Home Blog Page 3160

महिलांनी स्वयंरोजगारासाठी पुढाकार घ्यावा – अनुपमा पवार

0
पुणे : महिलांनी स्वतः पुढे येऊन विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक  संचालिका  अनुपमा पवार यांनी व्यक्त केले.

यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संतमाई स्किल डेव्हलपमेन्ट सेंटरमधील विद्यार्थिनींना  प्रशस्तीपत्र प्रदान करताना बोलत  होत्या.  याप्रसंगी  त्यांच्या हस्ते बेसिक फॅशन डिझायनिंग आणि बेसिक ब्युटी पार्लर या कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे  दोन महिने कालावधीचे या प्रशिक्षण  पूर्ण केल्याबाबतचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना अनुपमा पवार म्हणाल्या की. प्रत्येक महिलेने स्वतःमधील सुप्त गुण  ओळखून स्वतःचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे आहे. खास करून बाजारपेठेची मागणी, विक्री कौशल्य या बाबी लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या व्यवसायात आवश्यक ते बदल केले पाहिजेत.  स्वतःला कमी न लेखता आपल्या कुटुंबाचे आपणही  आर्थिक कणा बनू  शकतो. हा विश्वास निर्माण करायला हवा. ‘यशस्वी’ सारख्या संस्थाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षणाच्या द्वारे महिलांना सक्षम बनविण्याचे जे काम सुरु आहे ते निश्चितच कौतूकास्पद आहे असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक पदाधिकारी मिलिंद आहेर यांच्यासह संस्थेचे सर्व प्रशिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राची राऊत यांनी केले.

अटकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा मृत्यू…

0

पुणे-अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा पुण्यात मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गिरवले हे अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील आरोपी होते. तसेच, ते संग्राम जगताप यांचे समर्थक मानले जात.कैलास गिरवलेंच्या मृत्यूला अहमदनगर पोलीस कारणीभूत असून, त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, असा आरोप बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे

कैलास गिरवले यांना अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आधी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते.

कैलास गिरवलेच्या मृत्यूनंतर बाबासाहेब गिरवले यांनी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये अहमदनगर पोलिसांच्या विरोधात तक्रार दिली आहे. कैलास गिरवलेंच्या मृत्यूला अहमदनगर पोलीस कारणीभूत असून, त्यांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, असा आरोप बाबासाहेब गिरवले यांनी केला आहे. कैलास गिरवले यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत अँमडॉक्स, इन्फोसिस, वेंकीज, टेक महिंद्रा संघांचे विजय

0

पुणे: सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित 4थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अँमडॉक्स, इन्फोसिस, वेंकीज व टेक महिंद्रा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत आगेकुच केली.

पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात आवेश सय्यदच्या नाबाद 89 धावांच्या बळावर अँमडॉक्स संघाने बीएमसी सॉफ्टवेअर संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना बीएमसी सॉफ्टवेअर संघाने  19.4 षटकात सर्वबाद 133 धावा केल्या. यात श्रेयस करंदीकरने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 133 धावांचे लक्ष अँमडॉक्स संघाने केवळ 18.3 षटकात 5 बाद 134 धावांसह पुर्ण केले. आवेश सय्यद सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत रवी थापलीयालच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने एमफसीस संघाचा 106 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 6 बाद 171 धावा केल्या. यात संजय पुरोहीतने 64 धावा केल्या. 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एमफसीस संघ 18.5 षटकात सर्वबाद 66 धावात गारद झाला. रवी थापलीयालने 11 धावेत 5 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. रवी थापलीयाल सामनावीर ठरला.

अन्य लढतीत सुजित उबाळेच्या दमदार जलद 90 धावांच्या बळावर वेंकीज संघाने सनगार्ड/एफआयएस ग्लोबल संघाचा 47 धावांनी पराभव केला. तर साकेत देशपांडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने दसॉल्ट सिस्टिम्स संघाचा 98 धावांनी दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बीएमसी सॉफ्टवेअर- 19.4 षटकात सर्वबाद 133 धावा(श्रेयस करंदीकर 44(40), चिन्मय दुबे 22, अनिरूध्द पिंपळखरे 2-16, प्रविण खाल्खो 3-10) पराभूत वि अँमडॉक्स- 18.3 षटकात 5 बाद 134 धावा(आवेश सय्यद नाबाद 89(58), ब्रुमिक्स सुब्रमणियन 2-14) सामनावीर- आवेश सय्यद
अँमडॉक्स संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.

इन्फोसिस- 20 षटकात 6 बाद 171 धावा(संजय पुरोहीत 64, महेबुब शेख 27, साईनाथ शिंदे 36, राजीव शेखर 2-23) वि.वि एमफसीस- 18.5 षटकात सर्वबाद 66 धावा(रत्नदिप लोंढे 27, रवी थापलीयाल 5-11, अश्लेष चौधरी 2-5, शारोन थॉमसन 2-14) सामनावीर- रवी थापलीयाल
इन्फोसिस संघाने 106 धावांनी सामना जिंकला.

वेंकीज- 20 षटकात 6 बाद 194 धावा(अदित्य कदम 38, सुजित उबाळे 90(52), ऑस्टिन लाझारुस नाबाद 37, पवन अनंद 2-33) वि.वि सनगार्ड/एफआयएस ग्लोबल- 20 षटकात 8 बाद 128 धावा(पवन अनंद 49, कमलेश रावलानी नीबीद 26, सागर बिर्डवाडे 3-24) सामनावीर- सुजित उबाळे
वेंकीज संघाने 47 धावांनी सामना जिंकला.

टेक महिंद्रा- 20 षटकात 7 बाद 159 धावा(साकेत देशपांडे 34, सचिन पिंपरीकर नाबाद 58, महेश तुपड 2-17) वि.वि दसॉल्ट सिस्टिम्स- 20 षटकात 7 बाद 61 धावा(अन्शुल गोस्वामी 21, स्वप्निल थोरात 3-11, साकेत देशपांडे 2-1) सामनावीर- साकेत देशपांडे
टेक महिंद्रा संघाने 98 धावांनी सामना जिंकला.

कोरेगाव भीमा प्रकरण : कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे

0

पुणे : पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यात आज पुणे पोलिसांनी कबीर कला मंचचे कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर छापे टाकून शोध मोहिम सुरु केली आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, नागपूर आणि गडचिरोली येथे ही शोध मोहीम सुरु असल्याचे सांगण्यात आले.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते. या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना चेतवल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ७ जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली़ ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आज पहाटेपासूनच अतिशय गुप्तपणे पोलिसांनी पुणे, मुंबई, गडचिरोली येथील कार्यकर्त्यांच्या घरावर एकाचवेळी सर्च आॅपरेशन सुरु केले़ पुण्यात कबीर कला मंचचे स्वतंत्र कार्यालय नाही़ येरवडा येथील रमेश गायचूर आणि वाकड येथील सागर बोडके यांच्या घरात तपासणी सुरु आहे. त्याचवेळी नागपूर येथील सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी तपासणी सुरु आहे.

अत्यंत गुप्तपणे सुरु केलेल्या या सर्चमध्ये पोलिसांना कार्यकर्त्यांच्या घरातून कोरेगाव भीमा संबंधी वाटण्यात आलेली पत्रके, पेनड्राईव्ह व अन्य काही साहित्य मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुंबईतही सुधीर ढवळे व अन्य काही कार्यकर्त्यांच्या घरात सर्च सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नकार दिला असून कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.

डॉ. करंदीकर यांचे ज्ञानेश्वरी आणि ओंकार साधने वरील संशोधन मौलिक – भारत सासणे

0
स्व. डॉ. जयंत करंदीकर लिखित ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे– विश्वाचा श्वास म्हणजे ओंकार आहे, पिडीतांना जगण्याची उमेद म्हणजे ओंकार आहे, ईश्वराच्या आधी आणि नंतर सुद्धा ओंकार असून विजयाचा मंत्र म्हणजे ओंकार होय असे सांगणाऱ्या डॉ. जयंत करंदीकर यांचे ज्ञानेश्वरी आणि ओंकार साधने वरील संशोधन अत्यंत मौलिक आहे, यामुळे ते जगभरात जाणे महत्वाचे आहे, यासाठी त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद व्हावा असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
ओम शक्ती केंद्र नगरचे संस्थापक स्व. डॉ. जयंत करंदीकर लिखित ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि डॉ. करंदीकर यांनी संगीत दिलेल्या ‘गीत आसावले तुझ्यासाठी’ या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सासणे बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, ओम शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त डॉ. किशोर भिंगारे, वैशाली भागवत, बाबासाहेब सौदागर, डॉ. गिता करंदीकर, डॉ. नीरज करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सासणे म्हणाले, ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ पुस्तकात डॉ. करंदीकर यांनी नोंदवलेली निरीक्षणे अत्यंत महत्वाची आहेत, वाचा आणि मन व शरीरावर होणारा ओंकाराचा परिणाम यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे यामुळे करंदीकर यांचे संशोधन कल्याणकारी आहे, यामुळे हे ज्ञान जगभर पोहचणे आवश्यक आहे.
अनुराधा मराठे म्हणाल्या, मेहेराबाबाच्या एका कार्यक्रमात आमची पहिली भेट झाली होती, त्यांच्या उपचार पद्धती विषयी मी ऐकले आणि एक दिवसाचे शिबीर केले होते. दरम्यान माझा आवाज आठ महिने बंद झाला होता, डॉ. करंदीकर यांच्या ओंकार स्वर साधनेचा फायदा झाला, रवींद्र साठे आणि अन्य गायक, कलावंतानाही या प्रणालीचा उपयोग झाला आहे. वाचाशुद्धी हे कार्य ते अतिशय चांगल्या पद्धतीने करत हे मी अनुभवले आहे. त्यांचे मार्गदर्शन अनेक गायकांना महत्वपूर्ण ठरले आहे.
कुवळेकर म्हणाले, १२ वर्षापूर्वी ‘ओम शक्ती शब्द स्वर साधना’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते, दुसरी आवृत्ती येत असताना त्याचा कर्ता नाही याचे दुःख वाटते. डॉ. करंदीकर यांची ओंकार साधना आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास गाढ होता. त्यांनी विश्वकल्याणाचा विचार करून आपले कार्य सुरु केले. वाचा, मन आणि शरीर शुद्धीसाठी त्यांनी केलेले अनमोल आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात  ‘गीत आसावले तुझ्यासाठी’ हा गाण्यांचा कार्यक्रम झाला, यामध्ये नीरज करंदीकर, रोहित पारखे, डॉ. सत्तार सय्यद यांचे गायन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती करंदीकर यांनी केले.

सामाजिक कर्जाच्या योजनांवर कर्मचार्‍यांना प्रोत्साहन

0

पुणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्रने वर्ष 2017-18 करिता एससी-एसटी कर्जदारांना कर्ज वितरण आणि वसूली या संदर्भात  उल्लेखनीय कार्य करणार्‍या शाखांना पुरस्कार प्रदान केले. विजेता शाखांना पद्मश्री प्राध्यापक सुखदेव थोरात आणि श्री आर. पी. मराठे, व्यवस्थापकीय संचालक तसेच सीईओ, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते वार्षिक रोलिंग ट्रॉफी प्रदान केली गेली.

यावेळी, श्री आर. पी. मराठे, व्यवस्थापकीय संचालक तसेच सीईओ, बँक ऑफ महाराष्ट्र म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या या शुभ आणि प्रेरणादायक क्षणी विजेता शाखाना सन्मानित करताना अत्यंत आनंद होत आहे. आमची बँक देशातील आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक सुदृढतेसाठी वचनबद्ध आहे आणि अशा प्रकारची कृती आमच्या शाखांना प्रोत्साहित करते जेणेकरून ते समाजातील त्या वर्गाची आर्थिक मदत करतील जे की आजही दुर्बल आहेत.”

पद्मश्री प्राध्यापक डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, “ डॉ. आंबेडकर एक सच्चे राष्ट्रभक्त होते आणि त्यांनी देशात न की केवळ सामाजिक परंतु आर्थिक सुधारणांचा प्रयत्न केला. त्यांनी आजच्या आर्थिक प्रणालीचा पाया रचला. देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी बँकिंग एक महत्वपूर्ण माध्यम आहे, मागास व्यक्तींना अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे प्रत्येक बँकेची जबाबदारी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सामाजिक कर्ज देण्याच्या योजनांमध्ये कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी पाऊले उचलत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे.”

बँकेने आपल्या विविध अंचल कार्यालयांमध्येदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

जामीन हा भुजबळांचा हक्क -प्रकाश आंबेडकर

0

पुणे – केस चालवून भुजबळ दोषी आहेत कि नाही ते कोर्टाने ठरवावे , दोषी असतील तर त्यांना जरूर आत ठेवावे त्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही पण चौकशीनंतर तरी त्यांना जामीन द्यायला हवा असे येथे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे .
तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांना चौकशीनंतरही जामीन न देणे हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली . चौकशी झाल्यानंतरही त्यांना तुरुंगात का ठेवले जात आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा, असे आंबेडकर म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

संताप आणि चिंतेचे वारे ,म.गांधी रस्त्यावर ..,असिफासाठी कॅण्डल मार्च (व्हिडीओ)

0

पुणे-  कथुवा येथील  ८ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार व निर्घृण खुनाच्या पाशवी कृत्यामुळे  संताप आणि चिंता  अशा संयुक्त विचारांचे  वारे   आज शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर दिसून आले.कॉंग्रेस पक्षाने कॅण्डल मार्च आयोजित केला होता . विशेष म्हणजे या मार्च मध्ये नागरिक महिला मुलींसह  तर काही कुटुंबासह उत्स्फुर्तपणे आणि अत्यंत  शांतपणे काही काळ सहभागी झाल्याने असिफावरील अत्याचाराची जखम किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट दिसून आले. असिफ वरील पाशवी हल्ल्याने देश हादरून गेला आहे . घराघरात याप्रकाराने अनेकांना धक्का बसला आहे. आजच्या या कॅण्डल मार्च मध्ये पुणे कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,मोहन जोशी, उल्हास पवार,आबा बागुल, अभय छाजेड ,अरविंद शिंदे,अविनाश बागवे, अजित दरेकर, बंडू नलावडे ,मनीष आनंद ,कमल व्यवहारे, सतीश पवार ,शेखर कपोते ,राजू शेख, रमेश अय्यर  आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज सायंकाळी लष्कर परिसरातील संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावर  “कॅण्डल मार्च” काढण्यात आला. यावेळी या रस्त्यावरील दुकानांमधील ग्राहक आणि दुकानदार यांनीही हा कॅण्डल मार्च जाईपर्यंत व्यवहार थांबविले आणि मूक प्रतिसाद दिला . या मार्च मध्ये विविध मार्गाने येवून काही कुटुंबे तर अनेक महिला मुलांसह उत्स्फुर्तपणे आणि गंभीरतेने सहभागी होताना दिसत होत्या.

रमला विठूमाऊलीच्या भक्तांचा मेळा(व्हिडीओ)

0

पुणे-वैशाख वणव्याची दाहकता जणू चैत्रातच जाणवू लागते आणि  विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेला पंढरपुरात प्रारंभ होतो  आणि  दरवर्षीप्रमाणे  श्री. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना उन्हाळ्यातील उष्णतेचा दाह लागू नये यासाठी चंदन उटी लावण्यात येऊ लागते  . या पुजेला गेल्या महिन्यात १९ मार्चला पंढरपुरात  प्रारंभ झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत ही पूजा नित्यनियमाने केली जाते.हीच परंपरा विठुरायाच्या भक्तांनी कात्रजमध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही नगरसेवक प्रकाश कदम यांच्या निवासस्थानी राबविली जाते  .येथेहि विठुरायाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लाऊन पूजा केली गेली , आणि  पंढरपूरच्या विठुरायाच्या नामघोषात भजन कीर्तनात वारकरी येथे रमला .

प्रकाश कदम हे भाविक म्हणूनदेखील  सुपरिचित आहेत .त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी उन्हाळ्यात असा वारकऱ्यांचा मेळा संपन्न होतो . आणि स्नेहभोजनाने या मेळ्याची सांगता होते. आज रात्री येथे भजन कीर्तनात रमलेल्या वारकऱ्यांची हि झलक … (टीप – वारकऱ्यांचा मेळा कात्रजमध्ये रमला : या व्हिडीओत प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीचा समावेश केला आहे .)

गोवा टुरिझमतर्फे ग्रेप एस्केपेड आणि गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सव

0

पणजी – विविध सणांची भूमी असलेल्या गोव्याकडे जगाला दाखवण्यासाठी बरेच काही आहे आणि त्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे इथले सण. एप्रिल २०१८ च्या दुसऱ्या पंधरवड्यात दुहेरी मजा अनुभवता येणार आहे. तेव्हा बॅग भरा आणि ही दुहेरी मजा अनुभवण्यासाठी गोव्याकडे चला.

ग्रेप एस्केपेड आणि गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सव २०१८ या दोन अतिशय आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी गोवा टुरिझम सज्ज झाले आहे.

ग्रेप एस्केपेड २०१८ भारतातील अतिशय लोकप्रिय असा जीवनशैली आणि वाइन महोत्सव म्हणजेच ग्रेप एस्केपेड २०१८ गोवा टुरिझमतर्फे गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून १९ ते २२ एप्रिल दरम्यान डी. बी. बांदोडकर मैदान, कंपाळ, पणजी येथे संध्याकाळी सहानंतर आयोजित करण्यात आला आहे.

 हे ग्रेप एस्केपेडचे १४ वे वर्ष आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा मौसम लक्षात घेता या चार दिवसीय कार्यक्रमात लाखो पर्यटक सहभागी होतील असा अंदाज असून राज्यातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल.

गेल्या इतकी वर्ष ग्रेप एस्केपेडने कायमच स्थानिक उद्योजकांना आपले ज्ञान, उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी, बीटुबी संपर्क साधण्यासाठी आणि गोवन तसेच पर्यचकांना विनयार्डमधील स्वाद, गोवन खाद्यपदार्थ चाखण्याची संधी देण्यासाठी, गोव्याची संस्कृती व परंपरा अनुभवण्यासाठी व्यासपीठ पुरवले आहे.

या कार्यक्रमात सर्वोत्तम वाइन, खाद्यपदार्थ, फॅशन आणि मनोरंजन यांचा मिलाफ पाहायला मिळतो. या चार दिवसीय महोत्सवात पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिक, हॉटेलमालक, रेस्टॉरंट मालक, उत्पादक आपापल्या दर्जेदार उत्पादनांसह सहभागी होत असतात.

गोवा व्हिंटेज कार आणि बाइक महोत्सव २०१८ गोवा टुरिझमचा व्हिंटेज बाइक आणि कार महोत्सव विविध व्हिंटेज बाइक आणि कार चालक, वापरकर्ते, संग्राहक व चाहत्यांना एकत्र आणणारा असून ते आपल्या अभिमानास्पद गाडीसह राजधानीचे शहर असलेल्या पणजीमध्ये परडे काढतील.

व्हिंटेज बाइक आणि कार रॅली आयनॉक्स कोर्टयार्ड ते मिरामार वर्तुळ अशा मार्गावरून दिवजा वर्तुळावरून परत आयनॉक्स कोर्टयार्डकडे जाईल जिथे या गाड्या संध्याकाळी सहानंतर लोकांना पाहाण्यासाठी ठेवल्या जातील. यानंतर व्हिंटेज गाड्यांना वेगवेगळ्या विभागानुसार बक्षिस आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. या विभागांमध्ये सर्वात जुने वाहन, सर्वात आकर्षक वाहन, सर्वात दुर्मीळ वाहन यांचा समावेश आहे.

प्रेक्षकांसाठी संध्याकाळी फॅशन शो आणि मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे हा कार्यक्रम संस्मरणीय केला जाणार आहे.

सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत ओएमडीटी , एमडब्लूटीए क संघांचा इलाईट डिव्हिजन मध्ये प्रवेश

0
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना  व  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत  ओएमडीटी , एमडब्लूटीए क या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून  इलाईट  डिव्हिजन मध्ये प्रवेश  केला.  
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात  ओडीएमटी अ संघाने पीवायसी डॉन्स  संघाचा 18-13 असा पराभव करत   इलाईट  डिव्हिजन मध्ये प्रवेश  केला. विजयी संघाकडून संतोष कुराडे, उदत गुप्ते सुहास मापारी, अतुल जोशी, अतुल मांडवकर, बिनेश राजन संतोष कुराडे व कोनार कुमार यांनी विजयी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

 

एमडब्लूटीए क संघाने पीवायसी इगल्स  संघाचा 24-5 असा पराभव करत  इलाईट  डिव्हिजन मध्ये प्रवेश  केला.  एमडब्लूटीए क संघाकडून अजय चव्हाण, राजाराम के, अजय चौहान, शायनी बरेतो, संजय आशेर, राहुल सिंह, पार्थ महापात्रा व विक्रम गुलानी यांनी आपापल्या गटात विजय मिळवून संघाला 24-5 असा एकतर्फी विजय मिळवून दिला. 

एकूण 16 संघांचा  इलाईट  डिव्हिजन मध्ये प्रवेश केला आहे. यापैकी दोन संघ  आंतर क्लब रा ज्य अजिंक्यपद टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन: 

ओडीएमटी अ वि.वि.पीवायसी डॉन्स  18-13(100अधिक गट: संतोष कुराडे/उदत गुप्ते वि.वि.सत्यमूर्ती/केदार देशपांडे  6-4;खुला गट: सुहास मापारी/अतुल जोशी पुढे चाल वि.रणजित पांडे/अमोल काणे  0-6; 90अधिक गट: अतुल मांडवकर/बिनेश राजन वि.वि.तुषार नगरकर/संजय बोथरा 6-3; खुला गट: संतोष कुराडे/कोनार कुमार वि.वि.केदार देशपांडे/मधुर इंगळहळीकर 6-0);

एमडब्लूटीए क वि.वि.पीवायसी इगल्स  24-5(100अधिक गट: अजय चव्हाण/राजाराम के वि.वि.संतोष कपटिया 6-3; खुला गट: अजय चौहान/शायनी बरेतो वि.वि.ललित संचेती/प्रकाश चांदोरकर  6-0; 90अधिक गट: संजय आशेर/राहुल सिंह वि.वि.लक्ष्मीकांत चोभे/श्रीराम मोने  6-2; खुला गट: पार्थ महापात्रा/विक्रम गुलानी वि.वि.राहुल गांगल/संतोष कपटिया  6-0).    

 

पीवायसी डॉन्स वि.वि.एफसीटीसी24-3(100अधिक गट: केदार देशपांडे/सत्यमूर्ती वि.वि.सुनील लोणकर/सिद्देश परळकर  6-2;खुला गट: अमोल काणे/रणजित पांडे वि.वि.अमित नूलकर/मनोज कुलकर्णी  6-0; 90अधिक गट: तुषार नगरकर/संजय बोथरा वि.वि.मनोज कुलकर्णी/देवेंद्र बडवे  6-0; खुला गट: केदार देशपांडे/मधू इंगळहळीकर वि.वि.कपिल जोशी/सुनील लोणकर6-1);   

       

विनिंग एज अ वि.वि.मगरपट्टा ब  19-18(100अधिक गट: उदय टेकाळे/निलेश नाफडे वि.वि.प्रदीप मित्रा/मयूर पारेख  6-2; खुला गट: अविनाश पवार/गंगा प्रसाद पराभूत वि.रतिश रतुसरिया/प्रदीप जगदाळे  4-6; 90अधिक गट: मंदार कापशीकर/मुकेश देशपांडे वि.वि.दिएगो ग्रिफिन/कृष्णन नारायण  6-4; खुला गट: आशुतोष सावनी/आदित्य टेकाळे पराभूत वि.संकेत माळी/या,अमनदीप सिंग 3-6);

ओएमडीटी ब वि.वि.सोलारिस क  23-10(100अधिक गट: उमेश दळवी/ज्ञानेश्वर कारकर पराभूत वि.संभाजी शिंदे/सत्यजित गुजर 5-7(5-7); खुला गट: राहुल पाटील/प्रितेश श्रीवास्तव वि.वि.हेमंत निकम/श्रीकांत पवार  6-2; 90अधिक गट: राम नायर/अमित धंद वि.वि.रवी भांदेकर/हेमंत निकम  6-1; खुला गट: हिमांशू कपटिया/कौस्तुभ देशमुख वि.वि.संभाजी शिंदे/संजय अगरवाल 6-2);

एफसी लिजेंड्स वि.वि.विनिंग इज क 23-9(100अधिक गट: पांडुरंग पाडळे/कर्नल आगाशे वि.वि.जय कुलकर्णी/महेश कुलकर्णी  6-2; खुला गट: मनमीर लांबा/संजय पाटील वि.वि.गुरुराज/जय कुलकर्णी  6-1; 90अधिक गट: योगेश नातू/श्री सुखात्मे वि.वि.सुनील कोंकर/प्रशांत कुलकर्णी  6-0; खुला गट: कौशिक देशपांडे/महेंद्र देवकर पराभूत वि.राहुल उप्पल/साकेत वेलिंग5-6(4-7));

टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटला आता आयएसओ ९००१ आणि आयएसओ २९९९०चे प्रमाणपत्र

पुणे-: टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ही ना-नफा चालणारी कौशल्य विकास संस्था आहे. या संस्थेला ब्युरो व्हेरिटास या नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्डाच्या प्रमाणपत्रीय मंडळातर्फे, आयएसओ २९९९०:२०१० आणि ९००१:२०१५ असे दुहेरी प्रमाणपत्र देऊन मान्यता देण्यात आली आहे.

अध्ययन सेवा पुरवठादारांसाठी उच्चतम विशेष दर्जा असलेले हे आयएसओ २९९९०:२०१०प्रमाणपत्र आहे. यात विकासाच्या संहिता, पुरवठा, मूल्यांकनाचा परिणाम आणि गुणांकन यातील प्रशिक्षणाचा समावेश असून, प्रमाणपत्रात तब्बल १९ प्रक्रियांचा समावेश असेल.

आयएसओ ९००१:२०१५ हे दर्जा व्यवस्थापन यंत्रणेसाठीचे प्रमाणन आहे आणि जगभरात दर्जात्मकतेसाठी सर्वात मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.

टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (टीपीएसडीआय)द्वारे प्रक्रियांतील उत्कृष्टता आणि दर्जात्मक सेवा दिल्या जातात, या दोन्हीसाठी हे प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१५ साली द टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा कंपनीतर्फे तरुणांमध्ये रोजगाराच्या संधी वाढाव्यात, तसेच भारतीय ऊर्जा आणि संबंधित क्षेत्रांमधील आवश्यक कौशल्यांमधील त्रुटी भरून काढाव्यात यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

“ग्राहक आणि प्रशिक्षणार्थींना दर्जात्मक अध्ययन सेवा प्राप्त होतील, याची खात्री दुहेरी प्रमाणपत्रामुळे मिळते, आमच्या सर्व प्रशिक्षण केंद्रांमधून अशा प्रकारचे प्रमुख प्रशिक्षण दिले जाते आणि यातही सातत्याने सुधारणा केल्या जातात. आम्ही प्रशिक्षण संस्था म्हणून जे काही करू ते दर्जेदारच असेल, तो दर्जा प्राप्त करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व संकल्पना पणाला लावलेल्या आहेत,’’ असे टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रमुख श्री. सी एन नागाकुमार म्हणाले.

“ऊर्जा क्षेत्र आणि संबंधित क्षेत्रांमधील समकालीन आणि भविष्यकालीन कौशल्यांसाठी सर्वोत्कृष्ट एकीकृत तांत्रिक प्रशिक्षण संस्था बनणे, हा संस्थेच्या गुणांकनातील एक मोठा टप्पा आहे. दर्जा आणि प्रक्रियेतील उत्कृष्टता या धर्तीवर टाटा पॉवर्सची संस्कृती आणि मूल्य उभारलेली आहेत आणि ही मान्यता प्राप्त होणे ही आम्ही प्रत्येक दिवशी जगत असलेल्या मूल्याची पोचपावतीच आहे,’’ असे टाटा पॉवर को. लिमिटेडचे सीओओ आणि ईडी श्री. अशोक सेठी म्हणाले.

या संस्थेतर्फे रोजगारासाठी उपयुक्त असे विस्तारित श्रेणीतील अत्याधुनिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र पुरवले जाते. थर्मल, जलरंग आणि नवीकरणीय ऊर्जा, परिवर्तन आणि वितरण यासाठी लागणारी कौशल्ये, याबरोबरच संबंधित क्षेत्रातील कौशल्यांचाही यात समावेश आहे.

टीपीएसडीआयतर्फे देशभरात ५ जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात –यापैकी महाराष्ट्रात शहाड आणि ट्रॉम्बे येथे ही केंद्रे आहेत, शिवाय झारखंडमध्ये मेथौन आणि जमशेदपूर व गुजरातमध्ये मुंद्रा आदी ठिकाणी केंद्रे आहेत. उद्योगातील मागणी आणि शैक्षणित स्तरावरील अध्यापन यांच्यातील त्रुटी भरून काढण्यासाठी, संस्थेतर्फे आयटीआय, पॉलिटेक्निक्स आणि ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले जाते.

टीपीएसडीआयतर्फे देशभरात ५ जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात –यापैकी महाराष्ट्रात शहाड आणि ट्रॉम्बे येथे ही केंद्रे आहेत, शिवाय झारखंडमध्ये मेथौन आणि जमशेदपूर व गुजरातमध्ये मुंद्रा आदी ठिकाणी केंद्रे आहेत. २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून या संस्थेने २९००० अधिक लोकांना प्रशिक्षित केले आहे.

ऊर्जा क्षेत्रातील अनुभवी तंत्रज्ञांपासून रोजगारक्षम कौशल्यांच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांपर्यंत… शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच टीपीएसडीआय सामावून घेते. सर्व प्रकारच्या उद्योगातील मागणी आणि शैक्षणित स्तरावरील अध्यापन यांच्यातील त्रुटी भरून काढण्यासाठी, संस्थेतर्फे आयटीआय, पॉलिटेक्निक्स आणि ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले जाते.

टाटा पॉवरविषयी:

टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक वीज कंपनी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार होत आहे. कंपनी, तिच्या सर्व उपकंपन्या आणि संयुक्तरित्या नियंत्रित कंपन्या अशा सर्वांची मिळून १०७५७ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता आहे; तसेच ऊर्जा क्षेत्राच्या सर्व विभागांमध्ये, म्हणजेच- इंधन सुरक्षा व लॉजिस्टिक्स, निर्मिती (औष्णिक, जल, सौर व पवनऊर्जा), पारेषण, वितरण व व्यापार- यांमध्ये कंपनी काम करत आहे.

भारतात वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यांसाठी कंपनी यशस्वीरित्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतील प्रकल्प राबवत आहे. उत्तर दिल्लीमध्ये वीजवितरणासाठी दिल्ली विद्युत बोर्डासोबत “टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड”, भूतानमधील ताला जलविद्युत प्रकल्पातून विजेचे निर्वासन (इव्हॅक्युएशन) करून दिल्लीला आणण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत “पॉवरलिंक्स ट्रान्समिशन लिमिटेड” आणि झारखंडमध्ये १०५० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत “मैथोन पॉवर लिमिटेड” ही या प्रकल्पांची काही उदाहरणे.

टाटा पॉवर भारतातील २.६ दशलक्ष ग्राहकांना वितरणसेवा देत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित असा देशातील पहिला ४००० मेगावॉट क्षमतेचा महाऊर्जा प्रकल्प कंपनीने गुजरातमधील मुंद्रा येथे विकसित केला आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठ्या नूतनीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असून, स्वच्छ (पर्यावरणपूरक) ऊर्जेची कंपनीची श्रेणी ३४१७ मेगावॉट इतकी आहे.

कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तार केला असून, इंडोनेशियातील अग्रगण्य कोळसा कंपनी पीटी कॅल्टिम प्रायमा कोल अर्थात केपीसीमध्ये टाटा पॉवरचे ३० टक्के समभाग आहेत; सिंगापूरमधील पीटी बरामल्टिसुकेसराराना टीबीके (“बीएसएसआर”) खाण कंपनीत, ट्रस्ट एनर्जी रिसोर्सेसमार्फत कोळशाचा पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी तसेच आपल्या औष्णिक वीजनिर्मितीसाठी कोळसा आयात करण्यासाठी, २६ टक्के भागधारणा आहे; आफ्रिकेतील सब-सहारा भागात प्रकल्प विकसित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत ‘सेनेर्गी’ हा संयुक्त उपक्रम सुरू आहे; झांबियामध्ये १२० मेगावॉट जलविद्युत निर्मितीसाठी झेस्कोसोबत ५०:५० भागीदारीत संयुक्त उपक्रम २०१६ मध्ये कार्यान्वित झाला आहे; जॉर्जियामध्ये एजीएलमार्फत पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी संयुक्त उपक्रमातून नॉर्वे व आयएफसीमध्ये १८७ मेगावॉट जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे आणि भूतानच्या राजेशाही सरकारसोबत भागीदारीत  भूतानमध्ये जलविद्युत निर्मिती सुरू आहे.

अग्रगण्य तंत्रज्ञान, प्रकल्पांचे उत्तम कार्यान्वयन, सुरक्षेसाठी जागतिक दर्जाच्या प्रक्रिया, ग्राहकांची काळजी आणि पर्यावरणपूरक उपक्रम या वैशिष्ट्यांच्या जोरावर टाटा पॉवर बहुअंगांनी वाढीसाठी सज्ज असून येणाऱ्या अनेक पिढ्यांची ‘आयुष्ये प्रकाशमान करण्यासाठी’ वचनबद्ध आहे.

पुण्याच्या महापालिका आयुक्तपदी सौरभ राव तर जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम

0

पुणे-पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांचा साडेतीन वर्षांचा कालावधी झाल्याने मागील महिन्यात त्यांची बदली झाली होती. त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार शासन आदेशानुसार दहा दिवसांपूर्वी सोडल्याने त्यांच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापदावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांचीच नियुक्ती केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. सौरभ राव यांना जिल्ह्यासह महापालिकेचे कामकाज आणि शहराच्या प्रश्नांविषयी माहिती असल्याने राज्यशासनाकडून त्यांची नियुक्ती होईल असे बोलले जात होते. सौरभ राव यांची नियुक्ती सत्ताधारी भाजपला फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात पुरंदर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. महापालिका क्षेत्रातील कामेही गतीने पूर्ण होतील, असे बोलले जात आहे.

दरम्यान, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्यात काही अधिकाऱ्यांचीही बदली झाली आहे. त्यामध्ये राहुल द्विवेदी हे अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. तर नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबई येथे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात बदली झाली आहे.

टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत आर्यन हूड, सानिका भोगाडे, अपर्णा पतैत, अमोद सबनीस यांचा मुख्य फेरीत प्रवेश

0

पुणे,16 एप्रिल 2018 :  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आर्यन हूड, अमोद सबनीस, अंशित देशपांडे, सौमिल चोपडे यांनी, तर मुलींच्या गटात  सानिका भोगाडे, माही शिंदे अपर्णा पतैत यांनी आपापल्या गटातील प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत 14वर्षाखालील मुलींच्या गटात सानिका भोगाडेने रिशिता अगरवालचा 6-0, 6-1असा, तर माही शिंदेने रिहाना रॉड्रिगेसचा 6-1, 6-0असा सहज पराभव केला. अपर्णा पतैतने तिस्या रावतवर 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात अमोद सबनीसने आदित्य सुर्वेचा टायब्रेकमध्ये 6-2, 6-7(2), 7-6(4)असा पराभव केला. सौमिल चोपडेने देवब्रत बॅनर्जीचा 6-3, 6-2 असा तर, अंशित देशपांडेने आदित्य यादवचा 6-1, 6-0असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

14वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन हूडने पार्थ देवरूखकरला 6-1, 7-5असे नमविले. निशीथ रहाणे याने ईशान नाथनचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: 14 वर्षाखालील मुले:
निशीथ रहाणे वि.वि.ईशान नाथन 6-0, 6-0;
योहान चोकनी वि.वि.शर्विल पाटील 6-0, 2-6, 6-2;
आर्यन हूड वि.वि.पार्थ देवरूखकर 6-1, 7-5;

12वर्षाखालील मुले:
सौमिल चोपडे वि.वि.देवब्रत बॅनर्जी 6-3, 6-2;
अंशित देशपांडे वि.वि.आदित्य यादव 6-1, 6-0;
करण रावत वि.वि.पृथ्वीराज बारी 6-3, 6-3;
अभिराम निलाखे वि.वि.अथर्व रुईकर 6-1, 6-2;
अमोद सबनीस वि.वि.आदित्य सुर्वे 6-2, 6-7(2), 7-6(4);

14वर्षाखालील मुली:
माही शिंदे वि.वि.रिहाना रॉड्रिगेस 6-1, 6-0;
अपर्णा पतैत वि.वि.तिस्या रावत 6-2, 6-3;
सानिका भोगाडे वि.वि.रिशिता अगरवाल 6-0, 6-1;
इशान्या हतनकर वि.वि.सिद्धी खोत 6-3, 6-0;
आशी छाजेड वि.वि.चिन्मयी बागवे 6-2, 7-5.

पाण्यासाठी जिल्ह्यात जनआंदोलन उभे करणार : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे. :-पाण्याचा साठा करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने मी जिल्ह्यात जनआंदोलन करणार आहे. या लोकचळवळीसाठी शासनातर्फे निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी व्यक्त केला. उंड्री-पिसोळी नजीकच्या वडाची वाडी येथील तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ बापट यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पीएमआरडीएच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, वडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय बांदल, उपसरपंच जिजाबा बांदल, माजी सरपंच बबन बांदल,  शिवाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीश बापट यावेळी म्हणाले,  ‘पाझरतलावाच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमता वाढवून भविष्यात पुरेल अशा पाणीसाठवणीचे नियोजन करावायचे आहे. पाझर तलावाच्या एकूण कामकाजासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपये तर पीएमआरडीएच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांतील तलावांतील गाळ काढण्यासाठी पीएमआरडीएच्या वतीने तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तलावातील गाळ काढून साठवण क्षमतेत वाढ झाल्यास भीषण उन्हाळा जाणवणार नाही. एक महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. वडाचीवाडीचा पाझर तलाव हा महाराष्ट्रातील आदर्शवत पाझर तलाव करणे आमचे उदिष्ट आहे. ग्रामस्थांनी देखील पाण्याच्या प्रश्नासाठी एक होऊन काम करणे गरजेचे आहे. पाझर तलावाच्या कामाची गतिशीलता पाहण्यासाठी कामाचे चित्रीकरण केले जाईल. पीएमआरडीए व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वेळोवेळी लागेल ती मदत ग्रामस्थांना करण्याचे आव्हान यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

वडाचीवाडी येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दोन जे.सी.बी. मशीन तसेच सोळा डंपर पीएमआरडीए कडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गाळ काढत असताना सध्या तलावात असलेले पाणी जनावरांच्या पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी याशिवाय तलावातील गाळ शेतकऱ्यांना द्यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. तलावातील गाळ काढल्यानंतर गावची भूजल पातळी वाढण्यासाठी ओढे व बंधाऱ्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गावकऱ्यांच्या इच्छेविरोधात येथे होणारी टाउन प्लानिंग स्कीम करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे ही

स्कीम करताना शेतकऱ्यांचा व जमीन मालकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही ही पालकमंत्र्यांनी या वेळी दिली.

पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी पीएमआरडीएच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी सुरज मांढरे यांनी तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली तसेच गाळ काढून झाल्यानंतर पावसाळ्यात या भागात वृक्ष लागवड करण्यासाठी ही जिल्हा परिषद पुढाकार घेईल असे सांगितले. गावकऱ्यांनी या तलावातील गाळ काढल्यानंतर आसपासच्या पाच ते सहा गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याची भावना व्यक्त केली.