पुणे- शिवसृष्टी साठी वेळ आणि पैसा नाही , कचरा ,पाणी ,अतिक्रमणे आणि पुनर्वसनासाठी महापालिका प्रशासन संघर्ष करत आहे मात्र हीच महापालिका ३५० कोटीच्या सायकलट्रॅक साठी युद्धपातळीवर कामकाज करत आहे हि बाब अचंबित करणारी वाटते आहे . जिथे 10 लाख घरे असावीत तिथे ३५० कोटी रुपये खर्च करून ; रस्ता रुंदी न करता आहे त्याच रस्त्यांवर म्हणजे जिथे बीआरटी ,पथारी,पार्किंग ,पदपथ असताना आणखी सायकल मार्ग युद्धपातळीवर करण्याचा घाट महापालिका का घालते आहे ? असा सवाल मनसे च्या रुपाली पाटील यांनी आज केला आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे …..
वजोर डॉट कॉमच्या ऑफलाईन स्टोअरचे पुण्यात थाटात उद्घाटन
पुणे-बरीच महिने प्रतीक्षा केल्यावर
वजोर डॉट कॉमच्या ग्राहकांना ह्
वजोर डॉट कॉम आजतागायत आपल्या ध्
वजोर डॉट कॉमचा एक अनोखा उपक्र
सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी ब्
वजोर डॉट कॉम २०१८ मध्ये चेन्नई
देआसरा आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजनांची सुरूवात.
ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाशी सुद्धा देआसराने केला सहयोग.
पुणे-देआसरा फाऊंडेशन, नव उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, देआसराने संपूर्ण देशभरात उद्योगाला चालना देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरण (ओएसडीए) बरोबर सहयोग केला आहे. तांत्रिक शिक्षणाच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्यांवर आधारीत प्रशिक्षणासाठी योग्य पायाभूत सुविधा विकसित करणे आणि अधिक महत्त्वाचे, उद्योजकता मध्ये विकास यावर भर दिला जाणारा आहे.
ओएसडीए प्रामुख्याने ओडिशामधील कौशल्याच्या विकासाशी निगडीत आहे, ज्या मध्ये प्रामुख्यानी तरुणांना उद्योगाच्या कौशल्याचे प्रशिक्षित दिले जाते. ओएसडीए उद्योगीक शिक्षण आणि प्रशिक्षण देईल,या सहयोगातून देआसरा सुद्धा ओडिशा मधील तरुणांना नवउद्योग उभा करण्यात मदत करणार आहे.तसेच देआसरा युवकांना व्यावसायिक योजना तयार करण्याची क्षमता प्रदान करेल जे पूर्णपणे कार्यात्मक आणि समजून घेणे सोपे असेल.
असेच टाटा ट्रस्ट हि उद्योजकता वाढविण्यासाठी आणि बेरोजगार युवकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करत असते.यात देआसरा फाऊंडेशनने टाटा ट्रस्टच्या मदतीने एक व्यवहार्य व्यवसाय योजना विकसित करणे, निधीची सुविधा पुरविणे आणि एक फायदेशीर व्यवसाय चालवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या वेळी देआसरा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.प्रज्ञा गोडबोले म्हणाले,” या दोन स्थापन केलेल्या संस्थांच्या सहकार्यात्मक दृष्टीकोनामुळे आपण सर्व एकत्रितपणे जास्त तरुण वर्गाला मदत करू शकू जे योग्य दिशेने मार्गक्रमान करतील ज्यामुळे उद्योगजगतात विकास,स्वयंरोजगार आणि रोजगार संधी युवकांना उपलब्ध होईल “
देआसरा, टाटा ट्रस्ट आणि ओएसडीए एकत्रितपणे बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकतात आणि युवकांना आपल्या भविष्याला मदत करण्याच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात.
‘ सिध्दी 2017-संकल्प 2018’ च्या माध्यमातून विकासाला अधिक गती – अपर जिल्हाधिकारी रमेश काळे
पुणे– जिल्ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून वेगळी ओळख असून जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे स्मार्ट मॉडेल म्हणून विकसित होत आहे. ‘सिध्दी 2017-संकल्प 2018’च्या माध्यमातून विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘सिध्दी 2017-संकल्प 2018’ या उपक्रमांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. काळे यांनी विविध विषयाशी संबंधित माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत ते म्हणाले, पुणे जिल्हयातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद शेतक-यांसाठी या योजनेअंतर्गत 385.57 कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली. त्यानुसार 47 हजार 78 थकबाकीदार सभासद शेतक-यांना रक्कम रु. 244.86 कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. वेळेवर कर्ज परत करणा-या 77 हजार 860 सभासद शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची रक्कम 127.83 कोटी रुपये देण्यात आली. सदरची रक्कम शेतक-यांच्या खाती वर्ग करण्याचे काम पूर्ण झाले.
पुनर्गठन केलेल्या 1,031 शेतकरी सभासदांना 4.21 कोटी रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 1 लक्ष 24 हजार 938 सभासद शेतक-यांना 372.69 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ या योजने अंतर्गत देण्यात आला. लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना एसेमेसव्दारे कळविण्यात आलेले असून मुद्दल व व्याजासह 1.50 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी 1.50 लाखावरील रक्कम भरल्यास शासनातर्फे 1.50 लाख लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी काळे यांनी स्पष्ट केले.
श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च 2016 रोजी शिखर समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी, पुणे यांनी केलेल्या आराखडयाच्या सादरीकरणात उच्चाधिकार समितीने दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल शिखर समिती समोर सादर केलेला आहे. त्याच अनुषंगाने या आराखड्यास शिखर समितीने 260.86 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी 148.97 कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सूचिबध्द प्रशिक्षण संस्था 279 असून यामध्ये7140 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी 9 हजार 810 असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.
राज्यात 1 जुलै ते 7 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यात 55 लक्ष 91 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी काळे यांनी दिली. त्यानुसार उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
झिरो पेंडन्सी उपक्रमांतर्गत 1 नोव्हेबर 2017 ते 31 डिसेंबर 2017 अखेर 2 लाख 60 हजार 64 प्रकरणांची निर्गती करण्यात आली. 31 डिसेंबर 2017 अखेर 23 हजार 512 प्रकरणे शिल्लक असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियानामध्ये 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 190 गावांची निवड करण्यात आली असून 5 हजार 855 कामांचा आराखडा तयार केलेला आहे. यापैकी 825 कामे हाती घेण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल राज्यपातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुरंदर तालुकयास मिळालेले असून राज्य पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीबाबत पुणे जिल्ह्यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कात्रज जुना घाट रस्ता एकेरी
पुणे. दि.5- पुणे ते कात्रज जुन्या घाट रस्त्याच्या डांबरी पृष्टभागाचे मजबूतीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम दिनांक 31 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नविन बोगद्यातून दरी पूलामार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे. याची संबंधितींनी नोंद घ्यावी, अशी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सौरभ राव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
भिडे गुरुजींनी काल केली एसपी आणि कलेक्टर शी चर्चा
सांगली : काल भिडे गुरुजी यांनी सांगलीत एसपी आणि कलेक्टर शी थेट चर्चा केली .शिवप्रतिष्ठानने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी हि चर्चा झाली “कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्या काही सत्य बाबी आहेतस त्या शासनापर्यंत पोचवू.’, असे जिल्हाधिकारी वजयकुमार काळम-पाटील यांनी यावेळी सांगितले तर पोलिस अधीक्षक शर्मा म्हणाले, की या संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली आहे. समिती या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर पक्षपात ना करता कारवाई केली जाईल. दरम्यान, जिल्हाधिकारी काळम-पाटील आणि पोलिस अधीक्षक शर्मा यांनी “शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याशी चर्चा केली. ज्या काही सत्य बाबी आहेत, जे कुणी दोषी आहेत, त्यांची माहिती शासनाला कळवू, कुणाची गय करणार नाही, असे काळम-पाटील म्हणाले.
भिडे गुरुजींचे मुंबईत भाषण -काय करणार पोलीस ?
पुणे: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचे 7 तारखेला मुंबईत परळ येथे भाषण होणार आहे. मात्र कोरेगाव भीमा दंगलीमुळे आणि त्यानंतर आ. जिग्नेश मेवानी यांच्या भाषणाला परवानगी न देता छात्रभारती च्या मुलांची उचलबांगडी करणारे पोलिस भिडे गुरुजींच्याच अटकेची मागणी होत असताना त्यांच्या भाषणाला परवानगी देणार कां, याविषयी साशंकता आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हे भाषण होणार आहे. छत्रपती शिवरायांचे बत्तीस मण वजनाचे सोन्याचे सिंहासन पुन्हा उभे करण्याचा शिवप्रतिष्ठान या संघटनेचा संकल्प आहे. त्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या जनजागृतीसाठी भिडे यांचे भाषण होणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या राज्यातील गडकोड मोहिमेबद्दलही ते बोलणार आहेत.
दरम्यान, सद्या राज्यभर तणाव असलेल्या भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुरोगामी संघटनांकडून भिडेंचा निषेध करण्यात येत आहे. या संघटनांकडून या कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे पोलिस कार्यक्रमाला परवानगी देतात कां, हे पाहवे लागणार आहे.
‘वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या’ – मनोरंजनाचं वादळ परत येतंय
तमाम मराठी प्रेक्षकांना दर सोमवारी आणि मंगळवारी जो प्रश्न ऐकायची सवयच लागलीये तो प्रश्न म्हणजे हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण सुरु होतोय चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा. ‘जिथे मराठी तिथे झी मराठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करत असलेल्या झी मराठीने या विश्व दौऱ्याच्या निमित्ताने जगाच्या नकाशावर एक धाडसी पाऊल टाकलं आहे. चला हवा येऊ द्या म्हणजे मराठी प्रेक्षकांचं हक्काचं मनोरंजन. मनोरंजनाचं हे वादळ आता पुन्हा परत येतंय. येत्या ८ जानेवारीपासून चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा सुरु होत आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या विश्वदौऱ्यात चला हवा येऊ द्याची टीम आपल्यासोबत प्रेक्षकांना जगाची सफर घडवणार आहे. चला हवा येऊ द्याने आत्तापर्यंत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. पोस्टमन काका, शांताबाई, जज, वकिल, मामा भाचे, वादघाले सासू सून, पुणेरी बाई अशी वेगवेगळी पात्र आपल्या जगण्याचा भाग बनली. मराठी सिनेमा आणि नाटकांसाठी या कार्यक्रमाने हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. पत्रांच्या माध्यमातून हसवता हसवता अंतर्मुख केलं. आणि आता जगाच्या नकाशावर मोहोर उमटवायला ही सतरंगी मंडळी सज्ज आहेत.
८ जानेवारीपासून सुरु होत असलेल्या चला हवा येऊ द्या विश्वदौऱ्याचं पहिलं स्टेशन आहे दुबई आणि अबुधाबी. कॉमेडीची आतषबाजी तर होणारच आहे शिवाय बॉलिवूड पार्क, फेरारी वर्ल्ड अशा अनेक ठिकाणांची सफर ही टीम प्रेक्षकांना घडवणार आहे. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांसोबत दुबई अबुधाबी दौऱ्यात खास पाहुणी म्हणून येत आहेत जाडूबाईची टीम अर्थात निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे. या दोन धमाल अभिनेत्रींसोबत विश्वदौऱ्याचा पहिला भाग रंगणार आहे. विश्वदौऱ्याच्या पुढील भागांमध्ये सुद्धा झी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकांमधले तुमचे लाडके चेहरे दिसणार आहेत.
स्टुडिओची चौकट मोडून जगाची सफर करणारा मराठी टेलिव्हिजनवरचा हा पहिलाच कॉमेडी शो ठरावा. दुबई अबुधाबी पाठोपाठ लंडन, पॅरिस, जपान, सिंगापूर, बाली, मॉरिशस, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युएसए अशा जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांत धुमाकूळ घालायला ही टीम सज्ज आहे. तेव्हा ८ जानेवारीपासून प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वा. करा जगाची सफर तुमच्या लाडक्या चला हवा येऊ द्यासोबत कारण जिथे मराठी तिथे झी मराठी.
दृष्टी विकसित झाल्यास कलाकृतींचे संरक्षण : उदयन इंदुरकर
पुणे – देव डोळे देतो, दृष्टी देत नाही, ती ज्याची त्याने विकसित करावी लागते. अशी दृष्टी विकसित झाल्यास कलाकाराची कला दिसेल, ती कलाकृती आपली वाटू लागेल आणि तिचे संरक्षण होऊ शकेल असे मत प्राचीन मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक उदयन इंदूरकर यांनी व्यक्त केले.
व्यक्ती आणि अभिव्यक्तीचा अनोखा संगम असणार्या ‘मुक्तछंद’ या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन करताना श्री इंदुरकर बोलत होते. हे या महोत्सवाचे विसावे वर्ष आहे. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. शंकर पवार, चित्रा खरे यांची उपस्थिती होती.
श्री. इंदूरकर पुढे म्हणाले, ‘ग्रीस, रोमन, इजिप्त आदी देशांमध्ये आपल्या आधीपासून मंदिरांची परंपरा होता. ज्यावेळी या देशांमध्ये मंदिरांची निर्मिती होत होती त्यावेळी आपल्या देशामध्ये ग्रंथाची निर्मिती चालू होती. कृषि, आयुर्वेद, गणित, नौकानयन आदी विषयात आपण समृध्द होतो. या परिपूर्ण ज्ञानाचा विवेकपूर्ण आणि व्यवहारी उपयोग आपण केला.’
ते पुढे म्हणाले, ‘राजकीय इतिहास हा देशाचा खरा इतिहास असल्याचे समजले जाते, तसे असेल तर गेल्या पन्नास वर्षांत साठ देशांचे अस्तित्व संपुष्टात आले. देशाचा खरा इतिहास त्याच्या कलांच्या इतिहासात असतो.’ श्री. इंदूरकर यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे देशातील व जगातील मंदिरांची माहिती दिली. लेणी, स्तूप, शिलालेख, मूर्ती व मंदिरे हा प्रवास उलगडून सांगितला. जैन, बौध्द, हिंदू परंपरेची माहिती दिली.
भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय शांतता अशक्य : प्रकाश आंबेडकर
मुंबई-कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी अकरा वाजता भेट घेतली. यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करुन जनतेला विश्वास द्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आरोपींच्या अटकेशिवाय शांतता शक्य नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यात सरकारने सुरु केलेली दलित तरुणांची धरपकड थांबवावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.आणि हि विनंती त्वरित मुख्यमंत्री यांनी मान्य केली आहे .
आंबेडकर म्हणाले, बंद पुकारुन आम्ही दलित समाजाचा राग कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींवर तत्काळ कारवाई करुन सरकारने समाजाला विश्वास द्यावा. बंददरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांची क्लिप जर पोलिसांकडे असेल तर त्यांनी ती आम्हाला सादर करावी या यादीतील लोकांना आम्ही हजर करु मात्र, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन थांबावावे, त्याशिवाय आंदोलन नियंत्रणात राहणार नाही, असे ते म्हणाले.
या बैठकीत आमच्या मागण्या मान्य झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवण्यात येईल तसेच आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. भिडे आणि एकबोटे यांना अटक होते की नाही हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शाब्बास …. निधी गेला तरी बेहत्तर पण पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी नको -सीमा सावळेंंची कौतुकास्पद भूमिका
पुणे-ज्या बीआरटी ने पुण्यात कलमाडी आणि कॉंग्रेसची सत्ता महापालिकेतून उलथवून लावली ,नंतर राष्ट्रवादीला देखील विरोधी बाकावर आणले अशा बीआरटी प्रकरणी… निधी गेला तरी बेहत्तर पण पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी नको अशी भूमिका चक्क सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली आहे. माणसी एकाहून अधिक खाजगी वाहने ज्या शहरात आहेत . अशा शहरात वाहतूक समस्येच्या नावाखाली,खाजगी वाहनांची कोंडी करून बीआरटी सारख्या योजना फक्त भ्रष्टाचारासाठी आणल्याचे आजतागायत पुण्यात तरी स्पष्ट झाले आहे . कित्येकदा बीआरटी तयार केली आणि उखडली , सायकल मार्ग हि तसेच वाहतूक समस्या हे भ्रष्टाचारासाठी कुरण मानून योजना आणल्या जात आहेत . अशा पार्श्वभूमीवर सीमा सावळे यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे .
पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात काम करत असताना देखील पुणे-मुंबई महार्गावर बीआरटी करण्यास विरोध केला होता. त्याचे दोष दाखवून दिले होते. त्यामुळे मनुष्यहानी होऊ शकते, असे सांगितले होते. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यावेळीही केली होती. सत्तेत असतानाही त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत.असे सीमा सावळे यांनी आज स्पष्ट केले .पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभेत पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी-दापोडी बीआरटीएसबाबत चर्चा झाली. त्यानंतर सावळे यांनी सभेतील माहिती पत्रकारांना दिली.
सीमा सावळे म्हणाल्या, ”महापालिका प्रशासन बीआरटी मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना केल्याचा दावा करीत आहे. ही बाब चुकीची आहे. मर्ज इन आणि आऊट येथील उपाययोजना पुरेशा नाहीत. आयआयटीच्या सूचनांचे पूर्णपणे पालन झालेले नाही. तसेच दापोडी ते पिंपरीदरम्यानच रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. येथील प्रवास धोक्याचाच ठरणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्याचा घाट कशासाठी. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यास बीआरटी सुरू होऊ देणार नाही. वेळप्रसंगी निधी परत गेला तरी चालेल परंतु या मार्गावर बीआरटी झाली नाही पाहिजे. आयुक्त म्हणतात बीआरटीची जबाबदारी निश्चित करावी लागेल. मग सगळ्या प्रकल्पांची देखील जबाबदारी निश्चित केली पाहिजे” असे सावळे म्हणाल्या.
4जी स्मार्टफोन अधिक परवडणा-या दरांत देण्यासाठी व्होडाफोनची सॅमसंगशी भागीदारी
मुंबई – भारतातील एक आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने आघाडीची मोबाइल फोन हँडसेट निर्मिती करणारी कंपनी सॅमसंगशी व्यूहरचनात्मक भागीदारी करत असल्याचे आज जाहीर केले. यामुळे सॅमसंगचे काही निवडक 4जी स्मार्टफोन आकर्षक रोख परतावा योजनेसह अधिक परवडणा-या दरांत उपलब्ध होतील. व्होडाफोनच्या सध्याच्या आणि नवीन ग्राहकांना गॅलेक्सी जे2 प्रो, गॅलेक्सी जे7 एनएक्सटी किंवा गॅलेक्सी जे7 मॅक्स् या लोकप्रिय सॅमसंग 4जी स्मार्टफोनपैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करून 1500 रुपयांचा रोख परतावा मिळवता येईल.
या विशेष योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रीपेड ग्राहकांना 24 महिन्यांसाठी दरमहा 198 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यामध्ये त्यांना अमर्याद कॉल आणि 1 जीबी डेटा प्रतिदिन (ग्राहकांना दरमहा एकूण 198 रुपयांचा रिचार्ज होईल, अशा कोणत्याही रिचार्ज योजना वापरता येतील) असे लाभ मिळतील. पोस्टपेड ग्राहकांना या योजनेसाठी व्होडाफोनची कोणतीही आकर्षक रेड योजना घेता येईल. योजनेचे पहिले 12 महिने संपल्यावर ग्राहकांना 600 रुपयांचा रोख परतावा मिळेल, तर पुढच्या आणखी 12 महिन्यांनंतर 900 रुपये रोख परतावा मिळेल. अशा प्रकारे एकूण 1500 रुपयांचा रोख परतावा मिळेल. हा परतावा ग्राहकांच्या एम-पेसा वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल.
व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘सॅमसंगच्या सर्वांत लोकप्रिय 4जी स्मार्टफोनवर व्होडाफोन सुपरनेट 4जी डेटा सक्षम नेटवर्कचा वापर करण्याकरता आम्ही आमच्या ग्राहकांना उद्युक्त करत आहोत. या भागीदारीद्वारे आम्ही विविध किमतीतील विविध 4जी स्मार्टफोनवर रोख परतावा योजना देत आहोत. डेटाचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना 4जी मिळावे, या आमच्या धोरणाचा हा भाग आहे. आम्ही सॅमसंगबरोबर देत असलेली योजना ग्राहकांना अधिक समृद्ध व्हॉइस आणि डेटा अनुभवासाठी स्मार्टफोन खरेदी करण्यास प्रोत्साहन देईल.’
सॅमसंग इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी रणजीवजित सिंग म्हणाले, ‘आम्हाला व्होडाफोनबरोबर भागीदारी करण्यास अतिशय आनंद होत असून, आमच्या लोकप्रिय गॅलेक्सी जे मालिकेतील स्मार्टफोनची व्होडाफोनच्या सेवेशी भागीदारी करून, शिवाय ते परवडणा-या किमतीत देऊन ग्राहकांना अधिक समृद्ध अनुभव देण्याची संधी यामुळे आम्हाला मिळाली आहे. सध्या भारतात विकला जाणारा दर तिसरा स्मार्टफोन हा गॅलेक्सी जे मालिकेतील आहे. हे स्मार्टफोन सॅमसंगच्या मेक फॉर इंडिया उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले आणि अनेक ग्राहककेंद्री सुविधा असलेले आहेत.’
मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त आझम कॅम्पसमध्ये काव्य संमेलन
पुणे :’महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘मराठी अकादमी’तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
आझम कॅम्पस ग्रीन ऑडिटोरियम येथे हे काव्य संमेलन झाले. गझलकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी उद्घाटन केले आणि गझल सादर केल्या.
उद्घाटन प्रसंगी वारुंजीकर म्हणाले, ‘आझम कॅम्पसच्या पुढाकाराने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. मराठी लेखनात काव्य हा लोकप्रिय काव्यप्रकार आहे. कविता लिहिणे हा आनंददायक प्रकार असतो. भावनांना शब्दात आपण दाद देतो तेव्हा कविता जन्माला येते. मिर्झा गालीब यांची शायरी लिहिण्यावरील निष्ठेने समाजात लोकप्रिय झाली. मराठीतून स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘अँग्लो उर्दू बाईज हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज’ च्या प्राचार्य परवीन शेख यांनी केले. मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख यांनी संयोजन केले.
परीक्षण नूतन शेटे, झुबेर पटेल यांनी केले. इम्रान झारेगीर यांनी आभार मानले. केतकी भोसले उपस्थित होत्या. २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
शनिवार वाड्यावर भाषण -जिग्नेश मेवाणी, उमर खलिद यांच्या विरोधात पुण्यात तर कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे एकबोटे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल
पुणे :मुंबईत विर्लेपार्ले मिठीबाई कॉलेज येथील भाईदास सभागृहात आयोजित राष्ट्रीय छात्र संम्मेलन बंद पाडून पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचे विरोधक म्हणून ख्याती पावलेले गुजरात चे आमदार जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांना येथे भाषणबंदी ,प्रवेश बंदी केली तर दुसरीकडे गेल्या ३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेत केलेल्या भाषणातून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुजरातचे वडगाम येथील आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेच्या उमर खालिद याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातल्या एका तरुणाने त्यांच्या विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 31 डिसेंबर रोजी शनिवारवाड्यासमोर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हे दोघे सहभागी झाले होते. त्यावेळी दोघांनी चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप करुन अक्षय बिक्कड या मुळच्या लातूर येथील तरुणाने डेक्कन पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणांचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या १५३ अ, ५०५ व ११७ या कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
छात्रभारती आयोजित राष्ट्रीय छात्र सम्मेलन आज मुंबईत होणार होते ,कोरेगाव भीमा प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर या संमेलनात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होते. दोघांनी काल शांततेचं आवाहन केले होते. आज 4 जानेवारीला छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र सम्मेलनाला दोघेही उपस्थित राहणार होते.
कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे एकबोटे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल
दरम्यान कोरेगाव-भीमा येथील घटना व दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे व समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, अनिल दवे यांच्यासह अज्ञात वीस ते पंचवीस जणांविरुद्ध शहरातील छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. तीन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावसिंगपुरा येथील जयश्री सुदाम इंगळे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे.
त्यानुसार छावणी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. छावणी पोलीसांनी हे प्रकरण शिक्रापूर (जि. पुणे) पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
बापू तेरे देशमे ..मानवता क्यू है अंधेरेमे ?( व्हिडीओ रिपोर्ट )
पुणे-शहर कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आज कोरेगाव भीमा च्या घटनेवर जाती पातीचा अंधकार दूर व्हावा आणि मानवतेचा प्रसार व्हावा यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर प्रार्थना केली .शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , मोहन जोशी,तसेच उल्हास पवार ,म.वि अकोलकर ,आ. शरद रणपिसे,अभय छाजेड,लता राजगुरू ,सुजाता शेट्टी,चांदबी नदाफ ,अरविंद शिंदे,जॉन पॉल,अजित दरेकर ,मनीष आनंद ,सोनाली मारणे, रशीद शेख ,निलेश बोराटे ,राजू शेख,रवींद्र म्हसकर,रमेश अय्यर ,रवी पाटोळे,छाया जाधव ,वैशाली मराठे,संगीता तिवारी ,चेतन आगरवाल,संदीप मोकाटे ,प्रदीप परदेशी,जयकुमार ठोंबरे आदी असंख्य मान्यवर कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते .
जातीय शक्ती आपलं सत्तेतील स्थान बळकट करण्यासाठी गरीब समाजात दुही पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते हाणून पाडण्यासाठी ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी नैतिक अधिष्ठानावर भारतीय राजकारण केलं त्यांच्या पायापाशी बसून लोकशाही ,मानवता आणि समतेचं तसेच शांततेचं आवाहन आम्ही करत आहोत असे यावेळी उल्हास पवार यांनी सांगितले तर कोरेगाव भीमा ची घटना निषेधार्ह असून या मागील सूत्रधार आणि कारस्थानी या सर्वांवर तातडीने कारवाई व्हायला हवी ,आणि समाजात शांततेचा, प्रेमाचा एकोप्याचा संदेश जायला हवा असे यावेली अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले…पहा हा एक व्हिडीओ रिपोर्ट


