Home Blog Page 3149

14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत अन्मय देवराजूचा अर्जुन गोहडवर सनसनाटी विजय

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईजरवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटकाच्या अन्मय देवराजू याने  मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कर्नाटकाच्या पाचव्या मानांकित अन्मय देवराजूने महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित अर्जुन गोहडचा 7-5, 7-5असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.  अकराव्या मानांकित कर्नाटकाच्या  रोनीन लोटलीकरने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या सोळाव्या मानांकित महाराष्ट्राच्या शिवम कदमचा 6-3, 6-0असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या  आयुष भटने महाराष्ट्राच्या बाराव्या मानांकित दक्ष अगरवालचा 3-6, 6-1, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.

14 वर्षाखालील मुलींच्या गटात  उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या  राधिका महाजनने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत सोळाव्या मानांकित हर्षिता बांगेराचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. सातव्या मानांकित महाराष्ट्राच्या परी सिंगने मध्यप्रदेशच्या चौदाव्या मानांकित अमीशी शुक्लाचा टायब्रेकमध्ये 6-1, 6-7(4), 6-3असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.  दुसऱ्या मानांकित वैष्णवी आडकरने आपलीच राज्य सहकारी सहाव्या मानांकित हर्षाली मांडवकरचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी: राधिका महाजन(महा)(1) वि.वि. हर्षिता बांगेरा (महा)(16)6-0, 6-0; परी सिंग(महा)(7)वि.वि.अमीशी शुक्ला(मध्यप्रदेश)(14)6-1, 6-7(4), 6-3; कुंदना बंदारू(11)वि.वि.अभया वेमुरी(तेलंगणा)6-4, 6-1; वैष्णवी आडकर(महा)(2)वि.वि.हर्षाली मांडवकर(महा)(6) 6-2, 6-3;

14 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी: रोनीन लोटलीकर(कर्नाटक)(11)वि.वि.शिवम कदम(महा)(16)6-3, 6-0;आयुष भट(कर्नाटक)(3)वि.वि.दक्ष अगरवाल(महा)(12)3-6, 6-1, 6-1; आयुषमान अर्जेरीया(4)वि.वि.मोनील लोटलीकर(कर्नाटक)(10)7-6(4), 4-6, 6-3; अन्मय देवराजू(कर्नाटक)(5)वि.वि.अर्जुन गोहड(महा)(2)7-5, 7-5.   

संजय टकलेचे मिशन डब्ल्यूआरसी इस्टोनियात सुरु

0
पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आपली मोहीम इस्टोनियात शुक्रवारी सुरु करेल. इस्टोनियातील राष्ट्रीय रॅली मालिकेतील तिसऱ्या फेरीत तो सहभागी होईल. शुक्रवार  व शनिवार असे दोन दिवस ही रॅली होत आहे.
 
लॅट्वियाचा एडगर्स सेन्सीस संजयचा नॅव्हीगेटर आहे. एडगर्सला डब्ल्यूआरसीचा अनुभव असून त्याच्या घराण्यात रॅलीची परंपरा गेल्या दोन पिढ्यांपासून आहे. संजय बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनने तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर2 ही कार चालवेल. तो इएमव्ही2 या टू-व्हील ड्राईव्ह कारच्या गटात सहभागी होईल.
 
संजयने सांगितले की, ब्रिटनचे माजी विजेते ग्रॅहॅम मिडीलटन माझे प्रशिक्षक व मेंटॉर आहेत. मी याच महिन्यात पोर्तुगालमधील रॅलीत सहभागी व्हायचे ठरविले होते. जागतिक रॅली मालिकेसाठी मी मित्सुबिशी मिराज आर5 ही कार घेतली आहे, पण ही कार अत्यंत वेगवान आणि शक्तीशाली आहे. ती चालविण्यापूर्वी तुलनेने कमी क्षमतेची आर2 ही कार चालविणे उपयुक्त ठरेल असा सल्ला त्यांनी दिला. त्याचवेळी तयारीसाठी या दोन रॅलींची निवडही त्यांनी केली.
 
संजयसाठी नॅव्हीगेटरची निवड करण्यातही ग्रॅहॅम यांचे मत महत्त्वाचे होते. संजयला शनिवारी सायंकाळी इस्टोनियाचा व्हिसा मिळाला. त्यानंतर तो सोमवारी लॅट्वीयाला रवाना झाला. त्याने बाल्टीक मोटरस्पोर्टसच्या सर्व्हिस सेंटरला भेट दिली. तेथे त्याने मिडीलटन यांच्या मार्गदर्शनाखाली टेस्टिंग केले. संजय म्हणाला की, टेस्टिंगमध्ये मुलभूत गोष्टी अचूकतेने करण्यावर भर असतो. मी एडगर्सबरोबर सुद्धा थोडे टेस्टिंग केले. त्याने जॅग्वार, व्होल्गा, सुबारू, स्कोडा फेबिया आर5 अशा कार चालविल्या आहेत. त्याने 2015 मध्ये माँटे कार्लो रॅली जिंकली होती.
गेल्या वर्षी संजयने न्यूझीलंडच्या मायकेल यंग याच्या साथीत इस्टोनियातच टार्टूमध्ये झालेल्या रॅलीत उपविजेतेपद मिळविले होते. युरोपातील रॅलीत पदार्पणात करंडक जिंकण्याचा पराक्रम त्याने केला होता. जागतिक रॅली मालिकेतील फिनलँड रॅलीच्या पूर्वतयारीसाठी होणाऱ्या ऑटो24 रॅली संयोजकांनी आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेच्या प्रतिनिधीत्वासाठी संयोजक ब्रायन यंग यांना आमंत्रण पाठविले होते. त्यावेळी संजय-माईकने काही स्टेजेसमध्ये ड्रायव्हर आणि नॅव्हीगेटर अशा दोन्ही भूमिका बजावल्या होत्या.
 
तेव्हा संजय युरोपमधील रॅलीत सहभागी होण्याच्या माफक उद्देशाने सहभागी झाला होता. त्यामुळे दुसरा क्रमांक बोनस ठरला होता. यावेळी संजयचे ध्येय सुस्पष्ट आहे.
 
हारजुमा रोड परिसरात रॅलीचा प्रारंभ जोर्ग ग्रॉस-रॅगो मोडरेर करतील. हारजू कौंटीमधील या रॅलीत आठ देशांते 71 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
 
या रॅलीला एफआयए (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाईल) या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेची मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संहिता, इस्टोनियन राष्ट्रीय क्रीडा नियमावली, इस्टोनियन रॅली मालिकेचे सर्वसाधारण नियम आणि रॅलीशी संबंधित नियम लागू आहेत.
 
थालीन रॅली
देश ः इस्टोनिया
कालावधी 11-12 मे 2005
मालिका ः इस्टोनियन रॅली मालिका (इस्टोनियन चँपीयनशीप)
फेरी ः तिसरी
एकूण अंतर ः 511 किलोमीटर 73 मीटर
अतिरीक्त स्टेजः 13
अतिरीक्त स्टेजेसचे एकूण अंतर ः 100 किलोमीटर 60 मीटर
ट्रायलच्या पुनरावृत्तीची संख्या ः 6
मार्गाचे स्वरुप ः 98 टक्के वाळू, दोन टक्के सिमेंट

तळेगावजवळ काटवी येथे 10 एकरांमध्ये प्रशस्त घरकुल योजना

–    वनरुम किचन, 1 बीएचके व 2 बीएचके घरांची किंमत फक्त 13.62 लाख, 21.18 लाख व 27.74 लाख अनुक्रमे

–    कोणतेही अपार्टमेंट, कोणताही मजला.. एकच किंमत

–    शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असणारा एकमेव निवासी प्रकल्प

पुणे: व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (बीएसई स्क्रीप आयडी VASCONEQ) या अत्यंत विश्वासार्ह व पुण्यात मुख्यालय असलेल्या विकसकाने दर्जेदार परवडणारी घरे बांधण्याचा शुभारंभ केला आहे. तळेगावजवळ काटवी येथे ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’ हा आपला नवा प्रकल्प या कंपनीने उभारला आहे. वनरुम किचन, 1 बीएचके व 2 बीएचके असे फ्लॅट्स केवळ परवडणाऱ्या दरांतच नव्हे, तर दर्जेदार स्वरुपात ‘व्हॅस्कॉन’ने सादर केले आहेत. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच उभारून ‘व्हॅस्कॉन’ने एक नवीन पायंडा पाडला आहे.

‘गुडलाईफ’मध्ये विविध सोयी-सुविधा असून त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक टॉवरमध्ये ग्रंथालय, अभ्यासासाठी वाचनालय, संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारती उभारून सुमारे 500 घरे सादर करण्यात येणार आहेत. दहा एकरांच्या जागेत वसलेल्या ‘गुडलाईफ’पासून जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गाला अगदी सहज जाता येते. आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यांनी सांगितले, की “गेल्या काही काळापासून परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी येऊ लागली आहे. शहरांकडे होणारे स्थलांतर आणि सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती यांचा विचार करून गृहनिर्माण प्रकल्प उभे राहात आहेत. कौटुंबिक दृष्टीने मुलांचे संगोपन, शिक्षण व विकास यांना महत्त्व देणारा हा पहिलाच गृहनिर्माण प्रकल्प आम्ही ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’च्या रुपाने उभारला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आमचे विशेष कौशल्य यांचा उपयोग करून घरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी मिळेल, याचा आम्ही या प्रकल्पात विचार केला आहे. ‘व्हॅस्कॉन’ला तीन दशकांची गौरवशाली परंपरा आहे. उत्कृष्ट दर्जा व पैशाचा पुरेपूर मोबदला या आमच्या तत्वांना आम्ही जपतो. यापुढेही आम्ही नवनवीन संकल्पांचा विचार करू व तसे प्रकल्प राबवू.”

पुणे हे मुंबईच्या जवळ आहेच, त्याशिवाय येथे आयटी, उत्पादन आणि सेवा उद्योग-धंद्यांची भरभराट झालेली असल्याने पुण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास झालेला आहे. तथापि बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने, तसेच काही विशिष्ट भागांमध्ये किंमती खूपच वाढल्याने आता तळेगावसारख्या शहरालगतच्या परवडणाऱ्या भागांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प निर्माण होऊ लागले आहेत. या नव्या भागांतही आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढू लागले आहे.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. संबंधी

‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स’चे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ‘व्हॅस्कॉन’चा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासी, औद्योगिक बांधकामे, आयटी पार्क, मॉल, मल्टीप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30 शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेत, तर काही ‘इपीसी’च्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे ‘इपीसी’ पध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे ‘व्हॅस्कॉन’ने ठरविले आहे.

रजपूत झोपडपट्टी ते डीपीरोड रस्ता जोडून देण्याची आमदार काळे यांची मागणी

नदी पात्रातील रस्त्यांच्या अर्धवट कामांची आयुक्त राव यांनी केली पहाणी

पुणे – जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता येथील वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी नदी पात्रातून रस्ता महापालिकेने करण्याचा प्रकल्प तयार हाती घेतला. रस्त्यांची कामेही काही प्रमाणात करून अर्धवट अवस्थेतील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून वाहतूक कोंडीत भर टाकली. ही कोंडी कमी करण्यासाठी रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रेपूल डीपीरोड मुख्य रस्त्याला जोडून द्या अशी मागणी आमदार विजय काळे यांनी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली.

आमदार विजय काळे यांनी आज आयुक्त सौरभ राव यांना नदी पात्रातील रस्त्याची प्रत्यक्षात असलेली अवस्था जागेवर नेऊन दाखवली. त्यावेळी प्रकल्प विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, विकास आराखड्याचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर, उपायुक्त सुनील केसरी आणि पथ विभागाचे अधिकारी यावेळी त्यांच्या बरोबर होते.बाबा भिडे पूलाकडून एरंडवणेकडे येणारा रस्ता रजपूत झोपडपट्टीवरून ऐंशी फूटी डीपी रस्त्याला जोडण्याचे नियोजन होते. त्यातील शेवटचा १०० ते २०० मीटर रस्त्याच्या तुकडा तयार नसल्याने सर्व वाहने अरूंद रस्त्यावरून एका वस्तीतून  कशी येतात हे आयुक्तांना आमदार काळे यांनी प्रत्यक्ष दाखवले.

रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रेपूल डीपी रोड सारखाचा बाबा भिडे पूल ते वैकुंठ स्मशान भूमी रस्ता कसा अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे हे आमदार काळे यांनी प्रत्यक्ष जागेवर नेऊन आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. हे दोन्ही रस्ते जोडले गेले तर कर्वे रोड आणि शास्त्री रोडवरील वाहतुकीचा ताण कसा कमी होऊ शकतो ? तसेच हा  नदी पात्रातील रस्त्याचा प्रकल्प काय उद्देशाने तयार केला होता ? याचीही महिती आमदार काळे यांनी आयुक्त राव यांना दिली. कर्वे रोडवर आणि नदी पात्रात मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतुकीस होणारा अडथळा वाढला असून त्यात दिवसेंदिवस वाढच होत जाणार असल्याचेही आमदार काळे स्पष्ट केले. त्यामुळे या पर्यायी रस्त्यांची फारच आवश्यकता असून कसेही करून हे रस्ते जोडले जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आय़ुक्तांचा निदर्शनास आणून दिले.

नदीपात्रात नव्या आखण्यात आलेल्या निळ्या रेषेत रस्ता येत असल्याने त्याची कामे करता येत नसल्याचे कारण सातत्याने अधिकारी देत होते. मात्र त्याचवेळी मंगल कार्यालयांची तात्पुरती बांधकामे निळ्या रेषेत कशी असा प्रश्न आयुक्त राव यांनी उपस्थित केल्यावर अधिकारी निरूत्तर झाले. सध्या नदी पात्रातून सूचनाही आयुक्तानी केली. नव्याने आखण्यात आलेल्या निळ्या रेषेची अंमलबजावणी कडक होत असल्याने आपण बाबतची बैठक लवकरच घेऊ असेही त्यांनी नमूद केले.

 

जप्त केलेल्या ६.३७ कोटीरुपयांच्या वाळूचा फेर जाहिर लिलाव

0

बारामती  :-  बारामती तालुक्यातील तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर, ग्रामीण पोलीस स्टेशन येथील जप्त करण्यात आलेल्या  अनधिकृत वाळुचा फेर जाहिर लिलाव सोमवार दिनांक 14.05.2018 रोजी सकाळी 11.00 वा. तहसिल कार्यालय दालन,बारामती येथे घेण्यात येणार आहे.ज्यांचेकडून सर्वोच्च्‍ बोलीनुसार बोली प्राप्त होतील त्यांनाच वाळु वाहतुक अधिकार देण्यात येतील. लिलावात भाग घेवू इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीला लिलाव सुरु होण्याच्या किमान 1 तासापूर्वी  जाहिर अनामत रक्कम रुपये 50,000/- रोखीने भरणे आवश्यक आहे. लिलावधारकाने नियमित आयकर भरत असल्याचा पुरावा, पॅन कार्डाची छायांकित प्रत, विक्रीकर विभागाचा टिन नंबर असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केले नंतरच लिलावधारकाला लिलावात सहभागी होता येईल.वाळू लिलाव भरताना संबंधिताने निवासाचा पुरावा, वाहन चालविणेचा परवाना यापैकी कोणताही एक पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.लिलावाची सरकारी किंमत यांचा तपशील पुढीलप्रमाणे – पोलीस निरिक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन,सहा.पोलीस निरिक्षक, वडगाव नि. सहा.पोलीस निरिक्षक,ग्रामीण पोलीस स्टेशन व सहा.पोलीस निरिक्षक, माळेगाव बु. पोलीस स्टेशन येथील एकूण 158.02 ब्रास  वाळू निश्चित केलेली अपसेट प्राईस6,37,966.2/- रुपये आहे. लिलावाच्या अटी / शर्ती, जागेचा तपशील इत्यादी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय, बारामती येथे पहावयास मिळेल, असे तहसिलदार श्री.हुनमंत पाटील यांनी एका पत्रकान्वये कळवले आहे.

नवउद्योजकांचा आधारस्तंभ – देआसरा

0

जीवनात यश त्यानांच मिळते जे चिकाटीने कार्यरत असतात. आपल्यात असलेले कौशल्य जाणून सातत्याने जो वाटचाल करतो त्यालाच यश मिळते. दत्तात्रय व स्नेहल बागडे हे याचे एक उत्तम उदाहरण. या जोडप्याला जेव्हा त्यांच्या पहिला बाळाची गोड बातमी कळली तेव्हा एक आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळले. आपल्यात असलेले कौशल्य जाणून गृहिणी असलेल्या स्नेहल यांनी पतीला हातभार लावण्यास सुरवात केली. व त्यातूनच एक नवीन उद्योजिका जन्माला आली. पती पत्नी दोघांनी मित्राच्या पेंटिंग व्यवसायात सामील होऊन सुशोभित वस्तू तयार करण्यास सुरवात केली. काही काळानंतर त्यांना अधिक भांडवलाची गरज भासू लागली. त्यावेळी त्यांनी देआसराकडे धाव घेतली. आज ते एक यशस्वीरित्या आपला व्यवसाय करत आहेत.

मार्केटिंग व कस्टम रिलेशन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या आदित्य काळेने स्वतःचे स्नॅक्स सेंटर सुरु करायचे ठरवले. व्यवसाय चालवण्यासाठी लागणाऱ्या कर्जाचे योग्य नियोजन न केल्याने आदित्य कर्जाची वेळेवर फेड करू शकत नव्हता. आदित्यची ही परिस्थिती समजून घेऊन देआसराने त्याचा योग्य रित्या व्यवसायाचा आराखडा व बँकेचे कागदपत्रे बनवले. आता आदित्य यशस्वीपणे वायसाय करत आहे व कर्जाची परतफेड योग्य वेळेस चालू आहे.

वाणिज्य शाखेत शिक्षान घेतलेल्या चैत्राली यांनी लग्नानंतर घरूनच ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला व त्याच बरोबर घरून डबे देण्याचे कामही सुरु केलेलं.

थोड्यच दिवसात त्यांनी स्वतःची फूड व्हॅन सुरु केली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व योजनेसाठी देआसराने त्यांना मार्गदर्शन दिले.

अशा अनेक नव उद्योजकांना व्यवसाय उभा करण्यासाठी व तो वाढवण्यासाठी देआसरा फाउंडेशन मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन रोजगार वाढवण्याच्या हेतूने डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केली आहे. नव्याने उद्योग चालू करणाऱ्या उद्योजकांसाठी देआसरा ही खऱ्या अर्थाने आसरा देणारी संस्था झाली आहे. या फाउंडेशनचे ध्येय २०२० पर्यंत कमीतकमी एक लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने  25,000  उद्योगांना त्यांचे व्यवसाय सुरू करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि वाढविण्यासाठी सक्षम करणे, असे ध्येय समोर ठेवले आहे. प्रज्ञा गोडबोले या फाउंडेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी असून देआसराच्या कार्यकारी टीममध्ये पूर्वी नामांकित बँकिंग आणि सरकारी वित्तीय संस्थांमध्ये काम करून समृद्ध अनुभव असलेले लोक कार्यरत आहेत.

ना नफा ना तोटा या तत्वावर या संस्थेचे कामकाज चालू असून उद्योजकांना एक समर्पित व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देते ज्याला उद्योगमित्र म्हणले जाते. जो व्यवसायासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करतो आणि निरंतर यशस्वीतेची खात्री देतो. देआसरा व्यवसाय व मालकांसाठी एक सक्षम व्यासपीठ तयार करून देते यातून ते व्यवसायाची ओळख, त्यातील चढ उतार, व्यवसायाला असलेली बाजारपेठ याची सर्व माहिती नव उद्योजकाला देण्यात येते. व्यवसाय सुरु झाल्यावर देखील उद्योगमित्र हा नवउद्योजकाबरोबर असतो. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला देअसरा कायम उद्योजकाच्या पाठीशी ठाम पणे उभे असते. नव्याने व्यवसाय करणे हे अगदी ध्येर्याचे काम आहे. व्यवसायात आपण यशस्वी होऊ का? हा व्यवसाय आपल्याला योग्यरीत्या चालवता येईल का? असे अनेक प्रश्न नवीन व्यवसाय चालू करताना प्रत्येकाच्या मनात येतात. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी उद्योजकांना व्यवसायासंबंधी विविध प्रकारची मदत व माहिती दिली जाते.

उद्योजकता वाढवणे, उद्योजकांना व्यवसाय चालवणे सोपे करणे हे ध्येय ठेऊनच देअसरा कार्यरत आहे. बेरोजगारीची मोठी समस्या सोडवण्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक घडवायला हवेत, या उद्येशाने फाउंडेशनची निर्मिती झाली. सहजपणे ग्राहकांशी जोडण्यासाठी, त्यांचे उत्पादन / सेवा बाजारात आणणे, व्यवहार करणे आणि दैनंदिन व्यवसाय कार्यप्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते. या उद्योजकांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी देआसरा विविध बँकांशी संलग्न झाल्या आहेत ज्यामुळे आजपर्यंत १७ कोटी पेक्षा जास्त रकमेची कर्जे या उद्योजकांना यशस्वीपणे वितरित करण्यात आली आहेत. या फाउंडेशन तर्फे पुणे, पिंपरी-चिचंवड तसेच राज्यात विविध शहरांमध्ये विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. ज्यात आर्थिक व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, नियोजन अशा विविध बाबींवर तज्ञान मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात येते.

बीआरटी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करावे-भिमाले

पुणे- सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज बी.आर.टी. मार्गावर रखडलेल्या कामांमुळे प्रवासी व पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरील कामे वेळेत पूर्ण करा, आठवड्याभरात कामाचा दर्जा सुधारा अशा सूचना सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आज संबंधित ठेकेदार व सल्लागाराला दिला.

स्वारगेट परिसरातील जेधे चौक ते कात्रज स्थानक या ६.२ किलोमीटर अंतरावर बी.आर.टी.च्या पुनर्रचनेचे काम चालू आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर श्री.भिमाले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज या मार्गाची पाहाणी केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पथ विभाग अधिकारी अभियंता श्री.विजयकुमार शिंदे, यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बी.आर.टी. मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बसस्टॉपचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे, डिझाईन सदोष असून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, स्वारगेट, आदीनाथ सोसायटी, बिबवेवाडी परिसरात वाहनतळ, पदपथ याचे मार्किंग झालेले नाही, ठिकठिकाणी राडारोडा पडलेला आहे, स्वच्छतागृहांसाठी जागांची अजून निश्‍चिती झालेली नाही, दिलेल्या वेळेत काम पूर्ण होत नाही याबाबी श्री. भिमाले यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.पुढील तीन महिन्यात या मार्गाच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आले असून कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे आठवड्याभरात कामे वेळेत झाली नाहीत, कामात सुधारणा झाली नाही तर संबधित ठेकेदार व सल्लागारावर कडक कारवाई केली जाईल.

बीआरटी सेल लवकरच कार्यान्वित करणार

बी.आर.टी. मार्गासाठी पी.एम.पी. चा यापूर्वी स्वतंत्र बी.आर.टी. सेल होता. मधल्या काळात हा सेल बंद पडला होता. तो पुन्हा सुरू करावा यासाठी पी.एम.पी.एम.एल. संचालक मंडळात लवकरच प्रस्ताव मंजुर करून घेऊन, तो कार्यान्वित करणार आहे.

अतिदुर्गम ‘चांदर’मध्ये आता महावितरणच्या प्रकाशाचं चांदणं

पुणे सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे, जि. पुणे) अन् लगतच्या दोन वस्त्यांसाठी अवघ्या सात दिवसांत 65 वीजखांब व एका वितरण रोहित्राची वीजयंत्रणा उभारत महावितरणने डोंगरदऱ्यातून अक्षरशः ‘प्रकाश’ खेचून आणला आहे. आजवर चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणाऱ्या चांदर गावासह डिगेवस्ती व टाकेवस्तीमधील घरेही महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघत आहेत.

केवळ एका विद्यार्थ्यांसाठी डोंगरदऱ्यातून अडीच- तीन तास प्रवास करून चांदर येथील शाळेत विद्यार्जन करणाऱे शिक्षक श्री. रजनीकांत मेंढे यांच्यामुळे अतिदुर्गम चांदर गावाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांद्वारे जगाला मिळाली होती. त्या शाळेला सुद्धा महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे, हे विशेष.

पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेलगत सह्याद्रीच्या घनदाट वनराईच्या डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम भागात वसलेले चांदर गाव. दोन डोंगराच्या खोल दरीत वसलेले हे 18 घरांचे गाव. बाजूलाच असलेल्या डोंगरमाथ्यावर 10 घरांची टाकेवस्ती व दुसऱ्या डोंगरमाथ्यावर 18 घरांची डिगेवस्ती असा 46 घरांचा परिसर. पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे साडेचार ते पाच तासांच्या प्रवासाचे चांदर गाव हे पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे शेवटचे टोक. दऱ्याखोऱ्यातील घाटरस्त्याने जाताना शेवटचे 15 किलोमीटर भूसभुशीत मातीरस्त्याचे अंतर कापणे चारचाकी वाहनांमध्ये केवळ जिप व तत्सम वाहनांखेरीज केवळ अशक्य आहे. चांदर व लगतच्या दोन्ही वस्त्यांचा पावसाळ्यात तर सुमारे 5 ते 6 महिने जगाशी संपर्क तुटलेला असतो. पण डोंगरदऱ्यातील याच गावात महावितरणने सामाजिक बांधिलकीचे एक नवीन प्रकाशपर्व सुरु केले आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे चांदर गावाची माहिती मिळाली. या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक व ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक अधिकाऱ्यांनी चांदर गावाची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर अत्यंत नैसर्गिक व भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीत हे आव्हान किती खडतर आहे याचा अंदाज आला. त्यानंतर दि. 20 एप्रिलला प्रत्यक्षात काम सुरु झाले.

महावितरणने हे आव्हान स्विकारून सामाजिक बांधिलकी जोपासत काम सुरु केले. सुमारे 60 कर्मचारी चांदर परिसरातील डोंगरदऱ्यात वीजयंत्रणा उभारण्याच्या कामी लागले. सकाळी 9 ते रात्री उशिरापर्यंत वीजयंत्रणा उभारण्यासाठी हे सर्वजण राबत होते. अत्यंत खडतर रस्त्याने सर्वप्रथम वीजखांब, तारा व इतर तांत्रिक साहित्य एकाच दिवसात आणल्यानंतर प्रत्यक्ष वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु झाले. यात डोंगर पायथ्याशी असलेल्या निवंगुणे वस्ती जवळील आडमल 22 केव्ही वीजवाहिनीला जोडून डोंगर माथ्यापर्यंत सुमारे 900 मीटर व त्यापुढील डिगेवस्तीजवळील सपाट भागापर्यंत नवीन 29 वीजखांब टाकून 22 केव्ही क्षमतेची सुमारे 1.72 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनी पूर्णपणे नव्याने उभारण्यात आली. त्यानंतर डिगेवस्तीजवळच 63 केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र लावण्यात आले. सलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर 26 एप्रिलला वितरण रोहित्र व उच्चदाब वाहिनी कार्यान्वित झाली. रोहित्राच्या वीजखांबावर रात्री लखलखणाऱ्या दिव्याने चांदर गावासह दोन्ही वस्त्यांना महावितरणने खेचून आणलेला प्रकाश आता घराच्या उंबरापर्यंत येत असल्याची चाहूल दिली. यावेळी ग्रामस्थांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

त्यानंतर डोंगरमाथ्यावर असलेल्या या रोहित्रामधून तीन वेगवेगळ्या दिशेला असलेल्या चांदर, डिगेवस्ती व टाकेवस्ती येथे 440 व्होल्टच्या लघुदाब वाहिनीद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात आली. रोहित्राजवळ असलेल्या डिगेवस्तीला 9 खांबावरील वाहिनीद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात आली. पण हे काम चांदरसाठी सर्वाधिक अवघड ठरले. दुसऱ्या दिशेला सुमारे 1300 मीटर डोंगरदरीत असलेल्या चांदर गावासाठी डोंगर उतारावर एकूण 17 वीजखांब उभारण्यात आले आणि तिसऱ्या दिशेने असणाऱ्या टाकेवस्तीसाठी सुद्धा स्वतंत्र 10 वीजखांब उभारण्यात आले. त्यानंतर या तीनही वस्त्यांसाठी नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु झाली. विशेष म्हणजे सिमेंट कान्क्रीटीकरणासाठी आवश्यक पाण्याचेही दुर्भिक्ष्य असल्याने व टँकर येणे शक्य नसल्याने बॅरलद्वारे पाणी आणावे लागले. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे 20 लाख रुपये खर्च आला.

वीजपुरवठा यशस्वी सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहक दिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे श्री. बबन सांगळे, श्री. तुकाराम बेसावडे यांना तर डिगेवस्ती येथील श्री. नथू कोकरे व श्री. तिमा कोकरे यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्या आहेत. घरात उजळलेले विजेचे दिवे पाहून महावितरणचे हे नवीन वीजग्राहक व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव व निष्पाप, दिलखुलास हास्यानेच शब्दातीत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. प्रकाशाच्या आगमनाचा आनंद साखर वाटून साजरा झाला. या वस्त्यांमधील आबालवृद्धांनी घरात विजेवरील दिव्याचा प्रकाश पहिल्यांदाच अनुभवला हेही विशेष.

चांदर गाव व दोन्ही वस्त्यांमध्ये 46 पैकी बहुतांश घरे ही कुडाची माती लेपलेली असल्यामुळे वीजमीटर व सर्व्हीस वायर टाकण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणीची प्रक्रिया ही वीजसुरक्षेला प्राधान्य देऊन सुरु आहे. यासोबतच ग्रामस्थांना वीजसुरक्षेबाबतही माहिती देण्यात येत आहे. अतिदुर्गम व डोंगरदऱ्यात चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये महावितरणच्या सामाजिक बांधिलकीचे प्रकाशपर्व सुरु केल्याबदद्ल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार व पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी या कामी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

‘गौरी सावंत -द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ द फर्स्ट ट्रान्सजेंडर मदर’-प्रकट मुलाखतीचे आयोजन

पुणे ःजागतिक मातृदिनानिमित्त ‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’ संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणार्‍या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणार्‍या तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’चे संस्थापक रिदम वाघोलीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आशय वाघोलीकर आणि अनू वाघोलीकर उपस्थित होते.

‘गौरी सावंत द एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी ऑफ द फर्स्ट ट्रान्सजेंडर मदर’ असे या कार्यक्रमाचे नाव असून, ‘एलिजियम बँक्वेट्स’, जंगली महाराज रस्ता येथे रविवारी 13 मे 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. ‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’चे संस्थापक रिदम वाघोलीकर हे गौरी सावंत यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

याच कार्यक्रमात डॉ. सोनिया नगराळे या ‘तृतीयपंथीयांचे कायदेशीर हक्क’ या विषयावर बोलणार आहेत. आशय वाघोलीकर संयोजन करणार आहेत.

‘क्रिएटिंग पॉसिबिलीटीज्’ ही संस्था सामाजिक विषयांवर जनजागृतीचे काम करते.

रिदम वाघोलीकर संस्थापक असून, लता मंगेशकर यांची भाची रचना खडीकर-शहा व्यवस्थापकीय संचालक आहेत.

नववधू सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज !

गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे.

ह्या आगळ्या सरप्राइज गिफ्ट विषयी नववधू सावनी सांगते,”मला आशिषला वेडिंग गिफ्ट देण्याची इच्छा होती. काय गिफ्ट करावं ह्याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं,की माझे सूर हेच माझं वैशिषठ्य आहे. त्यामूळे मी त्याला एक सुरेल सरप्राइज द्यायचं ठरवलं.”

ती पूढे सांगते, “जूनी गाणी गाण्यापेक्षा त्याच्यासाठीच एक गाणं तयार करायचं मी नक्की केलं. आणि मग माझ्या भावाला वैभव जोशी आणि मित्र सागर धोते, मयुर धांधेला ह्यात सहभागी केलं. वैभव जोशीने लिहीलेल्या गीताला सागर धोतेने संगीतबध्द केलंय. तर मयुरने गाण्यात माझ्या पतीचं आशिषचं पेटिंग बनवलंय.”

“मी आमच्या लग्नाच्या ‘संगीत’च्या कार्यक्रमाला हे सरप्राइज आशिषला दिलं. माझ्या ह्या रोमँटिक सरप्राइजनंतर त्याच्या डोळ्यात आनंदाक्षु तरळले होते. आणि आता मी तेच माहिया गाणं ऑफिशिअली लाँच केलंय. जसं आशिषला गाणं आवडलं तसंच ते सर्व कानसेनांनाही आवडेल, असा मला विश्वास वाटतो.”

‘ग्रे वॉटर ‘प्रक्रिया प्रकल्पामुळे तळजाई टेकडी वर्षभर राहणार हिरवीगार

पुणे-आतापर्यंत  पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना आता देशातील पहिल्या  कार्यान्वित झालेल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन दररोज पाच लाख लिटर पाणी मिळणार आहे,त्यामुळे तळजाई टेकडी आता वर्षभर हिरवीगार राहणार आहे असे प्रतिपादन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले. 

 पुणे महापालिकेच्यावतीने आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर प्रथमच  प्रक्रिया केलेले पाणी जलवाहिनीतून मंगळवारी पोहचले यावेळी या  शुद्ध पाण्याचे  जलपूजन करण्यात आले, त्यावेळी आबा बागुल बोलत होते .याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ राजू धारिया, शैलेंद्र पटेल , सचिन पुणेकर, आर. सी. माहुलकर , आणि वास्तुविशारद महेश नामपूरकर, अजित कोंढाळकर ,   पालिकेचे अधिकारी वर्ग तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल , नंदकुमार बानगुडे , हेमंत बागुल , सागर आरोळे , धनंजय कांबळे आदींसह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.  यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, तळजाई टेकडीवर १०७ एकर क्षेत्रात वसुंधरा जैव वैविध्य उद्यान हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून साकारला जात आहे. आजपर्यंत या टेकडीवरील वनसंपदेला वाचविण्यासाठी ,प्राणी -पक्षांच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरणप्रेमी कार्यरत होते. विशेषतः आजपर्यंत या टेकडीवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचवले जात होते मात्र   कै. वसंतराव बागुल उद्यान येथे कार्यान्वित झालेल्या देशातील पहिल्या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून तळजाई टेकडीवर अडीच किमीच्या  जलवाहिनीद्वारे आता प्रक्रिया केलेले पाणी आज पोहचले आहे. दररोज  पाच  लाख लिटर पाणी येथे मिळणार आहे. परिणामी आता वर्षभर तळजाई टेकडी हिरवीगार राहणार आहे. शिवाय 

वसुंधरा जैव वैविध्य उद्यान प्रकल्पाला या पाण्याचा उपयोग  होणार आहे.तसेच जमिनीत पाणी मुरून भूगर्भातील पाणीसाठाही वाढणार आहे.  वनसंपदा आणि प्राणी -पक्ष्यांसाठी  पाण्याची व्यवस्था आणि टेकडीचे संवर्धन यामुळे पर्यावरणप्रेमींही  सुखावले आहेत.नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर येथे एक लाख चौरस फुटाचे क्रीडांगणही  पूर्णत्वास आले असून लवकरच सौरउर्जेवरील ३०० किलोवॅटचा आदर्शवत प्रकल्पही  कार्यान्वित होणार आहे. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणाही सुरु होणार आहे. अशी माहिती बागुल यांनी यावेळी दिली. 

राजू धारिया म्हणाले , असे प्रकल्प काळाची गरज आहे. या ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यावरून होणारा दबावही  कमी होणार आहे.  भूजलपातळी वाढविण्यासाठी आणि पाण्याच्या पुर्नवापराला चालना देण्यासाठी असे प्रकल्प सर्वत्र उभारले पाहिजे आणि तळजाई टेकडीप्रमाणे अन्य टेकड्यांवरही हा प्रकल्प राबवावा आबा बागुल यांनी पर्यावरणासाठी केलेले हे कार्य आदर्शवत आहे. त्यांची दूरदृष्टी कौतुकास्पद आहे. शहरासाठी त्यांनी अनेक उपयुक्त प्रकल्प दिले आहेत. असे ते म्हणाले. 

आर. सी. माहुलकर म्हणाले, जायका प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपये खर्ची घालण्यापेक्षा शहरातील मोठ्या नाल्यांवर असे प्रकल्प उभे करण्याचे नियोजन झाले पाहिजे. सचिन पुणेकर म्हणाले, वनसंपदेबरोबरच वन्य जीवांच्या अधिवासाचे संवर्धन होण्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक आहे. संपूर्ण देशात असे प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. त्यांनी पर्यावरण संवर्धनाला खऱ्या अर्थाने चालना दिली आहे.  शैलेंद्र पटेल यांनी या प्रकल्पाचे कौतुक करून महापालिकेने अशा प्रकल्पांसाठी खास तरतूद अंदाजपत्रकात केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त  केली. यावेळी सर्व पर्यावरणप्रेमींनी ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पाला चालना देण्यासाठी आणि पाण्याचा पुनर्वापर वाढावा यासाठी पालिकेने बजेटमध्ये १०० कोटी रुपये खास तरतूद करण्याच्या मागणीचे पत्रही आयुक्तांना पाठविले. तसेच आबा बागुल यांच्या प्रत्येक विकासकामांसाठी आम्ही सदैव पाठीशी राहू अशी ग्वाहीही दिली. यावेळी एका पर्यावरणप्रेमीने आम्ही गेली तीस वर्षे या टेकडीवर दररोज पाण्याच्या बाटल्या घेऊन येत आहोत. मात्र आज टेकडीवर पाणी उपलब्ध झाल्याने खऱ्या अर्थाने टेकडी संवर्धनाला संजीवनी मिळाली आहे, अशा प्रकारचे कार्य फक्त आबा बागुल हेच करू शकतात अशा शब्दात त्यांनी गौरव केला.

नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत समीक्षा श्रॉफ, स्वरा काटकर, कायरा शेट्टी, सोनल पाटील, ईरा शहा यांची आगेकूच

0

पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात समीक्षा श्रॉफ,  सायना देशपांडे,  ईरा शहा,  कायरा शेट्टी,  स्वरा काटकर,  सोनल पाटील,  सारा गजभीये,  अन्या जेकब  या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ईरा शहाने आपलीच राज्य सहकारी माहिका गुप्ताचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव केला.  महाराष्ट्राच्या कायरा शेट्टीने तामिळनाडूच्या एसआर अनन्याचा 6-2, 6-2 असा तर,  स्वरा काटकरने उत्तरप्रदेशच्या सौमरिता वर्माचा 6-4, 6-1असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.  महाराष्ट्राच्या सोनल पाटीलने तेलंगणाच्या श्रीवल्ली मेडीशेट्टीवर 7-5, 6-0असा विजय मिळवला.  अन्या जेकबने हरियाणाच्या दिशा सेहरावतचा 4-6, 6-2, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव केला.

14 वर्षाखालील  मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित गुजरातच्या विशेष पटेलने विमल गगनचा  6-1, 6-1असा सहज पराभव केला. महाराष्ट्राच्या सोळाव्या मानांकित शिवम कदम याने हरियाणाच्या अग्रिया यादवचा 6-3, 6-1असा पराभव करून करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. अकराव्या मानांकित कर्नाटकाच्या रोनीन लोटलीकरने स्कंधा रावचा 6-2, 6-1असा पराभव करून आगेकूच केली.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुली: पहिली फेरी: लक्ष्मी अरुणकुमार(तामिळनाडू)वि.वि.अथमिका श्रीनिवास(कर्नाटक)6-1, 6-3; समीक्षा श्रॉफ(महा)वि.वि.रिद्धी चौधरी 6-3, 7-5; सायना देशपांडे(महा)वि.वि.नैना गुलाटी(दिल्ली)6-0, 6-0;   ईरा शहा(महा)वि.वि.माहिका गुप्ता(महा)6-3, 6-4; कायरा शेट्टी(महा)वि.वि.एसआर अनन्या(तामिळनाडू)6-2, 6-2; विद्युल मणिकांती(कर्नाटक)वि.वि.वैष्णवी वकीती(तेलंगणा)6-1, 6-2; हर्लीन धांडा(पंजाब)वि.वि.जेनी संथनाकुमार(तामिळनाडू)6-3, 6-2;   स्वरा काटकर(महा)वि.वि.सौमरिता वर्मा(उत्तरप्रदेश)6-4, 6-1; सोनल पाटील(महा)वि.वि.श्रीवल्ली मेडीशेट्टी(तेलंगणा)7-5, 6-0;  अभया वेमुरी(तेलंगणा)वि.वि.सुहिता मारूरी(कर्नाटक)6-3, 6-1; पवित्रा पारीख(गुजरात)वि.वि.रुमा गायकैवारी(महा) 7-5, 6-1; सारा गजभीये(महा)वि.वि.सोहा पाटील(महा) 6-3, 6-2; अन्या जेकब(महा)वि.वि.दिशा सेहरावत(हरियाणा)4-6, 6-2, 6-2; कनिस्का श्रीनाथ(कर्नाटक)वि.वि.निराली पदनिया(तेलंगणा)7-5, 6-1;

14 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:  विशेष पटेल(गुजरात)(1)वि.वि.विमल गगन  6-1, 6-1;  शिवम कदम(महा)(16)वि.वि.अग्रिया यादव(हरियाणा)6-3, 6-1; रोनीन लोटलीकर(कर्नाटक)(11)वि.वि.स्कंधा राव(कर्नाटक) 6-2, 6-1; अरुणवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(6)वि.वि.मनदीप रेड्डी(कर्नाटक)6-3, 6-0;  आयुष भट(कर्नाटक)(3)वि.वि.कुशल चौधरी(महा) 6-0, 6-0;

राज्यातील सुमारे अडीच लाख घरांना २ हजार वाड्यापाड्याना डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी

0

मुंबईराज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्यापाड्यात घरांना सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपायध्याय योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यन्त वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे.

 राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे कोटी ४० लाख २६ हजार ३५३ आहेत्यापैकी कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहेउर्वरित लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य दिनदयाल योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतची कामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत.  

 मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून महावितरणने या सर्व गावांत वीज पोहोचविली आहे. यात २०१८ मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाही समावेश आहे.

 सद्यस्थितीत राज्यातील वाड्यापाड्यांची संख्या सुमारे लाख हजार ९३९ एवढी आहेत्यापैकी ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यात यापूर्वीच वीजजोडणी देण्यात आली असून उर्वरित हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२ वाड्यापाड्यांना दिनदयाल योजनेतून ३४७ वाड्यापाड्यांना स्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची गरज आहे, अशा ठिकाणी विविध योजनेंतून निधी मिळवून तसेच दुर्गम भागात महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा) द्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे.

 राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा किंवा 1912, 1800-102-3435 / 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पिंपरीच्या जय हिंद स्कूलचे संस्थापक मुख्याध्यापक बी. एफ. खिलनानी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पिंपरी- जय हिंद हाय स्कूलचे संस्थापक मुख्याध्यापक भगवान खिलनानी (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत पत्रकार रुप कर्नानी हे त्यांचे भाचे होत.

बी. एफ. खिलनानी हे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी एका लहानशा शेडमध्ये जय हिंद हाय स्कूल ही शाळा स्थापन करुन २५ वर्षे तेथे सेवा बजावली. त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षकासाठीचा राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. ते निवृत्त होईपर्यंत या शाळेचा इतका अभिमानास्पद विस्तार झाला, की ती पिंपरीमधील सर्वांत मोठ्या शाळांपैकी आणि महाविद्यालयांतील ठरली.

भगवान खिलनानी शाळेत कार्यरत असताना त्यांनी आपले सर्व आयुष्य शाळेला इतके वाहून घेतले होते, की जणू काही त्यांचे लग्न शाळेशीच लागले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून न पाहता पूर्वायुष्यात ज्यांना वेळ देता आला नाही असे वैयक्तिक छंद जोपासण्याकडे लक्ष दिले. त्यात लेखन, काव्य, चित्रकला, गायन, संगीत रचना, पोस्टाची तिकिटे जमवणे, अर्कचित्रे (कॅरिकेचर्स) काढणे आदींचा समावेश होता. त्यांनी सिंधी व इंग्रजी भाषेत एकामागोमाग एक पुस्तके लिहिण्याचा सपाटा लावला, ज्यात कविता, लघुकथांचा समावेश होता. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन नामवंत व्यक्ती व उद्योगपतींच्या हस्ते रंजक वातावरणात झाले.

पूर्वायुष्यात शिक्षक असलेले भगवान खिलनानी आयुष्याच्या सोनेरी वयात विद्यार्थी बनले. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी उर्दू भाषा शिकण्यास सुरवात केली. ती आत्मसात केल्यावर त्यांनी दबी चिंगारिया नावाने उर्दू गझलांचे पुस्तक संकलित केले. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या हस्ते झाले. भगवान खिलनानी उर्दू गझलांचे संकलन करणारे पहिले सिंधी ठरले.

हिंदुस्थान टाइम्सने घेतलेल्या ऑल इंडिया कॅरिकेचर कॉन्टेस्ट या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात लता मंगेशकर यांचे अर्कचित्र रेखाटून देशपातळीवर दुसरे बक्षीस पटकावले. त्यानंतर त्यांनी स्वतः रंगवलेल्या सुमारे ८० चित्रांचा व हास्यचित्रांचा आल्बम संकलित केला. त्यात अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, शाहरुख खान अशा प्रसिद्ध कलाकारांची अर्कचित्रे आहेत. त्यांनी स्वतःची चित्रे, पोस्टाची तिकिटे यांची प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने असे १५ शानदार कार्यक्रम आयोजित केले.

साईबाबांचे निस्सिम भक्त असणाऱ्या भगवान खिलनानी यांनी रोज सकाळी निवासस्थानापासून ते शिवाजीनगरच्या प्रसिद्ध साईबाबा मंदिरापर्यंत रिक्षाने जाऊन दर्शन घेण्याचा शिरस्ता कधीही चुकवला नाही.

बी. एफ. खिलनानी यांची सिंधी, हिंदी, उर्दू व इंग्रजीतील पुस्तके

 बबल्स ऑफ लाईफ – रंजक आणि चातुर्यपूर्ण अवतरणांची मालिका

बबल्स ऑफ लाईफ – याच शीर्षकांतर्गत इंग्रजी कवितांचे पहिले पुस्तक

सिंग ओ माय लव्ह – इंग्रजी कादंबरी

नेथ – नेथ (शेवटी) या शीर्षकाची सिंधी कादंबरी. हीच प्रणयरम्य कादंबरी त्यांनी इंग्रजीत ॲट लास्ट या शीर्षकाखाली लिहिली.

रोझेस ऑफ रोमान्स – कथा संग्रह

स्टिल यू आर माय… – या पुस्तकात भगवान खिलनानी यांनी अत्यंत माया केलेल्या आणि मदतशील विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ लिहिलेले लेख आहेत.

दबी चिंगारिया – उर्दू गझलांचा संग्रह. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या हस्ते झाले.

फ्रॅग्रन्स ऑफ फॉलिज – हा १२४४ अवतरणांचा संग्रह व संकलन आहे. याच मालिकेतील दुसरे संकलन हे रंजक आणि चातुर्यपूर्ण अवतरणांचे आहे.

आर्टिस्ट अँड द मून – जीवनाचे विविध पैलू प्रकट करणाऱ्या ५२ लेखांचा संग्रह असलेले पुस्तक

ल्याहो मान, मान ना आयान – सिंधी लघुकथांचा संग्रह. या शीर्षकाचा अर्थ ‘हा जो मी, तो मी नव्हेच’ आहे.

खिलनानी यांनी स्वतः रंगवलेल्या सुमारे ८० चित्रांचा व हास्यचित्रांचा आल्बमही संकलित केला. त्यात अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, शाहरुख खान अशा प्रसिद्ध कलाकारांची अर्कचित्रे आहेत.

वावरहिरे, पंचक्रोशीतील पहिला सत्यशोधक विवाह संपन्न!

0

वावरहिरे(सातारा)-वावरहिरे ,कापसे मळा येथे 6 मे 2018 रोजी दुपारी 2 वाजता चि. गणेश जालिंदर कापसे आणि चि. सौ.ज्योती नामदेव शिंदे यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीने महात्मा फुले यांचे वेशभूषेत रघुनाथ ढोक ,यांनी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे विवाह लावला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट आणि सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र दिले. याप्रसंगी कापसे व ढोक यांनी सर्वांना विविध प्रकारची 300 झाडे आणि मुलींना व महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच दीनांची साउली हे 191 ग्रंथ महात्मा फुले जयंती निमित्त वाटप केले.
या नवदाम्पत्यानी आजच विवाह ची हळद लागण्यापूर्वी वावरहिरे येथे श्री पाणलिंग पठारावर पाणी फौंडेशन साठी दोन्ही वऱ्हाडसह श्रमदान करून वेगळा आदर्श निर्माण केला.यावेळी सरपंच चंद्रकांत वाघ ,सातारा जिल्हा बँकेचे मा.अनिल देसाई ,पाणी फौंडेशन कोअर टीम आणि हजारोचे संख्येने जनसमुदाय उपस्थतीत होता.