Home Blog Page 3277

रन फॉर पीस ॲण्ड डेमोक्रसीच्‍या रॅलीतून हजारो विद्यार्थ्यांनी जगाला दिला शांतीचा संदेश

0

डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे जागतिक शांतता दिवस साजरा

पुणे, ता. 21. जागतिक शांतता दिनाचे औचित्‍य साधून  डॉ. विश्वनाथ कराड एमआयटीवर्ल्ड पीस युनिव्‍हर्सिटी, पुणेतर्फे  आयोजित केलेल्‍या रन फॉर पीस ॲण्ड डेमॉक्रसी ने संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये डब्‍ल्‍यूपीयूच्‍या सर्व स्‍टॉफ बरोबरच हजारो विद्यार्थी आणि पुणे निवासी उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी झाले होते. शहरातील वेगवेगळ्या चार ठिकाणावरून निघालेल्‍या रॅलीज् ऐतिहासिक वास्‍तू शनिवारवाडा येथे एकत्र आल्‍या. यावेळेस सर्वांनी विश्र्वशांतीसाठी प्रार्थना केली.

या प्रसंगी भूमाता चॅरिटेबल ट्रस्‍टचे अध्यक्ष डॉ.बुधाजीराव मुळीक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्‍हर्सिटीचे संस्‍थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डल्‍ब्‍यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र स्‍टेट प्रिन्‍सिपॉल फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, सहयोग ट्रस्‍टचे अध्यक्ष ॲड.असीम सरोदे,  प्रकृती पोतदार, दलित पँथर ऑफ इंडियाचे अध्यक्ष बापूसाहेब भोसले, एकोल सोलिटरयचे संस्‍थापक अध्यक्ष मिनोचेर पटेल, गोखले इन्‍स्‍टिटयुटचे प्रा. डॉ.नरेश बोडखे, शारदा ज्ञानपीठमचे अध्यक्ष पं. वसंतराव गाडगीळ, पुणे मनपाचे सहआयुक्‍त गणेश सोनवणे, पूर्णवाद युवा फोरमचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, सत्‍य वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे, नातू विचार मंचाचे अध्यक्ष रवी नातू, ज्‍येष्ठ साहित्‍यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, सोसे अर्थमूवर्स प्रा.लि.चे संचालक मिलिंद सोसे, शिव संग्रामचे अध्यक्ष महेंद्र कडू, सा वा नी सूर संगीतचे संस्‍थापक सुरेंद्र मोहिते, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, आदित्‍य झुनझुनवाला आणि प्रा. जयश्री फडणवीस हे उपस्‍थित होते.

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्‍हणाले,””आज जगात दहशतवाद, जातीयवाद यामुळे जगात अशांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर रॅलीच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाला शांतीचा संदेश दिला आहे. तो निश्चितच मानवकल्‍याणासाठी महत्‍वाचा आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे. भविष्यात भारत देश जगाला सुख, समाधान व शांतीचा संदेश देईल.”

प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्‍हणाले, “”युनोने 1981 मध्ये विश्र्व शांतीचा नारा दिला होता. त्‍याला जागतिक शांतता दिनाच्‍या निमित्ताने रन फॉर पीस ॲण्ड डेमोक्रसी चे आयोजन करून डब्‍ल्‍यूपीयूने संपूर्ण विश्र्वाला शांतीचा संदेश दिला आहे. पुढील वर्षी 2 लाख विद्यार्थ्यांचा आणि जनतेचा सहभाग घेऊन शांतीसाठी सर्वात मोठ्या मॅरेथॉनचे आयोजन करणार आहोत. ”

ही रॅली शहरातील बीएमसीसी मैदान, बाबुराव सणस मैदान, साधू वासवानी मैदान आणि ॲग्री कल्‍चर मैदान या चार महत्‍वपूर्ण ठिकाणाहून सकाळी 6.00 वा. निघून 8.00 वा. शनिवारवाडा येथे पोहचली. त्‍यामध्ये ठिकठिकाणाहून माईर्स संस्‍थेचे विद्यार्थी सहभागी होत गेले. त्‍याच प्रमाणे डब्‍ल्‍यूपीयूच्‍या प्रथम वर्षाचे विद्यार्थीही सामील झाले.

सर्व लोकांमध्ये एकमेकांबद्दल आदर, शांती व प्रतिष्ठेची भावना निर्माण होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्‍या हातात शांतीचा संदेश देणारे बॅनर होते. संपूर्ण शहरात शांतीचा संदेश देत ही रॅली निघाली.

यावेळेस उपस्‍थित पाहुण्यांनी शांतीचे महत्‍व, उत्तम स्‍वास्‍थ्‍य, पीस म्‍हणजे आनंदी वृत्ती, डेमॉक्रसीसाठी शांतीचे महत्‍व, शांत विचारांनी आणि गोड बोलल्‍याने शांतीचे वातावरण आपोआपच निर्माण होते आणि जागतिकीकरणाच्‍या बाजारात वृक्षारोपणाचे महत्‍व  इ. विचार प्रकट केले.

ग्रुप कॅप्‍टन प्रा.डी.पी आपटे यांनी प्रास्‍ताविक केले व आभार मानले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाची सुरूवात विश्वशांती प्रार्थनेने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.

उत्तेजनार्थ सरपोतदार करंडकावर ‘सिंहगड’ची मोहोर

0

पुणे, ता. २१ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या विश्‍वासराव तथा बाळासाहेब सरपोतदार करंडक आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपदाची मोहोर उमटविली. ‘हा निव्वळ योगायोग समजावा’ या प्रसंगनाट्याने प्रथम क‘मांक पटकाविला.
ङ्गर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘बॅक लॉग’ला दुसरा क‘मांक मिळाला. विश्‍वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘जन्मखूण’ आणि याच महाविद्यालयाच्या ‘गुडलक’ या प्रसंगनाट्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत २६ महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
सोसायटीचे आजीव सदस्य डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्राचार्य डॉ. आशिष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे, आदीत्य सरपोतदार, विद्यार्थी प्रतिनिधी आदीत्य पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. अश्‍विनी गिरी व सागर देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे हे सतरावे वर्ष होते.
वैयक्तिक निकाल पुढीलप्रमाणे
दिग्दर्शन
१. अनिमेश कुमार, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय
२. संकेत पारखे, ङ्गर्ग्युसन महाविद्यालय

पियुष निरगावकर, अभियांत्रिकी महाविद्यालय
पुरुष अभिनय
१. अक्षय ओक, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय
२ संकेत पारखे, ङ्गर्ग्युसन महाविद्यालय
उत्तेजनार्थ
सुमंत ङ्गडके, व्हीआयटी
अभिजीत आहेर, सीओईपी
प्रतिक कार्यकर्ते, पीव्हीजी
स्त्री अभिनय
१ प्रियदर्शनी इंदलकर, पीव्हीजीसीओई
२ तनया गोखले, मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय
उत्तेजनार्थ
सायली साळुंके, सीओईपी
धनश्री जोशी, ङ्गर्ग्युसन
मोनिका बनकर, प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर

‘मामि’त पोहोचला ‘सर्वनाम’

0

मुंबईत होणाऱ्या १९ व्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस म्हणजेच मामि फिल्म फेस्टिव्हलसाठी सर्वनाम या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित या सिनेमाची ‘मामि’ फेस्टिव्हलच्या ‘इंडिया स्टोरी’ या विभागात ही निवड झाली आहे. ‘इंडिया स्टोरी’ या विभागात विविध भारतीय भाषांमधील एकूण ११ चित्रपटांची निवड झाली असून त्यात सर्वनाम या एकाच मराठी सिनेमाचा समावेश आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब असून प्रखर सत्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना भावेल, असा विश्वास गिरीश मोहिते यांनी व्यक्त केला.

‘नाम’ एका विशिष्ट् व्यक्तीचं अस्तित्व अधोरेखित करतं मात्र सर्वनाम ही सामुहिक संज्ञा आहे. स्वतःची ओळख जपत जगताना, नियती अनेकदा असा काही अनाकलीय खेळ खेळते की स्वतःचं अस्तित्व विसरून सर्वनामात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहत नाही. सर्वनाम हा सिनेमा ह्या प्रखर सत्याचा अनुभव देतो. आपल्या सिनेमांमधून वेगळं काहीतरी देऊ पाहणाऱ्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा सर्वनाम हा सिनेमासुद्धा निश्चितच वेगळा असेल.

आदिरोहन एंटरटेन्मेंटने या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. ‘प्री टू पोस्ट फिल्म्स निर्मित’ व गिरीश मोहिते दिग्दर्शित सर्वनाम मध्ये मंगेश देसाई, दिप्ती धोत्रे, उमेश बोळके आणि मास्टर राजवर्धन राहुल देसाई यांच्या भूमिका आहेत. याचे  सहनिर्माते रोहन बनसोडे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन तर संकलन निलेश गावंड यांचं आहे. कथा बशीर मुजावर यांची असून पटकथा गिरीश मोहिते व आशुतोष आपटे यांची आहे. संगीत अविनाश–विश्वजीत यांनी दिलं असून कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांनी केलं आहे. ‘मामि’ फेस्टिवल १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत रंगणार आहे.

मुख्यसभेतील आदेश ,चौकशी आणि अहवाल-सब गोलमाल ? (व्हिडीओ)

0

मुख्यसभेतील आदेश ,चौकशी  आणि अहवालांवर देखील संशयाचे ढग
पुणे- महापालिका मुख्यसभेतील आदेश,चौकशी आणि अहवालांच्या घोषणा आणि आश्वासने यावर आता विश्वास ठेवावा कि ठेवू नये  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . गेल्या सहा महिन्यातील मुख्य सभांचा कारभार पाहता अनेकदा महापौरांसह आयुक्तांनी दिलेले आधेश,केलेल्या घोषणा हवेतच विरल्या . अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित होतात . तेव्हा तेव्हा त्याबाबत ठोस कारवाई चे सुतोवाच प्रशासनाकडून करण्यात येते. महापौर ही आदेश देताना दिसतात . पण प्रत्यक्षात दिलेली वेळ आजतागायत कधीही पाळली गेली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे .
सीएसआर घोटाळा,बोगस कर्मचारी प्रकरण, जन्म मृत्यू दाखल्याचे गौडबंगाल, यासह अनेक प्रकरणी चौकशी कधी वेळेवर सुरु झाली नाही . जेवढ्या दिवसांच्या मुदतीत चौकशी सुरु करणे, अहवाल देणे ,कारवाई करणे याबाबत च्या घोषणा करण्यात आल्या त्या सर्वच फोल ठरल्या आहेत . कित्येकदा प्रशासनाला याबाबत विचारणा होऊनही त्याबाबतचे उत्तर प्रशासन देणार नाही अशी दक्षता जणू  खुद्द सत्ताधाऱ्यांनीच घेतली आहे कि काय ? असे वाटण्याजोगी परिस्थिती सभागृहात दिसून आली आहे .
गेल्या 5 महिन्यांपूर्वी सभागृहात चव्हाट्यावर आलेला सीएसआर घोटाळ्याबाबत अजूनही सभागृहात खुलासा प्रशासनाने केलेला नाही ,गेल्या जुलै महिन्यात
,बोगस कर्मचारी प्रकरण, जन्म मृत्यू दाखल्याचे गौडबंगाल, सभागृहासमोर पुराव्यानिशी मांडूनही याबाबत चौकशी झाली की नाही ? दोषी अधिकारी कोण आहेत ?यांची नावे ही सभागृहात सांगण्यात आलेली नाही. आणि अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी देखील नाखुशी दाखविल्याचे दिसून आले आहे . या प्रकारामुळे एकूणच प्रकरणे बाहेर येवूनही सत्ताधारी पदाधिकारी त्यांना पाठीशी घालीत आहेत काय ? असा सवाल त्यामुळे साहजिक पणे उपस्थित होणार आहे . अधिकारी ,प्रशासन याहून मोठी जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असल्याने या सर्यंचे खापर अर्थातच भाजपा वर फोडले जाऊ शकेल याची ही चिंता न करता कारभार केला जातो आहे .
कालच्या मुख्यसभेतील ‘गोलमाल’ पहाच …

लाशे बदल गयी..कफन वही …भाजपा नगरसेवकाचा भीमटोला (व्हिडीओ)

0


पुणे- महापालिकेतील भाजपचे नगरसेवक गोपाल चिंतल यांनी परिस्थितीचे अगदी साजेसे  वर्णन केले आहे ..अर्थात महापालिकेच्या खास सभेत आलेल्या पर्यावरण अहवालावर त्यांनी हि शायरी केली आहे …
पर्यावरण अहवाल खास सभेत पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी सदर केला ,यावेळी चिंतल आणि राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी हा अहवाल म्हणजे कॉपी पेस्ट आहे असा आरोप केला .यावेळी दिघे यांनी हा २१ व अहवाल असून ,यातील काही संकल्पना सारख्याच असल्याचे म्हटले .तर पर्यावरण सुधारण्यासाठी काहीच करण्यात येत नसल्याची टीका सुभाष जगताप यांनी केली .

मुंबईसह राज्यभर पाऊस…(व्हिडीओ)

0

पुणे-राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह राज्याला  पाणीपुरवठा करणारी धरणेदेखील पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे  वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

चासकमान

खेड तालुक्यातील चास कमान धरण परिसरात आज ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर आज अखेर धरण क्षेत्रात ९७९ मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे. काल दि.१९ संध्याकाळी व आज दि.२० पहाटे पासून संततधार पाऊस सुरु आहे भोरगिरी, भीमाशंकर परिसरात पडत असलेल्या पावसामुळे चास कमान धरणातून ५९९३ क्युसेस वेगाने भिमानदीत, ५५० क्युसेक वेगाने पाणी डाव्या कालव्यात तर ३०० क्युसेस वेगाने पाणी वीजनिर्मिती केंद्रातून भिमानदीत सोडण्यात येत आहे. तालुक्यातील चास कमान धरण क्षेत्रात पावसाची आणि धरणसाठ्याची माहिती पुढील प्रमाणे:

· धरणपातळी -५४९.५३· एकूण पाणी साठा – २४१.६९ दशलक्ष घनमीटर.· उपयुक्तपाणी साठा – २१४.५० दशलक्ष घनमीटर.· टक्केवारी -१०० टक्के.· विसर्ग – ५९९३ क्युसेस वेगाने सांडव्याद्वारे भिमानदीत, ५५० क्युसेस वेगाने डावा कालवा, ३०० क्युसेस वेगाने वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात· धरणक्षेत्रातील आजचा पाऊस – ६ मिलीमीटर.· धरणक्षेत्रातील आतापर्यंतचा पाऊस – ९७९ मिलीमीटर· तालुक्यातील सरासरी पाऊस ८०७ मिलीमीटर.

इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (बुधवारी दि,२०) रोजी दुपारी १२ वाजता धरण १०७. ५१% भरले आहे त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून, धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांसह पंढरपूर शहराला पुराचा धोका वाढला आहे.सध्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून १५ मोऱ्यांतुन ४० हजार क्यूसेस एवढा पाण्याचाविसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच वीर धरणामधून नीरा नदीत जवळपास २० हजार क्यूसेस पाण्याची त्यात भर पडत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागेत ६० हजार क्यूसेस पेक्षा अधिक वेगाने पाणी वाहते आहे. वरील भागातून येणाऱ्या पाण्यात आणखी झपाट्याने वाढ झाल्यास विसर्ग वाढू शकतो. त्याचा तडाखा पंढरपूरला बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. उजनी धरणात १०७ . ५१ टक्के पाणीसाठा आहे यात झपाट्याने वाढ होत आहे. पुर सदृश्यस्थिती निर्माण होवु नये म्हणून उजनी प्रशासनाने आज (बुधवारी दि,२०) एकूण ४१ मोऱ्यांपैकी १५ मोऱ्यांमधुन चाळीस हजार क्यूसेकने पाणी भिमा नदित सोडण्यात आले आहे…धरण क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढविला..धरणाच्या खोऱ्यात पावसाने मुसंडी मारल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.उजनी धरणाची पाणी पातळी ४९७ .१६५ दशलक्ष घनमिटर-एकूण पाणीसाठा – ३४३३ ९६ दशलक्ष घनमीटर-उपयुक्त साठा- १६३१ .१५ दशलक्ष घनमीटर-टक्केवारी – १०७ .५१ %

सिना माढा बोगद्यातुन ४ ०० क्यूसेकने तर कालव्यातुन १८०० क्यूसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर भिमा नदित दौंडवरुन ६८८१ विसर्ग सुरु असून बंडगार्डन हुन २१२७७ विसर्ग सुरु आहे. भिमा नदिकाठच्या नागरिकांना उजनी व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुण्यात पावसाची संततधार आजही दिवसभर कायम होती. यामुळे सलग तिसर्‍या दिवशी पुणेकरांनी चिंब पावसाळी दिवसाचा अनुभव घेतला. शहरासह उपनगरातही दमदार पाऊस बरसला. दिवसभर सूर्याचे दर्शनही झाले नसल्याने वातावरणातील गारठा वाढला होता. सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) ११.९ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे  अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठल्याने त्यातून वाट काढत जाणार्‍या वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहतुकीचा वेगही कमालीचा मंदावला होता. काही ठिकाणी सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडीही झाली. शहराप्रमाणेच शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही बुधवारी दमदार पाऊस पडल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. शहरात बुधवारी २३.३ अंश सेल्सिअस कमाल व २१.७  अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. दि. १ जूनपासून आतापर्यंत शहरात ६६०.६  मि.मी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत तो तब्बल १५५.४  मि.मी ने अधिक आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत शहर व परिसरात पावसाची संततधर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्त

 

 

सिंहगड महोत्सव आयोजनाबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा–जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे दि. 20 : सिंहगड महोत्सव आयोजनाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाने तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

शिवकालीन पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी ‘सिंहगड महोत्सवाचे’ आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठक घेण्यात आली, त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना  श्री. राव यांनी ही सूचना दिली. बैठकीला आमदार भिमराव तपकीर,  निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोहिनकर, तहसीलदार मीनल कळस्कर, सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम अधिकारी भरत लांघी, पुरातत्व विभागाचे जतन सहायक रामेश्वर निपाणे  आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, सिंहगडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वदूर पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सिंहगड महोत्सव आयोजित करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी प्रथम राज्य शासनाला  महोत्सवा बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावामध्ये महोत्सवा अंतर्गत घेण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, सिंहगडाच्या इतिहासाचे स्मरण करुन देणाऱ्या विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाची तसेच अन्य आवश्यक माहितीचा समावेश असणे गरजेचे आहे. रायगड महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत योग्य ती माहिती घेण्याच्या सूचना श्री.राव यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या. शिवकालीन दस्तऐवज, शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्याबाबत पुरातत्व विभागा बरोबर यावेळी चर्चा करण्यात आली.  या कालावधीत सिंहगडावर होणारी वाहतुकीची गर्दी, पार्किंगबाबतचे नियोजन, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा पासेस, घेण्यात येणारे कार्यक्रम व कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या नावांची यादी तसेच विविध कार्यक्रमामध्ये सहभागी कलाकार, स्पर्धक यांची यादी आदी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार भीमराव तापकीर म्हणाले, सिंहगड महोत्सवामध्ये  मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असावा. हा महोत्सव दर्जेदार होण्यासाठी यात शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच सिंहगड संवर्धनासाठी व गडाचे पावित्र्य जपण्यासाठी कार्यरत संस्थांनाही  सहभागी करुन घ्यावे.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी उपस्थितांना महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड म्हणाले, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, सरदार नावजी बलकवडे यांच्या शौर्यगाथा  व सिंहगडाचा  इतिहास लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. या महोत्सवात सिंहगडाचे छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शाहीरी मानवंदना, सिंहगड गिर्यारोहण स्पर्धा, ढोलताशा, मॅरेथॉन व सायकल स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले.  बैठकीस संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ‘रन फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी’चे आयोजन

0
पुणे. : डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे जागतिक शांतता दिनाचे औचित्यसाधून ‘रन फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी’ चे गुरुवार, दि. 21 सप्टेंबर 2017 रोजी आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्तींनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन एमआयटीडब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी केले आहे.
गुरुवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता बीएमसीसी, बाबुराव सणस, साधू वासवाणी, अ‍ॅग्री कल्चरल मैदान या चार ठिकाणांवरून रॅलीची सुरूवात होणार असून सकाळी 8 वाजता शनिवार वाडा येथे रॅलीची सांगता होईल.
या समारंभासाठी पूर्णवाद युवा फोरमचे माजी अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पारनेरकर, शिवसेनेचे नगरसेवक व कमल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल कलाटे, नगरसेविका व पुण्याच्या माजी मजपौर चंचला कोद्रे, एकोल सोलिटयरचे संस्थापक अध्यक्ष मिनोकेर पटेल, सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे, विवेक वेलणकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. सद्या जगातील कलुषित झालेले वातावरण पाहता सर्व लोकांमध्ये एकमेकांसाठी आदर, शांती व प्रतिष्ठेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या ‘रन फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅली चार विविध ठिकाणांवरून निघणार आहे. बीएमसीसी मैदानावरून निघणारी रॅली गोखले पुतळ्यापासून निघून एफ.सी.रोड, शबरी चौक, घोले रोड, बालगंधर्व, पीएमसी मार्गे शनिवार वाडयावर पोचणार आहे. एमआयटी एसओएम, एमआयटी सीएमएसआर व डीएमएसआर, एमआयटी एसओएम, एमएसीएस, एमआयटी एसओएम या महाविद्यालयाचे विद्यार्थी या मार्गावरील रॅलीत सहभागी होतील.
बाबुराव सणस मैदानावरून निघणारी रॅली वसंतदादा पाटील व लोकमान्य टिळक पुतळ्यापासून निघून अभिनव चौक, बाजीराव रोड, शनिपार-एबीसी मार्गे शनिवारवाड्यावर पोचेल. एमआयटी बीएड, डीएड व एमएड कॉलेज, एमआयटी पॉलीटेक्नीक, एमआयटी एसओटी, फार्मसी माहाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीत सामिल होतील.
साधु वासवानी मैदानावरून निघणारी रॅली साधु वासवानी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा गांधी पुतळ्यापासून निघुन बंड गार्डन पोलिस स्टेशन, आंबेडकर भवन, जुना बाजार, कुंभारवाडा, सुर्या हॉस्पिटल मार्गे शनिवारवाड्यावर पोचेल. या मार्गावरील रॅलीत एमआयटी एसओबी, एमआयटी एसओजी, डब्ल्यूपीयू प्रथम वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतील.
अ‍ॅग्री कल्चरल कॉलेजच्या मैदानावरून निघणारी रॅली महात्मा फुले पुतळ्यापासून निघून शिमला हाऊस, मॉडर्न कॅफे, नवा पूल मार्गे सांगता स्थळी पोचेल. एमआयटी व एमआयटी सीओई चे विद्यार्थी या मार्गावरील रॅलीत सहभागी होतील. एकुण 18 हजार विद्यार्थी व 2 हजार स्टाफ या रॅलीत सहभागी होतील. सोबतच एमआयटीचे शुभचिंतकही या रॅलीमध्ये सहभागी होऊन या उपक्रमास शुभेच्छा देतील.
या चारही ठिकाणावरून निघणार्‍या रॅली सकाळी 6.00 वाजता निघून 8.00 वाजताच्या दरम्यान शनिवार वाड्यावर पोचतील.

ईशा अगरवाल जिंकली माईलस्टोन मिस ग्लोबल वर्ल्ड इंटरनॅशनल पॅजन्ट रशियामध्ये भारताची मान उंचावली

0

पुणे,: मॉडेलिंग, इमेज मॅनेजमेंट, पोषण आणि तंदुरुस्ती हे ध्येय असलेल्या “शाईन ऑन” हा उद्यम चालविणाऱ्या फ्रीलांस मॉडेल आणि अभिनेत्री ईशा अगरवाल यांनी ‘माईलस्टोन मिस ग्लोबल वर्ल्ड इंटरनॅशनल पॅजन्ट’ हे शीर्षक हा पटकाविला आहे. मॉस्को, रशिया येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत ‘मिस सुपर मॉडेल’ होण्याचा मान देखील ईशाला मिळाला.

मॉस्को येथे झालेल्या माईलस्टोन मिस अँड मिसेस ग्लोबल वर्ल्ड इंटरनॅशनल पॅजन्ट ३० देशातील ३७ राष्ट्रीय विजेत्यांनी सहभाग घेतला होता. भारत, साऊथ आफ्रिका, युक्रेन, जॉर्जिया, पोलंड, जर्मनी, इस्राईल, युएसए, हाँग-काँग, व्हिएतनाम, फ्रांस, पेरू, रशिया व अन्य देशातील महिलांनी या पॅजन्ट मध्ये सहभाग घेतला होता. सेंट पीटर्सबर्ग व मॉस्को येथे स्पर्धकांना १० दिवस विविध कार्य, उपक्रम व खडतर सत्रांमधून जावे लागले. ईशा अगरवालने भारताचे प्रतिनिधित्व केले व क्राउन जिंकून भारताची मान उंचावली

जवळपास २०० दर्शक व रशिया आणि इतर देखातील अधिकारी मॉस्को मध्ये झालेल्या अंतिम फेरी साठी उपस्थित होते. जूरी पॅनेलमध्ये देखील मिस युनिव्हर्स ओल्गा टॉर्नर, मिसेस युनाइटेड नेशन्स डॉ प्रीती सोलंकी, मिसेस अर्थ रशिया नदालिया यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न व्यक्तींचा समावेश होता. या वर्षी झालेले पॅजन्ट महिला सशक्तीकरण या थीम वर आधारित होते.

बाल्टिमोर, युएसए यथे ईशाने ‘फर्स्ट रनर अप मिस इंटरनॅशनल एक्सक्युजिट २०१५’ हा शीर्षक पटकाविला. ह्या वर्षी थायलंड येथे झालेल्या पॅजन्ट शो मध्ये ईशाने  “माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस २०१७” हा शीर्षक जिंकला.

या भव्य यशाबद्दल बोलताना ईशा म्हणाली की, “या आधी मी बाल्टिमोर येथे फर्स्ट रनर्स अप टायटल व थायलंड  मध्ये माईलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल प्रिन्सेस २०१७ हे शीर्षक जिंकले आहे पण आंतरराष्ट्रीय पॅजन्ट शो जिंकण्याची संधी कधीच मिळाली नाही. हे स्वप्न आता पूर्ण झाल्याबद्दल मी अत्यंत आनंदित आहे व माझ्या पालकांच्या, मित्रांच्या आणि शुभ चिंतकांच्या प्रेम आणि समर्थनाशिवाय हे शक्य झाले नसते”.

ईशा पुढे म्हणाली की, “आज मी जे काही आहे त्याचे श्रेय परमेश्वराला जाते आणि माझा त्या सर्वोच्च शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळेच माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली. मी आनंदित आहे की हे टायटल जिंकून मी दाखवून दिले आहे की भारतीय लोक कुठेच मागे पडत नाहीत. महत्वकांक्षी मॉडेल्स साठी मला आदर्श मॉडेल बनायचे आहे व त्यांना हे सांगायचंय की मेहनतिच्या जोरावर सर्व काही शक्य आहे. हे विश्व तुमचे मंच आहे”.

मॉडेलिंग पुरते मर्यादित न राहता ईशा या महिन्यात रिलीज होणाऱ्या ‘तिथीवासल’ या तमिळ सिनेमात ईशा झळकणार आहे. ऑक्टोबर मध्ये रिलीज होणाऱ्या ‘निवे’ या तेलुगू सिनेमामध्ये देखील ती दिसणार आहे. मॉडेलिंग प्लॅटफॉर्मने निश्चितच ईशासाठी अनेक मार्ग मोकळे केले आहेत व या क्षेत्रात पुढे अजून प्रगतीकरून ती आपले स्वप्न पूर्ण करायची इच्छा बाळगते.

या भव्य यशानंतरही ईशाचे पाय अजूनही जमिनिवर आहेत. मतिमंद मुलांना वेळ देत त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी ती कामयानी स्कूल सोबत कार्यरत आहे.

‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय’ आणि ‘नॅशनल युर्निव्हर्सिटी’ (अमेरिका) यांच्यात सहकार्य कराराबाबत बैठक

0
पुणे ः‘तंत्रशिक्षण आणि संशोधन’ या विषयात ‘भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय’ (कात्रज कॅम्पस) आणि अमेरिकेतील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी’ यांच्यात परस्पर सहकार्य करार करण्यात येणार असल्याची माहिती ‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव यांनी दिली.या सहकार्य करारानुसार दोन्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण, फिल्ड ट्रीप्स, दूरशिक्षण यांचा लाभ होणार आहे.
‘नॅशनल युनिव्हर्सिटी’च्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपाध्यक्ष डॉ. विल पोर्च यांनी ‘भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला’ मंगळवारी भेट दिली आणि डॉ. आनंद भालेराव यांच्याशी चर्चा करून सहकार्य कराराविषयी

​​चर्चा केली. ‘विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना विविध शैक्षणिक संधींंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा करार उपयोगी ठरेल,’ असे डॉ. आनंद भालेराव म्हणाले.

लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमांमध्ये न मिरवता कचरा समस्येकडे लक्ष द्यावे : राजेंद्र जगताप

0

सांगवी,पिंपळे गुरवमध्ये कचरकुंडया ‘ओव्हरफ्लो’

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपळे गुरव,सांगवी,नवी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधील साचलेला कचरा महापालिका कर्मचार्‍यांकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरातील कचरकुंडया ओव्हरफ्लो झाल्या असून दुर्गंधीयुक्त कचर्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ना मिरवता कचरा समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.

परिसरातील वाढत्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजेंद्र जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाजवळ 60 फूटी रोडने जाताना विजयराज कॉलनी येथे रस्त्यालगत ठेवलेल्या कचराकुंडी मधील कचरा वेळेवर उचललेला नाही. त्यामुळे या ठिकाणी कचराकुंडी ओव्हरफ्लो झाल्याने नागरीकांकडून कचरकुंडीच्यालगत रस्त्यावर कचरा फेकला जात आहे. हा रस्ता नागरिकांच्या वर्दळीचा असल्यामुळे साचलेल्या कचर्‍यातून येणार्‍या दुर्गंधीचा त्रास रस्त्याने ये – जा करणार्‍या नागरिकांना तसेच सभोताली राहण्यास असलेल्या रहिवाश्यांना सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारची कचरा समस्या नवी सांगवी येथील शनि मारुती मंदीर,मयूरनगरी सोसायटी,काटेपूरम चौक, पी डब्लुडी कॉलनी जुनी सांगवी आदी ठिकाणी निर्माण झाली असून कचरकुंडयाभोवती साचलेल्या कचर्‍यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.महापालिका प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन परीसरातील कचराकुंड्यामधील कचरा नियमितपणे उचलला जावा, अशी मागणी त्यांनी केली.

एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिथे कचरा नाही, तिथे झाडू हातात घेऊन झाडू मारला जातो. तर दुसरीकडे शहरातील कचराकुंड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले जात आहे.  याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे भाजपाची स्वच्छता मोहीम हि केवळ दिखाव्यापुरती झाली आहे. स्थानिक नगरसेवक इतर कार्यक्रमांना हजेरी लावण्यातच व्यस्त आहेत. आपण नगरसेवक असताना नागरिकांच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य असायचे. आता मात्र नागरिकांना कचरा समस्या, खड्डेमय रस्ते, डासांचे साम्राज्य अशा विविध प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी स्वच्छता अभियानाचा केवळ दिखावा न करता नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करायला हवा, अशी अपेक्षाही राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.

​​ ​भारती विद्यापीठ ​अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

0
पुणे ​:
 
​भारती विद्यापीठ ​अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी अभियंता दिनानिमित्त कात्रज येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी दिली.
शाळेतील मुलांना अभियांत्रिकीची आवड निर्माण व्हावी. यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जास्रोत, हायड्रॉलिक व न्यूमॅटिक सिस्टीम, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संयोजन दत्तात्रय जाधव यांनी केले. प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सत्यजित महतो, सागर मोलाह, संदीप कुमार, नीरज यादव, हिमांशू कुमार, तरुण कुमार, अभय सिंह, अनिश पांडे आदि विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली.

सॅमसंगने महाराष्ट्रात स्मार्टफोनचे नेतृत्व संघटित केले, सणानिमित्ताने उत्साहवर्धक सवलती सादर

0

 

– सॅमसंगच्या `नेव्हर माइंड’ या सवलतीमध्ये खरेदीनंतर 12 महिन्यांच्या कालावधीत
एकवेळ स्क्रीन रिप्लेसमेंट उपलब्ध
– सॅमसंग गॅलेक्सी जे ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोनची मालिका आहे;
भारतात विकला जाणारा प्रत्येकी तिसरा फोन गॅलेक्सी जे मालिकेचा असतो
पुणे, भारत – 20 सप्टेंबर 2017 – सॅमसंग ही भारतातील क्रमांक एकची मोबाइल फोन कंपनी
आहे आणि देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे, या कंपनीने महाराष्ट्रातील आपले नेतृत्व
अधिक सबळ केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे मालिका ही भारतातील सर्वात लोकप्रिय
स्मार्टफोनची मालिका आहे आणि अलिकडेच गॅलेक्सी जे7 प्रो आणि गॅलेक्सी जे7 मॅक्सचे
उद्घाटन झाले, त्याला भरघोस प्रतिसाद लाभला आहे. महाराष्ट्रातील ग्राहकांचे प्रेम आणि
विश्वास पाहता, सॅमसंग इंडियाने सॅमसंगचे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी “नेव्हर माइंड’’
सवलत आज जाहीर केली आहे.
“नेव्हर माइंड’’ ही सवलत सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सादर करण्यात आली
आहे, याअंतर्गत खरेदीनंतर एक वेळा स्क्रीन रिप्लेसमेंट मिळणार आहे. सॅमसंगच्या “नेव्हर
माइंड’’ सवलतीत ग्राहकांना खरेदीनंतर स्क्रीन तुटल्यास 990 रुपयांच्या किंमतीची स्क्रीन बारा
महिन्यांच्या कालावधीत एकदा रिप्लेस करून दिली जाणार आहे. 21 सप्टेंबर 2017 ते 21
ऑक्टोबर 2017 या कालावधीत खरेदी झालेल्या फोनसाठी ही सवलत लागू आहे.
सॅमसंगच्या “नेव्हर माइंड’’ सवलतीमुळे ग्राहकांना निश्चिंत राहता येणार आहे आणि ही सेवा
9,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या फोनसाठी विस्तारण्यात आली आहे. यात जे, ए, सी
मालिका आणि ऑन सिरीज आणि प्रमुख एस मालिका आणि नोट मालिका यांचा समावेश
आहे.
सणांचे निमित्त ठेवून सॅमसंगने अलिकडेच प्रमुख गॅलेक्सी नोट8 चे भारतात उद्घाटन केले,
आणि लोकांना अधिक भव्य गोष्टींसह नवीन स्तरावरील नोट उपलब्ध करून दिला आहे.

“ग्राहकप्रधान नावीन्यपूर्णता आणि सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा देणे यावरच आमचे लक्ष
केंद्रित आहे, यामुळेच सॅमसंग इंडिया भारतातील सर्वोत्तम ब्रँड ठरला आहे. “नेव्हर माइंड’’ या
सवलतीमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विचार करण्यात आला आहे.
सॅमसंगने नेहमीच ग्राहकांसाठी मूल्याधिष्ठित सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि
ग्राहकांच्या आनंदाला प्राधान्य देणारी ही नवी सवलत त्याचीच पोचपावती आहे,’’ असे सॅमसंग
इंडियाचे उपाध्यक्ष श्री. राजू पुल्लन म्हणाले.
“आमची स्मार्टफोनची नवी उत्साहवर्धक जे मालिका भारताला नावीन्यपूर्णतेत मदत करते,
यामुळे महाराष्ट्रात आमचे नेतृत्व सबळ करण्यासही मदत झाली आहे.’’ ते पुढे म्हणाले.
अलिकडेच उद्घाटन करण्यात आलेले जे7 प्रो आणि गॅलेक्सी जे7 मॅक्स ग्राहकांसाठी नव्या
वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आले आहेत. सोशल कॅमेरा, अनोखे अँड्रॉइड नोगट आणि सॅमसंग
पे यासारख्या वैशिष्ट्यांमुळे गॅलेक्सी जे लोकांना जास्त भावत आहे. आजच्या घडीला भारतात
खरेदी होणारा प्रत्येक तिसरा स्मार्टफोन गॅलेक्सी जे मालिकेचा आहे.
सॅमसंग पे : सॅमसंग पे हे एक संपूर्ण देयकांचे व्यासपीठ आहे. यामुळे लोक त्यांची दैनंदिन देयके आणि
व्यवहार या व्यासपीठावरून करू लागले आहेत. सॅमसंग पेमुळे सॅमसंगच्या स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांना
केवळ एक टॅप करायचे आहे आणि आपल्या फोनमधून देयके भरायची आहेत, यासाठी प्रत्यक्ष कार्डाची
आवश्यकता नाही. `मेक फॉर इंडिया’अंतर्गत नावीन्यपूर्णतेत सॅमसंगने पेटीएम आणि मोबिक्विकसारखी
मोबाइल वॉलेट्स सरकारच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेससह सॅमसंगच्या पेच्या व्यासपीठावरून सादर केली
आहेत.
सोशल कॅमेरा : गॅलेक्सी जे7 मॅक्स आणि गॅलेक्सी जे7 प्रो या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सोशल कॅमेरा येतो,
आमच्या सर्वात अलिकडच्या नावीन्यपूर्ण उत्पादनात ग्राहकांसाठी नव्या पद्धतीने स्मार्टफोन कॅमेरा
वापरण्याची पद्धत आणली आहे, यात इंस्टंट शेअरिंग, इंस्टंट एडिटिंग आणि इंस्टंट डिस्कव्हरी यांचा
समावेश आहे.
मेक फॉर इंडिया इनोव्हेशन्स : गॅलेक्सी जे मालिका ही सॅमसंगच्या भारतीय ग्राहकांसाठी प्रमुख उत्पादन
ठरली आहे. अल्ट्रा डेटा सेव्हिंग, एस बाईक मोड आणि एस पॉवर प्लॅनिंग यासारख्या जे मालिका `मेक फॉर
इंडिया’ इनोव्हेशन्सची मूल्याधिष्ठीत सेवा जे मालिकेतील स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.

सॅमसंगने आपल्या तब्बल 10,400 भागीदार स्टोअर्स, 235 एक्सक्लुझिव स्टोअर्स आणि 170 सर्व्हिस
सेंटर्सच्या विस्तारीत रिटेल नेटवर्कच्या साहाय्याने महाराष्ट्रभर फेस्टिव बोनान्झा राबवण्याचेही ठरवले
आहे.

२४ तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला सरकारकडून १२५ कोटी मिळणार

0

पुणे-समान पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून १२५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला. राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीमुळे पालिकेला दिलासा मिळाला आहे.
शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी मिळावे, यासाठी पालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. कर्जरोखे उभारुन प्रकल्पाचा निधी गोळा केला जाणार आहे. योजनेसाठी सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपये खर्च येणार असून, २२०० कोटी रुपयांचा निधी कर्जरोख्याद्वारे उभा राहणार आहे. योजनेसाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने सुरू केला होता. समान पाणीपुरवठा योजनेतून शहरात ८२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी २४५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चातील ५० टक्के खर्च अमृत योजनेतून देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली होती.
अमृत योजनेमधून योजनेसाठी १२५ कोटी रुपयांचे अनुदान मिळण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. याबाबत मंगळवारी मुंबईत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे बैठक झाली. बैठकीला पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. या बैठकीत अमृत योजनेतून १२५ कोटी देण्यास मंजुरी देण्यात आली. पुढील महिनाभरात हा निधी पालिकेला मिळणार आहे.

सर्व धरणे हाऊसफुल्ल… टेमघर दुरुस्तीसाठी भरू देत नाहीत .

0

पुणे-सर्वात मोठे धरण उजनी आणि जिल्ह्यातील १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरल्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात सुमारे दोन हजार ५६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात आला.
खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे रात्री 11ला आठ पहाटे तीन वाजता 14 व सकाळी 7 वाजता 23 हजार क्यूसेक पाणी मुठा नदी पात्रात सोडण्यात आले.वरसगावमधून रात्री एक हजार क्यूसेक पाणी मोसे नदीत सोडले जात होते. तो विसर्ग पहाटे 3552 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. टेमघर मधूम 127 क्यूसेक असे सुमारे
5000 क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामध्ये खडकवासला, वरसगाव, पानशेत, वडज, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, निरा देवघर, भाटघर आणि वीर यांचा समावेश आहे.
‘शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे पूर्ण भरली आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे दोन हजार ५६८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी पाणी सोडले जाणार आहे.’ असे खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.
वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चारही धरणांच्या परिसरात सतत पाऊस पडत आहे. दिवसभरात टेमघर धरण क्षेत्रात ३८ मिलिमीटर, वरसगाव परिसरात ३२ मिलिमीटर, पानशेत धरण भागात ३३ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 

फक्त टेमघर धारण दुरुस्तीसाठी भरू दिले जात नाही तरीही त्यात 50 टक्के साठा आहे .
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही फुल्ल झाले आहे.नीरा देवघर धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाचे प्रमाण जास्त आहे. वीर धरणातून दिवसभरात सुमारे पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

उजनी शंभर टक्के भरले
उजनी धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हे धरण शंभर टक्के भरले गेले आहे. सध्या या धरणात ५७.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणातून ​दिवसभरात सुमारे १४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.