Home Blog Page 3219

मुक्ता बर्वेचं नवं नाटक ‘ढाई अक्षर प्रेम के’ रंगभूमीवर

0

अंबिका+रसिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ढाई अक्षर प्रेम के’ हे नाटक 23 डिसेंबर 2017 पासून रंगभूमीवर आले आहे. निर्मात्या सुजाता मराठे आणि मुक्ता बर्वे ह्यांच्या ह्या नाटकाचा मुहूर्त 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. व. पु. काळे यांच्या तु भ्रमत आहासी वाया या कादंबरीवर आधारित ढाई अक्षर प्रेम के  हे नाटक आहे.

निर्माती मुक्ता बर्वे यांची छापा काटारंग नवालव्हबर्ड्सकोडमंत्र या नाटकानंतरची ही पाचवी नाट्यनिर्मिती आहे मुक्ता बर्वे यांच्याच दीपस्तंभ, CODE मंत्र या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे यांनी ह्या नाटकाव्दारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहेत. “ढाई अक्षर प्रेम के” नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत दिनू पेडणेकर.

वपुंच्या तु भ्रमत आहासी वाया या कादंबरीचं नाट्यरुपांतर आणि नाट्य दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. पुण्यात अनेक हौशी व प्रायोगिक नाटकं करणारे दिग्पाल लांजेकर ह्या नाटकाव्दारे व्यावसायिक नाट्यसृष्टीत प्रवेश करत आहेत.

CODE मंत्र या नाटकात कर्नल निंबाळकरांची भूमिका करणारे अभिनेता अजय पुरकर ढाई अक्षर प्रेम के नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. रुद्रम मालिकेत छोटीशी भूमिका साकारणारी तरीही लक्षात राहिलेली अभिनेत्री किरण खोजे या नाटकात अजय पुरकर सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ह्या दोघांशिवाय ढाई अक्षर प्रेम के मधे सचिन देशपांडेअतुल महाजनतेजस कुलकर्णीनितीश घारेअश्विनी कुलकर्णी ह्यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं असूनपार्श्वसंगीताची बाजु नुपूरा निफाडकर ह्यानी सांभाळली  आहे वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून प्रकाशयोजना राहुल जोगळेकरनी केली आहे.

‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकाची निर्माती आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, ” एक सकस, ताजीतवानी आणि मनोरंजक कलाकृती आम्ही रंगभूमीवर घेऊन आलो आहोत. वपुंच्या कथेला दिग्पालने दिलेलं नाट्यरूपांतर आम्हांला तर आवडलंच पण त्यासोबतच वपुंच्या कन्या स्वाती चांदोरकरांनीही दिग्पालची पाठ थोपटलीय. त्यामूळे हे नाटक रसिकांनाही आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.” 

निर्माती सुजाता मराठे म्हणते, “निर्माती म्हणून हे माझं पहिलं नाटक, त्यात मुक्ताची साथ मिळाल्याने हुरूप आलाय. दिग्पालच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ह्या नाटकाला उत्तम कलाकारांची साथ मिळालीय. त्यातच पहिल्या प्रयोगापासून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाने उत्साह अधिकच वाढलाय.” 

साईसाक्षी आणि अनामिका रसिका आपलं नाटक जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘ढाई अक्षर प्रेम के’च्या रसिकांसाठी निर्मिती संस्था एक विशेष कॅशबॅक ऑफर घेऊन आली आहे. ‘ढाई अक्षर प्रेम के’च्या अगोदरच्या कोणत्याही प्रयोगाचे तिकीट पूढच्या प्रयोगाचे तिकीट काढण्यासाठी आणल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे.  

31व्या प्रविण करंडक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत जय पवार,प्रथमेश पाटील, गार्गी फुले,रिया मथारू यांचा मुख्य फेरीत प्रवेश

0

पुणे – प्रविण मसालेवाले प्रायोजित व हिलसाईड जिमखाना बिबवेवाडी यांच्या तर्फे आयोजित ३१व्या प्रविण करंडक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत जय पवार,प्रथमेश पाटील,अझमिर शेख, शौर्य राडे, अर्णव कोकणे, सामवेद देशमाने, गार्गी फुले,रिया मथारू, मुस्कान देशवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.

बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात जय पवारने सिध्दांत विनोदचा  9-2 असा तर प्रथमेश पाटीलने लक्ष गुजराथीचा  9-6 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. अझमिर शेखने तनय पटवारीचा 9-0 असा तर अर्णव कोकणेने पृथ्वीराज बारेचा 9-2 असा सहज ुपाभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात गार्गी फुलेने आहना कौरचा 9-0 असा सहज पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.  रिया मथारूने ऐश्वर्या जाधवचा 8-2 असा तर मुस्कान देशवालने अलिना शेखचा 9-2 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: 

जय पवार वि.वि सिध्दांत विनोद  9-2

प्रथमेश पाटील वि.वि लक्ष गुजराथी 9-6

अझमिर शेख वि.वि तनय पटवारी 9-0

शौर्य राडे वि.वि हर्ष ठक्कर 9-7

अर्णव कोकणे वि.वि पृथ्वीराज बारे 9-2

सामवेद देशमाने वि.वि मोक्ष सुगंधी 9-8(5)

मुली- गार्गी फुले वि.वि आहना कौर 9-0

रिया मथारू  वि.वि ऐश्वर्या जाधव 8-2

मुस्कान देशवाल वि.वि अलिना शेख 9-2

ग्राहकांना आपल्या अधिकारांची जाणीव असणे आवश्यक -जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार

0

पुणे– ग्राहक म्हणून असलेला आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ग्राहकाने जागृक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी आज केले. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. या ग्राहक दिनाच्या निमित्ताने आज शिवाजीनगर  बसस्थानक, शिवाजीनगर पुणे  येथे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री.भालेदार बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक आर.डी.शेलोत, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे, नायब तहसिलदार उत्तम बडे,  महाराष्ट्र राज्य दर नियंत्रक समितीचे सदस्य रमेश टाकळकर, हिंदूस्थान पेट्रोलिअम कंपनीच्या श्रीमती अनघा गद्रे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अरुण वाघमारे, तुषार झेंडे,  ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष विलास लेले आदी उपस्थित होते.

            श्री.भालेदार म्हणाले, आपण सगळेच ग्राहक आहोत. आपण विविध जीवनावश्यक वस्तू खरेदी करत असतो. आपणाला प्रत्येक पदोपदी अडचणीला सामोरे जावे लागते. ग्राहकांना त्यांचे  हक्क व कर्तव्य यांची माहिती ग्राहक संरक्षण कायदयाच्या माध्यमातून मिळत असते ती जाणून घेतली पाहिजे. डिजीटल मार्केट, इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या माध्यमातूनही ग्राहकाला आपल्या अडचणी सोडविता येतात. प्रत्येक ग्राहकाला विनामुल्य ग्राहक पंचायतीकडे तक्रार करता येते.  ग्राहकांनी ग्राहक संरक्षण, दक्षता समिती  यांचीही मदत घ्यावी. ग्राहक हाच केंद्र बिंदु असून प्रत्येकाने चांगली सेवा देण्याची खुणगाठ बांधली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही ग्राहकांच्या तक्रारीबाबत पाठपुरावा केला जाईल. असेही ते म्हणाले.

            श्री.वाघमारे म्हणाले, ग्राहकाने प्रशासनाशी सुसंवाद साधला पाहिजे.  ग्राहक संरक्षण कायदा हा सर्वांच्या उपयोगासाठी आहे. प्रशासन आणि ग्राहक यांनी हातात हात  घेवून काम केले पाहिजे. प्रशासनाच्या माध्यमातून चांगली सेवा होत असते. यावेळी  विलास लेले, तुषार झेंडे, रमेश टाकळकर, श्रीमती अनघा गद्रे यांची समयोचित भाषणे झाली.

            यावेळी शासनाच्या  प्रादेशिक परिवहन कार्यालय,  पुणे महानगर परिवहन महामंडळ, वैध मापनशास्त्र यंत्रणा, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, हिन्दुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन इत्यादी विभागांनी ग्राहक जागृतीपर स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या वतीने लोकराज्य मासिकांचा स्टॉल उभारण्यात आला होता. या सर्व स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे यांनी केले.

            यावेळी  विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व  परिसरातील नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

आझम कॅम्पस आयोजीत वक्तृत्व स्पर्धेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद

0
खा . मौलाना असरूल हक काझमी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण 
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी आझम कॅम्पस येथे झाला .
राज्यभरातून ९५ शाळातून १८० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले . उर्दू आणि इंग्रजी भाषेतून झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना एकूण १
लाखाची पारितोषिके देण्यात आली . खा . मौलाना असरूल हक काझमी(सदस्य ,मजलिस -इ -शूरा ,दारुल उलूम देवबंद ) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले . कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी डॉ . पी ए इनामदार हे होते . कार्यक्रमाला आबेदा इनामदार ,लतीफ मगदूम ,मुनवर पीरभॉय ,नासिर खान उपस्थित होते .
आझम कॅम्पस येथे २२ आणि २३ डिसेंबर रोजी या स्पर्धा पार पडल्या . पाचवी ते सातवी ,आठवी ते दहावी ,अकरावी ते बारावी ,पदवी आणि पदव्युत्तर अशा गटात या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या . स्पर्धेचे हे चवथे वर्ष आहे .
इस्लामच्या शांततेच्या ,मानवतेच्या संदेशावर आझम कॅम्पसची वाटचाल चालू आहे .आधुनिक शिक्षण ,तंत्रज्ञान समाजातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचे मोठे काम डॉ पी ए इनामदार यांनी केले आहे ‘अशा शब्दात खा . मौलाना असरूल हक काझमी यांनी या उपक्रमाचा गौरव केला .
‘भारतात मुस्लिमांची प्रगती जगातील अन्य देशांपेक्षा चांगली आहे ,अधिक प्रगती करण्यासाठी अधिक कष्ट करायला तरणोपाय नाही ,त्यासाठी नव्या पिढीला स्पर्धेसाठी सज्ज करण्याचे काम आझम कॅम्पस करीत आहे ‘असे उद्गार अध्य्क्षस्थानावरून बोलताना डॉ . पी ए इनामदार यांनी केले .

चांदणीचौक उड्डाणपुलासाठी बाधित फ्लॅटधारकांच्या मोबदल्याचे 100 कोटी द्या

0

स्थानिक भाजप नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांचे आयुक्तांना निवेदन

पुणे– चांदणीचौकातील नियोजित उड्डाणपुलासाठी बाधित फ्लॅटधारकांना मोबदला देण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने वर्गीकरणातून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक भाजप नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

चांदणीचौक येथील नियोजित उड्डाणपुलासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकसन मंत्री नितीन गडकरी यांनी 421 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन 27 ऑगस्ट रोजी झाले. मात्र अद्याप यासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन करण्यात आले नाही. मोकळ्या जागा संपादन करण्यापेक्षा बाधित होणारे 88 फ्लॅटधारक आणि एक बंगला मालक यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यांना रेडिरेकनरच्या दुप्पट मोबदला रोख स्वरूपात मिळावा; तसेच त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने वर्गीकरणातून उपलब्ध करून द्यावी अशी वेडे-पाटील यांची मागणी आहे.

या प्रकल्पाचा काही भाग बीडीपी आरक्षण झोनमध्ये येत आहे. तो विषय राज्यसरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे या विषयात निर्णय घेऊन बाधितांना योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळावा जेणेकरून हा प्रकल्प मार्गी लागेल असे वेडे-पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

‘सौभाग्य’ योजनेमुळे प्रत्येक गरिबांच्या घरांपर्यंत वीज पोहोचणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

Ø  गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या ‘सौभाग्य’ योजनेचा शुभारंभ

Ø  डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत वीज

Ø  राज्याला वीज वितरण सक्षमीकरणासाठी केंद्राकडून निधी

नागपूर – स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक देशवासियांनी हक्काचे घर, पाणी, वीज तसेच शेतीला सिंचणासाठी पाणी उपलब्ध होण्याचे स्वप्न पहिले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उजाला, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना व सौभाग्य योजना तसेच प्रधानमंत्री सिंचाई आदी विविध योजनेच्या माध्यमातून देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करीत आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने हे शासन गरिबांच्या सर्वांगीण विकासाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेचे राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. ऊर्जा क्रांतीचे प्रतिक ठरणाऱ्या सौभाग्य योजनेमुळे देशातील प्रत्येक घरांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. गावागावात वीज पोहोचावी, तसेच या योजनेंतर्गत गरिबांना मोफत तर इतरांना केवळ 500 रुपयांत वीज जोडणी देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ झाला असून राज्यातील सुमारे 111 गावातील 2 लक्ष 73 हजार घरांना पारंपारिक तर 21 हजार घरांना अपारंपरिक ऊर्जा डिसेंबर 2018 अखेर पर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

सौभाग्य योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमास राज्याचे ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार गिरीश व्यास, जिल्हा परिषद अध्यक्षा निशाताई सावरकर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे महासंचालक राजाराम माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे राजीवकुमार मित्तल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फिडर सेपरेशन, दिन दयाळ ग्रामज्योती विद्युतीकरण योजना तसेच आयपीडीएस आदी योजनांसाठी केंद्र शासनाच्यावतीने दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांनी मान्य केल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज तसेच वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सहाय्य होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सौभाग्य योजनेतून गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील कुटुंबाच्या घरांपर्यंत वीज पोहचली असून त्यांना विजेचे जोडणीचे प्रमाणपत्र देताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत आहे. त्यामुळे गरिबांपर्यंत विकास व प्रगती पोहोचविण्यासाठी शासन राबवीत असलेल्या योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील महावितरण कंपनीतर्फे माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राहकांना अत्यंत पारदर्शक व चांगली सेवा देण्यासोबतच कामकाजात सुलभता व प्रभावीपणे कार्यशैली वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या सेवेचा ग्राहकांना चांगला लाभ मिळणार असल्याचेही यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सौभाग्य योजनेमुळे विकास व प्रगतीपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांपर्यंत वीज पोहोचणार असून शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी विजेचे कनेक्शन देण्याच्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा विशेष उल्लेख करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ऊर्जा निर्मितीसाठी सिंचनाच्या पाण्याचा वापर न करता पुनर्वापर केलेले पाणी वापरल्यास शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकेल. गंगा नदी शुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत निर्माण झालेले पाणी केंद्रीय ऊर्जा विभागाने थर्मल पॉवर स्टेशनसाठी वापरावे. प्रदूषण टाळण्यासाठी 25 वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले प्रकल्प बदलवून त्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज निर्मिती करावी, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

विजेच्या जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने विजेवर चालणारी वाहनानाचे संशोधन व वापरला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, वीज तसेच इथेनॉलसारख्या बायो-इंधनाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचणार आहे. ग्रीन बस इथेनॉलवर चालविण्यात येत असून त्यासोबतच मोटारसायकल सुद्धा इथेनॉलवर येणार आहे. विजेच्या जास्तीत जास्त वापरासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी विजेवरील वाहनाच्या चार्जिंग स्टेशनची सुविधा झाल्यास विजेवरील वाहनांचा वापर वाढेल. समृद्धी महामार्गावर वीज वाहणी टाकल्यास ट्रक सुध्दा विजेवर चालू शकतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग

गरिबांना मोफ वीज जोडणी देण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असून त्यासाठी सौभाग्य योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या गावात अद्याप वीज पोहचली नाही, तेथे वीज पोहचविण्याचे काम गतीने सुरु आहे. त्यासाठी विद्युत वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण केले जात आहे, तसेच नवीकरणीय विद्युत निर्मितीसाठी 28 हजार कोटींचा ग्रीन कॉरिडोर बनविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील फिडर सेपरेशन, दीनदयाळ ग्रामज्योती योजना व विद्युत वितरण यंत्रणा सक्षमीकरण (आयपीडीएस)साठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 हजार 600 कोटी रुपये निधीची मागणी केंद्राकडे केली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाला प्राप्त झाला आहे. त्यापैकी 2 हजार कोटी रुपये मागणीच्या प्रस्तावसंदर्भात बोलताना केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री सिंग यांनी कालबद्ध कार्यक्रमानुसार योजना पूर्ण करण्यासाठी सहाय्य देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असल्याचे सांगितले. नवीकरणीय ऊर्जा विकासाठी देशात प्राधान्य असून सध्या 60 हजार मेगावॉट वीज तयार होत असून 2022 पर्यंत 2 लक्ष मेगावॉट वीज निर्माण करण्याचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विजेच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने वीज निर्मितीची क्षमता वाढविण्यात आली असल्याचे सांगताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, 3 हजार 250 मेगावॉट क्षमता वाढविण्यात आली असून 30 ते 35 वर्षांपेक्षा जास्त जुने झालेले ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या जागी अत्याधुनिक प्रकल्प बसविण्यात येत असून भुसावळ येथे 660 मेगावॉट क्षमतेच संचाचे तसेच इतर प्रकल्पांमधून १ हजार ६०० मेगावॉट वीज निमिर्ती करण्याचे लक्ष आहे.

राज्यात 30 हजार मेगावॉट क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने दिनदयाळ ग्रामज्योती विद्युतीकरण योजना, फिडर सेपरेशन व आयपीडीएस अंतर्गत केंद्राकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. यानुसार 4 हजार 600 कोटी रुपये तत्काळ मिळावेत. तसेच 2 हजार कोटी वाढवून देण्याची मागणी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आली. सौरउर्जेच्या बाबतीतही येत्या पाच वर्षात प्रत्येक कृषिपंप सौरउर्जेवर आणण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह तसेच महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. सौभाग्य योजनेंतर्गत गडचिरोली सारख्या आदिवासी गावांमध्ये राहणाऱ्या पाच लाभार्थ्यांना वीज जोडणीचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महावितरणच्या जागेवर सुरु करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल इंडिया अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ‘डिजीटल महावितरण’ अंतर्गत कर्मचा-यांकरिता सुरु करण्यात आलेल्या डॅशबोर्ड आणि इतरही विविध उक्रमांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणचे महासंचालक राजाराम माने यांनी आभार मानले. यावेळी महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा या चारही कंपन्यांचे संचालक, वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सौभाग्य योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील वीज जोडणी मिळालेल्या नागरिकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीज जोडणी प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

माझ्या नवऱ्याची बायको : अथर्वच्या मुंजीत गुरूला मिळणार महाप्रसाद..!

0

 

गुरु-राधिका-शनाया; या त्रयीने महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत
;माझ्या नवऱ्याची बायको; ही मालिका मराठी मनोरंजन क्षेत्रात हुकूमत गाजवते आहे. गुरु, राधिका आणि शनायाची
अफलातून केमिस्ट्री तसंच हाय व्हॉल्टेज ड्रामापासून प्रासंगिक विनोदापर्यंत अस्सल मनोरंजनानं ठासून भरलेलं कथानक, हे
या मालिकेच्या तुफान लोकप्रियतेची मुख्य कारणं आहेत. प्रत्येक एपिसोडगणिक रंगत जाणारं हे कथानक आता आलंय
नागपूरच्या एका;रोमांचक वळणावर..!
अथर्वच्या मुंजीसाठी आपलं बिऱ्हाड घेऊन गुरुनाथ गाठणार आहे नागपूर! गुरुनाथ सोडून राधिका आणि इतर सुभेदार
कुटुंबाला तसंच मित्रपरिवाराला मुंजीच्या कार्यक्रमासाठी खूप उत्सुकता आहे. गुरुनाथचं मन मात्र शनायासाठी मुंबईतच
अडकलंय. फक्त सोपस्कार म्हणून गुरुनाथ मुंजीतले विधी पार पाडणार आहे. गुरूला भुलवण्यासाठी शनायाने
राधिकासारखं वागण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. आपण राधिकासारखे दिसू शकतो पण बनू शकत नाही हे तिला
कळून चुकलं! ;गुरु;कृपेसाठी शनायाची चाललेली धडपड आता तिला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. राधिका
आणि शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरू आजवर अनेकदा तोंडघशी पडला आहे. आता वडिलांच्या प्रॉपर्टीचा हव्यास
गुरूला आणि गुरूचा सहवास शनायाला नागपूरपर्यंत घेऊन येणार आहे!! आजपर्यंत गुरूने मोठ्या चलाखीने शनाया प्रकरण
आपल्या आई-बाबांपासून लपवून ठेवलं होतं, पण अथर्वच्या मुंजीत शनायाच्या;अचानक भयानक; आगमनाने गुरुनाथची
दाणादाण उडणार आहे. शनायाच्या येण्याने मुंजीच्या कार्यक्रमाची सांगता;धक्कादायक; होणार आहे.
अथर्वच्या मुंजीत आता गुरुची;उत्तरपूजा; बांधली जाणार आहे. राधिकाला मुलीसमान मानणाऱ्या गुरूच्या वडिलांकडून
गुरुला मिळणार आहे महाप्रसाद! गुरूच्या कर्मांचा ;जागर अथर्वच्या मुंजीत घालेल का ;गोंधळ? गुरुचे ;डोहाळे;
लागलेल्या शनायाची राधिका करेल का ;पंचारती;? गुरुनाथचे वडील त्याला प्रॉपर्टीमधून करतील का बेदखल? गुरु आणि
शनायाला धडा शिकवण्यासाठी आता राधिका कोणतं पाऊल उचलेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मालिकेच्या
पुढील काही भागांमध्ये, तेव्हा पाहायला विसरू नका ;माझ्या नवऱ्याची बायको; सोम-शनि रात्री ८ वाजता फक्त आपल्या
झी मराठीवर!

सोशल मीडियावरील नाठाळांच्या माथी हाणा कायद्याची काठी…

0
युवती संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष मनाली भिलारे यांनी देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र च्याविरोधात दाखल केली एफआयआर
पुणे : 
राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेच्या पुणे शहराध्यक्ष व सोशल मीडिया प्रमुख मनाली भिलारे यांनी पुणे येथील खडक पोलिस ठाण्यात  “Devendra Fadnavis for Maharashtra” या फेसबुक पेजविरोधात काल एफआयआरद्वारे फिर्याद दाखल केली. देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या पेजवरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अत्यंत अश्लाघ्य व आक्षेपार्ह भाषेत मजकूर प्रसृत केला जात आहे व त्यामुळे या पोस्टवरील कमेंटमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह व अश्लील मजकूर लिहिला जात आहे. त्यामुळे मनाली भिलारे यांनी भारतीय दंड संहिता १८६० या अधिनियमाअंतर्गत कलम ५०९ व ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० याअंतर्गत कलम ६६(C) व कलम ६७ अन्वये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्यासाठी खडक पोलिस ठाणे, पुणे येथे फिर्याद दाखल केली असून दिनांक २२ डिसेंबर रोजी ही तक्रार इन्स्पेक्टर राजेंद्र केशवराव मोकाशी यांनी फिर्याद स्वीकारून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील तपास इन्स्पेक्टर संभाजी रामचंद्र यांच्याकडे सोपवला.
“देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र” असं नाव या पेजला आहे. या पेजवरचा बराचसा मजकूर शिष्टसंमत पातळी सोडून असतो. देवेंद्र फडणवीस या नावाला तर ते अजिबात साजेसं नाही. पण देवेंद्र फडणवीस  हे सध्या मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आहेत याचाही सोयीस्कर विसर या पेज चालवणाऱ्यांना पडला आहे. त्यांनी पातळी सोडल्यामुळे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सुसंस्कृत प्रतिमेला अनेक तडे गेले आहेत. मूळ छायाचित्रांत फेरफार करून त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणे, पक्षाच्या चिन्हाचे विद्रुपीकरण करणे अशा गोष्टी करून पक्षाच्या नेत्यांची नाहक बदनामी या पेजवरून केली जात आहे. असा नाठाळपणा करणाऱ्यांवर लोकशाहीमार्गाने कायद्याचा बडगा उभारणेच योग्य ठरणार आहेत. तरंच अशा विकृत मानसिकतेला आळा बसेल, अशा विश्वास भिलारे यांना वाटतो.

सोलापुर विद्यापीठ नामांतर : शासनाची विश्वासार्हता संशयास्पद!

0

पुणे: सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नांव देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने खोटारडेपणाचे धोरण आखलेले दिसते. “अहिल्याबाई होळकरांचे नांव सोलापूर विद्यापीठास दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल व विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा होईल” असे राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी विधानसभेत नामविस्ताराच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले होते. त्यांचे हे विधान कामकाजात नोंदले गेले आहे. हे विधान श्री. तावडे यांनी किंवा सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीने अद्याप मागे घेतलेले नाही. असे असुनही अलीकडेच नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाचं नामांतर अहिल्यादेवी होळकर करण्याची घोषणा केली खरी पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या विद्यापीठाचे नाव बदलणार नसल्याचे विधानपरिषदेतच स्पष्ट केले. असे असतांनाही सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला असून, कार्यवाहीसाठी उपसमिती स्थापन करण्यात आल्याची माहिती, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी कालच विधानपरिषदेत दिली. समजा घेतलाच असेल तर मंत्रीमंडळाचा निर्णय श्री. सावरा कसे जाहीर करू शकतात? श्री. तावडेंच्याच आधीच्या अहिल्यादेवींबाबतच्या अवमानास्पद विधानाचे काय झाले? हा सारा प्रकारच गूढ, धुळफेक व कुचेष्टा करणारा आणि अहिल्याबाई होळकरांना मानणा-या देशवासियांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा आहे असे मत महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.

नामांतर हा अत्यंत वेगळा विषय असला तरी शासनाच्या भोंगळ आणि उडवाउडवी करण्याच्या वृत्तीमुळे तो जास्त संवेदनशील बनला आहे. नामांतरातील घोळापेक्षाही महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी “अहिल्याबाईंच्या नांवामुळे जातीय तेढ वाढेल” असे विधान करावे ही गंभीर बाब आहे. याबाबत त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही किंवा त्यांचे विधान कामकाजातुन वगळले गेलेले नाही. मुख्यमंत्रीही या बाबतीत मौन बाळगुन आहेत. मुलभुत प्रश्नांना बगल दिली जात आहे, मग कोणत्या आधारावर त्यांनी नामांतराची घोषणा केली? विद्यापीठाने अद्याप ठरावच केलेला नाही तर मंत्रीमंडळाने कशाच्या आधारावर नामांतराचा ठराव केला? की जो ठराव झालाच नाही त्याबाबत केवळ धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी खोटे दामटून सांगितले जाते आहे? असे गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून शासनाची विश्वासार्हता संशयास्पद बनली आहे असेही सोनवणी म्हणाले. या बाबतीत स्वत: मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रमाणित कागदपत्रांसहित व योग्य अध्यादेशासहित निवेदन द्यावे. अन्यथा नामांतराच्या सर्व घोषणा या भुलथापा होत्या, फसवणूक होती असे समजले जाईल असेही श्री. सोनवणी म्हणाले.

 

भीमथडी जत्रेसे उत्साहात सुरवात, पुणेकरांकडुन पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद

0
पुणे – ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १२ वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते.  ही जत्रा २२ ते २५ डिसेंबर पर्यंत अॉग्रीकल्चरल ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे सुरू राहील
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आणि  अन्य मान्यवरच्यां हस्ते भीमथडीचे 22 डिसेंबर रोजी उद्घाटण झाले.  यात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलिस उपमुख्य अधिकारी ज्योती प्रिया सिंग, येरवडा जेलच्या प्रभारी स्वाती साठे, अनाथांसाठी काम करणा-या सामाजिक कार्यकर्ता माननीय सिंधुताई सपकाळ, अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रेमळ परोपकारी अश्या सुमाताई किर्लोस्कर, आदरणीय वेदांती राजे भोसले, वर्षा चोरडिया – अध्यक्ष, फिक्की फ्लो पुणे चाप्टर, ह्या सर्व महिलांच्या हस्ते  सकाळी १० वाजता भिमथडीचे उद्घाटण झाले.
महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या अकरा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला  आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक  उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.
मागिल वर्षी देखील भीमथडीस प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला, १ लाखांहूनही अधिक लोकांनी भीमथडीची विविधतेने नटलेली संस्कती अनुभवली.  ह्या वर्षी देखील३०२ हून अधिक ग्रामिण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळाले आहेत.या वर्षीच्या भीमथडी जत्रेचं वेगळेपण/ आकर्षण  म्हणजे भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते. यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे रात्रीचा ‘भिमथडी सिलेक्ट फॅशन शो ‘ आणि लहाण मुलांसाठी खास ख्रिसमस  विशेष “पेटिंग झू “.
पल्लवी दत्ता यांच्या संकल्पनेतुन साकारलेली भिमथाडी सिलेक्ट  थिम ह्यावर्षी पहावयास मिळेत ज्यात  फॉशन चे अनोके 20 स्टॉलचा एक विशेष विभाग आहे. येथे भारतातील पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पुनरुज्जीवन व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. सौ.पल्लवी दत्तांनी सध्याच्या काळात भारतातील  फॅशनच्या असंख्य रूचकीय पैलूंना शोधले आहे .लॅक्मे फॅशन वीक समर / रिसॉर्ट 2017 मध्ये सस्टेनेबल फॅशन आणि इंडियन टेक्सटाइलसाठी फॅशन डॉक्युमेण्ट्रीयनच्या त्या सर्वेसर्वा होत्या.
सांगतिक कार्यक्रम / कॉन्सर्टस देखील ह्या वर्षी असतील .ज्यात रघू दिक्षित प्रोजेक्ट आणि रेसोनन्स आपली संगीत कला भीमथडी जत्रेत सादर करणार आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता रघू दिक्षित  आणि २२ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता रेसोनन्स चे वैभव जोशी आणि अंजली मराठे आपली कला प्रस्तृत करतील . ह्या कॉन्सर्ट द्वारे महाराष्ट्रीय संस्कृती समझुन घेणे अानखी सोपे होईल.  यंदाचा ह्या १२ व्या महोत्सवास देखील  दरवर्षी प्रमाणेच पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळेत.
टेक्नोसॅव्ही आणि रिचेबल भीमथडी जत्रा-
या इंटरनेटच्या युगात भीमथडी जत्राही ‘टेक्नोसॅव्ही’ झाली आहे. तुम्ही या जत्रेतील विविध उपक्रम, कॉन्सर्टस् आता इंटरनेटवरून बुक करू शकता.
www.bookmyshow.com  या संकेतस्थळावरून आपले टिकीट कन्फर्म करू शकता. ऑनलाईन पे करू शकता.  पुण्यातील कोणत्याही भागातून भीमथडी जत्रेला येण्यासाठी  ‘UBER’ टॅक्सी बुक केल्यास 30 टक्के प्रवास भाड्याची सुट देण्यात आली आहे.  यासाठी तुम्ही ‘JATRA17’ हा कोड ‘UBER’ बुक करताना वापरा.

पुण्यातील रेल्वे मालधक्का बंद न करण्याबद्दल आणि रेल्वे स्टेशनवर कूल कॅबला जागा देण्याबाबत खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

0

पुणे :

पुणे रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे मालधक्का बंद करण्याच्या निर्णयाबद्दल आणि रेल्वे स्टेशनमध्ये कूल कॅबला जागा न देण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला आक्षेप घेणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना लिहिले आहे.

पुणे मालधक्का अनेक वर्षांपासून पुणे आणि स्टेशनचे अविभाज्य अंग आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशनवर जड सामान ठेवणे आणि सामान उतरविण्यासाठी स्टेशनचा वापर करणार्‍या हमालांशी कोणतीही चर्चा न करता, पूर्व सूचना न देता त्यांना बेरोजगार करण्यात आले आहे.

या विषयी वारंवार निवेदने देवूनदेखील काही उपयोग होत नसल्याने असंघटित क्षेत्र आणि हमालांसाठी कार्यरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी यासंदर्भात 11 डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने काही प्रतिसाद दिलेला नाही. हे दुर्देवाचे आहे. असे खासदार चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

कूल कॅब रेल्वे स्टेशनवरील एक अविभाज्य भाग आहे. कूल कॅबसाठीची रेल्वे स्टेशनची जागा ओला आणि उबेर कॅबला देण्यात आली आहे. कूल कॅबचालक संघटित नसल्याने त्यांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतलेला नव्हता म्हणून त्यांना पार्किंग लॉटपासून वंचित ठेवता येणार नाही. पुणेकर नागरिक विशेषतः महिलांना कूल कॅब नेहमीच सुरक्षित ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्टेशनवर पार्किंग मिळावे, अशी मागणीही खासदार वंदना चव्हाण यांनी या पत्रात केली आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासासाठी निघालेल्या कु.सायली महाराव व कु.पूजा बुधावले यांचा पुण्यात सन्मान

0
पुणे-बेटी बचाव-बेटी पढाव व प्रदूषण मुक्त भारत हा संदेश देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल प्रवासावर निघालेल्या कु.सायली महाराव(ठाणे)व कु.पूजा बुधावले(पुणे)यांचे आज 2000 की.मी.प्रवास करून पुणे शहरात आगमन झाले असता त्यांना पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा देण्यासाठी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड़, गजानन सोनावणे,प्रशांत गांधी,विकास भांबुरे, गोपाळ भंड़ारी,अनिकेत बोकील,अजित कोलेकर,राहुल कोटला विजय राजमाने, शाबीर खान, सोनू शेख,बबलू सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
  या दोन्ही मुलींनी “बेटी बचाव-बेटी पढाव व प्रदूषणमुक्त भारत”हा संदेश काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास करून आपल्या कृतीतून देत आहेत त्याबद्दल त्या कौतुकास पात्र आहेत असे मत यावेळी श्री.बांगड़ व श्री.भांबुरे यांनी व्यक्त केले व त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
  दोन्ही मुली महाविद्यालयीन शिक्षण घेत असून त्यांना या प्रवासासाठी के टू के राईड़चे गोपाळ भंड़ारी व अनिकेत बोकील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

रवाईन हॉटेल नॅशनल सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत ऋतुजा चाफळकर, गार्गी पवार, यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0

पाचगणी रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल नॅशनल सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत सोळाव्या मानांकीत ऋतुजा चाफळकरने अव्वल मानांकीत प्रेरणा विचारेचा तर क्रिशन हुडाने अर्णव पतंगेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

           रवाईन हॉटेलपाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत क्रिशन हुडाने चौथ्या मानांकीत अर्णव पतंगेचा 6-1, 7-6(7) असा टायब्रेकमध्ये तर दहाव्या मानांकीत मोहित बोंद्रेने आठव्या मानांकीत आर्यन भाटियाचा 3-6, 7-6(3), 6-4 असा संघर्षपुर्ण लढतीत टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात सोळाव्या मानांकीत ऋतुजा चाफळकरने अव्वल मनांकीत प्रेरणा विचारेचा 2-6, 6-2, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली व अंतिम फेरी गाठवी. तिस-या मानांकीत गार्गी पवारने बिगर मानांकीत वैष्णवी आडकरचा 6-1, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात क्रिशन हुडा व भुपेंद्र दहिया या जोडीने धन्या शहा व अर्जून कुंडू यांचा 7-5, 6-4 असा तर दुस-या मानांकीत नरेश बडगुजर व वंश भागटानी यांनी  अर्णव पतंगे व यशराज दळवी यांचा  6-3, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात प्रेरणा विचारे व ह्रदया शहा यांनी संजना सिरीमुल्ला व राई वाशिमकर यांचा 7-6(4), 1-6, 10-5 असा संघर्षपुर्ण लढतीत टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऋतुजा चाफळकरने आपली विजयी घोडदौड कायम राखत दुहेरीतही  सानिया मसंदच्या साथीत रेनी सिंगला व रेनी सिंग यांचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर  निकाल : मुले:उपांत्य फेरी: 

क्रिशन हुडा(1)वि.वि.  अर्णव पतंगे(4)   6-1, 7-6(7);

मोहित बोंद्रे(10) वि.वि आर्यन भाटिया(8)  3-6, 7-6(3), 6-4;

मुली- ऋतुजा चाफळकर(१६)वि.वि  प्रेरणा विचारे(1) 2-6, 6-2, 6-2;

गार्गी पवार(3) वि.वि वैष्णवी आडकर 6-1, 6-3;

दुहेरी गट- मुले- उपांत्य फेरी: 

क्रिशन हुडा/भुपेंद्र दहिया वि.वि धन्या शहा/अर्जून कुंडू  7-5, 6-4;

नरेश बडगुजर/वंश भागटानी(2) वि.वि अर्णव अर्णव पतंगे /यशराज दळवी   6-3, 7-5;

मुली- प्रेरणा विचारे/ह्रदया शहा(1) वि.वि संजना सिरीमुल्ला/ राई वाशिमकर (3) 7-6(4), 1-6, 10-5;

ऋतुजा चाफळकर/सानिया मसंद(4) वि.वि रेनी सिंगला/रेनी सिंग 6-3, 6-2.

‘हॉस्टेल डेज’ १२ जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

0

दिग्दर्शक अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे  चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा हॉस्टेल डेजया आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यांत प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.त्यांशिवाय या चित्रपटात पुण्यातील  चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यांत समावेश आहे.या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.“हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तरीख जाहीर करताना काढले.ही कथा आहे १९९४ मधील; साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची. १९९० च्या या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फार  मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरु झाली. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येवू लागले. समाजामध्ये त्यामुळे फार मोठे बदल झाले आणि महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले. हॉस्टेल डेजची कथा हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, विनोदाच्या अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते.१९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा हॉस्टेल डेजहा एक सांगीतिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे  गायक कलाकार त्यासाठी एकत्र आले आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकर अजय नाईक यांना १९९०च्या दशकातील हा काळ हॉस्टेल डेजमध्ये त्याचप्रकारची गाणी देवून पुनरुज्जीवीत करायचा होता. या सर्व गायकांनी चित्रपटासाठी गावे अशी त्यांची इच्छा होती. या दिग्गजांनी  गाणी गायला होकार दिला आघाडीच्या सहा बॉलीवूड गायकांनी एका मराठी चित्रपटासाठी गाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल,” असे उद्गार अजय नाईक यांनी काढले. त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे गायक प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत.नाईक पुढे म्हणाले की, कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.

 

एसटी मधील मोफत वायफाय सेवेमुळे महामंडळास दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

0

  नागपूर-राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतका वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

            सदस्य सर्वश्री प्रकाश आबिटकरबसवराज पाटीलश्रीमती प्रणिती शिंदे आदींनी राज्य महामार्ग परिवहन मंडळास एसटीमधील मोफत वायफाय सेवेमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना परिवहन मंत्री श्री. रावते यांनी म्हटले आहे कीएसटी बसेसमध्ये वायफाय प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून महामंडळास या प्रकल्पाद्वारे वार्षिक परवाना शुल्क म्हणून प्रतीवर्षी एक कोटी पाच लाख इतका अतिरिक्त महसूल पुढील पाच वर्षांसाठी प्राप्त होणार आहे. तांत्रिक कारणास्तव वायफाय उपकरण बंद पडल्यास सदर कंपनीकडून त्याची मोफत दुरुस्ती करुन देण्यात येतेअसे श्री. रावते यांनी उत्तरात म्हटले आहे.