Home Blog Page 3272

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 28 : केंद्र शासनाने 1 जानेवारी, 2016 पासुन बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदर्श नियमावली सप्टेंबर 2016 पासून देशभरात लागू केली आहे. या कायद्याच्या कलम 41(1) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था यांनी शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील, अशा अवैध संस्थांवर या कायद्याच्या कलम 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमाअंतर्गत कमाल 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व रु 1 लाखापर्यंत दंड अथवा दोन्हीची तरतुद करण्यात आली आहे.

बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील कलम 41  अनुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव आदर्श नियमावलीच्या परिशिष्ठ 27 मध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, 103, शिवाजीनगर, चुनावाला चेंबर्स, जुना तोफखाना, पुणे-05 या पत्त्यावर 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांच्या दुरध्वनी क्र. 020-25536871 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

लवकरच मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : मेट्रोच्या पुण्यातील कामाला आजपासून प्रत्यक्ष  सुरुवात झाली असून लवकरात लवकर मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. वनाज ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोच्या कामाचे आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमीपूजन होवून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.  यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधाताई कुलकर्णी, आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गटनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार,यांच्यासह नगरसेवक, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पुणे मेट्रोला परवानगी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. मात्र भूसंपादन, मेट्रो स्टेशनची जागा, मेट्रोचे मार्ग ठरवणे,कामाचा आराखडा तयार करणे  यासारख्या तांत्रिक बाबींमुळे मेट्रोच्या कामाला सुरुवात होण्यास कालीवधी लागला. मात्र सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून आज मेट्रोच्या कामाला पुणे शहरात प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत आहे. आता वेगाने काम होऊन २०२१ पर्यंत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल.

या कामासाठी रस्त्यावरील ९ मीटर जागा लागणार असून रस्त्याच्या दुतर्फा हे काम सुरु राहणार आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी येथे स्वतंत्र वाहतूक पोलीस तसेच मेट्रोचे वॉर्डन नेमण्यात येणार आहे. या ठिकाणी फक्त पिलर वरती येवू पर्यंत वाहन पार्किंग करता येणार नाही. तो पर्यंत थोडासा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. शिवाजीनगर येथील धान्याच्या गोदामाची जागा मेट्रोच्या ताब्यात मिळाली असून तेथील अन्न धान्य दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. मेट्रोच्या कामाबद्दल नागरिकांच्या सूचना मिळाव्यात त्यांच्या काही शंका असतील तर त्यांचे निरसन व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत, असेही बापट यांनी सांगितले.

वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

पुणे दि, 28 : ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. वन्यजीवाविषयी अधिक प्रमाणात जनजागृती होण्याच्या उद्देशाने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे  1ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) डॉ.दिनेश त्यागी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) के.पी.सिंग, उप वनसंरक्षक  रंगनाथ नाईकडे, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) नेचरवॉक चॅरिटेबल ट्रस्टचे पुष्कर चौबळ, बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर, अनुज खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राजस्थान येथील सरिस्का व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गोविंदसागर भारद्वाज यांचे “वन्यप्राणी व अधिवास संवर्धन ” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा अधिकाधिक वन्यजीव  प्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय वनाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन वृत्तपत्र विक्रेता संघाच्या हस्ते होणार …

0
पुणे ः‘पुणेकरांनी पुणेकरांवर काढलेला दिवाळी अंक’ अशी ख्याती असलेल्या ‘पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही माहिती दिली. वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे तसेच राम दहाळ, प्रशांत गणपुले, चिंतू पवार, चैतन्य खरे यांना ‘पुण्यभूषण 2017’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा मान देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात या अंकाचे प्रकाशन होणार असून, ‘प्रवीण मसाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया, कमला चोरडिया, अशोक गोडसे (श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष ), महेश सूर्यवंशी (कोषाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती या प्रकाशन कार्यक्रमाला असणार आहे.
मागील वर्षी सिटी पोस्ट ऑफिसमध्ये प्रकाशन समारंभ झाला होता. दिवाळी अंकाचे वितरण पोस्टाद्वारे करणार्‍या पोस्टमन काकांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. त्यापूर्वी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेल्या ‘पक्क्या’ पुणेकरांच्या हस्ते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. प्रकाशन समारंभातील कल्पकता राखत आणि गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वषार्र्चे औचित्य साधून यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ‘पुण्यभूषण 2017’ दिवाळी अंकाचे प्रकाशन होत आहे.
पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुणेकरांनी पुणेकरांसाठी ’दिवाळी अंक’ काढण्याची संकल्पना ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ने प्रत्यक्षात आणली. या अंकाला दरवर्षी दर्जेदार अंकांसाठी अनेक पारितोषिके मिळत असतात, अशी माहिती डॉ. सतीश देसाई यांनी दिली.

माधुरी भादुरी यांच्या सोलो शो ‘कॅनव्हास अँड बियॉंड’चे अनावरण

0
पुण्यातील स्टुडिओ-एम मध्ये होणार आयोजन
पुणे: पुण्याच्या माधुरी भादुरी गेल्या चार दशकांपासून एक विख्यात कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे काम भारतातील आणि परदेशातील 36 पेक्षा जास्त सोलो आणि 72 ग्रुप प्रदर्शनांद्वारे प्रदर्शित केले गेले आहे. कलेची जाण असलेल्या विवेकी व्यक्तींच्या कला संकलनाचा त्या भाग बनल्या आहे.
माधुरी भादुरी यांनी पुण्यातील ‘स्टुडिओ-एम’ या त्यांच्या स्टुडिओमध्ये ‘कॅनव्हास अँड बियॉंड या शोचे अनावरण केले. या शो मध्ये रिफ्लेक्शन, होरायझोन व ग्लिम्प्स सारख्या श्रेणींमधील माधुरी यांच्या कलाकृती संकलित करून प्रदर्शित केल्या होत्या. या विशेष प्रसंगी सुमनताई किर्लोस्कर, ज्योती अगरवाल, अल्पना किर्लोस्कर, सुनीता कल्याणी, संध्या व अमोल पालेकर सारख्या दिग्गजांनी उपस्थिती लावून दीपप्रज्वलन केले.
माधुरी यांची रिफ्लेक्शन सिरीज ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट क्लोड मोने यांच्या वॉटर लिलीजची आठवण करून देणारी आहे. पाऊस आणि पाणी वापरून कलाकाराने संशोधनासाठी घेतलेल्या मेहनतीला दर्शविते. या सिरीज मध्ये प्रकाश आणि सावलीच्या विस्मयकारक परस्परक्रियातील क्षणभंगूर, क्षणिक आणि प्रभाववादी गुण दर्शविणारी आहे. शहरातील आयुष्याचे मोहक पैलुंवर प्रकाश टाकणारी होरायझोन सिरीज त्यांच्या रिफ्लेक्शन सिरीज सारखीच खूप प्रभावशाली आहे. शहरातील विविध रंग व छटा उलगडणारी ही सिरीज थोडी अवास्तविक वाटली तरी नयनरम्य नक्कीच आहे.
धातूच्या टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या कलाकृती ज्यांना माधुरी असेम्ब्लेजेस असे संबोधतात व  झोपड्यांच्या छतांचा पॅचवर्क देखील त्यांनी प्रदर्शित केले आहे. ह्या प्रदर्शनात द एम्बर्स सिरीज मधील अत्यंत सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं नाइट लॅम्प, झूमर, टेबल लॅम्प व टी- लाइट होल्डरचे अद्वितीय नमुने झळकत होते.
माधुरी यांनी द मायरड्स कलेक्शन मधील सॅटिन, सिल्क कुशन व टेबल मॅट्स खूप विशिष्ट व आधुनिक पद्धतीने डिझाइन केल्या आहेत. त्यांनी रंगविलेले म्युसिंग्स सिरीज म्हणजेच स्टँडअलोन फायबर कास्ट स्कल्पचर देखील अत्यंत मोहक आहेत. अत्यंत सुंदर खुर्च्या व कॉफी टेबल असलेली मिलांज सिरीज सुद्धा देखणी आहे. मेटॅलिक सीरीजमधील अत्यंत सुंदर आणि बोलके म्युरल, खुर्च्या व फिगरीन्स सहज लक्ष वेधून घेतात.
रिफाईंड इम्प्रेशनिस्टिक लँडस्केप हा माधुरी यांचा ट्रेडमार्क बनला आहे. त्यांचा आजवरचा प्रवास फक्त कलाकार म्हणूनच नाही तर एक परिपूर्णतावादी म्हणूनही राहिलेला आहे. माधुरी यांच्या मते कला हा एक सुंदर अनुभव आहे.

लिप सिंग बॅटल मध्ये शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुखने केला झिंगाट डान्स !

0

निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या स्टार प्लस वर ‘लिप सिंग बॅटल’ हा रिएलिटी शो होस्ट करतेय. ह्या शोसाठी बॉलीवूडच्या मोठ-मोठ्या सेलिब्रिटींची हजेरी शोवर लागलेली आहे. नुकतीच ह्या आगळ्या-वेगळ्या रिएलिटी शोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुखने हजेरी लावली होती. इथे येऊऩ शिल्पा आणि रितेशने आपल्या खास अंदाजात झिंगाट डान्स करून खूप धमाल उडवली. आणि शो अधिकच मनोरंजक झाला.

शोमधल्या सूत्रांनुसार, झिंगाट गाण्यावर डान्स केल्यावर रितेश देशमुखने लिप सिंग बॅटलचं चॅलेंज घेत, मिथुन चक्रवर्तींच्या ‘जीते हम शान से’ चित्रपटातल्या ‘जुली जुली’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला. मिथुनदाच्या गेटअपमध्ये मिथुनदा स्टाइलमध्ये परफॉर्म करून रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकली.

एवढंच नाही, तर शिल्पा शेट्टीनेही लिप सिंग बॅटलचे चॅलेंज घेत, अमिताभ बच्चन ह्यांचा गेटअप केला. आणि बिग बींच्या ‘हम’ चित्रपटातल्या लोकप्रिय ‘जुम्मा चुम्मा दे दे’ ह्या गाण्यावर परफॉर्म केले. शिल्पा शेट्टी महानायक अमिताभ बच्चन स्टाइलमध्ये डान्स करत असतानाच फराह खान बनली किमी काटकर. आणि दोघींनी मिळून ह्या ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावर परफॉर्म करून धमाल उडवून दिली. त्यामुळेच आता हा शो जेव्हा टीव्ही वर प्रेक्षिपत होईल, तेव्हा नक्कीच लोकांना हा शो पाहताना खूप मजा येईलं.

वेजल मानकर ,अर्जुन कढे,प्रभाताई नेने “कोथरूड भुषण” पुरस्काराने सन्मानित.

0

 

पुणे-क्रीएटिव्ह फौंडेशन आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात आज विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणारयांचा कोथरूड भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.भाजप चे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले,पिंपरी चिंचवड चे भाजप अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणारायाना सन्मानित करण्यात आले.यावेळी महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके,उमेश भेलके,मंदार बलकवडे उपस्थित होते.
अर्जुन कढे याने टेनिस मधे अंडर १४ आणि अंडर १७ यात देशाचे प्रतिनिधित्व केले असून विंबल्डन,ऑस्ट्रेलियन ओपन,फ्रेंच ओपन अशा सर्व ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत यश मिळविले आहे,तर श्वेजल मानकर याने स्विमिंग मधे तब्बल ११०० पदक मिळविले असून त्याने नुकताच वीरधवल खाडे चा विक्रम मोडून सुवर्णपदक मिळविले आहे,हे दोघेही केवळ कोथरूड चे भूषण नसून देशाचे भूषण आहेत आणि ते या दोन्ही क्रीडाप्रकारात देशाचे नाव मोठे करतील अशी खात्री वाटते असे गौरवोद्गार योगेशजी गोगावले यांनी काढले.तसेच पुणे शहर भाजप च्या वतीने महिलांच्या स्वयंरोजगारावर भर देण्यात येणार असून त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहोत असे ही गोगावले म्हणाले.
पिंपरी चिंचवड मधे मिळविलेली सत्ता ही माझ्या एकटया मुळे मिळालेले यश नसून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कष्टाने हे यश साध्य झाले आहे असे सांगून ” मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितार्थ करणार असून त्याद्वारे पिंपरी चिंचवडचा कायापालट करुन दाखवु आणि भ्रष्टाचार मुक्त काम कसे असते हे दाखवून देउ असे आ लक्ष्मणभाउ जगताप म्हणाले.असे महोत्सव हे आवश्यक असून याद्वारे नागरिकांची सांस्कृतिक भूक पूर्ण होते असेही ते म्हणाले.
या वेळी वयाच्या ऐंशीव्या वर्षी चौकान्मधे आणि शाळांसमोर वाहतूक नियमन करणारया प्रभाताई नेने यांना ही कोथरूड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच मराठा क्रांती मोर्चा च्या वेळी पुणे ते मुंबई रिव्हर्स गियर मधे गाडी चालविणारे आणि आता देशाची परिक्रमा रिव्हर्स गियर मधे करण्याच्या प्रयत्नात असलेले संतोष राजेशिर्के आणि फुटबॉल या खेळात प्रावीण्य मिळविणारी वैष्णवी राजेश बराटे यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका अल्पना वर्पे ,डॉ श्रद्धा मराठे पाठक,स्वप्नाली सायकर,छाया मारणे आणि हर्षाली माथवड या नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत केले मंदार बलकवडे यांनी आभार मानले.

केंद्र शासनाच्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

0

  पुणे, दि. 27: आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2018 चे औचित्य साधून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी दि. 29 सप्टेंबर 2017 पर्यंत नामांकन प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे या कार्यालयास पाठवावेत.

पुरस्काराबाबतची माहिती केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे कार्यालय, 103, शिवाजीनगर, चुनावाला चेंबर्स, जुना तोफखाना, पुणे-411005, दुरध्वनी क्रमांक-020-25536871 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

गांधी जयंती रोजी दिल्ली मध्ये आयोजीत गोलमेज परिषदेमध्ये रामजन्मभूमी – बाबरी मस्जिद च्या समस्येवर चर्चेतून मार्ग काढण्यासाठीचे प्रयत्न.

0

पुणे, २७ सप्टेंबर : ‘आयोध्या येथील रामजन्मभूमी व बाबरी मश्जिद च्या विवादास्पद समस्येला आंतरधर्मीय संवादाच्या माध्यमातून सोडविणे आवश्यक’ या विषयाला अनुसरून डॉ. विश्‍वनाथ कराड एमआइटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी तर्फे गांधी जयंतीचे (2 आक्टोबर ) औचित्य साधून नवी दिल्ली येथे एक दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व नामांकित व्यक्ती या परिषदेमध्ये सहभागी होणार असून या विषयावर योग्य ते समाधान शोधण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड व कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दिल्लीमध्ये आयोजीत या पत्रकार परिषदेस नालंदा युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. विजय भटकर , अयोध्या रामजन्मभूमी चे पूर्वाध्यक्ष व माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती, वरिष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, भारतीय जनता पक्षाचे राष्टृईय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, माजी केंद्रीयमंत्री आरिफ मोहम्मद खान, नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, सांची विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. यज्ञेश्वर शास्त्री, मुस्लीम विचारवंत शेख बशीर अहमद बियाबानी, ज्यू विचारवंत इजिकेल आएजॅक मळेकर, आदी विचारवंत सहभागी होतील.
या परिषदेमध्ये हिंदू धर्मियांसोबतच इतरही धर्मीयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न करून योग्य तो मार्ग काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. रामजन्मभूमीच्या त्या विवादास्पद जागी राममंदिरासोबतच इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे देखील निर्माण केली जावीत.
यावेळी मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे, डॉ. सुभाष आवळे, डा. महेश आबाळे उपस्थित होते.

गर्ल्स हॉस्टेल च्या मुलींची नऊ रंगाची नवलाई

0

नवरात्रीचा सण आपण स्त्रीशक्तीचं प्रतिक म्हणून साजरा करतो. घटस्थापना ते दस-यापर्यंत सर्वत्र धामधूम असते ती देवीच्या जागराची. सुख, समृद्धी आणि मांगल्याच्या या सणात अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात केली जाते. झी युवावरील गर्ल्स हॉस्टेल या हॉरर मालिकेतील सारा, प्रियांका, तन्वी , मालती , वल्लरी , ध्यानलक्ष्मी , सागरिका , नेहा , बिना  आणि वनिता  या मुलींनीही आणि त्याचप्रमाणे त्यांची रेक्टर दुर्गा यांनी त्याच्या रोजच्या गडबडीच्या शेड्युल मधून वेळ काढत नऊ रंगाच्या साड्यांमध्ये फोटोशूट केले . आजचा दिवस माझा या कल्पनेने प्रेरीत होत ९ रंगाची उधळण करत आणि त्याच बरोबर इतर सुंदर रंग त्यात आणत गर्ल्स होस्टेलच्या मुलींनी फोटोशूटची धमाल अनुभवली. सध्या मालिकेत नेहा च्या मिसिंग केस बद्दल चौकशी सुरु असून पोलिसांना एक बॉडी सापडली आहे. गर्ल्स हॉस्टेल ही मालिका सोमवार ते शुक्रवार रोज रात्री १० वाजता झी युवावर पाहायला मिळेल.

पुण्यातील भांडणाबत कल्पना नाही..राणेंच्या पक्ष प्रवेशासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेऊ – रावसाहेब दानवे

0

पुणे – पुण्यात निवडणुकीपूर्वी सिंहगडावर सर्व पदाधिकारी स्थानिक नेते आणि उमेदवारांना नेवून तिथे शपथ घेणारे ,तसेच निवडणुकीच्या काळात भाजपच्या कार्यालयाचे सर्वांना समवेत घेवून उद्घाटन करणारे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मात्र पुण्यातील पक्षांतर्गत भांडणावर बोलणे टाळले ,पुण्यातील भांड्नाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगितले … तर नारायण राणे आणि अमित शाह यांची दिल्ली येथे माझ्या निवासस्थानीच भेट झाली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभाची निमंत्रण पत्रिका दिली. तसेच त्यावेळी राणे यांच्या भाजपप्रवेशाची राजकीय चर्चाही झाली आहे. मात्र, राणेंच्या पक्षप्रवेशासंबंधीचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू, अशी माहिती दानवे यांनी दिली.
भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने दानवे बुधवारी पुण्यात आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
दानवे पुढे म्हणाले, आंदोलन करणे, मोर्चे काढणे राजकीय पक्षांचे कामच असते. त्यामुळे राज्यात निघत असलेले मोर्चे म्हणजे सरकारविरोधी जनतेत असंतोषाचे वातावरण आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच सरकार म्हणून शिवसेना आणि भाजप उत्तमप्रकारे काम करत आहेत. राजकीय पक्ष म्हणून शिवसेना मोर्चे काढत असेल तर तो पक्ष वाढविण्याचा एक भाग आहे. मराठा मोर्चा आणि कर्जमाफी यानंतर आम्ही सर्वे घेतला आहे, यात पक्षाला पोषक वातावरण असल्याची प्रतिक्रीया दानवे यांनी दिली.

पुण्यातील भांडणाबत कल्पना नाही..

पुणे भाजपमध्ये नवे आणि जुना असा वाद सुरू आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना निवृत्त करावे असे संघाचे धोरण असल्याची माहिती संजय काकडे यांनी दिली होती. यावर विचारले असता, याबाबत मला काहीच माहित नाही. अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी बोलण्याच्या ओघात भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बावळट म्हणून ऑगस्ट महिन्यात संभावना केली होती. दानवे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्या वक्तव्याचे पडसाद उमटले.”या वक्तव्याची प्रदेश भाजपने काही दखल घेतली का,’ अशी पत्रकारांनी दानवे यांना विचारणा केली. त्यावर “हे वक्तव्य मी ऐकले नाही आणि वाचलेही नाही’ असे उत्तरे दानवे यांनी दिले. त्यावर हशा पसरला अन्‌ पालकमंत्री गिरीश बापट तुम्हाला शहरातील काही माहिती देत नाहीत का,’ असे पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर बापट आणि दानवे दोघांनीही हसून प्रश्‍नाचे उत्तर टाळले. मात्र, टीव्ही चॅनेल, फेसबुक, व्हॉटस ऍप आदी माध्यमांवरही सहयोगी खासदारांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले ते समजले नाही का असाही प्रश्‍न दानवे यांना विचारण्यात आला.पक्ष किंवा त्यातील लोकप्रतिनिधींबद्दल शेरेबाजी करू नये, अशी किमान समज तरी पक्षाने खासदार काकडे यांना दिली का, असे विचारले असता, दानवे यांचा धरून ठेवलेला पेशन्स संपला… “अन्‌ आता मी खरं बोलू का’ असे त्यांनी म्हटले. त्यामुळे पत्रकारांचे कान टवकरले गेले. परंतु, क्षणभर पसरलेल्या शांततेचे गांभीर्य लक्षात आल्यावर दानवे यांनी विषयला बगला दिली आणि हसतमुख चेहरा दुसऱ्या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी सज्ज केला.पत्रकार परिषदेनंतरही संजय काकडे यांच्याबाबत दानवे यांनी बाळगलेले बोलके मौन हा उपस्थित नेत्यांत चर्चेचा विषय झाला होता

लता मंगेशकर यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त ८८ ​​ ज्येष्ठ नागरिकांना ‘ स्वरलता’ पुस्तकांची भेट पुण्यातील युवा लेखकाचा उपक्रम !

0

पुणे :गानसम्राज्ञी  लता मंगेशकर यांच्या ८ ८ व्या  वाढदिवसानिमित्त ८८ ज्येष्ठ नागरिकांना ‘स्वरलता ‘ पुस्तकांची भेट देण्यात आली !पुण्यातील  रिदम वाघोलीकर या युवा लेखकाने हा उपक्रम दीदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे  २७ सप्टेबर ,बुधवारी सायंकाळी केला.

महिला हिंदू अनाथाश्रम, निवारा, मातोश्री वृध्दाश्रम या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना , अनाथ महिलांना ‘ स्वरलता ‘ या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या.

हे अनोखे पुस्तक ग्रामोफोन डिस्कच्या आकारातील पहिले पुस्तक असून त्यात संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे लेख आहेत. रिदम वाघोलीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून रचना खडीकर -शहा अतिथी संपादक आहेत. लतादीदींच्या हस्तेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.

रिदम वाघोलीकर यांच्यासमवेत सुधीर वाघोलीकर, आशय वाघोलीकर, अनु वाघोलीकर, प्रतिक रोकडे आणि चैतन्य येरवडेकर  हे देखील या उपक्रमात सहभागी झाले.

‘ लता मंगेशकर हे श्रद्धास्थान आहे.कलाकार म्हणून अद्वितिय, अलौकिक आहेत. त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करावा, अशी इच्छा त्यांचा चाहता म्हणून होती. या इच्छेपोटी  ज्येष्ठांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम केला. सर्वच जण त्यामुळे खूप आनंदित झाले .लतादीदींच्या पुस्तकातील वाचनाने आनंद मिळावा हा उद्देश सफल झाला’ असे रिदम वाघोलीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

उद्या २८ रोजी  ‘आभाळमाया ‘ वृध्दाश्रम सिंहगड रस्ता येथे  सकाळी साडेदहा वाजता या पुस्तकांचे ज्येष्ठांना वाटप करण्यात येणार आहे.

विषमतेची दरी पाहवत नाही-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू

0
पुणे : दि. 27
समाजात जे काही चाललेले आहे ते बघवत नाही. विषमतेची दरी पाहवत नाही. मला खूप त्रास होतोय, कुणी उपाय सांगाल का? अशा शब्दात सामाजिक अस्वस्थतेवर यंदाचे महर्षी पुरस्कार प्राप्त व ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा 21वा महर्षी पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त केल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, दीपा लागू, रजनी वेलणकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, दादा गुजर, वास्तुविशारद महेश नामपूरकर, डॉ. सतीश देसाई, आय.ए.एस. अधिकारी सुशील खोडवेकर, अभिनेत्री ज्योती सुभाष, सुलभा तेरणीकर, आयोजक व अध्यक्ष आबा बागुल, जयश्री बागुल, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, अमित बागुल,  नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
महर्षी पुरस्कार प्राप्त केल्यानंतर डॉ. श्रीराम लागू म्हणाले, खरं म्हणजे मला स्वत:विषयी बोलणे जमत  नाही. दुसर्‍यांनी लिहिलेले पाठ करून ते मी मांडू शकतो. एक नट म्हणून ते मला उत्तम जमते. सद्यस्थिती पाहता मी अक्षरश: गोठून गेलो आहे. आपण कुठल्या परिस्थितीत वावरतोय याचा विचार करतोय. एकीकडे आपण नाटक पाहतो, तर बाहेर भिक मागणारे हात असतात. हे सहन होत नाहीय. मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. कुणी यावर उपाय सांगेल का? अशा शब्दात त्यांनी सामाजिक प्रश्‍नांवर सहवेदना व्यक्त केल्या. शिवाय एकीकडे चांगले कार्य असे बोलले जाते तर दुसरीकडे त्याला कोणी जागतही नाही. असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘मन की बात सोडा, काम की बात करा’
अध्यक्षीय भाषणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सध्या समाजात अस्वस्थता आहे, हे डॉ. श्रीराम लागू यांनी मांडलेल्या सहवेदना खरंच विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. त्यांच्या चेहर्‍यावरुनच समाजाप्रती असणारी त्यांची आस्था जाणवत आहे. आम्हीही सामाजिक प्रश्‍नांवर आवाज उठवितो आणि डॉ. लागू यांच्या सामना चित्रपटातील मारूती कांबळेचे पात्र आम्हाला आठवते. त्या मारूती कांबळेंचं काय झालं हे नंतर प्रेक्षकांना  जरी कळलं असेल पण सध्याच्या राजकारणात मारूती कांबळेचं काय झालं? हे विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला सभागृहात विचारावं लागतं. मुख्यमंत्र्यांना वारंवार विचारूनही मारूती कांबळेेंचं काय झालं हा शब्दप्रयोग वारंवार करावा लागतो. आत्ताची परिस्थिती ‘मन की बात नको, काम की बात करो’ अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधार्‍यांवर आसूड ओढला. ते म्हणाले, सिंहासन चित्रपटातून एकप्रकारे राजकारणाची सद्यस्थिती काय आहे हेच स्पष्ट होते.
सत्कार स्विकारल्यानंतर प्रदीप वेलणकर म्हणाले, माझ्या आयुष्यात दोनच पुरस्कार मला महत्त्वाचे आहेत, तेही डॉ. श्रीराम लागू यांच्या उपस्थितीत मिळाले आहेत. हे पुरस्कार माझ्या कायम स्मरणात राहतील. उशिरा का होईना मला पुरस्कार मिळाले, असे स्पष्ट करताना आयोजक आबा बागुल यांच्या समाजाप्रती असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गारही त्यांनी काढले.
माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, महर्षी पुरस्कारापलीकडील व्यक्तीमत्त्व डॉ. लागू यांचं आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिका अजरामर आहेत. महेश नामपूरकर म्हणाले, डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयातून, कलेतून प्रेरणा मिळते. दर्जेदार भूमिका आणि त्यातील वेगळी छटा हा ध्यास कसा असतो हेच दर्शविते, असे स्पष्ट करून आबा बागुल यांना सामाजिक मूल्यांचा ध्यास आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्तविकात आबा बागुल म्हणाले, डॉ. श्रीराम लागू यांच्या कार्याचे मोजमाप करू शकणार नाही, असे उत्तुंग व्यक्तीमत्त्व त्यांचे आहे. आज त्यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित केल्याने खर्‍या अर्थाने सार्थक झाले आहे. वास्तविक महर्षीच्या पुढे त्यांची योग्यता आहे, असेही ते म्हणाले.
मानपत्राचे वाचन अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी केले. स्वागत घनश्याम सावंत यांनी तर सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.

पक्षनेते -प्रशासन समन्वयासाठी बैठक तर झाली …..

0

पुणे-  गेल्या सहा महिन्यात प्रशासनातील बडे अधिकारी आणि पक्षनेते यांच्यातील मतभेद कालच्या महापालिका मुख्य सभेत दिसून आल्यानंतर कोण नमते ,झुकते घेणार ? कोण कायदेशीर मार्गाने काम करते आहे आणि कोण करत नाही ?असे प्रश्न असताना हे सारे प्रश्न बाजूला सारून काल उपमहापौर  सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहात दिलेल्या आदेशाप्रमाणे आज महापौर दालनात आज महापालिका आयुक्त ,तसेच दोन्ही अतिरिक्त आयुक्तां समवेत  महापौर ,सभागृहनेते आणि पक्षनेते यांची बैठक तर झाली आहे … पण खरोखर समन्वय साधला जाणार आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळात च मिळणार आहे … दरम्यान या प्रकरणी सभागृह नेत्यांना आज या इनकॅमेरा बैठकीत काय झाले याबाबत विचारले असता पहा ते काय म्हणाले …..व्हिडीओ…

महारावल रतन सिंह लूकसाठी लागले 4 महिने आणि 22 कारागीर !

0

संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणारा शाहिद कपूर पहिल्यादाच अशा वेगळ्या रूपात दिसत आहे. एका प्रख्यात आणि बहादूर भारतीय राजपूत राजाची भूमिका रंगवताना शाहिद कपूर ह्या लूकमध्ये राजपूत राजाच्या शाही रूपात साजेसा दिसतोय.

दिल्लीच्या डिझाइनर रिंपल आणि हरप्रीत नरूला ह्यांनी शाहिद कपूरचा हा राजेशाही लूक डिझाइन केलाय. त्यासाठी राजस्थानच्या ऑरगॅनिक फॅब्रिकवर 22 स्थानिक कारागिरांनी बुद्देदारी वर्क करून महारावल रतन सिंहचा लूक चार महिने कसून मेहनत करून बनवला आहे. ह्या शाही कपड्यांमध्ये तपशीलावार काम झालेले दिसून येते आहे. राजस्थानी पारंपरिक रंगांचा वापर तर शाहिदच्या ह्या कपड्यांमध्ये झालेलाच आहे. त्याचप्रमाणेच महारावल रतन सिंहचा शाही आणि मर्दानी अंदाजही दाखवण्यासाठी बारकाईने काम करण्यात आलंय.

वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि  संजय लीला भन्साली प्रॉडक्शनचा पद्मावती चित्रपट 1 डिसंबर 2017 ला झळकणार आहे.