Home Blog Page 3188

4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत रेंजर्स, नाईट्स, समुराईज, रेझरबॅक्स संघांचा विजय

0

पुणे-  ग्रीन बॉक्स् यांच्या तर्फे आयोजीत 4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत रेंजर्स, नाईट्स, समुराईज, रेझरबॅक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

कॅसल रॉयल, एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नील सांघवी(2,7,15मि.)याने केलेल्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स संघाने एबीआयएल ऍजटेक्सचा 5-0असा धुव्वा उडविला. ईश्वर क्षीरसागर याने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर चिताज नाईट्स संघाने डीएसके पलाडियन्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पराभूत संघाकडून निखिल माळीने एक गोल केला. अभयराज शिरोळे अँड असोसिएट्स समुराईज संघाने रावेतकर ग्लॅडिएटर्सचा 2-1 असा पराभव केला.

अन्य लढतीत एस एस वायकिंग्ज गोयल गंगा लॅन्सर्स यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. एमपी ग्रुप मावरिक्स संघाने केएसएच बोल्टसला 1-1असे बरोबरीत रोखले. अक्षय नायरने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर  निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबॅक्स संघाने हिलयोज सेंचूरीयन्सचा 1-0असा सनसनाटी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एमपी ग्रुप मावरिक्स: 1(शॉन अरलँड 2मि.)बरोबरी वि.केएसएच बोल्टस: 1(सुरज कदम 12मि.);

माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स: 5(नील सांघवी 2,7,15मि., मेलविन थॉमस 9,16मि.)वि.वि.एबीआयएल ऍजटेक्स: 0;

आयएमई फायरबर्डस: 3(सौरभ कदम 4मि., हिमांशू नाबंदर 6मि., रेशव तोमर 10मि.)बरोबरी वि.युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 3(रोहित मूलचंदानी 3,18मि., स्वयंगोल कृष्णा पाटील 11मि);

चिताज नाईट्स: 2(ईश्वर क्षीरसागर 5, 14मि.)वि.वि.डीएसके पलाडियन्स: 1(निखिल माळी 6मि.);

अभयराज शिरोळे अँड असोसिएट्स समुराईज: 2(मितान पाटील 5मि., मोहिल टिपणीस 14मि.)वि.वि.रावेतकर ग्लॅडिएटर्स: 1(कौशल वालेचा 19मि.);

एस एस वायकिंग्ज: 0 बरोबरी वि.गोयल गंगा लॅन्सर्स: 0;

रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड बायसन्स: 1(सौरभ शिंदे 7मि.)बरोबरी वि.परांजपे स्पार्टन्स: 1(देवेंद्र करोदी 11मि.);

निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबॅक्स: 1(अक्षय नायर 14मि.)वि.वि.हिलयोज सेंचूरीयन्स: 0.

 

मौलाना आझाद यांना अभिवादन

0
पुणे : 

‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले. माजी शिक्षण मंडळ सदस्य सुनिल खाटपे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुरेश पवार, संजय गायकवाड, संजय गाडे, शंकर शिंदे, निलेश वरे, वैभव जाधव हे उपस्थित होते.

जगातील सर्वांत उंच खडा पर्वत असलेल्या किलिमांजारोच्या शिखरावर १७ भारतीय आरोहकांची यशस्वी चढाई

0

पुणे-एक प्रमुख हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग अँड माउंटेनिअरिंग कंपनी असलेल्या डव्हेंचर पल्सने भारतीयांच्या सर्वांत मोठ्या जथ्याला आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट किलिमांजारोवर नेण्याच्या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करुन नुकताच इतिहास घडवला.

किलिमांजारोसारख्या पर्वतावर यशस्वी चढाई करण्याचे सरासरी प्रमाण एरवी ५० टक्क्यांहून अधिक असत नाही, मात्र डव्हेंचर-पल्सच्या गटातील १८ आरोहकांपैकी १७ जणांनी जगातील सर्वांत उंच खड्या पर्वताचे शिखर यशस्वी गाठून यशस्वितेचे प्रमाण तब्बल ९५ टक्के दाखवून दिले आहे. एक आठवडाभर सुरु असलेली ही मोहीम गेल्या १ फेब्रुवारीला स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊला फत्ते झाली. गटातील केवळ एका गिर्यारोहकाला शिखर चढाई मोहीम सुरु होण्याआधीच परत यावे लागले.

यासंदर्भात बोलताना मोहिमेचे नेते समीर पाथम म्हणाले, ही थक्क करणारी कामगिरी आहे. माऊंट किलिमांजारो पर्वत समुद्र सपाटीपासून १९,३४० फूट उंचावर असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो जगातील सर्वांत उंच खडा पर्वत आहे, जगातील सर्वोच्च सात शिखरांच्या मालिकेत (प्रत्येक खंडांतील सर्वांत उंच शिखरे) त्याचा समावेश आहे आणि ते आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे.

ॲडव्हेंचर-पल्सच्या १८ जणांच्या गिर्यारोहक संघाने गेल्या २५ जानेवारीला ही मोहीम सुरु केली. या संघात समाजाच्या सर्व स्तरांतील नियमित पदभ्रमण करणाऱ्यांचा समावेश होता. यामध्ये चक्क आर्य भाटिया हा दहा वर्षांचा मुलगाही सहभागी होता. (त्याच्यासमवेत त्याची आई पवन सोही होती.) हा मुलगा किलिमांजारो शिखर सर करणारा सर्वांत तरुण भारतीय अमेरिकन ठरला आहे.

संघातील इतर सदस्यात कॅलिफोर्नियातील डब्लिनची रेना, बंगळुरुच्या वासवदत्ता व मेघा, नाशिकची अनुराधा, मुंबईचे ॲशडिन, पूर्वा, सपना व प्रशांत, पुण्यातून पूजा कपूर, प्रतिमा कोरे, इप्सा, कनिष्क पांडे व हितांशु मलानी (दोघेही इयत्ता बारावीचे विद्यार्थी), सलिल करिश्मा व मोहीम नेते समीर पाथम यांचा समावेश होता.

या पदभ्रमणाच्या अनुभवाबाबत विचारले असताना प्रतिमा कोरे म्हणाली, “जगातील सर्वांत उंच खड्या पर्वताच्या व आफ्रिका खंडातील सर्वांत उंच शिखरावर चढाई करण्याची अनुभूती शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मागे वळून पाहाताना ‘मला ते करायची इच्छा होती’, असे म्हणण्यापेक्षा ‘मी ते केलंय यावर विश्वासच बसत नाही’, असे म्हणणे नेहमीच आनंदाचे असते. या मोहिमेपेक्षा मी या प्रवासाची स्मृती नेहमी जपून ठेवेन. माझी बहीण प्रणोती, गिरीभ्रमणप्रेमी पूजा आणि मोहिमेचे नेते समीर पाथम यांना खूप खूप धन्यवाद. समीर यांनी आफ्रिकेतील किलिमांजारोप्रमाणेच रशियातील एल्ब्रुस, नेपाळमधील एव्हरेस्ट अशा शिखरांवर अनेक मोहिमा यशस्वी नेल्या आहेत. अतिउंचावरील चढायांच्या कलेत ॲडव्हेंचर-पल्सने प्रभुत्व मिळवले असून त्यांना प्रत्येक आरोहकातील चैतन्याचा मोहीम यशस्वी करण्यासाठी कसा उपयोग करुन घ्यायचा, हे अचूक ठाऊक आहे.”

रेना हिनेही हर्षोल्हासित प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, होय. मी अखेर ते शिखर गाठले आहे. ॲडव्हेंचर-पल्सच्या संपूर्ण संघाच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ही कामगिरी शक्य झाली नसती. त्यांनी मला नुसती चढाई करण्याची घाई केली नाही, तर आजूबाजूच्या रम्य आणि चित्तथरारक देखाव्यांची अनुभूती घेण्यासाठी हवा असलेला अवकाशही दिला. मी एक-एक पाऊल काळजीपूर्वक टाकत शिखरापर्यंत गेले, पण गरजेच्या क्षणी ॲडव्हेंचर-पल्सचा संघ तेथे सज्ज होता. मला त्या खडकांवरुन वर ओढून घेण्याची गरज होती आणि या संघाने मला मदतीचा हात देत शिखर सर करण्याचा आनंद मिळवून दिला. या संपूर्ण संघाची मी अत्यंत आभारी आहे.”

ॲडव्हेंचर-पल्सने नोव्हेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्रातील सर्वांत तरुण पदभ्रमणपटूला नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पला नेऊन, तसेच काही वर्षांपूर्वी पुण्याच्या बिशप स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांत मोठ्या जथ्यालाही एव्हरेस्ट बेस कॅम्पला नेऊन विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे.

लिमांजारो मोहीम – २०१८ च्या यशामुळे उत्साहित होऊन आता ॲडव्हेंचर-पल्सने येत्या वसंत ऋतूमध्ये माऊंट एव्हरेस्ट मोहिमेचे पुढचे मोठे आव्हान स्वीकारले आहे.

तालीमचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर या रविवारी

0

एक दशकापेक्षा जास्त झी टॉकीज या वाहिनीने सदाबहार आणि नवीन सिनेमे तसेच म्युजिक, कॉमेडी आणि मराठी
नाटकं याद्वारे प्रेक्षकांना खिळवून सुध्दा ठेवलेले आहे. झी टॉकिज एक कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज आहे आणि त्याला
प्रेक्षकांनी नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्राच्या मातीशी निगडित असलेला कुस्ती हा सर्वांचा लाडका आणि प्रसिद्ध खेळ आहे. पण हा खेळ नितीन
मधुकर रोकडेंच्या तालीम या चित्रपटाचा मुख्य विषय आहे आणि त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे 25
फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त झी टॉकिज वर. तालीम ही एका दत्तक कुस्तीपटूची कथा
आहे जो सर्व संकटांवर मात करुन पुन्हा परत उभा राहतो.
तालीम मध्ये कुस्तीपटू भाऊ (अभिजीत श्वेतचंद्र)ची कथा सांगीतलेली आहे जो महाराष्ट्र केसरी हा सर्वोच्च पुरस्कार
मिळविण्याच्या कल्पनेने पछाडलेला आहे आणि त्यासाठी तो आयुष्यभर त्याचे प्रशिक्षण घेत आहे. जेव्हा तो त्याची
शक्ती आणि युक्ती खऱ्या स्पर्धेत आजमावण्यासाठी सज्ज झालेला असतो तेव्हाच तो लक्ष्मीच्या प्रेमात पडतो. लक्ष्मी
(वैशाली दाभाडे) ही एका तमाशा मंडळातील प्रमुख नर्तिका आहे. त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी जयसिंह (प्रशांत मोहिते) या
परिस्थितीचा फायदा घेतो आणि बाजू उलटवितो.
तालीमचे दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे बॉलीवूड मधील प्रख्यात संकलक आहेत आणि कुस्ती सारख्या प्राचीन
खेळाच्या सर्व बाबी त्यांनी अचूकरीत्या मांडल्या आहेत.
महाराष्ट्राचा गौरव आणि प्रमुख खेळ असलेल्या तालीम मध्ये काय होते हे पहा, या रविवारी २५ फेब्रुवारीला….

केवळ एकाच धर्माची विचार प्रणाली संबंध देशावर लादणे अयोग्य-शरद पवार

0

पुणे- धर्म प्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डाबरे यांनी त्याच्या शिष्टमंडळासमवेत शरद पवार यांच्या समवेत त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली . त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले केवळ एकाच धर्माची विचार प्रणाली संबंध देशावर लादणे अयोग्य  असल्याचे सांगितले . कारण धर्म निरपेक्ष लोकशाही राज्यव्यवस्थेची भूमिका सुसंगत नाही . श्री पवार यांच्या राष्ट्रव्यापी निरंतर सेवेचे कौतुक करताना अल्पसंख्यांक आणि विशेषतः ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजाच्या काही प्रमुख अडीअडचणी आणि समस्या शरद पवार याच्या कानी घातल्या . गेली ६० वर्ष तीन कोटी ख्रिश्चन समूहाच्या वतीने ख्रिश्चन दलितांना देखील इतर दलितांप्रमाणे आरक्षण व सवलती मिळाव्यात , म्हणून राष्ट्रव्यापी लढा चालू असून देखील ख्रिश्चन दलितांना अजूनहि  त्या दिल्या जात नाहीत .  हे भारताच्या संविधानाशी जुळणारे नाही . या बिशप थॉमस डाबरे यांच्या विधानास  शरद पवार यांनी दुजोरा दिला . दलितांच्या बाबतीत समान धोरण असावे अशी आपली भूमिका असल्याचे शरद पवार यांनी स्मरण करून दिले. त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजातील गुणवंत , सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना संधी देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे बिशप थॉमस डाबरे यांनी सांगितले .

यावेळी ख्रिश्चन समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते मायकल साठे यांनी  सांगितले कि , आपण आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत सामान्य कार्यकर्त्यांना  संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .  जेष्ठ पत्रकार जॉन गजभिव यांनी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले . या भेटीमध्ये मायकल साठे , रे फर्नाडिस , डॉ. जोशवा  रत्नम , जॉन गजभिव , वसंत गजभिव , सुधीर पाटील , रॉक गोम्स आदी ख्रिश्चन समाजातील मान्यवर उपस्थित होते .

शेतीविषयक उपकरणांची खरेदी, विक्री आणि ती भाड्याने मिळवण्यासाठीचा पहिला मंच-‘खेतीगाडी.कॉम’

0

पुणे-ट्रॅक्टर आणि शेतिविषयक उकरणांची खरेदी, विक्री तसेच ती भाड्याने देण्याची सुविधा असणारा जगातिक पहिलाच मंच  ट्रॅक्टर तसेच शेतिविषयक उपकरणांची खरेदी, विक्री आणि ती भाड्याने मिळवण्यासाठीचा पहिला व एकमेव जागतिक मंच म्हणजे खेतीगाडी. त्याच्या देशातील सेवेचे उद्घाटन पुण्यात करण्यात आले. ‘खेतीगाडी.कॉम’ या नावाने असलेल्या या मंचाचा प्रमुख उद्देश आहे- शेतीच्या पद्धतीअधिक कार्यक्षम करण्यासाठी योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे. शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधित समाजांना पेलावी लागणारी आव्हाने समजून घेऊन ‘’खेतीगाडी’’तर्फे त्यांना सोपे, सोयीस्कर, सुकर आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे उपाय पुरवले जातात. ते शेतकरी, उत्पादक, वितरक, कंत्राटदार अशा सर्वांच्या दृष्टीने परस्परांच्या उपयोगाचे ठरतात. ‘’खेतीगाडी’’च्या मंचावर सर्व ब्रॅन्डचे, सर्व प्रकारचे, सर्व शक्तीचे आणि सर्व क्षमतेचे ट्रॅक्टर्स तसेच, शेतिविषयक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेतिविषयक उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शेतीच्या पद्धतींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करायला लावणे, हे ‘’खेतीगाडी’’चे प्रमुख प्रयोजन आहे. त्यासाठी ‘‘खेतीगाडी’’तर्फे शेतकऱ्यांना विविध उत्पादनांची सविस्तर माहिती पुरवली जाते. त्यांना त्याचा उपयोग योग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची विक्री करण्यासाठी होतो. या साधनांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम कमी करणे शक्य होते. ‘’खेतीगाडी’’ला अशा साधनांचे सर्व प्रकारचे उत्पादक, खरेदीदार, विक्रेते, कंत्राटदार, अशी उत्पादने भाड्याने देणारे अशा सर्व घटकांना एकमेकांच्या फायद्यासाठी एकाच मंचावर एकत्र आणण्यात यश आले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनो ..परीक्षेला जाण्यापूर्वी ऐका ‘गुरुमंत्र ‘

0


पुणे- दहावीच्या  परीक्षा सुरु होत आहेत . या परिक्षार्थींना अवघ्या काही मिनिटात मार्गदर्शन केले आहे.चाटे ग्रुप च्या प्रा. फुलचंद चाटे सरांनी … तेव्हा अवघी काही  मिनिटे वेळ काढा आणि ऐका.. पुढे मार्गस्थ व्हा ..खूप खूप शुभेच्छ्या…

बारावीच्या विद्यार्थ्यांनो ..परीक्षेला जाण्यापूर्वी ऐका ‘गुरुमंत्र ‘

0

पुणे- बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत . या परिक्षार्थींना अवघ्या काही मिनिटात मार्गदर्शन केले आहे.चाटे ग्रुप च्या प्रा. फुलचंद चाटे सरांनी … तेव्हा अकरा मिनिटे वेळ काढा आणि ऐका.. पुढे मार्गस्थ व्हा ..खूप खूप शुभेच्छ्या…

भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्कृती विसरू नका -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे  :  जगभरातील सर्वाधिक तरुणांची  संख्‍या असणारा आपला देश आहे. तरुण हीच आपल्‍या देशाची शक्‍ती आहे, याच जोरावर भारत हा जगात महासत्‍ता होणार आहे, यासाठी भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्‍कृती विसरू नका,असे आवाहन मुख्‍यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांनी आज केले.

????????????????????????????????????

पुणे येथील सिंबायोसिस लॉ स्कूलच्‍या ‘सिम्‍भव 2018’ या दहाव्‍या आंतर-महाविद्यालयीन वार्षिक सांकृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुख्‍यमंत्री  श्री. फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)चे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमास सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)च्‍या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्‍बॉयसिस लॉ स्‍कूलच्‍या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,“वसुधैव कुटुंबकम” ही आपल्या देशाची संस्कृती आहे. शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरूवात “भगिनींनो आणि  बंधूंनो” अशी करून आपल्या संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती. आपल्या देशावर ग्रीक, शक, इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल अशा अनेकांनी आक्रमणे केली. मात्र या आक्रमणानंतरही आपल्या देशाची संस्कृती टिकून आहे. आपल्या देशात असणाऱ्या ज्ञानामुळेच आपले जगातील स्थान टिकून आहे.

अनेक नद्या एकत्र येवून ज्या प्रमाणे सुंदर समुद्र तयार होतो, त्याच प्रमाणे विविध श्रध्दा, संस्कृतींच्या मिश्रणाने आपली भारताची संस्कृती तयार झाली आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या नाविन्यपूर्ण सृजनशीलतेमुळे मोठे आर्थिक केंद्र म्हणून महाराष्ट्राचा विकास होणार आहे. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. हीच आपल्या देशाची शक्ती आहे. या लोकसंख्येला कौशल्यतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून आपण आर्थिक क्षेत्रात मोठा विकास करू शकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

आता कृत्रिम बुध्दीमत्ता ही नवी संकल्पना जगात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आपण पाऊल टाकले आहे. या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. भविष्याचा वेध घेणारेच पुढील काळात टिकणार आहेत. त्यामुळे भविष्यातील संधीसाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. या बदलांसाठी तयार राहण्यासाठी आपल्या कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

येत्या काळात न्यायिक क्षेत्रात मनुष्यबळाची मोठी आवश्यकता भासणार आहे. समाजात वाढणाऱ्या सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती असणारे कायदेतज्ज्ञ निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शां. बं. मुजूमदार म्हणाले, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हे तर इंडीयन टॅलेंट असे नमूद करून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी या टॅलेंटचा लाभ घ्यायला हवा. “मॅग्नेटिक महाराष्ट्र”चे  आयोजन करून देश आणि विदेशातील गुंतवणुकदारांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विमानतळासमोरील मार्गाच्या “सिंम्बॉयसिस मार्ग” या फलकाचे उद्घाटन झाले.

‘सिम्‍भव 18’ चे आयोजक कार्तिकेय चौहान यांनी सिंम्भवची संकल्पना स्पष्ट करून आयोजनाचा हेतू विशद केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ स्कूलच्या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर यांनी केले. आभार सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनलचे (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. रजनी गुप्‍ते यांनी मानले.

 

महामित्र जनतेला जोडणारा प्लॅटफॉर्म…

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रशांत गुप्ता या विद्यार्थ्याने महामित्रच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महामित्र हा डिजीटल प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आपण लोकशाही मानणारे आहोत त्यामुळे राज्याच्या विकास प्रक्रीयेत नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी महामित्र हा उपक्रम उपयुक्त असून या निमित्ताने राज्यातील जनतेला बरोबर घेतले जाणार आहे.

या शिवाय पुणे मेट्रो, बसची कनेक्टीविटी, मुंबईतील मेट्रो,मोनोरेल, जलवाहतुक आदी प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

येत्या तीन वर्षात 90 टक्के शेतीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

पुणे: येत्या तीन वर्षात राज्यातील 90 टक्के शेतीपंपांना सौर कृषीवाहिन्यांच्या माध्यमातून सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार असून सध्याच्या वीजपुरवठ्याचा प्रतियुनिट दरही निम्म्यावर येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 21) दिली.

वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये 150 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार श्री. भीमराव तापकिर, महाऊर्जाचे महासंचालक श्री. राजाराम माने, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, नगरसेवक श्री. दिलीप बराटे, नगरसेवक श्री. सचिन दोडके, नगरसेविका सौ. दिपालीताई धुमाळ, नगरसेविका सायलीताई वांजळे तसेच सोसायटीच्या अध्यक्ष सौ. साक्षी महाले आदींची उपस्थिती होती.

ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे म्हणाले, की पूर्वी सौरऊर्जेवरील वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट 16 रुपये खर्च येत होता. केंद्र व राज्य शासनाने सौरऊर्जा निर्मितीच्या धोरणाला वेग दिल्याने सद्यस्थितीत हा खर्च प्रतियुनिट तीन ते साडेतीन रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी व ग्रामीण भागात सौरऊर्जेवरील प्रकल्पांत वाढ होत आहे. यासोबतच राज्यातील सुमारे 45 लाख शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषीवाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिलेली आहे. या महत्वाकांक्षी सौर प्रकल्पाद्वारे येत्या तीन वर्षात राज्यातील 90 टक्के शेतीपंपांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सध्या पारंपरिक वीजनिर्मितीद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठ्यासाठी येणारा प्रतियुनिट सहा रुपये खर्चही तीन रुपयांवर येणार आहे. याशिवाय कोळशावरील सुमारे 2500 मेगावॉट विजेची मागणी कमी होईल व त्याचा पर्यावरणाला फायदा होणार असल्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी आमदार भीमराव तापकिर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विवेक रत्नपारखी यांनी केले तर सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री. सुनील ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक श्री. सचिन दोडके यांनी आभार मानले.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबाद करण्याचा भाजपचा प्रयत्न- पृथ्वीराज चव्हाण

पुणे- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती. मात्र, आता ऑक्सफोर्ड  इकॉनॉमिक संस्थेच्या अहवालानुसार मुंबई शहर हे  भारताचे इकॉनॉमिक केंद्र राहिले नसून ते दिल्ली आणि गुडगावला गेले आहे. त्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी राहिलेली नाही. आर्थिक वित्तीय केंद्र हे अहमदाबाद येथे पळवले आहे. हायपर लूप हे केवळ स्वप्नरंजन आहे. हे स्वप्न दाखवून पुणेकरांची सरकार फसवणूक करत आहे  अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  शहर अध्यक्ष रमेश बागवे , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,अनंतराव गाडगीळ ,विश्वजित कदम ,दीप्ती चौधरी ,अविनाश बागवे ,अजित दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की,  हायपर लूप हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे. हायपर लूप या योजनेसाठी व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या समवेत 40 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मात्र, ही गुंतवणूक राज्य सरकार, केंद्र सरकार अथवा  ब्रॅन्सन करणार हे सरकारवे स्पष्ट करावे. तसेच याबाबतचे आर्थिक निकष जाहीर करावेत. हायपर लूप हे केवळ स्वप्नरंजन आहे. हे स्वप्न दाखवून पुणेकरांची सरकार फसवणूक करत असून लोकांना रोजगार हवे आहेत त्यामुळे स्वप्नं दाखवून लोकांची फसवणूक करू नये  अॅपलचे फोन पुण्यात तयार होणार, असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, तीन वर्षात काहीही झाले नाही. जनरल मोटर्सचा प्रकल्प पुण्यात आणण्याची घोषणाबाजी केली पण पुढे काही झाले नाही. रोजगार निर्मितीसाठी रोजगार सदन व्यवसायाला चालना देणे आवश्यक होते. मात्र, यात महाराष्ट्र  6 व्या क्रमांकावर आहे. हे उत्साहजनक आकडे नाहीत अशी टीका चव्हाण यांनी केली.  देशासमोर कृषी संदर्भात मोठ्या समस्या उभ्या असताना महाराष्ट्र राज्य सरकार मॅग्नेटिक महाराष्ट्र साजरा करीत आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम राबविला. मात्र, त्याची उपलब्धी काय याचे उत्तर सरकारने दिले नाही. मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम अपयशी ठरला. त्यामुळेच आघाडी सरकारच्या काळातील मॅग्नेटिक महाराष्ट्र हे घोषवाक्य राज्य सरकारने घेऊन कार्यक्रम केला असल्याचे चव्हाण म्हणाले.

सरकारचा मेकिंग महाराष्ट्र हा कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यांची आकडेवारी फुगवलेली आहे. त्यामधील फक्त 838 प्रकल्प कार्यान्वित आहेत. केवळ 42 हजार 146 इतकी रोजगार निर्मिती झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आकडेवारी फुगवून दाखवत आहेत. 5 लक्ष कोटी गुंतवणूक झाल्याचा दावा सरकार करत आहे. ही गुंतवणूक कुठे आणि कधी झाली यांची महिती सरकारने द्यावी. सविस्तर माहिती दिली जात नाही. त्यामुळे ही फक्त जाहिरातबाजी आहे. गुजरातच्या विकासदरापेक्षा ( 8 टक्के) महाराष्ट्राचा विकासदर (7.3 टक्के) कमी आहे.  विकासदारात महाराष्ट्र 8 व्या क्रमांकावर आहे.

  मुख्यमंत्री पंतप्रधानाच्या दबावाखाली काम करतात अशी टीका करीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती. मात्र, आता ती गुजरातला पळविली आहे. आर्थिक वित्तीय केंद्र हे अहमदाबाद येथे पळवले आहे.  ऑक्सफोर्ड  इकॉनॉमिक संस्थेच्या अहवालानुसार मुंबई शहर हे  भारताचे इकॉनॉमिक केंद्र राहिले नसून ते दिल्ली आणि गुडगावला गेले आहे. त्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी राहिलेली नाही. बुलेट ट्रेन आणून मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बुलेट ट्रेनची गरज मुंबईला नसून अहमदाबादला आहे म्हणून ती तयार करण्यात येत आहे.

नमिश हूड, मृणाल शेळके, पार्थ देवरूखकर, श्रावणी देशमुख, पूर्वा भुजबळ यांना विजेतेपद अर्णव पापरकरला दुहेरी मुकुट

0

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर याने 10 व 14 वर्षाखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, नमिश हूड, मृणाल शेळके, पार्थ देवरूखकर, श्रावणी देशमुख, पूर्वा भुजबळ या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या पडलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अर्णव पापरकरने देव तुकारियाचा 7-1असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. याच गटाबरोबरच 14 वर्षाखालील गटात अव्वल मानांकित अर्णव पापरकरने तेराव्या मानांकित निशीथ रहाणेचा 4-1, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. अर्णव हा न्यू इंडिया शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

8वर्षाखालील मिश्र गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नमिश हूड याने नीरज जोर्वेकरचा 7-0असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. 10वर्षाखालील मुलींच्या गटात  मृणाल शेळके हिने प्रिशा शिंदेचा 7-1असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मृणाल एसपीएम पब्लिक शाळेत दुसरी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

12वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित पार्थ देवरूखकरने आठव्या मानांकित अर्जुन कीर्तनेचा 4-0, 5-3असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. पार्थ हा डीईएस सेकंडरी शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे. याच मुलींच्या गटात चौथ्या मानांकित
श्रावणी देशमुखने सिमरन छेत्रीचा 5-3, 5-3असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. 14वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित पूर्वा भुजबळने अव्वल मानांकित गौतमी खैरेला 4-0, 5-3असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नमिश हूड(1)वि.वि.नीरज जोर्वेकर 7-0;

10वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर(1)वि.वि.देव तुकारिया 7-1;
10वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.प्रिशा शिंदे 7-1;

12वर्षाखालील मुले:
पार्थ देवरूखकर(1)वि.वि.अर्जुन कीर्तने(8) 4-0, 5-3;
12वर्षाखालील मुली:
श्रावणी देशमुख(4)वि.वि.सिमरन छेत्री 5-3, 5-3;

14वर्षाखालील मुले:
अर्णव पापरकर(1)वि.वि.निशीथ रहाणे(13)4-1, 4-1;
14वर्षाखालील मुली:
पूर्वा भुजबळ(2)वि.वि.गौतमी खैरे(1)4-0, 5-3.

23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सीपीसीएल, बीपीसीएल सांघांचा विजय

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत सीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 31-17 असा पराभव केला. बीपीसीएल संघाने एमआरपीएल संघाचा 28-19 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन फेरीत सीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 32-17 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. सीपीसीएल संघाच्या पेरा रसनने 8 चढायांमध्ये 6 गुण मिळवले तर वासूदेवन याने 10 चढायांमध्ये 8 गुण मिळवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. जानकीरामन याने कौशल्यपुर्ण पकडी करत ईआयएल संघाचे मनोबल खच्ची केले व मध्यंतरानंतर ईआयएल संघाला ऑल आऊट करून लोन चढवले.  सीपीसीएल संघाने सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा राखत मध्यांतरापुर्वी 17-10 अशी आघाडी घेतली व सामन्याच्या शेवटीपर्यंत ती टीकवून ठेवत संघाला 32-17 असा विजय मिळवून दिला.

दुस-या लढतीत बीपीसीएल संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत एमआरपीएल संघाचा 28-19 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. बीपीसीएल संघाने सुरूवातीपासून आक्रमक खेळ करत मध्यंतरापुर्वी 21-7 अशी भक्कम आघाडी घेतली व एमआरपीएल संघाने मनोबल खच्ची केले. बीपीसीएल संघाच्या दिपचंद सिंगने 10 चढायांमध्ये 9 गुण मिळवून संघाचा डाव भक्कम केला. निलेश शिंदेने आपल्या लैकीकाला साजेशी कामगिरी करत सर्वाधिक पकडी केल्या व संघाला 28-19 असा विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबिन फेरी

सीपीसीएल वि.वि ईआयएल – 32-17(17-10 मध्यांतरापुर्वी)

बीपीसीएल वि.वि एमआरपीएल – 28-19 (21-7 मध्यांतरापुर्वी)

4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत बायसंन्स,लॅन्सर्स, बोल्टस, पलाडियन्स संघांचा विजय

0

पुणे-  ग्रीन बॉक्स् यांच्या तर्फे आयोजीत 4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत बायसंन्स, लॅन्सर्स, बोल्टस, पलाडियन्स, रेंजर्स, समुराईज, ग्लॅडिएटर्स, रेझरबँक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

कॅसल रॉयल, एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अतितटीच्या झालेल्या लढतीत निखिल माळीच्या हॅट्रीक कामगिरीच्या जोरावर डीएसके पलाडियन्स संघाने हिलीओस सेन्चुरियन्स संघाचा 4-3 असा पराभव केला. केएसएच बोल्टस संघाने युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स संघाचा तर गोयल गंगा लॅन्सर्स संघाने एबीआयएल ऍझटेक्स संघाचा अनुक्रमे 2-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स संघाने चिताज नाईट्स संघाचा तर निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबँक्स संघाने एसएस रॉय वायकिंग्ज संघाचा 1-0 असा पराभव केला. देवेंद्र कोरोडीच्या दोन गोलांच्या जोरावर रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड बायसंन्स संघाने आयएमई फायरबर्डस संघाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

डीएसके पलाडियन्स: 4(निखिल माळी 4,9,17 मी, यश सरदेसाई 12मी) वि.वि  हिलीओस सेन्चुरियन्स: 3(शॉन थॅमसराजे 14, 19मी, लिऑन नेसामनी 8मी)

केएसएच बोल्टस: 2 (यश चव्हाण 12मी, साजल कदम 16मी) वि.वि युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 0

गोयल गंगा लॅन्सर्स: 2 ( शॉन बॉब  8मी, पृथ्विराज सातव 14मी) वि.वि  एबीआयएल ऍझटेक्स: 0

माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स:  1(निखिल नारायणन 9मी) वि.वि चिताज नाईट्स: 0

निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबँक्स: 1(अक्षय नायर 13मी) वि.वि  एसएस रॉय वायकिंग्ज: 0;

रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड बायसंन्स: 3(देवेंद्र कोरोडी 7, 19मी, कृष्णा पाटील 15मी स्वयं गोल) वि.वि  आयएमई फायरबर्डस: 0

अभयराज शिरोळे अँड असोसीएट्स समुराईज: 1(विपुल त्रिवेदी 11मी) बरोबरी वि  एमपी ग्रुप मावरिक्स: 1(शॉन अर्लांड 15मी)

रावेतकर ग्लॅडिएटर्स: 3(रोईथ जयसिंघानी 6मी, कौशल वालेचा 9मी, जयंत कापसे 15मी स्वयं गोल) वि.वि  परांजपे स्पार्टन्स: 1( सौरभ शिंदे 12मी)

14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत ओएनजीसी संघाला विजेतेपद

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे  14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत ओएनजीसी संघाने बीपीसीएलचा 3-0असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या बिलियर्ड्स स्पर्धेत सांघिक गटात अंतिम फेरीत रुपेश शहा, आलोक कुमार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर गतविजेत्या ओएनजीसी संघाने बीपीसीएल संघाचा 3-0असा पराभव केला. रुपेश शहाने सामन्यात सुरेख सुरवात करत आघाडी घेतली. त्यानंतर एस श्रीकृष्णा पुनगरमान करत आघाडी भरून काढली. 48च्या ब्रेकवर असताना एस श्रीकृष्णा सोपा पॉट मिस केला. त्यानंतर रुपेश शहाने वर्चस्व कायम राखत 77 गुणांचा ब्रेक नोंदवत हि फ्रेम एस श्रीकृष्णा विरुद्ध 202(77)-100अशी जिंकून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात आलोक कुमार आणि मनन चंद्रा यांच्यात अतितटीचा सामना झाला. मननने 37गुणांच्या ब्रेकने चांगली सुरुवात केली. त्यानंतर आलोकने संधी मिळताच उपयुक्त ब्रेक नोंदविला व सामना 200(83)-111अशा फरकाने जिंकून आघाडी कायम ठेवली. विजयासाठी 9 गुणांच्या फरकाची गरज होती. त्यासाठी विश्वविजेता पंकज अडवाणी तिसऱ्या सामना खेळला. त्याने देवेंद्रविरुद्ध हि औपचारिकता पूर्ण केली.

3 व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात
ध्वज हरिया, आदित्य मेहता यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर इंडियन ऑईल संघाने जीएआयएलचा 2-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.

सांघिक स्नूकर गटात उपांत्यपूर्व फेरीत जीएआयएल संघाने एनआरएलचा 2-0 असा पराभव केला. आशुतोष पाधीने दुर्लव बोराचा 82-17, 77-12 असा तर इशप्रित चड्डाने स्वप्नव दत्ताचा 77-12, 82-02असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: सांघिक गट:
ओएनजीसी वि.वि.बीपीसीएल 3-0(रुपेश शहा वि.वि.एस श्रीकृष्णन 202(77)-100; आलोक कुमार वि.वि.मनन चंद्रा 200(83)-111; पंकज अडवाणी वि.वि.देवेंद्र जोशी 9-5);

3 व 4थ्या क्रमांकासाठी लढत:
इंडियन ऑईल वि.वि.जीएआयएल 2-1(ब्रिजेश दमानी पराभूत वि.इशप्रित चड्डा 37-200; ध्वज हरिया वि.वि.आशुतोष पाधी 200-29; आदित्य मेहता वि.वि.अशोक यादव 200-34);

सांघिक गट: स्नूकर: उपांत्यपूर्व फेरी:
जीएआयएल वि.वि.एनआरएल 2-0(आशुतोष पाधी वि.वि.दुर्लव बोरा 82-17, 77-12; इशप्रित चड्डा वि.वि.स्वप्नव दत्ता 77-12, 82-02); 

इंडियन ऑईल वि.वि.ऑईल 2-0(आदित्य मेहता वि.वि.जे फुकन 119(51,67)-00, 75-10; लक्ष्मण रावत वि.वि.रुद्र दत्ता 95-04, 81-06)