना सोबत घेऊन समन्वयाने लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे प्रतिपादन हिंजवडी इंडस्ट्रीज असोशिएशन तसेच एमआईडीसीच्या वतीने आयोजित बैठकीत राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील सभागृहात केले.
बैठकीस जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे,आ.लक्ष्मण जगताप एमआईडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या, एमआयडीसी संदर्भातील समस्या पीएमआरडीए च्या टाउन प्लॅनिंग स्कीम मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक तसेच पार्किंगचे 75 टक्के प्रश्न सुटतील. शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या हिताचा विचार करूनच सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी माहिती श्री.बापट यांनी यावेळी दिली.
अभियानात प्लास्टिक कचरा पुनर्वापर प्रक्रियेचा देणार संदेश
ही सेवा’ या अभियानास प्रारंभ झाला. हे अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सचिन पासलकर यांनी दिली.
स्वच्छता दिंडी, प्रभात फेरी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महापौर आणि पालकमंत्री गप्प का ?
पुणे- आरक्षणामुळे गुणवंत मुलांना परदेशी जावे लागते असे नाशकात वक्तव्य झाले तेव्हा फारसे काही वाटले नाही ,जातीय आरक्षणाऐवजी निश्चितच गुणवत्तेवर आरक्षण असायला हवे ,शिक्षणावरही नाही ,कारण कित्येकदा जातच काय ,शिक्षण नसूनही गुणवान असलेली असंख्य व्यक्तिमत्वे देशाने पाहिलेली आहेत ; .त्यामुळे या विधानाचे कोणी काही मनावर घेतले नाही. लोकमान्यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे ही ठामप्रतिपादन करून ,भाऊ रंगारीं गणपती मंडळाच्या बाबत संशयात्मक भूमिका ही महापौर असलेल्या मुक्ताताई आणि पालकमंत्री यांनी कायम ठेवली .तरीही सार्वजनिक गणेशोत्सवात लोकमान्यांचे योगदान सर्वमान्य असल्याने या विषयाचा गांभीर्याने फारसा विचार कोणी केला नाही . पण पुण्यात चक्क ब्राम्हण नसलेल्या स्त्रीने स्वयंपाक केला म्हणून बाटल्याची तक्रार करणाऱ्या मेधा खोलेंच्या , धड पाठीशीही हे दोघे राहिले नाहीत , आणि धड त्यांचा निषेध ही केला नाही.. अशी रुखरुख अनेकांच्या मनात घर करून आहे. खरे तर काही संघटना ,पक्ष यांनी याप्रकरणी खोलेंचा आणि त्यांची अशी अभूतपूर्व तक्रार नोंदवून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध केला ,निदर्शने केली .त्यानंतर खोलेताई यांनी तक्रार मागे ही घेतली . पण ब्राम्हण नसलेल्या इतर लोकांमुळे अजूनही बाटाबाटी चे प्रकार पुण्यात चालत आहेत ,हे त्यांच्या या कृतीमुळे उघड आणि जाहीरपणे दाखवून दिले. आणि विशिष्ट लोक विशिष्ट लोकांनाच नौकरी, काम धंदा देत आहेत ,गुणवत्ता तिथे फिकी पडते आहे, याची चर्चा या प्रकारामुळे प्रकर्षाने चव्हाटया वर मांडली गेली .
खोले ताई यांनी पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात जी फिर्याद दाखल केली, त्यात आपला सोवळ्यातला स्वयंपाक बाटल्याची तक्रार करताना, स्वयंपाक बाटण्याचे कारण असे दिले आहे की, तो स्वयंपाक एका यादवकुलीन मराठा निर्मला यादव या महिलेने केला होता. यांच्या स्पर्शाने आपला ब्राम्हण धर्म बाटतो, हेच आजमितीला दाखवून दिले. या तक्रारीने पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातले गेले . पण जोमाने पुढे सरसावली ती मराठा कार्डाचे राजकारण करणारी मंडळी . ओबीसी ,दलित,रिपब्लिकन,बहुजन अशा विविध जातीजमातीच्या आणि सर्वधर्म समभाव माननाऱ्या संघटना त्या जोमाने सरसावल्या नाहीत.पुण्यात पेशवाई आहे कि मराठेशाही आहे अशा स्वरूपाचा वाद कोणी पेटवू नये .पण इथे मानवतेचा कारभार ,माणुसकीचा दरबार आहे, असे दिसतच नसल्याने बहुधा मानवतावादी संघटनाही पुढे आल्या नसाव्यात .आणि नेमकी पुण्यात हीच उणीव मोठी आहे . त्यामुळे पुणे तिथे काय उणे असे आता कोणी म्हणू नये .
हे विश्वची माझे घर, अशी शिकवण देऊन जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर,यांची करून कहाणी सर्वांना ठाऊक आहे .शिर्डीच्या साईबाबांचे खडतर जीवनमान देखील सर्व जाणून आहेत .पण त्यांच्या नंतरदेखील त्यांच्याच नावाचा वापर करून फायदे लाटणारी मंडळी , ही, तीच आहेत यात शंका कोणी घेण्याचे कारणनाही . फरक एवढाच आहे,त्यांच्या काळात ही समाज प्रवृत्ती उघडपणे ,निर्भीड छातीने पुढे येवून बाटल्याची वागणूक देत होता, आणि आता …. छुपे रुस्तुमगिरी सुरु असावी, असे वाटल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थितीत खोले ताई यांनी दाखविलेले धाडस निश्चितच वास्तवता अधोरेखित करणारे आहे .
मनुस्मृतिने शिक्षण नाकारलेल्या स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणारे महात्मा जोतिबा फुले-सावित्रीमाई फुले पुढे आल्या, तेव्हा त्यांना याच शहरात दगडे फेकून मारली गेली .ज्यांनी दगडी मारली… आता त्यांच्या वारसदार मुली .. कुठे पायलट ,कुठे संशोधक , कुठे अध्यापक ,तर कुठे आमदार ,खासदार ,नगरसेवक ,सरपंच असतील .आणि खोले ताई देखील त्यामुळेच हवामान खात्याच्या संचालिका पदांवर पोहोचल्या .
ज्या महात्मा फुल्यांना याच शहरात पालिकेच्या निवडणुकीत पराभूत करण्यात आले होते त्यांचाच पुढे पुतळा लावून पालिकेचा कारभार सुरु ठेवला गेला . याच महापालिकेतील महापौर पदावर विराजमान असलेल्या लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणाऱ्या मुक्ताताई यांनी, मेधा खोले यांच्या बाबत कोणतीही भूमिका उघड करू नये , हा प्रश्न अनेकांची मने विचलित करून जात आहे .बडे बडे शहरोंमे ,छोटी छोटी बाते होती रहती है, आप ध्यान ना दिजीये ,हम समर्थ है , अशा स्वरूपाचे स्पष्टीकरण शनवार वाड्यावरून सीएम फडणवीसांपुढे करणाऱ्या पालकमंत्र्यांना देखील या घटनेत स्वारस्य दाखविण्याची गरज भासलेली दिसत नाही .स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेवर आधारित संविधान बहाल केलेले डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या, या थोर महापुरुषांच्या प्रतिमा ,पुतळे उभारून त्यांना आदरांजली वाहणाऱ्या राजकारण्यांनी याबाबत ठोस भूमिका जाहीर करायलाच हवी होती, ती का केली नाही असा प्रश्नात्मक मतप्रवाह सध्या आहे.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत धेंडे यांचे निधन
पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत गणपत धेंडे यांचे शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे ते वडील होत.
अनेक दिवसांपासुन ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यासाठी त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते ,मात्र उपचार सुरु असताना आज शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सासवड येथील पारगाव मेमाणे हे धेंडे यांचे मुळ गाव. 1954 मध्ये नोकरीनिमित्त ते पुण्यात आले. रेल्वे प्रशासनात पोलिस म्हणुन ते 2 वर्ष नोकरीस होते. त्यानंतर खडकी येथील दारुगोळा कारखान्यात काम करण्यासाठी रुजू झाले. येथील उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सासवड, येरवडा व नागपुर चाळ परीसरामध्ये त्यांनी आंबेडकर चळवळ रुजविण्यासाठी आणि 1956 च्या धर्मांतर चळवळीमध्ये मोठे योगदान दिले.
आज दुपारी 12 वाजता येरवडा येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विद्याप्रतिष्ठानच्या आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचा देशपातळीवर झेंडा
स्वच्छता क्रमवारीत देशात दुसरे मानांकन: मानांकन यादीतील महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज
बारामती: स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवरील शिक्षण संस्थांची स्वच्छता
मानांकने जाहिर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात
देशात दुसरे स्थान पटकविले. देशभरातील साडेतीन हजार शिक्षण संस्थांनी या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, महाराष्ट्रातील
केवळ याच कॉलेजला मानांकन यादीत स्थान मिळविण्याचा मान मिळाला आहे.
दिल्ली येथील हॉटेल अशोका येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रिय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते
विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमाला युजीसीचे चेअरमन डॉ. विरेंदरसिंग चौहान, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रिय मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने पाच वेगवेगळ्या विभागासाठी
देशातील एकूण 40 हजार शिक्षण संस्थांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. या अभियानाला प्रतिसाद देत देशातील सुमारे साडेतीन हजार शिक्षण संस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या अर्जातील गुणांकनात सरस असणाऱ्या 174 शिक्षण संस्थांना देशाच्या राजधानी दिल्लीत बोलविण्यात आले होते. निमंत्रित करण्यात आलेल्या या निवडक 174 शिक्षण संस्थांपैकी 25 संस्था पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. या पैकी स्वच्छता मानांकनात विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजला देशात दुसरे स्थान मिळाले. यामध्ये कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट, आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.
या विभागात तामिळनाडूच्या कोंगू आर्ट आणि सायन्स कॉलेज अव्वल स्थानावर राहिले. बारामतीचे आर्टस, सायन्स ॲण्ड
कॉमर्स कॉलेजला दुसरे मानांकन तर चेन्नईतील रामकृष्ण मिशन विवेकानंद कॉलेजचा तिसरा क्रमांक आला.
आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजच्या या कामगिरीने विद्याप्रतिष्ठानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाला हे यश लाभले. या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व विश्वस्त महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. कॉलेजच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कॉलेजचे अभिनंदन होत आहे.
धार्मिक स्थळामधील प्रसादाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कार्यशाळा
अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : धार्मिक स्थळी भाविकांना दिला जाणारा प्रसाद हा अधिक सुरक्षित असावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागामार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, अन्न दान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित व चांगल्या प्रतीचे अन्न देणे ही अन्न दात्याची जबादारी आहे. लोकांना अधिक सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यशाळेत विविध धार्मिक प्रसादालयातील विश्वस्त, आचारी,कर्मचारी तसेच परिसरातील हॉटेल खाद्यपदार्थ विक्रेते यांना सुरक्षित अन्न पदार्थाची निर्मिती, साठवणूक व वाटप वितरण या बाबत प्रशिक्षित केले जात आहे. धार्मिक संस्थांमधील अन्न सुरक्षा व्यवस्थापन अधिक चांगले असले पाहिजे. प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे.
उद्योजक आनंद चोरडिया म्हणाले, ग्राहकाची काळजी घेणे हे व्यावसायिकाचे प्रथम कर्त्यव्य आहे. ग्राहकाला चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ दिल्यास लोकांचा त्या व्यावसायिकावरील विश्वास वाढतो त्यामुळे त्याच्या व्यवसायात प्रगती होते. पर्यायाने व्यावसायिक आणि ग्राहक यांना समाधान लाभते.
आपल्या प्रास्तविकात अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी पुणे विभागाच्या वतीने आज पर्यंत १५ धार्मिक स्थळांच्या प्रसादालयातील आचारी तसेच विश्वस्त यांच्या सह २०० हून अधिक लोकांना प्रशिक्षित केल्याचे सांगितले.
आज संपन्न झालेल्या कार्यशाळेस जैन श्वेतांबर, दादावाडी, मंदिर ट्रस्ट सारसबाग, श्री.शंकर महाराज समर्थ मठ धनकवडी, पुणे, एन व्ही सी इस्कॉन मंदिर कात्रज, गुरुद्वारा श्री गुरुसिंग साहेब गणेश पेठ पुणे, गुरुनानक दरबार , कॅम्प,पुणे, श्री अक्कलकोट स्वामी महाराज मठ, बुधवार पेठ, पुणे, स्वामी नारायण मंदिर आंबेगाव या धार्मिक स्थळांचे विश्वस्त तसेच प्रसादालयाचे आचारी तसेच एस.एन.डी.टी महाविद्यालयातील मुली,हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग महाविद्यालयाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत एम.एम चितळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.
सुरक्षा रक्षकाच्या टेंडरचा काळा कारभार (व्हिडीओ)
पुणे -९०० सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या वार्षिक १५ कोटीचे टेंडर मिळविण्यासाठी बाराणेचे टेंडर आठ आण्यात भरणारे तथाकथित महाभाग ,प्रत्यक्षात टेंडर मिळविल्यानंतर काय आणि कसे दिवे पाजळतील ? असा सवाल करीत नगरसेवक अविनाश बागवे यांनी या प्रकरणी महापालिका अतितिरिक्त आयुक्तांचे लक्ष वेधले आहे . महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयात तसेच उद्याने ,सांस्कृतिक भवन ,स्मशान भूमी,दवाखाने,जलतरण तलाव,समाज मंदिरे ,प्राणी संग्रहालये,पाणीपुरवठा केंद्रे ,स्टेडीअम,महापालिकेच्या जागा ,मिळकती ,जल केंद्रे,आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक- मदतनीस पुरविण्यासाठी महापालिकेने टेंडर मागविली होती . यामध्ये किमान वेतन कायद्यानुसार वेतन , भविष्य निर्वाह निधी , संपर्क तसेच दळणवळण खर्च,टीडीएस.. आदी सर्व बाबींचा विचार होणे अपरिहार्य आहे . मात्र याबाबत कोणताही विचार न करता केवळ स्वस्तात , सर्वात कमी दराने आलेले टेंडर म्हणून एका महाभागाचे टेंडर मंजूर करण्याचा घाट प्रश्नातील काही अधिकाऱ्यांनी घातला आहे . याबाबत पुढील विचार होणे गरजेचे असून बारा आणे खर्चाचे काम कोणी आठ आणे खर्चात कसे आणि का करायला तयार होतो ? याचा विचार करूनच प्रशासनाने याप्रकरणी स्थायी समिती पुढे विषयपत्र ठेवायला हवे होते . मात्र तसे न करता सर्वात कमी दराचे टेंडर म्हणून संबधित महाभागाची शिफारस केली आहे . हा पराक्र धोकादायक असून महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेशी असा खेळ होऊ नये . याबाबत योग्य ती दक्षता हि घेतलीच पाहिजे अशी भूमिका बागवे यांनी घेतली आहे . पहा आणि ऐका नेमके याप्रकरणी बागवे यांनी काय म्हटले आहे …
बिबवेवाडीत शेतकरी- ग्राहक थेट भेट , थेट संवाद (व्हिडीओ)
पुणे- येथील नगरसेवक राजेंद्र (आबा ) शिळीमकर यांनी आयोजित केलेल्या शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन आज सायंकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले . आमदार माधुरी मिसाळ आणि मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . बिबवेवाडीतल्या या आठवडेबाजारात राजगुरुनगर, मंचर भागातील १९ शेतकऱ्यांनी आपापला शेतमाल थेट ग्राहकांना उपलब्ध करून दिला . यावेळी थेट शेतातून आलेला भाजीपाला घेणारा ग्राहक आणि तो आणणारा शेतकरी यांच्यात थेट भेट थेट संवाद झाला . पहा एक अल्पशी व्हिडीओ झलक
पेट्रोल डिझेल दरवाढ व महागाई विरुद्ध निदर्शने
पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कंमिटी पर्वती विधानसभा मतदार संघ तर्फे पेट्रोल डिझेल दरवाढ व महागाई विरुद्ध निदर्शने पुणे सातारा रोड ( उत्सव हॉटेल चौक ) येथे करण्यात आले. या प्रसंगही रमेश बागवे ( अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कंमिटी), अभय छाजेड व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




