कलेमध्ये सफलता नव्हे तर सार्थकता महत्वाची: वाजपेयी
सिंधू सेवा दलाच्यावतीने रुग्णांसाठी रुग्णपयोगी साहित्य भेट
पुणे-सिंधू सेवा दलाच्यावतीने रुग्णांसाठी रुग्णपयोगी साहित्य भेट देण्याचा उपक्रमाचे उदघाटन प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. बलदेव दुधानी यांच्याहस्ते करण्यात आले .भवानी पेठमधील पदमजी कंपाउंड येथील सिंधू सेवा दलाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी , उपाध्यक्ष अशोक वासवानी , सचिव सचिन तलरेजा , खजिनदार पुरुषोत्तम परियानी, सहसचिव परमानंद भटिजा , सदस्य पीटर दलवानी , रमेश लालचंदानी , रमेश छाब्रिया , सुरेश फेरवानी , मनोहर फेरवानी आदी मान्यवर उपस्थित होते .
या उपक्रमामध्ये रुग्णांना व्हीलचेअर , वॉकर , काठी , बेड पॅन , वॉटर बेड , युरीन पॉट ,बेडशीट व गादी देण्यात येणार आहे . ज्यांना हे रुग्णपयोगी साहित्य हवे असल्यांस त्यांनी .भवानी पेठमधील पदमजी कंपाउंड येथील सिंधू सेवा दलाच्या कार्यालयात येऊन कार्यालयीन सचिव वर्षा मोहीनानी मोबाइल ९०४९४६४१५१ कार्यालयीन दूरध्वनी – ०२० – २६३३३१५६ यावर संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .
यावेळी प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. बलदेव दुधानी यांनी सांगितले कि , सिंधू सेवा दल समाजपयोगी कार्य करीत आहे . रुग्णांसाठी रुग्णपयोगी साहित्य भेट देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे . याचा लाभ रुग्णांनी जरूर घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक वाधवानी यांनी केले तर आभार रमेश लालचंदानी यांनी मानले .
मुलिंची हत्या न करता सन्मान करा – मुनिश्री पुलकसागरजी महाराज
सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आरोपीने बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले, तसेच या खुनाच्या अनुषंगाने अधिक चौकशीसाठी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
सीबीआयने सचिन अंदुरेला काल दाभोलकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरोपीला आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीमध्ये सचिनचे नाव समोर आले होते. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने सचिनला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते. आरोपीला कुठलाही पुरावा नसताना अटक केली असल्याचे सचिनचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांनी कोर्टात म्हटले.
तसेच पूर्वी सीबीआयने अटक केलेल्या वीरेंद्र तावडेच्या चार्जशीटमध्ये म्हटल्याप्रमाणे सचिनचे वर्णन नाही. तसेच त्या चार्जशीटमध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचा दाभोळकरांच्या खुनाशी संबंध असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सचिनला पुरावा नसताना अटक केल्याचे सलसिंगीकर म्हणाले. हा दावा सीबीआयच्या वकिलांनी खोडून काढला.
आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानचा हास्य-विनोद-आनंदमहोत्सव
आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आठवडाभर निरनिराळ्या सुप्रसिध्द विनोदी लेखकांना निमंत्रित करुन त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. याशिवाय समारोपाच्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पुण्याच्या विनोद विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची 120 वी जयंती 13 ऑगस्ट रोजी झाली. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेली 21 वर्षे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे आणि त्यांच्या सहका-यांच्या पुढाकाराने हा महोत्सव होतो.
हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते 7 ऑगस्ट रोजी झाले. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे, डॉ. शाल्मली कुलकर्णी, डॉ. शौनक कुलकर्णी, राजश्री दवणी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते. आचार्य अत्रे यांनी ज्या-ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिथे-तिथे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले, अशा शब्दात गोडबोले यांनी आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. श्रीमती गोडबोले यांनी मराठी साहित्यातील विनोद परंपरेचा व्यापक आढावा सादर केला. लिळा चरित्रातही विनोदाचे स्थान आढळून येते. संत काव्यात, संस्कृत नाटकातही विनोद आढळून येतो. बाईने चेष्टा करणे तत्कालिन समाजाला मान्य नसल्याने संस्कृत नाटकात विदूषक हा पुरुषच दिसून येतो. लोकसाहित्यातील उखाणे, जात्यावरील गाणी हे विनोदाचेच एक अंग आहे. विनोदी परंपरा प्राचीन असल्याचे सांगून विनोदासाठी उत्स्फूर्तता आणि बुध्दीमत्ता लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शि. म. परांजपे, ह.ना.आपटे, श्री.कृ. कोल्हटकर, रा. ग. गडकरी, चिं.वि. जोशी, दत्तू बांदेकर, पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी विनोदी साहित्याला दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. यावेळी गोडबोले यांनी विनोदी प्रसंग, किस्से सांगून विनोदाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट केले.
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे यांनी प्रास्ताविकात हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू सांगितला. आचार्य अत्रे म्हणजे हास्याचा विश्वव्यापी गडगडाट आणि खळखळाट होते. हशा आणि टाळ्यांचे अभेद्य समीकरण होते. अभिजात विनोद, निखळ विनोद, अतिशयोक्तीपूर्ण विनोद, सामाजिक, राजकीय दोषांचे विश्लेषण करणारा विनोद, स्वभावनिष्ठ विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, कल्पनानिष्ठ विनोद असे इतर कोणीही एकत्रितरित्या न हाताळलेले विनोदाचे निरनिराळे प्रकार आचार्य अत्रे यांनी हाताळले म्हणूनच त्यांना विनोदसम्राट म्हणतात. आचार्य अत्रे एकमेव-अद्वितीय असे व्यक्तिमत्व होते. आचार्य अत्रे म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभेची गरुडझेपच होती. त्यांचा जन्म दिन 13 ऑगस्ट हा अखिल भारतीय मराठी विनोद दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे अॅड. कानडे यांनी सांगितले.
सुभाष खुटवड, मुकूंद टांकसाळे, श्रीकांत बोजेवार, डॉ. आनंद देशपांडे, श्रीपाद ब्रम्हे या सुप्रसिध्द विनोदी लेखकांनी या हास्य-विनोद-आनंदमहोत्सवात हजेरी लावली. आपल्या व्याख्यानात जीवनाची वाटचाल, आलेले अनुभव, विनोदाचे महत्त्व, आचार्य अत्रे यांचे विविध क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.
पुरस्कार वितरणप्रसंगी माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, नाट्यकर्मी अशोक समेळ, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे उपस्थित होते. कवी केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार सूर्यकांत वैद्य, आद्य विडंबनकार आचार्य अत्रे पुरस्कार विश्वास वसेकर, विनोदी लेखक आचार्य अत्रे पुरस्कार श्रीपाद ब्रम्हे, शिक्षणतज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार डॉ. राम ताकवले, पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रगती बाणखेले, उद्योगपती आचार्य अत्रे पुरस्कार राजेश मंडलिक, प्राचार्या सुधाताई अत्रे सामाजिक पुरस्कार राजश्री प्रसन्न दवणी, अक्षरवाङ्मय आचार्य अत्रे पुरस्कार आशीष चांदोरकर, बृहत आत्मचरित्र आचार्य अत्रे पुरस्कार अशोक समेळ, आचार्य अत्रे विशेष पुरस्कार देवदत्त गोपाळ अनगळ, सिध्दहस्त व्यंगचित्रकार आचार्य अत्रे पुरस्कार राजेंद्र सरग यांनी स्वीकारले. याशिवाय वक्ता दशसहस्त्रेषु आचार्य अत्रे पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक आचार्य अत्रे पुरस्कार अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे पुरस्कार प्रताप फड, सुवर्णपदक विजेते आचार्य अत्रे पुरस्कार प्रसाद ओक, रंगकर्मी हास्य अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार अतुल परचुरे, राजकीय कार्यक्षम कार्यकर्ता नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके आदींनी वितरित करण्यात आले.
न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांत विनोद आणि व्यंगचित्राचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, विनोद किंवा व्यंगचित्र केवळ हास्यरस निर्माण करत नाहीत तर ते समाजप्रबोधनही करत असते. हास्याचा बुध्दीशी संबंध आहे त्यामुळेच विनोद निर्माण करणारी व्यक्ती बुद्धीवंत असते. आजच्या युगात हसण्यावर मर्यादा येत आहेत, पण पोटभर हसणे गरजेचे आहे. व्यंग किंवा विनोद जीवघेणा नसावा याचे भान असले पाहिजे, असे नमूद करुन हसणे ही जीवनाची संजीवीनी असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद, व्यंगचित्र, विडंबन यामधून सामाजिक प्रबोधन कसे होईल, यावर अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
आचार्य अत्रे हे मराठी संस्कृती जपणारे एक बहुगुणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार ज्या मान्यवरांनी स्वीकारले त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. आचार्य अत्रे ह्या नावाचे वलय प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारण, साहित्य, समाजकारण, नाटक, चित्रपट, लेखक अशा विविध कलागुणांनी समृध्द असणारे व्यक्तीमत्व म्हणजे आचार्य अत्रे, असे न्यायमूर्ती कोदे म्हणाले. आचार्य अत्रे ही व्यक्ती आजही मराठी मनांवर अधिराज्य गाजवत आहे. मराठी संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. ‘मी कसा झालो’ हे त्यांचे पुस्तक आजच्या पिढीसाठी मागर्दशक असून तरूणांनी ते जरुर वाचावे, असे आवाहन न्या. कोदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे, डॉ. शाल्मली कुलकर्णी, शंकर डी. पाटील, डॉ. शौनक कुलकर्णी, अनिल अत्रे, अॅड. वसंतराव कर्जतकर आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
राजेंद्र सरग
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
दाऊद चा हस्तक जबीर मोतीला इंग्लंडच्या सुरक्षा एजन्सीने लंडनमध्ये घेतले ताब्यात
लंडन :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक जबीर मोतीला लंडनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. इंग्लंडच्या सुरक्षा एजन्सीने ही कारवाई केली आहे. भारतासाठी हे मोठं यश मानलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने जबीर मोतीच्या अटकेची मागणी केली होती
जबीर मोती पाकिस्तानी नागरिक आहे आणि तो डी-कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा प्रमुख मानला जातो. दाऊदच्या सगळ्या आर्थिक हिशेबांची माहिती असणाऱ्या मोतीला लंडनच्या हिल्टन हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले.
पाकिस्तानी नागरिक असलेला जबीर १० वर्षांच्या व्हिसावर इंग्लंडमध्ये राहत होता. जबीर मोती आणि दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावई जुनैद यांच्यातल्या आर्थिक देवाणघेवाणीच्या चौकशीनंतर जबीरवर ही कारवाई करण्यात आली. जबीर पाकिस्तान, मध्य पूर्व देश, इंग्लंड आणि युरोप, आफ्रिका आणि दक्षिण पूर्व आशियातल्या देशांमधली दाऊदची कामं सांभाळत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या देशांमधील व्यवसायांमधून होणारी कमाई आणि अवैध शस्त्रांची विक्री, अंमली पदार्थांचा व्यवसाय, रियल इस्टेट उद्योग, खंडणी आदी अन्य बेकायदा कामांमधून मिळणारे पैसै भारतविरोधी कारवायांसाठी वापरले जातात.
दाभोळकर हत्येचा सूत्रधार सीबीआय च्या दृष्टीक्षेपातच …
मुंबई -अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनी यश आले आहे. हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या चौकशीतून त्यांच्यापैकी एकाचा दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट संबंध असल्याचे उघड झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन प्रकाशराव अंदुरे याला सीबीआयच्या पथकाने शनिवारी औरंगाबाद येथून अटक केली. सचिन अंदुरे हा एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर याचा खास मित्र आहे. सचिन त्याच्या वारंवार संपर्कात होता. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल शरद याने दिली होती. वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्याकडे अनेक नंबर प्लेटस सापडल्या. यापैकी कोणती नंबर प्लेट वापरली आहे का याचा तपास एटीएसचे अधिकारी करीत आहेत. सचिन अंदुरे हा देखील हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असून त्यानेच दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणातील मुख्य आरोपी सारंग अकोलकर अद्याप फरार आहे. मात्र आता दाभोळकरांच्या हत्येचा खरा सूत्रधार आता सीबीआय च्या नजरेच्या टप्प्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .ज्याला पकडणे फारसे अवघड उरलेले नाही .आणि सीबीआय यावर काय कारवाई कशा पद्धतीने करेल हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये दाभोलकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा आला होता. तेव्हापासून एटीएससह अनेक तपास यंत्रणा हल्लेखोरांचा शोध घेत होते. गेल्या आठवड्यात शुक्रवारी महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथील भंडारआळीत छापा टाकला. वैभव राऊत याच्याकडून शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. त्याच्या संपर्कात असलेल्या शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांनाही अटक करण्यात आली. या तिघांची आठ दिवस कसून चौकशी केल्यानंतर पुण्याहून पकडण्यात आलेल्या आरोपीचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्याने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे याचे नाव सांगितले. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असल्याने एटीएसने याबाबतची माहिती सीबीआयला दिली. या माहितीच्या आधारे सीबीआयने औरंगाबाद येथील कुवारफल्ली या गावात छापा टाकून सचिन अंदुरे याला अटक केली.
पानसरे हत्येचाही उलगडा होणार
डॉ. दाभोलकर यांच्याप्रमाणेच मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही हत्यांमध्ये बरेच साधर्म्य असल्याने सचिन अंदुरे याच्या चौकशीतून पानसरे यांच्या हत्येचाही उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
– अॅड. मुक्ता दाभोलकर
दाभोलकर हत्याप्रकरणात अंदुरेला केलेली अटक ही महत्त्वाची घडामोड आहे. यानंतर तपासयंत्रणा या कटाच्या मूळापर्यंत पोहोचतील अशी आमची भावना आहे. उच्च न्यायालयाने तपासप्रक्रियेतील देखरेखीची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता या सगळ्या तपासप्रक्रियेतून खुनी तसेच सूत्रधारांपर्यंत निश्चितपणे पोहोचता येईल. हे लवकरात लवकर घडणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या खुनाचा तपास वेळीच लागला असता तर पुढील खून टळले असते.
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी तपासातील महत्त्वाचा घटनाक्रम :
2013-
20 ऑगस्ट- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या
गुन्हे शाखेची तपास पथके रवाना, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात
22 ऑगस्ट- घटनास्थळावरील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले
23 ऑगस्ट- पोलिस ठाण्यांच्या पातळीवर तपास पथके
25 ऑगस्ट- भोंदूबाबा, बनावट डॉक्टर, ज्योतिषी यांची चौकशी सुरू
26 ऑगस्ट- तत्कालीन एटीएस प्रमुख आणि पुणे पोलिसांची एकत्रित बैठक
27 ऑगस्ट-मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना तपासाबाबत सूचना
28 ऑगस्ट- दुचाकींच्या नंबरप्लेट, सराईत आणि पॅरोलवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू
29 ऑगस्ट-सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई आणि तेथून लंडनला
29 ऑगस्ट-गोव्यातील आश्रमातून एक साधक ताब्यात
30 ऑगस्ट-सुमारे आठ कोटी फोन कॉलसह ई-मेलची तपासणी सुरू
2 सप्टेंबर-संशयितांचे रेखाचित्र तयार, बॅलेस्टिक अहवाल पोलिसांना प्राप्त
6 सप्टेंबर- रेखाचित्राशी साधर्म्य असलेल्या 17 जणांची चौकशी
19 डिसेंबर-मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना कोठडी
2014-
16 जानेवारी-गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरू
13 मार्च- नागोरी आणि खंडेलवालची प्रत्यक्षदर्शींकडून ओळखपरेड
3 एप्रिल-विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना
9 मे-गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविला
3 जून-तपासाची कागदपत्रे सीबीआयच्या ताब्यात
6 जून-सीबीआय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
15 नोव्हेंबर-दाभोलकर हत्या प्रकरणाच्या चौकशीत गांभीर्याने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
2015 –
2 ऑगस्ट-तपासाबाबत अंनिसचे राष्ट्रपतींना पत्र
21 नोव्हेंबर-मारेकऱ्यांचे रेखाचित्र पुन्हा एकदा प्रसिद्ध
3 डिसेंबर-डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही – गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
2016 –
17 फेब्रुवारी-“सनातन’चे साधक नीलेश शिंदे, हेमंत शिंदेच्या न्यायवैद्यक चाचणीस (पॉलिग्राफ टेस्ट) न्यायालयाची मंजुरी
31 मे-सीबीआयचे वीरेंद्र तावडे (पनवेल) व सारंग अकोलकर (पुणे) यांच्या घरी छापे
4 जून-सीबीआय तपासासाठी लंडनच्या स्कॉटलंड यार्डची मदत घेण्याबाबत चर्चा
14 जून-वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा
16 जून-मडगाव स्फोट, मिरज दंगलीत तावडेचा हात
18 जून-मारेकऱ्यांना पोलिस अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिल्याची चर्चा
18 जून-दहशतवाद विरोध पथकाचा (एटीएस) कोल्हापुरातील 13 जणांवर “वॉच’
2017 –
1 मार्च-मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सीबीआय व मुंबई गुन्हे शाखेतर्फे पाच लाखांचे बक्षीस जाहीर
20 मे-तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमण्याची “अंनिस’ची मागणी
5 ऑक्टोबर- न्यायालयाने वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज फेटाळला
2018-
21 मे-पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या अमोल काळेसह पाच जणांना कर्नाटक “एसआयटी’कडून अटक
30 जून-अमोल काळे याच्याकडील डायरी जप्त, डायरीत वैभव राऊतचा उल्लेख, कर्नाटक-महाराष्ट्रातील लेखक, विचारवंतांसह 36 जण “हिट लिस्ट’वर.
6 जुलै-न्यायालयाने वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला
10 ऑगस्ट-अमोल काळेच्या डायरीनुसार मुंबईतून वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना अटक
11 ऑगस्ट-राऊतसह दोघांचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय
कोण आहे सचिन अंदुरे?
– सचिन हा मूळचा दौलताबादचा रहिवासी
– औरंगाबादमधील राजाबाजारमधील वेणू निवास इमारतीत भाड्याने वास्तव्य
– औरंगाबादमध्ये पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह दहा महिन्यांपासून वास्तव्य
– औरंगाबाद सासरवाडी असलेल्या सचिनला एक मोठा भाऊ
– निराला बाजार भागातील एका कापड दुकानात नोकरी
– अंदुरेच्या अटकेपासून त्याच्या राजाबाजारमधील घराला कुलूप
– सचिन दहिहंडी, मिरवणुकांमध्ये असायचा सहभागी
– सचिनचा कोणाशीही वाद नसल्याची शेजाऱ्यांची माहिती
– सचिनच्या फेसबुक अकाउंटवर केवळ प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट
‘घुमट’ हे भारतीय सांस्कृतीक राष्ट्राचे मंदिर -बिहारचे पर्यटन मंत्री प्रमोद कुमार यांचे मत
जानेवारी २०२० मध्ये उरणार नाही … फुरसुंगी आणि उरूळी देवाची कचरा डेपो – मंत्री विजय शिवतारेंची घोषणा
पुणे: फुरसुंगी, उरूळी देवाची येथील कचरा डेपो ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत असेल ,त्यानंतर मात्र हे कचरा डेपो पुर्णपणे बंद करणारच असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेत पत्रकारपरिषद घेवून स्पष्ट केले .कचरा डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या वारसांना महापालिकेत येत्या दोन महिन्यात नोकरी देण्यात येईल याबाबत हि आज महापालिकेत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असे ते म्हणाले .
यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, तसेच अन्य अधिकारी व फुरसुंगी, उरूळी देवाची येथील प्रमुख ग्रामस्थ, विसर्जीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदी बैठकीला उपस्थित होते. शिवतारे यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली.
कचरा डेपो ३१ डिसेंबर २०१९ अखेर पुर्णपणे बंद करण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे. समाविष्ट गावांमधील ५ गावांमध्ये प्रत्येकी १०० टनांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करून तिथे हा कचरा जिरवला जाईल. उर्वरित ५०० टन कचरा कमीकमी करत डिसेंबर अखेर डेपोत कचरा आणण्याचे पुर्णपणे थांबवले जाईल. यासाठीचे वेळापत्रकच आयुक्तांनी बैठकीत सादर केले असून त्याप्रमाणे काम केले जाईल असे शिवतारे म्हणाले.
डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे एकूण ५७ वारस आहेत. त्यातील ४० जणांच्या वारसा हक्काबाबत काहीच संदेह नाही. त्यांना त्वरीत महापालिकेच्या सेवेत घेण्यात येईल. उर्वरित १७ जणांनी न्यायालयाकडून तेच वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणल्यानंतर त्यांनाही सेवेत घेतले जाईल. फुरसुंगी व उरूळी देवाचीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून ७२ कोटी रूपयांची पाणी योजना राबवली जात आहे. आता ही गावे महापालिकेत आल्यामुळे त्यांना माणसी १५० लिटरप्रमाणे पाणी द्यावे लागणार आहे. त्यासाठी योजनेत काही बदल करावे लागतील. त्याबाबत प्राधिकरण व महापालिका यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी व काय बदल करावे लागतील त्याची चर्चा करावी अशी सुचना केली असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली.
सध्या आलेल्या ११ गावांचा सांडपाणी निर्मुलन आराखडा तयार केला जात आहे. आणखी काही गावे पुढच्या तीन वर्षात महापालिकेत येणार आहे. आराखडा करताना याही गावांना त्यात सहभागी करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे. काही गावांमध्ये तातडीचे कामे करणे गरजेचे आहे. गंगासागर येथे १६ ते १७ गल्ल्यांमध्ये बिकट स्थिती झाली आहे. तिथे त्वरीत रस्ते करावेत. प्रमुख रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील व पावसाळा संपल्यानंतर कामही सुरू केले जाईल. राज्य सरकारने या गावांसाठी विशेष निधी दिला नाही, मात्र मुख्यमंत्री स्तरावर त्याबाबत चांगला निर्णय होईल अशीअपेक्षाही शिवतारे यांनी व्यक्त केली.
महापालिका केशवनगर, लोहगाव, सूखसागरनगर व अन्य २ गावांमध्ये प्रत्येकी १०० टन असे एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करणार आहे. त्या गावांमधून याला विरोध झाला तर असे विचारले असता शिवतारे यांनी महापालिकेने ते पाहून घ्यावे असे सांगितले. फुरसुंगीने २१ वर्षे हा त्रास सहन केला आहे, त्या बदल्यात महापालिकेने तिथे काही विशेष खर्च केलेला नाही. आता या गावांमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे, त्याचा समावेश महापालिकेत झाला आहे, त्यामुळे तिथे विकासाचा समतोल साधला जाईल अशी अपेक्षा शिवतारे यांनी व्यक्त केली.
एमआयएम च्या ‘त्या ‘नगरसेवकाला अटक तर भाजपच्या 5 नगरसेवकांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद-जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. तर याच नगरसेवकाला सभागृहात मारहाण केल्याबद्दल भाजपाच्या पाच नगरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये महापालिकेत भाजपा नगरसेवकांनी एमआय़एमच्या नगरसेवकाला बेदम मारले होते. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.
भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.
शुक्रवारी महानगरपालिकेच्या मुख्य सभेत सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावास विरोध करणाऱ्या मतीन यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शनिवारी मतीन यांना अटक करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण ; २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण
पुणे-आरक्षणाच्या मागणीसाठी २० ऑगस्टपासून मराठा कांती मोर्चाने आता बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यभरातील विविध ठिकाणी २० ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालया समोर देखील करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या समनव्यक शांताराम कुंजीर,बाळासाहेब अमराळे ,विकास पासलकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
यावेळी कुंजीर म्हणाले की,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गात काढून देखील राज्य सरकार ने त्याची दखल घेतली नाही.त्याच्या निषधार्थ ९ ऑगस्ट रोजी राज्यातील ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यावर चुकीच्या पध्द्तीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ते पोलीसांनी मागे घ्यावे.तसेच मागील महिन्याभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे.यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभरात २० ऑगस्टपासून चक्री उपोषण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनामध्ये तोडफोड करणारे समाजकंटक होते, असा आरोप त्यांनी केला.
जीवनात प्रेम भावनेला मोठे महत्व – मुनिश्री पुलकसागरजी महाराज
पुणे-प्रेम हाच जीवनातील महामंत्र आहे. गायत्री, णमोकार यांसारख्या महामंत्रामधून जर प्रेम काढून टाकले, तर त्या मंत्रांचे महात्म्य कमी होते. हे प्रेम वासनाविरहित, मोहरहित असावे. एकत्र भोजन केल्याने कुटुंबातील प्रेम वाढते आणि समाजात प्रेम टिकवायचे असेल तर सामुहिक भजन करावे. घरात प्रेम टिकवायचे असेल तर गुरूंचा आदर, वाणीत सभ्यता आणि कुटुबीयांमध्ये प्रेम असावे, असा गुरूमंत्र मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी शनिवारी दिला. तसेच ज्या घरात या तिन्ही गोष्टी असतात, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. हल्ली माणसांपेक्षा जास्त प्रेम जनावरांवर केले जाते. प्राण्यांवर प्रेम केलेच पाहिजे, पण ते करताना मनुष्याबाबत तिरस्कार करू नये. बहुतांश लोक मी का आधी बोलू? या विचाराने आपण आपली भांडणे संपविण्याचा प्रयत्न करत नाही. जग अतिशय सुंदर आहे, थोडेसे प्रयत्न केले तर वर्षांपासून चालत असलेले तंटे पण लगेच संपुष्टात येतात. मात्र हे प्रयत्न प्रेमपूर्वत असावेत, असेही मुनिश्री यांनी सांगितले.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवात मुनिश्रींचे प्रवचन होते. प्रवचनाचे सातवे पुष्प गुंफताना ‘प्रेम’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, ऍस्पायर नॉलेज अॅन्ड स्किल्स् प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, पुढारी वृत्तपत्राचे बिझनेस संपादक अनिल टाकळकर, समितीच्या उपाध्यक्षा सुजाता शहा, अजित पाटील, विरकुमार शहा हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवातीस सुरगुंडा पाटील आणि परिवार यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. यानंतर ज्योती दोशी आणि परिवारातर्फे मुनिश्रींचे पादप्रक्षालन करण्यात आले. यावेळी गंधारी कोठाडिया व आनंदी शाह यांनी मुनिश्रींना शास्त्र भेट दिली. पुण्याच्या हिया मेहता या मुलीने ’आई’ वरील गाणे सादर केले तसेच बारामती येथील भक्ती ग्रुपच्या कलाकारांनी मंगलाचरण सादर केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी ऍस्पायर नॉलेज अॅन्ड स्किल्स् प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी यांनी उपस्थितांना कौशल्य विकासाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. आपल्याकडे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. यामध्ये परकीय भाषेचा विशेषत: पुण्यामध्ये जपानी भाषेचा समावेश होतो. पुणे शहराचा आसपास सुमारे 112 जापनीज कंपन्या आहेत. याठिकाणी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही जपानी भाषा शिकल्यास याठिकाणी काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या संस्थेचे प्रतिनिधी याठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्यावा” असे गांधी यांनी सांगितले.
पुढारी वृत्तपत्राचे बिझनेस संपादक अनिल टाकळकर म्हणाले, माझी सून जैन समुदायातील असून ती समाजातील परंपरा अतिशय भक्तीभावाने निभावते. तिच्या माध्यमातून जैन समाजाशी जुडता आले. मी अध्यात्माचा खूप मोठा अभ्यासक नाही. परंतु आज जर अध्यात्म तुमच्या सोबत नसेल तर तुमच्या आयुष्यातील गोंधळ वाढतो. मुनिश्रींसारखे अध्यात्मिक मार्गदर्शक तुमच्या सोबत असतील तर हा गोंधळ कमी होण्यास मदत मिळते. चातुर्मासानिमित्त मुनिश्रींचे विचार ऐकायला मिळण्याचे भाग्य पुणेकरांना मिळत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
रविवारी दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता ‘बेटी बचाव’ विषयावर मुनिश्रींचे प्रवचन होईल. तसेच दुपारी 3 वाजता ‘भक्तंबर स्तोत्राची महती’ या विषयावर सुजाता फुलफगर यांचे मार्गदर्शन करणारे व्याख्यान होईल. हा ज्ञानगंगा महोत्सव तीन सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 8.30 ते 10 यावेळेत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे.
मुनिश्रींच्या चातुर्मासानिमित्त रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे 3 सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी धारिवाल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी हाडांची ठिसूळता तपासणीसोबतच कॅन्सर डिटेक्शन चाचणीची सोय देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली. गेल्या 3 दिवसात एकून 550 स्त्री-पुरूषांनी हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी करून घेतली. तसेच आज महिलांच्या कॅन्सर निदान तपासणी शिबीरात 102 महिलांनी सहभाग घेतला. दि. 19 रोजी देखील हे महिलांसाठी कॅन्सर निदान तपासणी शिबीर संपन्न होणार आहे.
आता प्रमुख पाहुणे मिळेनात ..म्हणून रखडलेत 17 पुरस्कारांचे वितरण ; हाय रे महापालिका …
भर सभागृहात मारहाण म्हणजे झुंडशाही;त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे -आमदार इम्तियाज जलील
औरंगाबाद -महापालिकेतील मुख्य सभेत दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याबाबत नगरसेवक सय्यद मतीन यांची वर्तणूक वैयक्तिक असून त्याच्याशी पक्षाचा संबंध नाही. त्यांच्या सभागृहातील परस्पर वर्तणुकीबाबत पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, मात्र त्यांना सभागृहातच मारहाण करणे हि झुंडशाही आहे आणि त्याविरुध्द पोलिसांनी आणि महापालिकेने स्वतःहून सीसी टीव्ही फुटेज पाहून त्यामध्ये अशी गुंडागर्दी करताना जे कोणी दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले .







