देशाची आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबाद करण्याचा भाजपचा प्रयत्न- पृथ्वीराज चव्हाण

Date:

पुणे- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती. मात्र, आता ऑक्सफोर्ड  इकॉनॉमिक संस्थेच्या अहवालानुसार मुंबई शहर हे  भारताचे इकॉनॉमिक केंद्र राहिले नसून ते दिल्ली आणि गुडगावला गेले आहे. त्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी राहिलेली नाही. आर्थिक वित्तीय केंद्र हे अहमदाबाद येथे पळवले आहे. हायपर लूप हे केवळ स्वप्नरंजन आहे. हे स्वप्न दाखवून पुणेकरांची सरकार फसवणूक करत आहे  अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  शहर अध्यक्ष रमेश बागवे , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,अनंतराव गाडगीळ ,विश्वजित कदम ,दीप्ती चौधरी ,अविनाश बागवे ,अजित दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की,  हायपर लूप हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे. हायपर लूप या योजनेसाठी व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या समवेत 40 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. मात्र, ही गुंतवणूक राज्य सरकार, केंद्र सरकार अथवा  ब्रॅन्सन करणार हे सरकारवे स्पष्ट करावे. तसेच याबाबतचे आर्थिक निकष जाहीर करावेत. हायपर लूप हे केवळ स्वप्नरंजन आहे. हे स्वप्न दाखवून पुणेकरांची सरकार फसवणूक करत असून लोकांना रोजगार हवे आहेत त्यामुळे स्वप्नं दाखवून लोकांची फसवणूक करू नये  अॅपलचे फोन पुण्यात तयार होणार, असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, तीन वर्षात काहीही झाले नाही. जनरल मोटर्सचा प्रकल्प पुण्यात आणण्याची घोषणाबाजी केली पण पुढे काही झाले नाही. रोजगार निर्मितीसाठी रोजगार सदन व्यवसायाला चालना देणे आवश्यक होते. मात्र, यात महाराष्ट्र  6 व्या क्रमांकावर आहे. हे उत्साहजनक आकडे नाहीत अशी टीका चव्हाण यांनी केली.  देशासमोर कृषी संदर्भात मोठ्या समस्या उभ्या असताना महाराष्ट्र राज्य सरकार मॅग्नेटिक महाराष्ट्र साजरा करीत आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम राबविला. मात्र, त्याची उपलब्धी काय याचे उत्तर सरकारने दिले नाही. मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम अपयशी ठरला. त्यामुळेच आघाडी सरकारच्या काळातील मॅग्नेटिक महाराष्ट्र हे घोषवाक्य राज्य सरकारने घेऊन कार्यक्रम केला असल्याचे चव्हाण म्हणाले.

सरकारचा मेकिंग महाराष्ट्र हा कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यांची आकडेवारी फुगवलेली आहे. त्यामधील फक्त 838 प्रकल्प कार्यान्वित आहेत. केवळ 42 हजार 146 इतकी रोजगार निर्मिती झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आकडेवारी फुगवून दाखवत आहेत. 5 लक्ष कोटी गुंतवणूक झाल्याचा दावा सरकार करत आहे. ही गुंतवणूक कुठे आणि कधी झाली यांची महिती सरकारने द्यावी. सविस्तर माहिती दिली जात नाही. त्यामुळे ही फक्त जाहिरातबाजी आहे. गुजरातच्या विकासदरापेक्षा ( 8 टक्के) महाराष्ट्राचा विकासदर (7.3 टक्के) कमी आहे.  विकासदारात महाराष्ट्र 8 व्या क्रमांकावर आहे.

  मुख्यमंत्री पंतप्रधानाच्या दबावाखाली काम करतात अशी टीका करीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती. मात्र, आता ती गुजरातला पळविली आहे. आर्थिक वित्तीय केंद्र हे अहमदाबाद येथे पळवले आहे.  ऑक्सफोर्ड  इकॉनॉमिक संस्थेच्या अहवालानुसार मुंबई शहर हे  भारताचे इकॉनॉमिक केंद्र राहिले नसून ते दिल्ली आणि गुडगावला गेले आहे. त्यामुळे मुंबई आर्थिक राजधानी राहिलेली नाही. बुलेट ट्रेन आणून मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बुलेट ट्रेनची गरज मुंबईला नसून अहमदाबादला आहे म्हणून ती तयार करण्यात येत आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...