Home Blog Page 3138

गुजर निंबाळकरवाडीत अनधिकृत शाळेचे बांधकाम पाडले- ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा बांधकामे खरेदी करू नका ;पीएमआरडीएने दिला इशारा

पुणे -महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने ता. हवेली येथील मौजे गुजर निंबाळकरवाडी हिल टॉप हिल स्लोप वरील  मुळीक नगर येथे वन विभागाजवळील सर्वे नंबर १०/२/१ ब मधील १६ हजार स्क़्क़ेअर फूट  (१४५०.०० चौ.मी.) आकारातील G+३ अनधिकृत नियोजित शाळेचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीची परवानगी आहे असे सांगून होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची खरेदी करू नका ,अन्यथा फसाल ,फटका बसेल असा इशारा पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते  यांनी दिला आहे

प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ (१) अन्वये संबधिताना प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली होती. सदरील बांधकाम आरसीसी स्वरुपात दुमजली स्वरूपातील हे बांधकाम होते. दिनांक ०५ जून २०१८  रोजी अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निष्कासन पथक क्रमांक एक मार्फत पार पडली.

 पीएमआरडीएचे पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, (प्रभारी तहसीलदार) उपअभियंता राजेंद्र मेदनकर, उपअभियंता सुर्यकांत कापसे, सह्यक अभियंता राजेश्वर मंडगे, यु.बी. लोखंडे, कनिष्ठ अभियंता योगेश दिघे, सुजय पाटील तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे, पोलीस उपनिरीक्षक भोलेश्वर अहिवळे, तसेच स्थानिक पोलीस    कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदरील कारवाई पार पाडण्यात आली.

पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी नागरिकांना सदर सदनिका खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. अनधिकृत सदनिका या  स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात, याकरिता नागरिकांनी जागरूक राहावे.  शहानिशा करूनच सदनिका खरेदी कराव्यात. शासन निर्णय ७.१०.१७ नुसारच्या अटीनुसार ३१.१२.२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमनाकुल करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे  दि. २१ जून २०१८ पूर्वी अर्ज करून बांधकामे नियमनाकुल करून देण्यात येतील असे आवाहन केले आहे.

व्हॅस्कॉन’च्या ‘गुडलाईफ’ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

75 हून अधिक (95 टक्क्यांहून जास्त) अपार्टमेंट्सची विक्री झाली केवळ एका आठवड्यातच

पुणे- व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (एनएसई स्क्रीप आयडी VASCONEQ, बीएसई स्क्रीप कोड 533156) या अत्यंत विश्वासार्ह व पुण्यात मुख्यालय असलेल्या विकसकाने आज घोषित केलेकी तळेगावजवळ काटवी येथे व्हॅस्कॉन गुडलाईफ’ हा नवीन प्रकल्प सुरू झाल्यापासून एका आठवड्यातच तेथील 475 अपार्टमेंटसची विक्री झाली आहे. या विक्री झालेल्या अपार्टमेंट्सची एकूण किंमत 100 कोटी रुपये आहे. व्हॅस्कॉनने नुकताच दर्जेदारपरवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश केला असूनकंपनीच्या गुडलाईफ या प्रकल्पातील 500 घरांच्या नावनोंदणीचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार होते. त्यास मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळेआता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम यापूर्वी ठरविलेल्या दिवसापेक्षा अगोदरच सुरू करण्याचे कंपनीने ठरविले आहे.

सुमारे 10 एकर जागेतील गुडलाईफ प्रकल्पात वनरुम किचन, 1 बीएचके व 2 बीएचके असे फ्लॅट्स केवळ परवडणाऱ्या दरांतच नव्हेतर दर्जेदार स्वरुपात व्हॅस्कॉनने सादर केले आहेत. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच उभारूनव्हॅस्कॉनने एक नवीन सुरुवात केली आहे. गुडलाईफमध्ये विविध सोयी-सुविधा असून त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक टॉवरमध्ये अभ्यासासाठी वाचनालय असून त्याखेरीज ग्रंथालय संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारती उभारून सुमारे 500 घरे सादर करण्यात येणार आहेत.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यांनी सांगितलेकी काटवी येथील व्हॅस्कॉन गुडलाईफ’ ला अगदी पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ग्राहकांचा आमच्यावर किती मोठा विश्वास आहेयाची आम्हालाप्रचिती आली. प्रकल्प सादरीकरणाला मिळालेल्या या यशामुळे परवडणारीदर्जेदार घरे बांधण्याच्या आमच्या निर्णयाला पाठबळ मिळाले आहे. यापुढेही आम्ही या स्वरुपाचे आणखी प्रकल्प उभारू.

गुडलाईफपासून जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गाला अगदी सहज जाता येते. आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. संबंधी ..

व्हॅस्कॉन इंजिनीअर्सचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये व्हॅस्कॉनचा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासीऔद्योगिक बांधकामेआयटी पार्कमॉलमल्टीप्लेक्सहॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30 शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेततर काही इपीसीच्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे इपीसी’ पध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे व्हॅस्कॉनने ठरविले आहे.

‘बालभारती’च्या मनमानी स्वरुपाच्या परवाना धोरणावर टीका; ‘रॉयल्टी’ शुल्काच्या विरोधात प्रकाशकांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0

दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना यंदा गाईड्सनोट्सइतर पुस्तके मिळण्याची शक्यता कमी

मुंबई : राज्यातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना यंदा गाईड व कार्यपुस्तके आदी पूरक साहित्य मिळू शकणार नसल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘बालभारती’ने प्रकाशकांवर अन्यायकारक असे परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

‘बालभारती’च्या परवाना धोरणामुळे महाराष्ट्रात यंदा दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना गाईड्स, नोट्स व अभ्यासाचे इतर पूरक साहित्य उपलब्ध होणार नाही.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) पहिली ते दहावी या इयत्तांच्या सर्व पुस्तकांसाठी परवाना पध्दत अंमलात आणण्याची घोषणा गेल्या दि. 25 मे रोजी केली.‘बालभारती’चा हा निर्णय़ प्रकाशकांना विश्वासात न घेता, घाईने व अपारदर्शी पध्दतीने अमलात आणण्यात येत असून या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी प्रकाशकांच्या संघटनेने केली आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षी तरी हा निर्णय स्थगित ठेवण्यात यावा, असे प्रकाशकांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परवाना पध्दत लागू करण्याचा ‘बालभारती’चा निर्णय हा खूप उशीरा घेण्यात आला असून त्याने प्रकाशकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे प्रकाशकांचे म्हणणे आहे.

‘प्रकाशक हे पाठ्यपुस्तकांची पुनरुक्ती करीत नाहीत. त्यामुळे ते कॉपीराईट कायद्याचा भंग करीत नाहीत. पाठ्यपुस्तकातून केवळ प्रश्न काढले जातात व त्यांची उत्तरे लेखकांकडून घेतली जातात. या उत्तरांमध्ये लेखकांनी त्यांची स्वतःची मांडणी केलेली असते. त्याचबरोबर, अतिरिक्त प्रश्नोत्तरे, व्याकरण, सरावाचे प्रश्न व त्यांची उत्तरे आदी मजकूर निर्माण करून संबंधित धड्याचा संपूर्ण अभ्यास सादर केला जातो,’ असे प्रकाशक व वितरक संघटनेचे सचिव दीपक शेठ यांनी म्हटले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक साहित्य, कार्यपुस्तके, गाईड्स प्रकाशित करणारे एकूण 30 ते 45 प्रकाशक महाराष्ट्रात आहेत. हे पूरक साहित्य इंग्रजी, मराठी, हिंदी व उर्दू या भाषांमध्ये निर्माण करून ही पुस्तके राज्यातील मोठी, मध्यम व लहान शहरे तसेच गावागावांत उपलब्ध करून दिली जातात.

‘बालभारती’ने दि. 9 मार्च 2018 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनंतर, आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी‘बालभारती’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तथापि आमच्या कोणत्याही सूचनांची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही वा आमचे म्हणणे एेकूनही घेतले नाही, अशी तक्रार प्रकाशकांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आपल्या मागणीचे समर्थन करताना प्रकाशकांच्या संघटनेचे सदस्य म्हणाले, ‘85 ते 90 टक्के प्रकाशक हे आपल्या पुस्तकांच्या 3 हजार ते 5 हजार प्रति दरवर्षी काढत असतात. ‘बालभारती’चे परवाना शुल्क लक्षात घेतले, तर या पूरक अभ्यासाच्या पुस्तकांचा खर्च 15 ते 25 रुपयांनी वाढेल. तो खर्च विद्यार्थी व पालक यांना परवडणार नाही.’

‘लहान प्रकाशक, विशेषतः उर्दू व हिंदी पुस्तके काढणारा प्रकाशक यामध्ये होरपळून निघेल. खर्च निघणार नाही, या शक्यतेने अनेकजण पूरक अभ्यासाची पुस्तके प्रकाशित न करण्याचा विचार करीत आहेत,’ असे दीपक शेठ यांनी सांगितले.

प्रकाशकांना परवाने देणे, नाकारणे वा परत घेणे असे प्रकार ‘बालभारती’ने मनमानी पध्दतीने केल्यास त्यामुळे परवाने प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार निर्माण होऊ शकेल, अशी भितीही प्रकाशकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

प्रकाशकांसाठी परवाने पध्दत अमलात आणायची असल्यास, प्रकाशकांच्या व्यापाराचे स्वरूप लक्षात घेऊन ती पुढील वर्षीपासून लागू करावी, गैरव्यवहार टाळण्यासाठी हे परवाने देण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशन आणावे, तसेच इयत्ता व भाषेचे माध्यम ध्यानात घेऊन त्याप्रमाणे परवान्याचे वाजवी शुल्क आकारावे, अशी विनंती प्रकाशकांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.

 

पाशा पटेल यांची पवारांवर टीका

पुणे : शेतकऱ्यांना चिथावणी देण्याची भाषा शरद पवारांना शोभत नाही असा प्रहार करत ; सो चुहे खा के बिल्ली हज को चली अश्या शब्दात राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत केले होते. त्याला उत्तर देताना पटेल पुण्यात बोलत होते.

स्वामिनाथन आयोग तुमच्या काळात आला होता, एवढ्या वर्ष तुम्ही तो का नाही लागू केला असा प्रश्नही पटेल यांनी यावेळी उपस्तिथ केला.त्याचबरोबर शेतकऱ्यांना चिथावणी देण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. असेही ते यावेळी म्हणाले. पवार कृषिमंत्री असतानाच्या काळातील चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि 50 टक्के नफा देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ती ते पूर्ण करतील. अशी हमी सुद्धा पटेल यांनी यावेळी दिली.

पटेल म्हणाले, शरद पवार कृषी मंत्री असताना चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी एका हाकेत रस्त्यावर उतरत होते. तळहातावर केस येईपर्यंतची भाषा करणाऱ्यांनी 10 वर्ष स्वामिनाथन आयोग समोर असताना तो लागू केला नाही. आधीच्या सरकारने जे 40 वर्षात शेतकऱ्यांसाठी केले नाही ते मोदी सरकार 4 वर्षात करत आहे.

दीपक मानकरांचा ‘त्या आत्महत्येशी’ संबंध नाही – अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पोलिसांना लेखी  अगोदरच कळविले होते ,असे असताना हि   त्यानंतर झालेल्या जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे त्यांचे राजकीय खच्चीकरण करणे नाही काय ? असा शंकास्पद सवाल आता राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या समर्थकांतून आणि चाहत्यांमधून एकीकडे विचारला जातो आहे तर दुसरीकडे  आज खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मानकर यांची जाहीर पणे बाजू घेतली आहे

अजित पवार म्हणाले, दीपक मानकर यांचा जितेंद्र जगताप या व्यक्तीच्या आत्महत्येशी थेट संबध दिसत नाही. उलट मानकर यांनी त्याला व्यवसायात सहकार्य केले होते, अशी आपली माहिती आहे. शिवाय जगताप यांच्याकडून आत्महत्या करण्याची धमकी त्यांना देण्यात येत असल्याची माहिती देणारा अर्ज मानकर यांनी पुणे पोलिसांना दिला होता.मुळशी तालुका राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित भुकूम येथील मेळाव्यात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले .

शनिवारी दुपारी जितेंद्र जगताप यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी पाठविलेल्या  चिठ्ठीत त्यांनी दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर  व्यक्ती कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व  सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

तथापि मानकर यांनी एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारीच पोलिसांकडे ,जगताप हे आत्महत्येची धमकी देत असल्याचा लेखी तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला होता . पहा या अर्जाच्या फोटो कॉपी ….

 

जर मानकर यांनी अगोदरच लेखी कळविले होते तर … त्यांचा दोष कसा काय ? असा सवाल केला जातो आहे .

दरम्यान जितेंद्र जगताप हे जरी मानकर यांच्याजवळचे  होते तरी जगताप यांच्याही  राजकीय महत्वाकांक्षा होत्या. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुका त्यांनी लढविल्या आहेत. यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते.

दीपक मानकर हे राष्ट्रवादीचे शहरातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाते ,तसे ते मराठा,बहुजन  समाजाचे नेते म्हणूनही सुपरिचित आहेत .त्यांचे  नाव  येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होते.खुद्द खासदार वंदना चव्हाण यांनी नुकतेच जाहीरपणे मानकर यांचे कौतुक हि केले होते.  १० जून च्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरु केली होती .आगामी कोथरूड विधानसभाच नाही तर पुणे लोकसभेसाठी खंबीर उमेदवार म्हणून त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहू लागले होते .कोथरूडच्या शिवसृष्टीसाठी त्यांनी अनेकदा तीव्र आंदोलनाचा आवाज उठविला होता.

दरम्यान आत्महत्या केलेले जगताप यांच्या नातलगांनी  दुरचित्रवाहिन्यांना दिलेल्या बाईट वरून देखील मानकर यांच्या कडून काही रकमेची त्यांना अपेक्षा होती असे सांगितले आहे  . माध्यमांमधून आलेल्या बातम्यांनुसार आत्महत्येची चिठ्ठी कशी मिळाली? आत्म् हत्येपुर्वी अशा प्रकारे,अशा मार्गाने  चिठ्ठी पाठविणे ,असे प्रकार सहसा दिसत नाहीत .  या मुळे  गूढता दिसत असल्याने मानकर यांना गोवले जाते आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . मानकर यांच्या राजकीय उत्कर्षाच्या काळात त्यांच्यावर ओढविलेल्या या प्रसंगाने त्याचे राजकीय खच्चीकरण होऊ शकेल असी समीक्षकांचे म्हणणे आहे .

मुळशी तालुक्यातील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली; त्यांचे अभिनंदन केले. ही मुलं आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत, भविष्यात त्यांना जीवन प्रवासातील प्रत्येक वळणावर समृद्धी व यश प्राप्त होवो, अशा मी शुभेच्छा देतो. -अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  वर्धापन दिनानिमित्त येत्या दहा तारखेला हल्लाबोल आंदोलनाचा समारोप सहकारनगरमध्ये होत असून यावेळी तयारीचा आढावा 2 जून रोजी घेतला. यावेळी श्री. अंकुश काकडे, श्री. सुभाष जगताप, श्री. बाबुराव चांदेरे आणि दीपक मानकर

पुणे लोकसभा -भाजपामध्ये रस्सीखेच जोरात ….

पुणे- आगामी लोकसभेचे पडघम आता चांगलेच वाजू लागले असून पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या कोणत्या नेत्याचे पारडे जड ठरणार? या प्रश्नावर आता खल होतो आहे . भाजपच्या वतीने  सर्वात अगोदर रणांगणात उडी घेतली आहे ते राज्यसभेचे सदस्य आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी . पण उमेदवारी खेचण्यात त्यांना यश येणार काय ? पक्षातील निष्ठावंताच्या आव्हानापुढे काकडे बाजी मारू शकतील काय ? अशा प्रश्नांवर भाजपमध्ये चर्चा रंगते आहे .
काकडे यांनी इच्छुक म्हणून आपली उमेदवारी जाहीर करून धक्का तंत्र अवलंबले असले तरी त्यांच्या पुढे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे  आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचे मोठे आव्हान आहेच . बापट हे सातत्याने ४० वर्षे भाजपमध्ये सक्रीय आहेत .एकनिष्ठ म्हणून त्यांचे नाव घेतले जाते . राजकीय डावपेचात ते माहीर मानले जातात .कसबा विधानसभा मतदार संघातून सातत्याने निवडून आलेले बापट यांच्या वयाकडे  आणि शाररीक दृष्ट्या  तंदुरुस्तीकडे बोट दाखविले जाते . आणि याच कारणांनी त्यांनी विविध वेळा वादग्रस्त विधाने करून अंतर्गत राजकारणात खळबळ उडवून दिली . मात्र हि सारी विधाने त्यांच्या एकनिष्ठतेपुढे निष्प्रभ ठरतील काय ?हा जसा प्रश्न आहे ,तसाच बापट यांच्या आमदारकीचा आणि प्रामुख्याने पालकमंत्रीपदाच्या कारकिर्दीतल्या कामाचा आढावा घेतला जावू शकेल अशी स्थिती आहे . भाजपची २०१४ च्या निवडणुकीतील देशभरात जी स्थिती होती तीच कायम राहील याची खात्री खुद्द भाजपमध्ये कोणीही देवू शकत नाही . त्यामुळे सावधानता पाळूनच ,कामाचा आढावा ,आणि ताकद आजमावूनच बापट यांच्याबाबत निर्णय घेतला जावू शकेल असे समीक्षकांचे मत आहे . पुणे लोकसभेच्या बाबत जात हा मोठा अडथळा बापटांना ठरेल असेही म्हटले जाते. मूळ कसबा मतदार संघातील अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते बापटांच्या कार्यकाळावर फारसे समाधानी नाहीत .आणि भाजपचा पारंपारिक मतदार एवढीच बाजू त्यांची जमेची मानली जाते . अशा मतदाराव्यतरिक्त अन्य मतदार भाजपकडे कसा खेचला जाईल यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केला नसल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. आणि आपल्या कसबा मतदारसंघातील मतदारांच्या, आणि पुणेकरांच्या स्मरणात राहील असा कोणताही भक्कम निर्णय ,भरीव कामगिरी त्यांनी केलेली नसल्याचे सांगितले जाते .
भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे देखील पक्षातील निष्ठावंत म्हणून सर्वपरिचित आहेत .लोकसभेतील त्यांची उपस्थिती पक्षाच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक मानली जाते .नागरिकांचे काम करोत अथवा ना करोत ,पण त्यांनी कोणालाही त्रासदायक ठरतील असे वर्तन किंवा निर्णय कधी घेतलेले दिसत नाहीत. एकंदरीत सोज्वळ स्वभाव आणि मराठा कार्ड या देखील त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात . पण आपल्या खासदारकीच्या काळात पुणे शहरात ,मतदार संघात ते सलगपणे सक्रीय राहू शकलेले नाहीत, आणि कोणतीही भरीव कामगिरी,लक्षणीय कौशल्य ते दाखवू शकलेले नाहीत   हि वास्तवता आहे .त्यामुळे  निव्वळ नामधारी खासदार म्हणून वावरल्याचा त्यांच्यावर आरोप होतो .खुद्द मराठा आणि बहुजन समाजासह पुणेकर आणि पक्षातील गटातटाच्या राजकारणात त्यांच्यावर नाराजी असलेला मोठा वर्ग आहे .
संजय काकडे यांचा तर भाजपचे सहयोगी खासदार म्हणूनच सातत्याने माध्यमातून उल्लेख होतो .ते राजकारणात सक्रीय असले तरी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत  राजकारणात अगदीच नवीन आहेत .राज्यसभेतील अनुपस्थिती ,चंचल आणि तापट स्वभाव , परिणामांची पर्वा न करता, भीडभाड न बाळगता ताडकीफाड वक्तव्य करणे याची दखल घेतली गेलेली आहे . पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नजीकचे म्हणून त्यांचा गवगवा आहे. त्यांच्यावर सोपविलेले काम ते यशस्वीपणे पार पाडतात असाही त्यांचा लौकिक आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारांसह अन्य मतदार त्यांच्या माध्यमातून पक्षाला लाभेल काय ? या प्रश्नाकडे उमेदवारी देताना विचार होऊ शकेल असे काहींचे म्हणणे आहे . पुणे महापालिकेच्या निवडणूक काळात आणि नंतरही त्यांनी शहर आणि परिसरात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे .निव्वळ  मराठा च नाही तर बहुजन वर्ग आणि त्यांचे म्होरके काकडे यांनी आपलेसे करून घेतलेले वेळोवेळी दिसले आहे .भाजपचा पारंपारिक मतदार आणि पारंपारिक नसलेला मतदार अशी गोळा बेरीज ते करू शकतील काय ?या प्रश्नावर खल होईल असे अनेकांना वाटते आहे .
एकूणच बापट, शिरोळे आणि काकडे यांच्या ‘उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत ‘ कोण बाजी मारेल हे मात्र समजायला उशीर असला तरी यावर कार्यकर्ते मात्र चर्चेला रंग भरत आहेत .दरम्यान भाजपचे  पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे देखील स्पर्धेत उतरलेले आहेत .मात्र या निवडणुका घोषित होण्यापूर्वीच त्यांच्यावर अन्य जबाबदारी सोपवून अध्यक्ष बदलाच्या वावड्या ही उठू पाहत आहेत .आगामी निवडणुक जिंकण्यासाठी निष्ठा आणि त्याबरोबर साम ,दाम, दंड ,भेद ,कौशल्य अशा अनेक पातळ्यांवर विचारमंथन ,नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांमधूनच सुरु झाले आहे .हीच भाजपची जमेची बाजू मानली जाते . मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश हा अंतिम टप्प्यापर्यंत सातत्याने राखून ठेवणे हि जबाबदारी अर्थातच नेत्यानंच पार पाडावी लागणार आहे .

वीजबिलांची दुरुस्ती प्रकिया ऑनलाईन – ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती मिळणार

0

 मुंबई:-महावितरणच्या ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहेतसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल.

वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ ऑनलाई करण्याचे निर्देश दिले होते.

या निर्देशानुसार नव्या ऑनलाईन प्रक्रियेत ग्राहकांना वीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल ॲप, ईमेल व्टिटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहेया तक्रारीच्या सोडवणूकीसाठी मुख्यालय ते शाखा कार्यालयांपर्यन्तच्या प्रत्येक कार्यालयात विशिष्ट कर्मचाऱ्यांवर तक्रार सोडविण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहेतक्रार आल्यानंतर ती किमान दिवसांत सोडवावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. जर ग्राहकांचे वीजबील बरोबर असेल तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएस प्राप्त होईल त्यात संबंधित वीजबील भरण्याचे आवाहन करण्यात येईल. परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर ते वीजबील संबंधित शाखा कार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फत ग्राहकांच्या वीजबील तक्रारीच्या संदर्भात आवश्यक ती प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईलयानंतर सुधारणा केलेले अंतिम वीजबील ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हा एसएमएस दाखवून ग्राहकाला आपल्या वीजबिलाचा भरणा करता येईल.

 महावितरणने याबाबत परिपत्रक जारी केले असून यात ऑनलाईन वीजबील दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. महावितरणच्या या नवीन उपाययोजनांमुळे ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. तसेच त्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल.

राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे ऑडिट करणार – ऊर्जामंत्री

0

अहमदनगर:  महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राळेगणसिद्धी येथे सोमवारी (दि. 4) जाहीर केले. यामुळे शेतीपंपाचा वीजवापर निश्चित होऊन वीजबिलांबाबत तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी शेतीपंपाचा वीजवापर आणि वीजबिल यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली.

ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या वीजबिलाबाबत प्रश्न उपस्थित करणारे पत्र ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची तातडीने दखल घेऊन ना. श्री. बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीपंपाचा वीजवापर निश्चित करण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच शेतीपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यात हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून शेतीपंपाची थकबाकी २९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकऱ्यांकडे व्याज, दंड वगळता १८ हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीजबिलाबाबतच्या तक्रारी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे ना. श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॉट प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. या प्रकल्पाची आणखी तीन मेगावॉटने क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकारात्मक चर्चा व उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अध्यक्ष असलेल्या राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्थेला अधिकचे वीजबिल पाठविल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

कंत्राटी चौकशी अधिकारी पदासाठी अर्ज करण्याचे अजित पवार यांचे आवाहन

पुणे – राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त जागांमुळे भ्रष्टाचार व अन्य शिस्तभंग विषयक  प्रलंबित प्रकरणात चौकशीची कार्यवाही करून सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी शासन निर्णयानुसार कंत्राटी पध्दतीने चौकशी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. तरी  इच्छुकांनी येत्या 8 दिवसात आपले अर्ज रोजगार हमी शाखेकडे सादर करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (रोहयो) अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, विभागीय चौकशी अधिकारी नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार नव्याने उद्भवणारी प्रकरणे निकाली काढण्यासाठी मंत्रालयीन उपसचिव व समकक्ष अथवा त्यावरील वेतन संवर्गातील पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. या पॅनेलमधील सेवानिृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येईल.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 6 (3) अन्वये रोजगार हमी योजनेतील अनियमिततेकरिता विभागीय आयुक्त हे शिस्तभंग विषयक प्राधिकारी असल्याने इच्छुक सेवानिवृ्त्त अधिकाऱ्यांचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यासाठी मागवण्यात येत आहेत. कंत्राटी चौकशी अधिकारी यांना विभागीय चौकशी प्रकरणात अपचारी असल्यास 1 हजार 800 रुपये व अपचारी यांची संख्या वाढल्यास प्रति अपचारी 3 हजार रुपये याप्रमाणे कमाल 30 हजार इतकी रक्कम अनुज्ञेय राहील. कंत्राटी चौकशी अधिकारी यांची कमाल वयोमर्यादा 70 वर्ष आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी 8 दिवसांत आपले अर्ज सादर करावेत.

ओपेल पूल ची 2 री जलतरण स्पर्धा जोरदार उत्साहात संपन्न

पुणे:- ओपेल पूल आयोजित 2री जलतरण स्पर्धा  पुणे महानगरपालिकेच्या कै. शंकरराव राजाराम कदम जलतरण तलावावर आयोजित करण्यात आली होती..या स्पर्धेत तब्बल 600 पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात  सहभाग घेतला.. 32 इव्हेंट मध्ये तब्बल 92 स्पर्धकांनी पारितोषिके मिळवली.तसेच 4 लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे काढण्यात आली.
नगरसेवक प्रकाश कदम,नगरसेविका अश्विनी भागवत,सामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ,प्रभाकर (बाबा) कदम,वाई चे सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड भारती विद्यापीठ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप
 पत्रकार चंद्रकांत हंचाटे,मार्गदर्शक चंद्रकांत कदम, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली..
नागरिकांनी व लहान मुलांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज दैनंदिन स्विमिंग करावे पोहण्यामुळे आरोग्य चांगले राहते असे प्रकाश कदम यांनी सांगितलेतर स्विमिंग या क्रीडा ला क्रिकेट व इतर खेळा सारखे महत्व दिले गेले पाहिजे. क्रीडा प्रकारात स्विमिंग मुळे आरोग्य चांगले राहतेच तर स्विमिंग मधून अनेक लहान मुले पुढे ऑलम्पिक सारख्या स्पर्धेची तयारी करून त्यात आपल्या देशाचे नाव मोठे करावे असे नगरसेविका  अश्विनी भागवत यांनी सांगितले..
स्पर्धेचे सूत्रसंचालक आशिष जराड यांनी केले तर स्पर्धेचे आयोजन ओपेल पूल चे व्यवस्थापक सागर कदम,ओंकार जाधव, सिद्धार्थ आढाव,अनिल नावगैरे,अभिषेक लोणकर,सचिन रासगे,राहुल होळकर,संदीप बोरकर,यांनी केले..

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन व भव्य मिरवणूक

पुणे :पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर २९३ वी जयंती महोत्सवाची सुरुवात काल दुपारी १ वाजता शनिवार वाडा  ते सारसबाग भव्य ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात झाली. या मध्ये प्रामुख्याने पारंपरिक  वाद्य ढोल पथक ,हलगी ,मैदानी खेळ,धनगर लोकप्रिय नृत्य ,तसेच घोड्यावर पारंपरिक वेषेत महिला होत्या  ,रथ या मध्ये सहभागी होते. पारंपारिक  वेशभूषेत हजारो धनगर बांधव या मध्ये सहभागी झाले होते.

       हि मिरवणूक दशनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चौक ,फडगेट पोलीस स्टेशनमार्गे स्वारगेट  पासून सारसबाग येथे मिरवणुकीसाची सांगता झाली.
     सारसबाग येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अभिवादन सभा व पुरस्कार  सोहळा घेण्यात आला. ह्या वर्षीचे समाज भूषण पुरस्काराचे ३ मानकरी आहेत १}आमदार दत्ता  भरणे {इंदापूर} २}विश्वास देवकाते {पुणे जि .प. अध्यक्ष },३}आमदार नारायण आबा पाटील {जेऊर , करमाळा }
                      या कार्यक्रमाचे उदघाटक मंत्री विजय शिवतारे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड अण्णा पाटील ,प्रमुख प्रवक्ते मिथुन आटोळे ,आमदार योगेश टिळेकर ,गोपीचंद पडळकर ,आमदार दत्ता भरणे ,पुणे जि .प .अध्यक्ष विश्वासराव देवकाते,तुकाराम करे ,नगरसेवक उदय डांगे,शशिकला वाघमारे ,मोहन शेंडगे व  या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम बाप्पू हाक्के उपस्थित होते.
          धाडसी प्रराक्रमी व प्रशासनावर प्राधान्य निर्माण करण्याऱ्या पहिला महिला म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ना घावे लागेल असे प्रतिपादन मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी केले.
        आमचे प्रेरणा स्थान राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत त्यांनी समाजामध्ये योग्य मार्ग दाखवला स्त्रियांनी एकत्र येऊन संघटित व्हावे व राजमातेचे विचार आत्मसात करावेत असे मत ह्या कार्यक्रमाचे आयोजक घनश्याम बाप्पू हाक्के यांनी व्यक्त केले यावेळी हजारोंचा समुदाय सारसबाग येथे उपस्थित होता.

महात्मा फुले मंडळाच्यावतीने हिरकमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन

पुणे-महात्मा फुले मंडळाच्यावतीने हिरकमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप राऊत यांच्याहस्ते करण्यात आले . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव राऊत तर  प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , , माजी आमदार कमल ढोलेपाटील , दि सासवड माळी शुगर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे , भवानी पेठ प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका मनिषा संदीप लडकत ,  महात्मा फुले समता परिषदेचे पुणे महानगर अध्यक्ष प्रितेश गवळी , माजी नगरसेवक संदीप लडकत , युवा माळी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता भगत , ज्योती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर पैठणकर , रघुनाथ ढोक , दिनेश होले , शिवराम जांभुळकर , चार्टर्ड अकौंटंट बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत महात्मा फुले मंडळाचे संस्थापक सदस्य प्रा. भगवानराव डोके यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष   हनुमंत टिळेकर व चांगदेव पिंगळे यांनी केले तर आभार मंडळाचे सचिव कैलास काठे यांनी मानले .

या कार्यक्रमाचे संयोजन  महात्मा फुले मंडळाचे संस्थापक सदस्य प्रा. भगवानराव डोके , उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर , सचिव कैलास काठे , सहसचिव कमलाकर डोके , हिशोबतपासणीस दिलीप भुजबळ विश्वस्त मंडळ सुधाकर आरू , ऍड. दिगंबर  आलाट , दीपक जगताप , चांगदेव पिंगळे , गिरीश झगडे , पांडुरंग गाडेकर आदीनी केले होते . यावेळी मंडळास माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी पंचवीस हजार रुपये देणगी दिली.

पावसाळ्यात विजेचे धोके टाळा

0

येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल. पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. मुसळधार पाऊस नसताना किंवा वादळ नसताना वीजपुरवठा खंडित का होतो, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यामागे वीज वितरण यंत्रणेवर उन-पावसाचा काय परिणाम होतो, हे जाणून घ्यावे लागेल. यासोबतच पावसाळ्यातील दिवसांत घरातील विजेची उपकरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

विजेपासून सावधान!

वीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. विजेपासून प्रामुख्याने पावसाळ्यात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जिवितहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हीच सुरक्षितता हाच सर्वोत्तम उपाय आहे.

पावसाळ्यात वादळवाऱ्यामुळे वीजतारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विजेचे खांब, विजेच्या तारा व रोहित्रे (Transformer) यातून ठिणग्या पडत असतात अशावेळी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्वरित कळवावे. कारण अशा ठिणग्यांतून वीजतारा तुटून किंवा आग लागून मोठी दुघर्टना घडण्याची शक्यता असते.

 

खबरदारी हीच सुरक्षितता !

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.

मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

उपाययोजनाही महत्वाच्या!

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.

काय करू नये!

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

वीज ही अत्यावश्यक गरज आहे. मात्र त्या विजेचा वापर सुरक्षिततेची खबरदारी घेऊन योग्यप्रकारे केला तरच ती उपयोगी ठरु शकते. अन्यथा दुर्घटना घडून वीज अतिधोकादायक होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी पावसाळ्यात विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अभियंते व जनमित्रांची कसोटी

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्गाचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड करण्याची सुविधा आहे. त्यासाठी कॉल सेंटरवर किंवा 92255-92255 या मोबाईल क्रमांकावर (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास संबंधीत ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाईलवरून तक्रार नोंदविण्यासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधून केवळ तक्रारीचा तपशील सांगावा लागतो.

निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी (महावितरण ),पुणे

नगरसेवकाने बजावले कर्तव्य ,अन वाचले जखमी तरुणाचे प्राण

पुणे : रस्त्यामध्ये अपघातात जखमी होऊन पडलेल्या व्यक्तीस तातडीने इस्पितळात पोहचवावे याबद्दलचे आवाहन आपण अनेकदा ऐकतो. मात्र बहुतांशी वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी मात्र या बाबतीत आदर्श घालवून दिला आहे. आज दुपारी निलायम थिएटर जवळील रस्त्यावर एक तरून मोटर सायकल स्लिप होऊन जमिनीवर आपटला गेला. रक्तताच्या थारोळ्यात पडलेला वडार वाडीतील शाहरूख खान हा तरुण जखमी अवस्थेत पडलेला पाहूनही जाणारे येणारे न बघितले सारखे करून पुढे जात होते. याच वेळी तिथून जाणाऱ्या नगरसेवक आबा बागुल यांनी तातडीने गाडी थांबवून जखमी तरुणास स्वतः उचलून सारस बागेजवळील अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल केले. व त्यामुळे त्याचे प्राणही वाचले. प्रत्येक नागरिकाने अशी जबाबदारी पार पडलीच पाहिजे. असे आबा बागुल यांनी सांगितले.

महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरने मे 2018 मध्ये केली 28,199 युनिटची विक्री

महिन्यात देशांतर्गत विक्रीमध्ये 14% वाढ

 मुंबई- 19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मे 2018 मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी आज जाहीर केली.

मे 2018 मध्ये देशांतर्गत विक्री 28,199 युनिटची झाली, तर मे 2017 मध्ये ती 24,710 युनिट होती. मे 2018 मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत + निर्यात) 29,330 युनिट इतकी झाली, तर गेल्या वर्षी याच काळात ती 25,749 युनिट होती. मेमध्ये 1,131 युनिटची निर्यात करण्यात आली.

मासिक कामगिरीविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “आम्ही मे 2018 मध्ये 28,199 ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या 14 टक्के अधिक आहे. अन्नधान्याचे व फुलशेतीचे चांगले उत्पादन येईल, अशा विक्रमी अंदाजामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल व ट्रॅक्टरच्या मागणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात 1,131 ट्रॅक्टरची विक्री केली व मे 2017च्या तुलनेत 9% वाढ साध्य केली.”

फार्म इक्विपमेंट सेक्टर
फार्म इक्विपमेंट सेक्टर मे एकत्रित मे
  F18 F19 %बदल F18 F19 %बदल
             
देशांतर्गत 24710 28199 14% 49918 58083 16%
             
निर्यात 1039 1131 9% 1982 2172 10%
             
एकूण 25749 29330 14% 51900 60255 16%

* निर्यातीत सीकेडीचा समावेश

महिंद्राविषयी

19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.