धार्मिक स्थळामधील प्रसादाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कार्यशाळा

Date:

अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : धार्मिक स्थळी भाविकांना दिला जाणारा प्रसाद हा अधिक सुरक्षित असावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागामार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, अन्न दान हे श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित व चांगल्या प्रतीचे अन्न देणे ही अन्न दात्याची जबादारी आहे. लोकांना अधिक सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यशाळेत विविध धार्मिक प्रसादालयातील विश्वस्त, आचारी,कर्मचारी तसेच  परिसरातील हॉटेल  खाद्यपदार्थ विक्रेते यांना सुरक्षित अन्न पदार्थाची निर्मिती, साठवणूक व वाटप वितरण या बाबत प्रशिक्षित केले जात आहे. धार्मिक संस्थांमधील अन्न सुरक्षा व्यवस्थापन अधिक चांगले असले पाहिजे. प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे.

उद्योजक आनंद चोरडिया म्हणाले, ग्राहकाची काळजी घेणे हे व्यावसायिकाचे प्रथम कर्त्यव्य आहे. ग्राहकाला चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ दिल्यास लोकांचा त्या व्यावसायिकावरील विश्वास वाढतो त्यामुळे त्याच्या व्यवसायात प्रगती होते. पर्यायाने व्यावसायिक आणि ग्राहक यांना समाधान लाभते.

आपल्या प्रास्तविकात अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी पुणे विभागाच्या वतीने आज पर्यंत १५ धार्मिक स्थळांच्या प्रसादालयातील आचारी तसेच विश्वस्त यांच्या सह २०० हून अधिक लोकांना प्रशिक्षित केल्याचे सांगितले.

आज संपन्न झालेल्या कार्यशाळेस जैन श्वेतांबर, दादावाडी, मंदिर ट्रस्ट सारसबाग, श्री.शंकर महाराज समर्थ मठ धनकवडी, पुणे, एन व्ही सी इस्कॉन  मंदिर कात्रज, गुरुद्वारा श्री गुरुसिंग साहेब गणेश पेठ पुणे, गुरुनानक दरबार , कॅम्प,पुणे, श्री अक्कलकोट स्वामी महाराज मठ, बुधवार पेठ, पुणे, स्वामी नारायण मंदिर आंबेगाव या धार्मिक स्थळांचे विश्वस्त  तसेच प्रसादालयाचे आचारी तसेच  एस.एन.डी.टी महाविद्यालयातील मुली,हॉटेल मॅनेजमेंट अॅंड केटरिंग महाविद्यालयाच्या मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत एम.एम चितळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...