Home Blog Page 3182

गुलमोहर मध्ये नवीन कथा ‘ सासू, सून आणि तो…’

0

कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली स्त्री म्हणजेच मुलाची आई , जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते तेव्हा साधारणपणे तिची मानसिकता बदलते अर्थात अत्यंत प्रेमाने, आदराने नीटच नाते जोपासणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. मात्र “सासूबाई’ ही उपाधी लागली की सत्ता, मानपान व अपेक्षा आणि तुलना या विकारांमध्ये ती जखडली जाऊ शकते.  याउलट सासू, सुना सुज्ञ, समंजस असतील तर घरात “स्वर्ग’ उतरतो.  दर आठवड्याला नात्यांची नवी गोष्ट देण्याचं प्रॉमिस झी युवा पाळत आहे. हीच परंपरा कायम राखत एक सुंदर कथा ही युवा वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेली आहे.  जगाच्या पाठीवर कायमच चर्चेत असलेलं एक नातं म्हणजे सासू आणि सूनेचं नातं. याच नात्याची एक गमतीदार गोष्ट येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १२ मार्च आणि १३ मार्च ला पाहायला मिळणार आहे. सासूच्या भुमिकेत वंदना गुप्ते, शिवानीच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर आणि जय च्या भूमिकेत अक्षय वाघमारे या कथेतून भेटणार आहेत.

आईच्या आदरयुक्त धाकात वाढलेला जय. एका बोल्ड एण्ड ब्युटिफुल मुलीच्या म्हणजेच शिवानीच्या प्रेमात पडतो खरा पण आईला कसं सांगणार हा प्रश्न काही सुटत नाही. शिवानी मात्र आजच्या तरूणींचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. त्या अपरोक्ष जयची आई त्याच्यासाठी मुली शोधते आहे आणि अचानक जय आणि शिवानी लग्न करून दारात उभं राहतात. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आईला धक्का बसतो. आता आई जय आणि शिवानीला घरात घेणार का? सून म्हणून शिवानीला आता काय काय करावं लागणार? शिवानी या परिक्षांमध्ये पास होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहा गुलमोहर मधील पुढील कथा सासू, सून आणि तो.

महिलांनी विद्यार्थीनींसाठी चालविलेल्या कॅन्टीन मध्ये ‘महिला दिनी ‘ प्रत्येक डिश बरोबर पेढे आणि अत्तर वाटप !

0
महिला दिनी ‘गौरीज किचन ‘चा आगळा वेगळा उपक्रम 
पुणे :
महिलांनी विद्यार्थीनींसाठी चालविलेल्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कॅन्टीन’ मध्ये ‘महिला दिनी ‘ फर्माइशीच्या प्रत्येक डिश बरोबर पेढे आणि अत्तर वाटप करण्यात येणार आहे !

 

​ ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कॅन्टीन’च्या संचालक गौरी बीडकर यांनी ही माहिती दिली . गौरी बीडकर यांच्या ‘गौरीज किचन ‘ या स्टार्ट अप फर्म ने  ​ ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कॅन्टीन’ या महिन्यातच चालविण्यास घेतले आहे .  ‘अँग्लो उर्दू गर्ल्स स्कुल आणि आबेदा इनामदार वरिष्ठ मंहाविद्यालय परिसरात असलेल्या या कॅन्टिनवर विद्यार्थिनींची कायम गर्दी असते .हे कॅन्टीन मधील सर्व स्टाफ महिलावर्ग आहे . त्यात कॅन्टीन संचालक गौरी बीडकर,सहायक सुलताना मुलतानी   ,आणि मदत करणाऱ्या मीरा अडागळे मावशी यांचा समावेश आहे.   शेजारी वसतिगृह असल्याने कॅन्टीन सायंकाळी उशिरा सुरु ठेवा ,रविवारीही चालू ठेवा ‘असा प्रेमळ आग्रह गौरी बीडकर यांना होतो .अशावेळी ओंकार थिटे या युवक सहकाऱ्याची  बाहेरून साहित्य आणून द्यायला गौरी बिडकर यांना मदत होते .
या नव्याने जडलेल्या स्नेहापोटी गौरी बीडकर यांनी ८ मार्च महिला दिनी या कॅन्टीन ला फर्माईश सांगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीचे स्वागत अत्तर लावून आणि पेढा देऊन करणार असल्याचे सांगितले .
कॅन्टीन हे विद्यार्थिनींचे जमून गप्पा मारण्याचे ,सुख -दुःख वाटून घेण्याचे ठिकाण असल्याने आगळ्या पद्धतीने महिलादिन साजरा करण्याचे गौरी बीडकर यांनी ठरवले आहे
पत्रकारितेतून फूड इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या गौरी बीडकर  भारती विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अशी २ कॅन्टीन चालवितात आणि तिसऱ्या कॅन्टीनची तयारी सुरु आहे . समाजातील मान्यवरांना घरी निमंत्रित करून उत्तमोत्तम पदार्थ खिलविण्याचा आणि  गप्पा मारण्याचा साप्ताहिक उपक्रम त्यांनी सलग ३ वर्षे चालविल्यानंतर त्यांना फूड इंडस्ट्रीत उतरण्याचा आग्रह झाला . आपल्याला चवदार पदार्थ आणि अतिथ्यशीलतेचा वारसा आई अपर्णा भावे यांच्याकडून मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात
भारती विद्यापीठ येथे भारतभरातील कॉस्मोपॉलिटन विद्यार्थी -विद्यार्थिनी तर अँग्लो उर्दू हायस्कुल येथे सर्वधर्मीय विद्यार्थिनींना आवडणारे पदार्थ करून देताना खूप शिकायला मिळाले ,असेही त्या म्हणाल्या

‘बायो सीएनजी’ क्षेत्रातील योगदानाबद्दल नितीन देशपांडे यांचा गौरव

0
पुणे :
कृषी-औद्योगिक क्षेत्रातील वेस्ट (कचऱ्या) पासून बायो सीएनजी आणि बायो कंपोस्टिंग प्रकल्प उभारणीच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ‘‘ट्रायोकेम सुक्रोटेक इंजिनियरिंग अ‍ॅण्ड प्रोजेक्टस् प्रा.लि.’ ( Triochem Sucrotech Engineering and Projects pvt.ltd.Pune) चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांचा थायलंड येथे ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ देऊन गौरव करण्यात आला.
सहाव्या ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल्स इन शुगर अ‍ॅण्ड इंटीग्रेटेड टेक्नॉलॉजिज’ या परिषदेत मंगळवारी, 6 मार्च रोजी हा गौरव कार्यक्रम झाला.
थायलंडच्या उडोन थानी प्रांताचे राज्यपाल वॅटना पुट्टीचॅट यांच्या हस्ते देशपांडे यांना ‘एक्सलन्स अ‍ॅवार्ड’ (गुणवत्ता सन्मान) देऊन गौरविण्यात आले.

‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ उपक्रमास चांगला प्रतिसाद

0
पुणे :
 
‘शिवप्रतिष्ठान’ गणेश नगरच्या वतीने शिवजयंतीनिमित्त ‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून आगळी वेगळी शिवजयंती प्रतिष्ठानने साजरी केली, अशी माहिती ‘शिवप्रतिष्ठान’ च्या वतीने उपक्रम आयोजक किशोर खामकर, अजिंक्य चव्हाण, शुभम खामकर यांनी पत्रकाद्वारे दिली. 
या उपक्रमांतर्गत वही 830 नग, पेन 450 नग, पेन्सिल 300 नग आणि खोड रबर 300 आणि रंगपेटी 57 नग जमा झाले आहे. सिद्धेश फाले, साहिल सातपुते, भूषण परबते, ओंकार खामकर, सौरभ विधाते, अर्जुन देमाणे, सोहम आवळे, हर्षल जाधव, प्रतीक ढावरे, स्वप्नील खामकर, स्वप्नील आंबुरे यांनी या उपक्रमात सहकार्य केले आहे. 
या उपक्रमाची माहिती देताना किशोर खामकर म्हणाले, ‘शिवप्रतिष्ठान’ गणेश नगर, सात चाळ पूरग्रस्त वसाहत एरंडवणे येथील युवकांच्या वतीने गेली 6 वर्षे घराच्या अंगणात शिवजयंती साजरी करण्यात येते. अनेक शिवभक्त या दिवशी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अथवा हार अर्पण करतात. यावर्षी आम्ही ‘एक वही एक पेन शिवरायांच्या चरणी’ ही मोहीम हाती घेतली. ह्या मोहीमेतंर्गत शिवरायांच्या चरणी हार, पुष्प न वाहता फक्त ‘एक वही, एक पेन अर्पण’ करा असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.’ 

‘या उपक्रमामध्ये वही -पेन, पेन्सिल, खोड रबर इत्यादी शालेय वस्तू स्वीकारण्यात आल्या. जमा झालेल्या वस्तू गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच गरजू अनाथ मुलांना वाटण्यात येणार आहेत. रयतेला साक्षर बनविण्याचे शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करण्याचा आमच्या प्रतिष्ठानचा हा एक छोटासा प्रयत्न आहे’, अशी माहिती आयोजक अजिंक्य चव्हाण आणि शुभम खामकर यांनी दिली. 

बजेट म्हणजे दोघांची पोपटपंची – सुभाष जगताप यांचा घणाघात

पुणे- महापालिकेच्या गेल्या वर्षाच्या आणि यंदाच्या वर्षाच्या बजेटवर राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांनी जोरदार टीका केली . हे बजेट म्हणजे आयुक्त आणि चेअरमन ची  पोपटपंची आहे . हे दोघे दीड शहाणे आहेत . अशी जोरदार टीका त्यांनी केली .

1)देशभरातील सर्व योजना २०२२ ला पूर्ण करणार ..बहुतेक भाजपने २०२२ ला मोठा मुहूर्त काढलेला दिसतोय …
2)चार वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ४० कोटी पुणे शहरासाठी दिले आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १५०० कोटी शहरासाठी खर्च केले आता पुणेकरांनी ठरवावे ..कार्यक्षम कोण ?
3)पुणे महापालिकेचे गेल्यावर्षी चे अंदाजपत्रक मोहोळ यांनी मांडले तेव्हाच मी त्यांना सपनो का सौदागर म्हटले होते …ते बजेट १७०० कोटी ने फुगविलेले बजेट होते हा हि उल्लेख केला होता .. तसेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे …
4)गेल्या वर्षीचे स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांनी केलेलेभाषण म्हणजे पोपटपंची होती ..अंदाजपत्रकातील बहुसंख्य योजना फसव्या निघाल्या ..
5)त्यामुळे पुणेकर यांचा ‘थापेबाज ‘ म्हणून गौरव करतील … 6)चेअरमन आणि आयुक्त म्हणजे दोघेही साडेतीन शहाणे ..असे म्हणावे लागेल …
(महापालिकेच्या अर्थ संकल्प २०१८-१९ वरील सुभाष जगताप यांचे संपूर्ण ५१ मिनिटांचे भाषण https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2036689569907013/  या फेसबुक पेजवर पहा आणि ऐका)
इथे पहा आणि ऐका पहिल्या 11 मिनिटांची जोरदार झलक

‘बालगंधर्व’ तोडू देणार नाही – दीपक मानकर


पुणे- भव्यतेच्या नावाखाली बालगंधर्व रंग मंदिर तोडू देणार नाही असा स्पष्ट इशारा देत मेट्रो च्या नावाखाली बिल्डरांची लुट करू नका ,झोपडपट्टीला अंतर्गत रस्ते लाईट सुविधा देतो तशा कर भरणाऱ्या सोसायट्यांमध्ये देखील द्या ,अशा अनेक मागण्या आज अर्थसंकल्पावर भाषण करताना माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केल्या .
शिवसृष्टी होण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा तुम्ही घेणार आहात त्या शेतकऱ्यांना जमिनीची किंमत देण्यासाठी काही तरतूद या बजेट मध्ये केली नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला .
बालगंधर्व रंगमंदिर तुम्हाला भव्य दिव्य करायचे असेल , चांगली गोष्ट आहे , पण आहे ते बालगंधर्व तोडून ..तिथल्या सांस्कृतिक वाऱ्याला थोपवून ठेवू नका , त्यापासून पुणेकरांना वंचित ठेवू नका , आपल्याकडे एखादा प्रकल्प हाथी घेतला कि तो 5 -5 वर्षे रखडतो . असे झाले तर पुणेकर रसिक बालगंधर्व च्या सांस्कृतिकतेला मुकतील . अशी भीती हि त्यांनी व्यक्त केली .आम्हीआधुनिकतेच्या नावाखाली  बालगंधर्व कदापि पूर्णतः तोडून देणार नाही असा इशारा त्यांनी दिला .
1) स्मार्ट सिटी अंतर्गत झोपडपट्ट्यांचा समावेश करा .
2) झोपडपट्ट्यांना अंतर्गत रस्ते ,लाईट देतो तशा सुविधा कर भरणाऱ्या सोसायट्यांमध्ये का देत नाही ?
3)मेट्रोच्या नावाखाली  कर वाढवून बिल्डरांची लुट करू नका .
4)खडकवासला धरणाचा गाळ काढण्याकडे का दुर्लक्ष करता ?
दीपक मानकर यांचे संपूर्ण भाषण ..https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2036664833242820/  या फेसबुक पेजवर पहा ..
येथे पहा भाषणाची एक झलक …

जमा 1 रुपया आणि खर्च 2 रुपये .. फेक बजेट – आबा बागुलांचा प्रहार

पुणे- मूळ शिल्लक रक्कम न दाखविणारा ,आणि जमेची बाजू किती? आणि खर्च त्याहून जवळपास दुप्पट दाखविणारा असा फेक आकड्यांचा खेळ मांडून सत्ताधारी भाजपने यंदाचा अर्थ संकल्प मांडला आहे . अशा आशयाची टीका करत आज महापालिकेच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,माजी उपमहापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष आबा बागुल यांनी केली .
(बागुल यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील  महापालिका बजेट या विषयावरील वरील  २७ वे भाषण …जसेच्या तसे 

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2036556053253698/
या फेसबुक पेजवर दिले आहे . )
बागुल म्हणाले ,
1) बजेट चे आकडे फेक वाटतात
2)कोणतीही करवाढ न करता , वाढते शहरीकरण ,वाढती बांधकामे यांचा  संबध लक्षात न घेता पालिकेकडे जमा रक्कम कशी वाढेल याबाबत काहीही विचार केलेला दिसत नाही.
3) शिवसृष्टी च्या भूसंपादनासाठी विशेष तरतूद नाही .
4)५८०० कोटीचा अर्थ संकल्प मांडला असला तरी प्रत्यक्षात ३२०० ते ३५०० कोटी रुपयेच जमा होऊ शकतील असा हा अर्थ संकल्प शहराचा विकास करणार कसा ?
पहा आणि ऐका भाषणातील हायलाईटस

‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’मध्ये पदवी प्रदान सोहळा

0
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी’ मध्ये शनिवार, ३ मार्च रोजी पदवी प्रदान सोहळा झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख यांच्या हस्ते बी. फार्मसी २०१६-१७ च्या तुकडीतील ३० विद्यार्थांना पदवी प्रदान करण्यात आल्या. प्राचार्य किरण भिसे यांनी स्वागत केले.

 

महावितरणच्या अधिका-यास मारहाण करणाऱ्या तिघांना सहा महिन्यांची सक्तमजुरी व नऊ हजाराचा दंड

0

मुंबई –

वीजबील वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणा-या महावितरणच्या अधिका-यांना घरामध्ये कोंडून मारहाण करणा-या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्हयातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावला आहे.

उमरी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुनील कासनाळे हे दि. 25 नोव्हेंबर 2012 रोजी आपल्या सहकारी कर्मचा-यांसोबत सिंधी या गावी वीजबील वसुली व मीटरची तपासणी मोहीम राबवित होते. यावेळी शिवाजी पुयड हे अनधिकृतरित्या आकडा टाकून वीज वापरत असल्याचे आढळून आल्यामुळे आकडा टाकून वीज चोरल्याबद्दलचा रितसर पंचनामा करीत असताना शिवाजी पुयड आणि अन्य दोघांनी घराचा दरवाजा बंद करुन पंचनाम्याचे कागदपत्र फाडून टाकले. त्याचबरोबर पंचनाम्याचे चित्रीकरण करणारे कर्मचारी बालाजी ढेरे यांना उग्रसेन पुयड व मारोती पुयड या आरोपींनी हातपाय धरुन मारहाण करत मोबाईल काढून घेतला.  तसेच इतर कर्मचा-यांनाही कागदपत्रे फाडत धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले. दि. 3 मार्च 2018 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी उमरी तालुक्यातील सिंधी येथील नितीन बालाजी पुयड, उग्रसेन शिवाजी पुयड व मारोती शिवाजी पुयड या तिघांना 353, 342, 201, 504, 506 सह 34 या कलमांतर्गत प्रत्येकी सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अजीम खान यांनी काम पाहिले.

कमिन्स इंजिनियरिंग कॉलेज येथे महिला मॅरेथॅान संपन्न

0

पुणे- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार जिल्हा निवडणूक कार्यालय व कमिन्स इंजिनियरिंग कॉलेज, कर्वे रोड,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिये संबंधी जनजागृती होण्यासाठी महिला मॅरेथॅानचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 200 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाने विविध प्रकारच्या स्पर्धा, परिसंवाद, कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालय,पुणे व कमिन्स इंजिनियरिंग कॉलेज,कर्वे रोड ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 मार्च रोजी सकाळी 7  वाजता महिला मॅरेथॅानचे आयोजन करण्यात आले होते. कमिन्स इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. या मॅरेथॅान मध्ये पुण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी, श्रीमती मोनिका सिंह सुद्धा धावल्या. या स्पर्धेत कमिन्स इंजिनियरिंग कॉलेजची शामली शेणोलीकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकवीला तर अपर्णा पै व रिया जाईल या विद्यार्थिनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आल्या.

या कार्यक्रमासाठी कमिन्स कॉलेजच्या संचालिका श्रीमती डॉ. माधुरी भुषण खाम्बेटे, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा सहायक आयुक्त,पुणे महानगरपालिकेचे ज्ञानेश्वर मोळक व त्यांचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सलीम चाऊस यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह  उपस्थित राहून वाहतूक व्यवस्थेचे संचलन केले, तसेच जिल्हा रुग्णालय, औंध हे रुग्णवाहिके सह उपस्थित राहिले. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

तनिष्कबरोबर जुन्या सोन्याची अदलाबदल योजना

पुणे-भारतात पहिल्यांदाच, तनिष्क या दागिन्यांच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅंडने आणली आहे एक अशी योजना जी सोनेप्रेमींसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे. २२कॅरेट शुद्धतेच्या जुन्या सोन्याच्या मोबदल्यात नवीन सोने,तेही शून्य टक्के घट काढून, आणि प्रत्येक १०ग्रॅम सोन्याच्या बदल्यात*(अटी लागू) मिळवा रू.३३६० पर्यंत जास्त. ही योजना तनिष्कच्या सर्व शोरूम्समध्ये उपलब्ध आहे आणि अत्यंत योग्य वेळी जाहीर झाली आहे, जेव्हा ग्राहक सणासुदीसाठी आणि इतर शुभकार्यांच्या निमित्ताने सोने खरेदी करतात. तनिष्कबरोबरच्या सोन्याच्या व्यवहारातले फायदे खालीलप्रमाणे:

तनिष्कबरोबर जुन्या सोन्याची अदलाबदल करण्यात तुमचे ५ फायदे आहेत:

  • अत्यंत अद्ययावत अशा कॅरेटमीटरवर तुमच्या सोन्याची शुद्धता तपासली जाते.
  • तनिष्कचा सोने खरेदी भाव त्यांच्या विक्रीच्या भावाइतकाच असतो.
  • तनिष्कमध्ये तुमचे सोने तुमच्या समोर वितळवून त्याचे वजन केले जाते.
  • कुठलेही जुने दागिने येथे विकले जात नाहीत. ते वितळवून त्यांचे नवे दागिने घडवले जातात.
  • तुम्हाला खड्यांची किंमत सोन्याच्या भावात कधीच द्यावी लागत नाही.

दीपिका सभरवाल तिवारी, सहकारी उपाध्यक्ष, मार्केटिंग, ज्वेलरी विभाग, टायटन कंपनी लिमिटेड, या योजनेविषयी त्यांचे विचार मांडताना म्हणाल्या “तनिष्कचा तत्वनिष्ठ आणि चोख व्यवहार ग्राहकांना गेली वर्षानुवर्षे संतुष्ट करत आला आहे. ही योजना म्हणजे या विश्वासाचेच फलित आहे. या योजनेद्वारे चोख व्यवहार तर होतोच पण ग्राहकांच्या आवडीनिवडीचाही मान राखला जातो. योजनाबद्ध आणि पूर्वनियोजितसोने खरेदीसाठी ओळखले जाणारे भारतीय ग्राहक या योजनेद्वारे त्यांच्या जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने नक्कीच घेतील.

तनिष्कविषयी:

तनिष्क या टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय दागिन्यांच्याब्रॅंडने त्यांच्या अद्वितीय कारागिरीमुळे, खास डिझाइन्समुळे आणि चोख व्यवहारामुळे गेल्या दोन दशकांमध्ये ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. भारतीय स्त्रीचे अंतरंग समजून घेणारा आणि तिला तिच्या आवडीप्रमाणे कधी परंपरागत तर कधी आजच्या युगाचे दागिने पुरवणारा एकमेव ब्रॅंडम्हणूनतनिष्क प्रसिद्ध आहे. याच लौकिकाला साजेसा ‘ भारतातलासर्वाधिक विश्वासार्ह दागिनेब्रॅंड’ हा पुरस्कार तनिष्कला‘ट्रस्ट रिसर्चऍडव्हायजरी’ यांच्यातर्फे २०१७मध्ये मिळाला आहे. त्यांच्या याच लौकिकाला अधोरेखित करणारी तनिष्क शोरूम्स अद्ययावत अशाकॅरेटमीटरने सुसज्ज आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोन्याची शुद्धता सर्वाधिक खात्रीलायक पद्धतीने पडताळता येते.सोनेआणि हिऱ्यांच्या ५००० हुन जास्त डिझाइन्सचे भारतीय, पाश्चात्य आणि या दोन्हींचा मेळ घालणारे दागिने तनिष्क तुम्हाला पुरवतात. त्यांचेअद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा कारखान्यांमध्ये तयार झालेले दागिने म्हणजे कलेचा सर्वोच्च अविष्कार असतात. तनिष्कच्या रिटेल साखळीत१२१ शहरांमधल्या २१० खास शोरूम्स आणि बुटीक्स गुंफलेल्या आहेत.

ससून मधील सुधारणांसाठी सीएसआर चा उपयोग व्हावा – चंद्रकांत दळवी

0

पुणे– “ससूनसारख्या सरकारी रुग्णालयातून गरीब रुग्णांना आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निधीबरोबरच सामाजिक आणि उद्योग संस्थांच्या सीएसआरचा महत्वाचा वाटा आहे. मुकुल माधव फाउंडेशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन ससूनमधील आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात,” असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. 

फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पचनसंस्थाविकार निदान व उपचार केंद्राचे (एन्डोस्कोपी युनिट) आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी सर्व सुविधांनी युक्त प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन व लोकार्पण चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले. ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ यांच्या स्मरणार्थ हे केंद्र आणि प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आले आहेत. याप्रसंगी हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. फिलिप अब्राहिम, लंडन येथील रॉयल कॉलेजचे डॉ. अरविंद शहा, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रितू प्रकाश छाब्रिया, प्रकाश छाब्रिया, ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. शशीकला सांगळे, डॉ. शीतल महाजन, डॉ. हरीश टाटिया, विनोद रोहानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, “मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या या एन्डोस्कोपी युनिटमुळे अनेक गरजू रुग्णांवर अल्प दरात उपचार शक्य होणार आहेत. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या प्रयत्नातून गेल्या काही वर्षात ससून अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. अनेक संस्था येथे आर्थिक सहकार्य करीत आहेत. शासकीय रुग्णालयांतून गरजू रुग्णांना अधिक लाभ होण्यासाठी या रुग्णालयांचे आधुनिकीकरण गरजेचे आहे. मुकुल माधव फाउंडेशनसारख्या पुण्यातील आणि आजूबाजूच्या कंपन्या आणि संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा.”

डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, “एन्डोस्कोपी केंद्रात एंडोस्कोपिक रिट्रोग्रेट कोलनजीओ पॅनक्रीटोग्राफी (ईआरसीपी) हे अत्याधुनिक उपकरण बसविण्यात आले आहे. या तपासणीद्वारे खडा (स्टोन), ट्युमर यामुळे होणारे ब्लॉकेज तपासता येईल. या केंद्रामुळे तपासणी आणि उपचाराचे दिवस वाढणार असून, जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयाला आयकर खात्याची ८० जी ची सुविधा मिळाल्याने सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी ससूनच्या रुग्णाभिमुख विकासाला हातभार लावावा.”

रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या रुग्णांनाही एन्डोस्कोपी उपचार मिळावेत, या हेतूने फाउंडेशनने या केंद्राचे आधुनिकीकरण केले आहे. तसेच ससूनमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी नऊ ठिकाणी प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहेत. त्यातील बाल रुग्ण विभागाजवळील पहिल्या प्रतीक्षा कक्षाचे आज लोकार्पण झाले. येत्या काळातही ससूनच्या विविध विभागांच्या आधुनिकीकरणात मुकुल माधव फाउंडेशन सहकार्य करणार आहे.”

शिवजयंतीनिमित्त लोहगडावर ध्वजारोहण

0

पुणे- जय भवानी, जय शिवाजीचा नारा देत नवजागृती मित्र मंडळाचे कार्यकर्ते लोहगडावर पोहचले आणि सर्वाधिक उंच असलेल्या विंचु कड्यावर भगवा ध्वज फडकाविला. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता.

नवजागृती मित्र मंडळ हे पुण्यातील सोमवार पेठेतील असून मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी औंढेचे माजी सरपंच अर्जुन पाठारे, लोहगडचे माजी सरपंच गणेश धानीवले, नवजागृती मित्र मंडळाचे पंकज अगरवाल, अनुपम गवारे, अक्षय बारस्कर, प्रतीक सराफ, जगनाथ लोखंडे, प्रशांत सराफ, निमिष अगरवाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा यासाठी या इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले पाहण्यासाठी औंढे व औंढोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही किल्ल्यावर नेण्यात आले होते. मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती अध्यक्ष राहुल शर्मा यांनी दिली.

लोहगाव विमानतळ जमीन हस्तांतरण संबंधी तातडीची बैठक – खा. अनिल शिरोळे

0

पुणे-लोहगाव विमानतळ संबंधी राज्य सरकार तर्फे २५ एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री तसेच केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी ह्यांनी राज्य सरकारला ३० जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यात चर्चा झाली असून जागा देण्याचे तत्वत: मान्य करण्यात आल्याची माहिती शिरोळे ह्यांनी आज संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत गडकरी ह्यांची भेट घेतल्यानंतर बोलताना दिली आहे. तसेच ह्या संबंधी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधिताची बैठक पुणे महापालिका आयुक्त यांनी बोलाविण्याची सुचना देखील गडकरी ह्यांनी केली असून त्यानुसार आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार ह्यांच्याशी शिरोळे यांनी तातडीने बैठक घेण्यास सांगितले आहे. श्री. कुणालकुमार यांनी तातडीने बैठक ठरवतो असे सांगितले आहे.

ऱ्हीदम वाघोलीकर, रचना खडीकर -शहा यांना ‘राष्ट्रीय कला गौरव ‘ पुरस्कार जाहीर

0
पुणे –
भारतीय पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युवा लेखक ऱ्हीदम वाघोलीकर ( पुणे ) , रचना खडीकर -शहा ( मुंबई )यांना ‘ कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक, नासिक येथे ११ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती महेंद्र देशपांडे यांनी दिली.
-हीदम वाघोलीकर आणि रचना खडीकर -शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. रचना खडीकर -शहा या लता मंगेशकर यांची भाची आहेत.
लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ ( इंडियन हार्प ) आकारात प्रकाशित होत आहे