Home Blog Page 31

अच्युत गोडबोले , डॉ अभिजीत व डॉ मनीषा सोनवणे-‘डाॅक्टर्स फाॅर बेगर्स’, नेत्रा पाटकर-झेप संस्था  यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार जाहीर

पुणे प्रार्थना समाज वार्षिकोत्सव : संस्थेचे १५६ व्या वर्षात पदार्पण
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी १५५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. अच्युत गोडबोले, डाॅ. अभिजीत सोनवणे आणि डाॅ. मनीषा सोनावणे, डाॅक्टर्स फाॅर बेगर्स ,यांच्या सोहम संस्थेला आणि नेत्रा पाटकर यांच्या झेप संस्थेला यंदाच्या वार्षिकोत्सव सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे धनराज निंबाळकर उपस्थित होते. डेक्कन महाविद्यालयाचे माजी संचालक पद्मश्री डाॅ. के. पद्दय्या यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

अच्युत गोडबोले यांना डॉ रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठीतून विज्ञानासहित अनेक विषयांद्वारे विपुल साहित्य निर्मिती केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

डॉ. अभिजीत सोनवणे व डॉ. मनीषा सोनवणे ,’डॉक्टर्स फॉर बेगर्स’,सोहम ट्रस्ट या संस्थेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील सामंजस्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो. याही पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.

‘झेप रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन’ या संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर यांची डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष गरज असलेल्या बालकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदा अकरावे वर्ष आहे. रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे तीनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

डॉ. दिलीप जोग म्हणाले, रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बुधवार पेठेतील हरिमंदिर, पुणे प्रार्थना समाजात उपक्रमोपासना होणार आहे. शनिवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धर्मविषयक विचार’ या विषयावर सार्वजनिक सभेचे अध्यक्ष विद्याधर नारगोलकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दिपोत्सव होईल. रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ईश्वरोपासना होणार आहे. त्यानंतर नमिता मुजुमदार सह बारे खुर्द कीर्तन मंडळ, सायलीताई महाराज कीर्तन मंडळ यांचे कीर्तन होणार आहे. हे कार्यक्रम बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजाच्या हरिमंदिरात होणार आहेत.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रजनी फाउंडेशनकडून आदिवासी समुदायासाठी धान्यदान उपक्रम

0

रिलायन्स जनरल इन्शुरन्सने रजनी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रातील फुलोरेपाडा येथे आदिवासी समुदायासाठी धान्यदान उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. “एक छोटा सा दान, बनाए देश महान” या भावनेने प्रेरित या उपक्रमाअंतर्गत कुटुंबांना डाळ, तांदूळ आणि मूग यांसारख्या आवश्यक अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.

आमच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, ज्यामुळे रिलायन्स जनरल इन्शुरन्सची समाज कल्याणाप्रती असलेली दृढ बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आणि सकारात्मक, दीर्घकालीन सामाजिक परिणाम साध्य करण्यात मदत झाली.

गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरली :मंडळ अध्यक्षाला दोन दिवसांची साधी कैद आणि १ हजाराचा दंड

पुणे- लेझर आणि बिम लाईटने डोळ्यांना अपाय होऊ शकतो अशा लाईटचा उधळ सार्वजनिक वापर अपघातही घडवून आणू शकतो यामुळे त्यास बंदी असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित लेझर आणि बिम लाईटचा वापर केल्याप्रकरणी भैरवनाथ मित्र मंडळाचे (वैदवस्ती, पिंपळे गुरव) अध्यक्ष गोपी पंढरीनाथ लोखंडे (वय ३४) यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यांना १ हजार रुपये दंड आणि २ दिवसांची साधी कैद ठोठावण्यात आली आहे.कर्णकर्कश्श ध्वनी क्षेपक वापरून लहानगी मुले ,वृद्ध नागरिक ,रुग्ण यांना आणि ज्यांना आवश्यक नाही अशांना त्रासदायी वर्तन रस्तोरस्ती करणाऱ्या मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना देखील अशा प्रकारे गुन्हे , खटले दाखल झाले तर जेलची हवा खावी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १६३ अंतर्गत संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात प्रखर बिम लाईट व लेझर लाईटचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित केला होता. याबाबत सर्व गणेश मंडळांना लेखी आणि तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या.या आदेशाचे उल्लंघन करत, ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.३० ते रात्री ११.४५ या वेळेत पिंपळे गुरव परिसरात भैरवनाथ मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना इजा पोहोचेल अशा तीव्र लेझर व बिम लाईटचा वापर करण्यात आला.याची दखल घेऊन सांगवी पोलिस ठाण्यात बीएनएसएस कलम २२३ (तत्कालीन भादवि कलम १८८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सांगवी पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपी गोपी लोखंडे यांना दोषी ठरवले.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-१) संदिप आटोळे, सहाय्यक आयुक्त शशिकांत महावरकर आणि सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोनि अमोल नांदेकर, पोउनि रोहित पाटील, विजय शेलार, पोहवा विशाल चौधरी, प्रमोद जराड, तुषार साळुंखे यांच्या पथकाने केली.पोलिस उपायुक्त संदिप आटोळे यांनी सांगितले की, भविष्यातही अशा प्रतिबंधित लेझर व बिम लाईटचा वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी आणि मंडळांनी पोलिस आदेशांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली:अक्षय कुमारचा मंत्र

; पुण्यातून मोठ्या प्रमाणावर खेळाडू घडविण्याचा मान्यवरांचा निर्धार

खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता; विजेत्यांचा गौरव

पुणे, ता. २७ : ‘लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून ४४ हजार खेळाडू मैदानात उतरतात, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूच उत्तम आरोग्य घडत असते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केले. त्याने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खेळाला महत्त्व दिल्याबद्दल अभिनंदनही केले.
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे समारोप झाला. मुरलीधर मोहोळ यांनी भारतमातेची प्रतिमा देऊन अक्षयकुमारचा सत्कार केला. या कार्यक्रमात विजेत्या चार हजार खेळाडूंना गौरविण्यात आले. अक्षय कुमार यांनी लहान खेळाडूंशी संवादही साधला. अक्षय कुमार आणि खासदार मुरलीधर मोहोळ सायकल चालवत व्यासपीठाजवळ आले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, खेलरत्न पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, मुख्य समन्वयक मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त टेनिसपटू नितीन कीर्तने, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार या आजी-माजी खेळाडूंसह प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, सचिन भोसले, श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांना खेळासाठी पाठिंबा द्या
अक्षय कुमार म्हणाला, ‘खेळाडूंआधी पालकांचे आभार. त्यांनी मुलांना खेळासाठी पाठिंबा दिला. माझे वडील मला नेहमी म्हणायचे. सकाळी लवकर उठ, रात्री लवकर झोप. तो मंत्र मी आजही पाळला आहे. उत्तम आरोग्य सर्वांत जास्त गरजेचे आहे.’ या वेळी ४४ हजार खेळाडू क्रीडा महोत्सवात सहभागी झाले. पुढच्या वर्षी एक लाख खेळाडूंचा यात सहभाग असायला हवा, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यातील क्रीडा संस्कृती वाढवायची : मोहोळ
खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘विकसीत भारत हा बलवान असला पाहिजे. त्यासाठी फिट इंडिया, क्रीडा महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ३७ क्रीडा प्रकारांत २९ ठिकाणी स्पर्धा घेतल्या. यात ४४ हजार खेळाडू सहभागी झाले. याबाबत सर्व खेळाडू, संघटनांचे आभार. पुण्याला क्रीडा संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे. ते समृद्ध करणे. ते वाढवणे हा या स्पर्धा आयोजनामागील उद्देश होता. या स्पर्धांमधून आणि तुमच्यातूनच भविष्यातील अंजली भागवत, शांताराम जाधव होतील. आज शहराचे नेतृत्व केले, उद्या राज्याच्या नेतृत्व कराल, देशाचे नेतृत्व कराल.’ हा जगन्नाथाचा रथ ओढवून नेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे, असे सांगायलाही मोहोळ विसरले नाहीत.

पंच परिवर्तनामुळे वैभव
अंजली भागवत म्हणाल्या, ‘तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला चांगले व्यासपीठ मिळत आहेत. आम्हाला असे व्यासपीठच मिळायचे नाहीत. दर दिवशी स्पर्धेची तयारी कराल, तेव्हा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकाल. दर वर्षी या स्पर्धा व्हाव्यात, अशी माझी इच्छा आहे. पुण्यातूनच आपल्याला जास्तीत जास्त अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कारप्राप्त खेळाडू घडवायचे आहेत.’
डॉ. प्रवीण दबडघाव म्हणाले, ‘खेळ हा आनंद देणारा असतो. खेळामुळे सर्व जण एकत्र येतात. विषमता घालवायची असले, तर खेळ हे उत्तम व्यासपीठ आहे. खेळामुळे एक कुटुंब तयार होते. खेळात आपण पर्यावरणाचाही विचार करीत असतो. स्वदेशीचा विचार करीत असतो. नागरिक शिष्टाचाराचा विचार करीत असतो. या सर्व गोष्टी भारताला जागतिक स्तरावर अव्वल होण्यासाठी महत्त्वाच्या असतात. याला पंच परिवर्तन म्हणतात. हे देशाला वैभव मिळवून देऊ. आणि हे खेळातूच येते.’

पुण्यातील कौशल्यावर चर्चा
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘२०१४ पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांचा आग्रह धरला होता. त्यांनी कला, क्रीडा, शेती, नवीन तंत्रज्ञान असे चार प्रकारचे महोत्सव सुचवले होते. मोहोळ यांनी क्रीडा महोत्सवाला सुरुवात केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कुठेही गडबड झाली नाही. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा झाल्या. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन.’ सरकार खेळाबाबत मोठे निर्णय घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे; त्याचबरोबर नोकरीही द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर खेळाडू निर्माण व्हावे, यासाठीच हा उपक्रम आहे. या यशावर थांबू नका. आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजवायचे आहे. पुण्यातील कौशल्य जागतिक स्तरावर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

विद्यार्थी सहाय्यक समितीसारख्या संस्था महाराष्ट्राचे भूषण

चांगल्या कामासाठी मदत मागा; दानशूर सढळ हाताने देतात

डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन; दिवाळीच्या सुटीत विद्यार्थ्यांनी संकलित केलेला निधी संस्थेकडे सुपूर्त

पुणे : “चांगल्या कामासाठी निधी संकलन सामाजिक अभिसरणाचा महत्वपूर्ण घटक आहे. संस्थेच्या कार्याला पुढे घेऊन जाणारा हा उपक्रम कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. त्यामुळे चांगल्या कामासाठी मदत मागायला कधीही लाजू नका. निर्मळ मनाने मागितलेली मदत सढळ हाताने देणारे दानशूर समाजात आहेत,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

सामाजिक जाणिवेतून दिवाळी सुटीत आपल्या गावी आणि परिसरात संस्थेसाठी संकलित केलेला निधी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी साहाय्यक समितीकडे सुपूर्त केला. समितीमधील १३०० विद्यार्थ्यांनी जवळपास २५ लाखांचा निधी संकलित केला आहे. संस्थेच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात आयोजित कार्यक्रमात समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, कायम विश्वस्त तुकाराम गायकवाड, सहाय्य संकलन उपसमितीचे अध्यक्ष प्रदीप मांडके, वसतिगृह उपसमिती अध्यक्ष दिनकर वैद्य, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी व मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार आदी उपस्थित होते.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “समाज घडवणाऱ्या डेक्कन कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधक मंडळ, भांडारकर इन्स्टिट्यूट याप्रमाणेच विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य आहे. या संस्था महाराष्ट्राचे भूषण आहेत. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक संवेदनशीलता रुजवण्याचे काम विद्यार्थी साहाय्यक समिती करते आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. महाराष्ट्रातील लोकांमध्ये दानत आहे. चांगल्या कामासाठी लोक सढळ हाताने मदत करतात. आपले काम तेवढ्या तळमळीने आणि प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे.”

तुषार रंजनकर म्हणाले, “गेल्या ४० वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. समितीचे काम गावागावात पोहोचावे, तसेच निधी संकलन व्हावे, या उद्देशाने होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव अधिक दृढ करतो. देणारे हात असंख्य आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज असते.”

प्रदीप मांडके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मुलांमध्ये संकलनाचा संस्कार रुजावा, त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम असतो. प्रत्येकाने किमान वीस लोकांना भेटून प्रत्येकी शंभर रुपये संकलित करावे, असा उद्देश असतो. त्यातून त्यांच्यामध्ये आपल्या संस्थेप्रती आदराची भावना तयार होते, असेही त्यांनी नमूद केले.

सहाय्य संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पर्यवेक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निधी संकलन करताना आलेले अनुभव मांडले. कार्यकर्ते वल्लभ कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. समितीचे विश्वस्त, सल्लागार, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३० नोव्हेंबर ‘स्वच्छ आमुची नदी’ ‘नदी महोत्सव २०२५ मध्ये सहभागी व्हा – महापालिकेचे आवाहन


पुणे- येथील महापालिकेतील घनकचरा व पर्यावरण विभाग यांच्या वतीने ‘नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे’ अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा “RIVER WEEK” तसेच २ डिसेंबर हा “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या अनुषंगाने पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील स्वच्छता करणेसाठी “नदी महोत्सव- स्वच्छ नदी, सुंदर पुणे” आयोजित केला आहे.
हा नदी महोत्सव पुणे महानगरपालिका, युवा फॉर अॅक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.०० ते १०.०० भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीमद्वारे साजरा करण्यात येणार आहे.
या महोत्सवात नदी स्वच्छता मोहिम, पथनाट्य, ड्रम-सर्कल्स यांसारखे जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण विषयक जनजागृती स्टॉल्स असणार आहेत. पर्यावरणीय बांधिलकीला बळकटी देण्यासाठी यामध्ये नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, आणि पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणी लिंक: https://forms.gle/vu4Ch33pn3Q7vinH7
उपक्रमामध्ये सहभाग मोफत असून सहभागींकरिता माहिती खालीलप्रमाणे:-
सदरची स्वच्छता मोहीम भिडे पुल ते म्हात्रे पुल या नदीपात्र रस्त्यावरील नदीपट्ट्यावर आयोजित केली जाणार आहे, संपूर्ण नदीपट्टा ६ विभागामध्ये विभाजित केला आहे या ठिकाणी पोहचण्यासाठी २ प्रवेशद्वारे आहेत.
झोन १, २ आणि ३ बाबा भिडे पूल
झोन ४, ५ आणि ६ खुडे पथ येथून नदीपात्र रस्त्यावर प्रवेश
सहभागींनी त्यांच्या नेमून दिलेल्या झोनमध्ये नदीकाठ स्वच्छ करावा.
प्रत्येक झोनमध्ये सहभागींसाठी हातमोजे आणि मास्क उपलब्ध करून दिले जातील
बॅरिकेड केलेल्या भागात किंवा नदीमध्ये उतरू नये, सहभागीनी बंद बूट परिधान करावेत.
कार्यक्रमादरम्यान रोपे वाटप करण्यात येतील.
तरी या अनोख्या कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहवर्धक वातवरणात श्रमदान करून, नदी महोत्सव २०२५-स्वच्छ नदी, सुंदर पुणे यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पावसकर साहेब,रस्ते खोदणाऱ्या ठेकेदाराला का हो घाबरताय ?

बेकायदेशीर रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा ..टाळाटाळ का आणि कशासाठी ?

पुणे- एकीकडे नगर अभियंता पदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले महापालिकेतील पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर सोशल मीडियामध्ये रोज शक्तिमान चहाचा आस्वाद घेताना दिसत असले, तरी दुसरीकडे मात्र ते बेकायदेशीर पणे रस्ते खोदणाऱ्या किरकोळ किरकोळ ठेकेद्रांना सुद्धा घाबरत असल्याचे आरोप आता होताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, मकरंद पेठकर, अशोक हरणावळ,उपशहरप्रमुख प्रशांत राणे, आबा निकम, पराग थोरात, अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, सोहम जाधव, परेश खांडके, हेमंत यादव, संतोष तोडे, राजेश मोरे, जुबेर शेख, अनिल दामजी, गौरव गायकवाड, अभिषेक जगताप, आतिष अनारसे, सचिन घोलप, प्रतिक आल्हाट, दिलीप पोमण, गणेश घोलप, निलेश वाघमारे, सुरज खंडाळे, संजय साळवी यांनी पावसकर यांना घेराव घालून बेकायदेशीर रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा ..टाळाटाळ का आणि कशासाठी ? असे सवाल करत भांडून सोडले . आणि नंतर लेखी निवेदन दिले.

या संदर्भात संजय मोरे यांनी सांगितले कि,’ दिवाळीच्या आधीपासून सुरू झालेली रस्तेखोदाई अजून पर्यंत मनमानी पद्धतीने चालूच आहे. तसेच ज्या ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत त्या ठिकाणी फक्त राडाराडा टाकून खड्डे झाकण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी राडारोडा असाच पडलेला आहे.आपणास वारंवार आमच्या युवासेने मार्फत पत्र देऊन फोटो दाखवून व्हाट्सअप वर व्हिडिओ पाठवून याबाबत कल्पना देण्यात आलेली आहे. परंतु आपणा कडून कोणत्याही पद्धतीची ठेकेदारावर जरब बसेल अशी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निष्क्रिय पथविभागाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे पत्र आपणांस देत आहोत. आज फक्त आपणास घेराव घालून पुणे शहरातील रस्त्यांच्या बेकार अवस्थेच्या फोटोंची माळ आणून तशी जाणीव करून दिली आहे. रस्ते सुधारणांबाबत आपल्या खात्यामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. व त्यांच्यावर महानगरपालिकेची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा पुणेकरांच्या प्रश्नाबाबत आपले खाते उदासीन असल्याबाबत नागरिकांसाठी उग्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

पुणे महानगरपालिकेला रस्त्याच्या झालेल्या दुरावस्था कामाबाबत कोणताही भुर्दंड नको अशी आमची भूमिका आहे. महानगरपालिका प्रशासनाला झालेल्या त्रासाबद्दल व पुणेकर नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेराव घालून पत्र देउन पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावस्कर यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार पावसकर यांनी ठेकेदेरांना खोदलेला रस्ता व्यवस्थित करण्याचे आदेश पारीत केले.

इम्रान खान तुरुंगात,बाहेर मृत्यूच्या अफवा

0

कारागृह प्रशासन म्हणाले- त्यांची तब्येत ठीक, समर्थक भेटीसाठी आग्रही, बहिणी म्हणाल्या- सत्य सांगा
इस्लामाबाद-
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर अफवा वेगाने पसरत आहेत. इम्रान ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात बंद आहेत.काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की त्यांची तब्येत ठीक नाही. गेल्या ३ आठवड्यांपासून इम्रानच्या बहिणी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तुरुंग प्रशासन त्यांना परवानगी देत ​​नाहीये. यामुळे इम्रान यांच्या खराब तब्येतीबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

इम्रान यांच्या बहिणींनी सरकारकडे सत्य सांगण्याची मागणी केली आहे. तणाव वाढल्यानंतर तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे की इम्रान खान यांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे.इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षानेही इम्रान यांच्या तब्येतीबद्दलच्या अलीकडील अफवांबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच प्रशासनाकडे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भेटीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
पीटीआयने आरोप केला आहे की, परदेशी सोशल मीडिया खात्यांमधून इम्रान यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, जे राष्ट्रीय सुरक्षा आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आहे. पक्षाने कठोर इशारा दिला आहे की, इम्रान खानच्या सुरक्षा, आरोग्य आणि संवैधानिक अधिकारांची जबाबदारी थेट सरकारवर आहे.काही अनुचित घडल्यास ते सहन केले जाणार नाही. पीटीआयने अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करण्याचीही मागणी केली.

धरणे आंदोलनात बसलेल्या इम्रान यांच्या बहिणींवर लाठीचार्ज झाला होता

इम्रान खान यांच्या बहिणी अलीमा खान, नोरिन नियाझी आणि डॉ. उझमा खान गेल्या अनेक दिवसांपासून अडियाला तुरुंगाबाहेर धरणे देत आहेत, परंतु त्यांना भावाला भेटण्याची परवानगी मिळाली नाही.त्यांच्या बहिणींनी आरोप केला की, धरणेदरम्यान त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांना रस्त्यावर ओढून नेण्यात आले. त्यांनी याला क्रूरता म्हटले आणि सांगितले की हे सर्व इम्रान यांना कुटुंबापासून वेगळे करण्याच्या कटाचा भाग आहे.

गेल्या आठवड्यातही इम्रान यांच्या बहिणींशी गैरवर्तन झाले

गेल्या आठवड्यातही इम्रान खान यांच्या बहिणींशी रावळपिंडी पोलिसांनी गैरवर्तन केले होते. त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना तेव्हा घडली जेव्हा त्यांच्या बहिणी इम्रान खान यांना भेटण्यासाठी साप्ताहिक भेटीसाठी अडियाला तुरुंगात पोहोचल्या होत्या, परंतु त्यांना भेटू दिले नाही.

इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने X पोस्टमध्ये म्हटले आहे की, इम्रान खान यांच्या बहिणी अलीमा, नोरिन आणि डॉ. उझमा तुरुंगाबाहेर शांततेत बसल्या होत्या, तेव्हा पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी इम्रानच्या तुरुंगातील सुविधांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, इम्रानकडे तुरुंगात टीव्ही आहे, बाहेरून जेवण येते आणि जिमचे उपकरणेही उपलब्ध आहेत.

आसिफ म्हणाले की, जेव्हा ते तुरुंगात होते, तेव्हा त्यांच्याकडे फक्त दोन ब्लँकेट होते. त्यांनी सांगितले की, आम्ही थंड जमिनीवर झोपायचो आणि तुरुंगात बनवलेले जेवणच खायचो. आम्हाला गरम पाणीही मिळत नव्हते.त्यांनी आरोप केला की इम्रानकडे डबल बेड आणि मखमली अंथरूण आहे. त्यांनी दावा केला की तुरुंग अधिकारी त्यांची वैयक्तिकरित्या काळजी घेतात.

आसिफ म्हणाले की, इम्रान यांनी आपल्या समर्थकांना खोटे बोलण्यापूर्वी देवाला घाबरले पाहिजे.

उच्च न्यायालयाने इम्रान यांना भेटण्याची परवानगी दिली आहे

मार्च 2025 मध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना कुटुंब आणि वकिलांशी नियमित भेटण्याची परवानगी दिली होती, परंतु तुरुंग प्रशासन आदेशाचे पालन करत नाहीये.

ऑक्टोबर 2025 मध्ये न्यायालयाने पुन्हा भेटी सुरू करण्याचे निर्देश दिले, तरीही त्यांच्या बहिणींना अद्याप एकदाही भेटू दिले नाही.
इम्रान खानवर 100 हून अधिक खटले सुरू आहेत आणि ते ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, ज्यात सरकारी भेटवस्तू (तोशाखाना प्रकरण) विकणे आणि सरकारी रहस्ये उघड करणे यांसारख्या आरोपांचा समावेश आहे.

इम्रानवर आरोप आहे की, त्यांनी अल-कादिर ट्रस्टसाठी पाकिस्तान सरकारची अब्जावधी रुपयांची जमीन स्वस्तात विकली होती. या प्रकरणात इम्रान यांना 9 मे 2023 रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण देशात लष्कराच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले झाले होते.

पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी तसेच इतर 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, इम्रान यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते तोशाखाना प्रकरणात अडियाला तुरुंगात बंद होते. ​​​​

वाचन संस्कृती बळकट करणारा महोत्सव यंदा नवा विक्रम प्रस्थापित करेल; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

पुणे : ‘विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असून, राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यनगरीच्या या वैभवात पुणे पुस्तक महोत्सव भर घालत असून, वाचन संस्कृती बळकट करत आहे. या महोत्सवाची ख्याती आता दिल्लीतही पोहोचली आहे. पुणेकरांच्या उत्साहामुळे या महोत्सवाची व्यापकता व भव्यता वाढत असून, यंदाही हा महोत्सव नवा विक्रम प्रस्थापित करेल,’ असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी व्यक्त केला.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्या निमित्ताने संविधान दिनाचे औचित्य साधत यंदाच्या तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सव कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, ज्येष्ठ साहित्यिका व माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सव संयोजक प्रसेनजित फडणवीस आणि आनंद काटीकर, तसेच बागेश्री मंठाळकर व डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या काळात पुणे पुस्तक महोत्सवातून पुस्तक वाचनाबाबतची जागृती होत आहे. ‘पुणेकर वाचत आहेत,’ या उपक्रमातून वाचन चळवळीला नवे बळ मिळत आहे. या महोत्सवाचा प्रतिसाद वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पावला असून, संसदेच्या अधिवेशनातही त्याची चर्चा होत आहे,’ असेही मोहोळ यांनी अभिमानाने सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पुस्तकांची जादू वेगळीच असून, ती सर्वसामान्यांच्या जीवनाला प्रेरणा व दिशा देतात. पुस्तकांची ही ताकद पुणे पुस्तक महोत्सव अधोरेखित करते. युनेस्कोच्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ दर्जासाठी पुणे शहराला नामांकन मिळाले असून, त्यासाठी यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव अतिशय महत्त्वाचा आहे.’

संविधान दिनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उदघाटन होत असल्याचा आनंद व्यक्त करत डॉ. अरुण खोरे यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि थोर साहित्यिक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पुस्तक प्रेमाच्या आठवणी सांगितल्या. ‘या पुणे महोत्सवाने सर्वसामान्यांना पुस्तकांच्या ज्ञानसागरात विहार करण्याचा आनंद दिला असून, तो अधिक वृद्धिंगत व्हावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘पुणे पुस्तक महोत्सवातून ‘वाचणारा माणूस’ घडावा,’ असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.

पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे यांनी महोत्सवाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. ‘डॉ. आंबेडकर यांना पुस्तक वाचनाची प्रचंड आवड होती. संविधान हे आपल्या सर्वांचे आदर्श आहे. त्यामुळे संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे पूजन करून पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उदघाटन करत आहोत. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गत वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवात ९७ हजार पुस्तकांच्या साह्याने संविधानाचे मुखपृष्ठ साकारण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, एक हजार पुस्तकांचे स्टॉल आरक्षित झाले आहेत. पुणेकरांनी या वाचन चळवळीला अधिक बळकट करावे,’ असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, संविधानाच्या प्रतिमेचे पूजन आणि उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संयोजक आनंद काटीकर यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील भणगे यांनी आभार मानले.

भारत-जपान बिझनेस मीट २९ नोव्हेंबर रोजीप्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (पीसीसीआय)चा शुभारंभ लवकरच

पुणे २७ नोव्हेंबर : प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) यांच्या वतीने भारत-जपान बिझनेस मीटचे आयोजन शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत पुण्यातील क्राउन प्लाझा येथे करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उद्योन्मुख उद्योजकांसाठी प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (पीसीसीआय)चा शुभारंभ ही करण्यात येईल. अशी माहिती पीसीसीआयचे अध्यक्ष, लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि एम्पेरिया बिल्टकॉन चे व्यवस्थापकीय भागीदार डॉ. भगवान गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पीसीसीआयचे संचालक आणि क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे चे संस्थापक आणि सीईओ प्रा. दीपक बागडे, एलबीएमआयएफएल आणि एलबीएफएल आणि पीसीसीआय चे संचालक अ‍ॅड. ओमप्रकाश मौर्य व पीसीसीआय आणि व्यावसायिक महिला, पुणे च्या संचालिका श्रीमती विशाखा गायकवाड उपस्थित होत्या.

या परिषदेला टोकियो येथील व्हानेज लिमिटेडचे सीईओ डॉ. प्रमोद वाहने हे भारत-जपान व्यावसायिक सहकार्यावर मुख्य भाषण देतील. तसेच टोकियो येथील ग्रीन रिन्यूएबल एनर्जी इंकचे सीईओ एन.डोवाकी हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. १० राज्यातील ४५ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या ४५ दिवसीय आर्थिक सशक्तिकरण अभियानाची माहिती ही येथे देण्यात येणार आहे.

ही शिखर परिषद बिल्डिंग ब्रिजेसःइंडिया-जपान बिझनेस कोलॅबोरेशन या थीम वर आधारित असून तंत्रज्ञान, गुंतवणुक आणि नवोन्मेषामध्ये शाश्वत भागीदारी निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणणार आहे. परिषदेत शाश्वत भागीदारीवर तज्ञ पॅनेलबरोबर चर्चा करण्यात येईल. त्याच प्रमाणे शाश्वत भागीदारीतील दहा उद्योजकांचे स्टार्टअप प्रदर्शन आणि हरित ऊर्जा, आरोग्य सेवा, कौशल्य विकास आणि महिला उद्योजकतेवरील सत्रांचा समावेश आहे.

यावेळी प्रोग्रेसिव्ह कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीसीसीआय) उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे, लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड (एलबीएफएल) – ग्रामीण आणि अर्ध-शहरी भांडवली गरजा पूर्ण करणारी प्रस्तावित (एनबीएफसी) आणि होम बेठे डिजिटल व्यापार संधीसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आर्थिक सशक्तिकरण अभियानाचे शिल्पकार डॉ. भगवान गवई यांनी सांगितले की, ही शिखर परिषद भागीदारी निर्माण करणाच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. जपानी तांत्रिक उत्कृष्टता ही भारतीय उद्योजकीय उर्जेला पूरक आहे. तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व समावेशक भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम सर्व क्षेत्रांमध्ये आणि समुदायांमध्ये आर्थिक संधींचे लोकशाहीकरण करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनासह सतत सुधारणा करण्याच्या जपानच्या कैझेन तत्वज्ञानाशी सुसंगत आहे.

सारडा ग्रुपकडून ‘र्‍हायनो – रॉक सॉलिड इन्स्युलेशन’चे अनावरण

भारतातील सर्वाधिक पर्यावरण-अनुकूल रॉक मिनरल वूल, शाश्वतता व नवोन्मेषात नवे मापदंड

·  भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल – ऱ्हायनो, भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्मेल्टरमध्ये उत्पादित केले जाते जे जीवाश्म इंधनाचा कमी वापर करते.

·उत्कृष्ट थर्मल आणि अकॉस्टिक कामगिरीसाठी डिझाइन केलेले, र्‍हायनो त्याच्या थर्मल, अकॉस्टिक, अग्निरोधक, पाणी-प्रतिरोधक गुणधर्म आणि उच्च संकुचित शक्तीसह आधुनिक बांधकामात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.

· इमारत, औद्योगिक आणि सागरी अनुप्रयोगांमध्ये बहुमुखी,र्‍हायनो इन्सुलेशन दरवर्षी 45-50% पर्यंत ऊर्जा बचतीचे आश्वासन देते.

मुंबई, 27 नोव्हेंबर 2025: सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेडची (BSE: 504614) (NSE: SARDAEN) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या सारडा मेटल्स अँड अलॉयज लिमिटेडने आज भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल इन्सुलेशन सोल्यूशन, RHINO लाँच केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या CII च्या 23व्या ग्रीन बिल्डिंग काँग्रेस (IGBC) 2025मध्ये हे लॉंच करण्यात आले. उद्योग जगतातील अनेक दिग्गज आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेले हे लाँच भारतातील शाश्वत बांधकाम साहित्य उद्योगातील एक परिवर्तनीय टप्पा आहे.

सात वर्षांचे संशोधन, विकास आणि जागतिक भागीदारीतून तयार करण्यात आलेले RHINO हे भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल आहे. जीवाश्म इंधनाशिवाय शुद्धीकरण करण्यात आलेले हे RHINO भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. टिकाऊपणा, ऊर्जा संवर्धन आणि उत्कृष्ट कार्यक्षमता एकत्रित करून RHINO इन्सुलेशनची पुनर्परिभाषा करते. एलिट, एंडुरो आणि इको-ग्रीन या तीन प्रकारांसह, RHINO हे एकमेव रॉक मिनरल वूल आहे जे इमारत, औद्योगिक आणि सागरी उद्योगाच्या टिकाऊपणाच्या विविध गरजा पूर्ण करते.

·         उत्कृष्ट अग्निसुरक्षा: शून्य धूर उत्सर्जनासह 1000 अंश सेल्सिअस पर्यंत आग प्रतिरोधक. सुरक्षितता सुनिश्चित करते.

·         ऊर्जा कार्यक्षमता: संस्थात्मक, व्यावसायिक आणि निवासी इमारतींमध्ये ऊर्जा खर्चात 45-50% कपात करून इन्सुलेशनची पुनर्कल्पना.

·         पर्यावरणीय नेतृत्व: शून्य जीवाश्म इंधन वापरासह बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या तुलनेत 65% पर्यंत कमी CO2 उत्सर्जन साध्य होते.

·         प्रगत ध्वनिक नियंत्रण: नको असलेले आवाज शोषण्यास मदत करते, निरोगी आणि शांत राहणीमान आणि कामाचे वातावरण तयार करते.

·         वॉटर रिपेलेंट डिझाइन: कार्यक्षमता राखताना इन्सुलेशन आर्द्रतेपासून संरक्षण करते.

·         तपमान व्यवस्थापन: उष्णतेची वाढकमी करते आणि थंड होण्यास अनुकूल करते, इमारती आणि घरे जास्त काळ ताजीतवानी, थंड ठेवते आणि लक्षणीयरीत्या कमी ऊर्जा वापरते.

या लाँचिंगप्रसंगी सारडा मेटल्स अँड अलॉयज लिमिटेडचे ​​उपव्यवस्थापकीय संचालक श्री. मनीष सारडा म्हणाले, “पर्यावरणीय व्यवस्थापन आणि नवोपक्रमासह औद्योगिक उत्कृष्टतेचे एकत्रीकरण करण्याच्या सारडा समूहाच्या दृष्टिकोनाचे RHINO हे प्रतीक आहे. 37% जागतिक CO₂ उत्सर्जन* हे इमारतींमुळे होते. मात्र, आमचे उत्पादन हे उत्सर्जन 65% नी कमी करते, जीवाश्म इंधन काढून टाकते आणि ऊर्जा लागत 45-50% ने कमी करते. थोडक्यात म्हणजे, नेट झीरो इमारतींकडे भारताची वेगवान वाटचाल करते. हे प्रॉडक्ट खर्च व लागत घटवते व नफ्यात वृद्धी करते. इमारत उद्योगात परिवर्तन करण्याची आणि अग्निसुरक्षा वाढवणाऱ्या, ध्वनी प्रदूषण कमी करणाऱ्या तसेच तपमान नियमन सुधारणाऱ्या उत्कृष्ट थर्मल इन्सुलेशन आणि ध्वनिक नियंत्रणाद्वारे आधुनिक बांधकाम उंचावण्याची क्षमता या उत्पादनात आहे. IGBC च्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त इको फर्स्टचे सीईओ श्री. चित्रंजन कौशिक आणि एन्ड्युरन्स ऍथलिट तसेच भारतीय अभिनेत्री सुश्री सय्यामी खेर यांच्या उपस्थितीत हे लाँच  महत्त्वाचे आहे. हे उत्पादन शाश्वत आणि जबाबदार शहरी विकासासाठीच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.”

हे लाँच ग्रीन बिल्डिंग काँग्रेस 2025च्या ‘ग्रीन शिफ्ट्स फॉर ग्रीनर टुमारो: डू गुड, फिल गुड – एम्ब्रेस ग्रीन चॉईसेस फॉर अ सस्टेनेबल फ्युचर’ या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे. याच्या माध्यमातून सारडा ग्रुपला भारताच्या ग्रीन बिल्डिंग क्रांतीमध्ये आघाडीवर ठेवते. पाच दशकांहून अधिक काळ, सारडा ग्रुपने नवोन्मेष, जबाबदार वाढ आणि स्वावलंबनासाठी दृढ वचनबद्धतेद्वारे भारताच्या औद्योगिक प्रगतीत योगदान दिले आहे.

Ultraviolette चा 48 तासांत  मुंबई आणि पुण्यात  सहा ठिकाणी विस्तार!

0

• X-47 Crossover, F77 SuperStreet आणि F77 MACH 2 आता महाराष्ट्रातील सहा ठिकाणी विक्रीसाठी उपलब्धमुंबईतील अंधेरी, वाशी आणि ठाणे तसेच पुण्यातील शिवाजीनगरबाणेर आणि खराडी

 UV स्पेस स्टेशन्समुळे Ultraviolette चे राष्ट्रीय स्थान आणखी वाढले असून आता देशभरातील 30 शहरांमध्ये त्यांचा मजबूत पाय रोवला गेला आहे.


 ग्राहकांना सेवा: ग्राहक जीवनचक्राच्या गरजा पूर्ण करत उत्साहींसाठी गुंगवून ठेवणारा ब्रँड अनुभव उपलब्ध.


 वैयक्तिक टेस्ट राईड आणि सेवा: अनुभव केंद्रात वैयक्तिकृत टेस्ट राईड संधीसमर्पित सेवा सहाय्य आणि genuine spares ची सुविधा उपलब्ध.


पुणे, 27 नोव्हेंबर 2025 – मल्टी टेरेन मोटरसायकल आणि UV Crossfade या त्यांच्या पहिल्या रडार कम्युनिकेशनसह असलेल्या कार्बन फायबर हेल्मेटसह  X-47 Crossover च्या यशस्वी सादरीकरणानंतर Ultraviolette ने केवळ 48 तासांमध्ये महाराष्ट्रात सहा अत्याधुनिक Experience Centres सुरू करून त्यांच्या राष्ट्रव्यापी स्थानाचा वेग वाढवला आहे.  मुंबईतील अंधेरी, वाशी आणि ठाणे तसेच पुण्यातील शिवाजीनगर, बाणेर आणि खराडी या महत्त्वाच्या ठिकाणी स्थापित केलेल्या या स्पेस स्टेशन्स मुळे Ultraviolette च्या जलद वाढीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी केवळ भारतात आपले स्थान मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या Ultraviolette च्या दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करते असे नाही तर कामगिरी प्रणीत, शाश्वत आणि भविष्याभिमुख दळणवळण सुविधा वाहकांना उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या बांधिलकीला अधिक बळकटी मिळवून देते. एकाच छताखाली रिटेल आणि सर्व्हिसच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा तयार करून ग्राहकांन ब्रँडचे तंत्रज्ञान, डिझाईन आणि नाविन्यपूर्णता जवळून अनुभवता येते.

ही UV स्पेस स्टेशन्स प्रसिद्ध डीलर हॉलमार्क मोबिलिटी LLP (मुंबई) आणि KHV मोबिलिटी LLP(पुणे) यांच्या भागीदारीत ग्राहकांना Ultraviolette च्या परफॉरर्मन्स मोटारसायकल X-47, F77 MACH 2 आणि F77 SuperStreet यांचा सखोल अनुभव देतात. ही UV स्पेस स्टेशन्स टेस्ट राईड, विक्री, सेवा, स्पेअर्स आणि मोटारसायकलच्या अक्सेसरीज अशा सगळ्या गोष्टींचा समग्र अनुभव मिळवून देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.

Ultraviolette चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “Ultraviolette मध्ये आमचे ध्येय विश्वास आणि विश्वसनीयतेवर आधारित विक्री पश्चात सेवा  आणि मालकी अनुभव देत नेहमीच कामगिरी आणि तंत्रज्ञान यांच्या  सीमांना पुढे नेणारी उत्पादने विकसित करण्याचे राहिले आहे. महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये वाढणारे आमचे रिटेल  आणि सर्व्हिस केंद्र यांचे जाळे यामुळे आम्ही विक्री आणि सेवा या दोन्ही गोष्टी एकत्र आणत आहोत. त्यामुळे रायडर्सना शोरूम मध्ये प्रवेश करण्याच्या पहिल्या क्षणापासून ते विश्वसनीय विक्री पश्चात सेवा  पर्यंत  विनाअडथळा अनुभव मिळतो. आम्ही जसजसे वाढत आहोत, तसतसे तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सोयीसुविधा  एकत्र आणणारी कनेक्टेड परिसंस्था देखील उभारत आहोत. प्रत्येक Ultraviolette स्पेस स्टेशन  हे  भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डिझाइन केले आहे. तिथे नाविन्यपूर्णता सर्वांसाठी उपलब्ध होते आणि प्रत्येक रायडर Ultraviolette च्या भविष्यवेधी  विचारसरणीशी जोडला जातो.”

KHV मोबिलिटीचे भागीदार कौशिक कोठारी म्हणाले: “धोरणात्मक  संधींमधून वाढ साध्य करण्याच्या आमच्या दृष्टीकोनानुसार Ultraviolette सोबत जोडले जाण्याचा आम्हाला अभिमान आहे. इव्हीज या दुचाकी वाहनांचे भविष्य आहे याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि Ultraviolette चे अभियांत्रिकी, डिझाईन आणि ग्राहक केंद्री दृष्टीकोन यावरचे लक्ष आमच्या मूल्यांशी पूर्णपणे जुळते. एकत्रितपणे आम्ही नाविन्यपूर्णता आणि परस्पर यशाच्या सामायिक प्रवासात योगदान देऊ याचा आम्हाला विश्वास आहे.”

या मोटारसायकल्स इलेक्ट्रिक कामगिरीची नवीन व्याख्या करतात. त्यात 40.2 hp ची powertrain आणि 100 Nm torque आहे. फक्त 2.8 सेकंदामध्ये 0 ते 60 kph गाठते. 10.3 kWh बॅटरी असलेल्या या मोटारसायकल्स एका सिंगल चार्जवर 323 kms चा IDC range सादर करतात. त्यांच्या 3-level Traction Control System मुळे विविध राइडिंग परिस्थितींमध्ये सर्वोत्तम ट्रॅक्शन आणि स्थिरता मिळते. तसेच, 10 लेव्हल्स रीजनरेटीव्ह ब्रेकिंगमुळे अधिक सोय आणि उर्जा कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे रेंजही प्रभावीपणे वाढते. यात Dynamic Stability Control (UV DSC) देखील आहे. हे एक अत्याधुनिक वैशिष्ट्य असून  रीजनरेटीव्ह ब्रेकिंग लेव्हल्स आणि ABS चे विनाअडथळा मोड्यूलेशन करून माईल्ड, ॲक्टीव्ह किंवा पॅनिक ब्रेकिंग दरम्यान पूर्ण नियंत्रण आणि स्थिरता देते. त्यामुळे वाहन चालवणे अधिक सुरक्षित होते.

त्याव्यतिरिक्त, X-47 मध्ये UV Radar Intelligence आहे. दोन-चाकी वाहनांच्या डायनामिक्ससाठी खास डिझाइन केलेल्या या रडार यंत्रणेमध्ये 20 अंशापर्यंतच्या लीन अँगलसाठी intelligent adaptation आणि roll व pitch मधील फरकांसाठी seamless compensation आहे. त्यामुळे चालवताना सर्वोत्तम कामगिरी आणि त्या त्या परिस्थितीतील सजगता मिळते. यामुळे Ultraviolette ही UV HyperSense द्वारा समर्थित Advanced Rider Assistance System सादर करणारी पहिली उत्पादक बनली आहे. चालक सजगता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी तयार केलेली ही प्रणाली ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट, ओव्हरटेक अलर्ट आणि रिअर कोलिजन वॉर्निंग या चार मुख्य फीचर्सद्वारे कार्य करते.

या वर्षाच्या सुरुवातीला, Ultraviolette च्या मुख्य प्रवाहातील त्यांच्या दोन नवीन सादरीकरणानाही प्रचंड प्रतिसाद मिळाला: जगातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक स्कूटर – ‘Tesseract’. यात या विभागातील पहिले समग्र अंतर्भूत रडार आणि dashcam आहेत. तसेच ओम्नीसेन्स मिरर्स दिले आहेत. जोडीला disruptive electric motorcycle – ‘Shockwave’ हे दुसरे सादरीकरण. रोमांचक रायडिंग अनुभव शोधणाऱ्या चालकांसाठी काळजीपूर्वक डिझाइन आणि इंजिनियर करण्यात आली आहे.

शिवाजीनगर मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शोरूम नं. S3, एपिसेंटर 64-C1, ओल्ड मुंबई – पुणे हायवे, वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे- 411005, महाराष्ट्र.

बाणेर मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: ‘अमर टेक पार्क’ शॉप नं. S1, S3, S4, ग्राउंड फ्लोअर, सर्व्हे नं. 31/33/5/6/7/8, प्लॉट-A, बालेवाडी, पुणे- 411045, महाराष्ट्र.

खराडी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शोरूम नं. 09, कुल स्केप्स (VELSTAND), S.No. 9/1/1, तुकाराम नगर, खराडी बायपास, खराडी, पुणे- 411014, महाराष्ट्र.

अंधेरी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता:  शॉप 1 & 2, क्रेसेंट सोलिटेअर बिझनेस पार्क, साकीनाका, टेलिफोन एक्सचेंज लेन जवळ, साकी नाका, मुंबई- 400072, महाराष्ट्र.

वाशी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप नं. 4 & 5, सेक्टर 30 A, लोकमत कॉम्प्लेक्स जवळ, वाशी, नवी मुंबई- 400705, महाराष्ट्र.

ठाणे मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप नं. 6 & 7, ग्राउंड फ्लोअर, ब्ल्यू नाईल, प्लॉट नं. 369, एलबीएस रोड, मखमली तलाव जवळ, ठाणे (पश्चिम)- 400601, महाराष्ट्र.

महिंद्राने लाँच केली  XEV 9S — भारतातील नवी मोठी इलेक्ट्रिक ७-सीटर SUV

किंमत   19.95 लाखांपासून

●        स्टायलिशअस्सल SUV – अतिशय शांत आणि स्मूथ रायडिंग अनुभवासह

●        INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित, MAIAच्या बुद्धिमत्तेवर चालणारी

●        SUVs/MPVsच्या तुलनेत सर्वोत्तम स्पेस (Best in Space)

●        70 kWh बॅटरीची ओळख — वर्गातील सर्वोत्तम 180 kW पॉवर आणि 380 Nm टॉर्क

●        एकूण 6 व्हेरिएंट्सटॉपएंड ‘Pack Three Above 79 kWh’ ची किंमत एक्सशोरूम ₹29.45 लाख

●        बुकिंग्स सुरू: 14 जानेवारी, 2026

●        डिलिव्हरी सुरू: 23 जानेवारी, 2026

बेंगळुरू, 27 नोव्हेंबर, 2025 : आजच्या धकाधकीच्या जीवनात एक गोष्ट आपल्याला जवळजवळ मिळतच नाही — ती म्हणजे स्पेस… थांबण्यासाठीची स्पेस, विचार करण्याची स्पेस, स्वतःसारखे राहण्याची स्पेस, आणि आपल्या प्रिय लोकांसोबत असण्याची स्पेस. आज ही हरवलेली भावना महिंद्रा परत आणत आहे — एका अर्थपूर्ण, ताज्या अनुभवासह: XEV 9S, भारताची पहिली इलेक्ट्रिक-ओरिजिन 7-सीटर SUV, जी INGLO आर्किटेक्चरवर जमिनीपासून उभी करण्यात आली आहे.

XEV 9S भारताची ‘मोठी नवी इलेक्ट्रिक’ म्हणून येत आहे — एक धाडसी कल्पना, जी स्मार्टपणे डिझाइन केलेल्या, प्रशस्त SUVमध्ये रूपांतरित केली आहे, त्या लोकांसाठी ज्यांचे जीवन, स्वप्ने आणि रोजचे प्रवास अधिक मोठे होत आहेत.

ही SUV कुटुंबे, निर्माते, प्रवासी आणि प्रत्येक भारतीयासाठी आहे — ज्यांना त्यांच्या कारमध्ये एकच गोष्ट हवी आहे:

जे करायचे आहे आणि जे बनायचे आहे, त्यासाठी भरपूर स्पेस.

MAIA या भारतातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह बुद्धिमत्तेने चालणारी आणि महिंद्राच्या अभिव्यक्तीपूर्ण डिझाइन फिलॉसॉफीने साकारलेली XEV 9S ही फक्त एक नवी गाडी नाही — ती इलेक्ट्रिक स्वातंत्र्याची एक नवी भावना निर्माण करते.

नवी मोठी इलेक्ट्रिक SUV

विशाल केबिन, स्मार्ट थ्री-रो इलेक्ट्रिक लेआउट, अतिशय शांत ड्राइव्ह आणि खुलेपणाची खास भावना — या सगळ्यांमुळे XEV 9S ही गाडी कुटुंबे, प्रवासी, निर्मात्यांना आणि रोज प्रवास करणाऱ्या भारतीयांना आतापर्यंत न मिळालेला आरामदायी अनुभव देते. बिनशर्त आराम. कोणतीही तडजोड नसलेली स्पेस. आणि लहान न वाटणारी इलेक्ट्रिक SUV.

आरवेलूसामीप्रेसिडेंट – ऑटोमोटिव्ह बिझनेसमहिंद्रा अँड महिंद्रा लिआणि मॅनेजिंग डायरेक्टरमहिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिम्हणालेतंत्रज्ञान तेव्हाच अर्थपूर्ण ठरतेजेव्हा ते माणसांच्या शक्यता वाढवतेअसा आमचा विश्वास आहे. INGLO इलेक्ट्रिकओरिजिन प्लॅटफॉर्मवर तयार केलेली XEV 9S हेच करते — इतरांपेक्षा जास्त स्पेस देते आणि अतिशय स्मूथआवाजमुक्त राईड देते. MAIA ब्रेनमुळे या SUV ला अनेक हायटेक फीचर्स मिळतात आणि त्यामुळे आपल्या किमतीत ही सर्वात प्रगत SUV ठरते.”

नलिनीकांत गोल्लागुंटाचीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर – ऑटोमोटिव्ह डिव्हिजनमहिंद्रा अँड महिंद्रा लिआणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरमहिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिम्हणाले:

भारतीय मोबिलिटीचे भविष्य त्या ब्रँड्सचे असेल जे फक्त इलेक्ट्रिक वाहनं तयार करत नाहीततर संपूर्ण श्रेणीचाच नव्याने विचार करतात. XEV 9S सोबत आम्ही फक्त EV सेगमेंटमध्ये खेळत नाही — आम्ही त्याला व्यापक करत आहोतही SUV महिंद्रासाठी एका नव्यामोठ्या इलेक्ट्रिक युगाची सुरुवात आहे — जे स्केलवरउद्देशावर आणि भारत कसा प्रवास करतो याच्या खोल समजुतीवर आधारित आहे. ₹19.95 लाखांच्या आकर्षक प्रारंभिक किंमतीपासून हे हायटेक उत्पादन अधिक लोकांसाठी उपलब्ध होतेबुकिंग्स 14 जानेवारीपासून सुरू होतील आणि डिलिव्हरी 23 जानेवारीपासून सुरू होईल.”

प्रताप बोसचीफ डिझाइन आणि क्रिएटिव्ह ऑफिसर – ऑटो आणि फार्म सेक्टर्समहिंद्रा अँड महिंद्रा लिम्हणाले“XEV 9S डिझाइन करणे म्हणजे फक्त गाडीवर रेषा काढणे नव्हते, तर भावनांना आकार देणे होते. आम्हाला हे डिझाईन असे बनवायचे होते की आत पाऊल टाकताच ते आपले वैयक्तिक, शांत जागेसारखे वाटावे—आणि त्याच वेळी आधुनिक भारताची झलकही त्यात असावी. इलेक्ट्रिकने आम्हाला कॅनव्हास दिला; INGLO ने प्रकाश, स्पेस आणि आराम यांना मनासारखे आकार देण्याची मोकळीक दिली.

“परिणाम असा की, ही SUV आपले मोठेपणही सुंदरपणे दाखवते आणि आपले तंत्रज्ञान साधेपणाने मांडते. ती अभिव्यक्त आहे, शांत आहे आणि पूर्णपणे महिंद्राची ओळख जपते. ज्याच्या आकांक्षा दररोज मोठ्या होत आहेत, त्या भारतासाठी ही गाडी तयार आहे,

जागेला नवा आकार

XEV 9S ही महिंद्राच्या Heartcore Design फिलॉसॉफीची जिवंत प्रतिमा आहे. तिची दमदार उभी रचना, स्वच्छ आणि आकर्षक रेषा, ग्लॉसी फिनिश, तंत्रज्ञानाने भरलेली प्रशस्त केबिन आणि परफेक्ट प्रपोर्शन्स — हे सर्व मिळून एकच भावना देतात : ही खऱ्या अर्थाने प्रीमियम SUV आहे, जी स्पेस आणि उद्देश या दोन्हींची कमाल अनुभूती देते. XEV 9S म्हणजे चाकांवर फिरणारी शांत, सुसंस्कृत स्टाइल आहे.

डॉ. गौरी पालवे–गर्जे आत्महत्या प्रकरणी, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट; आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

0

‘न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही’ — डॉ. गोऱ्हे; सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

बीड, दि. २७ नोव्हेंबर २०२५ : बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “गौरी पालवे–गर्जे यांचा मुंबईतील मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबाने काही महत्त्वाची अतिरिक्त माहिती पोलिसांना द्यायची इच्छा व्यक्त केली; परंतु त्यांची नोंद झाली नव्हती. या तक्रारीची मी तत्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांशी तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले असून, पुढील दोन-तीन दिवसांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व पुरवणी जबाबांची नोंद केली जाणार आहे.”

कुटुंबीयांनी आरोपीचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांनाही अटक करावी, अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गौरीवर पूर्वी अनेकदा मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाचे मूळ कारण नीट समजून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

“उपसभापती म्हणून जबाबदारी आहेच, पण आई म्हणूनही हे प्रकरण मन हेलावून टाकणारं आहे. कुटुंबीयांना सक्षम सरकारी वकील मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे. तपासात कुठलाही दबाव सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई पोलिसांना दोन महत्त्वाचे निर्देश दिले—
पहिला, तपासाच्या प्रगतीबाबत अधिकृत बुलेटीन दर दोन दिवसांनी पत्रकारांना देण्यात यावे, जेणेकरून अफवा आणि अप्रमाणित माहितीला आळा बसेल.
दुसरा, अशा संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडितेवरच आरोप केले जातात; म्हणून संपूर्ण सुनावणीचे इन कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच जवळील गावातील एका पॉक्सो प्रकरणातील तक्रार नोंदवण्यात उशीर झाल्याबाबतही त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. “महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारींची त्वरित आणि गांभीर्याने नोंद होणे आवश्यक आहे. गावांमध्ये पॉक्सो कायद्याबाबत जागृती वाढवण्यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. पॉक्सो प्रकरणातील पीडित मुली आणि पालकांना तपासाच्या प्रगतीची नियमित माहिती देण्याबाबत भारतीय न्यायसंहितेतील नव्या तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

कुटुंबाला न्यायप्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी आर्थिक मदत

गौरी पालवे–गर्जे यांचे आई-वडील न्यायासाठी लढत असताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक ती आर्थिक मदत वैयक्तिक पातळीवरून कुटुंबीयांना दिली आहे. “न्याय मिळविण्यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. कुटुंबाच्या पाठीशी मी वैयक्तिकरीत्या उभी आहे,” असे त्या म्हणाल्या.

“गौरीच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. न्याय मिळण्यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा तितक्याच कटाक्षाने काम करतील,” असा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

या भेटीत शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी राज्य महिला आयोग सदस्य व बीड जिल्हा संपर्कप्रमुख अॅड. संगीता चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

‘गोंधळ’ने इफ्फीमध्ये महाराष्ट्राचे मध्यरात्रीचे मिथक आणि संगीत केले जिवंत


कलाकार आणि चमूने सिनेमाद्वारे कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचा केला गौरव

किशोर कदम यांनी केले शिकलेले ‘विसरण्या’बद्दल भाष्य; संतोष डावखर : मराठी सिनेमाचा दर्जा वाढवणे गरजेचे

#IFFIWood,SHARAD LONKAR 27 नोव्‍हेंबर 2025

आज इफ्फी मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना थेट महाराष्ट्रात मध्यरात्री होणाऱ्या प्रतिष्ठित विधीतील ढोल-ताशांचा गजर, फेर धरणारी वस्त्रे आणि दैवी भक्तिभावाच्या वातावरणात नेले. दिग्दर्शक संतोष डावखर आणि अभिनेते किशोर कदम यांनी श्रद्धेचे प्रतीक म्हणून सादर होणारी ही प्राचीन लोककला वासना, फसवणूक आणि सुटका यांच्या एका थरारक कथेचा कणा कशी बनली, हे उलगडून सांगितले.

गोंधळ: एक सिनेभाषा

चर्चा सुरू करताना, संतोष यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट थेट गोंधळ लोककथेवर आधारित आहे; या कलाप्रकाराचे वर्णन त्यांनी “आपल्या डोळ्यांसमोर हळूहळू नाहीशी होत चाललेली संस्कृती” असे केले. त्यांच्यासाठी हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नसून, तो सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचा एक प्रयत्न आहे.

ते म्हणाले, “आम्ही एक लोप पावत असलेली परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण संस्कृतीचे असंख्य घटक आहेत आणि गोंधळ ही त्यापैकी सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती आहे. निर्मितीदरम्यान आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करून, आमच्या टीमने हा वारसा जपण्यावर विश्वास ठेवला.”

अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. “मी माझ्या गावात गोंधळात भाग घेत मोठा झालो आहे. हे केवळ एक नृत्य नाही, तर संपूर्ण समुदायाचे जिवंत होणे आहे,” असे त्यांनी सांगितले. आठवणींमध्ये हरवलेल्या स्वरात त्यांनी शेजाऱ्यांचे एकत्र येऊन प्रार्थना करणे आणि उत्सव साजरा करत रात्रभर कला सादर करणे, याविषयी सांगितले.

या चित्रपटाची कथा सांगण्याची पद्धत ही “खोलवरच्या सिनेमॅटिक विचारसरणीतून” आल्याचे सांगत, त्यांनी विविध प्रकारचे धर्मविधी कथाकथनाचे माध्यम कसे बनतात यावर प्रकाश टाकला. “पारंपरिक गोंधळामध्ये, लग्नानंतरचे सादरीकरण ही समस्यामुक्त वैवाहिक जीवनासाठी केलेली प्रार्थना असते. या चित्रपटात, कथा गाणी आणि गोंधळाच्या माध्यमातून सांगितली गेली आहे. ही एक उत्कृष्ट सिनेमॅटिक कल्पना आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शकाचे आहे.”

एखादे पात्र खरेखुरे साकारतांना झालेल्या सर्जनशील प्रक्रियेविषयीही सविस्तर बोलताना किशोर यांनी  सांगितले की,  खरी किमया म्हणजे विस्मरण. कलाकार म्हणून आपण चित्रीकरणासाठी जाताना स्वतःच्या कलेचा किंवा अनुभवाचा विचार घेऊन जाऊ नये. पटकथेतच सर्व काही अंतर्भूत असते. अनेकदा दिग्दर्शकाला फक्त तुमच्याकडून संवाद उच्चारून घ्यायचा असतो, कारण भावना आधीच त्या शब्दांत जिवंत असतात. प्रत्येक वेळी अभिनय करणे आवश्यक नसते.

प्रत्येक चौकटीत परंपरेचे जतन आणि मराठी सिनेमाला नवा मापदंड 

संतोषसाठी ‘गोंधळ’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तो लहानपणी आजी-आजोबांसोबत गोंधळाच्या कार्यक्रमांना जात असे; त्या वेळी स्वयंपाक सामूहिकरीत्या तयार केला जात असे, प्रकाशयोजना अगदी साधी असायची आणि फक्त चार वाद्यांच्या साथीने गाणी सादर केली जात. आज मात्र आचारी येतात, पारंपरिक वाद्यांसोबत कीबोर्ड वाजवण्यात येतो आणि प्रकाशयोजना पूर्णपणे रंगमंचीय पद्धतीने केली जाते, असे त्याने सांगितले. पुढील पिढ्यांसाठी आहे तसाच, अस्सल गोंधळ टिपून ठेवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.  एका रात्रीत चित्रीकरण केल्याने खर्च कमी झाला आणि वेषभूषा बदलावी लागली नाही. त्यामुळे अस्सल गोंधळाचा अनुभवही कायम राहिला, असे त्याने पुढे सांगितले.

संतोष यांनी भारतीय प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीविषयीही स्पष्टपणे मत व्यक्त केले. मराठी प्रेक्षकांना हिंदी चित्रपट सहज उपलब्ध असल्याने प्रादेशिक चित्रपटांनी सातत्याने उच्च दर्जा राखणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.  आपल्याला एक नवीन मापदंड स्थापित करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. जर प्रेक्षक टिकीटसाठी पैसे देत असेल, तर त्यांना त्या बदल्यात एक चांगला चित्रपट पाहायला मिळावा.