Home Blog Page 3266

​’हेल्दी हार्ट क्लब’ची ​डॉक्टरांच्या संघावर मात !

0
पुणे :
जागतिक ह्रदय दिनानिमित्त मंगेशकर हॉस्पिटल तर्फे ‘हेल्दी हार्ट क्लब’ सदस्य  आणि ‘डॉक्टर्स इलेव्हन’ यांच्यात क्रिकेट मॅच घेण्यात आली.  ‘व्हीजन क्रिकेट ग्राऊंड’ (वडगाव फ्लायओव्हर जवळ, सिंहगड रस्ता) येथे आज (शुक्रवारी) झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये  ‘हेल्दी हार्ट क्लब’ सदस्यांचा संघ विजयी झाला. फिटनेस राखणाऱ्या ह्रदय रुग्णांचा सत्कार क्रिकेटपटू मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
 
हृदयरोगाबाबत जनजागृतीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सभागृहात जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. हृदय​रोग​ शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष साठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 

​हृदयरोग आणि हृदय शल्यचिकित्सा विभागाचे तज्ञ डॉक्टर

उपस्थित होते. 

 
मार्गदर्शन करताना डॉ. साठे म्हणाले, ‘जागतिक हृदयदिनानिमित्त हृदयरोगाबाबत जनजागृती करणे हा या क्रिकेट स्पर्धेचा प्रमुख हेतू होता. तंबाखु सेवन, अतिमद्यपान, व्यायामाचा अभाव, आहाराचा अनियमितपणा या गोष्टी टाळल्या तर 85 % लोकांमध्ये हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण टाळता येऊ शकते. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. 
 
यावेळी जागतिक हृदयदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील रुग्णांचा विशेष सत्कार

मिलिंद गुंजाळ यांच्या

हस्ते करण्यात आला. यामध्ये तीन महिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे, वजनावरील नियंत्रण आणि मधुमेहावरील नियंत्रण या स्पर्धांचा समावेश होता.

​’कार्डियाक रिहॅब’च्या टीम ने या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. ​
 
डॉ. शिरीष साठे यांनी कार्यक्रमाचे

​सूत्रसंचालन आणि ​

प्रास्ताविक केले

तर डॉ. आफताब यांनी आभार मानले.

याप्रसंगी खेळाडूंच्या फिटनेसचे किस्से मिलिंद गुंजाळ यांनी सांगितले. ते म्हणाले ‘कपील देव यांचा सुरूवातीचा व्यायाम, ५

​ ते ७​

किलोमीटर पळणे,

​भरपूर

दूध पिणे असा असायचा. गावसकर यांचा डाएट कंट्रोल, फीटनेस अजूनही चांगला आहे.

​ ​

जलतरणपटू अमर आढाव १६ वेळा सिंहगड चढला, लिमका रेकॉर्ड केले. खेळाडूंनी मनाने खंबीर

​ ​

असणे महत्वाचे असते.’

 
खेळाडूंच्या जेवण्याच्या, व्यायामाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या कसोशीने पाळतात

​,​

असेही त्यांनी सांगितले

ते पुढे म्हणाले, ‘खेळातून प्रेरणा आणि ताकद मिळते. माझ्या वडिलांनी एकही आजारपणाची रजा घेतली नाही. मीही एकही वैद्यकीय बिल कंपनीकडे पाठविले नाही. ‘खेळून आनंदी रहा, फिट रहा ‘ हा संदेश चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. ‘

“सीक्रेट सुपरस्टार” के प्रचार हेतु आमिर खान ने तुर्की के लिए भरी उड़ान!

आमिर खान फिलहाल अपनी आगामी फिल्म सीक्रेट सुपरस्टार के प्रचार में व्यस्त है और इसिलए सिलसिले में तुर्की रवाना हो गए है।

विराट कोहली के साथ दिवाली विशेष चैट शो के लिए अभिनेता सिंगापुर से भारत आये थे। सीक्रेट सुपरस्टार के प्रचार के लिए दोनो दिग्गज़ पहली बार एक मंच साझा करते हुए नज़र आएंगे।

आमिर फ़िल्म के प्रचार मे कोई कसर नही छोड़ रहे है इसिलए भारत मे फ़िल्म का प्रचार करने के बाद अब अभिनेता ने विदेशी बाजार की ओर अपना रुख़ कर लिया है।

आमिर खान, जो निर्माता-अभिनेता के रूप में सीक्रेट सुपरस्टार और ठग्स ऑफ हिंदुस्तान के बीच काफी तालमेल बिठाने की कोशिश कर रहे है, उन्होंने अवधि नाटक के फिल्मांकन से एक ब्रेक ले लिया है।

अभिनेता फिलहाल पूरी तरह से सीक्रेट सुपरस्टार के प्रचार में व्यस्त है और दीपावली के बाद शूटिंग शुरू करेंगे।

सेक्रेर सुपरस्टार,  ज़ैरा वासीम द्वारा निभाई गयी इसिलेग नाम की एक किशोर लड़की पर आधारित है, जो अपनी पहचान को छुपाते हुए सिंगिंग सुपरस्टार होने के अपने सपने को पूरा करने के लिए निर्धारित है।

फिल्म में आमिर खान एक विचित्र चरित्र संगीतकार शक्ति कुमार के रूप में नज़र आएंगे ।

फिल्म के ट्रेलर और पहले जारी किए गए गाने सभी तिमाहियों से बहुत प्यार और प्रशंसा प्राप्त कर रहे हैं।

अद्वैत चंदन द्वारा लिखित और निर्देशित “सीक्रेट सुपरस्टार”, आमिर खान, किरण राव, ज़ी स्टूडियोज और आकाश चावला द्वारा निर्मित है। फ़िल्म इस दीवाली 19 अक्टूबर पर नज़दीकी सिनेमाघरों में दस्तक देगी।

एकूणच सध्याची स्थिती हि ‘थापाड्या’ साठी योग्य आहे – अजितदादा पवार – “थापाड्या”या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न.

0
“जो पर्यंत चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तो पर्यंत दादा कोंडकेंना लोक विसरणे शक्यच नाही एवढे सातत्याने ओळीने चित्रपट रौप्य महोत्सवी द्यायचे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही मात्र ते त्यांनी त्यांच्या मेहनतीने व कामातून करून दाखवले त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काम करत असतांना जीव ओतून त्याच्या मध्ये काम केले पाहिजे व त्यातून प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे.
मी या क्षेत्रापासून थोडा लांबच राहिलो असल्याने आज दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी सांगितल्या प्रमाणे जीवनात पहिल्यांदाच चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि तो हि ‘थापाड्या’ सारखा नावाच्या चित्रपटाला त्यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न येणे साहजिकच आहे मात्र गेल्या तीन साडेतीन वर्षापासून आपण सगळेच बघतो आहोत कि कश्या प्रकारे थापा चाललेल्या असून लोकांना बनवण्याचे काम चालू आहे कदाचित त्याच्यातूनच भाऊ साहेबांना ‘थापाड्या’ हे नाव सुचले असावे असे मला वाटते आहे. मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी त्या भूमिकेतून हे बोलत नसून आता सहनशीलतेचा अंत झाला आहे असे मला वाटते पण आता लोकांना जाणवू लागले आहे कि हे फसवण्याचे काम चालू आहे त्यावेळस मग कोणीही असले तरी लोक गप्प बसत नाहीत आणि म्हणूनच या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव समर्पक आहे असा माझा कयास आहे तो कदाचित चुकीचा असेल कदाचित बरोबर असेल.” मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, भाऊसाहेब भोईर व शरद मस्के याची निर्मिती असलेला अजित शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मंगळवारी मुंबईत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताला आपली उपस्थिती का हे सांगितले.
निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले “लहान वया मध्ये ज्या कल्पना सुचत असतात त्याला मूर्त स्वरूप येण्यासाठी योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटावी लागते असे अजितदादा पवार माझ्या जीवनात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीत नफा नसतानाही मी  थापाड्या हा चौथा चित्रपट काढू शकलो ते फक्त अजितदादाच्या आशीर्वादाने. मला बऱ्याच जणांनी विचारले या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव देणे कसे सुचले तेव्हा मी त्यांना सांगितले कि आज काल या नावाला बरे दिवस आल्याने हेच नाव देण्याचे ठरवले.”
नाट्यचळवळीत आज जी काही थोडी फार उर्जितावस्था आहे ती अजित दादांच्या प्रयत्नामुळेच असे माझे मंत आहे. आम्ही मानसी फिल्म प्रॉडक्शनच्या वतीने ज्यांना कोणतीही चित्रपटाची पार्श्वभूमी नाही अश्या कलाकारांना संधी देवून नवीन कलाकार घडवण्याचे कार्य करत आहोत.
यावेळेस मोहन जोशी यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड या तीन कलाकारांनी स्कीट सादर केले त्यानंतर या तिन्ही कलाकारांचे अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, निर्मात्या संघाचा अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निर्माते भाऊसाहेब भोईर, शरद मस्के व इतर मान्यवर हजर होते.
सरते शेवटी मानसी मुसळे यांनी “थाप मारुनी थापाड्या गेला” या लावणी वरती लावणी सादर केली.

कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय ‘मेक इन इंडिया ‘ यशस्वी होणार नाही

0
पुणे :
कृषी क्षेत्राचा सरकारी मदतीसह विकास झाल्याशिवाय ‘मेक इन इंडिया ‘ हे अभियान पूर्ण होणार नाही ‘ असा सूर महात्मा गांधी स्मारक निधी आयोजित कार्यशाळेत उमटला . गांधीभवन येथे  ‘मेक इन इंडिया आणि शेती ‘ या विषयावरील कार्यशाळेत शेतकरी तज्ज्ञ विजय जावंधिया ,अर्थशास्त्राचे अभ्यासक मिलिंद मुरुगकर आणि डॉ कुमार सप्तर्षी सहभागी झाले .
गांधीभवन कोथरूड येथे झालेल्या या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला .
मिलिंद मुरुगकर म्हणाले ,’मेक इन इंडिया ‘ अभियानाचे अपील कमी झाले आहे . चीन प्रमाणे आपण निर्मिती करणारे अग्रगण्य राष्ट्र होऊ आणि जग आपला खरेदीदार होईल अशी शक्यता नाही . कृषी क्षेत्रातील लोकसंख्येची क्रयशक्ती वाढली तर अन्य क्षेत्रांवर त्याचा चांगला परिणाम होईल ,आणि अर्थव्यवस्था सुधारेल . शेती क्षेत्राचा विकास होण्याकडे सरकारचा आग्रह असला पाहिजे. प्रगत देशांप्रमाणे शेतीवर अवलंबून लोकसंख्या इतर क्षेत्रांकडे वळेल असे नाही . या क्षेत्राची क्रयशक्ती वाढली तर  पुढे बिगरशेती आणि कौशल्य विकासाकडे शेतीतील लोकसंख्या वळू शकेल .तोपर्यंत मेक इन इंडिया ‘अभियान देखील यशस्वी होऊ शकणार नाही .
विजय जावंधिया म्हणाले ,’आजची शेती परिस्थिती  ही १९८०-९० च्या काळापेक्षाही प्रतिकूल झाली आहे . तरीही आंदोलने होत नाहीत . एकरी उत्पादन वाढविणे आणि सिंचन वाढवणे,नवे तंत्रज्ञान  हा शेतीच्या समस्येवरील उपाय नाही ,तर त्यांना इतर क्षेत्राप्रमाणे प्रगतीचे आर्थिक फायदे देणे हा उपाय आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी  म्हणतात की २०२२ मध्ये शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट केले जाईल . ते तर दुप्पट होणार नाही . मात्र २०२६ साली आठवा वेतन आयोग येईल तेव्हा नोकरदार आणि शेतकरी यांच्या उत्पन्नात भलीमोठी दरी निर्माण झाली असेल . सरकारी धोरणे शेतीपूरक करणे हा एकमेव उपाय आहे .
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ  सप्तर्षी म्हणाले ,’शेतीकडे राजकारण्यांचे लक्ष नाही . आणि शेतकरी नेत्यांनी  पूर्वीपासून शेतकऱ्यांचे कैवारी होण्याच्या नादात सामूहिक पुरुषार्थाचा बळी दिला आहे . त्यामुळे त्या -त्या काळात शेतकरी नेते मोठे झाले असले तरी शेतकरी चळवळीची हानी झाली आहे .
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले

‘पोलिस काका ‘ योजनेसंबंधी संबधी मार्गदर्शन कार्यशाळा

0

पुणे :पुणे पोलीस दलाच्या ‘पोलिस काका ‘ योजनेसंबंधी संबधी मार्गदर्शन कार्यशाळा
अॅग्लो उर्दु गर्ल्स हायस्कूल व
आबेदा इनामदार मुलींचे ज्युनियर कॉलेज, आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे
येथे घेण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अमित घुले (API), पुणे व रफीक इनामदार (पोलिस काका), प्राचार्य आएशा शेख,व सय्यद गफ्फार उपप्राचार्य.
शिक्षक व सुमारे 1000 विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी
पोलिस अधिकार्यांना सुरक्षा संबंधित अनेक प्रश्न विचारले व त्यांचे शंका
समाधान करण्यात आले. मा. रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त पुणे यांच्या
‘पोलिस काका’ या संकल्पनेला हा सकारात्मक सहभाग आहे आणि
संस्थेतर्फे आम्ही पोलिस विभागाचे आभार मानत आहोत ‘असे प्राचार्य आयेशा शेख यांनी सांगितले

प्रधानमंत्री पीक वीमा योजना तपशील जाहिर

0

पुणे : प्रधान मंत्री पीक वीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पीक वीमा योजना सन 2017-18 आंबिया बहारामध्ये फळपिकांना लागु करण्यात आली आहे.

या योजनेचा उदेश कमी/जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व आर्द्रता या हवामान धोक्यापासुन निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे असा आहे पुणे जिल्ह्यातील पेरु, द्राक्षे, डाळींब, केळी, आंबा, लिंबु, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकासाठी सदर योजना इफको टोकीयो जनरल इंन्श्योरन्स कंपनीमार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे.

या योजनेसाठी पुणे जिल्ह्याकरीता फळपिकनिहाय अधिसूचित तालुके पुढीलप्रमाणे आहेत. फळपिकनिहाय अधिसुचित महसुल मंडळामध्ये हि योजना राबविण्यात येणार असून त्याचा तपशिल पुढील प्रमाणे

अ.क्र फळ पीक तालुके
1 आंबा दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर
2 डाळिंब दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली
3 द्राक्षे दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर
4 केळी दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, खेड, हवेली, शिरुर
5 मोसंबी इंदापुर
6 संत्रा शिरुर
7 पेरु बारामती, दौंड, हवेली, भारे, पुरंदर, शिरुर
8 लिंबु शिरुर, बारामती, दौंड

 

कर्जदार/बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा प्रस्ताव बॅकांना सादर करण्याची अंतिम मुदत व प्रति हेक्टर विमा हप्ता पुढील प्रमाणे आहे.

 

अ.क्र पीक शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर अंतिम मुदत
1 पेरु 2500/- 31 ऑक्टोबर
2 द्राक्षे 14000/- 15 ऑक्टोबर
3 डाळींब 5500/- 31 ऑक्टोबर
4 केळी 6000/- 31 ऑक्टोबर
5 आंबा 5500/- 31 डिसेंबर
6 लिंबु 3000/- 14 नोव्हेंबर
7 मोसंबी 3500/- 31 ऑक्टोबर
8 संत्रा 3500/- 30 नोव्हेंबर

 

 

 

 

सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अनिवार्य असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत हवामानातील बदलामुळे म्हणजेच अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान, यामुळे फुलधारणा व फळ धारणेच्या कालावधीत होणाऱ्या संभाव्य नुकसानीस विमा संरक्षण देय राहील, योजनेमध्ये शेतकऱ्यांनी विमासंरक्षीत रकमेच्या केवळ 5 टक्के विमा हप्ता भरावयाचे आहे. या योजनेत नुकसान भरपाई महसुल मंडळस्तरावरील स्वंयचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार देण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्ताक्षेप राहणार नाही.

अधिसुचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

१३ ऑक्टोबरला वाक्या चित्रपटगृहात

0

वास्तववादी सिनेमे प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात हे लक्षात घेत सामाजिक भान जपणाऱ्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात सातत्याने होत आहे. भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत या उद्देशाने वाक्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भटक्या समाजातील वंचिताना आपण आजही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही हे वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दिपक कदम यांनी वाक्या या चित्रपटातून केला आहे. माऊली निर्मित व आर.पी प्रोडक्शन प्रस्तुत वाक्या येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

पोतराजाच्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. विकासापासून दूर राहिलेला हा समाज आजही फार  बदललेला नाही. वंशपरांपरगत चालत आलेल्या रूढीपरंपरा आणि अंधश्रध्दा यांच्या दलदलीतून बाहेर पडणे त्यांना आजही शक्य झालेले नाही. या सर्व परिस्थितीला सामोरे जात यातून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करणाऱ्या पोतराजाच्या संघर्षाची कहाणी वाक्या चित्रपट मांडतो.

अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये वाक्या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली आहे. या चित्रपटामध्ये पोतराजची भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी तर घुम्या हे पात्र अभिनेता अभिजित कुलकर्णी याने साकारले आहे. या दोघांसोबत किशोरी शहाणे, प्रेमा किरण, गणेश यादव,  प्रियांका ज्ञानलक्ष्मी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी व प्रियांका ज्ञानलक्ष्मी यांचे आहेत. चित्रपटाची गीते बिपिन धायगुडे यांनी लिहिली असून संगीत देव आशिष यांचे आहे. छायांकन त्रिलोक चौधरी तर संकलन विनोद चौरसिया यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन अनिल सुतार, महेश चव्हाण यांनी केले असून कलादिग्दर्शन मधु कांबळे यांचं आहे. राजेंद्र पडोळे व दिपक कदम चित्रपटाचे निर्माते असून कार्यकारी निर्माते विनोद कुमार बरई आहेत. १३ ऑक्टोबरला वाक्या सर्वत्र प्रदर्शित होईल.

रशियातून शिक्षण घेतलेल्या दर्जेदार व कार्यक्षम डॉक्टरांची भारताला आवश्यकता : डॉ. अमित कामले

0

पुणे : ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’च्या (एकेईसी) रशियात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी जाणाऱ्या वर्ष २०१७-१८ च्या बॅचचे विद्यार्थी प्रस्थानपूर्व विद्यार्थी पालक मेळाव्याच्या निमित्ताने येथील शेरेटॉन ग्रँड हॉटेलमध्ये नुकतेच एकत्र आले. ही बॅच रशियातील ‘इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी’त एमबीबीएस अभ्यासक्रम शिकण्यासाठी रवाना झाली आहे. मेळाव्यात विद्यार्थी व पालकांचे डॉ. अमित कामले व पोर्णिमा कामले यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी उपस्थित होते. समारंभाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पहिलीच भारतीय बॅच आहे जिने कालिनिनग्राड येथील इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये निवड होण्यापूर्वी रशियन सरकारची रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयातील प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत पुण्याची शमिका मुरुडकर व मुंबईची शिवानी खांडलीकर या दोघींनी अव्वल स्थान पटकावले आहे. बॅचमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक वाचनासाठीची भारतीय पुस्तके ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सने पुरवली होती.

शपथ ग्रहण समारंभात (हिप्पोक्रॅटिक ऑथ सेरेमनी) या विद्यार्थ्यांनी उत्तम आणि उदात्त डॉक्टर बनण्याची प्रतिज्ञा केली. ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’चे संचालक डॉ. अमित कामले यांनी पालक व विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रवासाचे कानमंत्र, रशियातील शहरात व युनिव्हर्सिटी परिसरातील सुरक्षा, नोंदणी व व्हिसाचे नियम, अभ्यासक्रम, परीक्षा, सुट्या, पालक आणि विद्यार्थ्यांची वर्तणूक व जबाबदारी आदी पैलूंवर मार्गदर्शन केले. डॉ. कामले म्हणाले, “ भारताला आज रशियातून शिक्षण घेतलेल्या दर्जेदार व कार्यक्षम डॉक्टरांची गरज आहे. इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी त्यांच्या विकसित कॅम्पसमध्ये केवळ गुणवत्ताधारक भारतीय विद्यार्थ्यांची निवड करत असल्याचा मला आनंद आहे. केवळ गुणवत्ताधारक भारतीय विद्यार्थ्यांची नोंदणी होणे ही काळाची गरज आहे.” भाषणानंतर डॉ. कामले यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

याप्रसंगी शमिका मुरुडकरचे वडील डॉ. शिरीष मुरुडकर म्हणाले, “विद्यार्थ्याला स्वीकारण्यापूर्वी त्याचे ज्ञान व सुप्त क्षमता यांची चाचणी घेण्याची संकल्पना हा रशियन फेडरल युनिव्हर्सिटींचा अत्यंत उत्तम पुढाकार आहे, कारण एमबीबीएस अभ्यासक्रम देऊ करणाऱ्या प्रमुख देशांत प्रवेश परीक्षाच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन भारतात परतल्यावर एमसीआय चाचणी उत्तीर्ण करणे अवघड जाते.”

शिवानी खांडलीकरचे वडील श्याम खांडलीकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “या मेळाव्याला उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद झाला. डॉ. अमित कामले यांच्यासारख्या ध्येयवादी व्यक्तीशी संपर्कात आल्याने, तसेच ‘ए.के.ई.सी’ संस्था स्वतःला परिवार समजून देत असलेला उत्तम व्यावसायिक, स्नेहाचा आणि माणुसकीचा दृष्टीकोन यामुळे एक पालक म्हणून मी समाधानी आहे.”

210 कोथरुड विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम

0

पुणे, दि. 5: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांसाठी विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 210 कोथरुड विधानसभा मतदार संघातील मतदारांनी 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत नावनोंदणी करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, 210-कोथरुड विधानसभा मतदार संघ, पुणे यांनी केले आहे. या मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्व पात्र मतदारांचे अर्ज 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी पात्र मतदारांनी नमुना क्रमांक 6 चे अर्ज, तर मयतांची नावे वगळ्यासाठी नमुना क्रमांक 7 चे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.

मतदारांच्या सोयीसाठी दुसऱ्या व चौथ्या रविवारी  (दि. 8 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर 2017 रोजी) विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदार केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदारनोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 210 कोथरुड विधानसभा मतदार संघ, पुणे कर्वेरोड क्षेत्रीय रेल्वे बुकींग कार्यालया शेजारी, पुणे तसेच सर्व मतदान केंद्रे या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून पात्र मतदारांनी छायाचित्र मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे, असे आवाहन 210 कोथरुड विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

अतिक्रमणावर जबर दंडाच्या इलाजाचा तीव्र निषेध

0

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे  संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केला तीव्र निषेध

पुणे-देशात  राज्यात महागाई वाढल्यामुळे रोजगार हि नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी पदपथावर स्टोल अथवा हातगाडी यांच्यावर छोटे व्यवसाय घटक उपजिवेविकेचे साधन म्हणून जगत असताना अतिक्रमणावर जबर दंडाचा इलाज दाखवून अतिक्रमण थोपविण्याचा या कारवाईचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे  संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी तीव्र निषेध केला आहे .

वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्याच्या नागरी भागात फेरीवाल्याच्या संदर्भात राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्या दृष्टिकोनातून नगर रचना विभागाचे आणि भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या पथ विक्रेत्याबाबतचे पथविक्रेत्याचा उपजीविकेचे रक्षण आदी नियम कायदा ५ मार्च २०१४ रोजी धोरणात्मक असलेला फेरीवाला पथारी कायद्याचा प्रामुख्याने निराधार महिला विधवा महिला मागासवर्गीय अपंग प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारातील असलेले तरुण तरुणींना प्राधान्याने वरील धोरणाने परवाना देण्याचे निश्चित केलेल्या कायद्याचे महापालिका दुर्लक्ष करीत आहे .

वरील धोरणानुसार परिसरात असणाऱ्या व्यवसायकांची पथधारकांची अर्ज व गणना करून नाममात्र दर घेऊन त्यांना परवाना व ओळखपत्र देण्याचे निर्देश आहे . ते निर्देश  शहर सुधारणा समितीने न तपासता आणि अंत्यंत दुर्बल घटकातील पथव्यावसायिकांना अतिक्रमनाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा धोरणाच्या तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . दहाहजार ते वीस हजार रुपयांचा दंड म्हणजे अट्टल गुन्हेगारामध्ये पथविक्रेत्यांच्या विरोधात असून त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी न करता व्यवसायिकांची स्थळे अद्यापही निश्चित झालेली नाहीत . त्याकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख माधव जगताप हे अत्यन्त भांडवल व्यवसायिकाकडे असलेली मोठी अतिक्रमणे पाडण्यास त्यांचे धाडस होत नाही . पण रस्त्यावर बैठा पथारी व्यवसायिक हा अतिक्रमण म्हणून त्यांच्याकडे पाहून त्या गरीबाला मारण्याचे धोरण होत असल्यामुळे हि चिंतेची बाब बनली आहे . अशी माहिती  भगवानराव वैराट यांनी या पत्रकाद्वारे दिले .

लोकशाहीवाद आणि सत्याच्या मार्गाने दहशतवाद कमी करता येईल :

0
‘आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दहशतवादाचे स्वरूप ‘ विषयावरील कार्यशाळेचा सूर
पुणे :
शांततामय सहअस्तित्व हेच सर्व धर्मांची शिकवण असल्याने धर्माचे मूळ स्वरूप जाणणे ,सत्य तसेच  लोकशाहीवादी मार्गावर  चालण्यानेच दहशतवादाचा धोका कमी होऊ शकतो ‘असा सूर ‘आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दहशतवादाचे स्वरूप ‘या कार्यशाळेत उमटला .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ निमित्त आयोजित ही कार्यशाळा गांधी भवन येथे झाली .साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख ,भारत बचाओ आंदोलनाचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक फिरोझ मिठीबोरवाला यांनी मार्गदर्शन केले .  डॉ कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते .
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले ,’ असंतोषातून , आंतरराष्ट्रीय धोरणे ,स्पर्धा यातून  दहशतवादाचा जन्म होतो . सर्वच धर्मात कमी जास्त प्रमाणात दहशतवाद आहे . मुस्लिम दहशतवाद जगातील अधिक देशात आहे . हा दहशतवाद इस्लामच्या मूळ प्रेरणेशी विसंगत आहे ,हे समजून सांगण्याची गरज आहे . इस्लामचा मूळ प्रवाह शांतता आणि शिक्षणाचा आहे . जागतिक स्तरावर अमेरिकेची दंडेलशाही देखील दहशतवादाला कारणीभूत आहे . या पार्श्वभूमीवर भारतीय लोकशाही बळकट असल्याने आणि गांधी विचारामुळे भारत दहशतवादी देश होणार  नाही .  इतरत्र लोकशाहीवाद आणि सत्याच्या मार्गाने दहशतवाद कमी करता येईल. लोकांना दहशतवादाचा तिटकारा येणेही महत्वाचे आहे . भारताशी वैराची भूमिका घेतल्याशिवाय जगता येणार नाही असे पाकिस्तानला वाटते ,त्यामुळे त्यांच्याकडून दहशतवादाचे प्रयत्न चालू राहतात
फिरोज मिठीबोरवाला म्हणाले ,’जागतिक दहशतवादाच्या उगमाबाबत अमेरिकेची भूमिका संशयास्पद आहे . कोणत्याही काळातील दहशतवादामुळे कोणाचा फायदा झाला याचा अभ्यास केला पाहिजे . अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटर वर कोणी हल्ला केला याबाबत अनेक मतांतरे आहेत ,अमेरिकाच या हल्ल्यामागे होती ,असेही एक संशोधन आहे .  त्यांनतर च्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमुळे कोणाचा फायदा झाला ,हे समजून घेतले की या संशोधनाचे महत्व कळते . दहशतवाद हे राजकारणाचे हत्यार बनविण्यात आले असून भय आणि द्वेष निर्माण केला जात आहे . नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकीची स्पर्धा हेही आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे एक कारण आहे .
डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’भावनात्मक विचार केल्याने धर्मांचा संघर्ष होतो ,म्हणून बुद्धी बंद पडण्यापासून आपला बचाव केला पाहिजे . धर्माने हिंसेचा मार्ग स्वीकारला तर तो धर्म न राहता अधर्म होतो . भारताने जगाला शांततामय सहजीवनाचा आदर्श दिला आहे . सहअस्तित्व आणि मानवता यांच्या प्रयोगाची भारत ही जागतिक प्रयोगशाळा आहे ,या प्रयोगशाळेच्या धोका पोहोचता कामा नये .
संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले . यावेळी अन्वर राजन ,डॉ उर्मिला सप्तर्षी ,जांबुवंत मनोहर इत्यादी उपस्थित होते

रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आर्यन भाटिया, हृदया शहा अंतिम फेरीत प्रवेश

0

पाचगणी, दि.5 ऑक्टोबर  2017- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन भाटिया याने, तर मुलींच्या गटात हृदया शहा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या फेरीत सातव्या मानांकित आर्यन भाटियाने तिसऱ्या मानांकित सर्वेश बिरमानेचा ६-४, ६-० असा पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची नोंद केली.  दुसऱ्या मानांकित  निखिल निरंजनने चौथ्या मानांकित संस्कार चोभेचा टायब्रेकमध्ये ६-४, ७-६(७) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आर्यन भाटियाचा सामना  निखिल निरंजन याच्याशी होणार आहे.

मुलींच्या गटात  तिसऱ्या मानांकित हृदया शहाने दुसऱ्या मानांकित गार्गी पवारचा ६-३, ६-० असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित सान्या सिंग हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत श्रीचंद्रा टेंटूचे आव्हान २-६, ६-२, ७-५ असे संपुष्टात आणले.

दुहेरीत मुलांच्या गटात सर्वेश बिरमाने  याने निरंजन निखिलच्या साथीत संदेश कुरळे व एरीक नॅथन यांचा ६-१, ६-० असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली . चौथ्या मानंकित हितेश पी. व आर्य राज यांनी हितेश यालामांचीली व हर्षा कुमार यांचा टायब्रेकमध्ये ७-६(५), ६-२ असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: मुले:

आर्यन भाटिया(७)वि.वि.सर्वेश बिरमाने(३)६-४, ६-०;

निखिल निरंजन(२)वि.वि.संस्कार चोभे(४)६-४, ७-६(७);

मुली: सान्या सिंग(१)वि.वि.श्रीचंद्रा टेंटू २-६, ६-२, ७-५;

हृदया शहा(३)वि.वि.गार्गी पवार(२)६-३, ६-०; 

 

दुहेरी गट: मुले: उपांत्यपूर्व फेरी:

सर्वेश बिरमाने/निरंजन निखिल(१)वि.वि.संदेश कुरळे/एरीक नॅथन ६-१, ६-०;

हितेश पी./आर्य राज(४)वि.वि.हितेश यालामांचीली/हर्षा कुमार ७-६(५), ६-२;

अर्जुन कुंडू/संस्कार चोभे वि.वि.फैज नस्याम/ऋषी जलोटा ६-३, ६-२;

आदित्य बालसेकर/आर्यन भाटिया वि.वि.अर्जुन गोहड/यशराज दळवी ६-१, ६-२;

मुली: गार्गी पवार/हृदया शहा(१)वि.वि.श्रीचंद्रा टेंटू/रिया भोसले ४-६, ६-३, १०-६;

राधिका महाजन/इशिता जाधव(४)वि.वि. मृणाल कुरळेकर/मृण्मयी भागवत ६-३, ६-३;

कथा बिरमाने/हर्षिता बांगेरा वि.वि.सहित्या वदेरिया/चारिता पटलोला ४-६, ६-४, १०-१;

शनाया नाईक/सान्या सिंग(२)वि.वि.शुभ्रांजली सुभ्रता/परी सिंग ६-३, ६-२.

पुणे तिथे काय उणे ; अखेर नगरसेवकांनी उचलला कचरा (व्हिडीओ)

0

पुणे- महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान असले काही नाही … पण कचरा चोहीकडे … दिसतो आहे, समस्येने ग्रासलेल्या खराडीच्या नगरसेवकांनी ..अधिकाऱ्याना फैलावर घेतलं. पण कारणं,आणि समस्या जागेवरच अशा स्थितीने वैतागलेल्या महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव या दोन नगरसेवकांनी अखे कचरा उचलायला स्वतः सुरुवात केली . पण शेवटी नगरसेवकच ते .. मर्यादा आहे त्यांना .. 2 टनावर थांबले आणि पुन्हा अधिकाऱ्याकडे निघाले , पण अधिकारी गायब .. शेवटी प्रतीकात्मक म्हणून तिथे 2 कचऱ्याच्या थैल्या ठेवल्या . आणि रिकाम्या खुर्चीची आरती केली .. देवा सुबुद्धी दे … कचऱ्यापासून.. अस्वछतेपासून पुण्याला मुक्ती दे … पहा एक व्हिडीओ…

हडपसरला पुण्याची कचरापेटी करू देणार नाही – चेतन पाटील (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील सध्या भाजपवर खूपच संतापलेले आहेत . हडपसरला ते पुण्याची कचरापेटी बनवू पाहत आहेत . केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी यांचे हे उद्योग सुरु आहेत. आपण हे कदापि यशस्वी होऊ देणार नाही असे तुपे पाटील म्हणतात. पहा आणि ऐका .. चेतन पाटील नेमके काय काय म्हणाले …

महापालिकेतील सर्वपक्षीयांची धमाल सहल ‘ माऊंटाबू’ नक्की जाणार ?

0

पुणे-एरवी नेहमी एकमेकांवर कुरघोड्या करणारे ,एकमेकांवर सडकून टीका करणारे, एकमेकांचे पाय खेचणारे,राजकारणाने पछाडलेले सर्व पक्षातील नगरसेवक,… या निमित्ताने एकत्र येवून ,एकत्र राहून  थंड डोक्याने महापालिकेच्या कायद्यांचा ,अंदाजपत्रकाचा ,आणि सभाशास्त्राचा अभ्यास करणार आहेत . या निमित्ताने म्हणजे   राजस्थानातील माऊंटाबू येथील सहलीच्या ..छे ,सहलीच्या नका म्हणू , अभ्यास दौऱ्या च्या निमित्ताने… म्हणा .
आता सगळ्याचा पक्षांचे नगरसेवक एकत्र असा अभ्यास करणार असतील तर त्यास हरकत कोणी घेवू नये .पण असा खरा प्लान तर महापलिकेत शिजतो आहे. महिला नगरसेविका असलेल्या एका समितीच्या अध्यक्षाने याबाबत महापौरांना आणि महापौरांनी सर्वांनाच या सहलीचे एकत्र आवत्न धाडलं आहे . आणि बहुतेक सारे तयार ही आहेत ,पण आता जायचं कसं? खर्चाचा भार पेलायचा कसा, याबाबत अजून तरी, कोणी काही बोलत नाहीये .पण तारीख तर ठरलेली दिसतेय . पत्रातच उल्लेख आहे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंट नावाच्या संस्थेनं या अभ्यास शिबीराच आवतनपाठवलं आहे . याबाबत १० जून ला च त्यांनी पत्र धाडलं होतं.हे शिबीर ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी म्हणजे असे केवळ दोनच दिवस ठेवलं आहे . अनेक गोष्टींना पालिकेकडे पैसे नसले तरी , असे सारे ‘हम साथ साथ है ‘ म्हणून गोडीगुलाबीने पालिकेच्या कायद्याचा अभ्यास थंड डोक्याने करण्यासाठी
माऊंटाबू ला जाणार असतील तर निश्चितच  त्यांना पैसे उपलब्ध होतील यात शंका कोणी घेवू नये .