पुणे-सर्वात मोठे धरण उजनी आणि जिल्ह्यातील १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरल्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात सुमारे दोन हजार ५६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात आला.
खडकवासला, पानशेत व वरसगाव हो तिन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे रात्री 11ला आठ पहाटे तीन वाजता 14 व सकाळी 7 वाजता 23 हजार क्यूसेक पाणी मुठा नदी पात्रात सोडण्यात आले.वरसगावमधून रात्री एक हजार क्यूसेक पाणी मोसे नदीत सोडले जात होते. तो विसर्ग पहाटे 3552 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. टेमघर मधूम 127 क्यूसेक असे सुमारे
5000 क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामध्ये खडकवासला, वरसगाव, पानशेत, वडज, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, निरा देवघर, भाटघर आणि वीर यांचा समावेश आहे.
‘शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे पूर्ण भरली आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे दोन हजार ५६८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी पाणी सोडले जाणार आहे.’ असे खडकवासला धरणाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.
वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चारही धरणांच्या परिसरात सतत पाऊस पडत आहे. दिवसभरात टेमघर धरण क्षेत्रात ३८ मिलिमीटर, वरसगाव परिसरात ३२ मिलिमीटर, पानशेत धरण भागात ३३ मिलिमीटर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
फक्त टेमघर धारण दुरुस्तीसाठी भरू दिले जात नाही तरीही त्यात 50 टक्के साठा आहे .
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही फुल्ल झाले आहे.नीरा देवघर धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही पावसाचे प्रमाण जास्त आहे. वीर धरणातून दिवसभरात सुमारे पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
उजनी शंभर टक्के भरले
उजनी धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हे धरण शंभर टक्के भरले गेले आहे. सध्या या धरणात ५७.९० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणातून दिवसभरात सुमारे १४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.