Home Blog Page 3144

इंधन दरवाढीवर आता गप्प का ? जिथे भेळ तिथे खेळ ‘ करणाऱ्या अभिनेत्यांना सवाल

0

मुंबई-कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सुरु झालेली इंधन दरवाढ अद्यापही कायम आहे. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली. सध्या मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ८४.९९ म्हणजे ८५ रुपये तर डिझेलचा ७२.७६ म्हणजे ७३ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या किंमतीमुळे संपूर्ण देशात संताप वाढत चालला असून इंधनाच्या या वाढत्या दरांमुळे महागाई सुद्धा भडकू शकते.अण्णा हजारेंबरोबर रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी झालेला अमीर खान आता भाजपच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आपली टीम रंगवून आहे. अमिताभ बच्चनचे हि तसेच काही आहे .सलमान खान ,अनुपम खेर,अक्षय कुमार ..अशा अनेक अभिनेत्यांना ..ज्यांना ज्यांना जनतेचा पुळका अनेकदा आलेला आहे . त्यांना आता पेट्रोल डिझेलची दरवाढ दिसत नाही काय ? असा सवाल सोशल मीडियातून होवू लागला आहे . जॅकी श्रॉफ ने एकदा भाजपने क्या किया ? या वाक्यावर सोशल मिडिया वर प्रतिक्रिया दिली होती ..हा कॉंग्रेस होती तो ..१० /१२ घोटाळे कर चुकी होती ‘ अशी ती प्रतिक्रिया होती .या सर्व गोष्टींवर सोशल मीडियामध्ये चर्चा होत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामन्यांमध्ये प्रचंड संताप असून सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. यावेळी नेटकऱ्यांनी काही सेलिब्रेटी आणि राजकारण्यांनाही टार्गेट केलं आहे, ज्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात इंधन दरवाढीवरुन रोष व्यक्त केला होता. ट्विटरकरांनी तर नरेंद्र मोदींसहित अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि काही सेलिब्रेटींचे जुने ट्विट शोधून काढले असून, आता गप्प का बसला आहात ? असा प्रश्न विचारला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिल थकीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

0

मुंबई,

 शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने दि. २२ मे २०१८ रोजी शासन परिपत्रकद्वारे आदेश जारी केले आहेत.

शासकीय निवासस्थानात राहणारे अधिकारी  किंवा कर्मचारी शासकीय निवासस्थान सोडताना  वीजबिल भरत नाहीत किंवा प्रलंबित ठेवत असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर या निवासस्थानात राहण्यासाठी येणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना प्रलंबित वीजबिलामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या थकित बिलाची वसुली करतांना संबंधित वीज कंपन्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. उदय योजनेबाबत गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संनियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना महावितरण कंपनीकडून वीज देयकाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना घेणे बंधनकारक करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार शासकीय निवासस्थानात राहणा-या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना महावितरणकडून (मुंबई व उपनगर वगळता) वीजबिलाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळवून ते सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे.

याशिवाय सक्षम अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थान सोडणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचा-याने त्यांच्या ताब्यातील निवासस्थानाचे वीजबील थकित नसल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय निवासस्थानाचा ताबा घेण्याबाबतची कार्यवाही करु नये, असेही शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

वीजबिल थकित नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असून  उपविभागीय अधिकारी यांनी रिडींगनुसार तात्पुरते (प्रोव्हिजन्ल) वीजबील देऊन त्या वीजबिलाचा भरणा केल्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र द्यावे असे राज्य शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

एमसीए स्टेडियममध्ये प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’ची अनोखी भेट

‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’चा उपक्रम

पुणे :  ‘आयपीएल’चा क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्या रविवारी एमसीए स्टेडियमवर गेलेल्या हजारो प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’तर्फे एक अनोखी भेट मिळाली. प्रवेशद्वार क्र. 2 मधून स्टेडियममध्ये चाललेल्या प्रेक्षकांना आतमध्ये गेल्यावर त्यांचे स्वतःचे चेहरे भल्यामोठ्या ‘एलईडी स्क्रीन’वर पाहायला मिळाले. व्होडाफोन इंडिया कंपनीने ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या उपक्रमातून क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही व्यवस्था केली होती.

‘आयपीएल’चा अंतिम सामना पाहण्यासाठी रविवारी मोठीच गर्दी उसळली होती. 37 हजार प्रेक्षक बसू शकतील इतक्या क्षमतेचे एमसीए स्टेडियम त्या दिवशी पू्र्ण भरले होते. स्टेडियमच्या बाहेर ‘व्होडाफोन’च्या बूथवर येणाऱ्या प्रेक्षकांना दुपारी चार वाजल्यानंतर आपले चेहरे स्टेडियमच्या आतमधील मोठ्या स्क्रीनवर झळकलेले दिसले व त्यांना आश्चर्याचा व आनंदाचा सुखद धक्का बसला. सुमारे तीन हजार जणांना ‘व्होडाफोन’तर्फे ही भेट मिळाली.

व्होडाफोन इंडियाचे महाराष्ट्र-गोवा विभागाचे प्रमुख आशिश चंद्रा यांनी सांगितले, ‘’वेगवेगळ्या क्रीडा सामन्यांमध्ये व्होडाफोन इंडिया नेहमीच आपल्या पध्दतीने सामील होत असते. आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण अनुभव पारितोषिके आम्ही येथे देतो. क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचे भाग्य पुण्याच्या वाट्याला आल्याने व्होडाफोनने ही संधी घेण्याचे ठरविले. क्रिकेटचे चाहते असलेल्या आपल्या ग्राहकांना एक वेगळेच बक्षिस देण्याचे आम्ही ठरवले आणि अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्सच्या माध्यमातून ग्राहकांना स्टेडियममध्ये आपला चेहरा स्क्रीनवर झळकलेला पाहण्याचा आनंदाचा क्षण आम्ही देऊ केला. एखाद्या सेलिब्रेटीला ज्या प्रकारे स्क्रीनवर आतुरतेने पाहिले जाते, तसे आपल्यालाही पाहिले जात असल्याचे लक्षात आल्यावर हे तीन हजार प्रेक्षक एकदम खूष झाले. एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या ग्राहकांना बक्षिस देता आले व या ग्राहकांशी नते जोडता आले, याबद्दल व्होडाफोन इंडियालाही अभिमान वाटतो.’’

२ वर्षाखालील ३ मुलांवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मदतीने कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

४ जून ते ९ जूनला निशुल्क शिबीराचे आयोजन

पुणे- जगातील जवळजवळ ३६० दशलक्ष लोक म्हणजे जगाच्या लोकसंख्येचे ५% लोक हे न ऐकू येण्याच्या समस्येने त्रस्त आहे. ह्यातील ९% म्हणजे ३२ दशलक्ष १५ वर्षाखालील मुले आहेत. १००० मधील ५ मुले अत्यंत कमी वयातच ह्या समस्येला बळी पडतात. ऐकू न येण्यामुळे बालक बोलुदेखील शकत नाही हे सिद्ध झाले आहे. ह्या सगळ्याचा वाईट परिणाम मुलांच्या भविष्यावर झालेला दिसून येतो.

 

२ वर्षाखालील ३ मुलांवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने यशस्वीरीत्या कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांचे बालपण परत मिळवून दिले आहे. ४ जून ते ९ जून ह्या काळात निशुल्क शिबिराचे आयोजन केले आहे. कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या मुलांच्या पालकांकरिता ह्या शिबिराचे आयोजन करण्यात येते. ह्यात सर्जरी, ऑडियोलॉजी आणि हॅबिलीटेशनमधील तज्ञ मंडळींना भेटण्याची संधी मिळते. ह्यात त्यांना सर्व प्रकारचे योग्य ते मार्गदर्शन मिळते. लवकर कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्याने मुलांच्या बोलण्यावर, अभ्यासावर कसा फायदा होतो, कुठले कॉकलीयर इम्प्लांट निवडावे ह्याचसोबत सर्वात प्रगत कॉकलीयर इम्प्लांटदेखील दाखविण्यात येते.

 

२०१७ साली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा कॉकलीयर इम्प्लांट प्रोग्राम सुरु झाला. कॉकलीयर इम्प्लांटचा प्रसार करून गरजूंपर्यंत त्याची माहिती जावी आणि ह्याने समाजाला फायदा होऊन त्याच्या उपयोगाने एक सक्षम नागरिक बनावा असे उद्दिष्ट ह्या प्रोग्राममागे होते. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्जन्स डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. विक्रम ओक, डॉ. नीलांजन भौमिक, ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार, हॅबिलीटेशनिस्ट वृषाली देसाई, गोविंद राजोपाध्ये आणि कॉकलीयर इम्प्लांट कोऑर्डीनेटर रेवा इंदुरकर अशा तज्ञ मंडळींची टीम कॉकलीयर इम्प्लांटसवर काम करते.

“भारतात युनिवर्सल न्यू बॉर्न स्क्रीनिंगची अत्यंत आवश्यकता असून त्याने बालकांच्या जन्माच्या वेळीच ऐकण्याचे निदान केले जाईल. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे कॉकलीयर इम्प्लांट जन्माला आले ज्याच्या मदतीने बहिरेपणा समूळ नष्ट होऊन तुम्हाला एक नवीन आयुष्य प्राप्त होते”, असे विचार दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कॉकलीयर इम्प्लांट सर्जन्स डॉ. विक्रम ओक आणि डॉ. नीलांजन भौमिक यांनी मांडले.

“अल्पवयात बहिरेपणाचे निदान झाल्याने कॉकलीयर इम्प्लांटसच्या माध्यमातून ते लगेच बरे करण्यात येते. ह्यामुळे मुलांची भाषा चांगली होण्यास मदत होते व एक सामान्य माणूस म्हणून ते आयुष्य जगू शकतात” असे मत ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार ह्यांनी मांडले.

पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस तर्फे दुचाकी ढकल आंदोलन.

पुणे-वाढत्या पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज संत कबीर चौक नाना पेठ ते अल्पना टॉकीज पर्यंत दुचाकी ढकल मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारच्या विरूध्द निषेधाचे फलक घेवून कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘बेचारी जनता करे पुकार, लुट रही है मोदी सरकार’’, ‘‘पेट्रोल डिझेल की मंहगाई, यही है क्या अच्छे दिन की पेहचान?’’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यानंतर दुचाकी वाहने ढकलत पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अल्पना टॉकिज पर्यंत गेले.
त्याठिकाणी आपल्या भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने
वाढविलेले पेट्रोल व डिझेलचे दर हे आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहे.पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असून त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष असून जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे.इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून सर्व सामान्यांना याचामोठा आर्थिक फटका बसत आहे. आज राज्यात पेट्रोलचा दर प्रती लिटर ८४.५० रूपयांच्या वर गेला आहे तर डिझेल प्रती लिटर ७० रूपयांच्या वर पोहोचले आहेत. राज्यात इंधनावर अनेक कर लावले जात आहेत. काँग्रेस प्रणित यु.पी.ए. सरकार असताना अंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल वाढलेले असताना सुध्दा यु.पी.ए. सरकारने पेट्रोल – डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रती लिटर ६० ते ६५ रूपये पर्यंत असायचे. आता या नविन दरवाढीमुळे
जीवनावश्यक वस्तूंवर सुध्दा परिणाम होणार आहे. सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की,
‘‘मोदी सरकारला पेट्रोल – डिझेलच्या दरावर नियंत्रण ठेवता आले नाही. काँग्रेस -प्रणित यु.पी.ए. सरकार असताना आतंरराष्ट्रीय कच्चा तेलाचे भाव वाढत
असताना सुध्दा जनतेचे हित लक्षात घेऊन पेट्रोल – डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले
होते. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल – डिझेलचे दर वाढण्याची अनेक कारणे आहेत.
मोदी सरकारचे चूकीचे आर्थिक धोरणामुळे उत्पन्न कमी आहे, बँकांमध्ये कर्जाचा बोजा वाढलेला आहे. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. केंद्र सरसकार व राज्य सरकार पेट्रोल – डिझेलवर लावलेले विविध कर कमी करण्यास तयार नाही आणि सरकार जनतेवर हा भुर्दंड लादत आहे.’’
यानंतर माजी आमदार बाळासाहेब शिवरकर व मोहन जोशी यांचीही भाषणे
झाली.
यानंतर काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने पुणे उपजिल्हाधिकारी मा. विजयसिंह देशमुख
यांना भेटून पेट्राल – डिझेल दरवाढ कमी करणेबाबत निवेदन सादर केले.
यावेळी कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, लता राजगुरू, सुजित यादव, सुजाता
शेट्टी, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट,
मनीष आनंद, रमेश अय्यर, विकास टिंगरे, शेखर कपोते, मीरा शिंदे, अनुसया
गायकवाड, संगिता तिवारी, युवक अध्यक्ष विकास लांडगे, बाळासाहेब अमराळे,
नुरूद्दीन सोमजी, अमित बागुल, ब्लॉक प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, जयकुमार
ठोंबरे, भारती कोंडे, नागेश भालेराव, चेतन आगरवाल, सुमीत डांगी, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, चैतन्य पुरंदरे, बाळासाहेब आमराळे, अभिजीत महामुनी, राजेंद्र गायकवाड, ॲन्थोनी जेकब, विक्रम खन्ना आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मोहीत बोंद्रे, सुदिप्ता कुमार यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

0

मुंबई, 23 मे, 2018 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात मोहीत बोंद्रे तर मुलींच्या गटात  सुदिप्ता कुमार यांनी मानांकीत खेळाडूंवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत  16वर्षाखालील मुलांच्या गटात सोळाव्या मानांकीत गुजरातच्या मोहीत बोंद्रेने अव्वल मानांकीत छत्तीसगडच्या क्रिशन हुडाचा 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बाराव्या मानांकीत छत्तीसगडच्या नरेश बडगुजरने सहाव्या मानांकीत कर्णाटकच्या अर्णव पतंगेचा 6-3, 6-2 असा पराभव केला.

मुलींच्या गटात तमिळनाडूच्या बिगर मानांकीत विपाशा मेहेराने महाराष्ट्रच्या आकराव्या मानांकीत रिचा चौगुलेचा 6-2, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली तर चौदाव्या मानांकीत सुदिप्ता सेंथिली कुमारने तेलंगणाच्या तिस-या मानांकीत संस्कृती दमेराचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट : उप-उपांत्यपुर्व  फेरी:  16वर्षाखालील मुले:  

मोहीत बोंद्रे(16) (गुजरात)वि.वि क्रिशन हुडा(1)(छत्तीसगड) 6-4, 6-4

नरेश बडगुजर(12)(छत्तीसगड) वि.वि अर्णव पतंगे(6) (कर्णाटक)  6-3, 6-2

सुशांत दबस(3)(हरियाणा) वि.वि अर्यन पंडीत(14) (हरियाणा)  6-4, 6-2

समर रैना(दिल्ली) वि.वि गिरिष चौगुले (महाराष्ट्र)  7-5, 6-1

धृव तंग्री(7)(पंजाब) वि.वि  उदयवीर सिंग (9)  (छत्तीसगड)  6-2, 6-4

दिवेश गहलोत(4)(हरियाणा) वि.वि अमन तेझाबवाला(महाराष्ट्र)  6-1, 6-2

निशांत दबस(दिल्ली) वि.वि  डेनिम यादव (10)( मध्यप्रदेश)  6-2, 6-1

उदित गोगोई (2) (आसाम)वि.वि अर्यन भाटीया(13) (महाराष्ट्र)  3-6, 6-3, 6-1

मुली-

विपाशा मेहेरा(तमिळनाडू) वि.वि रिचा चौगुले(11)(महाराष्ट्र)6-2, 7-6(5)

सुदिप्ता सेंथिली कुमार (14) (महाराष्ट्र) वि.वि  संस्कृती दमेरा(3)(तेलंगणा)6-2, 6-2

संदिप्ती राव(13) (हरियाणा)वि.वि   श्रेया चक्रवर्ती (पश्चिम बंगाल) 6-1, 6-3

शरण्या गवारे(9) (महाराष्ट्र) वि.वि   ऋतुजा चाफळकर  (महाराष्ट्र) 6-2, 6-4

सान्या सिंग(4) (महाराष्ट्र)वि.वि कशिश भाटीया(15) (दिल्ली) 6-3, 6-4

वंशीका चौधरी(12) (उत्तर प्रदेश)वि.वि अकांक्षा नित्तूरे(महाराष्ट्र) 6-7(7), 6-4, 6-2

प्रेरणा विचारे(2)(महाराष्ट्र) वि.वि भक्ति शहा(तेलंगणा) 6-1, 6-3

दुहेरी गट-मुले- उपांत्यपुर्व फेरी

सुशांत दबस/दिवेश गहलोत वि.वि अर्णव पतंगे(कर्णाटक)/राजेश कन्नन आर.एस 2-6, 6-3, 10-8

उदित गोगोई/नरेश बडगुजर वि.वि निशांत दबस/एस. भुपती 2-6, 6-2, 10-8

उदयवीर सिंग/धृव तंग्री वि.वि आर्यन भाटीया/आर्यण पंडीत    6-3, 6-1

भुपेंद्र दहिया/ क्रिशन हुडा/ आदित्य बलसेकर/ मोहित बोंद्रे 67(1) 6-3, 10 -6

मुली

संस्कृती दमेरा/लक्ष्मी वुतुकुरु वि.वि दिव्या भारतव्दाज/श्रीचंद्रा टेंटू 6-1, 7-5

संदिप्ती राव/वंशीका चौधरी वि.वि चंद्रिका जोशी/सृजना रायराला 6-2, 6-2

विपाशा मेहरा/हृदया शहा वि.वि भक्ती परवानी/सुदिप्ता सेंथील कुमार 6-3, 7-6(3)

रिचा चौघुले/प्रेरणा विचारे वि.वि वैष्णवी अडकर/ऋतूजा चाफळकर 6-3, 7-5

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर श्वेता बच्चन नंदा यांचे अभिनयात पदार्पण

0

कल्याण ज्वेलर्स या भारतातील विश्वासार्ह व आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने आपल्या परिवारातश्वेता बच्चन नंदा यांचा समावेश केला आहे. ब्रँडच्या नव्या टीव्ही कॅम्पेनमध्ये श्वेता त्यांचे वडील व सन 2012 पासूनचे कल्याण ज्वेलर्सचे ब्रँड अम्बॅसेडर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सहभागी होणार आहेत.

पहिल्यांदाच, वडील व मुलगी यांच्यातील गहिरे नाते अॅड फिल्मसाठी अभिनयाद्वारे व्यक्त केले जाणार आहे. एलअँडके सातची अँड सातची यांनी लिहिलेल्या व स्कल्प्टर्स प्रॉडक्शनचे जीबी विजय यांनी दिर्गदर्शित केलेल्या अॅड फिल्ममध्ये वडील व मुलगी यांची गोष्ट सांगितली आहे, तसेच कल्याण ज्वेलर्स जपत असलेली पारदर्शकता व विश्वास ही मूल्येही समाविष्ट केली आहेत.

आगामी पुस्तकाची नुकतीच घोषणा केलेल्या श्वेता बच्चन नंदा डिझाइनर म्हणूनही ओळखल्या जातात. कल्याण ज्वेलर्सच्या परिवारात सहभागी झालेल्या श्वेता ब्रँडच्या विविध ग्राहक-केंद्री उपक्रमांमध्ये ब्रँडचा चेहरा असणार आहेत.कपड्यांच्या निवडीबद्दल लोकप्रिय असलेल्या श्वेता ब्रँडसाठी सिग्नेचर कलेक्शन झळकवत असताना स्वतःची खास शैलीही उमटवणार आहेत.

कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन यांनी सांगितले, “कल्याण ज्वेलर्स ब्रँडच्या टीव्ही कॅम्पेनध्ये सहभागी होण्यास श्वेता यांनी तयारी दर्शवली आहे, ही आनंदाची बाब आहे. बच्चन परिवाराबरोबर आमचे दीर्घ काळापासून नाते असून, श्री व सौ बच्चन आमच्या ब्रँडचे जगभर प्रतिनिधित्व करतात. अमिताभ बच्चन व श्वेता वडील व मुलगी या भूमिका साकारत आहेत, अशी पहिलीच अॅड फिल्म पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल. एक ब्रँड म्हणून कल्याणने नेहमीच कुटुंब व नाती या बंधांना महत्त्व दिले आहे. श्वेता यांनी डिझाइनच्या बाबतीत दिलेल्या योगदानामुळे कल्याणचे ट्रेंडी व आकर्षक सिग्नेचर कलेक्शन आणखी उठून दिसणार आहे.’’

ही टीव्हीसी मल्याळममध्येही चित्रित करण्यात येत असून त्यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका मंजु वॉरिअर करणार आहेत. ही जाहिरात जुलैपासून दाखवली जाण्याची शक्यता आहे.

कल्याण ज्वेलर्सविषयी

केरळ राज्यातील त्रिशूर येथे मुख्यालय असलेली कल्याण ज्वेलर्स ही भारतातील एक सर्वात मोठी दागिने उत्पादक वितरक आहे. 1993 मध्ये पहिले ज्वेलरी शोरूम सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्सने भारतात अंदाजे दोन दशके आपले स्थान निर्माण केले आहे. कल्याण 2013 पासून जीसीसीमध्ये कार्यरत आहे व यूएई, कतार, कुवेत व ओमान येथेही व्यवसाय करत आहे. कंपनीने गुणवत्ता, पारदर्शक दर व नावीन्य या बाबतीत या उद्योगात बेंचमार्क निर्माण केला आहे. कल्याणमध्ये सोने, हिरे व मौल्यवान धातूंच्या पारंपरिक व आधुनिक दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध असून ते ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतात. आज, कल्याण ज्वेलर्सची भारतात व पश्चिम आशियात 122शोरूम आहेत. कल्याण ज्वेलर्सने नैतिक व न्याय्य पद्धतीने व्यवसाय करण्याचे स्थापनेपासूनचे तत्त्व आजही कायम ठेवले आहे.

वाघोली परिसरातील वीजविषयक प्रश्नांवर लवकरच तोडगा

पुणे : वाघोली व परिसरातील वीजविषयक प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजयंत्रणेच्या आवश्यक दुरुस्तीसह नवीन वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच नादुरुस्त मीटर बदलून ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यात येणार असल्याची माहिती मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंदेले यांनी दिली.

वाघोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच वसुंधराताई उबाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. रामभाऊ दाभाडे, श्री. संदीप सातव, उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग भुजबळ, सहाय्यक अभियंता श्री. नंदकुमार वैरागर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वाघोली परिसरातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीबाबत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. वीजयंत्रणेची दुरुस्ती कामे करण्यासोबतच आवश्यक ठिकाणी वीजयंत्रणेतील जुने भाग सुद्धा बदलण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 28 लाख रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून कामांना प्रत्यक्षात सुरवात झालेली आहे. याशिवाय कवडेवस्ती येथील रोहित्र स्थानांतरीत करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आलेᅠआहे तेथे एरियल बंच केबल टाकण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सुमारे 44 हजार वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी लोणीकंद उपकेंद्गातून 22 केव्ही क्षमतेच्या वाघेश्वर भूमिगत वाहिनीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. या नवीन वाहिनीमुळे सद्यस्थितीत वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवरील वीजभार कमी होणार आहे. याशिवाय नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. वीजग्राहकांना वीजवापराचे अचूक बिल देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचीही माहिती यावेळी महावितरणकडून देण्यात आली.

‘मिसेस युनिव्हर्स अरब आशिया’साठी पुण्याच्या खुशबू करवा यांची निवड

पुणे –
इच्छा तिथे मार्ग कसा मिळतो याचा आदर्शवत प्रत्यय एका गृहिणीने , दोन मुलींच्या आईने … कॉर्पोरेट क्षेत्रातील एका उद्योजिकेने आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल  केंद्रसरकारने गौरविलेल्या पुण्यातील खुशबु सम्राट करवा  यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन दिला आहे.  मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून  भारताकडून त्या  प्रतिनिधित्व करणार आहेत. 
इंटिरिअर डिझायनर असलेल्या खुशबू करवा या मेकॉट्रॉनिक्स  सिस्टीम या कंपनीत संचालक पदावर कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात महिलांचा सहजतेने सहभाग असावा या उद्देशाने त्या स्मार्ट डिजिटल इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटमध्येही कार्यरत असून उत्कृष्ट कार्याबद्दल  केंद्र सरकारचा तसेच सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर यांचा पुरस्कारही त्यांच्या कंपनीला मिळाला आहे.  मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ या स्पर्धेत खुशबू करवा यांनी देशातून महाराष्ट्रासाठी  प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी या स्पर्धेत यशही मिळवले. मिसेस युनिव्हर्स अरब आशिया २०१८ या स्पर्धेच्या  भारतातील संचालक अंजना मेस्कारन्हेस यांच्या मार्गदर्शनाखाली आता मिसेस युनिव्हर्स  अरब आशिया २०१८ साठी त्या भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहेत.

यादव, कढे, भोसले, बांठिया यांना एमएसएलटीएच्या वार्षिक पुरस्कार प्रदान

0

मुंबई-:  एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार दिनानिमित्त आशियाई कुमार गटातील विजेती मिहिका यादव, भारताचा पुरुष गटातील क्र.5 खेळाडू अर्जुन कढे, भारताची महिला गटातील क्र.4 खेळाडू ऋतुजा भोसले, राष्ट्रीय सब-ज्युनियर गटातील विजेती ऋतुजा चाफळकर,  भारताचा कुमार गटातील अव्वल खेळाडू सिद्धांत बांठिया या खेळाडूंना  एमएसएलटीए वार्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण जर्मनीचे राजदूत डॉ.जुर्गेन मोर्हाड, पेट्रा  मोर्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे  अध्यक्ष भरत ओझा,  एमएसएलटीएचे  मानद सचिव सुंदर अय्यर, एमएसएलटीएचे  उपाध्यक्ष राजीव देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून विविध गटांमध्ये अव्वल तीन खेळाडूंमध्ये येण्याचा मान मिळविणाऱ्या खेळाडूंना हि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत असल्याचे एमएसएलटीएचे  मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक वयोगटांतील अव्वल तीन खेळाडूंना अशी  एकूण 11लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय नाशिकच्या डॉ.विजय थिटे, यवतमाळच्या राजेश दावे आणि अमरावतीच्या दिपक सोमय्या यांनी टेनिस खेळाच्या विकासासाठी व प्रचारासाठी कार्य केल्याबाद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. महाराष्ट्राला राष्ट्रीय खेळाडू मिळवून देणाऱ्या प्रशिक्षक केदार शहा, आदित्य मडकेकर आणि श्रीनिवास राव यांना गौरविण्यात आले.

तसेच, भिलाई येथील अखिल भारतीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या महिला व पुरुष संघाला  प्रत्येकी  51000रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. इंडोनेशियातील सोलो येथे आशियाई शालेय क्रीडा स्पर्धेत कांस्य पटकाविणाऱ्या कृतिका छाब्रा, तेजस्वी काटे आणि प्रशिक्षक हिमांशू गोसावी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

शिष्यवृत्ती विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:
आंतरराज्य संघ: महिला संघ:
 मिहिका यादव(मुंबई), ऋतुजा भोसले(पुणे), स्नेहल माने(पुणे), दक्षता पटेल(मुंबई),

पुरुष संघ: आर्यन गोवीस(मुंबई), जयेश पुंगलिया(मुंबई), कुणाल वझिरानी(मुंबई), अर्जुन कढे(पुणे);

आशियाई शालेय क्रीडा स्पर्धा: हिमांशू गोसावी(प्रशिक्षक), कृतिका छाब्रा आणि तेजस्वी काटे;

शिष्यवृत्ती विजेते खेळाडू:
कनिका वैद्य(मुंबई), सिद्धांत बांठिया(पुणे), ध्रुव सुनीश(पुणे), अथर्व शर्मा(पुणे), सालसा आहेर, प्रेरणा विचारे(मुंबई), आर्यन भाटिया(मुंबई), आदित्य बलसेकर(मुंबई), तेजस्वी मेहरा(नवी मुंबई), रिचा चौगुले(पुणे), गौरी भागिया(मुंबई), मालविका शुक्ला(मुंबई), अर्जुन गोहाड(पुणे), गिरीश चौगुले(पुणे), यशराज दळवी(पुणे), फैझ नस्यम(मुंबई), ऋतुजा चाफळकर(पुणे), सुदिप्ता कुमार(मुंबई), मानस धामणे(पुणे), प्रज्वल तिवारी(मुंबई), काहीर वारिक(ठाणे), मलिका मराठे(पुणे), मधुरिमा सावंत(पुणे), परी सिंग(पुणे), अन्या जेकब(पुणे), नील जोगळेकर(पुणे), अर्णव पापरकर(पुणे), समर्थ सहिता(मुंबई), अस्मि आडकर(पुणे), ओमी मेहता(नवी मुंबई), आकांक्षा अग्निहोत्री(पुणे).

स्विस रेडियोच्या प्लेलिस्टमध्ये ‘संगळंग ढंभळंग’, स्विस रेडियोवर वाजणारं पहिलं मराठी गाणं!

टियाना प्रोडक्शनचं 15 एप्रिल 2018 ला रिलीज झालेलं आदर्श शिंदेंने गायलेलं ‘सभंळगं ढंभळंग’ हे गाणं उभ्या महाराष्ट्रात गेले एक महिना गाजल्यावर आता हे गाणं जगविख्यात स्विस रेडियो स्टेशन ‘रिपब्लिक कलकुटा’लाही खूप आवडलं आहे. रिपब्लिक कलकुटाकडून हे गाणं त्यांच्या नॅशनल टेलिव्हीजन चॅनल आणि रेडियो स्टेशनच्या प्लेलिस्टमध्ये चालण्यासाठी मागवण्यात आलं आहे. असं आमंत्रणं मिळालेलं ‘सभंळगं ढंभळंग’ हे पहिलं मराठी गाणं आहे.

ह्यासंदर्भात संपर्क केल्यावर टियाना प्रॉडक्शनचे संस्थापक संचालक सुजीत जाधव म्हणाले, “हे आमच्या प्रॉडक्शनचे पहिलेच गाणे आहे. आदर्श शिंदेंने गायलेल्या ह्या गाण्याला प्रेक्षकांची दाद मिळेल असा आम्हांला विश्वास होता. पण महाराष्ट्रात ते एवढे गाजेल असे वाटले नव्हते. ह्या आनंदातच आता जगविख्यात स्विस रेडियो स्टेशनकडून आपणहूनच आमच्या गाण्याला त्यांच्या प्लेलिस्टमध्ये चालवण्यासाठी मिळालेलं आमंत्रणं म्हणजे आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा.”

ते पूढे सांगतात, “रिपब्लिक कलकुटा हे स्वित्झर्लंडमधले प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेडियो स्टेशन आहे. त्यांच्याकडून आम्हांला आमंत्रण येणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. देश-विदेशांतली निवडकच गाणी ह्या रेडियो स्टेशनवर चालतात. आणि त्यांची संगीत जाणकारांची टिम गाण्यांची निवड करते. अशावेळी संभळंग ढंभळंगला हा मान मिळणं, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.”

भैरोबानाल्यात सुरू असलेल्या नाला गार्डन कामाची पाहणी

पुणे-“भैरोबा नाल्यात सुरू असलेल्या नाला सौन्दर्यीकरण (नाला गार्डन) कामाची पाहणी आज शिंदे छत्री भागात करण्यात आली. या प्रसंगी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांकाजी श्रीगिरी, स्थानिक नगरसेवक विनोदजी मथुरावाला , भारत सरकारच्या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिनेशजी होले, बुंदेलाजी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान च्या वतीने या कामाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या बरोबरच शिंदे छत्री – खड्डा वस्ती – ताडी मळा येथुन नाल्यावरील पूलापासुन ते शंकर मठ ते एस आर पी रस्ता असा रस्ता देखील करण्यात येणार आहे. नाला सौन्दर्यीकरणाचे (नाला गार्डन) चे काम वानवडी गाव – गंगा सॅटेलाइट – शिंदे छत्री – ताडी मळा- जगतात नगर- दिव्या नगर- चौगुले नगर- होले नगर- भैरोबा नाला – टेन स्क्वेअर – फातिमा कॉन्व्हेंट- भैरोबा मंदिर- विद्या भवन कॉलेज- सेंट पॅट्रिक्स शाळा- चिमटा वस्ती- जांभुळकर मळा- उदय बाग- सोपान बाग- कवडे मळा या भागातुन जाणाऱ्या संपुर्ण नाल्यामध्ये करण्यात येणार आहे.”

कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये यावर्षीपासून इंग्रजी माध्यमाची “विवेक वर्धिनी” प्राथमिक शाळा सुरु होणार

पुणे: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाबरोबरच वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी शिक्षणाचा वसा घेऊन पुण्यात शिक्षण संस्था उभ्या करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नावे समाजकार्याचे महाविद्यालय स्थापन करून व्यावसायिक समाजकार्यकर्त्यांची एक फळी उभी करणाऱ्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने यावर्षीपासून प्राथमिक शिक्षण देखील उपलब्ध केले असून महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या प्ले ग्रुप ते इयत्ता चौथीपर्यंतच्या “ विवेक वर्धिनी” या प्राथमिक शाळेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव एम. शिवकुमार यांनी दिली आहे.

कर्वे समाज सेवा संस्थच्या वतीने १९६३ साली महर्षी कर्वे यांच्या नावे समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली व काही वर्षातच नावारूपास आलेल्या संस्थेच्या या समाजकार्य महाविद्यालयाने समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे तर देशपातळीवरील प्रथम दहा महाविद्यालयांपैकी एक असा बहुमान मिळविण्याची किमया केली आहे. कर्वे समाज सेवा संस्था ही गेली ५५ वर्षे शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अविरत कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांना त्याचा फायदा पोहोचावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाचे माहेरघर असणार्या पुणे शहरामध्ये दर्जेदार प्रतीचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचे आव्हान समाजकार्याचा वसा असणार्या कर्वे समाजसेवा संस्थेने स्वीकारले असून यावर्षीपासून हिंगणे- कर्वेनगर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्ले ग्रुप, नर्सरी, जुनिअर व सिनिअर केजी तसेच पहिली ते चौथी पर्यंतच्या इंग्रजी माध्यमाच्या “विवेक वर्धिनी” या प्राथमिक शाळेची सुरुवात करण्यात आली आहे.

समाजकार्याचा वसा असणार्या व आधुनिक सोयी सुविधांनी तसेच अद्ययावत असणार्या या शाळेमध्ये माफक दरामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून अधिक माहिती व प्रवेशासाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या कर्वेनगर येथील वनदेवी मंदिराशेजारील १८, हिल साइड येथील “विवेक वर्धिनी” शाळेच्या कार्यालयाशी ०९८८१८१६६६२ व ०९८८१८१६६६३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सचिव एम. शिवकुमार यांनी केलेले आहे.

​​कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये ‘एम. एस. डब्ल्यूू – समाजकार्य’ पदव्युत्तर अभ्यासक्रम

पुणे :‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस’, पुणे च्या वतीने एम. एस. डब्ल्यूू  – समाजकार्य ‘ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती ​कर्वे समाज सेवा ​संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी ​पत्रकाद्वारे ​दिली.
दोन वर्षाच्या, पूर्ण वेळ तसेच सेमिस्टर व ‘चॉइस बेस क्रेडीट सिस्टम’वर आधारित या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दि 21 जून रोजी देशपातळीवरील प्रवेश परीक्षा होणार आहे.
प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याकरिता कर्वे समाज सेवा संस्थेच्या www.karve-institute.org या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून, अर्ज डाऊनलोड करून, भरुन महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश अर्ज जमा करता येतील. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. 11 जून 2018 असून, प्रवेश परीक्षा दि. 19 जुन, 2018 रोजी आणि मुलाखत व गट-चर्चा दि. 21 जुन, 2018 या तारखेला आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच ज्या विदयार्थ्यांनी 2018 मध्ये पदवी परीक्षा दिली आहे ते विद्यार्थी सुद्धा प्रवेश अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊ शकतात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदवीधरांना नियमानुसार प्राधान्य दिले जाते.
प्रवेश अर्ज व संपर्कासाठी ‘कर्वे समाज सेवा​ संस्था​’, वनदेवी मंदिराशेजारी 18, हीलसाईड, कर्वेनगर, पुणे 411052, दूरध्वनी: 7517564210 किंवा kinsspune@gmail.com, येथे संपर्क करण्यात यावा असे आवाहन डॉ. दीपक वलोकर ​(संचालक​, ‘कर्वे समाज सेवा संस्था​)यांनी केले आहे.
 ​’​कर्वे समाज सेवा संस्था​’​ही पुण्यातील व देशातील समाजकार्याचे शिक्षण देणारी एक नामवंत शैक्षणिक संस्था असून, नॅक ‘ मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्नित आहे.

अधिकाऱ्यांचा जीव जाऊन श्रद्धांजली वाहण्याची वाट पहाणार काय ? अविनाश बागवेंचा सवाल

पुणे-नगरसेवक नसताना काही जण टोळके घेवून अधिकाऱ्यांकडे जावून दमदाटी करत आहेत . एका पत्रकारालाही ‘कुठे राहतोस’ असा प्रश्न करून आपल्या दमदाटीत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.पालिकेतील अधिकाऱ्यांचा जीव जाण्याची आपण वाट पहाणार आहोत काय ? आणि नंतर हिरवळीवर श्रद्धांजली वाहणार काय ? असा सवाल करीत पालिका अधिकाऱ्यांना होणारी दमदाटी भयावह असल्याचे सांगून त्याकडे महापौर आपण तातडीने लक्ष द्या अशी मागणी आज मुख्य सभेत नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे .पहा नेमके ते काय म्हणाले ….