Home Blog Page 3235

दोन अंग नृत्य एक; स्वर एक भाव अनेक ; नृत्य आणि गायनातून गुरू रोहिणीताई भाटे यांना आदरांजली

0

पुणे :  ते सादर करत असलेली प्रत्येक कलाकृती रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळवत होती,  घड्याळाचे काटे पुढे सरकत होते परंतु त्यांनी मंच सोडूच नये असे भाव प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरेतून स्पष्टपणे व्यक्त होत होते. दोन अंग होते पण नृत्य मात्र एकच सादर होत होते. ते आले, नाचले आणि त्यांनी रसिकांना जिंकलं.  प्रकृति नृत्यालयातर्फे गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ संवेदन मैफल भरविण्यात आली होती. यावेळी प्रथमच पुण्यात सादरीकरण केलेल्या गौरव मिश्र आणि सौरव मिश्र या जुळ्या बंधूंनी आपल्या कथक नृत्यविष्काराने रसिकांची मने जिंकली. तर आपल्या सुरेल गायकीतून पद्मभूषण पं छन्नूलाल मिश्र यांनी मैफलीस एका वेगळ्या उंचीवर नेले. अनेक भाव उलगडणारा त्यांचा मधुर स्वर रसिकांना विलक्षण कलेची अनुभूती देऊन गेला.

गुरू रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये तसेच प्रकृति नृत्यालयाच्या शिष्या यांच्या नृत्य सादरीकरणाने मैफलीस आरंभ झाला. कथक परंपरेनुसार झपताल त्यांनी सादर केला. रोहिणीताईंची सुंदर रचना असलेले ‘कैही कारण सुंदर हात जलो’ हे ‘मुग्धाभाव’ दर्शविणारेे नृत्यकाव्य नीलिमा अध्ये यांनी हळुवारपणे उलगडले.  वाद, विवाद, सुसंवाद या तिगलबंदीने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.

त्यानंतर पं. सितारादेवी यांचा वारसा लाभलेले बनारस घराण्याचे युवा नर्तक गौरव मिश्र आणि सौरव मिश्र यांचे कथक सादरीकरण झाले. अतिशय उत्साहवर्धक आणि उर्जायुक्त त्यांचे नृत्य पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पदन्यास आणि अभिनयाच्या सुरेख मिलाफातून त्यांनी शिवतांडव व शिवस्तुती सारख्या सुंदर रचना प्रस्तुत केल्या.  घुंगरामधून त्यांनी उमटवलेले विविध ध्वनी म्हणजे त्यांच्या कलेवरील विलोभनीय प्रभुत्वाची साक्ष देत होती. यावेळी त्यांना संदीप मिश्रा(सारंगी), मनोज देसाई (संवादिनी) आणि पं. अरविंदकुमार आजाद (तबला) यांनी सुरेल साथ दिली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीत शिरोमणी पं छन्नूलाल मिश्र यांचे गायन झाले. ते स्वरमंचावर येताच सर्व श्रोत्यांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. पं छन्नूलाल मिश्र यांनी राग ‘मारू बिहाग’ सादर केला. छोट्या छोट्या आलापातून सुरुवात करून श्रोत्यांना आपल्या मधुर स्वरांमध्ये त्यांनीे अक्षरशः खिळवून ठेवले. त्यानंतर राग मारू बिहाग मध्ये त्यांनी पेश केलेली ठुमरी म्हणजे साक्षात स्वरगंगाच.  आणि या स्वरगंगेचा मिलाफ थेट श्रोत्यांच्या हृदयात. त्यांनी सादर केलेला केलेली ठुमरी, ‘दादरा ठेका’ रसिक श्रोत्यांना विशेष भावला. ‘देखो देखो कैसी करत है ये रात’ , ‘ सावरे जमुना तट छिनो मेरो हात’, ‘दिगंबर खेले मसाने मै होरी’ अशा त्यांनी गायलेल्या बंदिशीनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक शब्दाचे स्पष्ट आणि शुद्ध उच्चार, त्यातील भाव उलगडून मांडण्याचा छन्नूलाल मिश्र यांचा वेगळा अंदाज यामुळे मैफलीची रंगत अखेर पर्यंत टिकून राहिली. यावेळी त्यांना रंजना आपटे(तानपुरा), नम्रता मिश्र (गायन), अरविंदकुमार आजाद (तबला)  यांनी समर्पक साथ दिली. आसावरी पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मंच नव्हे हे तर स्वरमंदिर

जेथे नाटक सादर होते तो मंच. भाषणे होतात ते व्यासपीठ पण जेथे सरस्वतीच्या आशीर्वादाने सुरेल स्वरांची अनुभूती घेता येते ते तर साक्षात स्वरमंदिर हे सांगतानाच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या समवेतील आठवणींनाही पं छन्नूलाल मिश्र यांनी उजाळा दिला.

बाबासाहेबांच्या घटनेमुळे लोकशाही मजबूत -संविधान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

0

पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेमुळे भारतात लोकशाही मजबूत राहिली आहे . असे मत आज विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी संविधा यात्रेला संबोधित करताना व्यक्त केले .
पुण्यातील समता भूमी , महात्मा फुले वाडा येथून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि मशाल प्रज्वलित करून येथून या यात्रेचा प्रारंभ झाला .भाजपचे खासदार अनिल शिरोळे , कॉंग्रेस चे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड ,तसेच रिपब्लिकन चे महेंद्र कांबळे,राहुल डंबाळे आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते येथे उपस्थित होते . . खासदार शिरोळे यांनी यात्रेत आपला सहभाग शेवटपर्यंत नोंदविला. मात्र भाजपचे अन्य नेते कुठे दिसले नाहीत . नगरसेवक अविनाश बागवे , सदानंद शेट्टी,परशुराम वाडेकर , तसेच अनिल सातपुते ,सतीश पवार , नितीन हंबीर आदी मान्यवर कार्यकर्ते आणि असंख्य भिमप्रेमी तरुण या यात्रेत साभागी झाले होते .जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला .

पुणे महापालिकेतील बढत्या वादाच्या भोवऱ्यात …

0

पुणे-एकीकडे तुकाराम मुंडे यांनी पीएमपीएमएल मधील अधिकाऱ्यांच्या बढत्या वादग्रस्त असल्याचे दर्शवित असताना आता  महापालिकेतील सहायक आयुक्तांना उपायुक्त पदावर, आणि प्रशासन अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त पदावर  बढती देण्याचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत . आयुक्तांनी विधी समिती मार्फत 1 के खाली हे दोन्ही विषय नोव्हेंबरच्या कार्यपत्रिकेवर आणण्यात यश मिळविले असून या संदर्भात महारष्ट्र शासनाच्या सामन्य प्रशासन विभागाचे उपसचिव टि. वा .करपते यांनी 2 नोव्हेंबर ला काढलेल्या जीआर कडे स्पष्ट पणे दुर्लक्ष करून या   बढत्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात येतो आहे .तर ज्यांची नावे बढत्यांसाठी सुचविली आहेत त्यातील काही अधिकाऱ्यांची कारकीर्द ही कायद्याच्या कचाट्यात सापडलेली असताना त्यांच्या बढत्यांच्या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे .
सर्वप्रथम हे विषय पहा काय आहे …


सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर बढत्या …
माधव देशपांडे यांची शैक्षणिक पात्रता डीसीई अशी दिलेली आहे.
उमेश माळी यांची पात्रता बीकॉम एलएल बी ,डिप्लोमा इन जर्नालिझम, डी.एल एल अँड एल डब्ल्यू ,इलेस जी डी अशी दिलेली आहे
संध्या गागरे यांची पात्रता बी ए . दिलेली आहे .
संजय गावडे यांची पात्रता डी.एम.ई , ए.एम आय .ई . दिलेली आहे .
यापैकी गागरे अनुसूचित जमाती गटातून तर गावडे यांना भजक गटातून बढती आणि अन्य दोघांना खुल्या गटातून बढतीचा विषय आहे .
या शिवाय वसंत पाटील यांची पात्रता डीसीई दिली असून त्यांना देखील खुल्या गटातून बढतीचा विषय आहे .


आता प्रशासन अधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त पदावर बढतीचा विषय पाहू .
आशिष महाडदळकर  हे बीकॉम एल.एस.जी.डी आहेत
प्रकाश जंगले हे बीकॉम आहेत, कोंडीबा सुपे हे बीकॉम एल एस जी डी आहेत .राजेंद्र रेगडे बी. ए . एल.एस जी डी.आहेत .शाम तारू हे बीकॉम आहेत .वैभव कडलख हे एमपीएम, एम ए ,डी एल एल अँड एल.डब्ल्यू.डी.फार्म आहेत .
यातील महाडदळकर,सुपे,आणि रेंगडे हे खुल्या गटातून तर जंगले अजआणि तारू हे भज-ब गटातून आणि कडलाख हे अ.जा.गटातून आहेत .
विधी समितीत काही उपसूचनेसह हे विषय मान्य करून मुख्य सभे पुढे ठेवण्यात आले आहेत .
यामध्ये वसतीगृहप्रमुख सोमनाथ बनकर ,आणि करसंकलन विभागातील दयानंद सोनकांबले यांचा समावेश करण्यात आला आहे .

आता शासनाने महापालिकेच्या आयुक्तांकडे पाठविलेल्या जी आर बद्दल …


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (क्रमांक बीसीसी -२०१७/प्र क्र ३१२ A भाग -1/16-ब )2 नोव्हेंबर रोजी जीआर काढून सर्व महापालिका आयुक्तांना तो पाठविला आहे .
त्यात स्पष्ट म्हटले आहे … १३ नोव्हेंबर २०१७ रोजी होणाऱ्या सुनावणी पर्यंत सर्व स्तरावरील पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवावी . आणि याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी .हा जी आर येथे आम्ही देत आहोत .
याच जी आर चा आधार घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी उपाधीक्षक पदावरून अधीक्षक पदावर बढतीने नेमणुका करण्याचे आदेश रद्द केले .ते पत्र हि येथे देत आहोत .


असे असताना
प्रभारी आयुक्त म्हणून सही केलेल्या 6 नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये विधी समितीत झालेले हे प्रशासन अधिकारी ते सहायक आयुक्त ,आणि सहायक आयुक्त ते उप आयुक्त या पदावरील बढत्यांसाठीचा विषय 1 के  खाली तातडीने नोव्हेंबर च्या मुख्य सभेपुढे ठेवण्यात आला आहे . यांनी हा जीआर दुर्लक्षित करून हा विषय ठेवल्याचे स्पष्ट आहे असा आरोप होतो आहे .
आता या जीआर च्या मुद्द्या बरोबर महापालिका आयुक्त यांनी  अन्य मुद्द्यांकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले जाते . ते कोणते मुद्दे ते पाहू यात .
शासनाने मान्यता दिलेल्या सभा कामकाज नियमावली प्रकरण १४ (४) मध्ये महापालिकेचा सहायक आयुक्त हा मान्य विद्यापीठाची पदवी घेतलेला असावा असे म्हटलेले आहे . पण सध्या या विषयानुसार ज्यांना  सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर बढती देण्यात येणार आहे त्यापैकी माधव देशपांडे यांची पात्रता केवळ डीसी ई दिलेली आहे . ते पदवीधर आहेत कि नाही ? याचा उल्लेख केलेला नाही .तीच बाबा संजय गावडे आणि वसंत पाटील यांच्याबाबत हि दिसते आहे . त्यांचा हि उल्लेख ते पदवीधर आहेत किंवा कसे ? हे विषयपत्रात  नमूद करण्यात आलेले नाही .
या शिवाय महाडदळकर नावाचे जे प्रशासन अधिकारी आहेत ज्यांना सहायक आयुक्त पदावर बढती या विषयान्वये  देण्यात येणार आहे . त्यांच्याबाबत गंभीर आक्षेप उपस्थित केले जात आहेत . महापालिका आयुक्त यांनी १८ ऑगस्ट २०११ रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना ‘ मनपाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या नियुक्त्यांबाबत ‘ अशा विषयाने (जावक क्र. -मआ /उ आ /से /२३१४ ) जो सविस्तर अहवाल पाठविला आहे त्यामध्ये 6 क्रमांकाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले तर ..त्यामध्ये या महाडदळकर यांनी उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे दिसून आल्याचे नमूद करून विधी सल्लागार यांच्या मार्फत पुढील कारवाई प्रस्तावित केल्याचे म्हटले आहे .


या कारवाईचे पुढे काय झाले ? हा मुद्दा येथे उपस्थित होणार आहे .
या शिवाय सहायक आयुक्त उपायुक्त पदावर नेमणूक केलेल्या अधिकार्यास राज्य शासनाकडून कलम ४५ (4) अन्वये मान्यता घ्यावी लागते याचा हि उल्लेख मुख्य सभेपुढे ठेवण्यात आलेल्या या विषयांमध्ये करण्यात आलेला नाही .
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हा विषय मंजूर करताना नगरसेवक आयुक्तांकडून घेणार काय ?किंवा आयुक्त या सर्व संशाय्स्पद वाटणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देणार काय ? हा खरा मुद्दा आहे .

 

संगीत हा सर्व मानव जातीला एकत्र जोडणारा दुवा पद्मभूषण डॉ. एन. राजम

0
पुणे :“आजच्या भेदाभेदाच्या जमान्यात सर्व मानवजातीला एकत्र जोडणारा दुवा  म्हणजे संगीत हा एक आशेचा किरण आहे.,”असे प्रतिपादन सुप्रसिध्द व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. श्रीमती एन. राजम  यांनी केले. त्याच बरोबर त्यांनी व्हायोलिन वादनाचे सप्रयोग प्रतिपादन केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘संगीतातून ईश्‍वराचा साक्षात्कार’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड होते.
याप्रसंगी विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ.एस. हरिदास हे उपस्थित होते.
सुरूवातीला श्रीमती एम.राजम यांनी संत मीराबाई, संत तुलसीदास, संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या काही परिचित भक्तीगीतांच्या स्वररचनांचे वादन केले. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय व सुगम संगीतातील फरक स्पष्ट केला.त्या म्हणाल्या,“एकाच प्रकारचे भक्तीगीत किंवा भजनाचे वादन किंवा गायन जेव्हा एखादा सुगम गायक किंवा वादक सादर करतो, तेव्हा त्या रचनेच्या संगीताहुकूम त्याचे वादन असते. पण एखादा शास्त्रीय गायक किंवा वादक जेव्हा ती रचना सादर करतो, तेव्हा दोन कडव्यांच्या मधील भाग तो स्वतःच्या प्रतिभेनुसार रंगवीत असतो. भारतीय शास्त्रीय संगीतातच हे स्वातंत्र्य असते. पाश्‍चात्य संगीतात मात्र त्या बाबत स्वातंत्र्य असत नाही.”
“सुगम असो वा शास्त्रीय, मुख्य म्हणजे श्रोत्यांना एका उच्च पातळीवर नेऊन प्रत्यक्ष ईश्‍वराचे दर्शन घडविणे किंवा मोक्षाचे द्वार उघडून देणे ही क्षमता भारतीय संगीतात आहे. यासाठी श्रोत्यांना संगीताच्या शास्त्राचे ज्ञान असण्याची मुळीच आवश्यकता नाही. अर्थात जर ते ज्ञान असेल, तर दुधात साखरच पडल्यासारखे होईल. म्हणून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत, त्यामध्ये संगीत हा एक प्रमुख घटक आहे.”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ ज्ञान, भक्ती व कर्मयोग  याचा मिलाफ  असलेले संगीत आपल्याला प्रत्यक्ष देवाकडे घेऊन जाते. संगीताच्या साधनेतून ईश्‍वर दर्शन हा आमच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. २१व्या शतकात जगाला शांतीचा संदेश फक्त संगीतच देऊ शकते.”
सकाळच्या सत्रात डॉ धनंजय केळकर व डॉ.संजय उपाध्ये यांची व्याख्याने झाली.
आरोग्यपूर्ण सूखाच्या शोधात, या विषयावर डॉ.धंनजय केळकर म्हणाले,“ निसर्ग हाच सर्वात मोठा देव आहे. तो कल्पनेपलिकडील आहे. यामध्ये जबरदस्त गुढता, आश्‍चर्य आणि साहस अशा गोष्टींचा समावेश आहे. सृष्टीवरील जंगल, समुद्र, बर्फ, वाळवंट या गोष्टींच्या सान्निध्यात गेल्याशिवाय आपल्याला सुख काय असते, हे कळणार नाही. याचा अनुभव घेण्यासाठी प्रचंड इच्छा शक्तीची गरज आहे. काश्मीर व लद्दाख यांच्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर सुखाचा एक प्रकार अनुभवास येतो. आपण आपले रोजचे जीवन अतिशय चाकोरीबद्ध जगत असतो. त्या पलिकडे जाऊन निसर्गाजवळ गेले पाहिजे. ”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, आनंदासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करण्याऐवजी वर्तमानकाळातील प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यावा. मनस्थिति बदलल्या शिवाय परिस्थिती बदलणार नाही. हे सूत्र सदैव ध्यानात ठेवा. मानवाला दुख पोहचविण्याचे सर्वात मोठे कारण नकारात्मक विचार आहे. म्हणून सदैव जिंकलो ऐसे म्हणा. म्हणजे तुम्ही सतत आनंदात रहाल व इतरांनाही आनंदी कराल. मुख्य म्हणजे तुमची कार्यक्षमता वाढेल व तुमचा प्रत्येक क्षण सुखात जाईल.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

दुर्ग जागरातूनच राष्ट्र जागरण होईल- शिवकालीन शस्त्र संग्राहक प्रमोद बोराडे

0

पुणे-शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धेतील स्पर्धकांना, इतिहास अभ्यासकांबरोबर मोफत किल्ले अभ्यास सहल व किल्ल्यावरच बक्षीस समारंभ असा उपक्रम आयोजित केला जातो . यंदा किल्ले रोहिडा येथे या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, इतिहास संशोधक व शस्त्र संग्राहक प्रमोद बोराडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .यावेळी मार्गदर्शन करताना श्री.बोराडे म्हटले की गड किल्ल्यांमुळेच छत्रपती शिवरायांनी पातशाह्या लोळवल्या, परकीय आक्रमणे परतवून लावली, व गुलामगिरी रुपी अंधारातून स्वराज्यरूपी प्रकाश या महाराष्ट्रात पसरवला .यावेळी, प्रतिष्ठान च्या अध्यक्षा, नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे यांनी, प्लास्टिक न वापरण्याची शपथ उपस्थितांना दिली .प्रतिष्ठान तर्फे रोहिडा गडावर, स्वछता मोहीम राबविण्यात आली व प्लास्टिक व कचरा गोळा करून गड स्वच्छ करण्यात आला . रा.स्व.संघ पुणे महानगर प्रचारक अण्णा वाळिंबे व सिंहगड भाग कार्यवाह .सचिन भोसले यांनी नारळ फोडून सहलीची सुरुवात केली .कार्यक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष होते व एकूण 484 जणांनी उपक्रमात सहभाग घेतला .

विद्यार्थ्यांनी अनुभवली जगातील सात आश्‍चर्ये !

0
पिंपरी / प्रतिनिधी:
उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या, शोभेची फुले, तसेच फुलपाखरे, कारंज्याचे तुषारे हे सर्व पाहून हरकून गेलेले विद्यार्थी… जगातील सात आश्‍चर्ये एकाच ठिकाणी पाहण्यातला आनंद आणि विद्यार्थ्यांना पडलेले विविध विविध प्रश्‍न व त्या माध्यमातून उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न… त्यांच्या निरागस प्रश्‍नांना शिक्षकांनी दिलेली समर्पक उत्तरे… आपणाला काहीतरी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहण्याजोगा होता.
निमित्त होते, विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लीटल फ्लॉवर स्कूलच्यावतीने आयोजित सहलीचे. पहिली ते सातवीपर्यंतचे सुमारे 600 विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. ही सहल पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यान आणि स्व. यशवंतराव चव्हाण उद्यान या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी शाळेच्या शिक्षिका, तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत सहकार्य केले. यावेळी सोसायटीच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पु.लं. देशपांडे उद्यानातील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. हा सर्व अनुभव विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण होता. स्व. यशवंतराव चव्हाण उद्यानात असलेली सात आश्‍चर्ये पाहण्याचा, त्याविषयी कुतुहलतेने जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न स्तुत्य होता. विद्यार्थ्यांनी भारतातला ताजमहल, पॅरिसचा आयफेल टॉवर, इजिप्तमधील गिझाचा भव्य पिरॅमिड, इटलीचा कोलासियम, ब्राझिलचा ख्राइस्ट द रिडीमर, अमेरिकेचा स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, चीनची भिंत.. ही जगातील सात आश्चर्ये जाणून घेतली. भारतातील महत्त्वाच्या वास्तूंचेही विद्यार्थ्यांना दर्शन झाले. हे सर्व पाहून संपूर्ण जगाचीच सफर झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
याबाबत संस्थेच्या सचिव आरती राव यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषयाच्या ज्ञान वाढीसाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मोठी मदत होत असते.

शहीदांना अभिवादन आणि संविधान उद्दिशकेचे सामुहिक वाचन (व्हिडीओ)

0

पुणे- शहर कॉंग्रेसच्या वतीने शहीद हवालदार अंबादास पवार यांचे बंधू सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ,आज २६/११ च्या पूर्व संध्येस मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले आणि उद्याच्या २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या औचित्याने संविधान उद्दिशकेचे सामुहिक वाचन करण्यात आले .
या वेळी शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड , संगीता तिवारी , बाळासाहेब अमराळे,बंडू नलावडे ,गोपाळ तिवारी, विकास टिंगरे,धनंजय दाभाडे, सोनाली मारणे,सुरेखा खंडागळे, राधिका मखामले ,कल्पना उनवणे, ललिता जगताप, रवींद्र म्हसकर ,छाया जाधव,अॅड.बोराटे,नारायण पाटोळे, अमर परदेशी ,विनय ढेरे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते .

‘शोषणमुक्त समाजाची निर्मिती हेच संविधानाचे मुख्य उद्दीष्ट’ : बी.जी.कोळसे पाटील

0
पुणे: ‘शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच संविधानाचे मुख्य उद्दीष्ट आहे. गरीब-श्रीमंत अशी दरी नष्ट करणे, भारताला खर्‍या अर्थाने सार्वबहुमत्व सामाजिक धर्म निरपेक्ष बनविणे हे देखिल संविधानाचे उद्दीष्ट आहे. सदर उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी संविधान प्रथम समजून ते आचरणात आणले पाहिजे,’असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केले.
‘ए.के.के.न्यु लॉ अ‍ॅकॅडमी’च्या वतीने आज शनिवारी ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यूकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एम.सी.ई. सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, एम.सी.ई. सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम, डॉ.रशिद शेख (प्राचार्य, ए.के.के.न्यू लॉ. अ‍ॅकॅडमी), प्रा.मुजफ्फर शेख, डॉ. मोरेश्‍वर कोठावदे उपस्थित होते.
डॉ. पी.ए.इनामदार बोलताना म्हणाले,‘भारतीय संविधान हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना बहुमोल देणगी दिली आहे. प्रत्येक भारतीयाने चांगल्या स्वरूपाचे शिक्षण घेऊन संविधानाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध व परिपूर्ण बनविले पाहिजे.’
डॉ.रशिद शेख (प्राचार्य, ए.के.के.न्यू लॉ. अ‍ॅकॅडमी) यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेसिन्टा बॅस्टियन यांनी केले. तर डॉ. मोरेश्‍वर कोठावदे यांनी आभार मानले.
डॉ.रशिद शेख बोलताना म्हणाले, ‘संविधान देशाचा आत्मा आहे. संविधानाचे महत्व समजण्यासाठी आणि याबाबत जागरूकता करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथोत्सव साहित्य रसिकांसाठी पर्वणी -उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे

0

पुणे : वाचनसंस्कृती वाढावी आणि नवनवीन साहित्य संपदेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी, ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सव साहित्य रसिकांसाठी पर्वणी असून त्याचा लाभ सर्व नागरिकांना घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले.

ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता मुलींच्या शाळेत जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करताना उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे बोलत होते. सहायक ग्रंथालय संचालक द.आ.क्षीरसागर, ग्रंथपाल सु.हि.राठोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती उज्वला लोंढे, विविध शासनमान्य सार्वजनिक वाचलनालयाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन युवक युवती यावेळी उपस्थित होते.

राज्याच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत वाचनसंस्कृती वाढावी आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 25 आणि 26 नोव्हेंबर या कालावधीत हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात राज्यातील प्रसिध्द पुस्तक प्रकाशन संस्थांनी ग्रंथ व साहित्याचे प्रदर्शन करणारे स्टॉल लावले आहेत.

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली.

लोकराज्य स्टॉलला भेट

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल ग्रंथेात्सवात लावण्यात आला आहे. या स्टॉलला भाऊसाहेब गलांडे यांनी भेट देऊन लोकराज्य मासिकाची पाहणी केली.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये मान्यवरांचे व्याख्यान व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. साहित्य व समाज या विषयावर ज्येष्ठ साहित्यीक राजन खान, आनंदी जीवनासाठी ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्व या विषयावर अनिल गुजाळ, संत साहित्य काळाची गरज या विषयावर डॉ.अरविंद नेरकर बोलणार आहेत. प्रदिप निफाडकर गझलदिप सादर करणार असून उल्हासदादा पवार यांचे ग्रंथोत्सव व ग्रंथालय चळवळ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामुल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती उज्वला लोंढे यांनी यावेळी केले.

ग्रंथदिंडी

       ग्रंथोत्सवामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सकाळी महात्मा फुले भाजी मंडई येथून कार्यक्रमस्थळापर्यत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थींनी,साहित्यीक, साहित्यप्रेमी नागरिक, वाचनालयाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

संविधान दिनानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने “ भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन “

0

पुणे-संविधान दिनानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड) येथील पंचशील चौकात मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने सजनाबाई भंडारी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले .  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगरसेवक प्रदीप गायकवाड सचिन शिंदे,  सुमन गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच ,  संविधानाचे पूजन नगरसेविका लता राजगुरू , सोनूभाऊ निकाळजे , शाम गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी संविधानाच्या उद्देशकीचे वाचन बौद्धाचार्य जयसिंग कांबळे व सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी. दाहिंजे यांनी केले .

या कार्यक्रमाचे संयोजन मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष राहुलदादा तायडे , दलित पँथर नेते प्रकाश साळवे , सुजित यादव यांनी केले . यावेळी प्रा. मयूर गायकवाड , यासिन शेख , श्रीराम चौधरी , केशव शिंदे , नितीन रोकडे , धनंजय कांबळे , के. बी. मोटघरे , बी. आर. थोरात , रामचंद्र वंजारे , बंडू गायकवाड , जितेंद्र गायकवाड , नवनाथ सोनकांबळे , नामदेव बनसोडे , कैलास झेंडे , कुंदन रणधीर , गौतम कांबळे , विनोद उबाळे , शशी निकाळजे , निलेश गायकवाड, गौतम सवाणे  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पी. दाहिंजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान यांनी या देशातील वेगवेगळ्या जातींना एकत्र ठेवून या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम केले आहे . या संविधानामुळे सर्वाना शिक्षणाचा हक्क,  समान कायदा व मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे . हे संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपण  सर्व कटिबध्द राहू , अशी शपथ घेण्यात आली . भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधान दिन साजरा

0

पुणे  :- गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधान दिन साजरा केला.
यावेळी स्कूलच्या गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवाणी याप्रसंगी उपस्थित होते.यानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून(Presentation) तसेच नाटकांच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्ये आणि त्यानंतर संविधानाच्या समाविष्ट केलेल्या मूल्यांची माहिती दिली.सोनू गुप्ता यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या,संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना अवलंबण्यासाठी जागरूक केले पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने येणाऱ्या पिढीला ही  तत्त्वे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना देशाचे जागरूक नागरिक बनविण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.
आपले हक्क आणि जबाबदारी विद्यार्थ्यांना समजावी, या हेतूने गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलने राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.असे विचार मुख्यध्यापिका भारती भागवाणी यांनी मांडले.

उत्तरध्रुवीय “फजअलरावेन” मोहिमेसाठी प्रथम भारतीय निवडीच्या उंबरठ्यावर, भारतासाठी वोटिंगचे आवाहन

0

एव्हरेस्टवीर, विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे जगातून ५ व्या स्थानावरपाकिस्तान, मंगोलिया येथील येथील युवक पुढील स्थानावर, आनंदला पुढे आणण्यासाठी वोटिंग करण्याचे आवाहन

१४ डिसेंबर पर्यंत आनंदला वोटिंग केल्यास भारताचा तिरंगा या मोहिमेत फडकणार

भारताचा शिखरवीर विश्वविक्रमवीर आनंद बनसोडे जागतिक स्तरावर मनाच्या समजल्या जाणाऱ्या “फजअलरावेन” या उत्तर धृवावरील मोहिमेत जगातून ५व्या स्थानावर असून प्रथम स्थानावर येण्यासाठी भारतातून भरपूर वोटिंगची आनंदला गरज आहे. १९६० पासून सुरु झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत एकाही भारतीयाची निवड झाली नव्हती. एव्हरेस्टवीर आनंदची निवड झाल्यास तो एकमेव व प्रथम भारतीय असेन.

उत्तर ध्रुवावर आर्क्टिक मोहिमेत जवळपास ३०० किलोमीटरचा पल्ला गाठायचा असतो. उणे ३०-४० तापमानात मजल मारायची असते.जगभरातून १५० पेक्षा जास्त देशातील ३००० पेक्षा जास्त लोकांमधून काही मोजक्या लोकांची निवड या मोहिमेसाठी होते. ऑनलाईन वोटिंग मध्ये भारताचा आनंद बनसोडे जर प्रथम स्थानावर आला तर आनंदची निवड होणार आहे.

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने आतापर्यंत जगातील ४ खंडातील ४ सर्वोच्च शिखरे सर करून त्यावर विश्वविक्रम केला होता. आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन व जगभरातील अनेक मोहिमाद्वारे सामाजिक कार्यही केले होते. २०१६ मध्ये आनंदने न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भाषणही दिले होते. इयत्ता ९ वीच्या हिंदी पुस्तकात आनंदच्या कार्यावर धडाही समाविष्ट केला आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटी आपआपल्या देशातील स्पर्धकांना वोट मिळवण्यासाठी मदत करत आहेत. आनंदला वोट करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे व भारताचा तिरंगा या मोहिमेत फडकवण्यास मदत करावी असे आव्हाहन आनंदच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले.

कसे कराल वोटिंग-

polar.fjallraven.com  या वेबसाईट वर जा.

VOTE वर क्लिक करा.

Anand Bansode हे नाव सर्च करा. (Search by Name मध्ये).

VOTE वर क्लीक करा. फेसबुक Login करा.

“I’m not a Robot” च्या समोरील चौकोनावर क्लिक करा.

Voting पूर्ण झाले.

किंवा-

http://polar.fjallraven.com/contestant/?id=929&backpage=1&order=popular

या दिलेल्या लिंकवर डायरेक्ट जाऊन आपल्या फेसबुक अकाउंट वरून लॉगइन करावे लागेल. Login नंतर “I’m not Robot” समोरील चौकोनाला क्लिक केल्यानंतर आपले vote ग्राह्य होईल. वोटिंगसाठी काही अडचण आल्यास 9730277759 या नंबरवर whatsapp मेसेज करा.

ज्ञानेश्‍वरांच्या एका ओवीने सुद्धा समाज परिवर्तन घडते अण्णा हजारे यांचे मत

0
पुणे: “संत ज्ञानेश्‍वरांच्या एका ओवीने समाज परिवर्तन होऊ शकते याचे उदा. म्हणजे राळेगणसिद्धी येथील क्रांतीकारक बदल. शुद्ध आचार, शुद्ध विचार, चारित्र्य, निष्कलंक जीवन आणि त्यागाची भावना हीच संताची शिकवण या समाजात सुख शांती आणून परिवर्तन घडवू शकते. त्यासाठी प्राध्यपकांनी शिक्षणाला नोकरी समझण्याऐवजी निष्काम कर्म करून सेवा करावी. त्यांच्या माध्यमातूनच या देशात आदर्श व्यक्तिमत्वाची  पिढी तयार होईल.” असे मत थोर समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.   महाराष्ट्र विधान सभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या समारंभात विधानसभेचे माजी सभापती श्री. दिलीप वळसे-पाटील यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र व ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या प्रसंगी विशेष एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु.कराड, डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे  प्राचार्य डॉ.एल.के क्षीरसागर हे उपस्थित होते.
श्री.अण्णा हजारे म्हणाले,“ भरकटत चाललेल्या या समाजाला संताचे विचारच वाचवू शकतील. येथे प्रत्येक व्यक्ती हा धन-संपत्ती जमविण्यासाठी धावत असतो. त्या माध्यमातून तो  सुख व आनंद शोधीत असतो. खरे म्हणजे संतांची शिकवणच त्याला आनंद देऊ शकते. चंचल मनाला लगाम लावावा. राळेगण सिद्धी येथे ११ वर्षात ९ लाख लोक अभ्यासासाठी आले. तसेच,५ लोकांनी पीएचडी पूर्ण केली आहे. विज्ञानाने प्रगती केली पण जो पर्यंत मानवाच्या अंतर्मनात अध्यात्म उतरत नाही तो पर्यंत या विज्ञानाचा काहीही उपयोग नाही. अन्यथा विज्ञान विनाशाकडे घेऊन जाईल. देशाच्या परिवर्तनासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन हे ठरविले पाहिजे, की जो पर्यंत कार्यकर्ता देहू-आळंदीला जाऊन अभ्यास करीत नाही, तो पर्यंत त्याला तिकीट मिळणार नाही.”
श्री. दिलीप वळसे पाटील म्हणाले,“ज्या सरकारी शिक्षण संस्थेला ऑटोनॉमी दिली, त्या संस्था आज प्रगतीचा टप्पा गाठीत आहेत. शिक्षण म्हणजे परिपूर्ण विद्यार्थी, नागरिक व व्यक्तिमत्व निर्माण करण्याचे साधन आहे. स्व. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात त्यांनी शिक्षण संस्था उघडण्याची परवानगी देऊन सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार उघडले. त्यामध्ये डॉ.विश्‍वनाथ कराड यांचा सुद्धा वाटा आहे. शिक्षण मंत्री असतांना राज्यातील प्रत्येक गरीब, गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी आम्ही त्यांची फी भरावयास सुरूवात केली. त्यामुळे राज्यसरकारला १५०० कोटी रूपये लागले. माझ्या मते शरद पवार हे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. शिक्षण व्यवस्थेतून समाज परिवर्तन कसे करता येईल, ही त्यांची कल्पना आमच्या काळात अंमलात आणली. आज एमआयटी ने अध्यात्म आणि शिक्षणाची परिभाषा बदलून संपूर्ण जगात नाव लौकिक प्राप्त केला आहे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ तपस्या, त्याग, समर्पणची जीवंत मूर्ती असलेल्या अण्णा हजारे यांच्या हस्ते संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन होणे हे आमचे भाग्य आहे. अण्णांच्या हातून घडणारे कार्य हे संताचे कार्य आहे असे म्हणता येईल.”
प्रा.डॉ. मंगेश तु.कराड यांनी मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांचा परिचय करून दिला. प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी आभार मानले.

गिरीश बापटांचे मंत्रीपद धोक्यात ?

0

पुणे- सिनिअर आहेत,पण आता त्यांना वयोमानानुसार दगदग होत नाही, पण त्यांना रिटायर करणे तर कठीण आहे ? सिनिअर लोकांचा सन्मान राखला पाहिजे , मग करणार काय ?
या प्रश्नावरचा तोडगा भाजपच्या कर्त्याधर्त्यांनी काढल्याचे सांगितले जाते . तो ही मोठा धक्कादायी आहे . गिरीश बापट यांना , ‘तुम्ही आता लोकसभेची तयारी करा ‘असे सांगून त्यांना मंत्रिपदातून मुक्त करण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या ऐवजी महेश लांडगे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घाण्यात येईल अशी हि चर्चा आहे . अर्थात या साऱ्या चर्चा गुजरात् च्या निवडणुकीमुळे मंत्रीपदाचा लांबलेल्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होत असल्या तरी .. गुजरात  निवडणुकीनंतर काय वातावरण असेल ते मात्र आताच सांगता येणार नाही असाही दावा होतो आहे .अर्थात या चर्चा राजकीय पातळीवर बलाढ्य असलेल्या पक्षात होतातच ,पण त्या निव्वळ चर्चा असतात असे याबाबतच्या चर्चेला  उत्तर  बापट समर्थकांकडून दिले जात आहे .’बापट साहेब, जरा मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून राज्यातील पेट्रोलचे दर कमी करा,”… असे विधान काल केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यात केल्याने , दिल्लीतून बापटांना विरोध होतो आहे कि मुंबईतून  यावर ही खल होतो आहे. .

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

पुणे :

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पर्वती मतदार संघाचे अनील जोरी (प्रभाग क्र . २९) यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण होत्या. यावेळी शंकर शिंदे, सुरेश पवार, ईश्वर मते, विनायक चाचर, संजय गाडे, अविनाश वेल्हाळ, ययाती चरवड हे उपस्थित होते.