Home Blog Page 3276

नादुरुस्त वाहिनीवरील 80 मेगावॉट विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन महावितरणचा पुणेकरांना दिलासा; भारनियमन टाळले

0
दांडेकर पुलानजीक फरशी पुलाजवळ महापारेषणच्या 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन फेजच्या वाहिन्यांचे जेसीबीच्या धक्क्याने नुकसान झाले आहे.

पुणे, दि. 22 : महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीतून होणारा 70 ते 80 मेगावॉट वीजपुरवठा तसेच सात उपकेंद्र बंद पडल्यानंतर महावितरणने इतर उपकेंद्रांतील पर्यायी व्यवस्थेतून व विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन करून शुक्रवारी (दि. 22) शहराच्या मध्यवर्ती भागात व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवला.

दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेली 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी जोडण्यासाठी चेन्नई येथून महापारेषणने मागविलेला ‘जाईंट’ आज सायंकाळी पुण्यात पोहोचला आहे. सोबतच वाहिनी जोडणारे तज्ञ कर्मचारीही आले आहेत. या वाहिनीच्या दुरुस्तीला आज सायंकाळी उशिरा सुरवात झाली असून शनिवारी (दि. 23) सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे.

महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटल्यानंतर गुरुवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महापारेषणचे 132 केव्ही जीआयएस व महावितरणच्या 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व पेठांसह लूल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा प्रामुख्याने रास्तापेठ विभाग, पर्वती विभाग व पद्मावती विभागातील सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्यासह सुमारे 120 अभियंते व कर्मचार्‍यांनी बाधीत झालेल्या भागांत इतर उपकेंद्गातील पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना सुरु केली. रात्री उशिरापर्यंत सर्वच भागातील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरळीत करण्यात आला.

पर्यायी वीजपुरवठ्यासाठी एकाच वेळी 70 ते 80 मेगावॉट विजेचे इतर उपकेंद्गातून भारव्यवस्थापन शक्य करणे नसल्याने विजेचा कमीतकमी वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले होते. त्यास प्रामुख्याने औद्योगिकसह सर्व ग्राहकांनी प्रतिसाद दिल्याने आज दिवसभर दारुवाला पूल (रविवार पेठ) व मंगळवार पेठ परिसरात प्रत्येकी एक तासांचे चक्राकार पद्धतीने दोन तास भारनियमन करण्यात आले. तर बाधीत झालेल्या उर्वरित सर्व परिसरात भारनियमन टाळून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला.

दांडेकर पुलानजीक फरशी पूलाजवळ तुटलेल्या भूमिगत 132 केव्ही वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन फेजच्या वाहिन्यांचे जेसीबीच्या धक्क्याने नुकसान झाले आहे. महापारेषणकडून या दोन्ही वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी मागविण्यात आलेला ‘जाईंट’ व तज्ञ कर्मचारी पुण्यात पोहोचले आहेत. शनिवारी (दि. 23) सायंकाळपर्यंत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महावितरणकडून शहराच्या बाधीत मध्यवर्ती व इतर परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. विजेची मागणी वाढल्यास व भारव्यवस्थापन शक्य झाले नाही, तर नाईलाजाने काही भागात चक्राकार पद्धतीने 3 ते 4 तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी कमीत कमी विजेचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

‘स्मार्ट गर्ल व तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे’ उद्घाटन संपन्न

0

पुणे: मुलींना स्मार्ट करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवश्यकता असून या मुळे समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अन्न व नागरि पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची घोषणा व उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या राजेश्री कदम उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री बापट म्हणाले, शिक्षण घेणाऱ्या मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यंत आवशक आहे. चांगले संस्कार हे मुलांमध्ये चांगला स्वभाव व वागणूक रुजवतात. यामुळे राज्य व देशाच्या बळकटिकरणात भर पडते. मुलींना स्मार्ट बनविण्यासाठी सर्व प्रथम समाजातील सर्व लोकांना स्मार्ट बनणे आवशक आहे म्हणून पहिली सुरुवात स्वत:ह पासून करा. कुटुंब व्यवस्था कोलमडू देवू नका, ती टिकवा. विज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा उपयोग करा व दुरुपयोग टाळा. स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग या अभियानाद्वारे इयत्ता 8 वी, 9वी, 10वी, 11वी व 12वी तील मुलींना सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास तयार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थिनींना सक्षम करण्यात मदत होणार आहे. तसेच श्री बापट यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियाना बाबतीत सर्वांना व्यसन टाळण्याचे आवाहन केले.

यावेळी  खा. सुप्रिया सुळे, खा. अनिल शिरोळे, राज्य मंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, यांची भाषणे झाली. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉग व तंबाखू मुक्त शाळा अभियानाची माहिती चित्रफिती द्वारे देण्यात आली.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी. भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी तसेच सलाम मुंबई फाऊंडेशनचे सदस्य जिल्ह्यातील  शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येणे उपस्थित होते.

जागतिक कन्या दिनाच्या पूर्वसंध्येला ड़ाॅ.गणेश राख यांचा कर्तव्य फाऊंडेशनतर्फे सन्मान

0

पुणे-गेली सात वर्षे आपल्या रूग्णालयात मुलींचा जन्म झाल्यास प्रसूतीचे संपूर्ण शुल्क माफ करणारे हड़पसर मधील मेड़ीकेअर हाॅस्पिटलचे प्रमुख ड़ाॅ.गणेश राख यांना जागतिक कन्या दिनाच्या पूर्वसंध्येला कर्तव्य फाऊंडेशनतर्फे विशेष शाखेच्या पो.निरीक्षक वैशाली चांदगुड़े यांच्या हस्ते “कर्तव्य सेवा सन्मान” देऊन गौरविण्यात आले.यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,ड़ाॅ.बंटी धर्मा,अशोक देशमुख,गणेश शेलार,अक्रम शेख,दिलीप भिकुले,अजित राख आदी उपस्थित होते.

“ड़ाॅ.गणेश राख यांनी प्रत्यक्ष कृतीतून “मुलगी वाचवा” या चळवळीत दिलेले योगदान कौतुकास्पद असून इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा”असे मत यावेळी पो.निरीक्षक चांदगुड़े यांनी व्यक्त केले.

यापूर्वी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही ड़ाॅ.राख यांचा गौरव केला असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

   ड़ाॅ.गणेश राख यांनी कर्तव्य फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले तसेच आपल्या कार्याचे अनेकांनी अनुकरण केल्याने समाधान वाटत असल्याचे मत व्यक्त केले.

“डॉ. तात्या लहाने … अंगार… पॉवर इज विदीन” चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस

0

डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा “डॉ. तात्या लहाने … अंगार… पॉवर इज विदीन” हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो प्रेक्षकांच्या भेटीस १० नोव्हेंबरला येत आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने चला हवा येऊद्या च्या सेटवर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मकरंद अनासपुरे, अलका कुबल, निशिगंधा वाड, साधना सरगम, भारत गणेशपुरे, विराग मधुमालती वानखडे, वंदना वानखेडे व स्वतः डॉ. तात्या लहाने उपस्थित होते.

या निमित्ताने डॉ. तात्या लहानेनी आपल्या आठवणींना उजाळा दिला व त्यावेळी ते म्हणाले “आज मी जिवंत आहे आणि जे आज मी दिवस पाहतोय ते माझ्या आई मुळेच. जर माझ्या आईनी मला तिची किडनी दिली नसती तर मी आजचे हे दिवस पाहू शकलो नसतो. प्रत्येकाची आई आपल्या मुलाला एकदाच जन्म देते पण माझ्या आईनी मला दोनदा जन्म दिला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की डॉक्टरकी हा व्यवसाय नसून ती एक सेवा आहे त्यामुळे डॉक्टरांनी डॉक्टरकी पेशाला व्यवसाय न समजता ती एक सेवा समजून काम केले पाहिजे, तसेच ते पुढे म्हणाले की आपल्या देशात रक्तदानचा प्रसार झाला आहे पण अजून ही अवयव दानाकडे गांभीर्याने घेतले जात नाही. आज आपल्या देशात अवयवदानाची नितांत गरज असूनसुद्धा अवयव दानाचे प्रमाण बाहेरच्या देशापेक्षा आपल्या देशात कमी आहे. आपण सगळ्यांनी जागरुक होऊन अवयवदान करून गरजू जनतेचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करावे व त्यांना नवे जीवन द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.”

चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विराग वानखेडे यांनी चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात सांगितले  की, मी नेत्रदानाच्या जागृतीसाठी “रोशनी जिंदगी में” या अभियानांच्या अंतर्गत अंधव्यक्तीच्या व्यथा जाणून घेण्यासाठी तब्बल १०० दिवस स्वतः च्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांची जीवनशैली अनुभवली. ५५५ तास ५ मिनिट ५ सेकंद पर्यंत गाण्याचा विश्वविक्रम करून चीन मधील ४६५ तासांचा गाण्याचा विक्रम मोडून नवा विश्वविक्रम केला व या विक्रमाची नोंद गिनीजबूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. मी ६ दिवस आणि ६ रात्र न जेवता न झोपता १२० तास गाण्याचा विक्रम करून यू. के च्या आयन गिब्सन चा २८ तास आणि २७ मिनिटांचा रेकॉर्ड मोडून नवा विश्व विक्रम केला आणि नेत्रदानाच्या जागृकतेसाठी कलर चॅनल वर १५५ तबला वादाकांसोबत न थांबता सलग १ मिनिट ४५ सेकंद तबला वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड केला.  तसेच मकरंद अनासपुरे, अलका कुबल, निशिगंधा वाड, साधना सरगम, भारत गणेशपुरे यांनी आपापल्या भूमिकांबद्दल सांगून ती भूमिका आपल्याला करायला मिळाली याबद्दल आभार व्यक्त केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून, सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचं संगीत ‘एक हिंदुस्थानी’ या संगीतकाराने केलं आहे. सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक विराग मधुमालती वानखडे यांनी उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. लहानेंचा जीवनपट दोन-अडीच तासांत अतिशय उत्तमरित्या गुंफला आहे. या सिनेमाचं वेगळेपण रिले सिंगिंग या उपक्रमाने अधिक वाढवलं आहे. विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३२७ गायकांनी सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने गात हे गाणे सादर केले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम नोंदविला आहे. ‘काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू’… हे गाणं सिनेमात गायिका साधना सरगम आणि विराग यांनी स्वतः गायलं असून ‘एक हिंदुस्थानी’ यांनी संगीतबद्ध केलं आहे. तसेच सिनेमातील एका गाण्याला केतकी माटेगावकर हिने देखील आवाज दिला आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजलीबाईंच्या भूमिकेत आहेत. यांच्यासोबत सिनेमात रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांच्या विशेष भूमिका आहेत. सिनेमाचं छायाचित्रण माधवराज दातार यांनी केलं असून, वेशभूषा वंदना वानखडे यांची आहे. तसेच सिनेमाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी समीर-सचिन यांनी सांभाळली आहे.

मसालापटाच्या लाटेत मराठी प्रेक्षक आशयघन विषय शोधू लागले आहेत. अशा चोखंदळ रसिकांसाठी डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन हा सिनेमा उत्तम पर्वणी ठरणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपले डॉक्टरकीचे शिक्षण पूर्णकरून जनसमुदायामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या डॉ. तात्या लहाने यांच्यावर तयार झालेली “बायोपिक” आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत.

पाचव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत स्पुटनिक्‍स, टोरॅनाडोज, डोव्हज, फाल्कन्स संघांची विजयी सलामी

0
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित पाचव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत स्पुटनिक्‍स, टोरॅनाडोज, डोव्हज आणि फाल्कन्स या संघानी आपापल्प्रया प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उद्‌घाटनाचा दिवस गाजविला.
पीवायसी क्‍लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत स्पुटनिक्‍स संघाने रेवन्स संघाचा 5-2 असा 14-8 असा गुणांनी, दुसऱ्या लढतीत टोरॅनाडोजने कॉमेंट्‌स संघाचा 4-3 असा 12-9 गुणांनी, तिसऱ्या सामन्यात डोव्हज संघाने ब्लॅक हॉक्‍सचा 5-2 असा 14-8 गुणांनी तर चौथ्या सामन्यात फाल्कन्सने ईगल्स संघाचा 4-3 असा 13-8 गुणांनी पराभव केला.

स्पर्धेचे उद्‌घाटन 
ट्रूस्पेसचे मालक आश्‍विन त्रिमल व उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्‍लबचे अध्यक्ष विजय भावे पीवायसी क्‍लबच्या उपाध्यक्ष शैलजा बापट,  बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे, गिरीश करंबेळकर, उदय साने, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ निवसरकर, बिपिन चोभे, अभिजित खानविलकर, स्पर्धेचे संचालक वरूण खानवलकर, कपिल खरे, सारंग लागू आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल –
स्पुटनिक्‍स वि. वि रेवन्स संघ 5-2 : गोल्ड खुला दुहेरी गट – अभिजित राजवाडे व श्रीधर चिपळूणकर पराभूत विरुद्ध श्रीयश वर्तक व केदार नाडगोंडे, 4-21, 11-21, सिल्व्हर खुला दुहेरी – प्रीती सप्रे व संदीप तपस्वी वि.वि. अभिजित खानविलकर व शिरीष साठे 15-11, 15-10, मिश्र दुहेरी गोल्ड गट – आश्‍विन शहा व सारा नवरे पराभूत विरुद्ध राजश्री भावे व व मिहीर विंझे 21-17, 10-21, 9-11, सिल्व्हर मिश्र दुहेरी – दीप्ती सरदेसाई व अमोल मेहेंदळे वि.वि. श्रीदत्त शानभाग व चैत्राली नवरे 14-15, 15-8, 11-6. चिल्ड्रन्स मिश्र गट एकेरी – अनया राजवाडे पराभूत विरुद्ध राधिका साठे 3-11, 6-11. सिल्व्हर खुला दुहेरी –बाळ कुलकर्णी व नीलेश केळकर वि.वि. देवेंद्र राठी व वेदांत खटोड 15-11, 13-15, 11-10, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी गट – बिपिन देव व बिपिन चोभे वि.वि. शिरीष कर्णिक व प्रशांत वैद्य 21-4, 21-7. गोल्ड खुला दुहेरी – अंकित दामले व अनिश राणे वि.वि. सारंग लागू व हर्षद बर्वे 21-13, 19-21. 11-3. 

टोरॅनाडोज संघ 
वि. वि कॉमेंट्‌स संघ 4-3: गोल्ड खुला दुहेरी – तेजस किंजवडेकर व महेश उतगीकर वि.वि. अंकुश जाधव व तेजस चितळे 12-21, 21-17, 11-5, सिल्व्हर खुला दुहेरी – अविनाश जोशी व विनय काळभोर वि.वि. सुदर्शन बिहाणी व गिरीश मुजुमदार 15-11, 12-15, 11-8. गोल्ड मिश्र दुहेरी – हर्षवर्धन आपटे व गौरी कुलकर्णी वि.वि. सलोनी तपस्वी व अमित धर्मा 21-17, 21-7, सिल्व्हर मिश्र दुहेरी – अनिकेत सहस्रबुद्धे व सिद्धी महाजन पराभूत विरुद्ध आदिती रोडे व राजेंद्र नाखरे 15-9, 14-15, 7-11, चिल्ड्रन्स मिश्र एकेरी – यश चितळे पराभूत विरुद्ध विष्णू गोखले 10-11, 11-6, 9-11. सिल्व्हर खुला दुहेरी – शैलेश लिमये व राजशेखर करमरकर पराभूत विरुद्ध जयदीप कुंटे व तुषार नगरकर 4-15, 15-10, 4-11. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी – शीतल काळभोर व गिरीश रानडे पराभूत विरुद्ध अनिल देडगे व अतुल बिनीवाले 7-21, 9-21. गोल्ड खुला दुहेरी – देवेंद्र चितळे व विक्रांत पाटील वि.वि. मिहीर केळकर व पराग चोपडा 21-12, 21-16. 

डोव्हज संघ 
वि. वि ब्लॅक हॉक्‍स 5-2: गोल्ड खुला दुहेरी – तन्मय आगाशे व सुंधाशू मेडशीकर वि.वि. ईशान तळवलकर व तन्मय चोभे 21-13, 21-17. सिल्व्हर खुला दुहेरी –करण पाटील व आकाश सूर्यवंशी वि.वि. अमित नाटेकर व अभिषेक ताम्हाणे 15-11, 15-11. गोल्ड मिश्र दुहेरी – ऋषी पूरिया व केदार भिडे वि.वि. अनिरुद्ध आपटे व मृदुल राठी 21-15, 21-4. सिल्व्हर मिश्र दुहेरी – गायत्री वर्तक व ऋत्विक गाडगीळ वि.वि. पल्लवी गोखले व कौस्तुभ वाळिंबे 15-4, 15-1. चिल्ड्रन्स मिश्र एकेरी – ईशान लागू वि.वि. आनंदिता गोडबोले 11-8, 11-6. सिल्व्हर खुला दुहेरी – संतोष पाटील व सचिन जोशी वि.वि. आलोक तेलंग व गोपाळ काणे 15-11, 15-13. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी – आनंद घाटे व रवी बापट पराभूत विरुद्ध विवेक जोशी व गिरीश करंबेळकर 20-21, 11-21. गोल्ड खुला दुहेरी – जयकांत वैद्य व अनिश रुईकर पराभूत विरुद्ध आदित्य काळे व राधिका इंगळहळीकर 10-21, 6-21. 

फाल्कन्स 
वि. वि ईगल्स 4-3:गोल्ड खुला दुहेरी – सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा वि.वि. आर्य देवधर व संग्राम पाटील 18-21,
21-17, 11-5, सिल्व्हर खुला दुहेरी – संदीप साठे व आशुतोष सोमण पराभूत विरुद्ध निनाद देशमुख व मंदार विंझे 14-15, 11-15, गोल्ड मिश्र दुहेरी – आदिती महाजन व रणजित पांडे वि.वि. दीपा खरे व मधुर इंगळहळीकर 21-9, 21-8. सिल्व्हर मिश्र दुहेरी – आनंद शहा व मेघना रानडे पराभूत विरुद्ध मिहीर पाळंदे व गोपिका किंजवडेकर 6-15, 8-15, चिल्ड्रन्स मिश्र एकेरी – आरूषी पांडे पराभूत विरुद्ध निखिल चितळे 4-11, 2-11. सिल्व्हर खुला दुहेरी – विनीत रुकारी व अमर श्रॉफ वि.वि. अजिंक्‍य मुठे व हरिष गलाणी 15-10, 15-7, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी – प्रवीण गुजर व आमोद प्रधान वि.वि. अविनाश भोसले व नितीन कोनकर 21-11, 21-20. गोल्ड खुला दुहेरी – सारंग आठवले व अद्वैत जोशी पराभूत विरुद्ध अमित देवधर व मकरंद चितळे 16-21, 12-21.

‘वनराई’ चा उपक्रम गुजरातमधील जिल्हा पंचायत शाळेचा करणार कायापालट

0
पुणे :‘वनराई’ पुणे च्या वतीने ‘शाळा नूतनीकरण आणि सुधारणा : मॉडेल स्कूल’ या प्रकल्पांतर्गत जिल्हा पंचायत शाळांतील सुधारणा व नूतणीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरूवात गुजरातमधील भरूच येथील जिल्हा पंचायत संचलित ’नवा पूनगाम प्राथमिक शाळे’पासून होणार आहे. बुधवार, दिनांक 27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. मिलिंद तलाठी (उत्पादन संचालक ‘एलांटास बेक इंडिया लि.’) यांच्या हस्ते आणि ’वनराई’चे प्रमुख रवींद्र धारिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती वनराई सीएसआर प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी दिली.
या प्रकल्पातंर्गत भरूच येथील जिल्हा पंचायत संचलित नवा पूनगाम प्राथमिक शाळेतील जेवणालयाची उभारणी व शेड घालणे, 8 वर्ग खोल्यांची सुधारणा, 2 वर्ग खोल्यांचेv​नव्याने ​बांधकाम, शाळेबाहेरील परिसरातील मोकळ्या अंगणात फरशी बसविणे अशा प्रकरची कामे करण्यात येणार आहेत.
’वनराई’चे मागील वर्षीपासून‘एलांटास बेक इंडिया लि.’बरोबर पुरंदर तालुकामधील भिवरी गावातील शाळांमध्ये नूतणीकरण, शाळांचा दर्जा सुधारण्याचे काम, शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, शौचालय बांधणी अशा प्रकारच्या सुधारणांचे काम करणे चालू आहे. सदरचा प्रकल्प तीन वषार्र्ंचा आहे. या प्रकल्पाच्या कामाची प्रगती पाहून ‘एलांटास बेक इंडिया लि.’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र कुमार यांनी ‘वनराई’ला गुजरातमध्ये हा प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन दिले. लोकांचा खासगी शाळांपेक्षा जिल्हा पंचायत शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जिल्हा पंचायत शाळांमध्ये मुक्तसंचार शिक्षणपद्धती असते. परंतु या शाळांमध्ये नूतणीकरण केल्यास, काही सुधारणा झाल्यास बघणार्‍यांची मानसिकता बदलून या शाळांचा दर्जा वाढण्यास मदत होईल, हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू आहे. या प्रकल्पाचा कालावधी 7 महिने इतका आहे.
भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुकाजवळील जिल्हा पंचायत संचलित ‘नवा पूनगाम प्राथमिक शाळा’ आहे. शाळा पहिली ते आठवी इयतेपर्यंत आहे. शाळेत एकूण 150 विद्यार्थी शिकत आहेत. ‘ऑईल अ‍ॅण्ड गॅस कार्पोरेशन लि.’ (गुजरात) मधील कामगारांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. काही मुलांची परिस्थिती अतिशय बेताची तर काहींची बरी अशा स्तरातील विद्यार्थी आहेत. शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, परंतु त्यांना योग्य सोयी-सुविधा मिळाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. गुजरातमधील एकूण 6 जिल्हा पंचायत शाळांचा सर्व्हे ‘वनराई’च्या वतीने करण्यात आला, त्यातील दोन शाळा या प्रकल्पासाठी निवड्यात आल्या आहेत. ‘नवा पूनगाम प्राथमिक शाळे’ पासून 27 सप्टेंबरपासून या प्रकल्पास प्रारंभ करण्यात येत आहे, असे जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ‘वनराई’चे रवींद्र धारिया, शिरीष डबीर (एव्हिपी एचआर, सचिव, एलांटास), सीमा अंकलकर (उपव्यवस्थापक), सुधीर मेकल (मुख्य वित्त अधिकारी, वनराई), प्रकाश जगताप (वनराई सीएसआर प्रकल्प संचालक), जिल्हा पंचायत प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, गोमीबेन वरसावा (नवा पुनगामच्या सरपंच), मदनभाई वरसावा (जिल्हा पंचायत सदस्य), भरतभाई पटेल (तालुका पंचायत सभापती, अंकलेश्वर) ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

एटलस कॉप्को इंडियाने पूर्ण केला 50 हजार लोकांना सुरक्षित पाणी पुरविणारा प्रकल्प

0

पुणे – महाराष्ट्रातील 50,000 नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा
करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याची घोषणा शाश्वत उत्पादने तयार करणारी जगातील
आघाडीची पुरवठादार कंपनी एटलस कॉप्कोने आज केली. कंपनीच्या कर्मचा-यांचा उत्स्फूर्त उपक्रम
असलेल्या वॉटर फॉर ऑल (सर्वांसाठी पाणी) अंतर्गत प्राधान्याचा सीएसआर प्रकल्प म्हणून
राज्यभरात राबवला जाणारा ‘जलदूत’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता.
‘वॉटर फॉर ऑल’चा महाराष्ट्रातील ‘जलदूत’ हा प्रकल्प प्रामुख्याने ‘सेवावर्धिनी’ या स्वयंसेवी संस्थेच्या
सहकार्याने आणि गावांत काम करणा-या आणखी काही स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन हाती घेण्यात
आला होता. पाणी व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतीचे आधी प्रशिक्षण घेऊन नंतर ते गावक-यांना
देण्यासाठी ‘जलदूत’ या उपक्रमामध्ये 25 गावांतील 40हून अधिक लोकांची निवड करण्यात आली
होती.
एटलस कॉप्को इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जिओव्हॅनी व्हॅलेन्ट म्हणाले, ‘गरजवंत क्षेत्राला स्वच्छ
आणि सुरक्षित पाणी पोहोचवणे हे एटलास कॉप्कोचे जगभरातील अतिशय जिव्हाळ्याचे उद्दिष्ट आहे.
‘जलदूत’ हा असा उपक्रम आहे, ज्याचा गरजू लोकांना पाणीपुरवठा करण्याबरोबरच शेतीसाठी
मान्सूनवरील अतिअवलंबित्व कमी करण्याचा उद्देश आहे. हा प्रकल्प पूर्ण होत असल्याची घोषणा या
जलदूतांच्या उपस्थितीत करणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे.’
हा प्रकल्प महाराष्ट्रात अडीच वर्षे राबवला गेला आणि त्यासाठी एटलस कॉप्को आणि कंपनीच्या
कर्मचा-यांनी सव्वादोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली. राज्यातील दुष्काळप्रवण भागांतील
50 हजारांहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. स्थानिक लोकांना पाणी
व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे हे याचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते.
प्रकल्पात सहभागी व्यक्ती अर्थात जलदूतांनी सहभाग संसाधन सर्वेक्षणे करून त्यांच्या गावांचे
तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार केले. त्यानंतर प्रत्यक्षात होऊ शकतील, अशी 24 कामे निश्चित
करून ती पूर्ण केली गेली. त्यामध्ये जलसंवर्धनासाठी प्रयत्न, सलग समतल चर, जलशोषण चर,
गॅबियन बंधारे, बंधारे दुरुस्ती आणि नवीन सिमेंट बंधारे बांधणे आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी
साठवण टाक्या आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश होता.

महालक्ष्मी मंदिर सारसबाग हजारो विद्यार्थ्यांचे सामूहिक श्री सूक्त व अथर्वशीर्षपठण

0

पुणे– आज शुक्रवारी सकाळच्या मंगलमय वातावरणात शंखाच्या आकाशात उमटणारा नाद … ढोल ताशाच्या गजरात विध्यार्थ्यांच्या मुखातून उमटत असलेल्या श्री सुक्त व अथर्वशीर्ष पठणाच्या नादस्वरात वातावरण पवित्रमय झाले होते. आज शुक्रवारी सकाळी विविध शाळांमधील हजारो विध्यार्थ्यानी श्री सूक्त व अथर्वशीर्ष पठण सामूहिकरीत्या म्हटले.
श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग नवरात्रोत्सव तर्फे आज सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक पठणाने गुंफली . आज सकाळी पावसाच्या शक्यतेने हा कार्यक्रम मंदिरासमोरील रस्त्याऐवजी पुणे महापालिकेच्या गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते,
आज पहाटे ५. ३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांचा समूह गटागटाने कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. विध्यर्थ्यांच्या गर्दीने संपूर्ण सभागृह भरभरून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वरूपवर्धिनी च्या ढोल पथकाने आपल्या ढोल-ताशांच्या दणदणाटाने सभागृह दणाणून सोडले. त्यापाठोपाठ मधुकर सिधये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंखनादाने सभागृह एका वेगळ्या आनंदात न्हाऊन निघाले. शंखांनादाच्या ध्वनीत सादर केलेल्या प्रार्थनेस सर्वानी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
शंखनादानन्तर गणेश स्तवन , ओंकार वंदनेने भक्तमय वातावरण निर्माण केले. त्यापाठोपाठ गायत्री मंत्राचे पठण , अथर्वशीर्ष पठण , बी श्री सूक्त पठण विध्यार्थ्यानी सामुथिरीत्या सादर करून एक भक्तिमय वातावरणाचा आनन्द सर्व उपस्थितांना दिला. यानंतर गणरायाच्या आरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
. याप्रसंगी पुणे या कार्यक्रमास पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आनन्द करमळकर , पुण्याच्या महापौर सौ मुक्त टिळक , प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे , प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री भाग्यश्री संकपाळ, प्रसिद्ध गायिका मुग्धा वेशनपायन , अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, महालक्ष्मी मंदिरचे मुख्य संस्थापक विश्व्स्त राजकुमार अगरवाल , मुख्य विश्वस्त अमिता अग्रवाल , विशवस्त प्रताप परदेशी,भारत अगरवाल , तृप्ती अगरवाल , प्रसिद्ध उद्योगपती कृष्णकुमार गोयल, त्यांच्या पत्नी राजमाला गोयल, बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या मुलांच्या, पाठांतराबरोबरच त्यांच्या निरोगीपणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू करमळकर , अभिनेते आगाशे , श्रोत्री आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक भारत अगरवाल व प्रताप परदेशी यांनी उपस्थिठांचे आभार मानले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

0

 

विषयांचे वैविध्य असलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. ‘Thank U विठ्ठला’ या हटके शीर्षकाचा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांच आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ‘Thank U विठ्ठला चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा पहाता येईल.

महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. संगीत रोहन – रोहन तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.

नेताजी विमान अपघातात वारले? …अनुज धर यांचे व्याख्यान

0

पुणे: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला यावर अजुनही बहुसंख्य भारतीयांचा विश्वास नाही. कारण त्या विमान कथित अपघाताच्या ज्या बातम्या प्रसृत झाल्या आहेत त्याच संशयाचे धुके निर्माण करतात. नेताजी त्या विमान अपघातात मरण पावले नसून ते सुरक्षितपणे सटकून अन्यत्र कोठेतरी गेले असावेत हे गृहित धरून त्या दिशेने अनेक संशोधकांनी शोधमोहिम राबवली आहे. त्यात मिशन नेताजीचे अनुज धर हे विख्यात पत्रकार व लेखक आघाडीवर आहेत. त्यांचे पुण्यामधे नेताजींच्या मृत्युच्या रहस्यावर शनिवार दि. २३ सप्टेंबर १७ रोजी सकाळी दहा वाजता रेंजहिल येथील सिम्बॉयोसिस इंस्टिट्युटच्या सभागृहात मिशन नेताजी तर्फे श्री. लोकनाथ राव यांनी व्याख्यान आयोजित केले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या या रहस्यमयी मृत्युबाबत श्री. धर यांचे संशोधन ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची पुणेकरांसाठी ही मोठी संधी आहे.

अनुज धर यांनी या विषयाला वाहिलेले अनेक पुस्तकेही लिहिली असून त्यावर वादळी चर्चा होत असते. नेताजींबद्दलच्या गोपनीय फाइल्स खुल्या करण्याचे काम सरकारने सुरु केले त्यात अनुज धर यांचा मोठा वाटा होता. फैजाबाद येथे १९८५ साली मरण पावलेले गुमनामी बाबा भगवानजी म्हणजेच नेताजी असून १४ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर १९४५ या काळात मात्सुयामा विमानतळावर कोणताही विमान अपघात झाला नसल्याचे माहिती तैवान सरकारने श्री. धर यांना दिली होती. यामुले त्यांच्या दाव्यांना बळ मिळते. या व्याख्यानाद्वारे यामागील सर्व रहस्य उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे या व्याख्यानाचे आयोजक लोकनाथ राव यांनी सांगितले. या अभ्यासपुर्ण व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक पुणेकरांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यातील बंगाली समाजाचा ‘दुर्गोत्सव’ २५ सप्टेंबरपासून हडपसरमध्ये

0

पुणे : बंगाली समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘पूर्बो पूना सर्बजनीन दुर्गोत्सव २०१७

​’चे आयोजन दि. २५ सप्टेंबरपासून हडपसरच्या भोसले गार्डन येथे करण्यात आले आहे.

पारंपरिक बंगाली पद्धतीचा दुर्गोत्सव आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे या ६ दिवसीय उत्सवाचे स्वरूप आहे. २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान हा उत्सव होणार आहे, अशी माहिती आयोजक संस्था ‘पूना बांगो सन्मिलनी’ आणि ‘पूर्बो पूना कालिबारी समिती’ च्या वतीने ‘दुर्गोत्सव समिती’चे अध्यक्ष सुबीर बिस्वास,सचिव

अ​भिजित डे
​आणि खजिनदार सौरभ बसाक यांनी दिली. या उत्सवाचे हे १५ वे वर्ष आहे.
दुर्गामातेच्या भव्य प्रतिमेचे २५ सप्टेंबर रोजी भोसले गार्डन मैदानातील मांडवात पूजन करण्यात येणार आहे. कुमारी पूजा, संधी पूजा, सिंदूर दान, भोग प्रसाद, पुष्पांजली असे पारंपरिक बंगाली कार्यक्रम या उत्सवात होणार आहेत.

महागाई विरोधात पुणे कॉंग्रेस आक्रमक (व्हिडीओ)

0


पुणे-शहर कॉंग्रेस च्या वतीने आज लष्कर परिसरातील म.गांधी रस्त्यावरील कोहिनूर चौकात महागाई विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली . शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात  कॉंग्रेसचे ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने येथे मोठा पोल्स बंदोबस्त ठेवण्यात आला होता . राज्य राखीव दलाच्या जवानांची तैनात आणि अनेक पोलीस अधिकारी यांच्या गर्दीत हि मोठ्या संख्येने आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तेवढीच जोरदार निदर्शने केली .माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड ,म.वि .अकोलकर, कॉंग्रेसचे महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे,अविनाश बागवे, चांदबी नदाफ, रशीद शेख ,रफिक शेख,विठ्ठल थोरात,राजूशेठ डांगी, अजित दरेकर ,मनीष आनंद ,हाजी नदाफ ,सुरेखा खंडागळे ,हसन कुरेशी,प्रदीप परदेशी,उस्मान तांबोळी ,सादिक कुरेशी,मंजूर शेख ,नरुद्दीन सोमजी ,माल्मिक जगताप ,मधुकर चांदणे ,रमेश सकट,शानी नौशाद आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .पहा या आंदोलनाची एक व्हिडीओ झलक …

महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी जेसीबीने तोडली- वीजपुरवठा विस्कळीत

0

पुणे : दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने साफसफाई करताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणचे 132 केव्ही जीआयएस तसेच महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ व इतर सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट आदी परिसरातील वीजपुरवठा गुरुवारी (दि. 21) दुपारी अडीचच्या सुमारास विस्कळीत झाला व त्याचा सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसला आहे.

दरम्यान, महावितरणकडून इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तथापि 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने या सर्व परिसरात पुढील दोन दिवस नाईलाजास्तव 3 ते 4 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार  आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वीजवाहिनीद्वारे रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. या उपकेंद्रातील आऊटगोंईंग वाहिन्यांद्वारे महावितरणच्या सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई, लुल्लानगर, गुलटेकडी व रास्तापेठ या सहा उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु बुधवारी (दि. 20) रात्री दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याची जेसीबीने सुरु असलेल्या साफसफाईच्या कामात सिमेंटचे काॅक्रीट उखडण्यात आले व महापारेषणच्या भूमिगत वीजवाहिनीचे नुकसान झाले. त्यानंतर रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे वाहिनीमध्ये आर्द्रता वाढली व आज दुपारी अडीचच्या सुमारास या भूमिगत वाहिनीचा स्फोट झाला. त्यामुळे महापारेषणच्या रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रांतून महावितरणच्या 6 उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, बुधवार पेठ, नवीपेठ, सदाशिव पेठ, गंजपेठ यासह सर्व पेठा, लुल्लानगर, कोंढवा, कॅम्प, गुलटेकडी, मंडई, मुकुंदनगर, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, रहेजा गार्डन, सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, स्वारगेट,  जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही परिसर, पर्वती आदी परिसरातील सुमारे अडीच लाख ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.

महावितरणच्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद असल्याने सुमारे 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून या संबंधीत परिसरातील सर्व वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु झाले आहेत. इतर उपकेंद्रांमधून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने काही परिसरांमध्ये नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीचे भारनियमन सुरु करण्यात आले आहे. खोदकामात नादुरुस्त झालेली महापारेषणची वीजवाहिनी विशिष्ट प्रकारची आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा जाईंट चेन्नई येथून विमानाने मागविण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 22) या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापारेषणकडून सुरु होईल.

महापारेषणच्या या भूमिगत वाहिनीच्या दुरुस्ती कामास तसेच बंद पडलेले 132 केव्ही जीआयएस व इतर सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजपुरवठा विस्कळीत झालेल्या सर्व परिसरात महावितरण नाईलाजास्तव आपात्कालिन परिस्थितीमुळे 3 ते 4 तासांचे चक्राकार भारनियमन करावे लागणार आहे.  भारनियमन टाळण्याचा किंवा त्याचा कालावधी कमीतकमी राहील असा प्रयत्न महावितरणकडून सुरु आहे. या कालावधीत सर्व वीजग्राहकांनी विजेचा वापर आवश्यकतेनुसार व कमीतकमी करावा तसेच उद्योग किंवा व्यावसायिकांनी विजेएेवजी शक्य असल्यास जनरेटरचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे. विजेच्या कमीतकमी वापराने महावितरणला विजेचे भारव्यवस्थापन शक्य होईल व विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच नाईलाजास्तव करण्यात येत असलेल्या तात्पुरत्या चक्राकार भारनियमनासाठी महावितरण दिलगीर असून या आपात्कालिन परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महालक्ष्मी मंदिरात आचार्य किशोर व्यास यांच्या हस्ते घटस्थापना

0


पुणे-जय माता दी, उदे गं अंबे उदे अशा जयघोषात आणि मंगलमय वातावरणात पुणे शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. तर नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची प्राणप्रतिष्ठापना करून शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ केला.
सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात श्री गोविंद गिरीराजजी महाराज (आचार्य किशोर व्यास) यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी संस्कार चॅनेलचे प्रमुख कृष्णकुमारजी पित्ती, मंदिराचे विश्वस्त राजकुमार अग्रवाल आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी भाविकांनी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

नवरात्रीमध्ये आली राणी पद्मावती!

0

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटाचा फस्ट लूक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळालाय. वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि भन्साली प्रोडक्शन्सच्या पद्मावती सिनेमाचे पहिले पोस्टर 21 सप्टेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रिविल झालंय.

संपूर्ण देशभरात एकिकडे नवरात्रीची घटस्थापना होत असतानाच भन्सालींच्या राणी पद्मावतीचे रूप सर्वांसमोर आलंय. पद्मावती फिल्म भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या कर्तृत्वाचं प्रतिक आहे. त्यामूळे नवरात्रीला देवीच्या स्थापनेच्या शुभ प्रसंगी ह्या चित्रपटाचा फस्ट लूक अनविल झाला आहे.

पद्मावती चित्रपटात आजपर्यंत कधीही न अनुभवलेली दृश्यात्मक अभिव्यक्ती पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव हे पद्मावती चित्रपटाचे वैशिष्ठ्य असेल.

संजय लीला भन्साली ह्याविषयी सांगतात, “राणी पद्मावतीची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या चित्रपटाचा फस्ट लूक घेऊन आम्ही आलोय. आणि नवरात्रौत्सव साजरा करतोय.”