Home Blog Page 3215

विजयस्तंभ कार्यक्रमानिमित्त पुणे-नगर राज्य महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने …

0

पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयातील लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत पेरणेफाटा येथे 1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून मोठया प्रमाणात जनसमुदाय वाहनांसह येत असतात. या विजयस्तंभास 200 वर्ष पुर्ण होत आहे. त्याअनुषंगाने राज्यभरातून विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी अंदाजे 9 ते 10 लाख इतका जनसमुदाय येण्याची दाट शक्यता आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र तसेच इतर राज्यातूनही जनसमुदाय बसगाडया, एस.टी.बसेस, चारचाकी,जीप,टेम्पो, मोटारसायकल मधून येत असतो. त्यामुळे पुणे-नगर राज्य महामार्गावरील‍ वाहतूकीवर परिणाम होवून वाहतूकीची मोठया प्रमाणावर कोंडी होते. महामार्गावरील वाहतूक वळविण्याकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे-नगर मार्गावरील वाहतूक पुढील प्रमाणे वळविण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग- अहमदनगर बाजूकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक शिक्रापूर चाकण मार्गाने मुबईकडे वळविण्यात आली आाहे. पुण्याहून शिरुर, नगर रोडकडे जाणारी वाहतूक सोलापूर रोडने चौफुला रोडने न्हावरा फाटा शिरुर नगरकडे वळविण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था- शिक्रापूर बाजूकडून येणारी वाहने- कोरेगाव भिमा बाजारतळ व इतर मोकळया जागेत केली आहे. पुणे लोणीकंद कडून येणारी वाहने- पेरणे टोलनाक्याच्या अलीकडे मोकळया जागेत पार्किंग करण्यात आली आहे. पुणे लोणीकंद कडून येणारी वाहने-लोणीकंद कुस्त्याचे मैदान येथे पार्किंग करावीत. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती पुणे ग्रामीण  जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

0000

१७ हजार शुभेच्छा पत्रांचे आणि ५ हजार चॉकलेटचे वाटप

0
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय.एम.ई.डी.) च्या वतीने
 
चारशे विद्यार्थ्यांनी केले रस्ता सुरक्षा जनजागृती विषयी शुभेच्छा पत्रांचे वाटप

पुणे:भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या (एन.एस.एस) वतीने ‘रस्ता सुरक्षा जनजागृती, स्वच्छ भारत आणि ग्रीन इंडिया अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानातंर्गत पुणे शहरातील विविध भागातील प्रमुख २० सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या चारशे विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या १७ हजार शुभेच्छा पत्रांचे आणि ५ हजार चॉकलेटचे वाटप केले.

यावेळी डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक), डॉ. भारतकुमार सांख्ये, डॉ विजय फाळके (एनएसएस विभाग प्रमुख), प्रा. मैत्रे (समन्वयक, एनएसएस विभाग), डॉ. ए. डी. मोरे (एम सी ए चे संचालक), प्रा. एस. सी. हेमबाडे आदी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी आणि आयएमईडीमधील प्राध्यापक सहभागी झाले होते.

या अभियानातंर्गत वाटण्यात आलेले ‘पॉकेट शुभेच्छा पत्र’ चार पानी आहे, यामध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत. तसेच ‘ग्रीन इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ याविषयी देखील संदेशाचा यामध्ये समावेश आहे.

‘रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे, या पार्श्‍वभूमीवर हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले’, अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.

हे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील प्रमुख चौकांमध्ये देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कोथरूड डेपो, परिहार चौक (औंध), श्री दगडूशेठ गणपती, सारसबाग (महालक्ष्मी मंदीर), वारजे पूल, संतोष हॉल (आनंदनगर,सिंहगड रोड), महानगरपालिका (बालगंधर्व), बिग बाजार (हडपसर), कर्वे पुतळा (कोथरूड), कात्रज सिग्नल, गुडलक चौक, स्वारगेट, शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर सिग्नल, अभिरूची मॉल (सिंहगड रोड), एम.आय.टी. (आनंदनगर), राजाराम पूल, पद्मावती (सातारा रोड), नळ स्टॉप या चौकांचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन

0

काही चित्रपट रंजनासोबत समाजातील वास्तव, व्यंग अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवीत असतात. अॅट्रॉसिटीया आगामी मराठी सिनेमातही प्रेक्षकांना अशाच प्रकारचे ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. गीत-संगीताचा सुमधूर साज लेऊन अॅट्रॉसिटी अॅक्टमागील सत्य अॅट्रॉसिटी या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांचे दिमाखदार प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. वेगळा विषय मांडल्याबद्दल निर्माता दिग्दर्शकाचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दिपक कदम यांनीअॅट्रॉसिटीचं दिग्दर्शन केलं आहे. कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. अॅट्रॉसिटी हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. समाजातील दुर्बल घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या अॅट्रॉसिटी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अॅट्रॉसिटीमध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेष करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी अॅट्रॉसिटीमधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.

राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे, तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, विनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत. येत्या २ फेब्रुवारीला अॅट्रॉसिटी प्रदर्शित होणार आहे.

गावातील प्रत्येकाला पिण्यासाठी शुध्द पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील -बबनराव लोणीकर

0

पुणे : राज्यात शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेतली आहेत. या योजनेमुळे गावातील प्रत्येक माणसाला पिण्यासाठी शुध्द पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन श्री.लोणीकर यांच्या हस्ते काल झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती मनिषा पलांडे, मुख्य अभियंता एस.एस.गरंडे, उपविभागीय अभियंता श्रीमती अनिता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता व्ही.एस.आवटे, शिरुर तालुक्याचे गट विकास अधिकारी संदिप जठार, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती रेखाताई बांदल, शिरुर तालुक्याचे सभापती सुभाषराव उमाप, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे आदि उपस्थित होते.

श्री.लोणीकर म्हणाले, राज्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाकडून अडीच हजार कोटी इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही चांगली योजना सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. या योजनेमुळे राज्यातील जनतेला पिण्यासाठी शुध्द पाणी मिळू शकेल. दुषित पाणी पिल्याने गावातील लोक आजारी पडतात, ती आजारी पडू नयेत, त्यांचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी  सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनतेला चांगले पाणी मिळाले पाहिजे. या नळपाणी पुरवठा योजनेसाठी पुणे जिल्हयाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही योजना 50 वर्षे टिकेल अशी दर्जेदार कामे झाली पाहिजेत. मुख्यमंत्री टप्पा दोन योजनेचाही आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. राज्यातील अनेक जिल्हे हे हागणदारी मुक्त झाले आहेत. राज्यात स्वच्छता अभियानाचेही भरीव कामे झाली आहेत. बऱ्याचशा नदया दुषित झाल्या आहेत. देशाचा विकासासाठी स्वच्छता अभियान राबवून चांगली कामे केली पाहिजेत. शिक्रापूरच्या विकासासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्यास प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते म्हणाले.

आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, या गावामध्ये अनेक विकासाची कामे सुरु केली आहेत. शासनानेही या गावातील बऱ्याचशा समस्या सोडविल्या आहेत. शिक्रापूर-चाकण रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या गावातील प्रत्येकाने गावच्या विकासासाठी सहभाग घेवून योग्य नियोजन करुन कामे करावीत.

यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती सुभाषराव उमाप, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अधीक्षक अभियंता मनिषा पलांडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथ सासवडे यांनी मानले.

यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रपतीपदाच्या वाटेला जायचे नाही-शरद पवार

0

पुणे-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांचा आज सत्कार होऊ शकला नसला तरी या व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत, असे मिश्किल उदगार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान काढले. यामुळे शिंदे मनातलेच बोलले की काय या भावनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
यावेळी शरद पवार म्हणाले, प्रतिभाताई पाटील यांनी देखील अनेक महत्वाच्या पदांवर कामे केली आणि त्याला न्याय देखील दिला. मात्र, त्याचे एका पदावर काम करायचे राहून गेले ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. त्यांच्यापासून हे पद हिरावून घेण्याचे काम मात्र मी केले, असे ते मजेत म्हणाले. दरम्यान, शेवटपर्यंत लोकांशी संवाद साधत राहणार असल्याचे सांगताना, हा माझा मार्ग नाही असे सांगत भावी राष्ट्रपती या चर्चेला शरद पवार यांनी पूर्ण विराम दिला.
राज्यपाल आणि राष्ट्रपतीपद मिळालेली व्यक्ती निवृत्त होते. मला अजूनही सामान्य जनतेत राहायचे आहे . त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या वाटेला जायचे नाही”, अशा सूचक शब्दांत राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे श्री . पवार यांनी स्पष्ट केले.

रेल्वे , मनपा सोबत खा. अनिल शिरोळे यांची बैठक

0

पुणे -शहरातील रेल्वे लाईन्स नजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन खा अनिल शिरोळे ह्यांनी आज महानगर पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि रेल्वेचे “ विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर ह्यांच्या सोबत एक बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. त्यानुसार एस आर ए योजना राबवून ह्या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ह्या रेल्वेमार्गावरील स्वच्छतेसाठी निधी रेल्वे का मनपा यांनी खर्च करावा यासंबंधी देखील ह्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. ह्या बैठकीस नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे देखील उपस्थित होते.

ये रे ये रे पैसा झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

0
असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी!! दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे, ये रे ये रे पैसा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला सिन्घम, चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल सिरीज् चे हिंदी चित्रपट सृष्टीतले ख्यातनाम दिग्दर्शक रोहित शेट्टी तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यांची विशेष उपस्थिती होती.
चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा.
अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संजय जाधव यांचे असून, संवाद आणि पटकथा अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी तसेच छायाआरेखन आहे पुष्पांक गावडे यांचं. महेश साळगावकर यांचे कला दिग्दर्शन असून पंकज पडघन यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत अमितराज आणि पंकज पडघन यांनी. ये रे ये रे पैसा हे गाणं लिहिलंय सचिन पाठक यांनी तर स्वरबद्ध केलंय प्रवीण कुवर आणि जान्हवी प्रभू-अरोरा यांनी. तर खंडाळ्याचा घाट हे गाणं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्या त्रिकुटाने चित्रीकरणाच्या वेळी लाईव्ह गायले असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे. साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले असून ते वैशाली सामंत यांनी गायले आहे.
हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

ग्रामपंचायत निवडणूक आंबी बुद्रुक (ता.बारामती) EVM मशीनमध्ये गडबडीचा आरोप

0

पुणे-ग्रामपंचायत आंबी बुद्रुक बारामती येथील ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या गैरप्रकार व बँलेट EVM मशिनमध्ये गडबडीमुळे ग्रामपंचायत आंबी ब्रुद्रुकची फेर निवडणूक घेण्यात येवून तसेच तेथील निवडणुका केंद्रअध्यक्षाची चौकशी करावी.अशी मागणी निवासी जिल्हाआधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे  करण्यात आली आहे . श्रीहनुमान सर्वधर्म जनविकास पँनलच्या वतीने ग्रापंचायत सरपंच पदाचे निवडणूक उमेदवार तुषार चिंतामन तावरे तसेच उमेदवार अतुल मारुतराव गायकवाड आणि दिंगबर खोमने यांनी निवडणूक केंद्रअध्यक्ष गायकवाड सी.बी. यांनी उमेदवार व प्रतीनिधी समोर EVM मशिन चेक करुन सह्या करुन सिल केलेली मशिन मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचल्या नंतर रात्री परस्पर त्याचे सिल काडून बदलून ती खराब असल्याने बदलली आहे व गोडबोलून बदल अर्जावर सह्या घेतल्या. अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केली आहे .

 

पुणे रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणार

0

पुणे- पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी रेल्वे बोर्डाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. 2 ते 6 ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावरील सर्वच फलाटांवर 26 कोचच्या गाड्या थांबू शकतील. मार्च 2019 पर्यंत पूर्ण हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 2 ते 6 ची लांबी कमी असल्याने तेथे 26 डब्यांची गाडी थांबविली जात नाही. केवळ एक क्रमांकाच्या फलाटावरच 26 डब्यांच्या गाड्या थांबतात, असे नमूद करून देऊस्कर म्हणाले, ‘‘रेल्वे स्थानकाची लांबी कमी असल्याने या फलाटांवर मालगाडी थांबविता येत नाही. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना थांबवून मालगाडीला प्रथम सोडावे लागते. परिणामी, इतर गाड्यांना 10 मिनिटे उशीर होतो. परंतु, लवकरच 2 ते 6 फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.

देऊस्कर म्हणाले, ‘‘सर्व फलाटांवर 26 डब्यांच्या गाड्या उभ्या करता याव्यात, या दृष्टीने शिवाजीनगरच्या दिशेला या फलाटांची लांबी वाढविली जाणार आहे. पुणे-लोणावळा मार्गावर आॅटोमॅटिक सिग्नल ब्लॉकिंगचे काम सुरू असून, अात्तापर्यंत पुणे ते कामशेतदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे.

आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत सेल2वर्ल्ड, यार्डी, टीसीएस संघांची उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

0

पुणे,– आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत सेल2वर्ल्ड, यार्डी व टीसीएस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत स्वप्निल आवळेच्या नाबाद 62 धावांच्या बळावर सेल2वर्ल्ड संघाने आयबीएम संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना आयबीएम संघाने  20 षटकात 9 बाद 148 धावा केल्या. यात पियुष कानिटकरने 30 व संकल्प देकाटेने 34 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 148 धावांचे लक्ष सेल2वर्ल्ड संघाने दोन षटके बाकी असताना 5 बाद 152 धावांसह पुर्ण करत उपउपांत्यपुर्व फेरी गाठली. स्वप्निल आवळे सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत  अंकित रावच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यार्डी संघाने ऑल स्टेटस् संघाचा 81 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अमित राडकरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर यार्डी संघाने 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या. 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑल स्टेटस् संघ 20 षटकात 9 बाद 96 धावांत गारद झाला. प्रमोद दवंडेने 3 तर अंकित रावने 4 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. अंकित राव सामनावीर ठरला.

तिस-या लढतीत गौरव सिंगच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर टीसीएस संघाने कॅपजेमिनी संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना दिपक कुमारच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर कॅपजेमिनी संघाने 20 षटकात 6 बाद 133 धावा केल्या. 133 धावांचे लक्ष टीसीएस संघाने 3 चेंडू बाकी असताना  5 बाद 138 धावांसह पुर्ण करत विजय संपादन केला. गौरव सिंग सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

आयबीएम- 20 षटकात 9 बाद 148 धावा(पियुष कानिटकर 30, संकल्प देकाटे 34, मोहित श्रीवास्तव नाबाद 20, रोहन लुनावत 3-15, रोशन धोंगडे 3-26) पराभूत वि सेल2वर्ल्ड – 18 षटकात 5 बाद 152 धावा(स्वप्निल आवळे नाबाद 62, रोशन धोंगडे 22, कृष्णा राजपुत नाबाद 21, विजय कुमार 2-15) सामनावीर- स्वप्निल आवळे

सेल2वर्ल्ड संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.

यार्डी- 20 षटकात 9 बाद 177 धावा(अमित राडकर 50, पार्थ शहा 21, तरूण नोटानी 26, जीवन गोसावी 49, सुमित रावत 2-26, रवी गोहर 3-36) वि.वि ऑल स्टेटस्-  20 षटकात 9 बाद 96 धावा(जीत ठाकूर नाबाद 24, सुमित रावत 36, प्रमोद दवंडे 3-15, अंकित राव 4-11) सामनावीर- अंकित राव

यार्डी संघाने 81 धावांनी सामना जिंकला.

कॅपजेमिनी- 20 षटकात 6 बाद 133 धावा(हर्षल लुनागेरीया 30, दिपक कुमार नाबाद 54, वैभव जैन नाबाद 21, राहूल गर्ग 2-15) पराभूत वि टीसीएस-19.3 षटकात 5 बाद 138 धावा(कन्वरजीत सिंग 22, रोहित पाठक 25, गौरव सिंग नाबाद 40, चंद्रमैली रेड्डी 2-36) सामनावीर- गौरव सिंग

टीसीएस संघाने 5 गडी राखून सामना जिंकला. 

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात- पालकमंत्री

0

पुणे:- हवेली तालुक्यातील मौजे पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सोमवार दिनांक १ जानेवारी २०१८ रोजी लाखो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी संबंधित सर्व विभागांनी काटेकोर नियोजन करुन तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी सूचना पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

            मौजे पेरणे येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणा-या नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस श्री.बापट यांच्या अध्यक्षतेखाली  येथे झाली, त्यावेळी उपस्थित विविध विभागाच्या अधिका-यांना त्यांनी ही सूचना केली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबुराव पाचर्णे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस अधिक्षक सुवेझ हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे  आदी उपस्थित होते.

        श्री.बापट म्हणाले, विजयस्तंभास भेट देणा-या नागरिकांना आवश्यकत्या सर्व सोयीसुविधा द्याव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तेवढे टँकर, फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहीका तसेच वैद्यकीय अधिका-यांचे पथक, अग्नीशमन दलाच्या गाडया, विद्युत पुरवठा, सी.सी.टी.व्ही यंत्रणा आदी सर्व सुविधा देण्यात याव्यात. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. आवश्यक असल्यास वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करावा. याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. याकरीता पोलीस प्रशासनाने स्वयंसेवकांनां प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घ्यावी.

         यावेळी  विविध विभागांच्या अधिका-यांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती  दिली.

 

मानस धामणे, जैष्णव शिंदे, ईरा शहा,रुमा गाईकवारी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0

पुणे– प्रविण मसालेवाले प्रायोजित व हिलसाईड जिमखाना बिबवेवाडी यांच्या तर्फे आयोजित ३१व्या प्रविण करंडक राष्ट्रीय(12 वर्षाखालील) मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत मानस धामणेने चौथ्या मानांकीत अंशूल सातवचा तर दुस-या मानांकीत जैष्णव शिंदेने तिस-या मानांकीत राघव हर्षचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ईरा शहाने सहाव्या मानांकीत कश्मिरा सुंबरेचा तर दुस-या मानांकीत रुमा गायकैवारीने बिगर मानांकीत रिया मथारूचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Jaishnav Shinde
Manas Dhamne

बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत मानस धामणेने चौथ्या मानांकीत अंशूल सातवचा 6-1, 6-1 असा तर दुस-या मानांकीत जैष्णव शिंदेने तिस-या मानांकीत राघव हर्षचा 6-3, 7-5, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ईरा शहाने सहाव्या मानांकीत कश्मिरा सुंबरेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला तर दुस-या मानांकीत रुमा गायकैवारीने बिगर मानांकीत रिया मथारूचा 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: मुले:

मानस धामणे(1) वि.वि अंशूल सातव(4) 6-1, 6-1

जैष्णव शिंदे(2) वि.वि राघव हर्ष(3) 3-6, 7-5, 6-1

उपांत्य फेरी: मुली:

ईरा शहा(1) वि.वि कश्मिरा सुंबरे(6) 6-0, 6-0

रुमा गायकैवारी(2) वि.वि रिया मथारू 6-4, 6-2

उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे – दिलीप मंडलिक

0

पुणे : आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग, नफ्याच्या टक्केवारीत झालेली घट अशा अनेक निराशाजनक बाबींचे आव्हान समोर असताना उद्योगांनी काळाच्या गरजेनुसार स्वतःच्या प्रचलित पद्धतींमध्ये बदल करत नवे बदल अंमलात आणले पाहिजेत, असे मत लार्सन अँड टूर्बो कंपनीचे कार्यकारी  उपाध्यक्ष  दिलीप मंडलिक यांनी व्यक्त केले. ते पुण्यात मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे आयोजित ‘ब्रेकिंग  लेगसी’ या  विषयावर बोलत होते.

मराठा  चेंबर्स ऑफ कॉमर्स (एमसीसीसीआयए), नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) व इंडियन  सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट (आयएसटीडी) एच.आर.फोरम  च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते.

यावेळी पुढे बोलताना  दिलीप मंडलिक म्हणाले कि, वाढत्या स्पर्धेत  उद्योगाला टिकून राहण्यासाठी प्रचलित पद्धती बाजूला ठेवून पुढे येणाऱ्या बदलांचा विचार करून प्रसंगी कठोर निर्णय घेणेही आवश्यक ठरते. याप्रसंगी एनआयपीएमच्यावतीने येत्या २८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात होणाऱ्या ‘नॅटकॉन’ या राष्ट्रीय परिषदेविषयी समन्वयक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले. तर आभारप्रदर्शन आयएसटीडीच्या अध्यक्ष रश्मी हेबळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमला करंदीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी  पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे  सुमारे शंभरहुन   अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक  पदाधिकारी उपस्थित होते.

अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांसाठी राज्यस्तरीय परिषद

0

 भारत सरकार आणि डिक्की तर्फे आयोजनउद्योगमंत्री  सुभा देसाई यांच्या  हस्ते उदघाटन

 पुणे  : अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांची क्षमता उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्मलघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय(एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की)यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.या परिषदेचे उदघाटन येत्या ३ जानेवारीला उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. अल्पबचत सांस्कृतिक भवन येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेलअशी माहिती राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक पी कृष्ण मोहन यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, महिला विंग प्रमुख स्नेहल लोंढे, डिक्कीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख देवानंद लोंढे, एनएसआयसीचे पुणे विभाग प्रमुख विकास कुमार नायक याप्रसंगी उपस्थित होते.

एनएसआयसीचे विभागीय सरव्यवस्थापक पी कृष्ण मोहन म्हणाले की,राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या नियोजन व विपणन विभागाचे संचालक पी. उदय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद घेण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरही या परिषदेस आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या एससी / एसटी आणि तळागाळातल्या उद्योजकांना एकत्र आणून यशस्वी व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हा या परिषदेमागील मुख्य उद्देश आहे. तसेच या उद्योजकांची क्षमता वाढवून त्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करून सक्षम उद्योजक घडविणेहे ध्येय आम्ही समोर ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 परिषदेविषयी बोलताना ते म्हणाले कीउद्योग विश्वातील चालू घडामोडींविषयी उद्योजकांना जागृत करण्याबरोबरच भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची थोडक्यात माहिती त्यांना यामार्फत दिली जाईल. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी उद्योजकांना याच परिषदेच्या माध्यमातून लाभेल. आचारविचारांची देवाणघेवाण होईलचर्चेची संधी मिळेल आणि पर्यायाने याचा फायदा त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास होईलअसा विश्वास देखील पी कृष्ण मोहन यांनी यावेळी व्यक्त केला.

 मिलिंद कांबळे यावेळी म्हणाले कीसूक्ष्मलघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातींच्या उद्योजकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत तसेच अनेक उपक्रमही राबविले जात आहेत. हे निश्चितपणेच कौतुकास्पद आहे. गेली काही वर्षे दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘डिक्की’ संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवित आहोत पण आता केंद्र व राज्य सरकारनेही पुढाकार घेतल्याने आमच्या कार्यास पाठबळ मिळेल ,यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथसबका विकास’ हे स्वप्न प्रत्यक्षात येईलअसे ही त्यांनी सांगितले.

‘काव्य सप्ताह’ २०१७ चे उद्घाटन

0
पुणे :कवीनी कवींसाठी आयोजित केलेल्या आणि कविता प्रेमींचा वार्षिक आनंदोत्सव अशी ख्याती असलेल्या ‘काव्य सप्ताह’ २०१७ चे उद्घाटन रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला, ‘प्रबोधन माध्यम’ चे संस्थापक दीपक बीडकर यांच्या हस्ते झाले.
संयोजक ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी स्वागत केले.
विश्वास वैद्य यांच्या चित्रप्रदर्शनाचे उ्दघाटन यावेळी करण्यात आले. ‘काव्य सप्ताह’ उपक्रमाचे हे 18 वे वर्ष आहे.
स्काऊट हॉल (सदाशिव पेठ) ‘ येथे सोमवारी सायंकाळी काव्य सप्ताह ला प्रारंभ झाला.
‘कोवळ्या उन्हात, मोकळ्या रानात’ हे कवी संमेलन पहिल्या दिवशी पार पडले.डॉ. गौरी दामले, आनंद कुलकर्णी, दीपाली दातार, शिवाजी बोराडे, विजय सातपुते तसेच अनेक कवींनी कविता सादर केल्या. ३१ तारखेपर्यंत हा काव्यसप्ताह रोज सायंकाळी साजरा होणार आहे.