Home Blog Page 3167

महावितरणमध्ये पारदर्शक प्रणालीद्वार कंत्राटदाराचे देयक अदा होणार

0

मुंबई, दि. 05 एप्रिल 2018:-

     ग्राहकसेवा केंद्रित कार्यप्रणालीचा अवलंब करताना कामकाजात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी महावितरणच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून कंत्राटदारांचे देयक अदायगीसाठीही पारदर्शक प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे.

महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार इआरपी प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला कामाचे कार्यादेशही या प्रणालीच्या माध्यमातूनच दिला जात आहे. याबाबत महावितरणने 31 मार्च 2018 ला परिपत्रक जारी केले असून यात कंत्राटदराच्या कार्यादेशात (वर्क ऑर्डर) मध्ये इआरपी प्रणालीतून निर्मित करण्यात आलेल्या पी.ओ. (पर्चेस ऑर्डर) क्रमांकाचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा क्रमांक नसलेल्या कामाच्या देयकाला मंजूरी देण्यात येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे कंत्राटदारांना त्याचे देयक निश्चित कालमर्यादेत मिळणार असून महावितरणच्या विविध विकासात्मक कामांना अधिक गती लाभणार आहे.

पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीच्या कामानंतर वीजपुरवठा पूर्ववत

0

पुणे, दि. 05 : महापारेषणच्या मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या पूर्वनियोजित व पूर्वसूचित कामामुळे 220 केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. 5) सकाळी 7 वाजता बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पर्वती, पद्मावती, रास्तापेठ, कोथरूड विभागामधील विविध भागात वीजपुरवठा बंद होता. मात्र दुपारी दीड ते 4 वाजे दरम्यान या सर्व विभागांतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी, की देहूरोड कात्रज बायपास राष्ट्रीय महामार्गावरील 220 केव्ही मनाेऱ्याच्या (टॉवर लाईन) 220 केव्ही वीजवाहिन्यांची उंची (ग्राऊंड क्लिअरंस) वाढविण्याचे पूर्वनियोजित काम महापारेषण कंपनीकडून पूर्वकल्पना देऊन गुरुवारी (दि. 5) सकाळी 7 वाजता सुरु करण्यात आले. या कामासाठी 220 केव्ही पर्वती – नांदेड सिटी व 220 केव्ही पर्वती – फुरसुंगी या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे महापारेषणच्या 220 केव्ही व 132 केव्ही पर्वती उपकेंद्र, जीआयएस 132 केव्ही तसेच महावितरणच्या विविध 22 केव्ही उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद झाला. यात रास्तापेठ, कसबा पेठ, घोरपडी, मंडई, भवानी पेठ, मुकुंदनगर, शंकरसेठ रोड, महर्षीनगर, सॅलीसबरी पार्क तसेच वडगाव बुद्गुक, हिंगणे, विकास नगर, सिंहगड रोड, गुलटेकडी, सहकारनगर, मित्रमंडळ चौक, सुभाषनगर, पर्वती गाव, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, शारदा मठ, अरण्येश्वर, पेशवे पार्क, नर्‍हे, नांदेड फाटा, आंबेगाव पठार, धनकवडी, आंबेगाव, नवी पेठ परिसर, पौड रोड, कोथरूड, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, चव्हाणनगर, बालाजीनगर, संभाजीनगर, राऊत बाग, कोंढवा, कात्रज आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी 7 ते दुपारपर्यंत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद होता.

महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. रोहिदास मस्के यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्यासह सुमारे 70 अभियंते व कर्मचारी मनोर्‍याच्या वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या कामात सहभागी झाले होते. सुमारे 6 मीटर उंचीवर असलेल्या या दोन्ही 220 केव्ही वीजवाहिन्या सुमारे 12 मीटर उंचीवर नेण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी जवळच एक स्वतंत्र मनोरा उभारण्यात आला व त्याद्वारे सर्वप्रथम 220 केव्ही पर्वती -फुरसुंगी वाहिनीचे काम दुपारी सव्वा वाजता पूर्ण करण्यात आले. या वीजवाहिनीवरच 220 केव्ही पर्वती – नांदेड सिटी वाहिनाचा वीजभार देण्यात आला. आणि 220 केव्ही पर्वती -फुरसुंगी या एकाच वाहिनीवरून 220 केव्ही व 132 केव्ही पर्वती उपकेंद्ग, जीआयएस 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या सर्व उपकेंद्रांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु झाला आणि पर्वती, पद्मावती, रास्तापेठ व कोथरूड विभागामधील सर्व परिसरातील वीजपुरवठा दुपारी चारपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.

५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव-२०१८ ; प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

0

मुंबई –  ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी इडक, रेडू, झिपऱ्या,नशीबवान, मंत्र, मला काहीच प्रॉब्लेम नाही, असेही एकदा व्हावे, भेटली तू पुन्हा, क्षितिज-एक होरायझन, मुरांबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.  प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता प्रभो शिवाजी राजा, कॉपी, अ ब क या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी पिप्सी, ह्दयांतर, पळशीची पी.टी यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६१ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून श्री. सुरेश खरे, श्री. अरुण म्हात्रे, श्री. नरेंद्र पंडीत, श्री .अनंत अमेम्बल, श्री. केशव पंधारे, श्री. विजय कदम, श्री. शरद पोळ, श्री. नरेंद्र कोंद्रा, श्रीमती अंजली खोबरेकर, श्री.शरद सावंत, श्री. जाफर सुलतान, श्री. अशोक राणे, श्री. सतीश रणदिवे आणि श्रीमती कांचन अधिकारी यांनी काम पाहिले.

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार ३० एप्रिल २०१८रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.

चित्रपट
1)उत्कृष्ट कलादिग्दर्शन
कै.साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्ह
विनायक काटकर
झिपऱ्या
2)उत्कृष्टछायालेखन
कै. पांडूरंगनाईकपारितोषिकरु. 50,000/- व मानचिन्ह
अर्चना बोराडे
इडक

3)उत्कृष्ट संकलन रु. 50,000/- व मानचिन्ह
देवेन्द्र मुर्डेश्वर
झिपऱ्या

4)उत्कृष्टध्वनीमुद्रण रु. 50,000/- व मानचिन्ह
दिनेश उचील
पल्याडवासी

5)उत्कृष्टध्वनीसंयोजन रु. 50,000/- व मानचिन्ह
रसूल पुकुटी
अर्णव दत्ता
क्षितीज-एक होरायन

6 )उत्कृष्ट वेशभूषा रु. 50,000/- व मानचिन्ह
प्रकाश निमकर
झिपऱ्या

7 )उत्कृष्टरंगभूषा
रु. 50,000/- व मानचिन्ह
श्रीकांत देसाई
रेडू

8) उत्कृष्टबालकलाकार
कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि
रु. 50,000/- व मानचिन्ह
साहिल जोशी-
मैथिली पटवर्धन
अ ब क
पिप्सी

 

मुंबई विद्यापीठाच्या दुरावस्थेला सरकार आणि राज्यपाल जबाबदारः सचिन सावंत

0

लाखो विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे भविष्य चुकीच्या हातात

मुंबई –

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शिक्षणसंस्थाच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक दीडशेपेक्षा खाली गेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या दुरावस्थेला राज्यातील फडणवीस सरकार आणि राज्यपाल हे जबाबदार असून लाखो विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे भविष्य चुकीच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबई विद्यापीठ हे देशातील आद्य विद्यापीठांपैकी एक असून या विद्यापीठाची स्थापना १८५७ साली झाली. देशातील अनेक नामवंत व्यक्तीमत्त्वांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाची पदवी घेतल्याचा अभिमान माझ्यासह अनेकांना होता, तशी परिस्थिती आता राहिली नाही याचे दुःख सावंत यांनी व्यक्त केले. एकेकाळी जागतिक स्तरावर पहिल्या ५०० व  आशिया खंडातील पहिल्या १५० विद्यापीठात स्थान मिळविणा-या मुंबई विद्यापीठाला देशातल्या पहिल्या १५० शिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळू नये ही शोकांतिका आहे. जवळपास ८ लाख विद्यार्थीसंख्या असलेल्या या विद्यापीठात गेल्या दोन- तीन वर्षापासून परीक्षा पध्दती, निकालाची प्रक्रिया आणि शिक्षणाचा दर्जा यामध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. राज्यपाल आणि सरकार यांचा शिक्षणाकडे संघ विचारधारेच्या चष्म्यातून पाहण्याचा दृष्टीकोन आणि शिक्षणाच्या दर्जापेक्षा संघ विचारधारा रूजवण्यासाठी अकार्यक्षम व्यक्तींची महत्वाच्या पदांवर केली गेलेली नेमणूक याला कारणीभूत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून कुलगुरुंसह विद्यापीठातील सर्वच वरिष्ठ अधिकारी प्रभारी आहेत. नविन कुलगुरु निवडीची प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असून त्यासाठीची निवड समितीही वादात सापडली असून यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील इतर विद्यापीठांची परिस्थिती ही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारी राहिली नाही. राज्यातील इतर खासगी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी आपला दर्जा राखून महाराष्ट्रात गुणवत्ता आहे हे दाखवून दिले आहे. यातूनच राज्यातील सरकार पूर्णपणे अकार्यक्षम असून सरकारच्या चुकीची धोरणे, सर्वच संस्थात राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाशी संबंधीत लोकांच्या नियुक्त्या करण्याचा लावलेला सपाटा आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळेच  राज्याच्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून राज्यभरात शिक्षक आणि विद्यार्थी महाविद्यालयात असण्यापेक्षा रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत असे सावंत म्हणाले.

ससूनच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम का खोळंबले – संभाजी ब्रिगेडचा सवाल

0

पुणे-राज्य सरकारने १२० कोटी रुपयांची तरतूद करूनही ससून रुग्णालयाच्या बहुमजली इमारतीचे काम का खोळंबले? यात दोषी कोण ? असे सवाल करत तातडीने हे काम पूर्ण करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे . या संदर्भात आज ससून अधिष्ठाता अजय चंदनवाले व सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता किडे यांच्याकडे निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.अशी माहिती ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी येथे दिली .

संतोष शिंदे यांनी सांगितले कि, ससून सर्वोपचार रूग्णालयातील ११ मजली (बहूमजली) नवीन इमारतीचे काम दोन वर्षापासून खडलेले आहे. राज्य सरकारने १२० कोटी रूपये मंजूर करून मागील दोन वर्षापासून काम बंद आहे. सन २०१६-१७ मध्ये 62 कोटी तर २०१७-१८ मध्ये १६ कोटी रूपये बजेट आले. स्थापत्य कामाची गरज असताना… अंतर्गत खोडसाळपणामुळे विद्युतचे काम सुरू केले. सदर कामावर आजपर्यंत 7० कोटी रूपयांचे आतील Civil work व 20 कोटी रूपयांचे Elitrical Work या कामावर पैसे खर्च झालेले आहेत. परंतु काम बंद असल्यामुळे झालेल्या कामाची पडझड सुरू आहे. तरीही याकडे कोणतेही ही गांर्भियाने घेत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग दोन वर्षात निविदा प्रक्रिया पुर्ण करू शकलेला नाही. म्हणून सरकार कडून उपलब्ध अनुदान मिळून सुध्दा अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे व निविदा प्रक्रिये अभावी काम रखडलेले आहे. यामुळे सामान्य गरीब नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रूग्णांना वार्डमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे नागरिकांना (रूग्णांना) खाली जमिनीवर टाकले जाते… आणि अर्धवट बहूमजली इमारत पडून आहे.

‘११ मजली इमारत सामान्य रूग्णाला महत्त्वाची असून पिडीत व वंचितांना त्याचा फायदा झाला पाहिजे… म्हणून निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.

११ मजली (बहुमजली इमारत) दोन वर्षापासून अर्थवट कामामुळे पडून आहे… राज्यसरकारचे ११० कोटी रूपये पाण्यात… दोषींवर कारवाई करा…! याबाबत आम्ही राज्यपाल व  मुख्यमंत्री यांच्याकडे ही पाठपुरावा करणार आहोत…  असेही शिंदे यांनी सांगितले .

एमआयएम च्या नगरसेविकेला भाजपकडून विद्युत वितरण समितीचे सभासदत्व…

0

पुणे- भाजप आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष म्हणजे अगदी एकमेकांचे कट्टर विरोधक असा जनतेत समज आहे. . पुण्यात एमआयएम ने एक नगरसेविका निवडून आणून आपले खाते जरूर उघडले आहे . पण या नगरसेविकेला सत्ताधाऱ्यांशी जमवून घेण्याशिवाय बहुधा पर्याय उरलेला नसावा . पालिकेच्या मुख्य सभागृहात गेली तब्बल १ वर्षे विरोधी पक्षांसाठी असलेल्या बाकांवर न बसता  भाजपच्या सत्ताधारी गोटात बसून वेळोवेळी भाजपला सभागृहात सपोर्ट करीत वाटचाल करीत आलेल्या एमआयएम च्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी अखेर गेल्या ६ मार्च ला पालिका अर्थसंकल्पावर बोलताना आपली खंत बोलून दाखविली आणि विविध मागण्या मोठ्या खुबीने मांडल्या,नंतर कुठे नुकतेच त्यांना  सत्ताधाऱ्यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील विद्युत वितरण समितीचे सभासद पद सत्ताधाऱ्यांकडून दिले गेले आहे  . महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या सहीने कार्यालयीन आदेश काढला आहे . यानुसार विद्युत वितरण नियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समिती मध्ये १३ व्या क्रमांकावर एमआयएम च्या नगरसेविका लांडगे याचे नाव आल्याने शिवसेनेच्या भुवया उंचावल्या आहेत . या समितीत बापू कर्णे,अनिल टिंगरे ,शीतल सावंत,राहुल भंडारे,मारुती सांगडे, किरण जठार ,मुक्ता जगताप ,श्वेता गलांडे ,शीतल शिंदे,यांच्यानंतर अश्विनी लांडगे यांचे १३ वे नाव आहे. २६ मार्च रोजी आदेश काढण्यात आला असून या अन्वये एकूण १९ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे .
एमआयएम ला पालिकेत कार्यालय देणे, गटनेता म्हणून अधिकार मिळणे, अर्थ संकल्पात ओवेसी यांचा फोटो टाकणे  अशा मागण्यांबाबत लांडगे या प्रयत्नशील असून तिथपर्यंत त्या कशा पद्धतीने पोहोचतील हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे .

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित

0

पुणे : दोन गटात झालेल्या राड्यानंतर पुढे ढकललेली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. १०) होणार आहे. पुणे स्टेशनजवळच्या सहकारी संघ सभागृहात दुपारी बारा वाजता मतदान होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवर्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलला कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलने पराभूत केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात १९ तारखेला राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपद, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी मतदान होते. त्यासाठी नवनिर्वाचित २१ सदस्य आले होते. त्यातील १० सदस्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलच्या बाजुने होते. तर ११ सदस्यांचा आघाडी पुरस्कृत कुसाळकर पॅनलला पाठिंबा होता.
त्यावेळी मतदानाची कार्यक्रमपत्रिका मिळाली नसल्याचे कारण सांगत भाजप पुरस्कृत सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, मतदान कक्षातील टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्या. या गोंधळाचा व्हिडिओ प्रसारीत झाला होता. त्यात भाजप पुरस्कृत पॅनलचे भिकाजी पार्ले

गेन बिटकॉईन कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून सव्वादोन कोटींची फसवणूक

0

आठ जणांना सायबर क्राईम सेलकडून अटक

पुणे– बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गेन बिटकॉईन कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक करणा-या आठ जणांना सायबर क्राईम सेलकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी दत्तवाडी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एक बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा 0.1 टक्के बिटकॉईन असे 18 महिन्यात एका बिटकॉईनचे 1.8 बिटकॉईन असा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते.

दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील आकाश कांतीलाल संचेती (रा.मुकुंद नगर, पुणे) आणि काजल जितेंद्र शिंगवी (वय-25, रा.महर्षीनगर, पुणे) आणि व्यास नरहरी सापा (वय-46, रा.भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली. निगडी पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्यातील हेमंत विश्वास सूर्यवंशी (रा.बाणेर, पुणे), हेमंत बाबासाहेब चव्हाण (रा.हडपसर, पुणे), अजय तानाजी जाधव (रा.काळेवाडी, फाटा), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (रा.नवी दिल्ली) आणि हेमंत चंद्रकांत भोपे (वय-रा.डिएसके विश्व, धायरी) यांना अटक करण्यात आली.

दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील आरोपींनी त्यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार घेऊन अनेकांना गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत आणि त्यांची फसवणूक करत होते. तर आरोपी पंकज आदलाखा हा मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून कार्यरत आहे. त्याने पुणे, मुंबई दिल्लीसह भारतातीतल अनेकत शहरात आणि दुबई येथे गेन बिटकॉईनच्या प्रचारार्थ सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आरोपींनी यामार्फत स्वत:चा लाखो रुपयांचा फायदा करून घेतला आणि गुंतवणूकदारांना स्वत: तयार केलेले क्रिप्टो एमकॅप मार्फत परतावा दिल्याचे भासवून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली.

आतापर्यंत फसवणूक झालेल्या पुण्यातील 25 नागरिकांनी सायबर सेल येथे तक्रार दिली आहे. तर फसवणुकीचा आकडा 2.25 कोटी रुपयांपर्यत पोहोचला आहे. ज्या नागरिकांची अशाप्रकारे फसवणूक झाली त्यांनी सायबर क्राईम सेल गुन्हे शाखा, पुणे शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

समता, समानता, समाजिक एकता, बंधूता यांचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – संतोष शिंदे

0
‘पुणे- छत्रपती शिवाजी महाराज हे ‘कुळवाडीभुषण बहुजन प्रतिपालक होते…’ ते शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे  राजे होते. म्हणून शिवरायांना डोक्यावर घेताना त्यांचे सामाजिक एक्याचे विचार डोक्यात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या सामाजिक ऐक्याला, महान विचारांना… प्रत्येकाने प्रेरणा म्हणून जगण्यासाठी त्यांचे क्रांतिकारी शौर्य, स्त्री सन्मानाला, दुर्ग संपन्न वैभवाला… शेतकऱ्यांना सन्मानाला, रयतेच्या विश्वासाला, धुरंदर राजकारणाला, महान मातृत्वाच्या सन्मानाला… कार्यकर्त्यांनी सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे.असे प्रतिपादन येथे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केले . छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३३८वा स्मृती दिनाच्या औचित्याने शिवचरित्र’ वाचन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष रघूवीर तुपे, अशोकराव सातपुते, हवेली तालुका कार्याध्यक्ष शिवाजी पवार, जोतिबा नरवडे, संजय चव्हाण, सुरेखा जुजगर, सपना माळी, सचीन जोशी, महेंद्र जाधव, मंदार बहिरट, विवेक तुपे, अजय पवार आदी उपस्थित होते.

१३व्या महिंद्रा रंगभूमी सन्मान पुरस्कारांमध्ये -विजया मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार

0

पुणे-महिंद्रा थिएटर एक्सलन्स अॅवॉर्ड ( मेटा ) २०१८ सोहळ्यामध्ये यंदा ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांना ( मेटा ) २०१८ जीवनगौरव पुरस्कारष् देऊन गौरविण्यात येणार आहेण् विजया मेहता या नामवंत दिग्दर्शिका असण्याच्या जोडीला १९६०च्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीवरील आघाडीचे व्यक्तिमत्व आहेत तसेच त्यांनी रंगायन या नाट्य कला अकादमीची स्थापना केलेली आहे.

मेटा सोहळ्याचे हे १३ वे वर्ष असून यंदा परीक्षक मंडळामध्ये नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि राष्ट्रीय कला अकादमी एनएसडीद्धच्या माजी संचालिका अमल अल्लानाए लोकप्रिय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री लिलीएट दुबे नाट्य दिग्दर्शिका नीलम मानसिंग चौधरी चित्रपट निर्माते अभिनेते लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रजत कपूर नामवंत छायाचित्रकार शास्त्रीय नृत्यकलाकार आणि शाम भारतीय कला केंद्राच्या संचालिका शोभा दीपक सिंग यांनी यंदा मेटा पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम पहिले.

नवभारत निर्मितीच्या वतीने ‘नृत्योत्सव’-‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची जनजागृती

0
भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसीचे एकत्रित आविष्कार
१८ संस्थांमधील ७५० अभिजात नृत्य कलाकारांचा सहभाग
 
पुणे- नवभारत निर्मिती संकल्प-सिध्दीच्या वतीने शहरातील ७५० अभिजात नृत्य कलाकारांच्या साधनेचा आविष्कार असलेला नृत्योत्सव शनिवारी (ता. ७ एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे. या कार्यक‘माद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. ही माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, गुरु शमा भाटे, नीलिमा अध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अठरा नृत्य संस्थांतील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
नृत्यभारती, मनीषा नृत्यालय, नादरुप, कलावर्धिनी, नुपूरनाद, आर्टिट्यूड, शांभवीज, कलासक्त, नृत्यधाम, नृत्यप्रेरणा, सुनाट्य अमृतवर्षा, नृत्योन्मेष, चिदंबरम, नृत्यप्रिया आणि ओडिसी या संस्थांचा सहभाग आहे. हा कार्यक‘म सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
नृत्य ही सर्वसमावेशक कला आहे. संगीताचे दृश्य रूप म्हणजे नृत्य, चलत शिल्प म्हणजे नृत्य आणि कायिक अभिनय म्हणजे नृत्य. सर्व भारतीय नृत्यशैलींना प्राचीन परंपरा आहे. याचाच अर्थ त्यात जितक्या मूलगामी आहेत तितक्याच त्या नवतेकडे झेपाविणार्‍याही आहेत. म्हणूनच सर्व चांगल्या-वाईटाला सामावत त्या चिरकाल अबाधित राहिल्या आहेत.
भारतात नऊ वेगवेगळ्या नृत्यशैली आहेत. भरतनाट्यम्, कथक, कथकली, ओडिसी, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, सत्रिय आणि झाऊ. नाट्यशास्त्रातील मार्गी नृत्य ज्या ज्या प्रदेशात स्थिरावले त्या त्या प्रदेशाची भाषा, संगीत आणि त्याच्याशी निगडील असलेली देहबोली या देशी शैलींनी अंगिकारली. जरी या शैलीची सादरीकरणाची पध्दत आणि दृश्य रुप वेगळे असले तरी आत्मा हा भक्ती हाच राहिला आहे. म्हणूनच यांना भगिनी शैली असे म्हटले जाते.
पुणे शहरात गेली पाचहून अधिक दशके शास्त्रीय नृत्याचा प्रचार, प्रसार होतो आहे. पंडिता गुरु रोहिणी भाटे यांनी पुणेकर रसिकांना कथक या उत्तर हिंदुस्थानी शैलीची ओळख करून देऊन ती पुण्यात रुजवली. गुरु शमा भाटे, गुरु मनिषा साठे यांच्या सारखे दिग्गज कलाकार आजही या कलेचा प्रचार, प्रसार करीत आहेत. गुरु सुचेता चापेकर, गुरु माणिक अंबिके यांच्यासार‘या कलाकारांमुळे भरतनाट्यम् ही दक्षिणी शैली पुण्यात रुजली वाढली व लोकप्रिय झाली. याबरोबरच ओडिसी आणि कुचिपुडी याही शैलींचा प्रसार आता पुण्यात होत आहे.
श्री गोगावले म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी राजकारणाकडे एका विकसित दृष्टिकोनातून पाहू इच्छिते. राजकीय पक्ष हा निवडणुकींपुरता मर्यादित नाही. समाज जीवनाचे प्रत्येक अंग प्रोत्साहित करणे, त्यांना बळ देणे आणि एक परिपूर्ण समाजाची निर्मिती हा हेतू नवभारत निर्मितीचा अविभाज्य भाग आहे. पुणे शहर हे परिपूर्ण शहर आहे. विविध कला याचे हे मूळ स्थान आहे. भविष्यकाळात पुण्याच्या इतिहासात देशाचे नेतृत्व करणारे पुणे शहर सर्वांगाने प्रोत्साहित झाले तर विविध क्षेत्राचे नेतृत्व पुणेकर करतील असा विश्‍वास या भारतीय नृत्य कलेच्या सादरीकरणामागील हेतू आहे.’ सांस्कृतिक विभागाच्या वतीने अजय धोंगडे, उदय जोशी, प्रा. विनायक आंबेकर, उमेश गायकवाड, दीलीप वेडे-पाटील, समन्वयक गणेश कळमकर, शशीकला मेंगडे, दीपक पोटे, राजेश येनपुरे यांनी संयोजन केले.

बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार जाहीर

0

पुणे-रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार (वेरा २०१७-१८) यंदा बीव्हीजी इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर हणमंतराव गायकवाड यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नारायण पेठेतील केसरी वाडयात असलेल्या लोकमान्य सभागृहात होणार आहे.

व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. कार्यक्रमाला क्लबच्या डायरेक्टर डॉ. शुभदा जठार, सेक्रेटरी विजय बोधनकर, प्रेसिडंट अभिजीत म्हसकर आदी उपस्थित राहणार आहेत.

हणमंतराव गायकवाड हे सोशल आंत्रप्रुनिअर, मोटीव्हेशनल स्पीकर, इंडस्ट्री पायोनियर म्हणून ओळखले जाते. त्यांनी कंपनीमध्ये काम करीत असताना आठ जणांना सोबत घेऊन हाऊसकिपींगची कामे करण्यास सुरुवात केली. आजमितीस विविध राज्यांमध्ये, शहरांमध्ये ७० हजारांहून अधिक लोकांना त्यांनी उपजिविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी केलेल्या व्यवसाय क्षेत्रातील या कार्यामुळे देशातील तरुणांसमोर ते आदर्श ठरले आहेत. त्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनतर्फे आत्तापर्यंत सुलोचना चव्हाण, प्रशांत दामले, सुबोध भावे, श्रीधर फडके, स्वाती काटकर, प्रमोद त्रिपाठी, अंजली धारु, अमर ओक, सुनिल मेहता, डॉ. निलेश साबळे, जयश्री तोडकर, कविता बोंगाळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दीपिका पादुकोण आणि सलमान खान बनले 2017-18 आर्थिक वर्षाचे सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

0

दीपिका पदुकोणने स्कोर ट्रेड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टवर विक्रम केला आहे. बॉलीवूडच्या ह्या पद्मावती राणीने  2017-2018 ह्या आर्थिक वर्षात 14 आठवडे सर्वोच्च स्थानावर राहून बॉलीवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असण्याचा मान मिळवला आहे तसेच सुपरस्टार सलमान खानही 17 आठवडे सर्वाधिक लोकप्रिय राहून गेल्या आर्थिक वर्षातला नंबर वन लोकप्रिय अभिनेता झाला आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, 2017-18 ह्या आर्थिक वर्षात दीपिका पदुकोण आपल्या पद्मावत चित्रपटामूळे सतत चर्चेत राहिली. तसेच, अभिनेता रणवीर सिंह सोबत असलेली तिची खास मैत्रीही तिला सोशल नेटवर्किंग साइट्स आणि मीडियामध्ये चर्चेत ठेवत होती. त्यामूळेच 58.22 गुणांसह 14 आठवडे सतत नंबर वन राहिलेली दीपिका गेल्या आर्थिक वर्षातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो.”

दीपिकाच्याशिवाय बॉलीवूड अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन स्थानी असलेला सलमान खान बिग बॉस आणि टाइगर जिंदा है चित्रपटामूळे गेल्या आर्थिक वर्षतले 17 आठवडे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी झालेली त्याच्या रेस3 चित्रपटाची घोषणा आणि फस्ट लूक ह्यामूळे त्याच्याविषयी मीडियात भरपूर चर्चा होती. लवकरच सुरू होणा-या दस का दम च्या नव्या पर्वामूळे ही सल्लुमियाँ लोकप्रिय स्टार्समध्ये सतत राहिला. आणि ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला, तो म्हणजे 68.3 ह्या अद्भूत गुणांसह दबंग खान स्कोर ट्रेड्सच्या चार्टवर 2017-18 मधला सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सुपरस्टार असल्याचं सिध्द झालंय.

अश्वनी ह्याविषयी सांगतात, ” फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लेटफार्मे्स तसेच, वायरल आणि डिजिटल बातम्या आणि प्रिंट माध्यम अशा निरनिराळ्या स्त्रोतांच्या सहाय्याने हा डेटा एकत्र केला जातो. ज्यामूळे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत आम्ही पोहोचू शकतो.”

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर 2017-2018 मध्ये सलमान खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खान ह्या बॉलीवुड एक्टर्स सोबतच दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिज आणि सोनम कपूर ह्या बॉलीवुड अभिनेत्री टॉप-5 मध्ये राहिल्या.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन राज्यात अव्वल

0

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे व महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये राज्यात अनुक्रमे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्युसन महाविद्यालय अव्वल ठरले आहे. देशपातळीवर सर्व संस्थांमध्ये विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत दोन क्रमांकांनी तर विद्यापीठांमध्ये एका क्रमांकाने प्रगती केली आहे. या मुल्यांकनात विद्यापीठ अनुक्रमे १६ व्या आणि नवव्या क्रमांकावर गेले आहे. पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील एकाही पांरपरिक विद्यापीठाला या यादीत स्थान मिळाले नाही.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी ‘नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेम ’ (एनआयआरएफ) जाहीर केले. देशात २०१६ पासून सर्व शैक्षणिक संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मुल्यांकन करून रँकिंग जाहीर केले जाते. त्यानुसार मंगळवारी सर्व संस्थांचे एकत्रित, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, वास्तुकला, विधी असे गटनिहाय रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये बहुतेक केंद्रीय संस्थांचा दबादबा राहिल्याचे दिसून येते. सर्व संस्थांमध्ये मिळून देशात बेंगलुरू येथील इंडियन इन्स्टिुट्युट आॅफ सायन्स या संस्थेने पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीला देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. त्याखालोखाल या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने दोन क्रमांकांनी प्रगती केली आहे. एकुण ९५७ सहभागी संस्थांमधून हे रँकिंग काढण्यात आले आहे.
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीतही पुणे विद्यापीठ मागील वर्षीच्या तुलनेत एका क्रमांकाने पुढे गेले असून यावर्षी देशात नववे स्थान मिळाले आहे. तर राज्यातील पहिला क्रमांक यंदाही कायम राखला आहे. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे १०० ते २०० क्रमांकामध्ये आहेत. महाविद्यालयांच्या यादीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने राज्यात पहिला तर देशात १९ वा क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ४५ व्या स्थानावर राहिले. एकुण संस्थांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९६ वा क्रमांक मिळाला आहे.
१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९)
२. इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (१९)
३. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्युट (२६)
४. टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्स (३२)
५. सिम्बायोसिस विद्यापीठ (४४)
६. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (५२)
७. नरसी मोनजी इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज (५५)
८. भारती विद्यापीठ (६६)
९. डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटी, कोल्हापूर (९७)पुण्यातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालये (कंसात देशातील क्रमांक)
१. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग (५५)
२. डिफेन्स इन्स्टिट्युट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (६३)
३. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय (८३)
४. आर्मी इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी (८८)

राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालये (कंसात देशातील क्रमांक)
१. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे (१९)
२. राजीव गांधी इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी, पुणे (६२)
३. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (७४)
४. भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ फाईन आर्ट्स, पुणे (९३)

पुण्यातील व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. सिम्बायोसिस इन्स्टिट्युट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट (१८)
२. इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट (५०)
पुण्यातील वैद्यकीयतील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (१८)

पुण्यातील वैद्यकीयतील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (१८)पुण्यातील विधीतील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. सिम्बायोसिस लॉ स्कुल (९)पुण्यातील औषधनिर्माणशास्त्र मधील सर्वोत्कृष्ट संस्था (कंसात देशातील क्रमांक)
१. पुना कॉलेज आॅफ फार्मसी (११)
२. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्युट आॅफ फामॉस्युटिकल (४९)

वास्तुशास्त्रमध्ये  एकही संस्था नाही
देशपातळीवरील रँकिंगमध्ये वास्तुशास्त्र गटात राज्यातील एकाही संस्थेची पहिल्या दहामध्ये समावेश झालेला नाही. मंत्रालयाने पहिल्या दहा संस्थांचे रँकिंग जाहीर केले आहे. या गटामध्ये देशातील एकुण ५९ तर राज्यातील आठ संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकाही संस्थेला रँगिंगमध्ये स्थान मिळाले नाही. देशपातळीवरील यादीत विद्यापीठाला एकुण संस्थांमध्ये ६७ वा क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सिम्बायोसिसला राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे. तसेच व्यवस्थापन आणि विधी गटामध्येही सिम्बायोसिस संस्थेने देशात अनुक्रमे १८ वा व नववा क्रमांक मिळविला आहे. खासगी विद्यापीठांमध्ये सिम्बायोसिस पाठोपाठ पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व भारती विद्यापीठाने पहिल्या शंभरात स्थान मिळविले आहे.

महापौर आणि खासदारांची नावे वगळल्याने शहर भाजपात जुना-नवा वाद सुरूच असल्याची चिन्हे

पुणे :  भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे तसेच शहरातील आमदारांचीही नावे  वगळण्यात आले आहे.  यामुळे जुने निष्ठावंत पण सत्तेतील अधिकारग्रहणापासून दूर राहीलेले आणि नंतर येवून म्हणजे ज्युनिअर असून सत्तेत बरेच काही मिळविलेले अशा दोन गटात सुप्त खेचाखेची सुरु असल्याचे खाजगीत बोलले  जाते आहे .
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,पालकमंत्री गिरीश बापट तसेच पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीच नावे या पत्रिकेत आहेत. हे तिघेही पुण्यातील भाजपचे जुने जाणते ज्येष्ठ निष्ठावंत मानले जातात .
येत्या ६ एप्रिलला पक्षाचा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातून किती कार्यकर्ते जाणार, कोण नेणार याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार व नगरसेवक यांच्यात जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद झाले होते. तसेच पक्षाच्या १०१ नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक, खासदार काकडे या बैठकीला अनुुपस्थित होते. त्यावरून पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे.
मुंबईतील कार्यक्रमानंतर पुण्यात ८ एप्रिलला कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रमणबाग येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे .त्यावेळी केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महापौर तसेच महापालिकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे.
एकीकडे पक्षात सत्ता असल्यामुळे सिनिअर आणि ज्युनिअर अशी दरी पडलेली  असताना नगरसेवक आणि आमदार अशीही दरी दिसून येते आहे. नगरसेवकांच्या कामांच्या आधारे आणि महापालिकेच्या बजेटवर आमदारांनी श्रेय लाटूनये त्यांनी स्वतंत्र पाने आपापल्या विधानसभा मतदार संघात आपापल्या परीने कामे करावीत असे नगरसेवकांचे मत आहे .तर महापालिकेतील नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडून  पक्ष संघटनेबाबत जेवढी जबाबदारी घेणे गरजेचे आहे  तेवढी घेतली जात नसल्याचे बोलले जाते आहे .