पुणे-क्रीएटिव्ह फौंडेशन आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवात आज विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणारयांचा कोथरूड भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.भाजप चे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले,पिंपरी चिंचवड चे भाजप अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणारायाना सन्मानित करण्यात आले.यावेळी महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके,उमेश भेलके,मंदार बलकवडे उपस्थित होते.
अर्जुन कढे याने टेनिस मधे अंडर १४ आणि अंडर १७ यात देशाचे प्रतिनिधित्व केले असून विंबल्डन,ऑस्ट्रेलियन ओपन,फ्रेंच ओपन अशा सर्व ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत यश मिळविले आहे,तर श्वेजल मानकर याने स्विमिंग मधे तब्बल ११०० पदक मिळविले असून त्याने नुकताच वीरधवल खाडे चा विक्रम मोडून सुवर्णपदक मिळविले आहे,हे दोघेही केवळ कोथरूड चे भूषण नसून देशाचे भूषण आहेत आणि ते या दोन्ही क्रीडाप्रकारात देशाचे नाव मोठे करतील अशी खात्री वाटते असे गौरवोद्गार योगेशजी गोगावले यांनी काढले.तसेच पुणे शहर भाजप च्या वतीने महिलांच्या स्वयंरोजगारावर भर देण्यात येणार असून त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहोत असे ही गोगावले म्हणाले.
पिंपरी चिंचवड मधे मिळविलेली सत्ता ही माझ्या एकटया मुळे मिळालेले यश नसून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या कष्टाने हे यश साध्य झाले आहे असे सांगून ” मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितार्थ करणार असून त्याद्वारे पिंपरी चिंचवडचा कायापालट करुन दाखवु आणि भ्रष्टाचार मुक्त काम कसे असते हे दाखवून देउ असे आ लक्ष्मणभाउ जगताप म्हणाले.असे महोत्सव हे आवश्यक असून याद्वारे नागरिकांची सांस्कृतिक भूक पूर्ण होते असेही ते म्हणाले.
या वेळी वयाच्या ऐंशीव्या वर्षी चौकान्मधे आणि शाळांसमोर वाहतूक नियमन करणारया प्रभाताई नेने यांना ही कोथरूड भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच मराठा क्रांती मोर्चा च्या वेळी पुणे ते मुंबई रिव्हर्स गियर मधे गाडी चालविणारे आणि आता देशाची परिक्रमा रिव्हर्स गियर मधे करण्याच्या प्रयत्नात असलेले संतोष राजेशिर्के आणि फुटबॉल या खेळात प्रावीण्य मिळविणारी वैष्णवी राजेश बराटे यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका अल्पना वर्पे ,डॉ श्रद्धा मराठे पाठक,स्वप्नाली सायकर,छाया मारणे आणि हर्षाली माथवड या नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत केले मंदार बलकवडे यांनी आभार मानले.