Home Blog Page 3204

सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत

0
निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या, रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत,दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित “यंटम” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. सोशल मीडियात ट्रेलर पोस्ट केल्यानंतर तो अवघ्या काही  वेळातच ट्रेंडही झाला. या चित्रपटातून अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
 
आजवर अनेक मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपट मी केले. लांबी वाढलेल्या भूमिका देखील असंख्य केल्या. उंची वाढविणारी भूमिका साकारता यावी याच्या प्रतीक्षेत मी होतो आणि ही संधी मला “यंटम” चित्रपटातून मिळाली असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
 
या चित्रपटात वैभव कदम आणि अपूर्वा शेळगावकर  ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. तर अभिनेते सयाजी शिंदे सनई वादकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सनई बोलत नाही, ती थेट काळजाला भिडते’ असे प्रभावी संवाद ही या चित्रपटाची ताकद आहे. ट्रेलरवरून या चित्रपटात एक हळवी मनाला भिडणारी प्रेमकथा पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियात या ट्रेलरला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे.
 
समीरसह मेहुल अघजा यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. गीतकार मंगेश कांगणे यांचे गीतलेखन असून चिनार-महेश यांचे  उत्तम संगीत लाभले आहे. हर्षवर्धन वावरे, योगेश रणमले, आनंदी जोशी, छगन चौगुले यांच्या सुमधुर आवाजात या चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. 
येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

खडकमाळ आळी तहसीलदार कचेरी समोर वकिलांचे आंदोलन

0
  पुणे- पुणे येथील तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या वतीने तहसीलदार कार्यालयात कामं करणार्या वकीलांना अचानक पणे वकीलांचे टेबल खुर्च्या बाहेर काढून तेथे बसण्याची मनाई केल्यानंतर पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड मिलींद द पवार यांच्या नेतृत्वाखाली खाली शुक्रवार पेठ येथील खडकमाळ अळी येथील तहसीलदार कचेरीच्या प्रवेश द्वारापाशी घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
           तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन  ही पुणे बार असोसिएशनशी सलग्न बार असोसिएशन आहे. तहसीलदार कचेरीतील एका कर्मचार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार नुकतीच कारवाई होऊन संबंधीत कर्मचारी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडला होता व त्याला अटक झाली होती. त्या प्रकरणानंतर चिडून जाऊन जाणिव पुर्वक तहसीलदार कचेरीत नियमित पणे काम करणाऱ्या वकीलांना तहसीलदार कचेरीतुन बळजबरीने बाहेर काढण्यात आले.
              तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या वतीने तहसीलदार हवेली पुणे यांना निवेदन देण्यात आले व आमच्या जागा आम्हाला पुर्ववत द्याव्यात व तहसीलदार कचेरीत कायदेशीर काम व वकीली व्यवसाय करायला अडथळा आणू नये तसे केल्यास भविष्यात तिव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या वतीने देण्यात आला.
              झालेल्या आंदोलनात पुणे बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अॅड मिलींद द पवार, तहसीलदार पुणे शहर व हवेली कार्यालय अॅडव्होकटस् बार असोसिएशन च्या अध्यक्षा अॅड राजश्री रा.अडसुळ/जाधव, उपाध्यक्ष अॅड मच्छींद्र नागपूरे, सचिव महेश सकट, सह-सचीव अॅड अनिता ठाकुर, अॅड लक्ष्मण कांंबळे, अॅड मुरलीधर तावरे, अॅड चक्रधर काळे, अॅड सुभाष ओसवाल,अॅड शमा शिंदे,अॅड अनिल पाटील, पुणे बार असोसिएशन चे माजी सचिव अॅड सचीन हिंगणेकर आदी उपस्थित होते.

जॅक्वार ग्रुप तर्फे डिझायनिंगची कौशल्ये विकसित करण्यासाठी डिझाईन कॉनफॅब चे आयोजन.

0

जॅक्वार ग्रुप या भारतातील आघाडीच्या संपूर्ण बाथरूम आणि लायटिंग उपाय प्रदाता कंपनी तर्फे डिझाईन कॉनफॅब या अनोख्या मंचाची सुरूवात केली असून या मंचा च्या माध्यमातून आर्किटेक्ट्स आणि विकासक एकत्र येऊन डिझायनिंग ची कौशल्ये आणि ज्ञान एकमेकां समोर प्रदर्शित करतील .

पहिल्या जॅक्वार ग्रुप डिझाईन कॉनफॅब चा विषय ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॅार स्मार्ट, हा परफॉर्मन्स इंडियन बिल्डिंग्ज’ हा आहे. या विभागातील सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम प्रक्रियांचा गौरव करण्यासाठी जॅक्वार कडून बाजारपेठेतील काही कौशल्यपूर्ण आणि बांधकाम क्षेत्रातील मंडळींना आमंत्रित करून त्यांचे विचार आणि संकल्पना, प्रक्रिया आणि दृष्टिकोन यांचे आदानप्रदान करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जॅक्वार कडून नेट झिरो बिल्डिंग चे सादरीकरण होय.  हे सादरीकरण जीएनए (आर्किटेक्ट गायत्री शेट्टी आणि नमित वर्मा) चे सुधीर सादर करणार आहेत. त्याचबरोबर जकुआर ग्रुप तर्फे जकुआर ग्रुपच्या मुख्यालयाला युनायटेड स्टेट्स ग्रीन बिल्डिंग काऊन्सिल (यूएसजीबीसी) कडून लीड प्लॅटिनम सर्टिफाईड रेटिंग मिळाल्याचीही घोषणा करण्यात येणार आहे. हे प्रमाणन सर्वोत्कृष्ट असे ईमारतीला मिळणारे ग्रीन प्रमाणन आहे.  यूएसजीबीसी ही दैदिप्यमान आणि दीर्घकालीन भविष्यासाठी आणि उर्जा बचतीसाठी काम करणारी संस्था आहे. परिणामी हे प्रमाणन मिळवणारी भारतातील पहिली अशी ही कार्यालयीन ईमारत ठरली आहे.

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत इन्फोसिस, अॅमडॉक्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाने अॅटॉस्‌ संघाचा तर अॅमडॉक्स संघाने सिमेंस संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आशय पालकरच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर इन्फोसिस संघाने अॅटॉस्‌ संघाचा 7 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना आशय पालकर व थॉमसन स्टेव यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अॅटॉस्‌ संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 129 धावांत रोखला. 129 धावांचे लक्ष संदिप सांघाईच्या जलद 41 धावांसह इन्फोसिस संघाने केवळ 18.2 षटकात 3 बाद 130 धावा करून सहज पुर्ण केले. आशय पालकर 22 धावांत 4 गडी बाद करणारा आशय पालकर सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत आवेश सय्यदच्या जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अॅमडॉक्स संघाने सिमेंस संघाचा 34 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना  अॅमडॉक्स संघाने 20 षटकात सर्वबाद 192 धावा केल्या. यात रोहित लालवानीने 30 धावा करून आवेशला सुरेख साथ दिली. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संदिप कानिटकरच्या 40 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व  ह्रषद खटावकर, भावनीश कोहली व मितेश मयेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे सिमेंस संघ 18.5 षटकात सर्वबाद 158 धावांत गारद झाला. आवेश सय्यद सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:

अॅटॉस्‌- 20 षटकात सर्वबाद 129 धावा(विघ्नेश मोहन 33, महेश भोसले 31, आशय पालकर 4-22, थॉमसन स्टेव 3-27) पराभूत वि इन्फोसिस- 18.2 षटकात 3 बाद 130 धावा(प्रभज्योत सिंग 23, संदिप सांघाई 41(24), आशय पालकर 23, साईनाथ शिंदे नाबाद 23, विघ्नेश मोहन 2-27) सामनावीर- आशय पालकर

इन्फोसिस संघाने 7 गडी राखून सामना जिंकला. 

अॅमडॉक्स- 20 षटकात सर्वबाद 192 धावा(आवेश सय्यद 56(27), रोहित लालवानी 30, अभिषेक पाटणकर 23, राजेश धालपे 3-30, संदिप कानिटकर 2-24, संजय पाटील 2-19) वि.वि सिमेंस- 18.5 षटकात सर्वबाद 158 धावा(हिमांशू अगरवाल 34, संदिप कानिटकर 40(25), राजेश धालपे 23, ह्रषद खटावकर 3-16, भावनीश कोहली 3-22, मितेश मयेकर 2-51) सामनावीर- आवेश सय्यद

अॅमडॉक्स संघाने 34 धावांनी सामना जिंकला. 

महालक्ष्मी मंदिरात ब्रम्होत्सव

0

पुणे-सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या ब्रह्मोत्सवास सोमवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला .महालक्ष्मी मंदिराच्या ३४ व्य वर्धापनदिनानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग तर्फे दिनांक २२ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत ३ दिवस ब्रह्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. काल सोमवारी सायंकाळी ७ वाजता राजस्थान मधील डिडवाना येथील झालरीया पिठाचे महंत घनश्यामाचार्यजी महाराज व स्वामीजी श्री भुदेवाचार्यजी महाराज यांच्या उपस्थित मंदिराचे प्रमुख विशवस्त श्री राजकुमारजी अगरवाल व त्यांच्या पत्नी सौ . अमिता अगरवाल यांच्या हस्ते कळस स्थापना आणि गरुड ध्वजाची स्थापना करण्यात आली . त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी , सरस्वतीदेवी आणि कालीमातेची पवित्र मंत्रोपचाराने धार्मिक पूजा उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली . यानंतर भाविकांनी अभिषेक केले . याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त ऍड प्रताप परदेशी , हेमंत अर्नाळकर , सौ तृप्ती अगरवाल , श्री रमेश पाटोडीया आदी उपस्थित होते.

अलंकार पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असुन पूल मजबूत असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिल्याने डांबरीकरण – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

0
पुणे-एरंडवणा येथील अलंकार पोलिस स्टेशन ते गुळवणी महाराज पथ या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे आज भूमीपूजन करण्यात आले.अलंकार पोलिस स्टेशन च्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक रेखा साळुंखे,पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे,राजबाग तरुण मंडळ चे विठ्ठलराव बलकवडे,संदीप मराठे,शांताराम भरम,विजय केंडे,मंदार महाडिक,मोहन शिगवण,सतीश दिघे,देशप्रेमी मित्र मंडळ चे अध्यक्ष मंदार बलकवडे,समीर बलकवडे,रुपेश अटक,ॲड प्राची बगाटे,प्रमिलाताई फाले,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.नगरसेवक दीपक पोटे व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून या बहुप्रतीक्षित रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
” नागरिकांना अपेक्षित असणारे काम करण्यावर आमचा भर असुन नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश आमच्या बजेट मधे आम्ही केला असुन यापुढील काळात ही नागरिकांनी प्रभागातील विकास कामे सुचवावित /आम्ही ती कामे पूर्ण करु असे नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले.
साधारण ५० वर्षापूर्वी अलंकार सोसायटीने येथील नाल्यावर पूल बांधला होता,सदर पूल काळाच्या ओघात कमकुवत तर झाला नाही न अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मी पुणे मनपा प्रशासनास पत्र देउन या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती केली होती.प्रशासनाने हा पूल अद्याप उत्तम स्थितीत असुन त्यास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे  असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.प्रशासनाच्या निर्वाळ्यानंतर मी व सहकारी नगरसेवक दीपक पोटे यांनी येथे बजेट मंजुर करुन घेतले व त्यानुसार सदर रस्त्याचे डांबरीकरण होत आहे असे ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी या रस्त्याचे काम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व पुलाचे ऑडिट केल्याबद्दल ही आभार व्यक्त करुन आता पोलिस व नागरिक निर्धास्तपणे या पुलाचा व नवीन रस्त्याचा वापर करु शकतील असे सांगितले.
यावेळी नगरसेवक जयंत भावे व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी महेशराव पोटे,कुलदीप सावळेकर,माणिकताई दीक्षित,संगीता आदवडे,सुलभा जगताप,सुवर्णा काकडे,हनुमान पवार,राजेंद्र येडे,बाळासाहेब धनवे,चंद्रकांत पवार,प्रतीक ढावरे,सारंगशेठ राडकर,सुरेश जपे,सुरेश ढोबे,उपस्थित होते.
राज तांबोळी यांनी सूत्र संचालन केले.तर मंदार बलकवडे,मोहन मामा शिगवण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

पत्रकारांनी सायबर सुरक्षेबाबत अधिकाधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी- वरिष्ठ पोलीस निरिक्षक राधिका फडके

0

सायबर जनजागृती विषयक कार्यशाळा संपन्न
पुणे – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पोलीस विभागाबरोबरच पत्रकारांनीही
सायबर सुरक्षेबाबत अधिकाधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास सायबर विषयक फसवणूक निश्चित
टाळता येईल, असे प्रतिपादन सायबर गुन्हे विभागाच्या प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी
केले.
जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या विद्यमाने रानडे इस्न्स्टिटयूट आवारात सायबर जनजागृती विषयक
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्रीमती फडके बोलत होत्या. यावेळी सायबर गुन्हे
विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व
वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय
उपसंचालक मोहन राठोड तसेच जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
सायबर गुन्हे घडल्यानंतर पोलिस त्याचा तपास करतात तथापी, असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी
नागरिकांमध्ये जगजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. जनजागृती हीच सायबर गुन्ह्यांना रोखणारी
गुरुकिल्ली आहे, असे श्रीमती फडके यांनी सांगितले.
श्रीमती शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, संगणक किंवा
इंटरनेटशी संबंधित घडणारा गुन्हा म्हणजे सायबर क्राईम. मोबाईल किंवा बँक खाते हॅक करणे, क्रेडीट कार्ड
किंवा ऑनलाईन बँकिंगचा गैरवापर करणे, फोन कॉल्स करुन फसवणूक होणे असे सायबर गुन्हे घडतात.
त्यामुळे एटीएम वापरताना किंवा पैसे काढताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश करु देऊ नका.
तसेच ऑनलाईन बँकींग करतानाही काळजी घ्यावी. सोशल मिडीयावर वैयक्तिक माहिती उघड करु नका.
सोशल नेटवर्किंग साईट वर होणारी फसवणूक टाळण्यासाठीचे खबरदारीचे उपाय, नौकरी मिळवून देण्याच्या

आमिषाने होणारी फसवणूक या बाबत त्यांनी सोदाहरण माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे
देखील दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन व आभार
माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मानले. पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार सरिता वेताळ,
पुणे रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस हवालदार सुनील बनसोडे, मुळास्वामी, प्रा संदिप नरडेले, प्रा योगेश
बोराटे यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी लाटेत सेनेचे १८ खासदार ; एकटे लढल्यास सेनेचे केवळ 4 ते 5 खासदार… (खा. संजय काकडे)

0

खासदार संजय काकडे यांची शिवसेनेच्या एकला चलोच्या निर्णयावर स्पष्ट भूमिका

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही अभ्यास न करता एकला चलोचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या खाषदार व आमदारांशी जरी ते बोलले तरी हे समजेल. पंतप्रधान मोदींच्या लाटेमुळे 2014 च्या निवडणुकीत कधी नव्हे ते शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. आता एकटे लढल्यावर त्यांचे केवळ 4 ते 5 खासदारच निवडून येतील, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेच्या एकला चलोच्या निर्णयावर व्यक्त केले.

शिवसेनेच्या स्थापनेपासून आणि बाळासाहेब हयातीत असेपर्यंत 1985 पासून शिवसेनेचे सर्वाधिक 15 खासदार निवडून आले. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या लाटेत 2014 च्या निवडणुकीत त्यांचे 18 खासदार आले. याची जाणीव शिवसेनेला आहे. त्याचा विसर त्यांना पडू नये.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडून आलेल्या मतदार संघात भाजपाचे 42 आमदार आहेत तर, शिवसेनेचे 30 आमदार आहेत. तसेच, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या सर्व निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले व महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला. नाशिक व पिंपरी चिंचवड येथे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी तेथे भाजपची एकहाती सत्ता आहे, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.

मुंबईत भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी तीन खासदार अाहेत. तर, महापालिकेत भाजपचे 26 वरून 82 नगरसेवक झालेत. महापालिकेत शिवसेना सत्तेत असली तरी 36 पैकी 18 आमदार भाजपचे आहेत. शिवसेनेचे केवळ 13 आमदार आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी घाई गडबडीत निर्णय घेतल्याचे वाटते. खासदार व आमदारांशी त्यांनी वैयक्तिक चर्चा केल्यास उद्धव ठाकरे यांना त्यांचा निर्णय चुकल्याची जाणीव होईल, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.

शिवसेनेने एकला चलोची भूमिका घेतलीच आहे. तर, भाजपही स्वबळावर निवडणूक लढेल व राज्यात 48 पैकी 30 खासदार भाजपचे सहज येतील, असा विश्वास व्यक्त करतानाच खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेला मात्र त्याची जबर किंमत मोजावी लागेल. त्यांचे केवळ 4 ते 5 खासदार निवडून येतील, असे सांगितले. उद्धव दूरदृष्टी ठेवणारे नेते त्यामुळे पूनर्विचार निश्चित करतील, अशी आशाही खासदार काकडे यांनी यावेळी व्यक्त केली.

विधानसभा वेगळी लढल्याने भाजपचे 123 आमदार निवडून आलेत. त्यानंतर जलयुक्त शिवार ते कर्जमाफी पर्यंतचे अनेक निर्णय झालेत. पंतप्रधान मोदींची लाट कायम आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम चांगले आहे. यामुळे येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 175 आमदार निवडून येतील, असा विश्वासही खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.

खासदार काकडे म्हणाले की, भाजपची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. 2014 मध्ये पराभूत झालेल्या 37 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर दिल्यावर त्यातील किमान 25 ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येईल, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

‘स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅकॅडमी’ चे ‘आर्ट वॉक अ‍ॅण्ड ग्राफिटी वॉल’ प्रदर्शन

0
महेंद्र थोपटे आणि विपुल खटावकर यांच्या शिल्पकलेचे प्रात्यक्षिक 
 
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅकॅडमी च्या वतीने वार्षिक ‘आर्ट वॉक अ‍ॅण्ड ग्राफिटी वॉल 2017-18’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आणि भिंती चित्रांचे (ग्राफिटी वॉल) उद्घाटन दिनांक 26 आणि 27 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. टी.एस.भाळ (माजी सहाय्यक पोलीस महासंचालक) यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता, हाय टेक हॉल येथे होईल, अशी माहिती ‘स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन यांनी दिली. 
 
यंदाचे प्रदर्शनाचे 10 वे वर्ष आहे. 
या प्रदर्शनातंर्गत ग्राफिटी वॉल चे (भिंती चित्र) उदघाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे आणि विपुल खटावकर यांच्या शिल्पकलेचे (मातीकाम) प्रात्यक्षिक होणार आहे. तसेच अनेक चित्रकारांच्या गाजलेल्या चित्रांच्या प्रतिकृती आणि मांडणी  विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यातील काही चांगली निवडक चित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
 
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी.ए.इनामदार (अध्यक्ष, एम.सी.ई. सोसायटी) असणार आहे. 
कार्यक्रमाला आबेदा इनामदार (उपाध्यक्ष,एम.सी.ई. सोसायटी), लतिफ मगदूम (सचिव,एम.सी.ई. सोसायटी), प्रा. इरफान शेख (सहसचिव,एम.सी.ई. सोसायटी), महाविद्यालयाचे प्राचार्य भारत लोंढे (स्कूल ऑफ आर्ट) उपस्थित राहणार आहेत.

फ्लेक्सबाजीवर खर्चा ऐवजी वाढदिवशी करा गरजूंना सहाय्य …

0
पुणे- राजकीय कार्यकर्त्यांनी वाढ दिवसानिमित्त फ्लेक्सबाजीवर खर्च करून शहर विद्रुपीकरणाला हात भार लावण्याऐवजी त्याच खर्चातून समाजातील पिडीत गरजू असहाय्य लोकांना मदत करावी असा संदेश आज शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिला .
आज आपल्या वाढ दिवसानिमित्त कोणीही कुठेही फ्लेक्स लावून शहर विद्रूप करू नये त्या ऐवजी त्याच खर्चाचे जमेल तेवढे धान्य ,पुस्तके ,वह्या असे साहित्य देवून शुभेच्छ्या द्या…असे विनंतीवजा आवाहन बागवे यांनी सोशल मीडियातून आपल्या कार्यकर्त्यांना चाहत्यांना केले होते . त्याचा परिणाम म्हणून असंख्य पुस्तके ,आणि धान्य व आदी किराणामाल जमा झाला . हे सारे साहित्य आज बागवे यांनी वृद्धाश्रम ,आणि निराधार मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थाकडे पोहोच केले .

पतंगप्रेमींनी लुटला आनंद

0

पुणे  :- गोयल गंगा फौंडेशन कडून बावधन मधील ‘गंगा लेजंड’ येथे  पतांगोत्सवाचे आयोजन करण्यात आले.असंख्य पतंग प्रेमींनी पतंगबाजीचा आनंद लुटला.  शहरीकरण व वेगवान जीवनमानामुळे बरेच पारंपरिक सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. सकाळी १0 वाजता महोत्सवाला सुरुवात झाली खरी पण, पतंग उडविण्याचा आनंद घेण्यासाठी आतूर झालेले पतंगप्रेमी वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी हजर होते. यात गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यासह लहान मुले, महिला, वयोवृद्धांनीही पतंगोत्सवाचा आनंद लुटला.

कुटुंबासमवेत बहुरंगी पतंग उडविण्यात सर्वजण दंग झालेले पहायला मिळाले. तसेच यावेळी ‘गंगा लेजंड’ येथे दीड वर्षापासून ते पाच वर्षापर्यंतच्या पूर्व प्राथमिक शाळा ‘गंगा अथ’ ची सुरुवात करण्यात आली.

गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले कि,आज एकीकडे समाजात जात,पात,वर्ण अशा मतभेदातुन नकारात्मक संदेश जात आहे. असे असताना आपल्याला लाभलेली सणांची संस्कृती ही यावर मात करण्याची मोठी ताकद आहे. आज या सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण माणुसकीच्या भावनेने एकत्र येतो. यातूनच मानवतेचा सकारात्मक संदेश जातो.  आनंदासाठी, एकोप्यासाठी असे सण-उत्सव एकत्र साजरा करण्यावर आमचा भर असतो असेही त्यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षांत सर्वांना हक्काची घरे : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे :  प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत येत्या पाच वर्षांत सर्वांना स्वस्तातील घरे उपलब्ध करून दिली जातील. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिली.   ‘पीएमआरडीए’ने  औंध  येथील भीमसेन जोशी सभागृहात कार्यशाळा  आयोजित केली होती. त्याचे  उदघाटन बापट यांच्या  हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे,आयुक्त किरण गिते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, हुडकोच्या वैजयंती महाबळ, क्रेडाईचे नॅशनलचे प्रेसिडेंट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, मराठी बांधकाम व्यावसाईक असोसिएशनचे गजेंद्र पवार  यांच्यासह अनेक विकसक, बांधकाम व्यावसायिक,ग्राहक आणि मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

बापट म्हणाले,  केंद्र आणि राज्य सरकारने  ठेवलेले उद्दिष्ट 2022 पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यातून  पुणे जिल्ह्याचे जीवनमान उंचवण्याचा  आमचा प्रयत्न राहील. नोकरी, व्यवसाय व अन्य कारणास्तव लोक शहराकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कुटुंबाचे विकेंद्रीकरण होत आहे. शहरात आल्यावर प्रारंभी मिळेल त्या जागेत लोक राहतात. काही कालावधीनंतर ते आपले जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. यावेळी शहरात स्वत:चे घर असावी .अशी त्यांची नैसर्गिक अपेक्षा असते. पण शहरातील  जागेंच्या दरामुळे सर्वसामान्यांना शहरात घर घेणे शक्य होत नाही. याचाच विचार करून केंद्र सरकार  प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत  सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देत आहे.  महाराष्ट्रात २०२२ पर्यंत १९.४० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यात २ लाख १९ हजार घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.  रस्ते, पाणी यांसारख्या भौतिक गरजा ही पुरवण्याची आमची जबाबदारी आहे.  ‘पीएमआरडीए’ आणि ‘म्हाडा’ च्या मदतीने पुणे जिल्याचे हे उद्दिष्ट आम्ही नक्की पूर्ण करू.  किरण गित्ते यांनी सर्वसामान्यांना स्वस्तात घरे देण्यासाठी पीएमआरडीए प्रयत्नशील असून प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल माहिती देण्यासाठी स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन करत असल्याचे सांगितले. तसेच  या योजनेच्या सफलतेसाठी खासगी बांधकाम व्यावासायिकांची मदत घेतली जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

श्रावण हर्डीकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची घोडदौड वेगाने सुरु व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने ही सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती दिली.

सतीश मगर यांनी केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या या योजना मुळे बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले असून यामुळे या व्यवसायाला आलेली मरगळ झटकण्यास मदत होईल. सर्व सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी क्रेडाई कडूनही लागेल ती मदत देण्यात येईल असे सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत केंद्र सरकारचे नियम, त्या संदर्भातील अध्यादेश याबाबत माहिती देण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घेवून लोकांच्या शंकांचे निरसन करावे. पीएमआरडीए कडे नोंद असलेल्या व्यावसायिकांनी याबाबतची माहिती ई- मेलद्वारे द्यावी अशी सूचना यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.

महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी सतीश चव्हाण यांची नियुक्ती

0

मुंबईमहावितरणच्या संचालक (वाणिज्य) या पदावर श्री. सतीश चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून महावितरण मुख्यालयातील प्रकाशगड मुंबई येथील सांघिक कार्यालयात ते यापूर्वी कार्यकारी संचालक (वाणिज्य) म्हणून कार्यरत होते.

        मुळचे नांदेड येथील रहिवाशी असलेले श्री सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1987 मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी सुमारे 14 वर्षे भारतासह दक्षिण कोरिया बांगला देशातील विविध स्टील उद्योगात महत्वपूर्ण पदावर काम केले. तसेच त्यांनी महापारेषण कंपनीतील 400 किव्हो अतिउच्चदाब बांधकाम विभागात उपकेंद्र वाहिनी उभारणीच्या कामाची जबाबदारी सुमारे 7 वर्षे सांभाळली.

        2009 साली त्यांची महावितरणमध्ये सरळसेवा भरतीने अधीक्षक अभियंता पदावर निवड झाली. या पदावर त्यांनी 5 वर्षे काम केले. त्यापैकी व्यवस्थापकीय संचालक यांचे विशेष कार्यअधिकारी म्हणून सुमारे 2 वर्षे उत्कृष्टरित्या काम केले. याशिवाय ते भार व्यवस्थापन, मुंबई पुणे चांचणी विभागातही कार्यरत होते. त्यानंतर सतिश चव्हाण यांची पदोन्नतीद्वारे मुख्य अभियंतापदी म्हणून निवड झाली. औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्राहकसेवा सुधारण्यात भरीव कामगिरी केली आहे.

महावितरणमधील महत्वाच्या असलेल्या कार्यकारी संचालक (वाणिज्य) या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन श्री सतिश चव्हाण यांची संचालक (वाणिज्य) या महत्वाच्या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.

‘आपला माणूस” ची टीम पुणेकरांच्या भेटीला !

0

पुणे : वायाकॉम18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की ! हा चित्रपट एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्यालाजोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. आपला मानूस चित्रपटाच्या टीजरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहे.

 

आपल्या मराठी चित्रपटाचा पायंडा नेहमी नातेसंबंधांचा आणि परस्पर एकमेकांसोबतची ताकद काय असते याबद्दलचा असतो. या चित्रपटामध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण दांपत्याची कथा मांडली असून, या भूमिका साकारल्या आहेत, अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी. तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे. वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो. ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबा विषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात.

नाना पाटेकर म्हणाले,“नटसम्राट नंतर, मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पहात होतो, एखादे असे पात्र जे ऐकल्यानंतर मी सोडणार नाही आणि मारुती नागरगोजे मध्ये मला ते सापडले. ते एक क्लिष्ट पात्र आहे, मराठी सिनेमामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याचे हावभाव आणि त्याच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे.”

 

सतीश राजवाडे म्हणाले,  हा एकच धाटणीवर आधारित सिनेमा नाही, स्टोरी टेलिंग चा वेगळा वापर करून हा सिनेमा लिहिला आहे यामुळे दर 15 मिनिटांनी वेगळा जॉनर यामध्ये तुम्हाला दिसेल. नाना पाटेकर यांच्या सोबत  काम करताना अनुभव सुंदर होता, प्रत्येक बाबीसाठी नाना तयार असतात प्रत्येक वेळी त्यांचा वेगळा अप्रोच असतो,  तिघेही कलाकार परफॉमर आहेत, परस्पर नातेसंबधावर हा सिनेमा बोलतो.

इरावती हर्षे म्हणाल्या,  भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही सिनेमात बघा, मी स्वतः ला भाग्यशाली समजते नाना पाटेकर यांच्या सोबत काम करता आले,  नानांचे काम प्रेरणा देणारे आहे, त्यांच्याकडून शिकायला मिळालं. नाटकावर आधारित असला तरी हा सिनेमा त्या नाटकापेक्षा वेगळा अनुभव प्रेक्षकांना देणारा आहे.

या सहकार्याबद्दल बोलताना व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स मराठी आणि कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले, “गेल्या पाच वर्षात मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आपल्या नावीन्यपूर्ण कथाकथनाच्या आणि अनोख्या संकल्पनांनी अन्य कोणापेक्षाही अधिक प्रभाव टाकला आहे. ‘आपला मानूस’ ही 2018 मधील व्हायकॉम 18 ची पहिली निर्मिती असेल. आपल्या प्रभावी अभिनय व संवाद कौशल्यांमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू कलाकार  नाना पाटेकर  आणि जबरदस्त कथानकासह ‘आपला मानूस’संकटांशी झुंजणाऱ्या आणि आयुष्यात काहीतरी अनपेक्षितपणे अशुभ घडण्याच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबाचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न करेल. हा एक विवेकी चित्रपट असून प्रेक्षकांना तो भावेल, याची मला खात्री आहे.”

 

वायाकॉम18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत “आपला मानूस” या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस, वॉटरगेट प्रॉडक्शन्स आणि श्री गजानन चित्र यांनी केली असून सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट ९.०२.२०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

कोरेगाव-भीमा मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ज्यांचे नाव कायम घेण्यात येते आहे त्या मिलिंद एकबोटे यांना  सत्र न्यायालयाने  अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे . कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली होती. या दंगलीच्या मुख्य सूत्रधारांविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असूनही सरकारने त्यांना अटक केलेली नाही. ही बाब लोकशाही व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने घातक आहे. अटकेची मागणी घेऊन विविध 35 संघटनांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत 18 जानेवारी रोजी या घटनेचा निषेध नोंदविला होता.

शनिवार वाड्यावरील एल्गार परिषद ३१ डिसेंबर रोजी पार पडली . त्यानंतर 1 जानेवारी रोजी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये  किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद राज्यात आणि देशात काही ठिकाणी उमटले होते .

कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल 

येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे.