Home Blog Page 3246

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत 32 संघांचा सहभाग

0

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2016-17 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 नोव्हेंबर पासून दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी पुना क्लब व पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर होणार आहेत.

स्पर्धेत एकूण 32 संघांनी आपला सहभाग नोंदनला आहे. यामध्ये गतवर्षीचा विजेता संघ इन्फोसीस व उपविजेता अॅटॉस्‌ संघ यांच्यासह टीसीएस, टेक महिंद्रा, सायबेज, आयबीएम, सनगार्ड एएस/ एफआयएस, गालाघर, केपीआयटी, टिएटो, सिमेंस, आयडीयाज्‌ अ सास कंपनी, एल अॅड टी इन्फोटेक, अॅमडॉक्स्, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, कॅपजेमिनि, व्हेरीटास, सेल2वर्ड, हरमन, यार्डी, विप्रो, सिनेक्रोन, मर्क्स, परसिस्टंट सिस्टीम, स्प्रिगर नेचर, इक्यु- टेक्नोलॅजीज्, कॅग्निझंट, ऑल स्टेस सल्युशन, एमफसीस, आय प्लेस, एक्सट्रीम वेबटेक, टॅलेंटीका या संघांचा समावेश आहे.

स्पर्धेत 8 गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक संघ 3 साखळी सामने खेळणार आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेत एकूण 1 लाखाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 50 हजार रूपये व करंडक, उपविजेत्या संघाला 30 हाजार रूपये व करंडक. तसेच मालिकावीरला 10 हजार रूपये व करंडक. सर्वोत्कृष्ट फलंदाजाला 5 हजार रूपये तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला 5 हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन आयडीयाज्‌ अ सास इंडियाचे संचालक प्रशांत केएस, आयडीयाज्‌ अ सास इंडियाचे माजी संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज्‌ अ सास इंडियाच्या माजी एचआर अनुराधा दत्तगुप्ता, आयडीयाज्‌ अ सास इंडियाच्या फायनान्स् हेड मल्लिका जेम्स्, विंग कमांडर व अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय जोगळेकर व अंकुर जोगळेकर मेमोरीअल फाऊंडेशनचे उपअध्यक्ष विजय जोगळेकर यांच्या हस्ते होणार आहे.

“बाघी 2” में टाइगर श्रॉफ का दिलचस्प लुक!

0
टाइगर श्रॉफ सितंबर से अपनी आगामी फिल्म ‘बाघी 2’ के लिए सख्ती से शूटिंग कर रहे हैं। तब से अभिनेता अपने छोटे बालों वाला लुक एक टोपी के अंदर छुपाए हुए नज़र आ रहे है।

टाइगर अपने सभी सार्वजनिक उपस्थितियों में टोपी पहने हुए दिख रहे हैं चाहे वो एक मंच शो हो या प्रेस इंटरैक्शन, अभिनेता बारीकी से अपने इस लुक को रस्यम तरीक़े से संजोय हुए है।

हाल ही में जब टाइगर अपनी वैनिटी वैन से एक एक्शन सीन की शूटिंग के लिए सेट की ओर कदम बढ़ा रहे थे तब उनके इस बाघी 2 के लुक को कैमरे में कैद कर लिया गया।

अभिनेता उस बेहद छोटे बाल, हल्की दाड़ी और दमदार शारीरिक काया में फ़िल्म के लिए पूरी तरह से तयार काफ़ी हॉट और उम्दा नज़र आ रहे थे।

टाइगर की टी-शर्ट पर खून के दाग को देख कर लग रहा है कि यह एक उच्च एक्शन सीक्वेंस होगा। इस एक्शन सीन को पूरी दुनिया से बेहतरीन कोरियोग्राफर द्वारा डिज़ाइन किया जाएगा।

अपनी पहली फिल्म ‘हिरोपंती’ के बाद टाइगर एक बार फिर से साजिद के साथ काम करने की इच्छा रखते थे और अब बाघी के बाद बाघी 2 के साथ एक हैट-ट्रिक पूरा करने के लिए तयार है।

एक म्यूजिक वीडियो में एकसाथ आने के बाद “बाघी 2” में टाइगर श्रॉफ के साथ दिशा पटानी नज़र आएंगी।

जोड़ी ने पहले ही दर्शकों के बीच बड़ी प्रत्याशा उत्तपन कर दी है, जिसके बाद दर्शक एक बार फिर से दोनो को बड़े पर्दे पर देखने के लिए उत्सुक है।

“बाघी 2” ने 18 सितंबर को पुणे में अपनी पहली अनुसूची पूरी कर ली है और पुणे में शूटिंग समाप्त करने के बाद अब फिल्म की टीम मुंबई में आ कर आगे की शूटिंग कर रही है। मनोज वाजपेयी और प्रतीक बब्बर जैसे अभिनेता 2015 में आई टाइगर श्रॉफ और श्रद्धा कपूर द्वारा अभिनीत हिट फिल्म बाघी की इस अगली कड़ी में एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हुए नज़र आएंगे। 27 अप्रैल 2018 में “बाघी 2” दस्तक  देने के लिए तयार है।

‘वर्ल्ड स्किल स्पर्धेत’ मोबाइल रोबोटिक्समध्ये आळंदी येथील एमआयटी एओईच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0

पुणे : आबूधाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड स्किल स्पर्धेत आळंदी येथील एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनियअरिंगच्या (एमआयटी एओई) विभोर मेश्राम व समर्थ गौदर या दोन विद्यार्थ्यांनी मोबाइल रोबोटिक्स कौशल्य स्पर्धेत ‘मेडल ऑफ एक्सलन्स’चा पुरस्कार प्राप्त करून देशाचा सन्मान वाढविला. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आबूधाबी येथे वर्ल्ड स्किल-2017 स्पर्धेत एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे विद्यार्थी विभोर मेश्राम आणि समर्थ महेश गौदर याने भारताचे प्रतिनिधीत्व करतांना ‘मेडल ऑफ एक्सलन्स’चा पुरस्कार प्राप्त केला आहे. ‘प्ले ग्राउंड मानेटरिंग रोबो’ या थीमच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोबाइल रोबोटिक्सचे कौशल्य दाखवीत हे पदक प्राप्त केले. त्यांनी या रोबोचेे डिझाइन, फॅब्रिकेशन आणि प्रोग्रॅम स्वतः तयार केला होता. स्पर्धेत 59 देशातील 1300 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, जपान, कोरिया, चीन, रशिया, नेदरलँड्स, हाँगकाँग बरोबरच अन्य देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांना एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.योगेश भालेराव, डॉ.महेश गौदर आणि डॉ. आनंद मालेवार यांनी मार्गदर्शन केले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.भालेराव यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात प्रत्येकी एक एक लाख रूपये आणि नॅशनल स्किल डेव्हलमेंट ऑफ कार्पोरेशनकडून नोकरीची हमी देण्यात आली आहे.

अरुणिमा – शब्दसुरांची नव्या गीतांमधून जीवनाचे विविध रंग खुलवणारी

0

पुणे, ता. ३ – अरुणा अनगळ यांनी लिहिलेल्या आणि संगीतबध्द केलेल्या अरुणिमा – शब्द सुरांची या नामवंत आणि उभरत्या गायकांनी गायलेली जीवनाचे विविध रंगे खुलवणारी गाणी गीतसंग‘हांत गुंफुन रसिकांसमोर येत आहेत. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन होणार आहे. राहुल देशपांडे, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, अंजली मराठै, रघुनंदन पणशीकर यासारख्या प्रथितयश आणि सुवर्णा राठोड, जयदीप वैद्य, निखिल मोडगी, शेफाली कुलकर्णी यासारख्या उभरत्या कलाकारांच्या आवाजात ही कलाकृती घडली आहे. प्रकाशनानंत काही कलाकार गाणी सादर करणार आहेत. पंडित रघुनंदन पणशीकरांचे प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे. रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कन्नड संघाचे कावेरी कॉलेज सभागृह, सीडीएसएसजवळ, एरंडवणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘मन की बात’मधील भाषणांच्या मराठी अनुवादाचे रविवारी प्रकाशन

0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातील भाषणे पुस्तकरूपाने मराठीत उपलब्ध होत आहेत. ‘मन की बात मराठी भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (५ नोव्हेंबर) होत असून  राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि नवभारत संकल्प-सिध्दी अभियान या संस्थांतर्ङ्गे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मन की बात’ हे पुस्तक तयार करण्यात आले असून प्रकाशन समारंभात राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांचे मुख्य भाषण होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांची समारंभात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आकाशवाणीच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्याच्या उपक्रमाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१४ मध्ये प्रारंभ केला. पुस्तकाच्या पहिल्या भागात ऑगस्ट २०१६ पर्यंत झालेल्या तेवीस भाषणांचा मराठी अनुवाद देण्यात आला आहे. ‘मन की बात’मधील भाषणांच्या प्रादेशिक भाषांमधील अनुवादाचे हे पहिलेच पुस्तक असल्याची माहिती नवभारत संकल्प-सिध्दी अभियानाचे समन्वयक योगेश गोगावले यांनी दिली.

आईच्या वेदना, खाल्लेल्या खस्ता जो जाणतो, तोच विद्यार्थी श्याम बनण्याचा प्रयत्न करतो : प्रा. प्रदीप कदम

0
प्रेरणा विद्यालयात श्यामची आई स्मृती शताब्दी निमित्त व्याख्यान
पिंपरी-
आईने मुलाला आदर्श बनावे म्हणून केलेली शिक्षा, घेतलेले परिश्रम, सोसलेल्या वेदना, खालेल्या खस्ता ज्या मुलाच्या काळजाला बोचतात आणि जाणीव करून देतात अशा आईची मुले श्याम बनन्याचा प्रयत्न करतात. तसेच असा कार्यक्रम घेणारी शाळाच आदर्श पिढी तयार करू शकते, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी केले.
           श्यामची आई स्मृती शताब्दी निमित्त प्रा. प्रदीप कदम यांचे “श्यामची आई.. प्रेरणा युवकांसाठी’ या विषयावर थेरगाव येथील प्रेरणा विद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. कदम बोलत होते. याप्रसंगी प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गुजर, पिंपरी- चिंचवड मनपाचे शिक्षण मंडळ माजी उपसभापती नाना शिवले, संचालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले.
          प्रा. कदम पुढे म्हणाले, स्वर्गाहूून श्रेष्ठ असते ती आई. म्हणून आई कल्पतरू मानणारे साने गुरुजी श्यामची आई पुस्तक लिहू शकले. आईची भक्ती, प्रेम व कृतज्ञता व्यक्तीला मोठ्या उंचीवर नेतात, हा आधुनिक काळातला आदर्श म्हणजे श्याम आणि श्यामची आई. संस्कार आवर्जून केले तरच होतात. केवळ बघून, बोलून आणि ऐकून होत नाही. यात कृती महत्त्वाची असते. यासाठी पालकांची भूमिका कृतीयुक्त असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संवेदनशील असणे आणि पालकांनी सौजन्यशील राहणे व परस्परपूरक भावना व सत्य जपत हा संस्कारदीप तेवत ठेवण्याच प्रयत्न झाला, तरच श्याम घडतील, असा आशावादही प्रा. कदम यांनी व्यक्त केला.
          विद्यार्थी, आई-वडील, शिक्षक आणि संस्कार असा मेळ घालत… हसत खेळत श्यामचा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकास यशोदा नावाच्या संस्कार सरितेने कसा केला व श्याम अवघ्या महाराष्ट्राचे आदर्श कसा होऊ शकला. हे कथन करीत प्रा. प्रदीप कदम यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रसन्नता, प्रचिती या बाबींचा अनोखा प्रत्यय यानिमित्ताने आला.

सभागृहाचा अमूल्य वेळ वाया जावू देवू नका – संदीप खर्डेकरांचे महापौरांना पत्र (जसेच्या तसे वाचा )

पुणे- गेली ३० वर्षांहून अधिक काळ ,पतितपावन संघटना आणि भाजप चा वेळोवेळी संघर्ष करणारा , डॅशिंग कार्यकर्ता अशी ओळख असलेले कार्यकर्ते आणि उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापौर मुक्ता टिळक यांना पाठविलेले पत्र भाजपच्या राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरणार आहे . नेमके काय आहे हे पत्र वाचा … जसेच्या तसे ….
प्रति,
मा.मुक्ता टिळक,
महापौर,पुणे.
विषय – कार्यपत्रिकेवरील प्रश्नोत्तरे व पॉईंट ऑफ इन्फर्मशन बाबत –
मा महोदया,
मी पुणे महापालिकेच्या कार्यपद्धतीशी १९८८/८९ सालापासून परिचित आहे.एक जागरूक पुणेकर म्हणून आणि पतित पावन संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी व माझे कार्यकर्ते सर्वसाधारण सभेच्या वेळी प्रेक्षक गॅलरीत व प्रसंगी महापौर गॅलरीत बसत असू व मनपा चा कारभार बघत असू.प्रसंगी एखाद्या विषयावर आंदोलन/घोषणा/किंवा एखाद्या अधिकाऱ्याने प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत तर त्याचा हुर्यो उडविणे हे काम आम्ही जागरूकतेने करत होतो.मला आठवते आहे कि मा अंकुश काकडे महापौर असताना सर्वसाधारण सभेत साधारण अर्धा तास शहराच्या प्रश्नांवर पॉईंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे अधिकाऱ्यांना धारेवर धरले जायचे ,त्यानंतर कार्यपत्रिकेवरील प्रश्नोत्तरे व्हायची व ज्या छापील उत्तरावर मा सभासदांचे समाधान व्हायचे नाही त्यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला जायचा व जनहिताचे प्रश्न सोडविले जायचे,या सगळ्याची पुणेकरांना,पत्रकारांना मोठी उत्सुकता असायची.
मात्र गट ६/७ महिन्यातील सर्वसाधारण सभेची एकूण कार्यपद्धती पाहता विरोधकांच्या गोंधळात आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे फारसे महत्वाचे नसलेले प्रश्न विचारून सभागृहाचा अमूल्य वेळ वाया जात आहे असे दिसून येते,प्रश्नोत्तरे तर एकदाही झाल्याचे मिनिट्स वरून दिसून येत नाही,खरे तर प्रश्नोत्तरे ही सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहेत .…. तरी आपण सर्व पक्षनेत्यांशी चर्चा करावी आणि आता किमान नोव्हेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेपासून या सभागृहाच्या परंपरेप्रमाणे सुरवातीचा अर्धा तास पॉईंट ऑफ इन्फर्मेशन द्वारे शहराच्या प्रश्नांवर चर्चा,तदनंतर कार्यपत्रिकेवरील प्रश्नोत्तरे आणि शेवटी कार्यपत्रिकेवरील प्रस्ताव अश्या क्रमाबद्दल एकमत करावे.याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी ही सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी आपण पुढाकार घेऊन चर्चा घडवून आणावी अशी आग्रही मागणी करत आहे,
योग्य कार्यवाहीच्या अपेक्षेत,
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष क्रीएटिव्ह फौंडेशन.
मो 9850999995

पुण्यात फेरीवाल्यांवर अटॅक

0

पुणे-फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनाला मनसेने काल दोन दिवसांचा अवधी दिला असताना आज दुपारी  काही कार्यकर्त्यांनी  राजाराम पूल आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील फेरीवाल्यांवर  अटॅक आंदोलन केले. या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांचे विक्रीसाठी मांडलेल्या वस्तू, सामान, फळे रस्त्यावर इतरस्ततः फेकून देण्यात आली .आणि मनसे च्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या .
मुंबई मधील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेकडून आक्रमक आंदोलन केले जात आहे. आता मुंबई पाठोपाठ पुण्यातही परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मनसेच्या रडार वर  आले आहेत. फेरीवाल्यांवर दोन दिवसांत कारवाई करण्याचे पत्र मनसेकडून यापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना दिले होते. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला होता. मात्र, या दोन दिवसात फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. तथापि मनसे पदाधिकारी मुंबईत व्यस्त असल्याने पुण्यातील आंदोलन आणखी दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे मनसेकडून कालच सांगण्यात आले होते.मात्र आज गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गट करून शहरातील विविध भागांत पाठविण्यात आले.
जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला.  राजारामपुलावरील फळविक्रेत्यांवर हल्ला करीत या विक्रेत्यांचे सर्व सामान, फळे रस्त्यावर फेकून दिली. तसेच फर्ग्युसन कॉलेज रस्‍ता, कर्वे रस्‍ता येथेहीकार्यकर्त्यांनी तोडफोड केली. फेरीवाल्यांचे साहित्य रस्‍त्यावर फेकून दिले.

रुपे डिस्कव्हर ग्लोबल कार्ड तब्बल 25 दशलक्ष लोकांपर्यंत पोचले

0

मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ला रुपे डिस्कव्हर ग्लोबल कार्ड तब्बल 25 दशलक्ष लोकांपर्यंत पोचल्याचे जाहीर करताना अभिमानास्पद वाटते आहे. एनपीसीआय आणि डिस्कव्हर फायनान्शिअल सर्व्हिसेस (डीएफस)मधील भागीदारी, रुपेचा जगभरातील स्वीकार वाढावा, यासाठी करण्यात आलेली आहे, यासाठी 2014 सालापासून बँकेतर्फे रुपे डिस्कव्हर ग्लोबल कार्ड देण्यात येत आहे.एनपीसीआयचे प्रमुख प्रक्रिया अधिकारी श्री. दिलीप आसबे म्हणाले की, “डीएफएसबरोबर संलग्नित होणे ही घटना आमच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. आम्ही आतापर्यंत 25 दशलक्ष रुपे कार्ड धारकांच्या सबलीकरणाचा टप्पा गाठला आहे, त्यांना तब्बल 185 देश आणि जागतिक ठिकाणी 40 दशलक्ष पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल आणि 1.9 दशलक्ष एटीएमद्वारे कार्डाचा वापर करता येणार आङे.’’

डीएफएसचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. डेव्हिड डब्ल्यू नेलम्स म्हणाले की, “आम्ही आतापर्यंत जी प्रगती केली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात आणि डिस्कव्हर गोल्बल नेटवर्कला रुपे ग्लोबल कार्डधारकांच्या या जागतिक प्रवासात खरेदीसाठी मदत करता येणार आहे, याचा भाग होता येत आहे, यासाठी आम्ही उत्साही आहोत. एनपीसीआयबरोबरच्या आमच्या भागीदारीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि भारतीय देयकांच्या बाजारपेठांमध्ये संलग्नितपणे विकास करू शकू, याकडे लक्ष देणार आहोत.’’दोन कंपन्यांमधील अंतर्गत भागीदारीचा लाभ देयक नेटवर्कना होणार आहे, या धोरणात्मक भागीदारीमुळेरुपे डिस्कव्हर डेबिट आणि क्रेडिट इंटरनॅशनल कार्डांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे, हे संरक्षण  एनपीसीआयच्या भारतातील सदस्य बँकांद्वारे दिले जाईल. रूपे ग्लोबल डेबिट आणि क्रेडिट कार्ड सध्या 32 बँकांमध्येदेण्यात आली आहेत. भारताबाहेर व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी आणि डिस्कव्हर ग्लोबलनेटवर्कमधून रोख रक्कम काढताना याचा वापर करता येईल. डिस्कव्हर ग्लोबल नेटवर्कमध्ये डिस्कव्हर, डिनेर क्लब इंटरनॅशनल, पल्स आणि संबंधित नेटवर्कचा समावेश आहे.

सध्या रुपे ग्लोबल कार्ड रुपे ग्लोबल क्लासिक डेबिट कार्ड, रुपे ग्लोबल क्लासिक क्रेडिट कार्ड, रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड, रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड अशा पाच विविध प्रकारांचा समावेश आहे.

 रुपे डिस्कव्हर सिलेक्ट क्रेडिट कार्डाची वैशिष्ट्ये

  • संपन्न प्रकारावर लक्ष्य केंद्रित केलेले हे कार्ड तुमचे स्वप्नातील जगणे प्रत्यक्षात येण्यासाठी मदत करते आणि याद्वारे मिळणाऱ्या सेवांमुळे तुमची जीवनशैली अतिशय आरामदायी होते.
  • समकालीन स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय लाँजमध्ये प्रवेश,जगभरातील 500 प्लस लाँज आणि भारतातील 30 प्लस लाँजचा समावेश; यासारख्या सर्वोत्तम विशेष सेवा खास ग्राहकांना भेट म्हणून दिल्या जातात.
  • प्रवास, खानपान आणि करमणूक यासंबंधीच्या सेवा 24×7 उपलब्ध
  • 10 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा

रुपे डिस्कव्हर प्लॅटिनम डेबिट आणि क्रेडिट कार्डाची वैशिष्ट्ये

  • भारतातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर लक्ष्य केंद्रित
  • रेस्टॉरंट, इंधनाचे पंप आणि सेवासुविधांची बिले भरणे यासर्वांवर वर्षभर चालणाऱ्या कॅशबॅक सेवा
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी विस्तारीत नेटवर्कवर वैध असणाऱ्या आकर्षक ऑफऱ आणि सवलती
  • एनपीसीआयबद्दल थोडेसे :भारतातील रिटेल देयक यंत्रणांसाठी केंद्रीय पायाभूत सुविधा म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ची स्थापना 2009 साली करण्यात आली आणि देशातील सर्व प्रकारच्या बँकांसाठी देयकांच्या वापरासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही संकल्पना अमलात आणली. इंटर बँक एटीएमचे व्यवहार बदलून एकच सेवा करणे, धनादेश वटवणे, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (एनएसीएच), आधार अनेबल पेमेंट सिस्टम (एइपीएस), यूएसएसडी आधारित *99#, रुपे कार्ड, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस), युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम). सध्या 350 दशलक्षपेक्षा जास्त रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आलेली आहेत.

 

डिस्कव्हरबद्दल थोडेसे: डिस्कव्हर फायनान्शिअल सर्व्हिसेस (एनवायएसई : डीएफएस) ही थेट बँक सेवा आणि देयक सेवा देणारी कंपनी असून, अमेरिकेतील सर्वात मोठ्या ब्रँडच्या वित्तीय सेवांबरोबर संलग्नित आहे. 1986 सालापासून कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी कार्ड देणारी कंपनी आहे. कंपनीतर्फे डिस्कव्हर कार्ड दिले जाते, याशिवाय अमेरिकेतील रोख रकमांच्या बक्षीसांतील प्रमुख कंपनी आहे, आणि याद्वारे विद्यार्थ्यांना खासगी कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह इक्विटी कर्ज, चेकिंग आणि बचत खाती आणि ठेवींवरील प्रमाणपत्र यासारख्या थेट बँक सेवा दिल्या जातात. कंपनीचा डिस्कव्हरच्या नेटवर्कमध्ये कामकाज चालते, लाखो व्यापारी आणि कॅश वापरली जाणारी ठिकाणी आदींच्या साहाय्याने कार्य चालते;पल्स या देशातील अग्रणीच्या एटीएम/डेबिट नेटवर्क, आणि डिनेर क्लब इंटरनॅशनल, ग्लोबल पेमेंट नेटवर्क यांच्यासह तब्बल 185 देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये कंपनीच्या प्रक्रिया राबवल्या जातात.

‘श्यामची आई ‘ स्मृती शताब्दी निमित्त साने ​गुरुजींच्या ​ जन्मगावी अभिवादन !

0
पुण्याच्या साने गुरुजी स्मृती समितीचा पुढाकार
पालगड :श्यामची आई म्हणजे यशोदा सदाशीव साने  यांचा स्मृती शताब्दी कार्यक्रम आज ( २ नोव्हेंबर ) साने गुरुजींचे जन्मस्थळ पालगड येथे साने गुरुजींच्या आता स्मारक असलेल्या निवासस्थानी झाला.
निवृत्त मुख्याध्यापक,साने गुरुजी स्मृती समितीच्या उपाध्यक्ष आणि​’​पेन्शनर्स असोसिएशन दापोली’​च्या संचालक वसुधा बीडकर यांनी यशोदा साने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मंगेश गोंधळेकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
 साने गुरुजी स्मारक पालगड येथे झालेल्या कार्यक्रमाला साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष शरद केळकर, खजिनदार डॉ. अशोक गोंधळेकर,
​ सौ. वैशाली जोशी,  मुख्याध्यापक बी. डी.पाटील, मंगेश गोंधळेकर, प्राचार्य यदमलकर, विकास वाचनालयाच्या ग्रंथपाल सुलभा कदम,सौ. फडके , शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, उद्धव सुपेकर, सौ. आठल्ये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ सारखी साने गुरुजी लिखित गीते यावेळी विद्यार्थांनी म्हटली. प्रणव करमरकर या विद्यार्थाने श्यामच्या आईची महती सांगीतली. श्री. पेवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
 ग्रामपंचायत पालगड येथेही संतोष दळवी, विद्याधर जोशी, मालती सुंदर जाधव आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्यामची आई स्मृती शताब्दी कार्यक्रम पार पडला.

25000डॉलर पुणे ओपन आयटी महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत 15 देशातील खेळाडूंचा सहभाग

0

रोमानीयाच्या जॅकलिन अॅडिना क्रिस्टियन आणि भारताच्या करमान कौरथंडी मानांकित यादीत आघाडीवर

 

पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटी महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत जागतिक क्र. 265 असलेल्या रोमानीयाच्या जॅकलिन अॅडिना क्रिस्टियनला अग्रमानांकन देण्यात आले आहे. तर भारताच्या करमान कौर थंडीला व्दितीय मानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि.4 ते 11नोव्हेंबर 2017 या कालवधीत होणार असून यामध्ये 15 देशांतील अव्वल खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

इस्राईलची डेनीज खजानीयुक, युक्रेनची व्हॅलेरिया स्ट्राकोव्हा, स्लोव्हाहाकियाची ताडेजा माजेरिक, तैपेईची पीईची ली, रशियाची याना सिझिकोवा आणि एना व्हॅसेलीनोविक हे मानांकित यादीतील अन्य खेळाडू आहेत. गतवर्षी पार पडलेल्या या स्पर्धेत रशियाच्या इरिना क्रोमाचेवाने विजेतेपद पटकावले होते.

या स्पर्धेला कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांनी पाठिंबा दिला असून भारतीय महिला खेळाडू जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, या स्पर्धेतून बहुमोल असे डब्लूतिए गुण मिळविणे भारतीय महिलांना शक्य होईल आणि त्यामुळे मानांकन यादीतही त्यांना प्रगती करता येईल. करमान कौर थंडी आणि ऋतुजा भोसले या दोन खेळाडू थेट मुख्य ड्रॉमध्ये खेळणार आहेत. परंतु अन्य भारतीय खेळाडूंनाही पात्रात फेरीतून मुख्य ड्रॉ गाठण्याची संधी आहे.

या स्पर्धेचे उदघाटन दि.5 नोव्हेंबर 2017 रोजी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, नवनाथ शेटे संचालित नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमीने या स्पर्धेचे आयोजन केले असून व्यस्त वेळेपत्रकामुळे पुण्याबाहेरच्या स्पर्धा खेळण्यास असमर्थ ठरलेल्या भारतीय महिला खेळाडूंना महत्वपूर्ण गुण  मिळविण्यासाठी हि स्पर्धा उपयुक्त ठरेल. आमदार निधीतून या स्पर्धेसाठी साहाय्य केल्याबद्दल मी आमदार मेधा कुलकर्णी यांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारे विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थानिक आमदारांच्या निधीतून विविध स्पर्धांचे आयोजन करणे आम्हांला शक्य होणार आहे.

स्पर्धा संचालक नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमीचे नवनाथ शेटे म्हणाले की,  या स्पर्धेत सहभागासाठी गुणवान भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये राष्र्टीय विजेती महेक जैन, उपविजेता झील देसाई, आशियाई जुनिअर विजेती मिहिका यादव आणि पुण्याची स्नेहल माने या खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 60डब्लुटीए गुण, उपविजेत्याला 36 डब्लुटीए गुण देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीतील खेळाडूंना 22 डब्लुटीए गुण, उपांत्यपुर्व फेरीतील खेळाडूला 11 गुण, दुसर्‍या फेरीतील खेळाडूला 6 गुण आणि पहिल्या फेरीतील खेळाडूला 1 गुण देण्यात येणार असल्याचे शेटे यांनी नमुद केले. आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची आयटीफ  महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 4 व 5 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस सोमवार दि.6 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

 

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे 

जॅकलिन आदींना क्रिस्टियन(रोमानीया), करमान कौर थंडी(भारत), डेनीज खजानीयुक(इस्राईल), व्हॅलेरिया स्ट्राकोव्हा(युक्रेन), ताडेजा माजेरिक(स्लोव्हाहाकिया), पीईची ली(तैपेई),याना सिझिकोवा(रशिया), एना व्हॅसेलीनोविक

‘माझा एल्गार’ १० नोव्हेंबरला चित्रपटगृहात

0

वास्तवाशी भिडणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. समाजात वावरत असताना सर्जनशील वा संवेदनशील व्यक्तींना जाणवणाऱ्या अनेक विषयांना यामुळे चित्रपटामध्ये स्थान मिळाले आहे. अपप्रवृत्ती विरोधातील लढा दाखवताना एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा मिलिंद कांबळे दिग्दर्शित माझा एल्गार हा मराठी  चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या सद्गुरू फिल्मस प्रस्तुत ‘माझा एल्गार’ या चित्रपटाची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून श्रीकांत आपटे प्रस्तुतकर्ते आहेत.

श्रद्धेच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो त्यावर ‘माझा एल्गार’ हा चित्रपट भाष्य करतो. गावातल्या एका अपप्रवृत्तीच्या महंता विरोधात एका स्त्रीने उभारलेला लढा दाखवतानाच तरुणाईने मनात आणलं तर ते समाजात नक्कीच चांगला बदल घडवू शकतील हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. आजच्या काळातील तरुणी आणि देवभोळ्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढणारा धूर्त महंत यांच्यातील चित्तथरारक संघर्ष यात पहायला मिळेल. या संघर्षात तरुणीला कोणाकोणाची साथ मिळेल? व हा लढा ती कशाप्रकारे लढेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

माझा एल्गार चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’  मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना…अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे व आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्तेने गायलं आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.

ऐश्वर्या राजेश  व यश कदम या नव्या जोडीसोबत स्वप्नील राजशेखर, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे आहे. संगीत सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबर्डे यांचे आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वार चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. १० नोव्हेंबरला माझा एल्गार चित्रपटगृहात दाखल होईल.

वीजजोडणीनंतर बिलच न भरणारे 7400 कृषीपंपधारक तर 38700 थकबाकीमुक्त

0

पुणे : पुणे परिमंडलात 7419 कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून वीजबिलच भरले नसल्याचे समोर आले आहे. या कृषीपंपधारकांकडे सध्या 19 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. परंतु, दुसरीकडे 38,620 कृषीपंपधारक शेतकरी नियमित वीजबिल भरीत असल्याने ते थकबाकीमुक्त असल्याची स्थिती आहे.

दरम्यान गेल्या तीन वर्षात पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत 13,384 कृषीपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत तर सद्यस्थितीत 2940 पेडपेडींग यादीतील कृषीपंपांना विविध योजनांमधून वीजजोडण्या देण्यात येत आहेत.

सद्यस्थितीत वीजपुरवठा सुरु असणारे एकूण 1,22,700 कृषीपंपधारक वीजग्राहक पुणे परिमंडलात आहेत. त्यापैकी 84 हजार 80 कृषीपंपधारकांकडे वीजबिलांचे 226 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांमधील 7419 कृषीपंपधारकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही वीजबिल भरले नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत 19 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे.

एका कृषीपंपाला वीजजोडणी देण्यासाठी सरासरी 1 लाख 16 हजार रुपये खर्च येतो हे विशेष. मात्र (कंसात थकबाकी) मावळ, खेड तालुक्यातील 2341 (7 कोटी 47 लाख), जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील 3148 (7 कोटी 92 लाख) तर मुळशी व हवेली तालुक्यातील 1930 (3 कोटी 80 लाख) कृषीपंपधारकांनी वीजजोडणी घेतल्यानंतर वीजबिलच भरलेले नाही, असे दिसून आले आहे. याउलट पुणे परिमंडलात सद्यस्थितीत नियमित वीजबिल भरणार्‍या कृषीपंपधारक शेतकऱ्यांची संख्या 38,620 असून ते थकबाकीमुक्त आहेत हे उल्लेखनीय. गेल्या तीन वर्षांत पुणे परिमंडलात एकूण 13,384 कृषीपंपांना 30 सप्टेंबरपर्यंत नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. सध्या 2940 कृषीपंपांना विविध योजनांच्या माध्यमातून वीजजोडण्या देण्याची कार्यवाही सुरु आहे.

आळंदी कार्तिकी यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत-जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे : येत्या 14 नोव्हेबर रोजीच्या कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या यात्रा सोहळयात मोठया प्रमाणात भाविक सहभागी होत असतात. या यात्रा कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिल्या.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी येथील कार्तिकी एकादशी यात्रा सोहळयाची पुर्व तयारी बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सौरभ राव  पुढे म्हणाले की, श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रा सोहळयासाठी खेडच्या उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष (नियंत्रण)स्थापन करावे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर अधिग्रहण करावी. तसेच वारकऱ्यांसाठी सरकारी दरात रॉकेल, गॅस, धान्य उपलब्ध करुन दयावे. आळंदी येथे पाहणी करुन इतरही अडचणीची दखल घ्यावी. तेथील अतिक्रमण काढावे. यात्रा कालावधीत मांसमच्छी व दारु विक्री यावर बंदी घालावी. आळंदी नगरपरिषदेने तिर्थक्षेत्रातील प्रमुख भागामध्ये (प्रदक्षिणा रोड, गोपाळपुरा, इंद्रायणी घाट) येथे विद्युत व्यवस्था करावी. पालखी तळावरील स्वच्छता व सपाटीकरण करण्यात यावे. रस्त्यावरील, गटारावरील चेंबरवरील पत्रे काढुन चेंबर झाकणेचे योग्य नियोजन करावे. तात्पुरती शौचालये उभारणे, आरोग्याच्या दृष्टीने यात्रेच्या ठिकाणी औषधांची धुर फवारणी करावी. आळंदी येथील रस्ते दुरुस्त करणे, उघडी गटारे बंद करणे, आळंदी  येथील नियंत्रण कक्षात तसेच शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. तसेच भाविकांची सुरक्षितता विचारात घेऊन आळंदी यात्रेच्या ठिकाणी पथारी वाले विक्रेते, खेळणी विक्रेत याबाबतचे नियोजन करणे.

पोलीस विभागाने पोलीस बंदोबस्त तैनात करणे. आळंदी येथे येणाऱ्या वाहनांचे नियोजन करणे. स्पीकरचा आवाज मार्यादीत ठेवणे विषयी दक्षता घ्यावी. तसेच ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिकासह सुसज्ज डॉक्टर व मेडीसिन, ओ.पी.डी. व आय.पी.डी.ची तात्काळ व्यवस्था करावी. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने नियमित पाणी पुरवठा करावा. श्री क्षेत्र आळंदी येथे अग्निशामक बंब याची सोय करावी. एस.टी.महामंडळाने शासकीय विश्रामगृहाजवळ यात्रा काळात तात्पुरते एस.टी.स्टॅण्ड उभारावे.देहुफाटा चौकाच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करावी. यात्रा कालावधीत जादा बसेसची व्यवस्था करावी. प्रादेशिक परिवहन विभागाने जड वाहने प्रवेशास प्रतिबंध करावा.तसेच जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीत दोन दिवस आधी पाणी सोडावे. भारत संचार विभागाने मोबाईल कनेक्टीव्हीटी  कॅपॅसिटी वाढवावी. विद्युत विभागाने दि.9 ते 18 नोव्हेंबर कालावधीत अखंडीत वीज पुरवठा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्ते व्यवस्थित करावे आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

 

‘सेल्फी विथ खड्डा…चंद्रकांतदादा , पहा खड्डेच खड्डे ….खा.सुप्रिया सुळेंचा टोला

0

पुणे : राज्यात रस्त्यांवर एकही खड्डा नाही, असा दावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज सुप्रिया सुळे यांनी खड्ड्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढून टोला लगावला आहे . शिवाय येत्या 1 डिसेंबरपर्यंत राज्यातले सर्व खड्डे बुजवले गेले नाहीत तर मी स्वतः आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कात्रज उंड्री बायपास व बोपदेव घाट परिसरात खड्ड्यांसह सेल्फी काढून ते फोटो आपल्या फेसबूक पेजवरुन व्हायरल केले. राज्यातील रस्त्यावरचा खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला सेल्फी विथ खड्डा याद्वारे सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.