Home Blog Page 3098

६२ फुट लांबीचा तिरंगा फडकवला महाराष्टाच्या सर्वोच्च शिखरावर.

0

७ वर्षाच्या चिमुकल्या अवनीत साबळे व अपंग चैतन्य कुलकर्णीची जगावेगळी कामगिरी

पुणे-महाराष्ट्रातील 360 एक्सप्लोरर या आघाडीच्या ट्रेकिंग ग्रुपने १५ ऑगस्ट रोजी एक इतिहास घडवत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर ६२ फुट लांबीचा तिरंगा फडकावला.  संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३२५ ट्रेकर्स ३५० एक्स्प्लोरर च्या मोहिमेत सहभागी झाले असून प्रत्येकाने या आगळ्यावेगळ्या मोहिमेमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.

भारताचे सुपुत्र एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे गिर्यारोहक बालाजी जाधव, निखिल यादव, दीपक कोणाळे, अमोघ मोहिते,  आशिष निर्वाना क्रॉसफिट जिमचे  राहुल व रुपेश सोनकांबळे यांनी 360 एक्सप्लोरर मार्फत आयोजित केलेल्या १५ ऑगस्ट रोजीच्या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातील ३२५ जणांनी सहभाग घेतला होता. जवळपास ६२ फुट लांबीचा तिरंगा भर पावसात आणि धुक्याने भरलेल्या आसमंतात फडकावून संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. अगदी नागपूर, जालना पासून सांगली मध्यप्रदेश येथील लोकही या ट्रेकमध्ये एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते. भर पावसात सकाळी ६ वाजता चढाई सुरवात करून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.३० च्या सुमारास त्यांनी ध्वज फडकवला.

अवनीत साबळे व चैतन्य कुलकर्णी यांनी घडवला इतिहास-

७ वर्षाच्या अवनीत साबळे याने आपली आई अंजली साबळे सोबत या मोहिमेत सहभागी होवून त्याच्या वयाच्या मुलांपुढे एक आदर्श उभा केला आहे. सर्वांच्या पुढे राहून अवनीतने सर्वाना प्रेरणा दिली. मुळचा अहमदनगर येथील अपंग असलेला चैतन्य कुलकर्णी गेले काही महिने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गिर्यारोहणाचे धडे घेत आहे. ४ वर्षापूर्वी नारळाच्या झाडावरून पडून अपंग झालेला चैतन्यने कळसुबाई शिखर सर करून अनेकांना चकित केले. 360 एक्सप्लोरर टीममुळेच हे यश मिळवू शकलो अश्या भावना त्याने व्यक्त केल्या.

 

“एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत या मोहिमेत ट्रेकिंगच्या आनंदासोबतच देशप्रेमाची भावना या जागवली. 360 एक्सप्लोरर या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील अनेकांचे स्वप्न पूर्ण होत आहे”

डॉ. अनिल वावले (पुणे)

 

“ही मोहीम आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.ट्रेकिंगमध्ये मिळणारा आनंद  जगाच्या कोणत्याही गोष्ठीतून मिळू शकणार नाही. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व डॉ. सागर गोपाळे याच्यासोबत नंतर अनेक वेळा ट्रेकिंगला जाणार असा निश्यय केला आहे. 360 एक्स्प्लोरर टीममधील सर्व लीडर्समुळेच या आगळ्या मोहिमेत सहभागी होवून यश मिळवता आले.

डॉ. गणेश कुलकर्णी  

कौशल्य विकास हाच यशाचा खरा मार्ग – दिलीप छाब्रिया

0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचा पदविकाप्रदान समारंभ  संपन्न  
 
पुणे  : कौशल्य  विकास  हाच  यशाचा  खरा  मार्ग असून होण्यासाठी  विद्यार्थीदशेपासूनच  कौशल्य विकास प्रशिक्षणाचा  अंगीकार  केल्यामुळे करिअरमध्ये यशस्वी  होण्यास मदत  असे मत  डी. सी. डिझाईनचे  संस्थापक  दिलीप  छाब्रिया  यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण  महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ व  यशस्वी  इन्स्टिटूयट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त  राबविण्यात  असलेल्या  शिका व कमवा  योजनेतील डिप्लोमा इन  मॅकेनिकल  इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या  पदविका  प्रदान सोहळ्यात  ते बोलत  होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले  की,    कौशल्य  विकास प्रशिक्षण आणि स्वतःच्या  हाताने प्रत्यक्ष  कंपनीत  काम करण्याच्या  अनुभवामुळे  कौशल्यात आणि ज्ञानात भरीव  वाढ होते व त्यातून  आत्मविश्वास  निर्माण  होतो.  कमवा  योजनेतील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे अन्य  कुठल्याही  इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या  तुलनेत  जास्त रोजगारक्षम झालेले  असतात आणि त्यांच्यातील वाढलेल्या  आत्मविश्वासामुळे त्यांना  स्वतःचे  करिअर  सुद्धा उत्कृष्ट  घडविता  येते.जगाच्या तुलनेत आजही भारतामध्ये  वाहनांची  वापरक्षमता  कमी असून  ती वाढण्याच्या दृष्टीने सर क्षेत्रातून  प्रयत्न सूरु  असून यामुळे नजीकच्या भविष्यात ऑटोमोबाईल क्षेत्राची प्रचंड  मोठ्या  प्रमाणात  वाढ होणार  आहे आणि या  क्षेत्रात रोजगाराच्या संधीसुद्धा  मोठ्या प्रमाणावर  निर्माण  होण्याची शक्यता  आहे, असेही छाब्रिया  यांनी  सांगितले.  
 
या पदविका प्रदान सोहळ्याप्रसंगी  बोलताना यशवंतराव  चव्हाण  महाराष्ट्र  मुक्त  विद्यापीठाच्या  विज्ञान  व तंत्रज्ञान  विद्याशाखेच्या  संचालक  डॉ. सुनंदा  मोरे यांनी  सांगितले की, आज  खर्या अर्थाने  मुक्त  विद्यापीठाचा उद्देश  सफल  होत असल्याचे पाहून  भारावून आले, ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे मुक्त विद्यापीठाचे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष  अस्तित्वात आल्याचे दिसत आहे, आपल्या मनोगतात इंजिनिअरिंग  डिप्लोमा  उत्तीर्ण  झालेल्या  विद्यार्थ्यांना  शुभेच्छा देत मुक्त विद्यापीठ अशा प्रकारचे अन्य  उपक्रम  राबविण्यासाठी कटिबद्ध  असल्याचे त्यांनी  सांगितले. 
 
याप्रसंगी  डिप्लोमा  उत्तीर्ण झालेल्या  ३५० विद्यार्थ्यांपैकी   ४२ विद्यार्थ्याना प्रातिनिधिक  स्वरूपात  पदविका प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन  गौरविण्यात  आले. यावेळी समाधान पाटील व सचिन  खोडदे  या विद्यार्थ्यानीही आपली  मनोगते  व्यक्त केली. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात  येणारा ‘यशोगाथा’  विशेषांक व ‘यशोमंथन’ हे  संशोधन  पत्रिकेचे (रिसर्च जनरल) प्रकाशनही  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘यशोत्सव’ अंतर्गत  विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कलाप्रकार  सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक  मल्हार  करवंदे  यांनी  केले तर आभार  प्रदर्शन  संस्थेचे संचालक संजय  छत्रे यांनी  केले. यावेळी कार्यक्रमाला ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्सचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस,संचालक अजय रांजणे, संचालक स्मिता धुमाळ, संचालक मकरंद कुलकर्णी, संस्थेच्या शैक्षणिक  विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील यांच्यासह  संस्थेचे  सर्व प्राध्यापक वर्ग, पर्यवेक्षक,शिक्षकेतर  कर्मचारी, विद्यार्थी व पालक  मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.
या कार्यक्रमासाठी प्रियांका साळूंके, उर्मिला सातपुते, अनन्या नाईक श्वेता साळी,सौमेन पात्रामी,विजय मुळीक, शाम वायचळ, प्रथमेश  पाटील, पवन शर्मा, अभिजत चव्हाण  आदींनी विशेष  सहकार्य केले.  

शहिदांच्या माता-पित्यांसह जवानांचा सहभाग- एकात्मता रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे
 स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  सहकारनगर परिसरात आयोजित केलेल्या एकात्मता रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीत शहीद जवानांचे आई -वडील बंधू आणि जायबंदी झालेले जवान यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. 

 रॅलीचा प्रारंभ  राजीव गांधी ई लर्निग शाळेच्या प्रांगणात शहीद जवान सौरभ फराटे यांचे आई मंगल फराटे , वडील नंदकुमार फराटे  यांचे हस्ते ध्वजारोहण करुन झाला त्यानंतर  राजीव गांधी शाळेपासुन गजानन महाराज चौक, सारंग सोसायटी, अरणेश्वर चौक मार्गे शिवदर्शन चौकापर्यंत ही एकात्मता रॅली काढण्यात आली.   या रॅलीत  भारतीय सैन्य दलातील शूर जवान चंदु चव्हाण ,सातारा येथील शुर जवानअमित घोरपडे व निसर्ग फिजिकल अकादमीचे श्रीराम कदम  सहभागी झाले होते.
   
   रॅलीमध्ये  युवकांनी सादर केलेले देशभक्ती पर पथनाट्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रॅलीचे जागोजागी नागरीकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.  गेली ७ वर्षे श्री आबा बागूल एकात्मता रॅलीचे आयोजन करत असतात. रॅलीमध्ये  युवक, युवती,  नागरीक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.    माजी आमदार व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री श्री. बाळासाहेब शिवरकर, पुणे शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जवान चंदु चव्हाण म्हणाले की, आशा उपक्रमांमूळे जवानांना सीमेवर लढण्यास बळ मिळते.आबा बागुल म्हणाले की, तरुणांना देशाप्रती अभिमान, अस्मिता जागृत करण्यासाठी आणि सर्व भारतीयांनी एकदिलाने,गुण्यागोविंदाने राहण्यासाठी एकात्मता रॅलीचे आयोजन केले जाते.
    दरवर्षी माजी महापौर श्री आबा बागूल व श्री अमित बागुल व त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या वतीने सिमेवर जे जवान शहीद होतात किंवा जे जवान चांगली कामगिरी करतात अशा  जवानांच्या घरी शौर्याची गुढी उभारली जाते व त्यांच्या कुटुंबीयांसोबत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रॅलीचे नियोजन   अमित बागुल  व  सहकाऱ्यानी केले. 

विविध क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राज्याचा पुरोगामित्त्वाचा वारसा कायम ठेवू या ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण

0

    मुंबई, दि. 15- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

मुख्यमंत्री यांचे स्वातंत्र्यदिनाचे मनोगत…

 बंधू आणि भगिनींनो…

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आणि भारत देशातील या सर्व नागरिकांना मी अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांनी या देशाकरीता आपले आयुष्य दिले, बलिदान दिले त्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींची आठवण करण्याचा दिवस आहे. त्यांना मानवंदना देण्याचा दिवस आहे. तमाम स्वातंत्र्य संग्राम सैनिक, हुतात्मे, क्रांतिकारक या सर्वांना आज या निमित्ताने मी वंदन करतो. त्यासोबत, भारताचे स्वातंत्र्य अबाधित टिकविण्याकरीता आमचे जे जवान सीमेवर लढतात त्या जवानांना मी अभिवादन करतो. जो बळीराजा आपल्या शेतामध्ये राब राब राबतो, हाडाचं काडं करतो, रक्ताचं पाणी करतो त्या बळीराजाला देखील मी अभिवादन करतो.

आज आपला महाराष्ट्र सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच उंच भरारी घेत आहे.  विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र सगळीकडे अव्वल ठरतोय. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहरांच अभियान, ग्लोबल सिटीचा इंडेक्स असेल, परकीय थेट गुंतवणूक या प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राने अभूतपूर्व अशीही कामगिरी केली आहे. विशेषत: महाराष्ट्रावर सातत्याने येणारे दु:ष्काळाचे सावट दूर करण्याकरीता ‘जलयुक्त शिवार’ सारखी योजना आपण आमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून 16 हजार गावे आपण जलपरिपूर्ण करतो आहोत. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एकूण 25 हजार गावे आपण जलपरिपूर्ण करणार आहोत. या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाणलोट क्षेत्राचा विकास होणार आहे. अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या आणि लोकसहभागातून प्रचंड मोठ्या अशा एक पाण्याच्या चळवळीमुळे महाराष्ट्राचे पूर्णपणे परिवर्तन होणार आहे.

सातत्याने पावसाळ्यात खंड येतो अशावेळी पिकांकरिता शाश्वत सिंचनाची सोय ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे. त्याचा दृष्य परिणाम आपल्याला पहायला मिळतो, आपली उत्पादकता वाढते आहे. परंतु उत्पादकता वाढत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याकरिता एकीकडे केंद्र सरकारने हमीभाव ठरवताना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्राने हमीभाव ठरवले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारनेदेखील अन्न धान्यांची रेकॉर्ड खरेदी केली आहे. 1999 ते 2014 या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यावेळी शासनाने केवळ साडेचारशे कोटी रुपयांच्या अन्नधान्याची एकूण खरेदी केली होती. त्या तुलनेत गेल्या तीन वर्षांमध्ये 8 हजार कोटींची खरेदी राज्य सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतमालाला उत्तम मार्केट मिळाले पाहिजे. याकरिता राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. जागतिक बँकेसोबत देखील दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये तेथील शेतीचे संपूर्ण परिवर्तन करणारा ‘स्वर्गीय नानाजी देशमुख हा कृषी समृद्धी प्रकल्प’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नव्याने सुरु होणारे ॲग्री मार्केटींग, ॲग्री व्हॅल्यू ॲडीशन या संदर्भातील मूल्यवृद्धीच्या प्रकल्पातून शेतीच्या क्षेत्राला शाश्वतता आली पहिजे असा आपला सातत्याने प्रयत्न आहे.

महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे आणि येथे जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे.  त्याकरता इज ऑफ डुईंग बिजनेसच्या माध्यमातून अतिशय चांगले कार्य राज्य सरकारने केले. आणि त्याचा दृश्य परिणाम आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये देशामध्ये एकूण जी गुंतवणूक आली त्यापैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली. त्यासोबत इम्पलॉईज प्रोव्हीडंट फंड ऑर्गनायझेशनने (इपीएफओ) संघटीत क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीचे जे आकडे जाहीर केले त्यानुसार देखील सर्वात जास्त रोजगार हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे. मागील एक वर्षामध्ये 8 लाख रोजगार हा औपचारिक/ संघटित क्षेत्रात (फॉर्मल सेक्टर) महाराष्ट्रात तयार झाला आहे.

एससी, एसटी, ओबीसी या संदर्भात देखील महाराष्ट्राने विविध योजना तयार केल्या आहेत. अतिशय वेगाने समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचण्याचे काम आपण करतो आहोत. विशेषत: ‘सर्वांकरीता घरे’ या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर देण्याची संकल्पना मा. पंतप्रधानांनी मांडली आहे. ती संकल्पना पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आणि शहरी असो की ग्रामीण दोन्ही क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली आहे.

हे सगळे होत असताना महाराष्ट्राची ही आगेकूच अशीच होत रहावी, महाराष्ट्र सातत्याने पुढे जात राहावा, याकरीता महाराष्ट्राचे पुरोगामित्व हे देखील टिकविण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा महाराष्ट्र हा सातत्याने पुढे गेला पाहिजे. महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्द हा देखील टिकून राहिला पाहिजे. समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये याठिकाणी सौहार्द राहिला तरच महाराष्ट्र पुढे जाईल, सर्वांना सोबत घेवून वंचितांना आवश्यक त्याठिकाणी मदत करुन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये असीमीत शक्ती आहे. त्या शक्तीच्या आधारावर महाराष्ट्र आजपर्यंत या देशाचं ग्रोथ इंजिन राहिला आहे. भविष्यात देखील राहणार आहे,

या आपल्या स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी आपण सर्व लोक मिळून एवढाचं संकल्प करु. महाराष्ट्रातला सर्व समाज एका दिशेने चालावा यासाठी महाराष्ट्रातील वंचितांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ आणि एक अतिशय बलशाली महाराष्ट्र आपण निर्माण करुया. एक बलशाली भारत आपण निर्माण करुया!

भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी स्वप्ने आपण पाहिली होती, ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण करु, हा विश्वास आज या निमित्ताने मी व्यक्त करतो. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना, क्रांतिकारकांना आणि सीमेवर लढणाऱ्या आमच्या जवानांना, आमच्या किसानांना या ठिकाणी वंदन करुन आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.

जय हिंद…! जय महाराष्ट्र…!

पोलीस विभागाने पिंपरी चिंचवड येथील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे -पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे दि. १५: सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून पिंपरी चिंचवड येथील  नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आज कार्यान्वित झाले. प्रारंभी याठिकाणी श्री. बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

यावेळी श्री. बापट म्हणाले, पोलिसांनी लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून काम करावे.तसेच लवकरच नव्या इमारतीमध्ये पोलीस आयुक्तालयाचे काम सुरु होईल, असेही ते म्हणाले.पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन म्हणाले, पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना योग्य सेवा देवून पोलीस विभाग चोख सेवा बजावेल.

यावेळी खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त  श्रावण हर्डीकर, उपायुक्त विनायक ढाकणे, उपयुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त नमिता पाटील तसेच लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

शिवणे ते म्हात्रे पूल रस्ता अडकला लालफितेशाहीत

0
पुणे- शिवणे ते म्हात्रे पूल रस्त्याचे भूसंपादन आणि रुंदीकरण   विविध खात्यांच्या टोलवाटोलवीत अडकून पडल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केला आहे
या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून … पहा नेमके त्यात काय म्हटले आहे ,
मा सौरभ राव,
आयुक्त पुणे मनपा,
विषय – शिवणे खराडी रस्त्याचा शिवणे ते म्हात्रे पूल रस्ता अडकला लालफितेशाहीत / विविध खात्यांची टोलवाटोलवी/भूसंपादन रुंदीकरण लटकले/ नागरिकांच्या विरोधामुळे १० ऑगस्ट ला मोजणी ही थांबली….
मा महोदय,
काल आपण शिवणे खराडी रस्त्याबाबत आमदार जगदीश मुळीक यांच्यासह बैठक घेऊन विविध आश्वासने दिल्याचे समजले.याबद्दल आपले अभिनंदन.मात्र यामध्ये आपला भर खराडी भागातील भूसंपादनावर होता.मात्र शिवणे ते म्हात्रे पूल या रस्त्यासाठी मी तीन वर्ष पाठपुरावा करत असून एरंडवणे भागातील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आपणास साईट व्हिजिट साठी पाठपुरावा करत आहेतच.
मी एस एम एस द्वारे आपणास येथील गंभीर परिस्थिती ची कल्पना दिल्यावर आपण पथ विभागाचे श्री.अनिरुद्ध पावसकर यांना सूचना दिल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी मनपा मध्ये अतिरिक्त आयुक्त मा. राजेंद्र निंबाळकर यांनी सर्व जागा मालकांची बैठक घेतली.सदर बैठकीत निंबाळकर साहेबांनी डी पी नुसार रस्ता ३६ मीटर चा करण्यात येईल असे सांगून याबाबतचा संभ्रम दूर केला.तदनंतर त्यांनी जमीनमालकांना जागा ताबा देण्याबाबतचे आवाहन केले व प्रपोजल सादर केल्यावर जमिनीच्या मोबदल्यात सहा महिन्यात टी डी आर च्या स्वरूपात मोबदला देण्याचे वचन दिले.तसेच दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळपासून मोजणी करण्यास व ३६ मीटरचे मार्किंग करण्याबाबतच्या सूचना ही दिल्या.मात्र मोजणीच्या वेळी अनेक जमीन मालकांनी सिटी सर्वे व मनपा च्या संयुक्त मोजणीची मागणी केली व मोजणी प्रक्रिया थांबविली.पुन्हा पहिले पाढे पंचावन्न…..
साहेब हा रस्ता झाला तर कर्वे रस्ता व सिंहगड रस्त्यावरील ताण हलका होईल व नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल हे समजून घेऊन त्वरित खालील कार्यवाही केली जावी …
१) आपली ह्या रस्त्यास व्हिजिट व सर्व संबंधित खात्यांची एकत्रित बैठक.
२) मातोश्री वृद्धाश्रमासमोर एक भंगार चा व्यावसायिक मनपा च्या नोटिशींविरुद्ध न्यायालयात जातो आणि स्टे मिळवतो/पाच वर्ष हा स्ट अबाधित आहे/धन्य ते आपले विधी विभाग.आज तर येथे नवीन हिरवी शेड टाकण्यात आली आहे व तेथे नर्सरी सुरु होत आहे,उद्या हे सदगृहस्थ ही स्टे मिळवतील आणि रस्ता रुंदीकरण थांबेल हे सांगणे न लगे…. याच्याच शेजारी स्मार्ट सिटी चा फलक दिमाखात उभा आहे.
३) मॅजेंटा लान्स,पंडित फार्म,श्री सावरकर यांचे जमीन ताबा देण्याबाबतची संमतीपत्र असूनही अद्याप कार्यवाही होत नाही ही शोकांतिका आहे.
४) पी के बिर्याणी यावर गेल्या आठवड्यात कारवाई झाली मात्र मी वारंवार विनंती करून ही तेथे त्वरित रस्त्याचे काम सुरु न केल्याने पुन्हा शेड उभे राहिले.
५) नवसह्याद्री विरुद्ध पुणे मनपा हा दावा ही दीर्घ काल उच्चं न्यायालयात प्रलंबित आहे,एकूणच विधी खात्याच्या कारभाराबद्दल शंका यावी अशीच परिस्थिती आहे.
६) सर्वे न ४३/१५ व सर्वे न ४७/२/३ नवसह्याद्री पोस्ट ऑफिस समोर च्या डी पी रस्त्यामध्ये बाधित लाभार्थींचे व म्हात्रे पुलाखालील बाधित १४ खासगी मिळकतधारक लाभार्थींचे बी एस यु पी अंतर्गत स्थलांतर झाले आहे,मात्र अद्याप येथे ताबा घेण्याबाबत मनपा च्या विविध खात्यांची टोलवाटोलवी सुरु आहे.
७) सिद्धी गार्डन येथून हा रस्ता म्हात्रे पुलाखालून नदी पात्रातील रस्त्याला जोडणे अपेक्षित आहे मात्र याबाबत ही काहीच हालचाल होताना दिसत नाही.
तरी कृपया त्वरित याबाबत निर्णय घ्यावा व प्रत्यक्ष अडचणी दूर करून कार्यवाही करावी ही नम्र विनंती,
आपला,
संदीप खर्डेकर.
मो 9850999995.
उपाध्यक्ष ,भारतीय जनता पार्टी पुणे.

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकार पुरस्कार प्रदान

0

पुणे4- आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ तसेच माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले आणि माजी न्‍यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. पुण्‍याच्‍या  विनोद विद्यापीठ येथे आचार्य अत्रे  स्मृती प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्‍कार  देण्‍यात येतो.

राजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याला जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. राजेंद्र सरग यांना यापूर्वी महाराष्‍ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तसेच इतर पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

आचार्य अत्रे  मराठी संस्कृती जपणारे एक बहुगुणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार ज्या मान्यवरांनी स्वीकारले त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. आचार्य अत्रे ह्या नावाचे वलय प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारण, साहित्य, समाजकारण, नाटक, चित्रपट, लेखक अशा विविध कलागुणांनी  समृध्‍द असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अत्रे, असे प्रतिपदन निवृत्त न्यायमूर्ती श्री. प्रमोद कोदे यांनी केले.

कार्यक्रमात नाट्यकर्मी अशोक समेळ, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबुराव कानडे, शाल्‍मली कुलकर्णी  आदींची उपस्थिती होती

निवृत्त न्यायमुर्ती श्री. कोदे म्हणाले, आचार्य अत्रे ही व्यक्ती मराठी मनांवर अधिराज्‍य  गाजवते. मराठी संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. हास्याचा बुध्दीशी संबंध आहे त्यामुळेच विनोद निर्माण  करणारी व्यक्ती बुद्धीवंत असते. आजच्या युगात हसण्यावर मर्यादा येत आहे, पण पोटभर हसणे गरजेचे आहे. व्यंग किंवा विनोद जीवघेणा नसावा याचे भान असले पाहिजे.  हसणे ही जीवनाची संजीवनी आहे.  प्रारंभी आचार्य अत्रे यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी अनेक रसीक उपस्थित होते.

सासर आणि माहेरला जोडणारा मुलगी हा दुवा – मुनिश्री पुलकसागर महाराज

0
पुणे-आई-वडिल होणे विशेषत: मुलीचे पालक असणे ही वाटते इतकी सोपी गोष्ट नाही. ती एक तपस्या असते. कारण मुली या दोन कुटुंबाना जोडणारे माध्यम असते. त्यांना दोन कुटुंबाना जोडायचे असते. त्यामुळेच आपल्या मुलींना चांगले संस्कार देणे ही तिच्या माता-पित्यांचे प्रमुख कर्तव्य असते. तुम्ही दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळेच तुमच्या मुलीचे घर, तिचा संसार सुखी होतो. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीवर कुटुंब तोडणारे नव्हे, तर कुटुंब जोडणारे संस्कार घडतील याबाबत दक्ष असले पाहिजे,” अशा शब्दांत डिगंबर जैन मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी मुलींवर चांगले संस्कार घडविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफतांना ‘बेटी का घर’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, चकोर गांधी, सुजाता शहा, सचिव जितेंद्र शहा हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलाने झाली. पूर्वा शहा डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी मंगलाचरण सादर केले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनिश्री म्हणाले, घरात आनंद पैशांनी नाही येत. चांगल्या स्वभावाने, चांगल्या आचरणाद्वारे येते. दोन कुटुंबाना जोडणार्याय मुलींचे आचरण चांगले असेल, त्यांचा स्वभाव मधूर असेल. आपल्या कुटुंबियांची मनापासून सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असेल तर नक्कीच त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळेल. तिच्या घरच्यांकडून, समजातील नागरिकांकडून तिला आदराची वागणूक मिळेल. त्यामुळेच मुलींवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. मुलींना असे संस्कार दिले पाहिजे की समोर येईल त्या प्रत्येक परिस्थीतीशी ती सामना करू शकेल, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्तींशी जुळवून घेत त्यांना आपलेसे करण्याची क्षमता तिच्यामध्ये येईल. त्यामुळे मुलींचे व्यक्तीमत्व सर्वगुणसंपन्न बनेल याची काळजी तिच्या पालकांनी घेतली पाहिजे.”
अनेकदा मुलींना त्या काय करतात? कोणते कपडे घालतात? कोठे जातात? याबाबत नेहमी पालकांकडून विचारणा होत असते. मुलींना बरेचदा ही विचारणा म्हणजे बंधन वाटत असते. मात्र आई-वडिलांची विचारणा ही बंधन नसून ती त्यांची तुमच्याप्रती असणारी काळजी असते. आपली मुलगी सुरक्षित असावी हीच भावना त्या विचारण्यामागे असते. ही बाब मुलींनी लक्षात घेतली पाहिजे, असेही मुनिश्री यांनी सांगितले. समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.30 ते 10 यावेळेत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. या चातुर्मासानिमित्त आर एम धारिवाल फाउंडेशनतर्फे 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर एम धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

पोलिसांची यात्रेतील पाळणे वाल्यांना ‘अर्थपूर्ण ‘ताकीद ?

0
ओतूर –
ओतूरचे ग्राम दैवत श्री कपर्दिकेश्वर यात्रा दरवर्षी श्रावण महिण्यात मोठ्या प्रमाणात भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लाखो भाविक ओतूर ( ता.जुन्नर ) मध्ये दाखल होतात.
यात्रेत पाळणेवाले,फुगेवाले,खेळणीवाले,मनोरंजनाचे खेळ करणारे तसेच हॉटेल व्यावसायिक दुरवरून दरवर्षी छोटे मोठे व्यसायिक व्यवसायाच्या निमित्ताने ओतूरमध्ये येतात.दरम्यान सोमवारी (दि.१३)पहिला श्रावणी सोमवार व यात्रेचा पहिला दिवस होता.मात्र दुपारपर्यंत पाळणे बंद असल्याने येणा-या यात्रेकरुंनी याबाबत चर्चा सुरु केली व हा विषय संबंधीत पाळणेवाल्यांसोबत विचारना केली असता पोलिसांनी पाळणे सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी ४० हजार असे १ लाख ६० हजार रुपयाची मागणी झाल्याचे समजते.यामुळे पाळणे बंद ठेवण्यात आले होते पैशांची मागणी केली असल्याने पैसे दिले नाहीत म्हणुन पाळणे बंद आहेत हा प्रकार काही ग्रामस्थांच्या कानावर गेला व पैसे दिले तरच पाळणे चालु ठेवा असा दमच जणु पोलिसांनी पाळणे वाल्यांना दिला अशी चर्चा गावभर झाली.
एवढ्या दुरवरून येणाऱ्या व्यावसायिकांना एवढी रक्कम द्यायची कशी आणि कुठुन असा प्रश्न पडला. त्यानंतर सर्व व्यावसायिकांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन सबंधित अधिकाऱ्याकडे धाव घेतली सबंधित अधिकाऱ्याने आमच्या माणसांबरोबर (कर्मचाऱ्याशी)  काय ? ते ….बोला !  असे सांगीतले.पोलिस तडजोड करण्यासाठी तयार नसल्याने सबंधित पाळणेवाल्यांनी श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे काही पदाधिकारी,ओतूरचे सरपंच,श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ओतूर येथील पत्रकारांना या बाबतची हकिकत सांगीतली.व त्यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनाही सबंधित पाळणेवाल्यांकडे पैशाची मागणी करतात अशी तक्रार गेली.त्यानंतर ताबडतोब आमदारांनी ओतूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांंना या बाबत जाब विचारणा केल्यावर पोलिसांनी लागलीच काढता पाय घेऊन शेवटी आमदारांनी फोन केल्यावर या पाळणेवाल्यांचे पाळणे सोमवारी सायंकाळच्या सुमारास सुरू झाले.मात्र या घटनेमुळे ओतूर पोलिसांबद्दल नागरिकांमधे नाराजीचा सुर निघत असुन याबाबत पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान सदर घटनेबाबत ओतुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे यांची पोलिस ठाण्यात भेट घेऊन प्रतिक्रीया मागितली असता याबाबत त्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले.

रिक्षावाल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ – पालकमंत्री गिरीश बापट

0

रिक्षा संघटनांची लवकरच बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

पुणे: रिक्षा चालकांचे आणि सामान्य नागरिकांचे एक विशिष्ट नाते असते. रिक्षावाला हा शहरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख आदरानेच केला पाहिजे. रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र रिक्षा चालक महामंडळ स्थापन केले आहे परंतु, अद्याप त्याचे काम सुरु झाले नाही. राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने सर्व रिक्षा संघटनांसोबत तत्काळ बैठक लावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिले.

शिवनेरी प्रतिष्ठान व शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, मानेकर सर, रिक्षा चालकांना मदत करणारे अजय दिक्षित, कराटे प्रशिक्षण देणारे रिक्षा चालक ज्ञानेश्वर सोनवणे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आणि रिक्षा चालकांच्या गुणवंत मुलांचा सत्कार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, लकी ड्रॉ काढण्यात आला. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, शिवनेरी प्रतिष्ठान व रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, आबा बाबर, भाजप माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश धाडवे, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, रोटरी क्लबचे ललित बोत्रा, नितीन किरीड, मराठा महासंघाचे अविनाश ताकवले, भाई शिंदे, संदीप आचार्य, अजय दीक्षित, किरण कद्रे, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.       नव्हे अहो रिक्षावाले म्हणा!

रिक्षावाल्यांच्या चांगुलपणा, प्रामाणिकपणाचे कौतुक करतानाच बापट यांनी रिक्षा चालकांमधील व्यसनाधिनतेविषयी चिंता व्यक्त केली. त्याविषयी संघटनांमार्फत काम करण्याची आवश्कता असल्याचेही ते म्हणाले. रिक्षा चालक आणि माझे नाते 40 वर्षे जुने आहे. पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा पहिली संघटना रिक्षा चालकांची सुरु केल्याची आठवण बापट यांनी सांगितले. देश आणि समाज चालविण्यामध्ये मोठ्या पदावर काम करणारी मंडळी जशी महत्वाची आहेत तशीच रिक्षा चालकांसारखी लोकंदेखील महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा उल्लेख न करता अहो रिक्षावाले म्हणाले.

२३ गावांमधील रस्तारुंदीसाठी आयुक्तांनी आठ दिवसात फेरप्रस्ताव द्यावा -आबा बागुल यांची मागणी

0
पुणे –
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका आयुक्तांनी तातडीने आठ दिवसात फेरप्रस्ताव सादर करावा अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे शिवाय २३ गावांमधील रस्ता रुंदीला चालना देण्याऐवजी स्थायी समितीने प्रशासनाचा सकारात्मक प्रस्ताव फेरअभिप्रायाला पाठविण्याच्या निर्णयालाबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. 
 
 याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि , सद्यस्थितीत समाविष्ट २३ गावांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून जुन्या विकास आराखड्याप्रमाणे बांधकामांना परवानगी दिली जात आहे,वास्तविक हा प्रकार चुकीचा आहे . ज्यावेळी २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळी या गावांमधील रस्ते दीडपट रुंद करण्याची मागणी भविष्यातील वाढत्या लोकसंख्या आणि नियोजनाच्यादृष्टीने करण्यात आली होती. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकही झाली होती. या गावांचा विकास आराखडा करताना रस्तारुंदी कमी दर्शविण्यात आली होती.त्यामुळे नियोजित रस्ता रुंदीसंदर्भांत  विषय  मांडण्यात आला होता मात्र स्थायी समितीने तो खाससभेकडे वर्ग केला होता. मात्र आता प्रशासनाने रस्तारुंदी आवश्यक असल्याचा  प्रस्ताव सादर केलेला असताना तो फेरअभिप्रायाला पाठविण्याचा स्थायी समितीने घेतलेला निर्णय चुकीचा आहे; मग कशाच्या याआधारे पुणे राहण्यासाठी देशात अव्वल ठरले आहे हा एक संशोधनाचा भाग आहे याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.   गेली नऊ  वर्षे नियोजित रस्ता रुंदी आणि गावांचा विकास यासाठी पाठपुरावा करीत  असताना अरुंद रस्ते ,वाढणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक बनले आहे अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी त्यांचा प्रस्ताव चुकीचा नाही हे सिद्ध करण्यासाठी येत्या आठ दिवसात फेरप्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे. 

पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

0

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे पोलीस पोलीस
अधीक्षक तथा नियंत्रक सारंग दादाराम आवाड यांना पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल
दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
१९९६ साली जिल्हा पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत रुजू झालेले सारंग आवाड यांनी
आपल्या सेवेची सुरूवात इस्लामपूर (सांगली) येथून केली. पोलीस उपायुक्त म्हणून ठाणे
शहरात काम पहिले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पुणे या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून
काम पहिले. या कालावधीत त्यांनी विक्रमी ३७३ गुन्ह्यामध्ये सापळा रचून कारवाई केली.
त्याचप्रमाणे पुणे येथे वाहतूक विभागात पोलीस उपायुक्तपदी असताना विक्रमी मोटार वाहन
कायद्याअंतर्गत कारवाई केली.
प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरा वापरून दोषी वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा त्यांनी
उगारला. राज्य राखीव पोलीस गात क्रमांक दोन येथे कमांडंट असताना त्यांनी गट दोनला
प्रथम आयएसओ मानांकन मिळऊन दिले. या उत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून
त्यांचे कौतुक होत आहे.

‘सोनी मराठी’टीव्हीवर नव्या वाहिनीची प्रेक्षकांना भेट; मराठी चित्रपटांना हि नवे व्यासपीठ

मुंबई-झी मराठी,झी युवा ,कलर्स मराठी ,स्टार प्रवाह अशा विविध मराठी वाहिन्या टीव्हीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून असताना आता मराठी टीव्हीच्या  वर्तुळात सोनी या प्रख्यात वाहिनीने आपला झेंडा रोवला आहे . जो १९ ऑगस्ट पासून फडफडणार  आहे. निव्वळ महिलांमधील कुरघोड्या  मध्ये अडकून न रहाता ,घरातील महिला सोबत तरुणाई ,प्रौढ ,वृद्ध असा सर्व समावेश प्रेक्षक वर्ग खेचण्यासाठी या वाहिनीने नियोजन केले असून ,प्रस्थापित मराठी वाहिन्यांच्या मालिका आणि कार्यक्रमातील नेमक्या त्रुटी आणि उणीवा लक्षात घेवून ,त्यांनी जोडलेला ठराविक प्रेक्षक वर्गाची सीमारेषा ओलांडून टीव्ही पासून दूर राहिलेला प्रेक्षक देखील कसा टीव्ही पुढे आणता येईल याचा विचार करून सोनी मराठी ने आपल्या मालिकांची निर्मिती केली आहे . आतापर्यंत १०० मराठी चित्रपटांचे हक्क या नव्या वाहिनीने घेतले असून ,या वाहिनीमुळे मराठी चित्रपटांना नवे व्यासपीठ उपलब्ध होत आहे .तूर्तास प्रारंभी  गुन्हे विषयक आणि राजकारण या विषयाला सोनी मराठी ने हाथ घातलेला नसला तरी आगामी काळात त्यावरही चांगली निर्मिती करण्याचा मानस असल्याचे भारतातील सोनी पिक्चर्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक एन पी सिंग आणि सोनी मराठी या नव्या वाहिनीचे बिझनेस हेड अजय भालवणकर यांनी येथे सांगितले .

मुंबईतील जुहूतारा मधील मेरियट हॉटेल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या दोघांनी हि माहिती दिली .आणि आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ ह्या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठ राहत Sony मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्नअसेल.वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषयमांडणी असलेल्या ९ कथा मालिका (Fiction) आणि २कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) Sony मराठी सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द करेल असे सांगून त्यांची नावे ट्रेलर सह घोषित केली
कथा मालिकांमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘ह.म.बने तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘तीफुलराणी’, ‘दुनियादारी फिल्मी इष्टाईल’, ‘Year Down’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हृदयात वाजेSomething’, ‘गर्जा महाराष्ट्र’ह्यांचा समावेश आहे.Sony मराठी सर्व मुख्य डायरेक्ट टू होम (DTH) आणि डिजिटल केबल प्लॅटफॉर्म्सवर उपलब्धअसेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड…

आज राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक पार पडली यावेळी पुणे आणि इतर जिल्ह्यांतील शहाराध्यक्षांची निवड करण्यात आली  पालिकेतील विरोधी पक्षनेते  चेतन तुपे यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली..शहरअध्यक्ष पदासाठी अनेक जन इच्छुक होते..गेली कित्येक दिवस शहराध्यक्ष पदासाठी  कोणाची निवड होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर आज चेतन तुपे यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली .. पक्ष्याध्यक्ष शरद पवार यांनी  टाकलेल्या जबाबदाऱ्या पक्षाची ध्येय धोरण पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि सर्वाना बरोबर घेऊन पक्षाचं काम तळागाळातील जन्मानसंपर्यंत पोहचवून  पक्ष भक्कम करण्याचा मी भविष्य काळात प्रयत्नशील राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली..

पुण्यातील येरवडा महिला जेलमधील स्थापन केले लॉकसेट सब अॅसेम्ब्ली युनिट

0

महिला कैद्यांना कौशल्ये व रोजगार देण्यासाठी समूहाने येरवडा सेंट्रल प्रिझनशी केला सहयोग

सारांश

·         तुरुंगातील महिला कैद्यांना कौशल्ये देण्यासाठी स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप आणि येरवडा सेंट्रल प्रिझन, पुणे यांच्यामध्ये सीएसआरचे सरकारी-खासगी भागीदारी मॉडेल.

·         ऑटोमोटिव्ह लॉकसेट सब अॅसेम्ब्लीचे उत्पादन करणार.

·         समूह सुरुवातीला 25 – 30 महिला कैद्यांना कच्च्या मालापासून फिनिश्ड गुड्सच्या अॅसेम्ब्लीपर्यंत डेडिकेटेड शॉप फ्लोअरवर काम करण्याचे प्रशिक्षण देणार.

·         भारतातील तुरुगांमध्ये स्पार्क मिंडा, अशोक मिंडाने सुरू केलेला 5वा प्रकल्प.

पुणे: स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपने जेल आवारातील महिला कैद्यांमध्ये ऑटोमोटिव्ह लॉकसेट सब-अॅसेम्ब्ली उत्पादनाचे युनिट बसवण्यासाठी व स्थापन करण्यासाठी पुण्यातील येरवडा सेंट्रल प्रिझनशी सहयोग केला आहे. तुरुंगामध्ये ऑटोमोटिव्ह लॉक पार्ट्स युनिट सुरू केल्याने महिला कैद्यांना मूलभूत रोजगार मिळवता येईल आणि ऑटोमोटिव्ह लॉक्सचे उत्पादन व फिनिशिंग यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये साध्य करता येतील.

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपची (NSE: MINDACORP, BSE: 538962) प्रमुख कंपनी असलेल्या मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेडने निश्चित केलेल्या निकषांनुसार, येरवडा जेलमधील विशेष महिला सेलमध्ये 25 – 30 महिला कैद्यांची निवड करण्यात आली आहे. महिला कैद्यांना ऑटोमोटिव्ह लॉकसेटची निर्मिती करण्यासाठी शॉप फ्लोअरवर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. समूह जेल अधिकाऱ्यांकडे कम्प्लायन्स वेजेस देतील आणि जेल अधिकारी ते पैसे कैद्यांना देतील. ग्राहकांना पुरवठा करण्याव्यतिरिक्त, ही उत्पादने आफ्टर-मार्केटमध्येही विकली जातील.

मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड “एमसीएल” आणि येरवडा सेंट्रल प्रिझन, पुणे यांच्यामध्ये 15 फेब्रुवारी, 2018 रोजी परस्पर सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. एमओयूच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये, लॉक सेट्सचे उत्पादन करण्यासाठी ऑटोमोटिव्ह उत्पादन अॅसेम्ब्लीची स्थापना करण्याचा समावेश आहे. एमसीएल येरवडा जेलमध्ये उत्पादनाची मूलभूत माहिती व मूलभूत प्रशिक्षण देणार आहे. सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत प्रिझन प्रकल्प हा समूहाने आतापर्यंत औरंगाबाद, तिहार व येरवडा येथे सुरू केलेल्या सीएसआर उपक्रमांचाच विस्तार आहे. विशेष उत्पादन प्रकल्प स्थापन केल्याने समूहाला तयार वस्तूंचा पुरवठा केला जाईल, शिवाय महिला कैद्यांना जेलच्या आवारात व बाहेर रोजगार मिळवण्यासाठीही मदत होईल. स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपच्या सीएसआर उपक्रमांचा भाग म्हणून, जेलच्या आवारात नियुक्त केलेले एमसीएलचे अधिकारी व पर्यवेक्षक दैनंदिन काम करत असताना, प्रोत्साहनपर उपक्रमही आयोजित करणार आहेत. जसे, सर्वोत्तम कर्मचारी, कार्यक्षम लाइन, सर्वोत्तम सूचना निवडणे व WOW उपक्रमाचे कौतुक करणे.

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपने एमओयूनुसार, येरवडा जेलमध्ये संपूर्ण मशीनरी, कच्चा माल, वस्तूंची वाहतूक आणि गुणवत्ताविषयक अन्य व्यवस्था व प्रक्रिया अशी गुंतवणूक केली आहे. एमसीएलच्या देखरेखीखाली जेलमधील कैदी शॉप-फ्लोअर चालवणार व सांभाळणार आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना, स्पार्क मिंडाअशोक मिंडा ग्रुपचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक मिंडा म्हणाले,आम्ही नेहमी निरनिराळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतो. समूहाने उत्पादन प्रकल्प स्थापन करणे व जैलमधील कैद्यांना सहभागी करून घेणे, हा जेलमधील कैद्यांचे जीवन सुधारण्यासाठी, तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये व्यवसायविषयक मूल्ये रुजवण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या विशेष पद्धतींचा एक भाग आहे. कैद्यांना रोजगार मिळण्याच्या हेतूने सुरू केलेल्या आमच्या सामाजिक उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी देण्यासाठी वायसीपी अधिकारी सहकार्य करतात व प्रोत्साहन देतात. स्त्री हा खऱ्या अर्थाने समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि स्त्रीला सबल केल्यास संपूर्ण समाज सबल होऊ शकतो, तसेच आगामी पिढ्यांमध्येही स्त्रीची भूमिका महत्त्वाची असते. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही करत असलेल्या छोट्याशा प्रयत्नामुळे जेलमधील कैद्यांच्या मानसिकतेत बदल आणण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.”

उद्घाटनाविषयीस्पार्क मिंडा फाउंडेशनच्या अध्यक्ष सारिका मिंडा यांनी सांगितले, “आम्ही बऱ्याच वर्षांपासून तुरुंग अधिकाऱ्यांबरोबर काम करत आहोत आणि आतापर्यंत औरंगाबाद जेल, तिहार जेल व येरवडा जेल यांबरोबरचे आमचे काम सुरळित सुरू झालेले आहे. आम्ही आता असंख्य कैद्यांना कौशल्ये व रोजगार उपलब्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत, कैद्यांना नोकरी दिल्याने त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत होतेच, शिवाय त्यांना उद्योग क्षेत्राची माहिती होती व स्वतःच्या उत्पादकतेचीही जाणीव होते. आमचे असे सामाजिक कल्याणाचे उपक्रम राबवण्यासाठी नेहमी सहकार्य करणाऱ्या येरवडा जेलमधील अधिकाऱ्यांचे विशेष आभार. आमच्या समूहाने सुरू केलेल्या प्रिझन प्रोजेक्ट्सना, सीएसआर टाइम्सने देशातील सर्वात नावीन्यपूर्ण सीएसआर मॉडेल म्हणून गौरवले आहे आणि यासाठी आमच्या फाउंडेशनचा सन्मान करण्यात आला. महिला कैद्यांची कार्यक्षमता आम्ही ओळखतो आणि ती कधीही केवळ घरगुती कामांपुरती मर्यादित नसेल”.

जेलची शिस्त अबाधित राखण्यासाठी, सर्व कामे सुरळीत होण्यासाठी कच्चा माल आतमध्ये आणणे व तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणे, या गोष्टी मिंडा कॉर्पोरेशनच्या नियंत्रणात ठेवण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना जेलमध्ये नियुक्त केले आहे; त्यामुळे समन्वय साधला जाईल आणि प्रक्रिया दर्जदार पद्धतीने केली जाईल. कंपनीच्या गरजांनुसार व्यवस्था व धोरण राबवले जात असल्याची दक्षता घेण्यासाठी, व्यवस्थापनाची टीम या युनिटला वेळोवेळी भेट देईल.

स्पार्क मिंडा येथील सीएसआर

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप गेली काही दशके सामाजिक विकासाचे उपक्रम राबवत आहे. वायसीपी प्रकल्प हा समूहाचा चौथा जेलबरोबरचा उपक्रम आहे. पहिला उपक्रम सन 2005 मध्ये, जर्मनीतील ड्रेसडन जेल येथील प्लास्टिक पार्ट्ससाठी सुरू करण्यात आला. अशाच प्रकारचा एक प्रकल्प तिहार जेलमध्ये एप्रिल 2014 मध्ये वायर हार्नेस अॅसेम्ब्लीसाठी आणि नंतर औरंगाबादमध्ये 2016 मध्ये लॉक बॉडी अॅसेम्ब्ली युनिटसाठी सुरू करण्यात आला. दिवंगत एस. एल. मिंडा यांनी, मोगा देवी मिंडा चॅरिटेबल ट्रस्ट याअंतर्गत सन 1987 मध्ये समूहाच्या सीएसआर प्रकल्पांची सुरुवात केली. मिंडा बालग्राम – निराधारांसाठी बालगृह; एस. एल. मिंडा सेवा केंद्र – कौशल्य प्रशिक्षण केंद्र; मोगा देवी मिंडा मेमोरिअल स्कूल – गावातील शाळा आणि एस. एल. मिंडा स्पोर्ट्स अकॅडमी हे काही ट्रस्टचे प्रमुख उपक्रम आहेत.

एक जबाबदार कॉर्पोरेट हा वारसा जपत असताना, समूहातील सीएसआर उपक्रम पीपल, प्लॅनेट व प्रॉफिट या ट्रिपल बॉटम लाइन मॉडेलपासून प्रेरित आहेत. सामाजिक कल्याण व पर्यावरणाची शाश्वतता या मुख्य संकल्पनेच्या मदतीने सीएसआर उपक्रमांचे नियोजन केले जाते व संपूर्ण समूहात अंमलबजावणी केली जाते. प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या व सहयोगात्मक उपक्रमांचा लाभ नेहमी समाजाला होतो. मिल्येनिअम डेव्हलपमेंट गोल व कंपनी कायदा, 2013 अंतर्गत सीएसआर यांच्यापासून प्रेरणा घेऊन, समूहामध्ये सध्या पुढील प्रमुख मुद्द्यांसंदर्भात काम केले जाते – शिक्षण;व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगाराला चालना; आरोग्य व स्वच्छता; विशेष व्यक्ती असलेल्यांना पाठिंबा; पर्यावरणविषयक शाश्वतता व महिला सबलीकरण. सीएसआर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी, समूहाने स्पार्क मिंडा फाउंडेशनची स्थापना केली आहे.

स्पार्क मिंडा फाउंडेशन ही कंपनी कायदा, 2013 मधील कलम 8 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली कंपनी असून ती मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (NSE: MINDACORP, BSE: 538962) या स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुपच्या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह व प्रमुख कंपनीची 100% उपकंपनी आहे. समूहाचे सध्या सुरू असलेले बहुतेकसे समाज विकास प्रकल्पस्पार्क मिंडा फाउंडेशनअंतर्गत चालवले जात आहेत. स्पार्क मिंडा फाउंडेशनअंतर्गत, प्रमुख समाज विकास प्रकल्प उत्तर प्रदशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्धा नगर, तामिळनाडूतील पल्लईपक्कम जिल्हा व उत्तरखंडातील उपनगरी भाग व महाराष्ट्रातील राजगुरूनगर येथे सुरू आहेत. दर्जेदार अंमलबजावणी व घटक असलेले हे प्रकल्प प्रामुख्याने बालके, युवक व महिला यांच्यासाठी फायदेशीर आहेत.

स्पार्क मिंडाअशोक मिंडा ग्रुपविषयी

स्पार्क मिंडा, अशोक मिंडा ग्रुप ही ओईएमसाठी एक आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक असून, समूहाचे मुख्यालय भारतात नवी दिल्लीनजिक गुरगाव येथे आहे. समूहाची स्थापना सन 1958 मध्ये, दिवंगत एस. एल. मिंडा यांनी केली आणि आज या समूहाला ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक म्हणून अंदाजे 60 वर्षांची परंपरा आहे. हा समूह पुढील तीन श्रेणींतील एक आघाडीचा ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे – सेफ्टी, सिक्युरिटी अँड रिस्ट्रेंट सिस्टीम;ड्रायव्हर इन्फर्मेशन अँड टेलिमॅटिक्स व प्लास्टिक इंटिरिअर्स. हा समूह सर्व प्रमुख प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, मोटरसायकल व स्कूटर, ऑफ-रोड व्हेइकल्स आणि भारत व परदेशातील – युरोप, एनएआर, सीआयएस व आशियायी देश – टिअर 1 उत्पादक यांना 35 अद्ययावत उत्पादन प्रकल्पांद्वारे सेवा देत आहे. तसेच, समूह अंदाजे 500 डीलरच्या डीलर डिस्ट्रिब्युटरशिपद्वारे भारतातील आफ्टर मार्केट श्रेणीला सेवा देतो. समूहाने अमेरिका, जपान, इटली व उझबेकिस्तान येथील अनेक आघाडीच्या कंपन्यांशी विविध संयुक्त भागीदारी केली आहे.