Home Blog Page 3267

पगार द्यायलाच पैसे नाहीत …महापालिका ६०० सुरक्षा रक्षकांना पाठविणार घरी …

0
पुणे -कंत्राटी पद्धतीने  पुणे महापालिका सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या ६००  सुरक्षारक्षकांना कामचुकार संबोधून कामावरून काढून  टाकण्याचा डाव पालिकेत रचण्यात आला आहे . पालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन या सर्वांना या प्रकारची माहिती असून ,पगार द्यायलाच पैसे नसल्याने खरे तर ही वेळ येवून ठेपली आहे. मात्र तसे कबूल न करता डच्चू देण्याचा घाट घातला जातो आहे . सध्या सुद्धा अनेकांचे तीन तीन महिन्यांचे पगार ठाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे .

ठेकेदारामार्फत विविध खात्यात हे सुरक्षारक्षक गेल्याकाही  वर्षांपासून महापालिका सेवेत कार्यरत आहेत. ठेकेदाराकडून वेळेवर वेतन न मिळणे, भविष्यनिर्वाह निधी ठेकेदारानेच लाटणे यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या सुरक्षारक्षकांच्या व्यथांकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने आता तडकाफडकी सुरक्षारक्षकांना काढून टाकल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाईल कि काय ? अशी शक्यता असल्याने याबाबत ओरडा झाल्याने दिवाळीनंतर हि पावले उचलण्याचे ठरले आहे . सध्या १८०० सुरक्षा रक्षक तैनात असून ९०० सुरक्षा रक्षकांचे टेंडर  ‘राजा उदार झाला’ पद्धतीने म्हणजे ठेकेदारच मोठा कुबेर जणू आणि त्यांने केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून ‘ना नफा ना तोटा’ पद्धतीने हे टेंडर भरल्याचे स्पष्ट झालेले आहे . अशा स्थितीत या ९०० रक्षकांचे पगाराचे पैसे दिल्यानंतर उर्वरित ९०० रक्षकांना द्यायला पालिकेकडे पैसे उरलेले नाहीत . त्यामुळे आपणास एवढ्या रक्षकांची गरजच नाही . केवळ १२०० रक्षक पुरेसे आहेत . अशी भूमिका घेत ६०० रक्षकांना घरी पाठविण्याचा मनसुबा पालिकेत रचला गेला आहे . कंत्राटी कामगार पद्धतीने कसा अत्याचार चालविला आहे याकडे  देशातील एक उदाहरण म्हणून निश्चित पाहता येणार आहे .

विजसेवेबाबतच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

0

पुणे, दि. 3 : विजसेवेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अन्य माहिती देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 या तीन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहक सेवा केंद्रातील तिनही टोल फ्री क्रमांक 24×7 तास उपलब्ध आहेत.

कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येतात. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचा मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. यानंतर रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांकावरून तक्रार नोंदविण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. वीजग्राहकांनी वीजसेवेविषयक तक्रारी असल्यास 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

याशिवाय विविध ग्राहकसेवा ‘एसएमएस’द्वारे देण्यासाठी वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडून नोंदणी करण्यात येत आहे. वीजग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यानंतर वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा बंद असल्याचा कालावधी किंवा देखभाल व दुरुस्तीच्या कालावधीची माहिती महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय 24×7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18002003435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. व www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपवर मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

‘नृत्य-सजीव गीतरामायणा’ने रसिकांना घातली मोहिनी

0

ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या तसेच संगीतकार सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांच्या प्रतिभा संगमातून अवतरलेल्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती…’, ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला…’, ‘शरयू तीरावरी अयोध्या…’, ‘स्वयंवर झाले सीतेचे…’ यांसारख्या गीत रामायणाच्या रचनांनी पुन्हा एकदा रसिकांचे कान तृप्त केले. रमेश देव प्रोडक्शन प्रा. लि. आणि सुबक यांची निर्मिती असलेलं ‘नृत्य-सजीव गीत रामायण’ विजयादशमीच्या मुहूर्तावर षण्मुखानंद सभागृहात सादर करण्यात आलं. भक्तीरसाने ओतप्रोत भरलेल्या गीत रामायणाचे आजही असंख्य चाहते असून, ‘नृत्य-सजीव गीत रामायणच्या रूपात नृत्य आाणि अभिनयाचा नवा साज लेवून जेव्हा या गीतरचना नव्याने सादर करण्यात आल्या, तेव्हा पु्न्हा एकदा रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी ठरल्या.

निर्माते रमेश देव आणि सुनील बर्वे यांची निर्मिती असलेल्या नृत्य-सजीव गीत रामायणमध्ये गदिमांनी रचलेल्या रचना नृत्य, गीत आणि संगीत यांचा अचूक मिलाफ घडवत सादर करण्यात आल्या. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती…’ या गीताने सुरुवात झालेला हा गीत-संगीताचा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. यापूर्वी सुबकच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड गेलेल्या नाटकांना पुनरुज्जीवत केल्यानंतर गदिमा-बाबूजींचं गीत रामायण रंगभूमीवर आणणं हा धाडसी निर्णय होता असं मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केलं. रमेश देवांसारख्या ज्येष्ठ अणि श्रेष्ठ कलावंताच्या साथीमुळेच हे शक्य झाल्याचंही सुनील बर्वे म्हणाले. आजच्या पिढीला रामायण काय आहे हे समजावं यासाठी गीत रामायणाला नृत्य आणि अभिनयाची जोड देण्यात आल्याचे रमेश देव यांनी सांगितले.

या कार्यक्रमातील सर्वच कलावंत, गायक, वाद्यवृंदांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याने गीत रामायण नव्या रूपात पाहताना एक वेगळाच आनंद लाभल्याचंही देव म्हणाले. सोनिया परचुरे यांनी सादर केलेल्या जटायू नृत्याचं देव यांनी विशेष कौतुक केलं. रसिकांची अशीच साथ लाभली तर भविष्यात याही पेक्षा भव्य दिव्य रूपात नृत्य सजीव गीत रामायणचे प्रयोग करण्यात येणार असल्याचे संकेतही देव यांनी दिले.

निर्माता-दिग्दर्शक अभिनय देव, अभिनेता-दिग्दर्शक अजिंक्य देव, सीमा देव, सचिन खेडेकर, आनंद इंगळे, पुष्कर क्षोत्री   यांच्यासह चित्रपटसृष्टी आणि विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. नृत्य-सजीव गीत रामायणची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांचं असून अतुल परचुरे यांनी याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत रावणवधाचं एक गीतही गायलं. सोनिया परचुरे आणि शरयू नृत्य कलामंदिरच्या शिष्यांनी कथ्थक नृत्याच्या आधारे गीत रामायणातील रचना सादर केल्या. अजित परब, हृषिकेश रानडे, विभावरी आपटे आणि शमिका भिडे यांनी बाबूजींच्या आवाजातील गीतरचना गात रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कमलेश भडकमकर यांनी या कार्यक्रमाचं संगीत संयोजन केलं.

एफसी पुणे सिटी सर्वाधिक युवा खेळाडूंचा संघ-गौरव मोडवेल

0
पुणे- एफसी पुणे सिटी संघामध्ये यंदाच्या वर्षी 23वर्षाखालील 9खेळाडूंचा समावेश असून त्यामुळे हा संघ आयएसएलच्या नव्या मौसमातील सर्वाधिक युवकांचा संघ ठरला आहे. या संघातील 7पैकी 4प्रशिक्षकही पूर्णपणे नवे असून ते खेळाडूंना आज प्रथमच भेटणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण नव्या आणि ताज्या दमाच्या अशा या संघाकडून आम्हांला यंदाच्या मौसमात चमकदार व भरीव कामगिरीची अपेक्षा असल्याचे एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले. 
 एफसी पुणे सिटी संघाच्या नव्या मौसमातील पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 
मोडवेल म्हणाले की, संघात एक मार्क्वी खेळाडू असणे अनिवार्य आहे हा नियम काढल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली आहे. यामुळे आता आपण स्वतःचे मार्क्वी तयार करू. पूर्वी आयएसएलची किंवा एफसी पुणे सिटी संघाची फारशी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्दी नव्हती. परंतु या खेळाडूंनी एफसी पुणे सिटी संघाचा चांगला अनुभव घेतला असल्यामुळे तसेच, आयएसएल स्पर्धेचीही आता चांगली प्रसिध्दी झाली असल्यामुळे आम्हांला चांगला दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळणे अवघड जात नाही. 
ऑगस्ट व सप्टेंबर हे महिने नव्या मौसमाच्या पूर्वतयारीसाठी नेहमीच महत्वाचे ठरतात. परंतु या महिन्यात आपल्याकडे नेहमीच पाऊस पडतो. त्यामुळे यापूर्वी सरावात अनेक अडचणी येत होत्या. परंतु आम्ही आता सरावासाठी अतिशय उत्तम अशी व्यवस्था केली असून याशिवाय संघाला सराव सामन्यांसाठी परदेशात पाठविण्यात येत असल्यामुळे ही अडचण दूर झाली आहे. तसेच, गेल्या वर्षी स्पेनमध्ये खेळलेल्या 9 सराव सामन्यांपैकी 7 सराव सामन्यात आम्ही विजय मिळविला होता. त्यामुळे या सराव सामन्यांचा आम्हांला निश्चितच उपयोग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही आम्ही अशाचप्रकारे सराव सामन्यांचे आयोजन करणार आहोत. 
संघात अनेक युवा खेळाडू असल्यामुळे दुखापती कमी होतील अशी एका बाजूला अपेक्षा असतानाच युवा खेळाडू स्वतःच्या शरीराबाबतीत काही निष्काळजी असल्यामुळे आम्ही खेळाडूंचा तंदरूस्ती व दुखापती याविषयी विशेष काळजी घेत आहोत. त्यासाठी आम्ही प्रीकंडिशनिंग कँप तसेच, व्यायामासाठी विशेष ङ्गिजिओ थेरपीस्ट यांची नेमणूक केली असून ते खेळाडूंना दुखापती टाळण्यासाठी खास प्रशिक्षण देणार आहेत. ही सर्व काळजी घेतल्यानंतरही दुखापती होतच असतात. त्यासाठी तज्ञ डॉक़्टरांची नेमणूक केली असून ते खेळाडूंवर अत्यंत त्यांची तंदरूस्ती कायम राखण्याचा प्रयत्न करतील. 
रॅन्को पोपोविच बहुसांस्कृतिक व अनुभवी प्रशिक्षक एफसी पुणे सिटीचे नवनियुक्त रॅन्को हे अतिशय अनुभवी आणि बहुआयामी व्यक्ती आहेत. पोपोविच यांची पार्श्वभूमी अतिशय वेगळ्या स्वरूपाची आहे, असे सांगून मोडवेल म्हणाले की, पोपोविच यांच्यावर बालपणातच कुटूंबाची जबाबदारी पडली. ते केवल 13 वर्षाचे असताना युगोस्लावियाचे विभाजन झाले आणि अतिशय आव्हानात्मक अशा राजकीय परिस्थितीत त्यांनी खडतर परिश्रम करून आपल्या कूटूंबाची काळजी घेतली आणि फुटबॉल करिअर घडविले. त्यामुळे त्यांचा काहीसा आक्रमक असला तरी विविध देशांमधील संघांना प्रशिक्षण देण्याचा तसेच, फर्स्ट डिव्हिजनपासून आंतरराष्ट्रीय संघांना मार्गदर्शन करण्याचा प्रचंड अनुभव पाठिशी असल्यामुळे ते खेळाडूंशी उत्तम समन्वय साधू शकतात. तसेच, त्यांना अनेक भाषा अवगत असल्यामुळे ते खेळाडूंशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. अशाप्रकारचे बहुसांस्कृतिक आणि अनुभवी प्रशिक्षक लाभल्यामुळे एफसी पुणे सिटी संघाची कामगिरीच निश्चितच चांगली होईल, असा आमचा विश्वास आहे. 

16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर हिचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

0

Arjun gohad

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात वैष्णवी आडकर हिने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आगेकुच केली.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत बिगर मानांकीत वैष्णवी आडकर हिने पाचव्या मानांकित शनाया नाईकचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित सान्या सिंगने राधिका महाजनवर ६-१, ६-२ असा सहज विजय मिळवला. सहाव्या मानांकित रिया वाशीमकरने विधी बर्मनला ६-३, ६-२ असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित गार्गी पवारने हर्षिता बांगेराचा ६-२, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली.

मुलांच्या गटात अर्जुन गोहड याने यशराज दळवीचा टायब्रेकमध्ये ६-३, ६-७(७), ६-१ असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या मानांकित सर्वेश बिरमाने याने एरीक नॅथनला ७-५, ६-१ असे नमविले. अव्वल मानांकित आदित्य बालसेकरने आर्य राजचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: मुले:

आदित्य बालसेकर(१)वि.वि.आर्य राज ६-०, ६-०;

आर्यन भाटिया(७)वि.वि.ऋषी जलोटा ६-३, ६-१;

सर्वेश बिरमाने(३)वि.वि.एरीक नॅथन ७-५, ६-१;

करीम खान वि.वि.साहेब सॊदी ६-३, ६-२;

अर्जुन कुंडू(५)वि.वि.सन्मय गांधी ७-५, ६-१;

संस्कार चोभे(४)वि.वि.हितेश यालाचिली ६-४, ६-२;

अर्जुन गोहड वि.वि.यशराज दळवी ६-३, ६-७(७), ६-१;

निखिल निरंजन(२)वि.वि.मानव जैन ६-३, ६-४;

मुली: सान्या सिंग(१)वि.वि.राधिका महाजन ६-१, ६-२;

रिया वाशीमकर(६)वि.वि.विधी बर्मन ६-३, ६-२;

मृणाल कुरळेकर वि.वि.जोस्ना मदाने ६-३, ६-३;

वैष्णवी आडकर वि.वि.शनाया नाईक(५)६-३, ६-२;

हृदया शहा(३)वि.वि.परी सिंग ६-३,७-६(१);

कामया परब वि.वि.चारिता पटलोला(८)६-१, ६-२;

गार्गी पवार(२)वि.वि.हर्षिता बांगेरा ६-२, ६-२.

 

महिला आघाडी सरचिटणीसपदी दीप्ती अजय पाटोळे यांची नियुक्ती

0

पुणे-भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महिला आघाडी सरचिटणीसपदी दीप्ती अजय पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते देण्यात आले .

दीप्ती अजय पाटोळे या घोरपडी गाव येथील असून त्यांनी स्वयंम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे . घोरपडी भागात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टरांचा सत्कार व व्यसनमुक्ती साठी विशेष कार्य करत आहे . वैद्यकीय शिबिराचे आयोजन देखील केले आहे . भारतीय जनता पार्टीचे गेले अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे .

वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हे नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले , महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,खासदार अनिल शिरोळे , खासदार संजय काकडे , सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , नगरसेवक सुनिल कांबळे ,   भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते . 

उद्यम विकास बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली – आ मेधा कुलकर्णी.

0

पुणे-उद्यम विकास सहकारी बँकेने सुनियोजित आणि यथोचित कार्य करताना सामाजिक बांधिलकी देखील जोपासली असे मत येथे आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले .

उद्यम विकास सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते बँकेच्या सभासदांच्या व खातेदारांच्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,यात दहावीत ९८.२०% गुण मिळवणारा कनक खिंवसरा,९८% मिळवणारी तन्वी तारकुंडे,९२% गुण मिळवणारी तनया देव,अमित गाटे यांचा तर ९१ % मिळवणाऱ्या अक्षदा डोईफोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बारावी च्या परीक्षेत ८६% गुण मिळवणारा मानस गोडबोले,८१% गुण मिळवणारा निरंजन केसकर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी बँकेच्या प्रगतीची कौतुक करताना नोटबंदीच्या काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केलेले कष्ट आपण अनुभवले असून त्या काळात ग्राहकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार केल्यामुळेच बँकेस प्रगती साधता आली असे ही त्या म्हणाल्या,तसेच जसे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे तसेच बँकेच्या संचालकांचा ही या प्रगतीत मोलाचा वाट असल्याचे ही त्या म्हणाल्या.आपल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करून बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली असून त्याबद्दल ही बँक अभिनंदनास पात्र आहे.

उद्यम विकास सहकारी बँकेने ५% लाभांश जाहीर केला असून बँकेस एन पी ए ची टक्केवारी ही कमी करण्यात यश मिळाले असून बँकेची सर्वांगीण प्रगती होत असल्याचे बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.,बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सर्व सभासदांचे स्वागत करताना ” बँकेने १०० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात बँकेस व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली असून बँकेचा कार्यविस्तार करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे.”असे सांगतानाच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नोटबंदी च्या काळात उत्तम कामगिरी केल्याची ही ते म्हणाले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार मेधा कुलकर्णी,बँकेच्या उपाध्यक्ष लीनाताई अनास्कर,संचालक पांडुरंग कुलकर्णी,दिलीप उंबरकर,महेंद्र काळे,मनोज नायर,दिनेश गांधी,शिरीष कुलकर्णी,गोकुळ शेलार इ उपस्थित होते.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक देशपांडे यांनी अहवाल वाचन केल्यावर सर्व सभासदांनी एकमताने बँकेच्या ठरावांना मान्यता दिली.
दीपक देशपांडे यांनी सूत्र संचालन केले तर उपाध्यक्ष सौ लीना अनास्कर यांनी आभार प्रदर्शन केले.

के.बी ल्यूब्स चे लुब्रीनॉक्स आणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईल महाराष्ट्रात उपलब्ध

0

पुणे : चाकण येथील के.बी.ल्यूब्स प्रा.लि. कंपनीच्या लुब्रीनॉक्स आणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईलला तमिलनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये प्रचंड यश मिळाले आहे. कंपनीने हे यश पाहता आता संपुर्ण महाराष्ट्रात लुब्रीनॉक्स अणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईल सादर केले आहे.अशी माहिती के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे डायरेक्टर जिग्नेश सुभाष अग्रवाल यांनी दिली.    कंपनी संदर्भात अधिक माहिती देताना अग्रवाल म्हणाले कि, के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे मुख्यालय पुणे येथे असून कंपनीचे अत्याधुनिक उत्पादन युनिट चाकण पुणे येथे कार्यरत आहे. उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी कंपनीला आयएसओ 9001:2008 प्रमाणपत्र मिळाले आहे.जिग्नेश अग्रवाल पुढे म्हणाले की, लुब्रीनॉक्स आणि डॉक्टर ल्यूब लुब्रीकेंट ऑईल 250 एम.एल. से 210 लीटरपर्यंतच्या बॉटल्स, पाऊचेस, बॅरल्स आणि बकेट्स मध्ये उपलब्ध आहे. के.बी ल्यूब्स प्रा.लि. चे सर्व उत्पादने गुणवत्ता दृष्टीने सर्वोत्तम आहे, हे फक्त आईएसओ सारखी मूल्यांकन तपासणारी संस्था मानत नसून आमचे लाखो ग्राहकांनी मनापासून स्वीकार करतात, कारण आमचे उत्पादन बाजारात उपलब्ध अशा प्रकारच्या अन्य उत्पादनाच्या बाबतीत एक नंबरवर पोहचले आहे.औद्योगिक क्षेत्रातील सर्व मशीनमध्ये जसे की, इंजीनियरिंग, फोर्जिर्ंग, रोलिंग मिल्स, टेक्सटाईल्स, शुगर मिल्स, क्रेशर इत्यादीत याचा वापर केला जातोहे  लुब्रीकेंट्स ऑईल ऑटोमोटिव सेक्टरच्या टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांच्या डीजल आणि पेट्रोलवर चालणार्या इंजिन साठी सर्वोत्तम आहेहे लुब्रीकेंन्ट्स हैवी ट्रक्स, जेसीबी आणि अर्थ मूविंग जेसीबी सारख्या मोठ्या इंजिनसाठी वापरण्यात येणार्या ऑईल ग्रीस, गेयर ऑईल, पॉवर स्टेयरिंग ऑईल आणि ब्रेक ऑईलचे ही उत्पादन करते आणि ते बाजारात उपलब्ध आहे. तमिलनाडु, कर्नाटक आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे हे लुब्रीकेंट्स ऑईल ग्रीस खूप लोकप्रिय झाले आहेतजिग्नेश अग्रवाल यांनी कंपनीचे उत्पादन विस्तारण्याच्या संदर्भातील योजनांची माहिती देतांना म्हणाले की, के.बी ल्यूब्स प्रा.लि.लुब्रीकेंट्स लवकरच तमिलनाडू, मध्यप्रदेश और कर्नाटक मध्ये मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रा सह  गुजरात, पंजाब, राजस्थान, आंधप्रदेश गोवा बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.   अग्रवाल म्हणाले की, विद्यमान उत्पादन प्रक्रियेचे चालू ऑप्टिमायझेशन आमच्या आर एंड डी टीमने फ्यूचरिस्टिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तो आमची कंपनी ग्राहकांच्या मनात सदैव घर करण्यासाठी उच्च दर्जाचे ब्रँडची निर्मिती करण्यावर नेहमी भर दिला जातो. कायम आम्ही या क्षेत्रात उज्वल भविष्यकडे नेहमी अग्रसर राहू। अधिक माहितीसाठी, या क्रमांकाशी 8552981455 किंवा मेल office@lubrinox.com  वर संपर्क करू शकता.

जगाला शांती व मानवतेचा संदेश देणारे विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारावे -नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेत एकमुखी मागणी

0
दिल्ली- अयोध्येतील राम जन्मभूमीच्या 2.77 एकर जागेवर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात यावे, असा ठराव सोमवारी नवी दिल्ली येथे रामजन्मभूमी- बाबरी मस्जिद विवादावर सर्वमान्य तोडगा शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेत एकमुखाने पारित करण्यात आला. अयोध्येतील उर्वरित म्हणजे 67 एकर जागेवर संपूर्ण जगाला शांती आणि मानवतेचा संदेश देणारे विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यात यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे  राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून रामजन्मभूमी- बाबरी मस्जिद विवादावर सर्वमान्य तोडगा शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेत अनेक महत्वपूर्ण प्रस्ताव पारित करण्यात आले, असे  एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी सांगितले.
या वेळी राम जन्मभूमि न्यासाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. राम विलास वेदांती, माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान, संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, माजी आमदार स्वामी अग्निवेश, प्रसिद्ध विचारवंत फिरोज बख्त अहमद, सर्व धर्मीय विद्वान मौलाना वहिदुल्ला खान अन्सारी-चतुर्वेदी, केंद्र सरकारचे माजी सचिव डॉ. कमल तावरी, एम.एस. रामैया विद्यापीठाचे कुलपती डॉ. एम. आर.जयराम, प्रसिद्ध पत्रकार विजय नाईक व ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, थोर विचारवंत श्री. इझीकेल इसाक मालेकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे हे उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, श्री. काशीराम दा. कराड व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “अयोध्येतील 2.77 एकर जागेवर प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर उभारल्यानंतर उर्वरित 67 एकर जागेवर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शीख, जैन यासह अन्य धर्मस्थळांच्या प्रार्थना भवनाचा समावेश असलेले विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यात यावे. येथून आपण जगाला विश्‍वशांतीचा आणि मानवतेचा संदेश देऊ शकू असा प्रस्ताव सुद्धा पारित करण्यात आला.”
“ राम जन्मभूमी-बाबरी मश्जिद वादावर सर्वमान्य तोडगा काढण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. यामध्ये सर्व धमार्ंच्या  प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा. अशी मागणी यावेळी परिषदेत करण्यात आली. अयोध्येतील उर्वरित 67 एकर जागेवर विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारण्यासाठी राष्ट्रीय न्यासाची स्थापना करण्यात यावी. या न्यासाच्या अध्यक्षपदी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी संयुक्तपणे निवड करावी. यामध्ये सरकारी प्रतिनिधी, विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान, इतिहास, कायदा, समाजसेवा व तत्वज्ञान इ. क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात यावा. असे मान्य करण्यात आले.”
विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्या माध्यमातून अयोध्या हे मानवता आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर येईल. भविष्यात भारतीय संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान आणि मानवतेचा संदेश देता येईल. 21व्या शतकात भारत देश जगाला सुख, समाधान आणि शांतीचा संदेश देईल व भारत विश्‍व गुरू म्हणून उदयास येईल असे प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी स्पष्ट केले.
दिवसभर चाललेल्या एक दिवसीय गोलमेज परिषदेत उपस्थित मान्यवरांनी देशाच्या हितासाठी हा वाद संपवावयास हवा, संवादाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ कमी करणे, सर्वधर्मींयानी एकत्र येणे, प्रेम आणि बंधुभाव निर्माण करणे, जात, धर्म आणि भाषा यामधील दरी कमी करणे, सर्व धर्मांचा आदर करणे आणि विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन अशा विविध मुद्यांवर विचार मांडले.
डॉ.एस.एन.पठाण यांनी या राष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी स्वागतपर भाषण केले. प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी दिल्ली डिक्लेरेशनचे वाचन केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

रुमा गायकवारी, अर्णव पापरकर यांना विजेतेपद

0
पुणे- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 12 वर्षाखालील चॅलेंज सिरीज स्पर्धेत मुलींच्या गटात रुमा गायकवारीने सोहा पाटीलचा, तर, मुलांच्या गटात  अर्णव पापरकरने  ऋषिकेश अय्यर याचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतीम फेरीत पाचव्या मानांकीत रुमा गायकवारीने बिगर मानांकीत अपर्णा पटाईतचा 6-3, 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत रूमाने अव्वल मानंकीत सोहा पाटीलचा 9-8(0) असा पराभव केला. रूमा डीईएस सेकंडरी स्कूल येथे सहावी इयत्तेत शिकते. रूमाचे हे या वर्षीतील सातवे विजेतेपद आहे. रूमा हिराबाग येथे प्रणव वेलणकर याच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात दुस-या मानंकीत अर्णव पापरकरने अव्वल मानांकीत ऋषिकेश अय्यरचा 6-1, 6-2 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. उपांत्य फेरीत अर्णवने सोळाव्या मानांकीत केवल किरपेकरचा  9-2 असा पराभव केला. अर्णव न्यु इंंडीया स्कुल कोथरूड येथे तिसरी इयत्तेत शिकत असून त्याचे या वर्षातील हे चौथे विजेतेपद आहे. अर्णव बाऊंस टेनिस अकादमी येथे केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक असे पारितोषीक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषीक वितरण स्पर्धेचे संचालक प्रविण झिटे व सुपरवायझर अभिनव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
रुमा गायकवारी(5)वि.वि. सोहा पाटील(1) 9-8(0)
अपर्णा पटाईत वि.वि. कश्मिरा सुम्बरे(12) 9-8(5)
अंतीम फेरी- रुमा गायकवारी(5)वि.वि. अपर्णा पटाईत 6-3, 6-1
मुले:उपांत्य फेरी:
ऋषिकेश अय्यर(1)वि.वि. सर्वेश झावर 9-7
अर्णव पापरकर(2)वि.वि. केवल किरपेकर(16) 9-2
अंतीम फेरी-  अर्णव पापरकर(2)वि.वि.ऋषिकेश अय्यर(1) 6-1, 6-2

कास पठार बंद -पीडब्ल्यूडी च्या भोंगळ कारभाराचा फटका

0

पुणे-साताऱ्यातील कास पठाराकडे जाणारा रस्ता सोमवारी खचला. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या पठाराकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराचा पुष्प हंगाम सध्या ऐन बहरात आहे. या काळात कास पठारावर विविध प्रकारची फुले उगवतात. त्यामुळे या काळात मुंबई, पुण्यासह देशभरातून अनेक पर्यटक कास पठारावर येतात. हा हंगाम काही दिवसांपुरताच मर्यादित असल्याने सध्या येथे प्रचंड गर्दीही होताना दिसत आहे. मात्र, आज सकाळी कास पठाराकडे जाणारा यवतेश्वरच्या घाटातील रस्ता अचानकपणे खचला. परिणामी कास पठाराकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची आवश्यक तेव्हा पाहणी केली काय ? त्याबाबत निगा राखली काय ? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पीडब्लूडी च्या भोंगळ कारभाराची लक्तरे बाहेर आणणार  कोण ?हा सवाल निर्माण झाला आहे .

यवतेश्वर घाटाच्या पायथ्याशी आल्यानंतर पर्यटकांना रस्ता खचल्याचे कळले. येथील रस्त्याचा भाग पूर्णपणे दरीत कोसळला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी घाटाच्या पायथ्याशीच वाहतूक थांबवली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी आणखी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.कासचा अधिकृत हंगाम एक सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. सुरूवातीला सरसकट पर्यटकांना कासवर प्रवेश देण्यात आला. विकेंडला होणारी पर्यटक व गाड्यांची प्रचंड गर्दीने कासवरील नियोजन ढासळू लागले. लगेचच विकेंडला ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश हे धोरण राबविण्यास सुरूवात झाली. पहिल्या शनिवारी बोगद्यात वनविभाग व पोलिस कर्मचारी यांनी तिकीट पाहूनच पर्यटकांना कास रस्त्याला सोडले. बुकिंग करून न येणारे तसेच बामणोली व वरती इतर भागात जाण्यारे पर्यटक यांची गैरसोय झाली. त्यातून पर्यटक व व्यवस्थापन यांच्यात वादविवाददेखील झाले होते.आता सारेच बंद झाले आहे .

तीन तरुणांनी साकारली नयनरम्य ‘अर्बोल द ला लुझ’ (द ट्री ऑफ लाईट) शिल्पकृती

0

पुणे, ३० सप्टेंबर २०१७ : महान विचारवंत साहित्यिक राल्फ वाल्डो इमर्सन यांनी म्हटले आहे, “सर्व जीवनच एक प्रयोग आहे. तुम्ही जेवढे अधिक प्रयोग करता तितके उत्तम.”अन्वम नागपाल (वय १७), आर. सिद्धार्थ (वय २४) आणि अन्विका नागपाल (वय १२) या तिघांनी एकत्र येऊन काचेचे देखणेपण आणि प्रकाशाची चमक यांच्या समन्वयातून ‘अर्बोल द ला लुझ’ (ट्री ऑफ लाईटसाठीचा स्पॅनिश शब्द) ही शिल्पकृती साकारली आहे. वापरलेल्या काचेच्या बाटल्या, विविध प्रकाश आणि इतर सामग्रीचा कुशल वापर करुन त्यांनी निसर्गाचा एक महान चमत्कार आविष्कृत करणारा अनोखा प्रकाशवृक्ष निर्माण केला आहे. त्याचबरोबर फेरप्रक्रिया (रिसायकलिंग) ही रंजक कृती कशी ठरते, याचाही वस्तुपाठ घालून दिला आहे.

 ‘सिम्बॉयसिस’चे संस्थापक व अध्यक्ष, पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजूमदार यांच्या हस्ते आज ८१, क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रोड, पुणे येथे या शिल्पकृतीचे अनावरण झाले.

 ‘अर्बोल द ला लुझ’ ही शिल्पकृती ९ फूट उंच व एक टनाहून अधिक वजनाची आहे. त्यात १०० हून अधिक बाटल्या व किमान २५० प्रकाशांचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती साकारताना या तिघांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अन्वम आणि अन्विकाचे वडील अपूर्व नागपाल (अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – http://www.apurvnagpal.com) गेली अनेक वर्षे वापरलेल्या बाटल्या जमा करत होते. त्यातून त्यांना एक व्हिंटेज कार बनवायची होती. नंतर ती कल्पना सोडून देऊन त्यांनी यातून एक झाड निर्माण करण्याची साधी कल्पना मांडली. तेही तितके सोपे नव्हते.

 यासंदर्भात अन्वम राजपाल म्हणाला, “झाडाच्या प्रत्येक स्तराची जुळणी व जोडणी करणे, त्यातील प्रत्येक फांदीला प्रकाश देणे, तो पोकळ्यांमधून नागमोडी नेणे, या गोष्टी प्रकल्पाचा सर्वाधिक अवघड भाग होत्या. मात्र या आव्हानांवर मात करणे, तसेच गेले सहा महिने हा प्रकल्प काही थोड्या बाटल्यांपासून ते अगदी फांद्या आणि फळांनी परिपूर्ण अशा झाडापर्यंत पूर्ण होताना बघणे हीसुद्धा मोठी मौज होती.”

 सिद्धार्थ म्हणाला, “काचेला आधार देणे व तरीही ती लवचिक ठेवणे जेणेकरुन जसजसा प्रकल्प विकसित होत जाईल तसतशी रचना बदलेल, हा भाग मला सर्वात औत्सुक्याचा वाटला. बाटल्यांच्या कडा, विविध आकाराच्या बाटल्यांची उपलब्धता, त्यांचे रंग अशा सर्व घटकांनी ही रचना निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि रचना साकारताना अनेक स्रोतांकडून मतप्रदर्शनाचीही कमतरता नव्हती.”

 बाटल्या पडू न देता पक्क्या चिकटवण्याच्या कामात अन्विका गढून गेली होती. ती म्हणाली, “आम्ही या बाटल्या चिकटवलेल्या स्थितीत स्थिर राहाव्यात, यासाठी सुपरग्लू, सिलिकॉन, चिकणमाती व अगदी वायर वापरुन अनेक चाचण्या केल्या. अखेर विविध बाटल्या व आकारांची कल्पक रचना करुन आणि विशेषतः झाडाच्या वेगवेगळ्या भागांसाठी निरनिराळ्या माध्यमांचा एकत्रित वापर केल्याने आम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला.”

 हा प्रकल्प अगदी सहज साकारला नाही. उलट तो दमवणूक करणारा, कठीण, आव्हानात्मक आणि प्रसंगी निराशाजनकही होता. तरीही या तिघांसाठी तो अविस्मरणीय ठरला आणि काही बाटल्यांपासून अख्खे झाड साकारल्यावर ती कलाकृती प्रेरणादायी आणि समाधान देणारी ठरली. वापरलेल्या सामग्रीवर फेरप्रक्रिया करताना आपल्यातील कल्पकतेची उर्मी बाहेर काढणे, हे खरोखर परिपूर्तीचा अनुभव देणारे होते.

 ट्री ऑफ लाईट साकारणाऱ्या तिघा कलाकारांविषयी :

अन्वम नागपाल (वय १७) हा सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला विविध क्षेत्रांत रस आहे, ज्यात वादविवाद स्पर्धा (त्याने काही मॉक युएन्समध्ये विजेतेपदही मिळवले आहे.), फूटबॉल (नुकत्याच झालेल्या फूटबॉल कॅम्पमध्ये सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक), चित्रपट, संगीत, कला व छायाचित्रण (कल्पक इन्स्टाग्रामर) यांचा समावेश आहे. तो अनुभवी पर्यटकही आहे. त्याने वयाच्या दुसऱ्या वर्षीच आपली पारपत्र पुस्तिका (पासपोर्ट बुकलेट) पूर्ण केली होती.

 आर. सिद्धार्थ (वय २४) हा नुकताच आयआयएम अहमदाबादमधून उत्तीर्ण झाला आहे. (तेथे त्याने अपूर्व शिकवत असलेला अभ्यासक्रम निवडला होता.) सध्या तो आरबीएल बँकेच्या कॉर्पोरेट बँकिंग विभागाचा कर्मचारी आहे. त्याला इतिहास, वाचन, कला, गेमिंग व धावण्याच्या क्रीडाप्रकारात रस आहे. तो उत्तम खवय्या असून त्याला मित्रांसमवेत नव्या रेस्टॉरंट्समध्ये जाणे आवडते.

 अन्विका नागपाल (वय १२) ही व्हिबग्योर हाय इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. ती नृत्यपारंगत असून अनेक समूहनृत्यांमध्ये तिने प्रशंसनीय कामगिरी करुन दाखवली आहे. तिला हिंदी व इंग्रजी गाणी गाण्याची आवड असून ती गानवृंदामध्ये गायनाचा सराव करते. अन्विकाला जगभर प्रवास करण्याची आकांक्षा आहे. तिने गेल्या तीन फिफा वर्ल्ड कप फूटबॉल स्पर्धांना उपस्थिती लावली आहे.

‘युध्द नको बुद्ध हवा ‘, ‘हम सब एक है’ : घोषणांद्वारे दिला संदेश

0

णे :

गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ आणि ‘युवक क्रांती दल’ यांच्या संयुक्तपणे आज  सकाळी  ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात आले होते.

सेनापती बापट पुतळा, अलका चौक, सीटी पोस्ट अशा मार्गे ​​शनिवार वाडा येथे शांती मार्च चा समारोप झाला. शनिवार वाडा येथे ‘थाळीनाद’ करण्यात आला. जाहेदभाई, चित्रलेखा जेम्स् हे धर्मगुरू शांती मार्च मध्ये सहभागी झाले होते. संदीप बर्वे, अप्पा अनारसे, श्रीपाद ललवाणी, मयुरी शिंदे, यल्लपा धोत्रे, सचिन पांडोळे, अजय हाप्पे, अतूल पोटफोडे, जांभुवंत मनोहर आदी कार्यकर्त्यांनी शांतीमार्चचे संयोजन केले. माहेर संस्थेचे सदस्य, ‘कोपरे गाव’ चे ग्रामस्थ, मोहोळ विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

‘युध्द नको बुद्ध हवा’, ‘हम सब एक है’  अशा घोषणा देण्यात आल्या.प्रसंगी बोलताना संदीप बर्वे म्हणाले, ‘भारतीय राज्य घटनेवर निष्ठा असणार्‍या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन दंगलमुक्त समाजासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. यासाठी हा ‘शांती मार्च’ आयोजित करण्यात आला होता. पुणे शहर दंगलमुक्त राखण्याचा आमचा संकल्प व ठाम निर्धार आहे. समाजात अमन सर्वांत महत्त्वाचे असते. ‘ चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ‘हिंसामुक्त समाज हा प्रत्येक नागरिकाला अपेक्षित आहे. परंतु दुर्देवाने समाजातील काही घटकांच्या अविचारी कृत्यांमधून समाजातील शांतता ढळते. अशावेळी महात्मा गांधीचे विचार समाजात रुजण्याची आवश्यकता लक्षात येते. त्या दृष्टीने महात्मा गांधींच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन. हा दिवस जगभर ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. धर्म, जात, रंग, भाषा आणि अनेक कारणांसाठी भिन्न असणारे आपण भारतीय म्हणून एक आहोत. शेकडो वर्षांपासून एकोप्याने राहण्याची आपली समृद्ध परंपरा आहे.’

‘गांधी जयंती व जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने दंगलमुक्त, हिंसामुक्त समाजाच्या निर्मितीचा सामूहिक संकल्प करण्यासाठी या शांती मार्च चे आयोजन करण्यात येते’​.

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता अभियान संपन्न

0
पिंपरी-
महात्मा गांधी जयंती निमित्त मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्राबरोबरच जगभरातून संत ज्ञानेश्‍वर माउलीचे दर्शन घेण्यासाठी आणि आळंदी पाहण्यासाठी भाविक येत असतात. इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मात्र, नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम‘ाज्य झाले आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
माउलीचे दर्शन घेऊन इंद्रायणी नदीच्या तीरी आळंदीचे नगरसेवक अविनाश तापकीर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. संघातील सर्वानी पूर्ण नदीपात्र आणि घाट परिसर स्वच्छ केला. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे, माधव मनोरे, सूर्यकांत कुरुलकर, मधुकर चौधरी, श्रीधर साबळे, सुनील शिंपी, भरत वाघमारे, भरत गोरे, विष्णु केकाने, धनंजय सागर, सतीश बुळे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, संतोष मुठाळ, अनिल सुतार रणजित घुमरे, बंडू सोनवणे, किसनराव पालवे,  बळीराम माळी, दीपक जाधव , विनायक भोसले, मंजुनाथ कांबळे, संजय माळी, संजय घुमरे, अमित माळी, शहाजी शिंदे  आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाप्रसंगी अरुण पवार म्हणाले, आज नदीप्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. पर्यावरणाचे संवर्धन आपणच वेळ काढून केले पाहिजे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण स्वच्छता अभियान चालू ठेवले, तर सर्व नद्या, परिसर स्वच्छ होईल. तन-मन-धन अर्पण करून निस्वार्थपणे सेवा केल्यास फळ हे चागलेच मिळत असते.
माधव मनोरे म्हणाले, धर्माने काम केल्याशिवाय जगात काहीच साध्य होत नाही. सर्वांनी मिळून स्वच्छतेचे काम केल्यास पर्यावरण रक्षण होण्यास मदत होणार आहे. ह.भ.प. रामचंद्र राजभाये महाराज म्हणाले, की कर्म हे सुबक आणि तेजस्वी असावे. निष्ठेने केलेल्या कामालाच चांगले रूप येते. या स्वच्छता अभियानामुळे सर्व आळंदीकर समाधानी आहेत.
विजय सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने निलेश कणसे यांना ” उत्कृष्ट स्वछता दूत पुरस्कार ” देउन सन्मानित

0

पुणे-

स्वछता सेवा सप्ताहमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबाबदल पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश कणसे यांना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते  ” उत्कृष्ट स्वछता दूत  पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले . या पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी खासदार अनिल शिरोळे ,महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव आदी मान्यवर नगरसेवक वर्ग , बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

निलेश कणसे हे पंधरा ऑगस्ट चौकाचे अध्यक्ष असून कुंभार बावडी बाजारपेठ तसेच महात्मा गांधी मार्गावर त्यांनी स्वछता अभियान राबविले . तसेच पंधरा ऑगस्ट वृत्तपत्र वाचनालय ते संचालक आहेत . असे काम करण्याची प्रेरणा श्री. नाना धर्माधिकारी  प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाली आहे .