पुणे : धार्मिक अल्पसंख्यांक विदयार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी–सुविधा उपलब्ध् करुन देऊन शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविदयालय, औदयोगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्याच्या योजनेस अल्पसंख्यांक विकास विभाग, शासनाचे परिपत्रक क्रमांक:अविवि-2018/प्र.क्र.171/का.6 दि. 30 जून, 2018 नुसार सन 2018-19 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेचेसाठीचे परिपुर्ण प्रस्ताव, अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविदयालय, औदयोगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2018 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग, 1 ला मजला, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.