Home Blog Page 3177

पाण्याचाही घोटाळा ; गोष्ट अजब गजब कारभाराची ..

0

 

पुणे :महापालिका आयुक्तपदावर गेली सुमारे ४ वर्षे एकच व्यक्ती कार्यरत आहेत ,या काळात  ज्या महापालिकेत ७२ बोगस कर्मचारी कार्यरत असणे ,१००० कोटीचा  २४ तास पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार होण्याचा प्रयत्न उघड झाल्याने राज्य सरकारच्या आदेशाने फेर टेंडर काढावे लागणे  ,दीड कोटीच्या सॅनिटरी नॅपकीनसाठी १५ कोटीचे इस्टीमेट करणे, कात्रज कोंढवा रस्त्याच्या  टेंडरप्रकरणात हि काही कोटीचा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होण्यामुळे फेर टेंडर काढावे लागणे असे असंख्य प्रकार उघडकीस आले, तसेच जलसंपदा खाते आणि पालिका यांच्या पुण्यासाठी  खडकवासला धरणातून घेतलेल्या पाण्यासंदर्भात देखील सुमारे ३५० कोटी रकमेवर वादंग सुरु  असण्याच्या अजब गोष्टी चव्हाट्यावर असतानाही  विविध स्तरावर पालिकेला बक्षिसे मिळवून देण्यात  आयुक्तांना ज्या यश आले ,त्यांना दिल्ली दरबारी प्रमोशन मिळणे अशा गजब कारभाराची ..आणि त्यांना बळी पडणाऱ्या राजकीय नेत्यांची चर्चा या पुढे निश्चित रंगणार आहे .

आता जलसंपदा आणि पालिका यांच्यातील ..मिटला …मिटला वाटणारा ३५४ कोटीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे . ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वापरले जात असल्याच्या कारणावरून, तर कधी थकबाकीच्या कारणांवरून राज्याच्या जलसंपदा विभागाकडून वारंवार महापालिकेकडे वसुली साठी तगादे करण्यात आले आहेत . पालिकेत व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असूनही असे घडणे हि गजब चीच गोष्ट मानली जाते .. आत्ता पुन्हा एकदा जलसंपदा विभागाने पालिकेला 395 कोटींची पाणीपट्टीची थकबाकी 20 मार्चपर्यंत भरली नाही, तर शहराचे पाणी बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवले आहे.

 यापूर्वीसुद्धा जलसंपदा विभागाने थकबाकी वसुलीसाठी महापालिकेला पत्र पाठवली आहेत. यावर महापालिका प्रशासन बिलाची तपासणी करून निर्णय घेईल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात येत आली . आता जलसंपदा विभागाने 20 मार्चपर्यंतची अंतिम मुदत पालिका प्रशासनाला दिली आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. बी. शेलार म्हणाले, महापालिकेबरोबर झालेल्या करारानुसार 1.25 टीएमसी पाणी महिन्याला घेणे अपेक्षित आहे; मात्र पालिका यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे. महापालिकेला वारंवार पाण्याची बचत करण्याच्या सूचना देण्यात  आल्या आहेत. अन्यथा भविष्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. महापालिका प्रशासनाने त्वरित थकबाकी भरावी असे त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, जलसंपदा विभागाने वाढीव बील पाठवले आहे. यासंदर्भात आम्ही बिलाची विस्तृत माहिती मागवली आहे. जोपर्यंत ही माहिती मिळत नाही तोपर्यंत बील भरता येणार नाही. महापालिका कोणत्याही प्रकारे अतिरिक्त पाणी वापर करत नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पालिका प्रशासन हे जास्त पाणी वापरत असल्यामुळे नियमाप्रमाणे दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे 354 कोटींची थकबाकी झाली असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे महापालिका 10 टक्के पाणी हे व्यवसायिक वापरासाठी देते. करारामध्ये केवळ 2.5 टक्के म्हटले आहे. त्यामुळे बिलामध्ये रक्कम वाढवण्यात आली आहे. 

पालिका प्रशासन हे 97.50 टक्के पाणी हे घरगुती वापरासाठी देत असून, उरलेले पाणी व्यावसायिक वापरासाठी देत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी याच पद्धतीने बील जलसंपदा विभागाला अदा केले जाते. मात्र जलसंपदा विभागाने महापालिकेचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. 2011 पासून 89 टक्के वापर घरगुती पाण्यासाठी आणि शिल्लक पाणीसाठा व्यावसायिक वापरासाठी देण्यात येत आहे. त्याचबरोबर 11.5 टीएमसी पेक्षा जास्त पाणी वापरल्यामुळे 354 कोटींची थकबाकी झाली असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

दरम्यान राज्यात आणि पालिकेत नेमकी सत्ता अधिकारी चालवितात पण त्यांच्या कारभारातील अशा भोंगळपणावर  लोकनियुक्त प्रतिनिधी नेमके काय करतात ..असा भोंगळ कारभार असतानाही कारवाई एवजी प्रमोशने कशी करतात ? असा प्रश्न प्रामाणीकांना सतावणार आहे.

 


 

पुण्यातून ‘आयटम ’ या नाटकाला नामांकन

0

द महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटायांच्यातर्फे आठवडाभर चालणाऱ्या१३व्या राष्ट्रीय रंगभूमी महोत्सव आणि पुरस्कारसोहळ्यासाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेतहा सोहळा १३ ते १८ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथील कमानी सभागृह आणि श्रीरामसेंटर येथे होणार आहेयावेळी वैविध्यपूर्ण विषयांवरील नामांकने मिळालेल्या १० कलाकृती आदरणीय परीक्षक आणि श्रोत्यां समोर सादर होतील. या वर्षीची अंतिम१०नाटके आसामी,बंगालीइंग्रजीहिंदीकन्नडमल्याळी आणि मणिपुरी भाषेमध्ये सादर होणार आहेत.

 

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करा -धर्मादाय सहआयुक्तांकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

0

पुणे-दीनानाथ मंगेशकर रूग्णालय धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. रूग्णालयात जादुटोणा होतो हे धक्कादायक व निषेधार्ह आहे. म्हणून… दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा परवाना रद्द करावा… कारण एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे. म्हणून संबंधितांवर कारवाई करावी…अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे आणि कार्यकर्त्यांनी केली आहे .

या संदर्भात शिंदे यांनी म्हटले आहे कि,डॉ. सतीश चव्हाण या डॉक्टरने महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क ‘मंत्रतंत्राचा वापर केला’ हे स्पष्ट झाले. मात्र या भोंदूगिरीत रूग्न महिलेचा मृत्यू झाला. हि घटना अतिशय धक्कादायक असून दुर्दैवाने या बनावट भोंदूगिरीत विवाहितेला जिव गमवावा लागला. हा सर्व प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला आहे.समतावादी चिकित्सक पुण्यातील स्वारगेट परिसरात कर्मठ डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे सौ. संध्या सोनवणे (वय २४ वर्ष) या महिला उपचारासाठी आली होत्या. त्यांच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला होता. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली गेली म्हणून त्यांना तातडीने डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात आले.त्याठिकाणी असे मंत्रतंत्राचे प्रकार सुरू असल्याने एका महिलेचा जिव गेला. म्हणून संबंधीत दोषी प्रशासनावर ‘मानवी हत्येसह अंधश्रध्दा विरोधी गुन्हा दाखल करून कठोर शासन झाले पाहिजे. तसेच रुग्णालयाचे  वैद्यकीय प्रमाणपत्र रद्दकेले पाहिजे यासह

राज्य सरकारने रूग्णालयास मिळणारे सर्व शासकीय अनुदान बंद करावे.,मृत सौ. सोनवणे यांच्या मुलांना पालकत्व म्हणून रूग्णालयाने ५० लाख रूपये तातडीने मदत करावी.  पुणे शहर व जिल्ह्यात सर्व रूग्णालयात अशासकिय सदस्यांची तातडीने नियुक्ती करून त्यांना हक्क अधिकार द्यावेत.हे प्रतिष्ठित हास्पिटल समस्या व तक्रारींचा ड्डा आहे… तर त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यां कर्मचाऱ्यासह सामान्य लोकांचे हद्दपार केंद्र बनले आहे असेही संभाजी ब्रिगेड ने म्हटले आहे.

यासंदर्भातील निवेदन ब्रिगेडच्या वतीने सहा. धर्मादाय आयुक्त नवनाथ जाधव यांना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, अमर जमादार, नगर जिल्हा सचिव टिळक भोस, छायाताई खैरनार, अॕड. विकास शिंदेयांनी दिले .

संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा मुंबईत २६ मार्चला मोर्चा-प्रकाश आंबेडकर

0

मुंबई-कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. संभाजी भिडेंविरोधात अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मार्चपर्यंत आम्ही मुदत देतो आहोत. कायदा सगळ्यांना सारखा आहे. मिलिंद एकबोटेंना अटक झाली आता संभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक झाली नाही तर मुंबईत धडकणार आहोत आणि जोपर्यंत संभाजी भिडेंना अटक केली जात नाही तोपर्यंत मुंबईचा ताबा सोडणार नाही असा इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करून येताना दलित बांधवांवर दगडफेक झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांची चिथावणी असल्याचे समोर आले त्यानंतर भारीप बहुजन महासंघाने मुंबई बंदचीही हाक दिली होती. तसेच हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी या दोघांना अटक का होत नाही असा प्रश्न वारंवार आंबेडकरी संघटना आणि विरोधकांकडून विचारण्यात आला. अखेर मिलिंद एकबोटेंना या प्रकरणी अटक झाली. त्यानंतर संभाजी भिडेंनाही अटक करण्यात यावी अशी मागणी होते आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आता २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर २६ मार्चलाच मुंबईवर मोर्चा काढू आणि मुंबई भिडे यांच्या अटकेपर्यंत ताब्यात घेऊ असाही इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा :पदाधिकाऱ्यांसह ,अधिकारी गायब?

 

पुणे- ‘एक वर्ष अंधकाराचे’  या नावाने राष्ट्रवादीने महापालिकेच्या सत्ताधारी भाजपा च्या विरोधात लाल महालावरून थेट महापालिकेवर मोर्चा नेला . मात्र कोणीही पदाधिकारी ,वरिष्ठ अधिकारी या मोर्चाला सामोरे गेले नाहीत . यावेळी केवळ स्थायीसामिती अध्यक्ष योगेश मुळीक महापालिकेत होते. आयुक्त ,अतिरिक्त आयुक्त , महापौर ,उपमहापौर, सभागृह नेते … मोर्चा आला तेव्हा महापालिकेत नव्हते. मात्र सुरक्षा विभागाचे प्रमुख उमेश माळी यांनी महापालिकेचे सर्व दरवाजे कुलूप बंद करून आतूनच विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांच्याशी काही क्षण चर्चा केली. अखेर महापालिकेच्या बंद गेट समोर भाषणे देऊनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चाची सांगता केल्यानंतर, कार्यकर्त्यांची पांगापांग झाल्यानंतर  महापालिकेचे दरवाजे उघडले गेले . आणि मोर्चातील नगरसेवक ही नंतर आत आले .

भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील सत्तापूर्तीला एक वर्ष पूर्ण झाले. पालिकेतील  सत्ताधारी सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत वर्षभरातील भाजपच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करण्यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘एक वर्ष अंधकाराचे’ या नावाने महापालिकेवर निषेध मोर्चा काढला . या  मोर्चात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काळे फेटे व काळे टीशर्ट परिधान करून भाजपच्या वर्षपूर्तीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. दरम्यान, या मोर्चात बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध दर्शवण्यासाठी बालंगंधर्व व महापुरुषांच्या वेशभुषा करुन कलाकार सहभागी झाले होते. 

लाल महाल येथून ‘एक वर्ष अंधकाराचे’ या नावाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. तो शनिवार वाड्यास वळसा घेऊन बाजीराव रस्त्यावरून शिवाजी पूल मार्गे पालिकेवर काढण्यात आला.  मोर्चा पालिकेसमोर आल्यानंतर पालिकेसमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या गेटला गाजराचा हार घालून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

देश, राज्य आणि पालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपने नागरिकांना पोकळ आश्‍वासने देण्यापलिकेडे काहींही केले नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांपैकी कोणतेही आश्‍वासन सत्ताधार्‍यांनी पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे आणि फसव्या योजना जाहीर करण्याचेच काम सत्ताधार्‍यांनी आजवर केले आहे. भाजपची सत्ता येऊन वर्षपूर्ती होत आहे. ही भाजप सत्तेची वर्षपूर्ती नसून, पुणेकरांच्या अंधकाराची वर्षपूर्ती आहे. पुणेकरांनी अत्यंत विश्‍वासाने विकासासाठी महापालिकेत भाजपला सत्ता दिली; परंतु गुंडगिरी, निविदांमध्ये संगनमताच्या प्रकारे नातेवाईकांना विकास कामे देणे, भ्रष्टाचार यांचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.  

दीपक मानकर म्हणाले, ‘‘सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांना गाजर दाखविण्याचेच काम केले आहे. दुर्बल घटकांसाठी पूर्वी सुरू असलेल्या योजना या सत्ताधाऱ्यांनी बंद केल्या आहेत. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास आमचा ठाम विरोध आहे. शिवसृष्टीच्या बाबतीतही या सरकारने फसवणूक केली आहे. प्रत्येक जाती धर्माला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्याचे काम या सरकारने केले आहे.’’ 

चेतन तुपे म्हणाले, ‘‘पराभवामुळे विरोधकांच्या डोळ्यावर अंधारी आली म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी आणि दिशाहीन कारभार पाहुन पुणेकरांच्या डोळ्यावर अंधारी आली आहे. ज्या दिवशी पुणेकरांच्या डोळ्यावरील अंधारी दूर होईल तेव्हा ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवतील. 

कॉग्रेस कार्यकर्ते व नेत्यांची पाठ :

पालिकेत सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या भाजपचा निषेध करण्यासाठी सुरुवातीस पालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात कॉग्रेस पक्षही सहभागी होणार असल्याचे आणि हा मोर्चा आघाडीतर्फे काढण्यात येणार असल्याचे कॉग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी जाहीर केले होते. मोर्चात सहभागी झालेल्या रथावरही आघाडीतर्फे मोर्चा असे नमूद केले होते. प्रत्येक्षात मात्र, या मोर्चात कॉग्रेसचे कोणीही कार्यकर्ते किंवा नेते सहभागी झाले नाहीत.

 

 

..या महापालिकेचे बंद सारे दरवाजे …(व्हिडीओ)

0


पुणे- प्रत्यक्षात बोगस कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पुणे महापालिकेने कोणीही आत येवू जावू नये म्हणून कित्येक महिन्यांपासून महापालिकेचे सारे दरवाजे बंद करून ठेवले आहेत . असंख्य दरवाजे असलेल्या या महापालिकेचा एकच दरवाजा येण्यासाठी आणि एकाच जाण्यासाठी ठेवून मोठ्ठी वाहतूक कोंडी खुद्द यांनींच करून ठेवली आहे . याचा सर्वाधिक त्रास होतो तो महापालिकेबाहेर गाड्या लावून आत पायी ये -जा करणाऱ्यांना ,किंवा सार्वजनिक बस ने येणाऱ्यांना… पण सुरक्षा विभाग ज्यांच्याकडे ते खूप दक्ष अधिकारी … बोगस कर्मचाऱ्यांना थारा द्यायचा नाही म्हणून आलेल्या अहवालाने त्यांनी हि कोंडी तर करून ठेवली … पण ती बोगस कर्मचाऱ्यांची नाही तर आम जनतेची कोंडी ठरली …. हे सर्व ठाऊक असूनही ..महापालिकेचे पदाधिकारी मुग गिळून … निर्णयाचे स्वागत करत आले आहेत .
आज तर अजबच किस्सा घडला …
शिवसेनेचे आंदोलन महापालिकेच्या आवारात .. पायऱ्यांवर झाले. पण त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचा मोर्चा येईल म्हणून सारे दरवाजे कुलूप बंद करण्यात आले . अनेकांना पालिकेच्या कोर्टात यायचे होते आणि जायचे होते त्या साऱ्या नागरिकांची मोठी ससेहोलपट झाली ..शिवाय अधिकारी कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून मिळाला मनस्ताप …
मोर्चेकरूंनी सुदैवाने कोणतेही आक्रमक धोरण स्वीकारले नव्हते . अनेक प्रेस फोटोग्राफर आणि काही पत्रकार उड्या मारून आत आले ..त्यांना त्याक्षणी होणाऱ्या घटना टिपायच्या होत्या..
मोर्चा संपला ..पांगला .. तरीही दरवाजे उघडायचे कोणी नाव घेईना … पहा हा व्हिडीओ…
या व्हिडीओ मध्ये माजी महापौर राजलक्ष्मी भोसले तुम्हाला दिसतील ….. त्यांचे हि ऐकले नाही .. आणि पळून गेले सारे .. आमच्याकडे चावी नाही म्हणाले …. (पण अंदर कि बात है .. चाव्या त्यांच्याच खिशात होत्या … माळी साहेबांची ऑर्डर होती … आणि यांच्यात परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्याची हिम्मत मात्र नव्हती … केवळ आदेशाची गुलामगिरी …)
पहा हा व्हिडीओ…..

पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदा ‘ग्लोबल पुलोत्सव’

0

पुणे-पु. ल. देशपांडे यांच्या 8 नोव्हेंबर 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत पु.ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने भारतातील 20 शहरात आणि भारताबाहेरील 5 खंडातील 30 शहरात ‘ग्लोबल पुलोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, सतीश जकातदार, पुण्यभूषण प्रतिष्ठानचे डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे उद्घाटन करण्यात आले.

वर्षभर होणाऱ्या या ग्लोबल पुलोत्सवात 500 कलाकार, साहित्यिक, आणि प्रमुख पाहुणे सहभागी होतील. परंपरेनुसार प्रत्येक शहरातील पुलोत्सवात ‘पु. ल. स्मृती सन्मान’, पु.ल.जीवन गौरव’ ‘पु. ल. कृतज्ञता सन्मान’, आणि पु. ल. तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

भारतातील पुणे, मुंबई, ठाणे, सांगली, नाशिक, जळगावसह 20 देशात पुलोत्सव साजरा होईल. तर भारताबाहेरील युरोप, आशिया, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आदी देशातील 30 शहरात ‘ग्लोबल पुलोत्सव’ हा कार्यक्रम साजरा होणार आहे. पुलोत्सव हा सर्वसमावेशक व्हावा आणि या महोत्सवात पु. ल. प्रेमी आणि विविध शहरातील संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मिलिंद एकबोटे १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत

0

पुणे : कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कोरेगाव-भिमा येथे वढू येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमादिवशी १ जानेवारीला दंगल उसळली होती. या दंगलीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एकबोटे यांनी या प्रकरणी जामिन मिळावा या साठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
संबंधित गुन्हा गंभीर असल्याने त्यांना १४ पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली होती. त्याला एकबोटे यांचे वकील अ‍ॅड. एस. के. जैन यांनी आक्षेप घेतला. जैन म्हणाले, एकबोटे यांचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही. पोलिसांनी कोठडी मिळविण्यासाठी जी कारणे दिली आहेत, ती योग्य नाहीत. पोलिसांना एकबोटे यांचा मोबाईल हवा आहे. त्यांना २ ते १० जानेवारी दरम्यान झालेल्या संभाषणाची माहिती हवी आहे. मात्र, ही माहिती पोलिसांना संबंधित मोबाईल कंपनीकडून देखील मिळू शकते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळला आहे. पोलिसांना तपास करण्याची संधी मिळाली पाहीजे. या साठी कमीत कमी कोठडी देण्याची मागणी न्यायालयाला केली. ती त्यांनी मान्य केली. 

 

रणांगणातून समोर येणार खल-नायक स्वप्नील

0

 

गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील
जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीच गोड भूमिकांमधून
आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला. रणांगण
चित्रपटाच्यानिमित्ताने हा मराठी सिनेसृष्टीचा नायक आता खल-नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटातून रणांगणात सुरू असलेलं एक वेगळंच युध्द प्रेक्षकांसमोर येणार आहे. ज्यात स्वप्नील जोशी
आणि सचिन पिळगांवकर एकमेकांविरोधात उभे आहेत. या रणांगणात स्वप्नील जोशी आणि सचिन
पिळगांवकरबरोबरच, सिध्दार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे अशी दिग्गज
कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स
(जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि
जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार
यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. बाप-मुलाला एकमेकांविरोधात उभं करणाऱ्या या
चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केले आहे.
रोमँटिक भूमिका साकारून तरूणींच्या मनात घर करणारा स्वप्नील जोशी रणांगण या चित्रपटातून
पहिल्यांदाच खल-नायकाच्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे. रणांगण चित्रपटातून प्रेक्षकांसमोर
येणारा हा स्वप्नीलमधील खल-नायक प्रेक्षकांना कितीसा भावतो, हे लवकरच कळेल.

एसओटीसीर्फे पुणे येथे नवे स्टोअर सुरू

पुणे-एसओटीसी ट्रॅव्हलने ऑक्सफर्ड ब्लूज, साळुंके विहार रोड, केदारी नगर, वानवडी , पुणे येथे नव्या स्टोअरचे उद्घाटन केले आहे.एसओटीसीच्या दृष्टीने पुणे ही सक्षम बाजारपेठ असून त्यामध्ये दरवर्षी लक्षणीय प्रगती होत आहे. या बाजारातील जास्तीत जास्त क्षमता वापरण्यासाठी आणि ग्राहकांना टूरच्या आधी व नंतर उत्तम अनुभव देण्यासाठी एसओटीसी स्टोअर सुरू करायचे ठरवले, जेणे करून ग्राहकांना त्यांच्या हॉलिडेविषयक सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करता येऊ शकतात. उत्कृष्ट हॉलिडे पॅकेजेस बुकिंग करण्याबरोबरच, प्रवाशांना विविध डील व खास सवलतींचाही लाभ घेता येईल.

याविषयी बोलताना, एसओटीसी ट्रॅव्हलचे भारत व एनआरआय बाजारातील सेल्स हेड डॅनिअल डिसोझा यांनी सांगितले, “या अतिशय स्पर्धा असलेल्या व वाढत्या उद्योगामध्ये आमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ग्राहकांना मिळणारा अनुभव अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आम्हाला वाटते. आमच्या ग्राहकांना उत्तमोत्तम हॉलिडे अनुभव मिळणे गरजेचे आहे. स्टोअरचे ठिकाण मोक्याचे व सोयीचे आहे. ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करून आम्ही त्यांना दर्जेदार सेवा देतो”.

 

रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ‘अ‍ॅन्युअल डे’

0
पुणे :  
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’मध्ये  ‘अ‍ॅन्यअल डे’ साजरा करण्यात आला. ‘बॉलरूम पार्टी’ या संकल्पनेवर आधारित परफॉर्मन्स विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले. पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. ‘बेस्ट शेफ’ना पारितोषिके देण्यात आली. प्रा. अनिता फ्रान्झ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.

वर्ष सरले ..नशिबी कर्ज आले .. भाजपा सत्तेच्या वाढदिवशी शिवसेनेची बोंबाबोंब

पुणे- महापालिकेत भाजप सत्तेचे एक वर्ष पूर्ण झाले .सत्तेच्या पहिल्या वाढदिवशी च सेनेने भाजपच्या कारभारामुळे पुणेकरांच्या नशिबी कर्ज आले असा आरोप केला आहे आणि भाजप सत्तेच्या विरोधात महापालिकेच्या पायऱ्यावर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली .
शिवसेना गटनेते, संजय भोसले ,नाना भानगिरे ,संगीता ठोसर ,पल्लवी जावळे,विशाल धनवडे ,माजी उपमहापौर नंदू मोझे , आदी मान्यवर यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते .
पहा या आंदोलनाची झलक …..

शासकीय मध्यवर्ती इमारत येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या नेत्र तपासणी शिबीरास सुरुवात

0

पुणे दि. 15- पुणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था पुणे तर्फे आयोजित व लॉरेन्स ॲन्ड मेयो (ऑफ्टीकल्स) यांच्या सहकाऱ्याने जिल्हा माहिती कार्यालय, सभागृह, शासकीय मध्यवर्ती इमारत, तळ मजला येथे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक मोहन राठोड व जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, जे. डी. कुलकर्णी, कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रताप धापटे उपस्थित होते.

हे शिबीर 15 व 16 मार्च 2018 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबीराच्या पहिल्या दिवशी मध्यवर्ती इमारतीतील विविध विभागांच्या शंभरहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

सत्ता हातून गेल्याने विरोधकांच्या डोळ्यापुढे अंधारी … महापौर

0

पुणे : अनेक वर्षांची सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या डोळ्यापुढे अंधारी आली आहे. वर्ष पुर्ण झाले तरी ती गेलेली नाही. त्यामुळेच ते काळे वर्ष साजरे करत आहेत अशी टीका महापौर मुक्ता टिळक यांनी केली.उद्या राष्ट्रवादी , तसेच कॉंग्रेस आणि शिवसेना भाजपच्या सत्ताकाळातील अंधकारमय वर्ष म्हणून मोर्चा काढून निदर्शने करत आहेत या पार्श्वभूमीवर महापौरांनी त्यांचा सामना करणारे हे वक्तव्य आज पत्रकार परिषदेतून केले . वर्षपुर्तीनिमित्त महापौरांनी पत्रकारपरिषद घेतली .भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच  उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी यावेळी उपस्थित होते.

महापालिकेतील वर्षभराच्या सत्ताकाळात मागील पंधरा वर्षात झाली नाहीत तेवढी मोठी व महत्वाची कामे झाली आहे, असा दावा त्यांनी केला. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापालिकेत १५ मार्च २०१७ रोजी महापालिकेतील महापौर व अन्य सत्तापदे भारतीय जनता पार्टीने ग्रहण केली. मेट्रो, २४ तास पाणी योजना, नदीकाठ संवर्धन योजना, नदीसुधार योजना पहिल्याच वर्षात मार्गी लावल्याचे महापौरांनी सांगितले. तर मुरलीधर मोहोळ यांनी मिळकतकर देणाऱ्या कुटुंबप्रमुखासाठीची अपघात विमा योजना, वैद्यकीय तसेच परिचारिका महाविद्यालय या योजनांना गती दिल्याचे सांगितले .  भिमाले यांनी मिळकत कर विभागाचे उत्पन्न जीआयएस यंत्रणेमुळे वाढले असल्याचा दावा केला. कॅन्सरमुक्त पुणे, लहूजी वस्ताद स्मारक, शिवसृष्टी या योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश मुळीक यांनी आगामी वर्षात या सर्व योजना पुर्ण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.
शहराध्यक्ष गोगावले यांनी पक्षाचे काम महापालिकेत जाहिरनाम्यानुसार सुरू असल्याचे सांगितले.
शिवसृष्टी बीडीपीत होणार आहेच एवढेच  नव्हे तर संपुर्ण शहराच्या बीडीपी धोरणाविषयी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली आहे. आमदार, खासदार यांनाही त्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात चर्चा होईल व नंतर मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्यात येईल असे भिमाले यांनीयावेळी स्पष्ट केले .

सलमानच्या आवाजावर नियंत्रण ठेवा -बालवडकरांचे पोलिसांना आवाहन

0

पुणे : येत्या शनिवारी होणाऱ्या सलमान खानच्या कार्यक्रमामुळे परीक्षा सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी  55 डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा ध्वनीक्षेपक बसविण्यास परवानगी देण्यात येवू नये, असे पत्र स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला दिले आहे.

याबाबत बालवडकर म्हणाले . अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अशा खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना घेऊन बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

 

येत्या शनिवारी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सलमान खान यांचा ‘दबंग टूर’ कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र त्या संदर्भात स्थानिक नगरसेवक बालवडकर यांनी आवाजाच्या संदर्भात पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली आहे. शिवजयंती, दहीहंडी, गणेशोत्सव काळात पोलिसांनी ध्वनी मर्यादा ओलांडलेल्या मंडळांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशावेळी लाखो रुपये कामावणाऱ्या आयोजकांना आश्रय दिला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या तरी 5 ते 9 वीच्या परीक्षा सुरू असल्याने परवानगी नाकारावी, असे पत्र त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे.