पुणे-हवेली तालुक्यातील वाघोलीचे झपाट्याने होणारे नागरीकरण व गृहप्रकल्प पाहता सध्या
अस्तित्वात असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा
(पीएमआरडीए)च्यावतीने नवीन योजना हाती घेऊन राबविण्यात येणाऱ्या वाढीव पाच एमएलडी (दशलक्ष
लीटर )पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्राची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वढू बंधाऱ्यापासून वाघोली गावाचे अंतर १२.५ किमी आहे. भीमा नदीवरील वढू बंधारामधून
पाणीपुरवठ्यासाठी पाणी उचलण्यात येणार आहे. वाघोली पाणीपुरवठा योजना प्रकल्पासाठी २३.१० कोटी
रुपये खर्च येणार आहे. सध्याच्या योजनेत इनटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जैक वेल, पंप हाउस, अशुद्ध पाणी
ऊर्ध्वनलिका २५० मिमी व्यासाची आहे. सध्या वाघोली पाणीपुरवठा योजना २.२ एमएलडी क्षमतेची आहे.
त्यासाठी अस्तित्वातील योजनेची पाणीक्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप टाकून पंपिग तास वाढवून २० तास
करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच अस्तित्वातील दाब नलीकेमधून १.४६ एमएलडी वाढीव पाणी पुरवठा
उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या विहिरीवरून अशुद्ध पाणी पंपिग मशिनरी बदलून
त्यासाठी वेगळी दाबनलिका टाकून ०.५ एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्याचे काम प्रस्तावित आहे.
सदरची योजना १२ तास पाणी उपसा होईल अशा पद्धतीची आहे. वाघोली गाव टेकडीच्या बाजूला असलेल्या
गट नं ८६४ या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र होणार आहे. सदर पाणीपुरवठा योजनेतून आव्हाळवाडी
गावासाठी पाणी पुरवठा होणार आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, वाघोली पाणीपुरवठा सुरळीतरीत्या पार
पडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. निविदा प्रक्रिया प्रभावीपणे व जलदगतीने राबविली जाणार आहे.
वाघोली परिसराची सध्य लोकसंख्या १ लाख १५ हजार आहे. सन २०२१ चा विचार करता ही लोकसंख्या ६
लाख ३४ हजार इतकी होईल. याकरिता पाणी पुरवठा क्षमता वाढविणे गरजेचे होते. या पाणी पुरवठा
योजनेमुळे वाघोली परिसरातील टंचाईच्या समस्येवर मात केली जाईल.
पीएमआरडीएकडून वाघोली पाणीपुरवठा निविदा प्रकाशित
राणी भोसले आणि मंजुषा नागपुरे यांचे उगलेंंवर टीकास्त्र …
पुणे- महापालिकेच्या मुख्यसभेत आज भाजपच्या नगरसेविका राणी भोसले आणि मंजुषा नागपुरे यांनी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यावर टीका केली आणि त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठवा अशी मागणी केली .मनपा कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतचा मुख्य सभेचा ठराव परस्पर शासनाकडून विखंडीत करवून आणून कामगारांवर अन्याय करणे , मुख्य सभेचा अवमान करणे असे ठपके त्यांनी त्यांच्यावर ठेवले . या शिवाय त्या हेकेखोर आहेत अशा स्वरूपाचे आरोप हि केले . प्रत्यक्षात या दोन नगरसेविका काय म्हणाल्या ते त्यांच्याच शब्दात ऐकायला हवे …
हे कारस्थान उगलेंंचे नाही तर कुणालकुमारांचे -चेतन तुपे पा.
पुणे- ग्रेड पे – कामगारांच्या वेतनाबाबत चे कारस्थान ,( मुख्य सभेचा ठराव विखंडीत करून आणण्याचे ) हे अतिरिक्त आयुक्तांचे नसून ,आयुक्त असताना कुणालकुमार यांनी केले आहे असा आरोप आज महापालिकेतील विपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी केला. मुख्य सभेत अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यावर भाजप नगरसेवकांकडून होत असलेल्या आरोपांचे अशा प्रकारे त्यांनी खंडन केले . कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्या साठी हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याने आपण तातडीने मुख्यमंत्र्यांकडे जावून हा कुणाल् कुमारांनी निर्माण करून ठेवलेला तिढा सोडवून आणावा असे ते म्हणाले
लोकप्रतिनिधींबाबत मतं कलुषित करण्याऐवजी प्रशासन गतिमान करा – सभागृहनेत्यांची तंबी
अतिरिक्त आयुक्त उगलेंंना माघारी पाठवा – रुपाली धावडे
पुणे- महापालिकेच्या मुख्यसभेत आज भाजपच्या नगरसेविका रुपाली धावडे यांनी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यावर टीका केली आणि त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठवा अशी मागणी केली . पहा आणि ऐका त्यांनी नेमके काय म्हटले आहे ….
किती अधिकारी बदलणार ? त्यापेक्षा आत्मपरीक्षण करा – वसंत मोरे
चौदाव्या आशिया स्कुल बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय बोरगावकरचे सुवर्ण यश
व्हॅस्कॉन कर्मचाऱ्यांनी केईएम रुग्णालयाला केले 55 बाटल्या रक्तदान
पुणे, दि. 17 जुलै 2018 ः व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. या बांधकाम क्षेत्रातील नामांकीत कंपनीने गुरुवार दि. 12 जुलै रोजी आपला वर्धापनदिन रक्तदानाची मोहीम घेऊन साजरा केला. या प्रसंगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 55 बाटल्या रक्तदान केले. याकामी केईएम रूग्णालयाने कंपनीला सहाय्य केले.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन यावेळी म्हणाले, माझे वडील आर. वासुदेवन यांनी स्थापन केलेल्या या कंपनीचे नाव औद्योगिक क्षेत्रात आदराने घेतले जाते. आम्ही उत्कृष्टतेचे अनेक मापदंड या क्षेत्रात निर्माण केले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.
कंपनीच्या यशात तिच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा वाटा आहे, ग्राहकांना चांगल्या सुखसोयी, चांगले वातावरण देऊन त्यांच्या पैशाचे खरे मूल्य मिळवून देणे हे कार्य यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा आणि यशाची उत्तुंग शिखरे गाठण्याचा निर्धारही वासुदेवन यांनी व्यक्त केला.
रक्तदानाच्या कार्यक्रमाच्यावेळी व्हॅस्कॉन इंजिनीअर्सचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष आर. वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन, समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष सुंदरराजन, रिअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश म्हात्रे, तसेच वरिष्ठ व्यवस्थापक, कर्मचारी, चॅनेल पार्टनर्स आणि कंपनीशी जुना ऋणानुबंध असणारे काही ग्राहक उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने समारंभाला सुरुवात करण्यात आली. आर. वासुदेवन यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. संबंधी ..
‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स’चे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या पहिल्या काही रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये ‘व्हॅस्कॉन’चा समावेश होतो. गेल्या 30 वर्षांत कंपनीने निवासी, औद्योगिक बांधकामे, आयटी पार्क, मॉल,मल्टीप्लेक्स, हॉस्पिटॅलिटी व समाज विकास केंद्रे असे विविध दोनशेहून अधिक प्रकल्प देशभरातील सुमारे 30शहरांमध्ये उभे केले आहेत. यातील काही कामे स्वतःची आहेत, तर काही ‘इपीसी’च्या माध्यमातून केलेली आहेत. यापुढे ‘इपीसी’ पध्दतीच्या कामांवर तसेच परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांवर भर देण्याचे ‘व्हॅस्कॉन’ने ठरविले आहे.
शेतकऱ्यांचे पीक विमा, पीक रोग नुकसानीचे सर्व पैसे देणार 38 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 17 : शासन शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम तसेच बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाई आदीबाबतचे सर्व पैसे देणार आहे. यातील नुकसान भरपाई बाबत 44 लाख शेतकऱ्यांपैकी 38 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे. सरासरी 12 हजार प्रती हेक्टर प्रमाणे ही रक्कम देण्यात आली आहे. उर्वरितांच्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
बियाणे कंपनीच्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी लागतो. यात 14 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यातील 8 लाख 8 हजार अर्जांवर कॉसी ज्युडीशियल प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी कायद्यानुसार केवळ 70 लोकांना प्राधिकृत केले होते. त्यात बदल करुन 1700 लोकांना नियुक्त केले. त्यांच्यामार्फत फिल्ड व्हिजीट करण्यात आल्या. तसेच यातील 1 लाख 55 हजार अर्ज निकाली काढले. त्यांना 96 कोटी 30 लाख रुपयांची मदत दिली असून साधारणत: 8 ते 15 हजार रुपये प्रती हेक्टर अशी सरासरी नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित अर्जांबाबात एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधी (एनडीआरएफ)ची वाट न पाहता राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) निधीतून 1 हजार 9 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यात 13 हजार 500 प्रती हेक्टरी रुपये वाटप केले आहे. तसेच संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार अजुनही मदत दिली जात आहे. एनडीआरएफचा तिसरा हप्ता 15 दिवसांत देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संच मान्यतेमध्ये किमान 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर – विनोद तावडे
नागपूर, दि. 17 : माध्यमिक शाळांमध्ये डोंगराळ भागासह सर्व शाळांना सद्यस्थितीत संच मान्यतेमध्ये किमान 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सदस्य दत्तात्रय सावंत यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. तावडे म्हणाले, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 दि. 1 एप्रिल, 2010 पासून लागू झाला आहे. प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांसाठी किती शिक्षक असावेत (विद्यार्थी : शिक्षक गुणोत्तर पीटीआर) याबाबत अधिनियमाच्या कलम 25 मध्ये तरतूद आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी संख्येवर आधारित शिक्षक निश्चिती करण्याच्या सूचना, शासन निर्णय दि. 13 डिसेंबर, 2013 व दि. 28 ऑगस्ट 2015 अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच या शासन निर्णयांद्वारे शिक्षक संख्या निश्चितीबाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत.
सदस्य बाळाराम पाटील यांनी याबाबत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
अल्पसंख्यांक बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदानास अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : धार्मिक अल्पसंख्यांक विदयार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी–सुविधा उपलब्ध् करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविदयालय, औदयोगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्याच्या योजनेस अल्पसंख्यांक विकास विभाग, शासनाचे परिपत्रक क्रमांक:अविवि-2018/प्र.क्र.
बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
पुणे जुलै 18: महाराष्ट्र राज्याची अग्रणी बँक असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ राज्यामध्ये त्यांच्या 500 हून अधिक ग्रामीण शाखांमार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करत आहे.
सदर शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक 28 जुलै 2018 रोजी करण्यात येणार आहे. मेळाव्यादरम्यान बँकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित शाखाधिकारी आणि कृषी अधिकारी शेतकरी बांधवांना पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज योजनांबाबत माहिती देतील, तसेच इच्छुक शेतकर्यांकडून कृषीकर्ज मागणी प्रस्तावदेखील स्वीकारले जाणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र शेतकर्यांना महाबँक किसान क्रेडिट कार्ड या योजनेद्वारे अल्प मुदत पीककर्ज उपलब्ध करत असते. मेळाव्यादरम्यान संबंधित शेतकर्यांना पीकनिहाय पतपुरवठा केला जाणार असून, त्यासोबत 10 टक्के रक्कम उपभोग आणि कापणीपश्चात खर्च (Consumption & Post Harvest Expenses) आणि 20 टक्के रक्कम शेतीसामुग्री दुरूस्ती आणि देखभालीसाठी (Farm Assets Repairs & Maintenance) दिले जातील.
ज्या शेतकर्यांचे पीककर्ज नूतनीकरण बाकी आहे अशा शेतकर्यांना नुतनीकरणादरम्यान 10 टक्के पीककर्ज मर्यादा वाढवून दिली जाणार आहे. तसेच नव्या शेतकर्यांना 5 वर्षासाठी प्रत्येक वर्षी 10 टक्के वाढ गृहीत धरून पतमर्यादा मंजूर करण्यात येणार आहे.
सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सदर मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होवून विविध योजनांचा लाभ घ्यावा.
‘त्या’ अधिकाऱ्यांना माघारी पाठवू .. भिमाले
पुणे- चांगले काम केले म्हणून जिथे बढती मिळते ,तिथे सन्मान समजला जातो ,पगार वाढतो आणि पुणे महापलिकेत जर बढतीला.. पगार कमी करून, अवमान करण्याचे प्रयत्न कोणी करून कर्मचारी,अधिकारी यांच्या प्रामाणिकपणाचा अवमान कोणी करत असेल आणि महापौरांसह ,मुख्य सभेचा अवमान कोणी करत असेल तर अशा अधिकाऱ्यांना शासनाकडे माघारी पाठवून देवू ,कर्मचाऱ्यांचे वेतन कदापी कमी करू देणार नाही अशी ग्वाही आज येथे कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सामोरे जाताना महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली . महापौर मुक्ता टिळक, कामगार नेत्या मुक्ता मनोहर ,कॉ. उदय भट. बापू पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भर पावसात महापालिकेवर धडकलेल्या हजारावर कर्मचाऱ्यांच्या समोर बोलताना पहा आणि ऐका सभागृह नेते भिमाले यावेळी नेमके काय म्हणाले …
शीतल उगले हटावो साठी भर पावसात कामगारांची महापालिकेवर धडक (व्हिडीओ)
पुणे- महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांना तातडीने शासनाच्या सेवेत परत पाठवा अशा मागणी साठी आज सकाळपासून भर पावसात हजारावर कामगारांनी महापालिकेवर धडक मोर्चा नेवून सकाळ पासून धरणे धरली आहेत .
महापालिका कामगारांचे पगार कमी करण्याचा घाट उगले यांनी घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे . याबाबत महापालिकेसमोरील मोर्चाचे -धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कामगार नेत्यांनी धडक उगले यांच्या बदलीची मागणी केली आहे ..पहा एक व्हिडीओ रिपोर्ट
