Home Blog Page 3264

मोहरमनिमित्त शिया समाजबांधवांच्यावतीने इमामपाड्यापासून पंजांची मिरवणुक

0

         पुणे-   मोहरमनिमित्त शिया समाजबांधवांच्यावतीने इमामपाड्यापासून पंजांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली .हि नवव्या मोहरमची मिरवणूक  अली सोमजी रोड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , मुदलियार रोड , पावर हाऊस , संत कबीर चौक , इस्लामपूरा , लक्ष्मी रोड , शरबतवाला चौक , , छत्रपती शिवाजी मार्केट , बाबाजान चौक , भोपळे चौक , कोहिनुर हॉटेल चौक , महात्मा गांधी रोडमार्गे गवळी वाडा येथून इमामपाडा येथे समाप्त करण्यात आली .

दहाव्या मोहरमची मिरवणूक इमामपाडा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , नेहरू मेमोरियल हॉल , साधू वासवानी रोड , साधू वासवानी चौक मार्गे आगाखान बंगला पर्यंत काढण्यात आली . यावेळी पुणे चौपाटी येथे  अली सोमजी फाऊंडेशनच्यावतीने शरबतवाटप करण्यात आले .

महसूलमंत्री साहेब ,पुणेकर रसिकांचे ६९ लाख खाणाऱ्याना काही शिक्षा नाही काय ?

0

पुणे – पूर्वीचा कुख्यात जकात चोर बॉलीवूडच्या स्टार समवेत हसताना खिदळताना पुणेकर आणि महाराष्ट्र पाहतो आहेच . अशाच प्रकारे  ग्राहकांकडून अनेक ठिकाणी व्यापारी शासकीय कर वसूल करतात पण तो हडप करून स्वतःची गरिबी गडप करून मोठ्ठे होतात अशाच प्रकारे पुण्यातील सिने रसिकांना देखील गंडवण्याचे प्रकार कित्येक वर्षांपासून सुरु आहेत मात्र सरकार अशा गब्बरांना नेहमीच पाठीशी घालीत आल्याचे चित्र ही वारंवार दिसून आले आहे .

करमणूक कर माफ असताना शहरातील सहा बड्या मल्टिप्लेक्‍स थिएटरच्या मालकांनी ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा कर प्रेक्षकांकडून वसूल करून खिशात घातल्याचे  प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे. या संदर्भातील फाइल तब्बल चार वर्षांनंतर महसूलमंत्र्यांच्या कोर्टात आली असून, येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. महसूलमंत्री सरकारच्या बाजूने उभे राहणार की मल्टिप्लेक्‍स थिएटर मालकांच्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांना राज्य सरकारने काही कालावधीसाठी मध्यंतरी करमाफी जाहीर केली होती; मात्र त्या कालावधीत शहरातील सिटी प्राइड, ई-स्वेअर, आयनॉक्‍स, गोल्ड ॲडलॅब, मंगला व गोल्ड बिग सिनेमा या मल्टिप्लेक्‍स थिएटर्सच्या मालकांनी प्रेक्षकांकडून परस्पर हा कर वसूल केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या मल्टिप्लेक्‍सने नेमका किती करमणूक कर गोळा केला, याची माहिती घेण्यासाठी थिएटर्सचे दैनंदिन तिकीट विक्री अहवाल जिल्हा प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आला.

तत्कालीन करमणूक कर अधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्‍सला वसुलीच्या नोटिसा बजावल्या. मल्टिप्लेक्‍समालकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांपर्यंत या नोटिशीला आव्हान दिले होते; मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांचे अपील फेटाळण्यात आले. तसेच ही रक्कम न भरल्यास जप्तीपर्यंत कारवाई करण्याची नोटीस बजावली. या कारवाईवर मल्टिप्लेक्‍सच्या मालकांनी आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन महसूलमंत्र्यांकडून स्थगिती मिळविली होती.

दरम्यान, राज्यात भाजपचे सरकार आले. भाजप सरकारमधील तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे या केसची सुनावणी झाली. त्यांनीही फाइल निकालासाठी बंद केली. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे खात्याची जबाबदारी आली. त्यांनी मल्टिप्लेक्‍सच्या केसवर पुन्हा नव्याने सुनावणी घेतली. आता ही केस निकालासाठी बंद केली आहे.

मल्टिप्लेक्‍स थिएटर्सच्या दैनंदिन तिकीट विक्री नोंदीची तपासणी करताना सिटी प्राइड- सुमारे २२ कोटी (कोथरुड व सातारा रस्ता), ई-स्वेअर- २१ कोटी ९२ लाख, आयनॉक्‍स-९ कोटी ९४ लाख, गोल्ड ॲडलॅब- सुमारे ७ कोटी, मंगला-६ कोटी ४२ लाख, गोल्ड बिग सिनेमा – ६४ लाख ७१ हजार असा एकूण ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल मल्टिप्लेक्‍सचालकांनी परस्पर खिशात घातला असल्याचे निदर्शनास आले.

उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार एकीकडे महसूल विभागाला कर वसुलीचे उद्दिष्ट देते, तर दुसऱ्या बाजूला हा कर वसूल करण्यावरील स्थगिती उठविण्यास विलंब करत आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मल्टिप्लेक्‍स थिएटर्सवरील कारवाईबाबत जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला वारंवार स्मरणपत्र पाठवूनही गेल्या चार वर्षांपासून निर्णयाअभावी हा महसूल अडकून पडला आहे. आता तरी सरकार सर्वसामान्यांना न्याय देऊन हा महसूल सरकार जमा करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पुण्यातील एका अकरा वर्षांच्या भीक मागणाऱ्या मुलीच्या जीवनसंघर्षावरून प्रेरित होऊन “मुस्कान” हा लघुपट केला…

0

पुणे: छोट्यांच्या मुखावरील स्मित लाघवी असतं याची सर्वांनाच कल्पना आहे. फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या सीएसआर विभाग निर्मित आणि राहूल पणशीकर दिग्दर्शित ‘मुस्कान’ या लघुपटातून पदपथावर राहून कुटुंबियांसमवेत भीक मागणाऱ्या  अकरा वर्षीय मुस्कान या मुलीची जीवनकहाणी आपल्यासमोर उलगडत आहेत. हा लघुपट मुस्कान आणि तिला अपरिचित परंतु प्रगतीपथावर नेणारा मार्ग दाखविणाऱ्या नेहा या समाजभान असणाऱ्या मुलीची कथा. हा लघुपट नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात निमंत्रितांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. उपस्थितांमधील चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी लघुपटाचे कौतुक केले.

राहूल्स ग्राफिक्स फोटोग्राफी स्टुडिओचे राहूल पणशीकर यांनी याप्रसंगी सांगितले की भारतात भीक मागणे हे प्रमाणाबाहेर वाढले आहे. समाजविघातक व्यक्तींनी गरिबांना भीक मागायला भाग पाडून, त्यांचे शोषण करत हा एक मोठा फोफावणारा उद्योग बनवून स्वतः चैनीत आयुष्य घालवताहेत. भारतीयांना शरमेची गोष्ट ही आहे की देशात चार लाख भिकारी आहेत आणि प्रत्येकाने ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण ‘मी एकटा/ एकटी काय करू शकणार असा विचार करत असाल?’ तर त्याचे उत्तर आहे ‘होय, करू शकतो.’

ते पुढे म्हणाले की, फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. आणि राहूल्स ग्राफिक्स यांनी या पदपथवासी भिकाऱ्यांना मदत करून त्यांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता येईल यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.

फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री निरंजन किर्लोस्कर यांनी सांगितले की, कंपनीला सामाजिक कार्याविषयी केवळ आस्थाच वाटते असे नसून, एक औद्योगिक संस्था म्हणून कंपनीची ती जबाबदारीच आहे असे आम्ही मानतो. त्यासाठीच सीएसआर विभाग स्थापून त्यात निष्ठावंत व्यक्तींची नेमणूक केली आहे, ज्यामुळे समाजहिताची कामे करता येतील. ते पुढे म्हणाले की, राहूल्स ग्राफिक्स आणि फ्लीटगार्डच्या पुढाकाराने तयार झालेल्या ‘मुस्कान’मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पदपथावर राहणाऱ्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊन ते त्यांना सन्मानाने जगण्यास सहाय्य करतील.

संतापजनक -शौचास बसलेल्या महिलांचे गळ्यात हार घालून फोटो काढले …मुख्यमंत्री साहेब या डॉ .भारुडला धडा शिकवा – सर्व स्तरातून निषेध

0

सोलापूर – प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि हागणदारीमुक्त गाव करण्याच्या अतिरेकापोटी सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याचा ‘संताप जनक प्रताप’ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड याने केला  आहे. हे केल्यानंतर प्रसिद्धीच्या हव्यासाने या महाभागाने हे फोटो सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर पाठविल्याचा आरोप होतो आहे .कमजोर महिलांची अब्रू वेशीवर टांगण्याचा प्रताप करणाऱ्या यामहाभागावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून त्याला धडा शिकवावा अशी मागणी होते आहे .

सिंगापूर कराराबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार – खा. अनिल शिरोळे

0

पुणे-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सिंगापूर दौऱ्यात पुणे मेट्रो रिजन व नागपूर मेट्रो रिजनच्या विकास नियोजन साठी सुबर्ना ज्युरांग ह्या कंपनीचे सहकार्य घेणे तसेच पुण्यातील प्रस्तावित नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सिंगापूर मधील चांगी विमानतळ कंपनी चे सहकार्य घेणे असे दोन महत्वपूर्ण करार करण्यात आले. ह्या दोन्ही करारांमुळे पुणे मेट्रो रिजन आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीस सहकार्य मिळणार असून त्यानिमित्ताने खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानले. भेटी दरम्यान पुणे मेट्रो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या दोन्हींचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असल्याचे शिरोळे ह्यांनी सांगितले.

संकट काळात जनतेने ऊर्जा बचत करावी ऊर्जामंत्र्यांचे आवाहन

0

नागपूर- झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करून शासनाला सहकार्य करावे व भारनियमनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यास मदत करावी असे नम्र आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जनतेला केले आहे.
ऊर्जा बचतीचे आवाहन करताना बावनकुळे म्हणाले की, तात्पुरत्या संकटाच्या काळात ऊर्जा बचत करणे हाच तूर्तास उपाय आहे. गरज नसताना विजेचा वापर टाळावा. घरात सर्व ठिकाणी एलईडी बल्ब/ट्यूबलाईटचा वापर करावा. आवश्यकता नसेल तर पंखे सुरु करू नयेत. गरज असेल तेव्हाच एअर कंडीशनचा उपयोग करावा. संकटाच्या काळात एसीचा वापर टाळल्यास बरे होईल. टीव्ही, पंखे सतत सुरु ठेवू नयेत. ज्या भागात भारनियमन नाही अशा भागातील नागरिकांनी वीज सुरु असतानाही किमान दोन तास वीज वापर स्वत:हूनच बंद ठेवावा. अशा उपाययोजना केल्या तर वीजबचत होईल व ज्या भागांना वीज मिळत नाही, अशा भागांना वीजपुरवठा करून त्या नागरिकांनाही भारनियमनाच्या संकटापासून दिलासा देणे शक्य होईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले.
महानगर परिषदा, नगर परिषदा, ग्रामपंचायतींनी पथदिवे तासभर उशीरा सुरु करून पहाटे 5 वाजता बंद करावेत. अनेक ठिकाणी दिवसभर पथदिवे सुरु असतात. विजेचा असा अपव्यय टाळावा. शासकीय व खाजगी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दिवसाच्या वेळी लाईटचा वापर करू नये. अत्यंत आवश्यक असेल तेथे दिवसा लाईट वापरावे. कार्यालयाच्या बाहेर जाताना लाईट पंखे सुरु राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आठवणीने लाईट पंखे बंद करावीत. या उपाययोजनांतून वीजबचत करून संकटाच्या काळात सरकारला सहकार्य करावे, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

टीटीए तर्फे “चेंज द वे यु थिंक ” या कार्यशाळेचे आयोजन

0
  पुणे  : टाईम्स आणि ट्रेंड अकादमी तर्फे “चेंज द वे यु थिंक ”  या कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते . टीटीए च्या फेम  हॉल,  पुणे येथे ही कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध प्रशिक्षक,  समुपदेशक, आणि प्रेरणादायी स्पीकर  सुशीला बहल यांनी हि कार्यशाळा  घेतली . त्या  स्कील्हान्स ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट कन्सल्टिंगचे संस्थापक आणि दिग्दर्शक आहेत.
           टाईम्स आणि ट्रेंड अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले, जेव्हा विद्यार्थी कॉर्पोरेट जगतात किंवा स्वतःचे उपक्रम सुरू करतात, तेव्हा  त्यांनी  योग्य दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.   जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.त्यासाठी त्यांनी  “चेंज द वे यु थिंक ”  या कार्यशाळेचे आयोजन केले .यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य मानसिकता  विध्यार्थी आत्मसात करतील. विद्यार्थ्यांनी त्यांना जे लक्ष्य ठरवले  आहे ते साध्य करण्यासाठी   वेगळा विचार करायला हवा. त्यासाठी  त्यांना कार्यशाळेचा उपयोग होईल
              सुशीला बहल यांनी विद्यार्थ्यांना ‘थिअरी ऑफ मार्जिनल गेन्स’ बुद्धिमत्ता सिद्धांत शिकवला. इव्हेंट मॅनेजमेंटची  विद्यार्थी   श्रुती पाटील, म्हणाली , ” प्रशिक्षकाने आम्हाला प्रत्येक समस्येसाठी किंवा आव्हानाकरिता आउट-द-बॉक्स पद्धतीचा अभ्यास करण्यास शिकवले.  समस्येकडे पाहताना आणि ती उत्कृष्टपणे हाताळण्यासाठी विविध पर्याय शोधून पहावे हे हि सांगितले.

‘विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे : डॉ. पी. के. ढाकेफाळकर

0
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘मायक्रोबायोलॉजि( सूक्ष्मजीवशास्त्र )’ विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय​ ​राष्ट्रीय
कार्यशाळेचे उदघाटन डॉ. पी. के. ढाकेफाळकर (वैज्ञानिक, आगरकर संशोधन संस्था, पुणे)​ यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ ए आर शेख असेम्ब्ली हॉल मध्ये झाले.
​महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी प्रास्ताविक केले. तर मायक्रोबायॉलॉजी विभाग प्रमुख डॉ . देविप्रिया मुजुमदार यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी सूत्रसंचालन केले तर अम्रिता भाटिया यांनी आभार मानले.
‘इंजनिअस ट्रेंड्स इन लाइफ सायन्सेस’ (INGENIOUS TRENDS IN LIFE SCIENCES) या विषयावर ही ​राष्ट्रीय ​कार्यशा​ळा आयोजित करण्यात आली आहे. आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ​समारोप ​होणार आहे, अशी माहिती कार्यशाळा समन्वयक गौरी देवस्थळे यांनी दिली.
उदघाटन प्रसंगी बोलताना डॉ. ढाकेफाळकर यांनी प्रयोगशाळा विषयावर भर दिला. ते म्हणाले, ‘विज्ञान आणि संशोधन हे मानवी समाजाच्या उन्नतीसाठी असावे. संशोधनात विविध क्षेत्रात सूक्ष्म जीव वापरले जातात जसे की तेल काढणे प्रक्रिया, जैवइंधन आणि सूक्ष्मजीवाणू इत्यादी. त्यांच्या उपयुक्ततेबद्दल अजून संशोधन व्हावे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे . भूतलावरील जीवंत प्राणांच्या आणि त्यांची परिसंस्था, पर्यावरणाचे भवितव्य या विषयावर या कार्यशाळेत चर्चा होत आहे. तसेच संशोधनपर निबंध सादर होत आहेत

“मोस्ट इंटेललॅक्टऊल वूमन अवॉर्ड ” पुण्याच्या ऐश्वर्या शेंडे ने जिंकला .

0
पुणे: राष्ट्रीय स्तरावरील मिसेस इंडिया गॅलेक्सी, 2017 च्या  स्पर्धेत पुण्याच्या  ‘ऐश्वर्या शेंडे’ यांना  “मोस्ट इंटेललॅक्टऊल वूमन अवॉर्ड ”  पुरस्कार मिळाला आहे. ही स्पर्धा  व्हायब्रंट कॉन्सेप्ट्स द्वारा  नवी दिल्ली येथे त्रिवोलि गार्डन रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण भारतातील 4000 पेक्षा अधिक प्रतिभावान महिलांपैकी केवळ 40 जण अंतिम मध्ये  निवडण्यात आले, त्यापैकी ऐश्वर्याला मोस्ट इंटेललॅक्टऊल वूमन  महिला म्हणून घोषित केले .महिलांच्या विरोधातील हिंसाचाराबद्दल जागरूकता वाढविणे  हे या स्पर्धेचे उद्दिष्ट्य आहे. मिसेस इंडिया गॅलेक्सी, हि स्पर्धा म्हणजे  भारतीय विवाहित महिलांची नवी  ओळख निर्माण करते . दोन वेगवेगळ्या केटेगिरीमध्ये दरवर्षी  जे सौंदर्य, प्रतिभा, बुद्धिमत्ता यात पारखली जाते .
     ऐश्वर्या ह्या  वकील कुटुंबातील आहेत. आणि त्यांचा , कलाकार, गायक आणि क्रीटीव्ह  असलेल्या कुटुंबात विवाह झाला  आहे.  ऐश्वर्या हिने  2013 मध्ये  कायद्याची पदवी प्राप्त केली  . त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट कायदे, ग्राहक संरक्षण कायदा आणि कर आकारणी या  क्षेत्रात काम केले आहे . ती एक अभिनेत्री  आणि कुचीपुडी डान्सर आहे. तिने हिंदी, इंग्रजी, मराठी, कन्नड, तामिळ आणि तेलगू या  बहुभाषिक प्रकल्पांमध्ये काम केले आहे. आंतरराष्ट्रीय कुचीपुडी नृत्य संमेलनात ऐश्वर्याने  सादर केलेले नृत्य  2016 च्या  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे .ती पुण्यातील गैर-सरकारी संस्थांशी देखील संबधित होती व वंचित व अनाथ मुलांच्या उन्नतीसाठी काम करते.
         स्पर्धेत अनेक प्रश्नांपैकी ऐश्वर्याला  विचारले, ‘तुम्हाला काय पसंत पडते , आवडणे किंवा आदर दिला जाणे ? आणि का? ‘ऐश्वर्याने उत्तर सांगितले ,’ मला आवडण्यापेक्षा आदर करायला आवडेल! आवडणे कदाचित तात्पुरते असू शकते परंतु आदर हा मनापासून येतो. माझ्यामध्ये आत्मसन्मान माझ्या मनात विश्वास निर्माण करतो की मला माझ्या अस्तित्वासाठी माणूस म्हणून काम करावे.
      लहान वयापासून ते आंतरशालेय आणि आंतर-महाविद्यालयीन नाटक आणि नाटक स्पर्धांमध्ये भाग घेत असल्याने तिला अभिनय व नृत्य आवडते. आज, ती तिच्या बहुभाषिक कौशल्यांसाठी थिएटर सर्किटमध्ये, अष्टपैलुत्व व्यक्तिमत्व  म्हणून ओळखली जाते.
            आपल्या जीवनात आर्टचे  महत्त्व सांगताना  ती म्हणते, ”  आर्टने  नेहमीच मला अनेक गोष्टी शिकायला मदत मिळाली आहे . तरुण वयापासून माझ्या मल्टी टास्किंग ची सवय मला आजही सहजपणे गोष्टी हाताळण्यास मदत करते.  वैयक्तिक गोष्टी, व्यावसायिक जीवन,  आणि सामाजिक जीवन एकाच वेळी  जास्त गोष्टी व्यवस्थापित करणे आव्हानात्मक आहे. तथापि प्रत्येक गोष्ट मी आनंदाने करते .  एक वकील म्हणून , एक अभिनेत्री म्हणून , आणि एक माणूस म्हणून अनेक गोष्टी शिकवल्या जातात .अनुभव मला एक माणूस  म्हणून समृद्ध करतात.
 ‘ऐश्वर्याने सांगितले   “माझ्या आयुष्यातील एक  अनुभव नसून माझ्या आयुष्याला  या अवॉर्ड  मुळे कलाटणी मिळाली आहे  ”  असे ‘ऐश्वर्याने सांगितले . मला मार्गदर्शन करण्यासाठी मी माझ्या कुटुंबाचे नेहमीच आभारी आहे! मी माझ्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना हा अवॉर्ड  समर्पित करते! “

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्‍न आवश्‍यक- मुख्‍यमंत्री फडणवीस­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­­

0

पुणे दि, 7 – पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून विधीमंडळ, न्‍यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि जनता या सर्वांनी त्‍यासाठी सामूहिक सकारात्‍मक प्रयत्‍न करावेत, असे आवाहन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्म फोर्स मेडीकल कॉलेजच्‍या धन्‍वंतरी ऑडिटोरियम मध्‍ये ‘पर्यावरण -2017 ‘ या विषयावरील प्रादेशिक परिषद आयोजित करण्‍यात आली होती. या परिषदेच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती मदन लोकूर, मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्‍लूर,  राष्‍ट्रीय हरित लवादाचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती स्‍वतंत्रकुमार, पर्यावरण व वन मंत्रालयाचे सचिव अजय नारायण झा, न्‍यायमूर्ती यू.डी. साळवी, बी.एस. सजवान, रंजन चॅटर्जी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, पर्यावरण विषयक कायद्यांची कार्यक्षमपणेअंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करतांना अडचणी लक्षात येतात. त्‍यामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सर्वोच्‍च न्‍यायालय, उच्‍च न्‍यायालय, राष्‍ट्रीय हरित लवाद यांनी दिलेले निर्णय महत्‍त्‍वाचे ठरतात. न्‍यायमूर्ती श्री. लोकूर यांनी स्‍वराज अभियान प्रकरणात दिलेला निकाल राज्‍यामध्‍ये पूरनियंत्रण आणि जल संवर्धन विषयक निर्णय घेतांना महत्वाचा ठरल्याचे त्‍यांनी सांगितले.

वन्‍यजीवन आणि वनजमीनीचे संरक्षण करणे किती महत्‍त्वाचे आहे, हे त्‍या भागातील जनतेला समजावून सांगितले तर हे काम अधिक सोपे होते. आफ्रिका खंडातील केनिया सारख्‍या देशांमध्‍ये या प्रकारे वनसंवर्धन झाल्याचे सांगून मुख्‍यमंत्री  फडणवीस म्‍हणाले, वन परिसरात राहणा-या जनतेचा वनसंवर्धन हा जीवनाचा एक भाग व्‍हायला हवा. वनसंवर्धनामुळे आपले जीवन सुसह्य होते, हे त्यांना पटवून द्यायला हवे. आपल्‍या राज्‍यात वन्यजीवांविषयी जागृती झालेली दिसून येत आहे.

शाश्‍वत प्रगतीसाठी  विकास आणि   पर्यावरण संवर्धन हे हातात हात घालून जाऊ शकतात, यावर विश्‍वास व्‍यक्‍त करुन मुख्‍यमंत्री  फडणवीस म्‍हणाले, भावी पिढीसाठी चांगले जग निर्माण करायचे असेल तर न्‍यायालयांनी योग्‍य मार्गदर्शन करावे.  किनारपट्टीजवळील मॅग्रूव्‍हबाबत बोलतांना श्री.  फडणवीस म्‍हणाले, या भागातील कोस्‍टल मँग्रूव्‍ह आणि इन्‍लॅण्‍ड मँग्रूव्‍ह यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. प्रगती साध्‍य करण्‍यासाठी हे करणे काळाची गरज आहे.  मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. समुद्रामध्‍ये अनट्रीटेड वॉटर(प्रक्रिया न केलेले पाणी) मोठ्या प्रमाणावर सोडले जाते. येत्‍या 4-5 वर्षात समुद्रात प्रक्रिया न केलेल्या पाण्‍याचा एकही थेंबही जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्‍वाही  मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी दिली.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती मदन लोकूर यांनी पुणे हे पर्यावरण जागृतीचे केंद्र असल्‍याचे सांगून विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनात राज्‍यांची, स्‍वयंसेवी संस्‍थाचीही भूमिका महत्‍त्‍वाची आहे. नागरिकांनीही मी कर देतो म्‍हणून कुठेही कचरा टाकून पर्यावरणाची हानी करणे चुकीचे आहे. प्रत्‍येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले.

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्‍लूर यांनी बालपणीचा काळ आठवून निसर्गरम्‍य वातावरणात झालेला बदल सर्वांच्‍या लक्षात आणून दिला. आर्थिक प्रगती साधत असतांना निसर्गाचा घात करणे अपेक्षित नाही. प्रदूषण वाढीमुळे रोगप्रतिकारक शक्‍ती कमी झाली. त्‍यामुळे बालकांना वेगवेगळ्या रोगप्रतिबंधक लसी टोचाव्‍या लागतात. औद्योगिक, तांत्रिक, वैज्ञानिक प्रगती हवी पण निसर्गाचा समतोल साधून हे साध्‍य करावे लागेल, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

राष्‍ट्रीय हरित लवादाचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती स्‍वतंत्रकुमार यांनी लवकरच मुंबईमध्‍ये पर्यावरणविषयक परिषद घेण्‍यात येणार असल्याचे सांगून देशाच्‍या पर्यावरण संरक्षणासाठी आजचे विद्यार्थी महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे सांगितले. या परिषदेच्‍या माध्‍यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनतेमध्‍ये जागृती होईल, अशी आशा त्यांनी व्‍यक्‍त केली.

पर्यावरण व वन मंत्रालयाचे सचिव अजय नारायण झा यांनी प्रास्‍ताविक केले.  न्‍यायमूर्ती यू.डी. साळवी यांनी स्‍वागतपर भाषण केले.

या परिषदेमध्‍ये महाराष्‍ट्रासह गोवा आणि गुजरात राज्यातील पर्यावरण क्षेत्राशी संबंधित राष्‍ट्रीय हरित लवादाचे सदस्‍य, न्‍यायमूर्ती, न्‍यायाधीश, वकील, विद्यार्थी सहभागी झाले होते.

मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करणार

0

पुणे : येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अपंग कल्याण आयुक्तालय, यशदा, चैतन्य इन्स्टिटूयट फॉर मेंटल हेल्थ, बापू ट्रस्ट, कर्वे समाज सेवा संस्था आणि स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन पुणे तसेच पुणे येथील मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या स्वयंसेवी संस्थाच्या  संयुक्त विदयमाने यावर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मानसिक आरोग्य साप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. चेतन दिवान, बापू ट्रस्ट च्या भार्गवी दवर, चैतन्य इन्स्टिटूयट फॉर मेंटल हेल्थ चे राहुल शिरुरे , स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशनचे अनिल वर्तक उपस्थित होते.

अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे मार्फत साजरा करण्यात येत असलेल्या या सप्ताहाची सुरुवात दि. ८ ऑक्टोबर २०१७ पासून होत असून मानसिक आरोग्याशी निगडीत व्यावसायिक, रुग्ण, रुग्णांचे कुटुंबीय, विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, एन एस एस विभाग तसेच एम एस डब्लू महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, पुणे व पिंपरी महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस दलातील विविध प्रतिनिधी तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित सर्व संस्था या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार असून सर्व उपस्थितांना मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती, शिक्षण व मार्गदर्शनपर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आल्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी सांगितले.

पुणे पदमावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहमाध्ये येथे पार पडणार्या या कार्यक्रमास मोफत प्रवेश देण्यात येणार असून शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र देखील देण्यात येणार आहे.

दि. 10 ऑक्टोंबर – मानसिक आरोग्य दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगाचे मानसिक आजार या विषयावर खालीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

 

दिनांक वेळ कार्यक्रमाचे स्वरुप
8 ऑक्टोंबर,2017. सकाळी 09.30

 

मानसिक आरोग्य जाणीव-जागृतीसाठी मोटार सायकल रॅली
8 ते 12 ऑक्टोंबर,2017. ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थाच्या वतीने वेगवेगळया प्रकारचे स्टॉल (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे).
10 ऑक्टोंबर,2017. सकाळी 10.00

ते सायंकाळी 6.00

सांस्कृतिक कार्यक्रम (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे).
11 ऑक्टोंबर,2017. सकाळी 10.00

ते सायंकाळी 6.00

चर्चासत्र (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे).
12 ऑक्टोंबर,2017. सकाळी 10.00

ते सायंकाळी 6.00

चर्चासत्र (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पदमावती, पुणे).

 

नितीन पाटील म्हणाले कि, मानसिक आरोग्याचा विषय दुर्लक्षीत राहिलेला आहे.  समाजामध्ये अपुर्या जन्जागृतीमुळे  रुग्णाची योग्य काळजी व देखभाल होत नाही. विविध मानसिक व सामाजिक  कारणांमुळे  सामोरे जावे लागत असलेल्या या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत असतात तसेच समाजात या बाबीची अनास्था व तिरस्कार असल्यामुळे हा रोग ब-याचदा लपवून ठेवला जातो. आधुनिक उपचार पद्धतीकडे पाहता सद्य स्थितीमध्ये फक्त औषध घेणे या पर्यन्तच मर्यादित न राहता इतर ब-याच उपलब्ध असणार्या थेरपी, समुपदेशन, आहार, विहार, रुग्णाच्या नातेवाईक व हितचिंतकांचे प्रशिक्षण, योगा, नृत्य, कामकाजात बदल अशा ब-याच मानसिक-सामाजिक-कौटुंबिक पैलूंवर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षीत असते.

मानसिक आजार हा सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील स्त्री -पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान मुले , वयात येणारी मुले, नोकरी व व्यावसायिक कामाचा ताण-तणाव, पारिवारिक ताण- तणाव, वैवाहिक मतभेद, मुले व पालक विसंवाद, दुष्काळ, आर्थिक अडचण, विषमता व  या विविध कारणांमुळे होणारे ताण- तणाव व विविध समस्या इत्यादि अशा सर्व घटकांसाठी  हा विषय महत्वाचा असून  यासाठी शासन, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संघटना-संस्था मिळून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी  अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी देखील भविष्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे  नितीन पाटील यांनी सांगितले.

 

 

दलित आणि मुस्लीम भागात जास्त लोडशेडिंग — संतप्त एमआयएम ने महावितरण कार्यालयाची केली तोडफोड

0

औरंगाबाद : महावितरणकडून शहरातील दलित आणि मुस्लिम भागातच आठ ते नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात असल्याचा आरोप करत एमआयएमने महावितरण कार्यालयात तोडफोड केली. आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात एमआयएमच्या दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या तोडत प्रवेश केला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याने एमआयएम कार्यकर्ते अधिकच संतापले. जनतेला लोडशेडिंगचे चटके देता आणि तुम्ही एसीची हवा खाता म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातील एसीच उखडून फेकला. दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयात गोंधळ सुरु होता. 

शहराच्या विविध भागात सध्या महावितरणकडून लोडशेडिंग केले जात आहे. परंतु शहरातील मुस्लिम आणि दलित बहुल भागात महावितरणकडून जादाचे लोडशेडिंग केले जात असल्याचा एमआयएमचा आरोप होता. या संदर्भात आज (ता. 6) दुपारी तीनच्या सुमारास इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या दोनशेवर कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांनी संरक्षक भितीच्या जाळ्या तोडून कार्यालयात प्रवेश केला. 

हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे दालन गाठले. आमदार इम्तियाज जलील, जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम नाईकवाडी हे यावेळी दालनात गेले तेव्हा तिथे मुख्य अभियंता नव्हते. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते अधिकच भडकले. लोकांना उकाड्यात आणि अंधारात ठेवून इथे एसीची हवा घेतली जात असल्याचे म्हणत काही कार्यकर्त्यांनी दालनातील एसी, टेबलावरील काच, फोन उखडून फेकले. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले.

बोरावळे गावच्या सरपंचपदी भाजपचे महेश शीळीमकर बिनविरोध

0

पुणे : प्रतिनिधी
बोरावळे (ता. वेल्हा) गावचा सरपंचपदी महेश यशवंत शीळीमकर यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता आली. ७ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. पुणे जिल्हयात भाजपाचा पहिला सरपंच बिनविरोध होण्याचा मान महेश शीळीमकर यांना मिळाला. भाजपाचे जेष्ठ नगरसेवक राजेंद्र शीळीमकर यांचे ते छोटे बंधू होत. अनिता शीळीमकर, सुरेखा रेणुसे, दत्तात्रय शिंदे, समीर मांडवलकर, अमोल धुमाळ, संगीता मांडलीक यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी नगरसेवक राजेंद्र शीळीमकर, भाजप वेल्हा तालुकाध्यक्ष अण्णा देशमाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अण्णा शिंदे उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानकातील कामांचा विस्तृत आढावा घेतला खा. अनिल शिरोळे यांनी ..

0

पुणे-

मुंबईतील एल्फिस्टन रोड स्टेशन वरील दुर्दैवी घटनेच्या  पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थनाकाचे प्रवासी सुरक्षाच्या दृष्टीने परीक्षण करण्याची मागणी खा. अनिल शिरोळे ह्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे रेल्वे प्रशासन तर्फे करण्यात येणार्‍या विविध कामांचा आढावा शिरोळे ह्यांनी विभागीय रेल्वे अधिकारी बी के दादाभोय ह्यांच्या समवेत विस्तृत बैठकीत घेतला.

बैठकीनंतर शिरोळे ह्यांनी रेल्वे अधिकार्‍यांना बरोबर घेऊन सध्याच्या प्रवासी पादचारी पुलाची पाहणी, स्कायओवर ब्रिज चा उपयोग वाढविण्यासाठी च्या उपाय योजना, तसेच नवीन पादचारी पूलाच्या कामाची प्रगति आदि विविध कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी देखील केली. “प्रवासी सुरक्षा आणि प्रवासी सुविधा” ह्या संबंधी चालू व प्रस्तावित असलेल्या दोन्ही कामांची सद्यस्थिती बाबत एक विस्तृत अहवाल रेल्वे प्रशासनाने तातडीने सादर करावा अशी मागणी बैठकीत केली असून हा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणार असल्याचे ही शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

सावधान; सिमेंट ही बाजारात बनावट -टोळी पकडली

0

पुणे-बनावट दारू ,भेसळयुक्त तेल तूप , मिठाई अशा अनेक प्रकारांनी ग्राहक गंडवला  जात असताना आता बाजारात सिमेंट देखील भेसळयुक्त नाही, तर चक्क बनावट सिमेंट बाजारात विकले जात असल्याचा प्रकार पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे उघडकीस आला आहे .घर पहावं बांधून ..अशी मनोकामना प्रत्येकाची असते , या मनोकामने वर  अशा वृत्तांनी सावट येणे साहजिक आहे . पण जे काम ग्राहक चळवळीने करायला हवे , ग्राहक पंचायतीने करायला हवे ते पोलिसांनी केल्याने ,पुण्यातील ग्राहक चळवळ संपुष्टात आल्याचे दिसू लागले आहे .
हडपसर सातवनगर हांडेवाडी रोडवरील बनावट सिमेंट तयार करणारा अड्डा संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने उध्वस्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना जणांना अटक केली आहे. आरोपी बिर्ला कंपनीच्या रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात बनावट सिमेंट भरून हे सिमेंट ग्राहकांना विकायचे.

पोलिसांनी येथील चौधरी इंटरप्रायजेस या सिमेंट विक्री करणा-या गोडावूनवर छापा टाकून मालक अन्वर हुसेन शेख (वय 50) मॅनेजर रमाकांत राजकुमार पांडे (वय-40), कामगार श्यामकुमार कल्लू कोळी (19), अमरनाथ रामखिलावत कोळी (वय-34) आणि शिवपूजन भोलुप्रसाद प्रजापती (वय-40) या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता आठ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना  मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी छापा टाकला असता आरोपी हा  सिमेंट बिर्ला सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात वेगळेच सिमेंट भरून ग्राहकांची फसवणूक करताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून 1603 बनावट सिमेंटच्या गोण्या, दोन टाटा आयशर टेम्पो आणि इतर साहित्य असा 19 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उप निरीक्षक पी.डी.गायकवाड, कर्मचारी नरेंद्र सोनावणे, राज देशमुख, रमेश भिसे, प्रदीप शेलार, भालचंद्र बोरकर, हजरत पठाण, अतुल मेंगे, तानाजी गाडे, विठ्ठल बंडगर, किरण चोरगे, दत्ता फुलसुंदर, कांतीलाल बनसुडे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.