पुणे- ग्रीन बॉक्स् यांच्या तर्फे आयोजीत 4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत रेंजर्स, नाईट्स, समुराईज, रेझरबॅक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
कॅसल रॉयल, एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नील सांघवी(2,7,15मि.)याने केलेल्या हॅट्ट्रिक कामगिरीच्या जोरावर माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स संघाने एबीआयएल ऍजटेक्सचा 5-0असा धुव्वा उडविला. ईश्वर क्षीरसागर याने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर चिताज नाईट्स संघाने डीएसके पलाडियन्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. पराभूत संघाकडून निखिल माळीने एक गोल केला. अभयराज शिरोळे अँड असोसिएट्स समुराईज संघाने रावेतकर ग्लॅडिएटर्सचा 2-1 असा पराभव केला.
अन्य लढतीत एस एस वायकिंग्ज गोयल गंगा लॅन्सर्स यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. एमपी ग्रुप मावरिक्स संघाने केएसएच बोल्टसला 1-1असे बरोबरीत रोखले. अक्षय नायरने नोंदविलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबॅक्स संघाने हिलयोज सेंचूरीयन्सचा 1-0असा सनसनाटी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एमपी ग्रुप मावरिक्स: 1(शॉन अरलँड 2मि.)बरोबरी वि.केएसएच बोल्टस: 1(सुरज कदम 12मि.);
माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स: 5(नील सांघवी 2,7,15मि., मेलविन थॉमस 9,16मि.)वि.वि.एबीआयएल ऍजटेक्स: 0;
आयएमई फायरबर्डस: 3(सौरभ कदम 4मि., हिमांशू नाबंदर 6मि., रेशव तोमर 10मि.)बरोबरी वि.युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 3(रोहित मूलचंदानी 3,18मि., स्वयंगोल कृष्णा पाटील 11मि);
चिताज नाईट्स: 2(ईश्वर क्षीरसागर 5, 14मि.)वि.वि.डीएसके पलाडियन्स: 1(निखिल माळी 6मि.);
अभयराज शिरोळे अँड असोसिएट्स समुराईज: 2(मितान पाटील 5मि., मोहिल टिपणीस 14मि.)वि.वि.रावेतकर ग्लॅडिएटर्स: 1(कौशल वालेचा 19मि.);
एस एस वायकिंग्ज: 0 बरोबरी वि.गोयल गंगा लॅन्सर्स: 0;
रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड बायसन्स: 1(सौरभ शिंदे 7मि.)बरोबरी वि.परांजपे स्पार्टन्स: 1(देवेंद्र करोदी 11मि.);
निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबॅक्स: 1(अक्षय नायर 14मि.)वि.वि.हिलयोज सेंचूरीयन्स: 0.