
Arjun gohad
पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात वैष्णवी आडकर हिने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आगेकुच केली.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत बिगर मानांकीत वैष्णवी आडकर हिने पाचव्या मानांकित शनाया नाईकचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित सान्या सिंगने राधिका महाजनवर ६-१, ६-२ असा सहज विजय मिळवला. सहाव्या मानांकित रिया वाशीमकरने विधी बर्मनला ६-३, ६-२ असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित गार्गी पवारने हर्षिता बांगेराचा ६-२, ६-२ असा पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात अर्जुन गोहड याने यशराज दळवीचा टायब्रेकमध्ये ६-३, ६-७(७), ६-१ असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या मानांकित सर्वेश बिरमाने याने एरीक नॅथनला ७-५, ६-१ असे नमविले. अव्वल मानांकित आदित्य बालसेकरने आर्य राजचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: मुले:
आदित्य बालसेकर(१)वि.वि.आर्य राज ६-०, ६-०;
आर्यन भाटिया(७)वि.वि.ऋषी जलोटा ६-३, ६-१;
सर्वेश बिरमाने(३)वि.वि.एरीक नॅथन ७-५, ६-१;
करीम खान वि.वि.साहेब सॊदी ६-३, ६-२;
अर्जुन कुंडू(५)वि.वि.सन्मय गांधी ७-५, ६-१;
संस्कार चोभे(४)वि.वि.हितेश यालाचिली ६-४, ६-२;
अर्जुन गोहड वि.वि.यशराज दळवी ६-३, ६-७(७), ६-१;
निखिल निरंजन(२)वि.वि.मानव जैन ६-३, ६-४;
मुली: सान्या सिंग(१)वि.वि.राधिका महाजन ६-१, ६-२;
रिया वाशीमकर(६)वि.वि.विधी बर्मन ६-३, ६-२;
मृणाल कुरळेकर वि.वि.जोस्ना मदाने ६-३, ६-३;
वैष्णवी आडकर वि.वि.शनाया नाईक(५)६-३, ६-२;
हृदया शहा(३)वि.वि.परी सिंग ६-३,७-६(१);
कामया परब वि.वि.चारिता पटलोला(८)६-१, ६-२;
गार्गी पवार(२)वि.वि.हर्षिता बांगेरा ६-२, ६-२.