पुणे :
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’तर्फे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले. माजी शिक्षण मंडळ सदस्य सुनिल खाटपे यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुरेश पवार, संजय गायकवाड, संजय गाडे, शंकर शिंदे, निलेश वरे, वैभव जाधव हे उपस्थित होते.