Home Blog Page 3101

व्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्य विकास आवश्यक … वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

पुणे,दि.10 :- देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्य करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे, आहे असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

            किवळे येथील सिंम्बायोसीस स्कील अँड ओपन युनिव्हरसीटीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भेट देऊन तेथील कौशल्य विकास अभ्यासक्रमावर आधारीत विविध प्रयोगशाळांची पहाणी केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सिंम्बायोसीस स्कील अँड ओपन युनिव्हरसीटीचे कुलपती डॉ.शां..मुजुमदार, कुलगुरु डॉ.स्वाती मुजुमदार यावेळी उपस्थित होते.

            विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर आधारीत शिक्षण घेणे काळाची गरज आहे. कौशल्य विकासात समयसूचकतेला महत्व आहे. जगाला जिंकण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक काम निष्ठेने करायला हवे.

            कुलपती शां..मुजुमदार यांनी, देशाच्या विविध प्रांतातील सुमारे सातशे विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत उच्च प्रतीचे शिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले.

            कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

‘संगीत सम्राट पर्व’ मधील पाहुणा कलाकार आहे आदर्शसाठी खास

0

 

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ
‘संगीत सम्राट पर्व’ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेमआणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या  टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईलीजोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत. या आठवड्यात संगीत सम्राट पर्व २ च्या मंचावर सज्ज होणारा पाहुणा कलाकार हा परीक्षक आदर्श शिंदे यांच्यासाठी खूप खास आहे. हा पाहुणा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लोकसंगीत गायक आनंद शिंदे म्हणजेच आदर्शचे वडील आहेत ८ ऑगस्ट म्हणजेच लोकप्रिय विनोदी अभिनेता दादा कोंडके यांच्या जयंती निमित्त आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आनंद शिंदे संगी
त सम्राटाच्या मंचावर सज्ज झाले. ज्यांच्यामुळे आपल्याला उत्तम आवाजाचा वारसा मिळाला तेआपले वडील गायक आनंद शिंदे यांना संगीत सम्राटाच्या मंचावर पाहून परीक्षक आदर्श शिंदे भारावून गेले. तसेच त्यांनी आपल्या बालपणीच्या वडिलांशी निगडित काही आठवणी आणि किस्से सगळ्यांसोबत शेअर केले.दिवसेंदिवस संगीत सम्राट पर्व २ मधील स्पर्धा चुरशीची आणि कठीण होत चालली आहे. त
ब्येत खराब असून देखील स्वरमय कोकण टीमची कॅप्टन जुईली जोगळेकर हिने अफलातून परफॉर्मन्स सादर केला आणि सगळ्यांची दादमिळवली. प्रत्येक आठवड्यात सगळयांची वाहवा मिळवणारी स्पर्धक हरगुन कौरने या आठवड्यात देखील तिच्या गाण्याने सगळयांची मनं जिंकली. एलिमिनेशन पुढील आठवड्यात असल्यामुळे या आठवड्यात सगळ्यांना गुणमिळवण्याची संधी मिळाली आणि सर्व टीम्सने एकमेकांना कमालीची टक्कर देत गुण कमावले.

फुलपाखरूमधील वैदेहीच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा

0

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील ‘फुलपाखरू’या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गो
ष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.
चर्चेत राहिलेली ही दोन्ही मंगळसूत्रे प्रिया कळंबे यांनी तयार केली आहे. प्रिया यांनी ज्वेलरी डिझाइनची कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. पण आवड म्हणून तयार केलेल्या या मंगळसूत्रांनी खूप पसंती मिळत आहे.
‘होणार सून..’ यामालिकेतील जान्हवीचं तीन पदरी छोटं मंगळसूत्र अनेकींना आवडलं आणि आजही त्या हे मंगळसूत्र घालताना दिसतात
. तसंच वैदेहीचं मंगळसूत्र देखील लोकप्रिय होणार अशी आशा आहे.
वैदेहीच्या मंगळसूत्राची खासियत म्हणजे टेम्पल ज्वेलरीच्या डिझाइनच्या मदतीने हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. काळ्या मण्यांवर सोनेरी पानांची वेल तयार करून मध्यभागी वाटीत डायमंड बसवण्यात आलं आहे. हेमंगळसूत्र इतर मंगळसूत्रांपेक्षा नक्कीच हटके आहे. यामुळे हे आणखी चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे.’आताच्या तरूणाईला वेस्टर्न कल्चरसोबत इंडियन कल्चरदेखील सांभाळायचं असते. लग्नानंतर मंगळसूत्र घालण्यात आजच्या मुलींना खूप कुतुहल वाटतं. पण आपल्या वेस्टर्न आऊट फिटवर हे मंगळसूत्र शोभेल असं असलं कीत्यांचा आनंद गगनात मावेनासा असतो. आणियाच कल्पनेतून हे डिझाइन तयार करण्यात आलं आहे.’असं प्रिया कळंबे सांगतात.

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो साठी ३५ हेक्टर जागा ताब्यात घेणार -२३ किलोमीटरच्या अंतरात २३ स्थानके …

0

महत्वकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित

पुणे- – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(पीएमआरडीए) ने हाती घेतलेला अत्यंत महत्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्वकांक्षी नागरी परिवहन’ (Vital important UrbanTransport Project) प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. सदर प्रकल्प खासगी विकासकांच्या माध्यमातून पीपीपीमॉडेलद्वारे राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी,व्यवसायिक मूल्य असलेल्या अंदाजे ३० ते ३५ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे.

सदर प्रकल्पास शासन निर्णय जमीन-२१५,प्र.क्र.४५/ज१/दि.१ जून २०१७ मधील तरतुदीनुसार निकडीचे सार्वजनिकप्रकल्प म्हणून शासनाने शासन निर्णय क्रमांक पीआरडी-३३१८/ प्र.क्र४९/(२)/नवि-७/दि.१८ जुलै २०१८ अन्वयेमहत्वकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच शासन निर्णयक्र.पीएमआरडी/३३१५/प्र.क्र/६९/नवि-७, दि.९ फेब्रुवारी २०१८ने सदरचा प्रकल्प बांधा, संकल्पन करा, आर्थिक पुरवठाकरा, वापरा व हस्तातंरीत करा (DBFOT) या तत्वावर मान्यता मिळालेली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या २३.३ किमी लांबीचा व २३ स्थानके असलेला मेट्रो रेल चारऑथोरिटीवाइज म्हणजेच एमआयडीसी, पीएमआरडीए, पीसीएमसी व पीएमसीच्या परिक्षेत्रातून धावणार आहे. मेट्रोच्या२३ स्टेशनसाठी मेगापोलीस सर्कल, क्वाड्रन, डोल्हेर, इन्फोसिस फेज२, विप्रो टेक्नोलॉजी फेज२, पाल इंडिया,शिवाजीचौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडीअम, निकमार्क, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव,कृषी अनुसंधान, सकाळनगर, पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषीविदयापीठ, शिवाजीनगर, सिविलकोर्ट या जमिनीचास्टेशनसाठी व कारडेपो व त्याच्या सेवा रस्त्यासाठी माण ता. मुळशी येथील जमिनीचा समावेश आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या ताब्यातील जमिनीपैकी आवश्यक लागणारे जमिनीच्या क्षेत्राचा ताबा मिळावा याबाबतचे भूसंपादनाचे प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी पुणे यांना सादरकरण्यात येणार आहेत. शासनाने दि. १८ जुलै २०१८ अन्वये घोषित केलेल्या निकडीचा प्रकल्प जाहीर झाल्याने जिल्हाधिकारी यांना शासन निर्णय ०१ जून २०१७ अन्वये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागाचे आगाऊ ताबे जिल्हाअधिकारी यांचेकडून पीएमआरडीएला देता येतील. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल व सदरप्रकल्प मार्गी लागण्यास चालना मिळेल, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले आहे.

राधिका बनणार ए.एल.एफ. कंपनीची नवी मालकीण

0

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट्स आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नवं वळण!

गुरुनाथच्या हलगर्जीपणामुळे ए.एल.एफ. कंपनी देशोधडीला लागली आहे. त्याला शोकॉज नोटीस देऊन देखील कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये काही फारसा फरक पडला नाही आणि त्यामुळेच गुरूच्या ऑफिसमध्ये त्याचे दोन्ही बॉस चांगलेच संतापले असून ते त्याला धारेवर धरतात. या सगळ्या काटकटीत गुरु राजीनामा देणार असे बोलतो पण त्याच्या या बोलण्याला न जुमानता त्याचे बॉस त्याला नुकसान भरपाई करण्याची चेतावनी देतात. ए.एल.एफ.च्या ढासळत्या स्थितीमध्ये कंपनीचे सध्याचे भागीदार ए.एल.एफ.चे शेअर्स एखाद्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीला विकायचं ठरवतात. त्यासाठी ते ३ कंपनी शॉर्टलिस्ट करतात त्यातील एक राधिका मसाले ही एक आहे. राधिकाला ही ऑफर मिळाल्यावर तिच्याकडे गुरुनाथचा अहंकार ठेचायची एक चांगली संधीच मिळाली आहे. आता राधिका ए.एल.एफ.ची नवीन मालकीण होऊन कशाप्रकारे गुरुनाथ आणि शनायाला तिच्या तालावर नाचवते हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

जगावेगळी प्रेमकहाणी ‘तुला पाहते रे’ १३ ऑगस्टपासून

0

झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध व रंजक विषयांची योग्यरीत्या हाताळणी आणि सादरीकरणातील नावीन्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेचं गेल्या २० वर्षांपासून भरभरून मनोरंजन करत आली आहे. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वेगळ्या धाटणीची मालिका प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेकडे पररतो आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी ‘तुला पाहते रे’ ही नवी मालिका १३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी ‘तुला पाहते रे’ ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमॅन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीच्या वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपरंतर होतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. मालिकेचे सर्व प्रोमो पाहता मालिकेत भव्यता दिसून येते. या मालिकेतून पुण्याची ‘गायत्री दातार’ ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

तेव्हा विक्रम आणि ईशाची परिकथेतील प्रेमकहाणी पाहायला विसरू नका १३ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!

 

सायप्रसच्या भूमीवर 10 दिवस – ‘ट्रॅव्हल एक्सपी’ची पाच भागांची मालिका

मुंबई-आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांची माहिती ट्रॅव्हल एक्सपी वाहिनीतर्फे सादर केली जाणार आहे. ‘टेन डेज सायप्रस’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या सफरीचे चित्रिकरण‘ट्रॅव्हल एक्सपी’ने अत्याधुनिक ‘फोर-के’ तंत्रज्ञानाने केले असून ‘एचडी’ स्वरुपात त्याचे प्रक्षेपण होईल. ट्रॅव्हल एक्सपी हे जगातील सर्वात आघाडीचे आणि 9 कोटी घरांमध्ये आवडीने पाहिले जाणारे प्रवासवर्णन क्षेत्रातील टीव्ही चॅनेल आहे.

‘ट्रॅव्हल एक्सपी’च्या अॅंकर सब्रिना चॅकिसी या ‘टेन डेज सायप्रस’ सादर करणार आहेत. त्या मुळात ब्रिटीश टेलिव्हिजनवरील सुप्रसिध्द सादरकर्त्या आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ‘द ब्रिटीश फॅशन अॅवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे थेट सादरीकरण त्यांनी नुकतेच केले. तसेच’ द गोल्डन ग्लोब’मध्ये लेडी गागा आणि ख्रिस्तोफर हेली यांच्या सब्रिना यांनी घेतलेल्या मुलाखतीही गाजल्या. सब्रिना या नेहमीच विविध वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करीत असतात, त्याचप्रमाणे बूट्स, ग्लॉसी बॉक्स,लेगो यासारख्या ब्रॅन्ड्सच्या जाहिरांतींना आपला आवाज पुरवीत असतात. ‘व्हाईब 197.6 एफएम’ या रेडिओवर ब्रेकफास्ट शो सादर करण्याबद्दल त्या सर्वांना परिचित आहेत.

प्रवासाची आवड असणाऱ्यांना आणि खाद्यप्रेमींना सायप्रसमधील विविध ठिकाणांची व खाद्यपदार्थांच्या चवींची सफर सब्रिना घडवून आणणार आहेत. ग्रीक पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या आणि संस्कृतीचा समृध्द वारसा लाभलेल्या अनेक जुन्या शहरांमध्ये फेरफटका मारण्याचा अनुभव दर्शकांना सब्रिना देणार आहेत.

या कार्यक्रमाबाबत ट्रॅव्हल एक्सपीच्या संचालिका निशा छोतानी म्हणाल्या, ‘टेन डेज सायप्रस’ हा एकमेवाद्वितीय व अनोखा कार्यक्रम सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमात शंभर टक्के खरे अनुभव मांडण्यात आले आहेत आणि ‘फोर-के’ व ‘एचडी’ या तंत्रज्ञानामुळे या अनुभवांचा आनंद द्विगुणित होणार आहे. भारतात हा कार्यक्रम दि. 12 ऑगस्ट रोजी ट्रॅव्हल एक्सपी वाहिनीवर प्रक्षेपित होईल. ग्रीक पुराणकथांमध्ये उल्लेखलेल्या सायप्रसमधील शहरांचा इतिहास व संस्कृती, तसेच तेथील सुंदर समुद्रकिनारे यांचा अविस्मरणीय अनुभव दर्शकांना यातून मिळेल.

सायप्रसचे उच्चायुक्त एजिस लॉयझू म्हणाले, ‘ट्रॅव्हल एक्सपी’ने एक संपूर्ण कार्यक्रम आमच्या सुंदर भूमीत चित्रित केला, याचा आम्हाला आनंद आहे. या कार्यक्रमातून पर्यटकांना आमच्या देशातील अदभूत ठिकाणांची माहिती मिळेल व ती प्रत्यक्ष पाहण्याची आणि सायप्रसमधील जीवनशैली अनुभवण्याची संधी ते अनुभवतील, असा मला विश्वास वाटतो. ‘टेन डेज सायप्रस’ हा कार्यक्रम सर्वांनी पाहावा आणि सायप्रसच्या प्रेमात पडावे, असा आमचा आग्रह आहे.

‘टेन डेज सायप्रस’ हा कार्यक्रम पाच भागांमध्ये सादर होईल. लारनाका या शहराचा यात समावेश असेल. लाझारुस या संताचे वास्तव्य असणारे व दहा हजार वर्षांचा इतिहास असणारे हे शहर जगातील सर्वात जुन्या अशा वीस शहरांमध्ये मोडते.

दुसऱ्या भागात निकोशिया या सायप्रसच्या सर्वात मोठ्या शहराची वैशिष्ट्ये दाखवण्यात येतील. निकोशिया ही गेली 1100 वर्षे.सायप्रसची राजधानी आहे. मध्ययुगीन घरे व अवशेष जतन केलेले फिकार्दू हे गाव आणि ट्रूडूज डोंगररांगा यांचे विलोभनीय दर्शनही यामध्ये होईल.

खिरोकितिया या तिसऱ्या भागात ट्रूडूज डोंगरांकडे जाणारा मार्ग अणि त्यावरील ‘युनेस्को’ने जतन करून ठेवलेली चर्चेस पाहायला मिळतील. यातून ग्रीक संस्कृती व इतिहास यांची काही माहिती दर्शकांना होईल, तसेच पॅफोज येथील सुंदर समुद्रकिनारेही बघता येतील.

कार्यक्रमाच्या पुढील भागात ग्रीक पुराणकथा आणि रोमन तत्वज्ञान यांची अधिक माहिती देताना पॅफोज पुरातत्व पार्कच्या कहाण्या सादर करण्यात येतील. यावेळी लिमासोल या एेतिहासिक शहराचा फेरफटका आणि भूमध्य सागरातील ‘काईट सर्फिंग’ची मजा दर्शकांना अनुभवता येणार आहे.

कार्यक्रमाच्या अंतिम भागात अकामाज नॅशनल पार्क आणि तेथील जैववैविध्य सादर करण्यात येईल. सायप्रसमधील प्रसिध्द असलेल्या गाढवांच्या अभयारण्यात फेरफटका आणि या देशातील लज्जतदार खाद्यपदार्थांची रेसिपी या गोष्टीही दर्शकांना आकर्षित करतील.

ट्रॅव्हलएक्सपी’विषयी:

ट्रॅव्हलएक्सपी हा ‘सेलिब्रेटीज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ब्रिटनमधील ‘मिडिया वर्ल्डवाइड लिमिटेड’ यांचा संयुक्त उपक्रम आहे. प्रक्षेपण, जाहिरात, मीडिया कन्सल्टिंग आणि इतर संबंधित सेवा या कंपन्या देतात. ही कंपनी 10 (दहा) उपग्रह वाहिन्या चालवते. ट्रॅव्हलएक्सपी ही जगातील आघाडीचा प्रवासी वाहिनी आहे. उत्तर अमेरिका व युरोपमध्ये या वाहिनीने ट्रॅव्हलएक्सपी 4-के हे जगातील पहिले ‘4-के एचडीआर चॅनेल’ एसईएस व इयूटेलसॅट यांच्या सहकार्याने सुरू केले आहे

घरांच्या विक्रीत तुलनात्मक वाढ अहवालाचे निष्कर्ष; बर्लिनला क्रेडाई नॅशनलची परिषद

0
पुणे: गेले अनेक महिने मंदीच्या सावटाखाली असणारे बांधकाम क्षेत्र आता कात टाकत आहे. मागील वर्षांचा आढावा घेता प्रमुख ७ शहरांमध्ये उभारण्यात येत असलेल्या घरांच्या विक्रीत तुलनात्मक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातही घरांच्या विक्रीत अल्प वृद्धी झाली आहे. यामुळे विकासकांमध्ये नवी आशा निर्माण होत असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या क्रेडाई नॅशनलच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा आढावा घेण्यात आला. बर्लिन येथे ही तीन दिवसीय परिषद पार पडली.
क्रेडाईच्या या १८ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अधिवेशनात क्रेडाई-जेएलएल, क्रेडाई-कुशमन आणि वेकफील्ड हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी क्रेडाई-जेएलएलच्या अहवालानुसार, घरांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तसेच क्रेडाई-कुशमन आणि वेकफील्डतर्फे सादर झालेल्या आणखी अहवालानुसार, बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीत १०,०८० कोटी रुपयांइतकी वाढ झाली असल्याचेही निर्देशनात आणले गेले. या परिषदेत क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जाक्षेश शहा, उपाध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासह
१००० पेक्षा अधिक सदस्य, विकसक आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ञ, वरिष्ठ व्यावसायिक आणि सहायक उद्योजक सहभागी झाले होते.
यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला ‘क्रेडाई महाराष्ट्रा’ने कायमच प्रोत्साहन दिले असल्याने सांगत त्याचा बांधकाम क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले. सरकारनेही अशा प्रकल्पांच्या निर्मितीवर विशेष सवलत दिल्याने त्याचा आगामी काळात निश्चितच फायदा होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
क्रेडाई-जेएलएलच्या अहवालाप्रमाणे, गुंतवणुकीशी संबंधित रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढती मागणी दोन घटकांवर आधारित असू शकते. ‘रेरा’च्या अंमलबजावणीमुळे खरेदीदारांचा आत्मविश्वास प्रथमच वाढला आहे. आणि दुसरी बाब म्हणजे बहुतांश राज्यांत भांडवली मूल्यांकन स्थिर ठेवल्याने घर खरेदीला मागणी वाढताना दिसत असल्याचेही कटारिया यांनी यावेळी नमूद केले. तसेच मुंबईत सर्वाधिक मागणी वाढली असून त्या खालोखाल बंगळुरूमध्येही घरांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातही २ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
‘क्रेडाई’ने आपले लक्ष्य समोर ठेवूनच कायम आपली वाटचाल केली आहे. सर्वाधिक रोजगार निर्मिती देणाऱ्या या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ‘क्रेडाई’ कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेच्या या दृष्टिकोनातूनमुळेच बांधकाम क्षेत्राला पुनरुज्जीवन मिळण्यास मदत झाली असून भविष्यासाठी एक मजबूत पाया ‘क्रेडाई’ने रचला आहे. या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणे आणि या क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न आघाडीवर आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही परिषद असल्याचे मत यावेळी सतीश मगर यांनी व्यक्त केले. बांधकाम क्षेत्रातील अनेक विषयांवर विस्तृत चर्चा या परिषदेतून झाल्याने ही परिषद फलदायी ठरली असल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६६८ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

0

पुणे-श्री संत  शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६६८ व्या समाधी सोहळ्यानिमित्त  श्री नामदेव शिंपी समाज पुणे लष्कर विभागाच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले . यावेळी श्री संत शिरोमणी महाराज प्रतिमेचे पूजन व पादुकांची पूजा विनोद रमाकांत खोले व संगीता खोले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर आरती श्री नामदेव शिंपी समाज , पुणे लष्कर विभाग अध्यक्ष प्रदीप खोले यांच्याहस्ते करण्यात आली . त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी सुबोध भावकर , किशोर निखळ , संजय फटके , ऍड. मोहन भावकर , सुभाष काळे , मुरारी हिरवे , श्रीकांत काळे , राजन पोटे , निरेन हिरवे , सिध्दार्थ भावकर , संजय लचके , सुजय खोले , मनोज शिंदेकर , सुधीर ढवळे , अरुण भांबुरे आदी मान्यवर व शिंपी समाज बांधव उपस्थित होते .

या समाधी सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले , पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे उपाध्यक्ष नंदू बिडकर , संचालक पोपट गायकवाड , नगरसेविका स्मिता वस्ते , नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेचे कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय नेवासकर , पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके , सुभाष पांढरकामे आदी मान्यवर उपस्थित होते .

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पुणे लष्कर भागात कडकडीत बंद

0

पुणे-मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पुणे लष्कर भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता . लष्कर भागातील गजबजलेला महात्मा गांधी रोडवरील सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली होती . लष्कर भागातील प्रसिध्द असलेली इराणी हॉटेल्देखील बंद मध्ये सहभागी झाली होती . महात्मा गांधी रोड , ईस्ट स्ट्रीट , साचापीर स्ट्रीट , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , रावसाहेब केदारी रस्ता , सेंटर स्ट्रीट , जान मोहम्मद स्ट्रीट , ताबूत स्ट्रीट , बुटी स्ट्रीटवरील सर्व बाजारपेठ व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवली होती .

लाल देवळाच्याजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर प्रवासी वाहतूक करणारी चार चाकी वाहनाची काचा दुपारच्या सुमारास फोडण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी मार्केट व कुंभारबावडी बंद ठेवण्यात आली होती . अनुचित प्रकार घडू नये पोलीस बंदोबस्त चौकाचौकांमध्ये ठेवण्यात आला होता .

यावेळी  सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट भागातील कार्यकर्ते  अंनत गव्हाणे ,निलेश कणसे , राजेंद्र म्हस्केपाटील ,जितेंद्र म्हस्के ,  विनायक काटकर , माधव काटकर , विजय महाडिक ,  अनिल निंबाळकर , विशाल मोरे , सुमित गावडे, अरविंद निंबाळकर , राहुल गव्हाणे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते .

बजमे रेहबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम अमीर शेख यांनी बंदला पाठिंबा दिला . यावेळी बजमे रेहबर कमिटीचे उपाध्यक्ष फैय्याज खान , सचिव इरफान मुल्ला , खजिनदार ऍड. अमित चव्हाण , फैय्याज शेख आदींनी बंदला पाठिंबा दिला .

पुण्यात कडकडीत बंद :मराठा आरक्षण

0

पुणे- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज पुण्यात शहर आणि परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला . लक्ष्मी रोड ,मार्केट यार्ड सह उपनगरातील व्यवहार हि बंद होते . मार्केट यार्ड परिसरात आज आप्पासाहेब गायकवाड ,विजय हिंगणे, विलास भुजबळ,संतोष नांगरे ,गणेश घुले,बाळासाहेब अमराळे आदी व्यापाऱ्यांनी आपल्या सहकारी व्यापारी आणि कामगार बंधूंना बरोबर घेवून मोर्चा काढला. गणराजाची आरती करून कैलासवासी काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहून सरकारने आता अंत पाहू नये ..वेळकाढूपणा करू नये असे आव्हान करण्यात आले . पहा हा व्हिडीओ रिपोर्ट …

देशातील अघोषित आणीबाणी विरुद्ध लढण्याची गरज : यशवंत सिन्हा

0
ऑगस्ट क्रांती दिनी डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित
पुणे :’ देशात अघोषित आणीबाणी आहे,संसदीय व्यवस्थांचे , संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन केले गेले आहे, सर्वांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यात येत आहे . राजकीय विरोधकांना बदनाम करून संपवण्यात येत आहे. या अघोषित आणीबाणी विरुद्ध लढले पाहिजे आणि देश जिवंत आहे, हे दाखवून देण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन आज माजी केंद्रीय  अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.
‘ मोदींवर बोलण्याऐवजी मुद्यांवर इथुन पुढे बोलले पाहिजे.पुण्याने देशाला दिशा द्यावी आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात पुढाकार घ्यावा, नागरिक म्हणून  आता  गप्प राहता कामा नये. सव्वाशे कोटी जनतेने मनात आणले तर १९७७ सारखे निकाल येऊ शकतात ,असेही ते म्हणाले.
ते डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक युवक क्रांती दल) लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
 हा कार्यक्रम आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला.
क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, ‘युवक क्रांती दल’ आणि ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांच्या संयुक्तविद्यमाने या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंत सिन्हा म्हणाले, ” आणीबाणी विरोधी आंदोलनात डॉ. सप्तर्षी यांची भूमिका महत्वाची होती.आज पुन्हा तशीच परिस्थिती आहे. मागील वेळच्या आणीबाणीला संविधानाचा आधार होता.पण, आता चतुराईने  अघोषित आणीबाणी राबवली जात आहे.
संसदीय व्यवस्था, तपास व्यवस्था, माध्यमे ताब्यात घेऊन नाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आताच्या आणीबाणीत धर्मवाद ( सांप्रदायिकता )आहे. अनेक व्यवस्था शरण गेल्यासारखी अवस्था आहे.
कॅबिनेट मंत्रीमंडळ व्यवस्थेची दुर्दशा झालेली आहे, असे सांगून सिन्हा यांनी उदाहरणे दिली. सरकारमधल्या क्रमांक दोनच्या मंत्र्याला , केंद्रीय गृहमंत्र्याला महबुबा मुक्ती सरकारचा पाठिंबा काढल्याची माहिती नसते. नागा विषयक कराराची माहितीही गृहमंत्र्याला नव्हती. परराष्ट्रमंत्र्यांना परदेश दौऱ्यात, कामकाजात सामावून घेतले जात नाही. त्यांचे अशोभनीय भाषेत ट्रोलिंग केले जाते. अर्थमंत्र्यांना नोटा बंदीच्या निर्णयाची माहिती नव्हती. राफेल निर्णयाची माहिती संरक्षण मंत्र्यांना नसते. कॅबिनेट व्यवस्था ‘ग्रुप ऑफ ऑर्डर्ली ‘ झाली आहे. एकच जण निर्णय घेत आहे, त्याचे श्रेय -अप श्रेय घेत आहे.
माध्यमांवरही अघोषित बंधने आहेत. भाजपा कार्यालयातून निर्देश सुटतात. पुण्यप्रसून वाजपेयी एबीपी न्यूज मधून काढण्यात आल्यावर त्यांचे म्हणणे माध्यमांनी मांडले नाही.पत्रकारांना आपल्या मुलाबाळांची काळजी वाटते, म्हणून ते आमचे म्हणणे छापू शकत नाहीत, असे मला दिल्ली पत्रकार परिषदेनंतर सांगण्यात आले.
पंतप्रधानांसमोर माध्यमांनी लोटांगण घातले आहे.दुसऱ्याच्या ‘ मनची बात ‘ ऐकायला पंतप्रधानांना वेळ नाही.
संसद व्यवस्थेला असहाय अवस्थेत पोहोचवण्यात आले आहे. संसद आता अल्पकाळ चालवली जाते. आताचे पावसाळी अधिवेशन केवळ १८ दिवस चालले.
न्यायव्यवस्थेलाही आपल्या मर्जीने नाचवले जात आहे.ईव्हीएम यंत्राविरुद्ध निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांची मागणी आहे. गुजरात, हिमाचल चे निकाल तारीख ठरवण्याची बाब संशयास्पद आहे. निवडणूक आयोग निःपक्ष काम करेल याची शक्यता कमी आहे.
रिझर्व्ह बॅंकेलाही नोटा बंदी प्रकरणात वाकवण्यात आले. आताच्या दोन नेमणूकांवरुन या व्यवस्थेचेही अवमूल्यन झाल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त केले.
अप्पा अनारसे, सचिन पांडुळे,जांबुवंत मनोहर, सुदर्शन चखाले, रवींद्र धनक,रवी लाटे, व्यासपिठावर उपस्थित होते.
या प्रसंगी सभागृहात आमदार जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, संजय बालगुडे, अन्वर राजन (महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव),  संजय बालगुडे,  आदी उपस्थित होते
युक्रांद ‘ चे सचिव संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला यशवंत सिन्हा , डॉ.कुमार सप्तर्षी यांनी अभिवादन केले.
ही तिसरी आवृत्ती ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांनी प्रकाशित केली आहे.
पुस्तकाविषयी माहिती देताना डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘१९७० च्या दशकात अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून तुरुंगात आलेले अनेक अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत चे लेखन ‘येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ या पुस्तकात आहे.’
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ यशवंत सिन्हा, आणि माझे गुरू हे  जयप्रकाश नारायण होते. म्हणून प्रकाशन समारंभाला त्यांनी पाचारण केले. आज सर्व जातींचे लष्करीकरण होऊ पाहत आहे. महाराष्ट्रात मराठा समाज अग्रदूत आहे. त्यामुळे आजचे आंदोलन हिंसक होईल, किंवा आमच्या कार्यक्रमात अडथळा येईल असे वाटत नव्हते. तसेच झाले, आणि निर्वेध पणे कार्यक्रम पार पडला.
देशात फॅसिस्ट राजवट असल्यासारखे वातावरण आहे, अशावेळी सत्याग्रहाच्या मार्गाने लढले पाहिजे. हे केंद्रातील सरकार गेले पाहिजे, या भूमिकेपर्यंत आम्ही आलो आहोत. काँग्रेसला भाजप विरोधी लढाई पेलवत नसेल तर सर्व भाजप विरोधी विचारांनी एकत्र यायला हवे.
डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ‘ येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ हे पुस्तक युक्रांद कार्यकर्त्यांसाठी पाठयपुस्तक आहे. व्यवस्थेच्या प्रतिनिधी असणारे मंत्री, पोलिस, जेलची भीती घालवण्याचे काम या पुस्तकाने केले. मराठी साहित्यातील हे महत्वाचे पुस्तक आहे. आताच्या काळात परिवर्तनाच्या प्रक्रियेत हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे

0

मुंबई, दि. ९ : राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुपारपासून मागे घेत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीने आज मंत्रालयात जाहीर केले.

आज दुपारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी शासन सकारात्मक असून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही  केली जाईल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले.  अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी दिली. त्यानुसार आणि मराठा आरक्षणासाठी असलेला बंद आणि रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून संप मागे घेत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

            यावेळी  सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौण्ड, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी, शिक्षक समिती, शिक्षक भारती, टीडीएफ, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

हातमाग महामंडळ निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 9 : हातमाग महामंडळाच्या निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

          सह्याद्री अतिथीगृह येथे हातमाग कामगारांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी वेतनश्रेणीबाबत विस्तृत चर्चा झाली.

          मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले, हातमाग कामगारांचे प्रश्न आर्थिक बाबींशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांची देणी देण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक आहे. 5 व्या वेतन आयोगाप्रमाणे कामगारांची वेतननिश्चिती करुन त्यांची देणी द्यावी. 2008 पूर्वी जे कामगार निवृत्त झाले त्यांनाही आर्थिक फरक द्यावा. या प्रकरणी  न्यायालयाने  केलेल्या सूचनेनुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

          या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, आमदार विकास कुंभारे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु. पी. एस मदान, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश नगरधनकर, सचिव जनार्धन जुनघरे उपस्थित होते.

मराठा आरक्षण ; पुण्यातील पेट्रोलपंपावर जेव्हा आंदोलकांची बाईक रॅॅली जाते … (पहा व्हिडीओ)

0

पुणे- मराठा आरक्षणासाठी आजच्या महाराष्ट्र बंदला पुण्यात पुरेपूर प्रतिसाद मिळाला .औषधांची दुकाने ,रुग्णालये ,आणि काही ठिकाणी पेट्रोल पंप सकाळी सुरु होते. असाच एक क्षण टिपला आहे ..पुणे सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावरील .. जेव्हा बिबवेवाडीतून आलेली आंदोलकांची बाईक रॅॅली  या पंपावर जाते …. पहा व्हिडीओ…