Home Blog Page 3103

जीटीडीसीचे टॅक्सी अप ‘गोवामाइल्स’ लाँच

0

पणजी – गोव्याची पहिले आणि एक्सक्लुसिव्ह मोबाइल अपवर आधारित टॅक्सी सेवा गोवामाइल्सचे गोव्याचे  मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते सेक्रेटेरियल कॉम्प्लेक्स, पोर्वोरी येथे लाँच करण्यात आले.

 लाँचप्रसंगी  पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष, श्री. निलेश काब्राल, गोव्याचे मुख्य सचिव श्री. धर्मेदंद्र शर्मा, पर्यटन सचिव, श्री. शेओ प्रताप सिंग, श्री. मेनिनो डिसूझा, संचालक, पर्यटन विभाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गोवामाइल्सचे लाँच स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठी गोवा व आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन- प्रवासात क्रांतीकारी बदल आणेल तसेच या नव्या उपक्रमांतर्गत सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकांचा फायदा करून देईल. राज्यात प्रवेश केल्यानंतर लगेचच गोवामाइल्सद्वारे परवडणाऱ्या आणि सरकारने मंजूर केलेल्या दरांत टॅक्सी आरक्षित करता येईल. गुगल प्ले स्टोअर तसेच अपल स्टोअरद्वारे गोवामाइल्स अप डाउनलोड करता येईल.

लाँचप्रसंगी श्री. पर्रीकर म्हणाले, ‘या नव्या अप आधारित टॅक्सी सेवेमुळे गोव्याला पर्यटकांना परवडणाऱ्या दरात भरपूर प्रवास करण्याची संधी देता येईल. विशेष म्हणजे, त्यांना गोव्यात आल्यापासून परत जाईपर्यंत परवडणाऱ्या दरांत ही सेवा वापरता येईल. हा उपक्रम लाँच केल्याबद्दल मी गोवा टुरिझमचे अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला भरपूर यश मिळेल अशी सदिच्छा देतो.’

त्यापुढे श्री. आजगांवकर म्हणाले, ‘गोव्यातील अपआधारित टॅक्सी सेवा वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणेल, ज्याचा या क्षेत्रातील सर्व घटकांना म्हणजेच टॅक्सी चालक, पर्यटक आणि स्थानिकांना फायदा होईल. मला खात्री आहे, की गोव्यातील पर्यटक टॅक्सी चालक आता या डिजिटल यंत्रणेत सहभागी होतील आणि पर्यायाने अशा प्रकारची यंत्रणा यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांच्या यादीत गोवा मागे राहाणार नाही.’

या उपक्रमाच्या फायद्यांवियी श्री. काब्राल म्हणाले, ‘आम्ही सार्वजनिक माहिती अभियान लाँच केले आहे, ज्याद्वारे गोव्यातील एक दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना गोवामाइल्सची माहिती दिली जाईल. सर्वसामान्य जनतेकडून आम्हाला भरघोस प्रतिसादाची अपेक्षा असून ते हे अप डाउनलोड करून त्याचा पर्यटन तसेच दैनंदिन प्रवासासाठी वापर करतील. ही अप आधारित टॅक्सी सेवा डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल, पर्यटकांसाठी प्रवास सोपा करेल व टॅक्सी चालकांना चांगले उत्पन्न देईल. या उपक्रमामुळे ग्राहकांना नवा अनुभव मिळेलच, शिवाय टॅक्सी भाडे भरण्यासाठी सोपा व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देईल.’ ते पुढे म्हणाले, ‘हे अप डिजिटल यंत्रणेमध्ये गोवन टॅक्सी चालकांना भागीदार बनवणाऱ्या आणि सर्वात जलद व सोयीस्कर यंत्रणा देणाऱ्या तसेच पर्यटकांना सेवेचा चांगला अनुभव देणारे पहिल्या काही अप्सपैकी एक एक आहे.’

गोवामाइल्सचे व्यवस्थापन फ्रंटमाइल्स प्रा. लि. या स्थानिक गोवन कंपनीद्वारे हाताळले जाणार असून टेंडरिंग प्रक्रियेच्या गरजांनुसार एसपीव्ही म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. ही एसपीव्ही ही पिटासिस सॉफ्टवेअर प्रा. लि. या पालक कंपनीची उपकंपनी आहे, जे जीटीडीसीच्या अप आधारित टॅक्सी सेवेचे यशस्वी बिडर होते. पिटासिस सॉफ्टवेअर प्रा. लि. ही गेली सात वर्ष वाहतूक ऑटोमेशन क्षेत्रात कार्यरत असून मास ट्रान्सपोर्टेशन, फ्लीट/क्सी अग्रीगेशन आणि कर्मचारी वाहतूक या क्षेत्रांत कार्यरत आहे. सध्या कंपनीच्या नोंदणीकृत प्रवाशांची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त आहे.

अपवर आधारित टॅक्सी सेवेच्या लाँचमुळे पर्यटकांना गोवामाइल्स सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारे आहे हे सहज लक्षात येईल, कारण त्यांना केवळ एका मोबाइल अपद्वारे आरक्षण, देखरेख आणि पैसे भरणे अशा सर्व क्रिया करत येणार आहेत. ट्रॅकिंगसुद्धा अतिशय सोपे ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवाशांना त्यांची राइड त्यांच्या सद्य आणि त्यापूर्वी आरक्षित केलेल्या राइडचे ट्रॅकिंग पाहाता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेस काही धोका असल्यास त्यात पॅनिक बटनाची सोयही दिलेली आहे.

या सेवेचा टॅक्सी चालकांनाही फायदा होईल याची खबरदारी गोवामाइल्सने घेतली असून त्यानुसार भारतात इतरत्र व जगभरातील ट्रेंडनुसार त्यांच्या उत्पन्नावर शुल्क आकारले जाणार नाही. टॅक्सी चालकांना दैनंदिन पातळीवर पैसे मिळतील. हेच मोबाइल अप कर आणि विमा कारणांसाठी तसेच जवळच व्यवसाय शोधण्यासाठी वापरता येणार असून त्यामुळे प्रत्येक चालकाला उत्पन्न मिळवण्याची खात्री असेल. उत्पन्नाचा सारांश अपमध्येच पाहाता येईल. स्थानिक गोवन चालकांमध्ये व्यवसायाचे समान विभाजन केले जाईल आणि त्यांना काम करून जास्त पैसे मिळवता येतील व हीच गोष्ट त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देईल.

चालकांसाठी पाळावयाच्या काही सूचना जीटीडीसीने तयार केल्याअसून अधेमधे त्यासंदर्भात प्रत्यक्ष आणि डिजिटल पातळीवर तपासणी करण्याचे काम जीटीडीसी करेल. पालन करणाऱ्यांना ताकीद दिली जाणार असून त्यामुळे ग्राहक समाधानाचा चांगला दर्जा राखला जाईल.

काही टॅप्समध्ये कॅब आरक्षित करा. पुढीलप्रमाणे

•  पिकअप लोकेशन सेट करा (उदा – घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, सध्याचे लोकेशन इत्यादी)

  • ड्रॉप लोकेशन सेट करा (उदा – घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, सध्याचे लोकेशन इत्यादी)
  • नकाशावर दिसत असलेल्या तुमच्या लोकेशनजवळच्या कॅब्ज/टॅक्सी पाहा
  • पैसे भरण्याचे विविध मार्ग – रोख पैसे भरा किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम, यूपीआय असे विविध कॅशलेस पर्याय वापरा.
  • वाहनाचा प्रकार निवडा आणि ‘कन्फर्म’ वर टॅप करा.
  • सोप्या पद्धतीने निवड करण्यासाठी तुम्हाला वाहनाचा प्रकार आणि दर दिसतील व त्यात तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडा.
  • त्यानंतर तातडीने इतर तपशील जसे, की चालकाचे नाव, गाडीचा नंबर, गाडीचा प्रकार इत्यादी. चालकाला दिला जाणारा ओटीपी अपमध्येच असेल.
  • चालकाला ओटीपी दिल्यानंतर रिअल टाइममध्येच कॅब येण्याची व ड्रॉप केले जाण्याची वेळ पाहा.
  • तुमची ट्रिप संपल्यानंतर इन्व्हॉइसचा इतिहास लगेचच ‘माय राइड्स’मध्ये पाहाता येईल आणि आधीच्या ट्रिप्सची माहिती सध्याच्या ट्रिपच्या माहितीखाली दिलेली असेल.
  • भाडेशुल्क आणि राइडची वैशिष्ट्ये जाणून घ्या – आरक्षित करण्यासाठी भाडे आणि विविध वैशिष्ट्ये तपासता येतील.
  • शेअर – राइडचे तपशील तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करता येतील.

‘बाजी‘ मालिकेतून अभिनेता अभिजित श्वेताचंद्रचे प्रमुख भूमिकेत पदार्पण

0

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवीन मालिका ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आली. झी मराठी वाहिनीने पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा प्रेक्षकांसाठी सादर केली आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’ नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. थोडीशी गो. नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांची जी शैली आहे त्या पद्धतीची ही कथा आहे आणि या कथेत अभिनेता अभिजीत श्वेताचंद्र हा बाजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ही बाजी एका शिलेदाराच्या पराक्रमाची आहे आणि हा शिलेदार अभिजीत छोट्या पडद्यावर साकारतो आहे.

त्याच्या या पदार्पणाबद्दल बोलताना अभिजित म्हणाला, “याआधी मी साकारल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय. पण ‘बाजी’ या मालिकेतून प्रमुख भूमिकेत पदार्पण करताना अर्थातच थोडं दडपण होतं. एक मालिका करणं मग त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद गृहीत धरता आम्ही आमचं १०० नाही तर २०० टक्के देत आहोत आणि कुठेतरी प्रेक्षक देखील आता त्याची दाखल घेत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती आम्हाला मिळत आहे. माझी ‘बाजी’ ही व्यक्तिरेखा म्हणजे शिवछत्रपती यांचा मावळा असलेला एक सामान्य मुलगा आहे जो स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहे. ही व्यक्तिरेखा जितकी आव्हानात्मक आहे तितकीच त्यासाठी मी मेहनत देखील घेतली. अगदी व्यक्तीरेखेच्या लुकवर घेतलेल्या मेहनतीपासून ते या व्यक्तिरेखेसाठी अपेक्षित असलेले तलवारबाजी, घोडेस्वारी यांसारखे स्टंट्स योग्यरित्या साकारण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करत आहे.”

 

ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विद्याभवन, विबग्योर, स्प्रिंग डेल स्कुल संघांची विजयी सलामी

0

पुणे: ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विद्याभवन स्कुल अ व ब, विबग्योर स्कुल अ व ब, स्प्रिंग डेल स्कुल अ या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत ऍरोन मेंडीस(2, 5,15मि.)याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर विद्या भवन स्कुल ब संघाने दस्तूर स्कुलचा 6-0असा धुव्वा उडविला. विद्या भवन स्कुल अ संघाने सिम्बायोसिस एसएससी ब संघाचा 3-0असा तर, विबग्योर स्कुल ब संघाने सिम्बायोसिस एसएससी अ संघाचा 4-0असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

स्पर्धेत दस्तूर हायस्कुल, विद्याभवन स्कुल अ व ब संघ, सिम्बायोसिस एसएससी(एलसीआर) अ व ब संघ, विबग्योर स्कुल अ व ब, स्प्रिंग डेल स्कुल अ व ब संघ, एंजल हायस्कुल लोणी, जेएन पेटिट स्कुल अ व ब, एंजल हायस्कुल उरळी कांचन, आदित्य इंटरनॅशनल स्कुल, आर्यन स्कुल, सेंट व्हिन्सेंट हायस्कुल, हचिंग्ज हायस्कुल, द ऑर्चिड स्कुल, सीएम इंटरनॅशनल स्कुल, बिशप्स हायस्कुल(कॅम्प), माउंट सेंट पॅट्रिक स्कुल, डॉनबॉस्को हायस्कुल, सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल, इंदिरा नॅशनल स्कुल, कस्तुरबा गांधी स्कुल, बिशप्स कल्याणीनगर, पुणे पोलीस पब्लिक स्कुल, विद्यांचल स्कुल, एचईएम गुरुकुल स्कुल या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:
स्प्रिंगडेल स्कुल अ: 2(ईशान केमकर 14, 16मि.)वि.वि.आदित्य इंटरनॅशनल स्कुल: 1(पंकज चौधरी 19मि);

विबग्योर स्कुल अ: 2(शील घटानी 4मि., आयुश कटनकर 8मि.)वि.वि.स्प्रिंग डेल स्कुल ब: 1(पार्थ भरेकर 3मि.);

विबग्योर स्कुल ब: 4(आदित्य गोयल 2मि., वैभव राजेश 3, 18मि., सिद्धांत आडमुठे 15मि.)वि.वि.सिम्बायोसिस एसएससी अ: 0;

विद्या भवन स्कुल ब: 6(ऍरोन मेंडीस 2, 5,15मि., आदित्य धुमाळ 9मि., अंकित गवारे 20मि., ओम राक्षे 21मि.)वि.वि.दस्तूर स्कुल: 0;

विद्या भवन स्कुल अ: 3(आदित्य पिल्लई 3मि., नील दगडे 7, 16मि.)वि.वि.सिम्बायोसिस एसएससी ब: 0;

कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये एरवाडी दिवस व स्तनपान सप्ताह साजरा

0

पुणे-कर्वेनगरयेथील कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्य महाविद्यालयाच्या वैद्यकीय व मनोवैद्यकीय समाजकार्य विभागाच्या वतीने एरवाडी दिवस व स्तनपान सप्ताहानिमित्त चर्चासत्र व विविध विषयांचे सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सन २००१ मध्ये तामिळनाडू मधील एरवाडी येथील एका मनोरुग्नालयामध्ये साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलेल्या २८ मनोरुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता व याच अपघाताची आठवण म्हणून मानसिक आरोग्य क्षेत्रांमध्ये “त्या” मनोरुग्णांना श्रद्धांजली वाहून मनोरुग्णाबाबत जागृती करण्यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो

याच दिवसाचे औचित्य साधून तसेच स्तनपान सप्ताहानिमित्त कर्वे समाज संस्थेच्या प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यावतीने माहितीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या दोन्ही दिवस व सप्ताहाचे महत्व यावर सादरीकरण करून चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.

संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, ज्येष्ठ प्रा. डॉ अनुराधा पाटील, प्रा. चेतन दिवाण व प्रा. दादा दडस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण करून चर्चा घडवून आणली.

संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, प्रा. डॉ अनुराधा पाटील, प्रा. चेतन दिवाण यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सीजीपीएलला कर्मचा-यांचे आरोग्‍य व सुरक्षिततेसाठी फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अवॉर्डमध्‍ये मिळाला ‘गोल्‍ड’ पुरस्‍कार

पुणे-

कोस्‍टल गुजरात पॉवर लि. (सीजीपीएल) या भारताची सर्वात मोठी एकीकृत वीज कंपनी टाटा पॉवरच्‍या पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनीला सर्वोत्‍तम सुरक्षा पद्धती आणि कामाच्‍या ठिकाणी सुरक्षितताविषयक नियमांची अमलबजावणी करण्‍यासाठी फेम एक्‍सलन्‍स सेफ्टी अवॉर्ड (गोल्‍ड)सह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. २९ जुलै २०१८ रोजी डेहरादूनमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या एका समारोहामध्‍ये सीजीपीएलच्‍या अग्निशमन व सुरक्षा विभागाचे प्रमुख श्री. प्रमोद कुमार सिंग यांनी कंपनीच्‍या वतीने पुरस्‍कार स्‍वीकारला.

उत्‍तराखंड सरकारचे शहरी विकास मंत्री माननीय श्री. मदन कौशिक, उत्‍तराखंड सरकारचे अर्थमंत्री श्री. प्रकाश पंत, उत्‍तराखंड भारतीय जनता पार्टीचे राज्‍य महासचिव श्री. नरेश बंसल आणि माजी खासदार श्री. जे. पी. अग्रवाल यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

पुरस्‍कार विजेत्‍या टीमचे अभिनंदन करत टाटा पॉवरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक श्री. अशोक सेठी म्‍हणाले, आरोग्‍य व सुरक्षा हे आमच्‍यासाठी अत्‍यंत महत्‍त्‍वाचे क्षेत्र असण्‍यासोबतच आमच्‍या व्‍यवसायाचा महत्‍त्‍वपूर्ण भाग आहेत. आम्‍ही सातत्‍याने कामाच्‍या ठिकाणी सर्वोत्‍तम व्‍यावसायिक आरोग्‍य व सुरक्षा आणण्‍याचा प्रयत्‍न करतो. हा पुरस्‍कार निश्चितच या दिशेने करत असलेल्‍या आमच्‍या प्रयत्‍नांना चालना देईल.

फाऊंडेशन फॉर अॅक्‍सेलेरेटेड मास एम्‍पॉवरमेंट (फेम) यांच्‍याकडून मिळालेला हा पुरस्‍कार क्षेत्रांना सर्वोत्‍तम व्‍यावसायिक आरोग्‍य व सुरक्षा प्रणाली, प्रक्रिया व पद्धतींची अमलबजावणी करण्‍यासाठी सन्‍मानित करतो.

राणे यांचा मराठा आरक्षण अहवाल घाईगडबडीतला – सुभाष देशमुख

0

पुणे-मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात तयार झालेला नारायण राणे यांचा अहवाल अतिशय घाईगडबडीत तयार झाला होता. त्यात फारशी स्पष्टता नसल्याने अनेक अडचणी आमच्या सरकार समोर होत्या. परंतु, भाजपचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनापासून मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता न्यायालयीन काम बाकी असून मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळेल, असा ठाम विश्वास देतानाच सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी नारायण राण यांनी दिलेल्या अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

पुणे गारमेंट फेअर उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी मराठा आरक्षणासह धनगर व इतर आरक्षणासंदर्भात सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणाबरोबरच धनगर व इतर सर्वच आरक्षणाचे प्रश्न भाजप सरकार शंभर टक्के मार्गी लावेल, असेही सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले. आरक्षणाव्यतिरिक्त मराठा समाजातील तरुणांसाठी नवउद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. त्याचे व्याज सरकार भरणार आहे. तसेच, शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधले जाणार आहे. यासाठी संस्था व समघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज द्यायचा आहे. त्यासाठीच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सरकार सोडवेल. आतापर्यंत फक्त सोलापूरमधून मागणी झाली असून ते काम लवकरच होईल, असेही देशमुख म्हणाले.

पुण्यात देशांतर्गत गारमेंट हब बनण्याची मोठी क्षमता – सुभाष देशमुख

0

पुणे : तयार कपड्यांचे देशातील मोठे हब होण्याची क्षमता पुण्यात आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कापड व्यापाऱ्यांचा जीएसटीसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे निश्चितपणे पाठपुरावा करेल, असा विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिला.

पुणे डिस्ट्रिक्ट होजिअरी, रेडीमेड अॅण्ड हँडलूम डिलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित तीन दिवशी पुणे गारमेंट फेअरचे उद्घाटन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. हा गारमेंट फेअर येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राऊंडवर 8 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत किरकोळ विक्रेत्यांसाठी खुला राहणार आहे. याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, असोसिएशनचे अध्यक्ष मनोज सारडा, गारमेंट फेअर कमिटीचे चेअरमन रितेश कटारिया, विभागीय अध्यक्ष महेश मोटवाणी, उपाध्यक्ष गिरीश सिरवाणी, सचिव कल्पेश पोरवाल, खजिनदार धनेश मुथियान, वैभव लोढा, केतन राणावत, कल्पेश जैन, निलेश फेरवाणी, अमित मुनोत, सतीश ओसवाल, मनीष अलवाणी, सचिन रतन, दिनेश बाफणा, आनंद ओस्तवाल, संजय झंवर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित विक्रेत्यांचा सुभाष देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणे गारमेंट फेअरमध्ये 160 गारमेंट उत्पादक व होलसेलर्स सहभागी असून 600 हून अधिक ब्रँड्स याठिकाणी उपलब्ध आहेत. येरवडा येथील डेक्कन कॉलेज मैदानावर सुमारे 60 हजार चौरस फुटाच्या हॉलमध्ये हा गारमेंट फेअर होत आहे. तयार कपड्यांची विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना दिवाळीच्या सणाच्या दृष्टीकोनातून कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईसह इतर अनेक ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे एकाच छताखाली किरकोळ व्यापाऱ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार कपडे पाहता यावेत आणि त्यांची खरेदी करता यावी या दृष्टीकोनातून हा गारमेंट फेअर आयोजित केला जात असून, त्याचे हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्समधील महिला, पुरुष, लहान मुले, स्पोर्ट्स, लग्नाचे कपडे, इनर वेअर्ससह नवीन ट्रेंड्समधील सर्व प्रकारचे तयार कपडे असणार आहेत. मोठ्या संख्येने किरकोळ व्यापारी या गारमेंट फेअरमध्ये येत आहेत.

पुणे हे सोलापूरपेक्षा मोठे शहर आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील स्थानिक कापड उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात धोरण तयार करीत आहे. पुणे गारमेंट फेअर सारखे उपक्रम कापड व्यावसायिक व उत्पादकांना नवे बळ देणारे आहेत. असे उपक्रम इतर ठिकाणीही झाले पाहिजेत. तयार कपड्यांना देशांतर्गत बरोबरच परदेशातीलही मोठी बाजारपेठ आहे. फॅशनचा जमाना आहे. त्यामुळे स्थानिक कपड्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुणे महत्त्वाचे ठिकाण आहे. महापालिका व संबंधीत विभागांशी बोलून पुण्याला गारमेंट हब बनविण्यासंदर्भात निश्चित प्रयत्न करु. दोन हजार रुपयांपर्यंत 5 टक्के व त्यापुढे 12 टक्के जीएसटी असावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात केंद्राकडे अहवाल पाठवू, असे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख म्हणाले.

आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील कापड व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

मनोज सारडा म्हणाले की, पुण्यात पाचशेहून अधिक होलसेल व्यापारी आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागातील किरकोळ कापड विक्रेते तयार कपड्यांच्या खरेदीसाठी पुण्यात येतात. आता पुणे शहर वाढले आहे. त्यामुळे एका ठिकाणी जर कापड व्यावसायिकांना जागा दिली तर, या व्यवसायाला मोठी चालना मिळेल. जीएसटीविषयी सरकारने विचार करून तो दोन हजारपर्यंतच्या खरेदीवर पाच टक्के करावा.

गारमेंट फेअर करण्यासाठी सर्व कमिटी सदस्यांनी मेहनत केली. तयार कपड्यांच्या विक्रेत्यांना डिजीटल करण्यासाठीचे प्रयत्न येथे झाले. त्यांची ऑनलाइन सदस्य नोंदणी करण्यात आली, असे गारमेंट फेअर कमिटीचे अध्यक्ष रितेश कटारिया यांनी सांगितले.
———

द टियारा पेजेंट कोच रितिका रामत्रीला ‘बेस्ट इन पेजेंट्री अवार्ड’

0
पुणे:  पेजेंट कोच आणि द टियारा पेजेंट ट्रेनिंग स्टूडियोची संस्थापिका रितिका रामत्रीस पेजेंट प्लॅनेट, बोस्टन, मॅसाचुसेट्स द्वारा ‘बेस्ट इन  पेजेंट्री अवार्ड’ साठी नामांकित केले गेले आहे.
पेजेंट प्लॅनेटला २००९ मध्ये संस्थापक आणि सीईओ स्टीवन रॉड्डी यांनी एक वेगळी ओळख मिळवुण दिली आहे.
रितिका रामत्रीने मागिल वर्षी मनुषी चिल्लर (मिस वर्ल्ड २०१७), साठी  इंटरनॅशनल पेजेंट कोचिंग आयोजित केले होते, ज्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.  ह्याचबरोबर मिस यूनिव्हर्स २०१८ मध्ये श्रद्धा शशिधर, मिस ग्रॅंड इंटरनॅशनल २०१७ साठी अनुकृति गुसैन, मिस इंटरकॉन्टीनेंटल २०१७ साठी प्रियंका कुमारी आणि मिस यूनाइटेड इंटरकॉन्टीनेंटल २०१७ साठी साना दुआ यांच्यासाठी देखील त्यांनी इंटरनेशनल पेजेंट कोचिंग ट्रेनिंगचे आयोजन केले होते. त्यांची ट्रेनिंग मानुषी चिल्लरसाठी खुप महत्वाची ठरली.
वर्ष २०१८ मध्ये में देखील टियारा ने बरेच भारतीय आणि अंतर्राष्ट्रीय पुरस्कार जींकण्यासाठी योगदान दिले आहे.
1. सोनल परीहार मिसेस अर्थ इंटरनॅशनल   २०१८
2. श्वेता चौधरी  मिसेस इको इंटरनॅशनल   २०१८/१९
3. मेघा दुबे मिसेस ईस्ट एशिया अर्थ २०१८
4. श्रद्धा कक्कड़  मिसेस यूनाइटेड नेशन्स २०१८
5. श्याना सनसरा मिस यूनाइटेड नेशन्स २०१८
6. श्वेता वरपे मिस गुडविल अम्बॅसीडर २०१८
7. श्रीमती शिवानी नायक शाह यांनी मिसेस इंडिया क्वींस ऑफ सबस्टेंस २०१८   जिंकले.
8. गायत्री भारद्वाज मिस यूनाइटेड कॉन्टिनेंट २०१८
9. पांच टियारा मुली ह्या मिस दिवा यूनिवर्स २०१८ पेजेंट साठी निवडल्या गेल्या आहेत. अलीशा महापौर, नेहल चुडासमा, शेफाली सूद, सुरीना जैदका आणि अदिति हुंडिया.

सफाई कर्मचा-यांसाठी असलेल्‍या योजनांची अंमलबजावणी व्‍हावी- दिलीप के. हाथीबेड

0

पुणे- सैनिक जसा सीमेवर उभा राहून देशाचे संरक्षण करतो, तसाच सफाई कर्मचारी देशामधील अस्‍वच्छता हटवून स्‍वच्‍छता निर्माण करत असतो.  सफाई कर्मचा-यांच्‍या या कामाचे महत्‍त्‍व लक्षात घेऊन त्‍यांच्‍याविषयी असलेल्‍या योजनांची अंमलबजावणी व्‍हायला हवी, असे आवाहन राष्‍ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्‍य दिलीप के. हाथीबेड यांनी केले. सफाई कर्मचा-यांच्‍या समस्‍या जाणून घेण्‍यासाठी ते राज्‍याच्‍या दौ-यावर आले असून पुणे येथे  बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाचेअतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.हाथीबेड म्‍हणाले, देशामध्‍ये स्‍वच्‍छता अभियान राबविले जात आहे. महात्‍मा गांधीजींनंतर स्‍वच्‍छतेला प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी महत्‍त्व दिले आहे. समाजातल्‍या शेवटच्‍या माणसाचा विकास व्‍हावा, प्रगती व्‍हावी, असे त्‍यांचे प्रयत्‍न आहेत. सफाई कर्मचारी हा समाजातील शेवटचा घटक आहे. त्‍याच्‍यासाठी केंद्र व राज्‍य शासनाच्‍या योजना आहेत, या योजनांचा लाभ माणुसकीच्‍या नात्‍याने त्‍यांना मिळाला पाहिजे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सर्वोपचार ससून रुग्णालय आदींमध्‍ये  सफाई कर्मचा-यांचे विविध प्रश्‍न आहेत. सफाई कर्मचा-यांना गणवेश, हातमोजे, गमबूट, मास्‍क तसेच इतर आवश्‍यक सुविधा, साधनसामग्री उपलब्‍ध करुन दिली गेली पाहिजे. सफाई कर्मचा-यांची दर तीन महिन्‍यांनी नियमित आरोग्‍य तपासणी झाली पाहिजे, ठेकेदारांमार्फत निवडण्‍यात आलेल्‍या  सफाई कर्मचा-यांना नियमानुसार वेतन दिले जाते का, त्‍यांचा प्रॉव्‍हीडंट फंड नियमित कपात करुन जमा केला जातो का याबाबतही माहिती घेण्‍याचे निर्देश त्यांनी दिले.

पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील सफाई कर्मचा-यांच्‍या प्रश्‍नांसदर्भांत स्‍वतंत्र समन्‍वय समित्‍या स्‍थापन करण्‍याची सूचना त्‍यांनी केली. या समित्‍यांमध्‍ये संबंधित अधिकारी, सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, महिला यांचा समावेश असेल. दर तीन महिन्‍यांनी या समित्‍यांची बैठक होत जाईल.  पोलीस विभागात प्रत्‍येक पोलीस ठाण्‍यात स्‍वतंत्र सफाई कर्मचारी नेमला जावा, यासाठी शासनाकडे  प्रस्‍ताव पाठवण्‍याची सूचनाही त्यांनी केली.

पुणे जिल्‍ह्याच्‍या बैठकीनंतर सोलापूर आणि सातारा जिल्‍ह्यात जाऊन सफाई कर्मचा-यांच्‍या समस्‍या जाणून घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तीन महिन्‍यानंतर विभागीय आयुकत स्‍तरावर आढावा बैठक घेणार असल्‍याचे  ते म्‍हणाले.

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0
  • कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन  2सप्टेंबर रोजी रंगणार

पुणे: सरहद यांच्या तर्फे आणि सिस्का ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत कारगिल येथे कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि शर्यत कारगिल येथे 1 व 2सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

कारगिल येथे होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेला सिस्का लेड यांचा पाठिंबा लाभला आहे. या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण सिस्का ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक राजेश उत्तमचंदानी, रनबडीज क्लबचे अरविंद बिजवे आणि संजीव शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

रनबडीज क्लबचे अरविंद बिजवे  म्हणाले कि,  कारगिल येथे झालेल्या भारत व पाकिस्तान यांच्यातील युद्धाची आठवण आपण सर्वांनाच आहे. या युद्धात आपल्या जवांनी मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. कारगिल परिसरातील वातावरण अधिकाधिक संव्हाराचे आणि शांततेचे राहावे. तसेच, परस्पर सामंजस्य वाढावे आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी हा सुद्धा या मॅरेथॉन आयोजनामागील उद्देश आहे. अखेर कोणत्याही परिसारमधील कला व क्रीडा उपक्रमाचे आयोजन हे तेथील जनजीवन सुरळीत असल्याचे लक्ष असते. त्यामुळे हि मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांचा प्रयत्न असतो. तसेच या मॅरेथॉनला नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. 

सिस्का ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक राजेश उत्तमचंदानी म्हणाले कि, कारगिल आंतरतराष्ट्रीय मॅरेथॉन हि शर्यत अस्सल धावपटूंसाठी  खास आकर्षण ठरणार आहे. तसेच, ज्यांचे धावण्यावर अतिशय प्रेम आहे, अशा हौशी धावपटूंसाठी हि शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे.

तसेच, हि स्पर्धा दोन दिवस चालणार असून यामध्ये 1सप्टेंबर रोजी होणाऱ्या टायगर हिल चॅलेंज या स्पर्धेत  60किलोमीटर, 120किलोमीटर, 160किलोमीटर रन अशा तीन प्रकारांचा समावेश आहे. तर, 2सप्टेंबर रोजी होणाऱ्या कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत  42किलोमीटर, 21किलोमीटर, 10किलोमीटर व 5 किलोमीटर रन या प्रकारांचा समावेश आहे.  स्पर्धेत पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, वाराणसी, सिलिगुडी, पश्चिम बंगाल, सिक्कीम यांसारख्या शहरातून 2000हुन अधिक स्पर्धक आपला सहभाग नोंदवितात.

स्पर्धेतील विजेत्यांना मानचिन्ह व आकर्षक भेटवस्तू पारितोषिके देण्यात येणार आहे.

‘एम.ए. रंगूनवाला’च्या डॉ. अश्विनी पै ‘मुखरोग निदान दंतशास्त्र’ विभागात विद्यापीठात प्रथम

0
पुणे : एम.डी. एस.परीक्षेत ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम.ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस’चा निकाल शंभर टक्के लागला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नासिक) ने घेतलेल्या या परीक्षेत रंगूनवाला दंत महाविद्यालयाचे सर्व ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
‘मुखरोग निदान दंतशास्त्र’ विभाग (OMDR) मध्ये याच महाविद्यालयाच्या डॉ. अश्विनी पै या विद्यार्थिनीने ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ (नासिक) मध्ये प्रथम येऊन सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. तर डॉ. श्रद्धा सुपनेकर या विद्यार्थिनीने रौप्यपदक पटकावून विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवला.
डॉ . कृष्णा कुमार (‘मुखरोग निदान दंतशास्त्र’ विभाग प्रमुख), डॉ. निखिल दिवाण यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार, रंगूनवाला दंत महाविद्यालयाच्या प्राचार्य रमणदीप दुग्गल, रजिस्ट्रार आर.ए. शेख  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विजेतेपदासाठी एफसी पुणे सिटी संघ सज्ज-गौरव मोडवेल

0

पुणे: एफसी पुणे सिटी संघाला गतवर्षी आयएसएल फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक उंचावता आला नव्हता. परंतु काही वेळा एखादे लक्ष्य साध्य करण्याकरीता जास्त काळ लागत असतो हे ध्यानात घेऊन आम्ही आमच्या संघावर विश्वास ठेवला आहे. गतवर्षी आम्ही विजेतेपदाच्या जवळ येऊन अगदी उपांत्य फेरीत पराभूत झालो होतो. यंदा मात्र विजेतेपदाचा करंडक जिंकून सर्वोच्च प्रतिष्ठा आणि सन्मान मिळविण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले. 

नव्या मौसमापूर्वी एफसी पुणे सिटी संघाच्या तयारीची आणि नव्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“सेलिब्रेटिंग फुटबॉल”, म्हणजेच सर्वार्थाने मैदानावर आणि मैदानाबाहेरही फुटबॉलचा उत्सव साजरा करणे या तत्वावर आमचा विश्वास असून आमचे चाहते हे एफसी पुणे सिटी संघाचे सर्वात मोठे बलस्थान आहेत, असे मोडवेल यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की,  नव्या मौसमासाठी संघात 7भारतीय खेळाडूंचा समावेश  असून यामध्ये विशाल कैथ, अनुज कुमार आणि कमलजीत सिंग हे 3 गोलरक्षक, आशिक कुरूनियन, निखिल पुजारी, रॉबिन सिंग या 3 विंगर्स आणि साहिल पनवर समावेश आहे. अधिकाधिक युवा खेळाडूंना वाव देण्याचे आमचे धोरण असून 18वर्षाखालील अकादमीतील 4 खेळाडू आमच्या वरिष्ठ संघात सहभागी होते. यंदाच्या मौसमात 18वर्षाखालील 5 खेळाडूंना संघात सहभागी करण्यात आले असून 4परदेशी खेळाडूंचा समावेशदेखील संघात करण्यात आला आहे.

आमच्याकडे उत्तम दर्जाचे आक्रमण असून त्यामुळे भक्कम बचावाचा समावेश करण्याची गरज आहे हे ओळखून आम्ही या 3विंगर्सचा संघात समावेश केला आहे. प्रशिक्षकांच्या बाबतीत पोपोविच सोडून गेल्यानंतर आम्ही नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहोत. या नव्या प्रशिक्षकाच्या नेमणुकीसाठी अधिक वेळ लागत असला तरी, आमच्याकडे प्रशिक्षकांची उणीव नाही. अनेक प्रशिक्षक आमच्या संपर्कात आहेत. परंतु, पुन्हा आम्ही मागच्या वेळेसारखे पेचात सापडू शकत नाही. त्यामुळे आम्ही योग्य प्रशिक्षक मिळेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नव्या प्रशिक्षकाची नेमणूक आम्ही जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आयएसएलच्या संपूर्ण मौसमातील मोस्ट व्हॅल्युएबल आणि लोकप्रिय संघ म्हणून एफसी पुणे सिटीची निवड करण्यात आली आहे, हे जाहीर करण्यात मला आनंद वाटतो. परंतु यामध्ये आमच्या चाहत्यांचा आणि पुरस्कर्त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच, संघासाठी विविध योजना राबविणाऱ्या मार्केटिंग टिमचेही मी कौतुक करू इच्छितो. पहिल्या मौसमात आम्हांला आयटी क्षेत्राकडून खेळाडू लोनवर मागवून घ्यावे लागले होते. आता हा ट्रेंड पूर्णपणे उलटला आहे. एफसी पुणे सिटी संघात सहभागी होण्यासाठी दर्जेदार खेळाडू उत्सुक असून यामुळे आमच्या खेळाडूंना फुटबॉल विश्वात ओळख मिळाली आहे. 

युवा खेळाडूंसाठी आम्ही आता नवे युथ प्रोग्राम लाँच करत असून फुटबॉलच्या माध्यमातून नव्या बाजारपेठेलाही गवसणी घालत आहोत. पुणे हि छोटी बाजारपेठ असे हटले जाते. परंतु एफसी पुणे सिटी संघाने हा ट्रेंड बदलला आहे. मॉल, मल्टिप्लेक्स, स्टेडियम तसेच विविध रॅलीज यांच्या माध्यमातून आम्ही लक्षवेधी चाहत्यांपर्यंत पोहोचलो असून हा ट्रेंड आणखी वाढतच जाणार आहे. आता आम्ही आत्मपरीक्षण केले असून आमच्यातील उणिवा दूर करून एक परिपूर्ण संघ म्हणून मैदानात उतरण्याचा आमचा निर्धार असल्याचे मोडवेल यांनी सांगितले. 

श्री कपर्दिकेश्वर श्रावणी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

0
ओतूरला यात्रा नियोजन बैठक संपन्न 
ओतूर – ओतूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर श्रावणी सोमवारी भरणाऱ्या यात्रेची तयारी पुर्ण झाली असुन यात्रा नियोजनाची बैठक ओतूर येथे नुकतीच पार पडली असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव वसंत पानसरे यांनी बोलताना दिली.
येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यात भरते.श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणाऱ्या तांदळाच्या कलात्मक पिंडी पहाण्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक  हर.. हर.. महादेवचा जयघोष करत ओतूरमध्ये दाखल होतात.श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येतात.येथील दैवत हे भक्तांना नवसाला पावत असुन भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात अशी भावना येथील भाविकांची आहे.
श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्था व समस्त ग्रामस्थ ओतूर यांच्यावतीने विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
   यात्रेनिमित्त दि.१३ अॉगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त सकाळी आठ ते अकरा शालेय विद्यार्थ्यांंच्या दिंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दि.१९ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाल,महिला,वारकरी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, दुसरा श्रावणी सोमवार दि.२० रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तिसरा श्रावणी सोमवार दि.२७ व दि.३ सप्टेबर रोजी चौथा श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे.तसेच मंगळवार दि.४ सप्टेबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिळा हंगामा व ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराला रूद्राभिषेक करून यात्रेची सांगता होणार आहे.

लोकसंख्येनुसार आरक्षण देवून टाका -पळवाटा का काढता … उदयनराजे

0

पुणे-स्वतःच्या अधिकारासाठी रस्त्यावर यावे लागते, याला हेच सर्व लोक कारणीभूत आहेत. लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन टाकायला हवे. सोयीच्या राजकारणामुळे आजवर बळी गेले त्यांना कोण कारणीभूत आहे, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या समन्वयकांची बैठक बोलावली होती. परिषदेला आलेल्या लोकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत, आंदोलनाच्या पुढील दिशा काय असावी, याबाबत यावेळी चर्चा झाली.

आरक्षणावर एवढी चर्चा का केली जाते हे कळत नाही. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तीस वर्षे झाली अजून किती वाट बघायची, असा सवाल यावेळी उदयनराजे यांनी केला.

इतर जातींना जसा न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम, धनगर समाजाची आहे. स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवला तर केसेस केल्या जातात. अजून किती अंत बघणे योग्य नाही. ही पक्षविरहित बैठक होती. कारण नसताना न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जागतिक पातळीवरील संयम पुरस्कार द्यायचा झाला तर या समजलाच द्यावा लागेल .लवकर निर्णय घ्या नाही तर उद्रेक होऊ शकतो ..असा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल …असा हि प्रश्न त्यांनी केला .

सफाई कामगारांना उच्चं न्यायालयाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी करा

0

पुणे महापालिकेच्या तक्रार निवारण समितीचे  सदस्य सतीश लालबिगे यांची मागणी

 पुणे-     सफाई कामगारांना उच्चं न्यायालयाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी करण्याची मागणी पुणे महापालिकेच्या तक्रार निवारण समितीचे  सदस्य सतीश लालबिगे यांनी केली .

     राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हत्तीबेद  हे महाराष्ट्र दौऱ्यावर पुणे भेटीवर आले असता नवीन शासकीय विश्रामगृहात त्यांच्याकडे केली . यावेळी सतीश लालबिगे यांनी सफाई कर्मचाऱ्याच्या समस्यांविषयी चर्चा केली . यावेळी सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेसाठी असणारी २५ वर्षाची अट शिथिल करून २० ते १५ वर्षापर्यंत करण्यात यावी , भ्रष्ट्राचार करणाऱ्या अधिकाऱ्याना काळ्या यादीत टाकावे तसेच त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे . तसेच सफाई कामगारांच्या  कंत्राटी पध्दतीवर चर्चा करण्यात आली .

        यावेळी कविराज संघेलिया ,पुणे महापालिकेच्या तक्रार निवारण समिती सदस्य दीपक निनारिया , प्रताप सोळंकी , मनोज पटेलीया , स्वराज्य निर्माण सेना पार्टीचे अध्यक्ष मन्नू कागडा ,  मेहेतर वाल्मिकी एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्षा परवीन लालबिगे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शिवानी लालबिगे आदी मान्यवर उपस्थित होते .