Home Blog Page 3220

मंत्री बापट यांच्या तीन वर्षांच्या अहवालाचे व ॲपचे अनावरण

0

नागपूरदि. 22 : माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा समावेश सरकारी व  दैनंदिन कामकाजातही होऊन त्याचा लाभ जनतेला व्हावाया हेतूने अन्न व औषध प्रशासनअन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्रीगिरीश बापट यांनी आताहायटेक’ पाऊल उचलले आहे.  राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट आता जनतेला ॲपद्वारे’ भेटणार आहेत.

या ॲपचे उदघाटन आज नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर येथे कार्यरत असणारे जय महाराष्ट्र‘ या वृत्त वाहिनीचे ज्येष्ठ कॅमेरामन दिनेश सातपुते यांच्या हस्ते झाले. हे ॲप ड्रीमवेअर्झ कंपनीचे रोनीत वाघ व पुष्कर गायकवाड यांनी तयार केले आहे. यावेळी मंत्री श्री. गिरीश बापट यांच्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्यातीन वर्षाचा सार्थक प्रवास: सर्वांगीण विकास’ या अहवालाचे प्रकाशनही जगन्नाथ बाजीराव बोरकुटे रा. गडचिरोली तसेच नानाजी माधवराव बेले( रा.अंबाडाता.नरखेडनागपूर) या दोन सर्वसामान्य ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श मंत्री श्री बापट यांनी समाजापुढे मांडला.

मंत्री श्री. बापट हे आमदार असल्यापासूनच त्यांची मुंबई व पुणे येथील कार्यालये सीसीटीव्ही ने जोडली आहेत. या द्वारे त्यांच्या भेटीसाठी येणारे लोक तसेच कार्यालयातील कामकाजावर ते लक्ष ठेवतात. मात्र आता या ॲपमुळे श्री बापट यांना आपल्या मतदारांशी व जनतेशी कायम कनेक्ट’ राहता येईल तसेच नागरिकांनाही आता मंत्र्यांना भेटण्याची वेळ घेणे सोपे जाईल पर्यायानेत्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.

याविषयी अधिक माहिती देताना वाघ यांनी सांगितले कीया ॲपच्या माध्यमातून संबंधित नागरिकाला मंत्री बापट यांना भेटीसाठी वेळ घेता येईल. वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस याबाबत एसएमएस‘ द्वारे माहिती दिली जाईल. काही कारणास्तव भेट रद्द झाल्यास त्याबद्दल ही त्या व्यक्तीला कळविण्यात येईल. एखाद्या विषयावर अधिकाऱ्यांची  बैठक नियोजित केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती कळवली जाईल. कार्यक्रमाला अथवा बैठकीला जाणे मंत्री बापट यांना शक्य होत नसल्यास त्याबाबत संबंधितांना कळविण्यात येईल. एकंदरीतच कार्यालयीन तसेच दैनंदिन कामकाजातही  सुसूत्रता आणण्यासाठी या ॲपचा प्रचंड फायदा होईल.

हे ॲप ‘Girish Bapat’ या नावाने प्ले स्टोरवर उपलब्ध असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा हा एक भाग आहे. नागरिकांशी संवाद वाढविण्याबरोबरच आपल्या खात्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणेहा देखील ॲप सुरू करण्यामागील मंत्री बापट यांचा उद्देश असल्याचेही वाघ यांनी सांगितले.

ॲप प्रमाणेच गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची सविस्तर माहिती जनतेला ‘‘तीन वर्षाचा सार्थक प्रवास: सर्वांगीण विकास’ या अहवालाच्या माध्यमातून पालकमंत्री गिरीश बापट जनतेला देणार आहेत.

या अहवालात प्रामुख्याने पुण्याच्या विकासासाठी केलेली कामे तसेच अन्नऔषधप्रशासन व नागरी पुरवठा खात्यात झालेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. यामध्ये पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोडपुणे मेट्रो,  यासारखे निर्णयइंडस्ट्रीयल हब हिंजवडी येथील समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्नआंतरराष्ट्रीय विमानतळ,पीएमआरडीएजलव्यवस्थापविकास आराखडा ,घनकचरा व्यवस्थापनआद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या स्मृतिस्थळ करणेदेहू- आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकास,पुणे आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी‘ करण्याबाबत केलेले प्रयत्न आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.अन्न व नागरी पुरवठा तसेच अन्न व औषध प्रशासन आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून त्यांनी हृदय शस्त्रक्रिया साठी लागणारे स्टेंट स्वस्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नतीन वर्षात सुमारे 64 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा बंदी आणखी प्रखर करण्यासाठी करण्यासाठी केलेले प्रयत्नस्टेट स्पेसिफिक चार्ज कमी करून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्याकडे पाठपुरावाकेरोसीन मुक्त जिल्हे करण्यासाठी केलेले प्रयत्नरेशनचा भ्रष्टाचार कमी करण्याबाबत केलेल्या उपाययोजनारेशन दुकानदारांचे मानधन वाढवण्याबाबत घेतलेले निर्णय तसेच संसदीय कार्यमंत्री म्हणून या तीन वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा या अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देणार -मुख्यमंत्र्यांची माहिती

0

  नागपूरदि. 22 : आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदीवास भोगला आहे त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा देण्याबाबत नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईलअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य एकनाथ खडसे यांनी या विषयी माहितीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले कीआणीबाणीच्या काळात अनेकांना 19 महिने तुरुंगात राहावे लागले होते. काही राज्यांमध्ये अशा बंदीवानांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन पेंशन देण्यात येते. उत्तर प्रदेशमध्यप्रदेश राज्यांमधून या संदर्भात माहिती घेण्यात आली. त्यानुसार राज्यातील अशा बंदीवानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धनगर आरक्षण संदर्भातील ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स’चा अहवाल लवकरच – आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा

0

नागपूरदि. 22 : धनगर आरक्षण संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हा अहवाल लवकरच शासनास प्राप्त होणार आहे. धनगर आरक्षणासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधान परिषदेत सांगितले.

नियम 97 अन्वये सदस्य श्री रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना श्री. सवरा बोलत होते. धनगर आरक्षण संदर्भात टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन टप्प्यातील या संस्थेचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्याचे काम सुरू असून या संस्थेचा अहवाल लवकरच शासनास प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यातील 108 तालुक्यातील 324 गावातील पाच हजार कुटुंबातील 20 हजार धनगर समाजातील नागरिकधनगर समाजाचे जाणकारलोकप्रतिनिधीव्यवसायानिमित्त फिरस्तीवरील धनगर समाजातील नागरिक यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. तर दुस-या टप्प्यात देशातील इतर राज्यातील जमातींचा अभ्यास करण्यात आला आहे.  अंतिम टप्प्यातील अहवालाचे काम सुरू असून हा अहवाल शासनास प्राप्त होईलअसे श्री. सवरा यांनी विधानपरिषदेत सांगितले.

             यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री कपिल पाटीलरामराव वडकुतेजोगेंद्र कवाडेजयदेव गायकवाडभाई गिरकर यांनी भाग घेतला.

शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

0

नागपूर,: सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शक्ती प्रदत्त समिती’ तसेच ग्रामपंचायत स्तरावर  विशेष ग्रामीण गृहनिर्माण फंड’ निर्माण करण्यात आला आहेअशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

            या निवेदनावर बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या कीया निर्णयात सर्वसाधारणपणे गायरान जमिनीसार्वजनिक वापरातील जमीन व वनक्षेत्र तसेच ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाहीअशा जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे त्याच ठिकाणी नियमानुकूल करण्यात येतील.

           सध्या अतिक्रमण ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणीच अशी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अतिक्रमण धारकाचे पुनर्वसन त्याच जागी करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय असेल तर अशा जमिनीवरील अतिक्रमणे आहेत्या ठिकाणी नियमानुकूल करतांना अशा प्रकल्पांना प्राधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘ग्रामीण गरजू व बेघर गृहनिर्माण प्रकल्प म्हणून ग्रामपंचायतकडून घोषीत करण्यात येईल. त्यानंतर अशा प्रकरणी पर्यायी गायरानासाठी प्रथम अतिक्रमीत जागेच्या दुप्पट जागा निवडावी. यासंदर्भात ग्रामपंचातीमध्ये ठराव करून याबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. संबंधित विभागाने मान्यता दिल्यानंतर ग्रामपंचायतीने यासंदर्भात संबंधित विभागाच्या मागणीनुसार पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रस्तावित धोरण व कार्यपद्धतीनुसार सदरचे अतिक्रमण त्याच ठिकाणी नियमानुकूल करण्यात येईल.

            अतिक्रमणाच्या वेगवेगळ्या प्रकरणी नियमानुकूल करण्याचे शुल्क पुढील प्रमाणे आहेत – अतिक्रमित केलेल्या कुटुंबातील सदस्याच्या नावे पर्यायी घर नसेल तर 500 चौ. फुट ते 2000 चौ.फुट पर्यंत 2000 पूर्वी वार्षिक मूल्य दर 1 होता 2000 ते 2011 पर्यंत हा वार्षिक मूल्य दर 1.5 होता. अतिक्रमित केलेल्या कुंटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावे पर्यायी घर असेल तर 2000 पूर्वी 500 चौ.फुट ते 2000 चौ.फुटापर्यंत वार्षिक मूल्य दर 1.5 होता. 1 जानेवारी2000 ते 1 जानेवारी2011 पर्यंत हा वार्षिक मूल्य दर 1.5 होता.

1 जानेवारी 2011 नंतरची सर्व अतिक्रमणे निरस्त करण्यात येतील. 1 जानेवारी 2011 पूर्वीची 2000 चौ.फुटाच्या वरील अतिक्रमणे निरस्त करण्यात येतील.

ग्रामपंचायतीने पुनर्वसनासाठी पर्यायी जागेची निवड करावी. या पुनर्वसनामध्ये प्रस्तावित पर्यायी जागेमध्ये अतिक्रमण धारकांना 500 चौ. फुट एवढी मोकळी जागा/भूखंड अनुज्ञेय राहील.

            राज्यातील गावांमध्ये शासकीय जमिनीवर 1 जानेवारी2011 अथवा त्यापूर्वीची निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण करून राहणाऱ्या ज्या कुटुंबाचे ग्रामपंचातीमध्ये पर्यायी निवास व्यवस्था नाही व जे लाभार्थी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत पात्र ठरतील. अशा घरकुल पात्र कुटुंबांना भूखंड किंवा मोकळ्या जागेचे वाटप विनामूल्य करण्यात यावे.

            ज्या कुटुंबाच्या काही सदस्यांचे नावे त्याच ग्रामपंचायती क्षेत्रात घर असेल असे कुटुंब जर 1 जानेवारी2000 पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत असेत तर प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार येणाऱ्या किमतीप्रमाणे आणि जर 1 जानेवारी2000 नंतर पण 1 जानेवारी2011 पर्यंत अतिक्रमण करून राहत असतील तर प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार येणार येणाऱ्या किंमतीच्या दीडपट शुल्क आकारुन पर्यायी जागेचे वाटप करण्यात यावे.

महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये जिव्हाळ्याचे संबंध राहावेत :बाबासाहेब पुरंदरे

0
पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवलेली ‘सुरतेची स्वारी ‘,स्वारी दरम्यानचे शिवाजी महाराजांनी घेतलेल्या  सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग ,आई वडलांची काळजी घेत चला ,वाचन करा ,शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे असा बाबासाहेबानी संदेश आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत ,असे केलेलं आवाहन यामुळे ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा ‘पुस्तक प्रकाशन समारंभ आणि  महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संस्मरणीय ठरला !
सुरतवाला फाउंडेशन च्या वतीने रसिक मित्र मंडळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते . 
पुस्तक प्रकाशन समारंभ दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार भवन येथे महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पार पडला  . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंपकलाल सुरतवाला होते  
सुरेशचंद्र सुरतवाला यांनी त्यांच्या आई -वडिलांची कथा ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा ‘ या पुस्तकाद्वारे मांडली आहे. 
या कार्यक्रमादरम्यान ‘रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘सुरतवाला फाउंडेशन’तर्फे ४ लाख रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप होणार करण्यात आले . ही शिष्यवृत्ती शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मिळून, त्यांच्या उच्च शिक्षणाकरीता देण्यात येते. या उपक्रमाचे ४ थे वर्ष होते . 
या प्रसंगी नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, माजी महापौर शांतीलाल बाबुभाई सुरतवाला, दिनेश हरिलाल सुरतवाला, जतीन धनसुखलाल सुरतवाला, जगमोहन रंगीलदास सुरतवाला (रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट) ,रमेश गोविंद वैद्य उपस्थित होते
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले ,’आई वडिलांच्या प्रति असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन या पुस्तकातून झाले आहे . विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे . आई वडिलांप्रती आदर दाखवणे अत्यंत महत्वाचे आहे . सुरतवाला कुटुंबाचे पुण्यात योगदान आहे . शिकणाऱ्यांना मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे . शिवाजी महाराजांच्या वकील मंडळात २ गुजराती होते . तेव्हापासून महाराष्ट्राचे -गुजरातचे नाते जिव्हाळ्याचे होते . महाराजांनी सुरत लुटली कारण औरंगजेबाने स्वराज्याची लूट केली होती .ते सुरत लुटण्याकरिता लुटायला गेले नव्हते तर स्वराज्याला औरंगजेबापासून झालेल्या नुकसानीची भरपाई मागायला गेले होते . त्यांचा सरदार उर्मटपणे लागल्याने त्यांना सुरत लुटणे भाग पडले . या लुटीच्या बातम्या इंग्रजी ,फ्रेंच वर्तमानपत्रात आल्या . इंग्रजी  कारभाऱ्यानी सुरत लुटीच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी धर्मस्थळांच्या दाखवलेल्या काळजीचे आणि संरक्षणाचे वर्णन केले आहे .   हे करताना त्यांनी महिला ,धर्मस्थळे यांची काळजी घेतली . महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहिले पाहिजेत . आपण एक आहोत ही भावना वृद्धिंगत केली पाहिजे .
शांतीलाल सुरतवाला ,सुरेशचंद्र सुरतवाला यांनी मनोगत व्यक्त केले . प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले .

अभिरूप संसद -२०१७ एमआयटीत संपन्न

0
दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल बनले या संसदचे सभापती
पुणे : शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, जीएसटी, प्राथमिक शिक्षण, आंगणवाडी आणि बुलेट ट्रेन यासारख्या महत्वपूर्ण मुद्यांवर एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) च्या अभ्यासक्रमा अंतर्गत आयोजित अभिरूप संसद सत्र-२०१७ मध्ये खडाजंगी झाली.
अभिरूप संसद सत्र -२०१७ चे सभापती दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल हे होते. तसेच, अभय अलोदे (पंतप्रधान), पुलकित (गृह मंत्री), मिहिर (अर्थ मंत्री), हिमांशू (कृषी मंत्री) व नलिनी देवी (रेल्वे मंत्री) यांच्याबरोबरच कित्येक विद्यार्थ्यांनी सत्ताधारी पक्षाचे खासदार बनून देशाच्या महत्वपूर्ण मुद्यांवर आपली बाजू मांडली. तसेच, विरोधी पक्षाकडून विचारलेल्या प्रश्‍नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. विरोधी पक्षनेता विक्रम बनकर याच्याबरोबरच कित्येक विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षीय खासदार बनून सत्ताधार्‍यांना देशातील प्रमुख समस्यांवर कोंडित पकडले.
देशातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, त्यांची दयनीय स्थिती यावर विरोधकांनी प्रकाश टाकल्यानंतर कृषीमंत्री बनलेले हिमांशू गुप्ता यांनी उत्तर दिले की, सरकार सिंचन, पशुपालन, कृषी उद्योग, जोडधंद्यासारख्या ग्रामीण क्षेत्राशी निगडित अशा गोष्टींवर सरकार लक्ष केंद्रित करीत आहेे.  त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्थेतही त्याचे नियोजन केले गेले आहे. पंतप्रधानांचे स्वप्न आहे कि, २०२२ या वर्षापर्यंत प्रत्येक शेतकर्‍याचे उत्पन्न दोन पटीने वाढेल. याच वर्षापर्यंत देशातील कोणताही शेतकरी उपाशी पोटी राहणार नाही. मनरेगा मध्ये ४८ हजार कोटी रूपयांची तरतूद करून लोकांना रोजगार देण्यात येईल.
प्राथमिक शिक्षण या विषयावर सरकार काय करीत आहे, तसेच शिक्षणाची दिशा नेमकी कशी आहे, या, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देतांना पंतप्रधान म्हणाले, सबका साथ सबका विकास हा आमच्या सरकारने शिक्षणाशी जोडला आहे. सरकारी शाळांच्या स्थितीत सुधारणा करून   प्रत्येक राज्यातील अंगणवाड्यांची समस्या सोडविण्यावर आम्ही कार्य करीत आहोत. तसेच, देशात केद्रीय शाळा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येईल.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशात बुलेट ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचे सरकारचे स्वप्न आहे. मुंबई ते अहमदाबाद येथे धावणार्‍या पहिल्या ट्रेन साठी जपान कडून ८८ हजार कोटी रूपयांचे कर्ज मिळाले आहेे. बुलेट ट्रेन मुळे १५ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
विरोधी पक्षाने जीडीपी व वाढत्या बेरोजगारीची समस्या उपस्थित केली. त्यावर गृहमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले, भारत विकासाच्या दिशेने जोरदार वाटचाल करीत आहे. जीडीपी थोडे खाली आले. परंतू हे कायम टिकणार नाही. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांमध्येच भारत आर्थिक शक्ती म्हणून उद्यास येईल.
यानंतर शेतकर्‍यांची आत्महत्या व जीएसटी विषयावरून सदनामध्ये खडाजंगी झाली. त्यावर सभापती रामनिवास गोयल म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून हे मतभेद शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशातील प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचवला पाहिजे. यासाठी देशात केंद्रीय शाळेची संख्या वाढवावी. अंगणवाडीत कार्यरत शिक्षकांना सरकारी कार्यांपासून व राजकीय पक्षांच्या कार्यापांसून दूर ठेवावे.
अभिरूप संसद-२०१७ संदर्भात मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास म्हणाल्या, देशाचे संसद सत्र कसे चालते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून या सत्राचे आयोजन केले आहे. येथे विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष आप-आपले डावपेच कसे लढवितात, आपले मुद्दे कसे मांडतात, विरोधी पक्षांप्रमाणे मंत्री कशा पद्धतीने प्रभावशाली उत्तर देतात, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थींना मिळतो. याचा उपयोग या विद्यर्थ्यांना त्यांचा राजकीय कारकीर्दीत निश्‍चितपणे होईल.
यावेळी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड व एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी अभिरूप संसद-२०१७ बद्दल समाधान व्यक्त केले.

सायकल आराखडा प्रकरणी भैयासाहेब जाधवांनी केला स्टँप घोटाळ्याचा आरोप (व्हिडीओ)

0

पुणे- नव्याने होऊ घातलेल्या सायकल आराखड्याच्या कामी स्टँप घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आज महापालिकेच्या मुख्य सभेत बोलताना नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी केला .
अविनाश बागवे यांनी सायकल आराखड्या मागे दडलेलं रहस्य उलगडल्या नंतर भैय्यासाहेब यांनी हा

‘स्टँप बॉम्ब’ उपस्थित करून सर्वांना धक्का दिला . ते म्हणाले , एक तर कमी रकमेचा स्टँप वापरला , आणि नंतर तो मुदत संपल्यावर दिला . शिवाय २०१६ च्या स्टँप पेपरवर २०१५ चा म्हणजे मागील तारखेचे अॅग्रीमेंट केले. त्यांच्या या वक्तव्याची सभागृहात गंभीर दखल विपक्ष् नेते चेतन तुपे यांनी घेतली . आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि सभापती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही तातडीने या विषयावर हस्तक्षेप करीत येत्या १८ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता महापालिका आयुक्त कुणालकुमार हे सायकल योजनेवर सादरीकरण करतील . तेव्हा या प्रकरणी सादरीकरण तसेच उपस्थित मुद्दे त्यांची उत्तरे यांची मिनिट्स लेखी नोंद ठेवली जाईल असे आश्वासन देण्यात आले .

सायकल आराखड्यामागे दडलंय तरी काय ?(व्हिडीओ)

0

पुणे- पूर्वी शहरात झालेले ३८ ते ३९ सायकल मार्ग ज्यावर २३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले , ते शोधूनही सापडणार नाहीत , अशी अवस्था असताना आता ३३५ कोटी रुपये खर्च करून नवीन सायकल आराखडा करण्यात महापालिकेला यश आले आहे .यावर आज पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवक अविनाश बागवे यांनी टीकेची झोड उठविली .
या आराखडयामागे नेमकं काय रहस्य दडलेलं आहे याचा भांडाफोड करण्याचा आज त्यांनी प्रयत्न केला .. पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात ….

 

ओखी वादळामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरु-मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

0

             नागपूर -ओखी वादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून त्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल. यासंदर्भात कोकण विभागातल्या आमदारांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            सदस्य सुभाष पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले की, ओखी चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात 16.72 मि.मी. अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 हेक्टरवरील आंबा व काजू पिकांचा मोहोर गळून पडला आहे. त्याचबरोबर पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरु आहेत. 

            या वादळाची सूचना मिळाल्यानंतर समुद्रात गेलेल्या 2600 बोटी परत आणण्यास यश आले आहे. तर अन्य राज्यातील 389 बोटी राज्याच्या किनाऱ्याला आल्या होत्या. त्यातील खलाशांच्या राहण्याची-जेवणाची तसेच वैद्यकीय उपचाराची सोय करण्यात आली आहे. ज्या बोटींचे अंशत: नुकसान झाले आहे त्यांना चार हजार रुपये, पुर्णत: नुकसान झालेल्या बोटींना 9,600 रुपये, मच्छीमार जाळीचे अंशत: नुकसान झाल्यास 2,100 रुपये, पुर्णत: नुकसान झाल्यास 2,600 रुपये तर फळबाग नुकसानीसाठी 18,000 हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. सध्या पंचनामे सुरु असून त्यानंतर नुकसान भरपाई अदा केली जाईल.

            यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, सीआरझेड 50 मिटरपर्यंत ठेवावे असा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला आठ दिवसात पाठविण्यात येईल.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अशोक पाटील यांनी भाग घेतला.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाणार नाही -जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

0

महाराष्ट्राचे संपूर्ण पाणी राज्यालाच मिळत आहे. गुजरातला पाण्याचा थेंबही जात नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. महाजन म्हणाले की, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी असून त्यामाध्यमातून मुंबईला 20.44 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी चार योजना प्रस्तावित असून त्यासाठी 10 हजार 881 कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळावे, अशी मागणी राज्य शासनामार्फत करण्यात आल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

            या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच उपलब्ध होणार असून गुजरातला पाणी दिले जाणार नाही, असे श्री. महाजन यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतीश पाटील, जयंत पाटील यांनी भाग घेतला.

शिक्षक भरती व अनुदान वाटपात झालेल्या अनियमिततेबद्दल लाचलुचपत विभागात जाण्याबाबत विचार करण्यात येईल – शिक्षणमंत्री विनोद तावडे

0

नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयाकडून शिक्षक भरती व अनुदान मंजूर करण्यात झालेल्या अनियमिततेबाबत लाचलुचपत विभागाकडे जाता येईल काय? अथवा प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करता येईल काय? याबाबत नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानमंडळ सदस्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली.

            सदस्य नागोराव गाणार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. तावडे पुढे म्हणाले की, नागपूर येथील जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयाने अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असताना 2 मे 2012 नंतर विशेष पटपडताळणीमुळे शिक्षक पदभरतीस बंदी असताना अनियमित पद्धतीने वैयक्तिक मान्यता दिलेल्या प्रकरणात सर्व संबंधितांना वाजवी संधी देऊन त्यांचे सुनावणीद्वारे म्हणणे ऐकूण घेण्यास शासनाने दि. 23 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयाद्वारे दिलेल्या सुधारित निर्देशानुसार 88 अनियमित वैयक्तिक मान्यता प्रकरणांबाबत शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना सुनावणीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.

            विना अनुदानित पदावर मान्यता नसताना सहायक शिक्षक पदावर मान्यता प्रदान केलेल्या प्रकरणात ही मान्यता रद्द करण्यात आली आहे. ही मान्यता रद्द केल्याचा आदेशा‍विरुद्ध मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने दि. 23 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरु आहे.

            20 टक्के अनुदानासाठी पात्र शिक्षकांना अनुदान नियमाने मिळाले पाहिजे. मात्र 20 टक्क्याऐवजी पात्र नसताना 100 टक्के अनुदान घेतलेल्या प्रकरणात योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच झालेल्या अनियमिततेमध्ये दोषी आढणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही श्री. तावडे यावेळी म्हणाले.

            लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

ऑनलाईन शिष्यवृत्तीमधून संस्थांच्या खात्यात

शिक्षणशुल्क जमा करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करु

 विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा करताना त्यापैकी शिक्षणशुल्काची रक्कम थेट संबंधित महाविद्यालयाकडे वर्ग व्हावी यासाठी नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

            सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. तावडे पुढे म्हणाले की, यापूर्वी काही वेळा शिष्यवृत्यांच्या बाबतीत अनियमितता होत होत्या. काही प्रकरणात शिष्यवृत्तीसाठी एकच विद्यार्थी एका पेक्षा जास्त महाविद्यालयात शिकत असल्याचे दाखविले जायचे. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे थेट विद्यार्थ्याच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, शिक्षणसंस्थांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून शिष्यवृत्तीच्या रकमेतून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण फी जमा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येईल.

            ते पुढे म्हणाले की, यावर्षी शिष्यवृत्ती वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी संस्था व विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाप्रमाणे शिष्यवृत्त्या ऑफलाईन पद्धतीने वितरण करण्यासाठी वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला आहे.

            या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री जोगेंद्र कवाडे, हरिसिंग राठोड, निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

भारतीय जनता पार्टी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी आम्रपाली पाटील यांची नियुक्ती

0

पुणे-भारतीय जनता पार्टी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या सरचिटणीसपदी आम्रपाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे  अध्यक्ष संतोष लक्ष्मणराव राजगुरू यांनी दिले .

     आम्रपाली भारत पाटील या भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा परिषदेच्या पंचायत राज आघाडीच्या उपाध्यक्ष तसेच वीरांगना फाऊंडेशनचे सचिव , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जस्टीस फेडरेशनच्या प्रदेश अध्यक्ष आदी पदावर कार्यरत आहेत . हुंडा बळी , स्त्री भृण हत्या विरोधी जनजागृती मोहिम वीरांगना फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवित आहे . त्यांना सन २०१५ मध्ये एशियन युथ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले . त्या वीरांगना महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत .

पत्र देते वेळी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक , नगरसेवक योगेश मुळीक , नगरसेवक संदीप जऱ्हाड , भारतीय जनता पार्टीचे  वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर बाबर   संतोष घोलप ,संतोष शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

????????????????????????????????????

शेतक-यांना जमिनीचा मोबदला देतांना सकारात्‍मक भूमिका ठेवावी–विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी

0

पुणे– सर्व  विकास प्रकल्‍प पूर्ण होण्‍याच्‍या दृष्टिने नियमाच्‍या चौकटीत राहून शेतक-यांना जमिनीचा मोबदला देतांना सकारात्‍मक भूमिका ठेवावी, अशा सूचना विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी दिल्‍या. विधानभवनात भूसंपादन अधिनियम 2013 या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

विभागीय आयुक्‍त श्री. दळवी म्‍हणाले, विकास प्रकल्‍प राबवतांना शेतक-यांची जमीन संपादित करावी लागते. भूसंपादन मंडळाने शेतक-यांच्‍या जमिनीचा मोबदला देतांना उदार दृष्टिकोन ठेवावा. जमिनीचा मोबदला वेळेत दिला नाही तर प्रकल्‍पाचा खर्च वाढून किंमत वाढते. त्‍यामुळे  भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्‍थापना करतांना भूसंपादन मंडळाने शेतक-यांना जमिनीच्‍या मोबदल्‍यात वाजवी भरपाई मिळण्‍याबाबत जागरुक रहावे. जेणेकरुन प्रकल्प वेगाने मार्गी लागतील. भूसंपादन अधिनियमाच्‍या कार्यशाळेत या बाबींवर व्‍यापक चर्चा होऊन ही प्रक्रिया अधिक गतीमान होईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. नवीन भूसंपादन कायदा पारदर्शक असून           शेतक-यांच्‍या हिताचा आहे. भूसंपादन मंडळाने लवादाच्‍या  प्रकरणांचा वेगाने निपटारा करावा, असे ते म्‍हणाले. कार्यशाळेत मुंबई मेट्रो रेल्‍वेचे  समीर कुर्तकोटी, सेवानिवृत्‍त नगररचनाकार मोहन वाणी, अपर जिल्‍हाधिकारी साहेबराव गायकवाड, अपर्णा ताम्‍हणकर, सुभाष डुंबरे, सहायक सरकारी वकील नितीन देशपांडे, अॅड. सुधाकर आव्‍हाड, रामचंद्र शिंदे आदींनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित करण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांचेही समाधान केले.

कार्यशाळेस उपजल्हिाधिकारी (भूसंपादन), जिल्‍हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.  कार्यशाळेचे सूत्रसंचालन विशेष भूसंपादन अधिकारी स्‍नेहल बर्गे यांनी केले.

वाढदिवसाचा खर्च टाळून अपंगांसाठी वेबपोर्टल

0

पुणे – अपंग व्यक्तिंच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी वेबपोर्टल आणि विविध सामाजिक संस्थांना देणगी देऊन सरस्वती विद्यामंदिराचे कार्यवाह आणि शहर भाजपचे कोषाध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर यांनी आपला साठावा वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात कार्यरत असणार्‍या प्रा. आंबेकर यांनी अपंगांच्या कौशल्य प्रशिक्षणाचे वेबपोर्टल करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे. या वेबपोर्टलच्या सहाय्याने अपंग विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, नोकरी व रोजगारासाठी मार्गदर्शन मिळू शकेल.
याबरोबर सार्थक सेवा संघ, शंभूराजे प्रतिष्ठान, निवारा वृध्दाश्रम, अनाथाश्रम, मूकबधिर शाळा, अपंग वसतिगृह, स्वरूपवर्धिनी, सरस्वती मंदीर आदी बारा सामाजिक संस्थांना प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे साठ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करुन व्यक्तिगत आनंदात समाजातील उपेक्षितांना सहभागी करुन घेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे उपक्रम राबविल्याचे प्रा. आंबेकर यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्सवरील अनावश्यक खर्च टाळून समाजातील उपेक्षितांसाठी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे असे आवाहनही प्रा. आंबेकर यांनी केले आहे.

राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार-२०१७ जाहीर!

0
पुणे-  एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ(एमआयटीडब्ल्यूपीयू), पुणे, भारत, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे देण्यात येणारे २०१७ चे राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार श्री. शंकरराव दिनकरराव खोत (वाजेवाडी, जि. सातारा), सौ. बेबीताई अशोक गायकवाड (अहमदनगर), श्री. डॉ. अशोक वामनराव बेलखोडे (किनवट, जि. नांदेड), श्री.सुदामकाका शंकर भोंडवे (डोमरी, जि. बीड),   श्री. प्रणव हरीदास खुळे (सातुर्ना, अमरावती), सौ.रेखाताई बन्सी भिसे (सारसा, जि. लातूर), श्रीमती रोहिणी नागराजन नायडू (नाशिक), श्री. प्रदीप मुकुंदराव नणंदकर (लातूर) व ह.भ.प. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर, जि. सोलापूर) यांना जाहीर करण्यात आले आहेत.
शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा व प्रत्येकी रू.११,०००/- रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, दि. २४ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता माईर्स एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कामगार राज्यमंत्री मा. ना. श्री. विजयसिद्रामप्पा देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. लातूरचे माजी खासदार मा.श्री.गोपाळराव पाटील व विवेकानंद हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठा चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे असतील. अशी माहिती राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार समितीचे समन्वयक व  एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी दिली.
१) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड कृषीरत्न पुरस्कार-२०१७
श्री शंकरराव दिनकरराव खोत हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी नैसर्गिक स्त्रोत कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ५० एकर जमिनीत मिश्र आंतरपिके घेऊन शेतीमध्ये नवा प्रयोग केला आहे व आजूबाजूच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सोबतच या संदर्भात वेळोवेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शेतकर्‍यांना याविषयीचे मार्गदर्शन करित आहेत. म्हणून त्यांना  कृषिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
२) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड समाजरत्न पुरस्कार-२०१७
 सौ. बेबीताई अशोक गायकवाड यांनी पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडीसारख्या मागासलेल्या भागातून पोटभरण्यासाठी अहमदनगरला येऊन तिथे भाजीपाल्याचा व्यवसाय केला. भाजीपाला विकत असतानाच येणार्‍या महिला व मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली. जून्या रूढी-परंपरांना झटकून वीरपत्नी व विधवांना व त्यांच्या नातेवाईकांना एकत्र आणले. त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना विधवा विवाहास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
३)राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड आरोग्यरत्न पुरस्कार-२०१७
श्री. डॉ. अशोक वामनराव बेलखोडे यांनी १९८३ पासून मराठवाड्यातील नक्षलवाद्यांच्या छायेत असलेल्या किनवट या आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून १२ वर्षे कार्य केले. सरकारी  नोकरी सोडून किनवट येथे त्यांनी १९९५ मध्ये साने गुरुजी रूग्णालयाची स्थापना केली. या रूग्णालयाच्यामार्फत किनवट तालुक्यातील ३९२ खेड्यातील ३ लक्ष लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरवित आहेत. तसेच ते गोरगरिबांच्यासाठी बिलात २५ टक्के सूट देऊन समाजकार्य करीत आहेत.  म्हणून त्यांना आरोग्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
४) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड शिक्षणरत्न पुरस्कार-२०१७
श्री. सुदामकाका शंकर भोंडवे यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे सोनदरा गुरुकुलाची स्थापना केली. मागील तीन दशकांपासून अनेक परिपूर्ण पिढ्या घडविणार्‍या या गुरुकुलाच्या माध्यमातून मराठवाडयातील ऊसतोड कामगार, शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. मराठवाड्यातील ५०० गावांतील जवळपास २००० विद्यार्थी या गुरुकुलामध्ये पारंपारिक शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठीत शिक्षण घेत आहेत. म्हणून त्यांना शिक्षणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
५) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड क्रीडारत्न पुरस्कार-२०१७
एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीमध्ये अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणार्‍या प्रणव हरीदास खुले यांनी पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये आपली चमक दाखवली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याला आठ सुवर्णपदक व तीन रौप्य पदके मिळाली आहेत. राष्ट्रीय पातळीवर एक सुवर्ण पदक, दोन रौप्य पदके मिळवली आहेत. आतंतराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके मिळाली आहेत. तसेच १० ते १७ सप्टेंबर २०१७ मध्ये साऊथ आफ्रिका येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्हणून त्यांना क्रीडारत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
६) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड ग्रामरत्न पुरस्कार-२०१७
सारसा हे गाव लातूरच्या पश्‍चिमेस ३५ कि.मी. अंतरावर मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार असून प्रमुख व्यवसाय शेती आहे. स्वच्छता, तंटामुक्ती, हागणदारीमुक्ती, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना, विविध बचत गटांची स्थापना व सक्षमीकरण, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम गावच्या सरपंच सौ. रेखा बन्सी भिसे यांच्या नेतृत्वाखाली राबविले जात आहेत. या गावची आदर्श गाव अशी ओळख आहे. त्यामूळे त्यांना ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
७) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड बचतगटरत्न पुरस्कार-२०१७
नाशिक येथील रहिवासी असणार्‍या श्रीमती रोहिणी नागराजन नायडू यांनी गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात महिला सक्षमीकरणासाठी १०७ बचतगटाची निर्मिती केली. या माध्यमातून त्यांनी ११७५ महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन उद्योग व व्यवसायासाठी स्वत:च्या पायावर उभे केले. या सोबतच महिला सक्षमीकरण, आरोग्य, ग्रामविकास, व महिलांचे हक्कांसाठी त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना बचतगटरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
८) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड जगजागरणरत्न पुरस्कार-२०१७
श्री. प्रदीप मुकुंदराव नणंदकर पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी दै. सोलापूर तरूणभारत, लोकसत्ता व साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून शिक्षण, शेती, पाणी व महिला आदी विषयांवरील समस्यांना वाचा फोडली. आपल्या लिखाणाद्वारे त्यांनी सामान्य लोकांना न्याय मिळवून दिला आहे. म्हणून त्यांना जनजागरणरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
९) राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड अध्यात्मरत्न पुरस्कार-२०१७
जयवंत महाराज बोधले यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून कीर्तन व प्रवचनाची सेवा सुरू केली आहे. आज भरकटलेल्या तरुणपिढीला आपल्या कीर्तन व प्रवचनाद्वारे सामाजिक, अध्यात्मिक व धार्मिकतेचे आत्मभान करून देत आहेत. तसेच, प्रवचन, कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून लोकशिक्षण, मुल्यनिष्ठा, संस्कार व नैतिकतेचे धडे ते समाजाला व तरुण पिढीला देत आहेत. म्हणून त्यांना अध्यात्मरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराद्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्‍या मात्र प्रसिद्ध नसणार्‍या व्यक्तींना प्रकाश झोतात आणून त्यांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला करून द्यावी व या पिढीस त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगण्यास प्रवृत्त करावे, हा या संस्थेचा उद्देश आहे.