- पुणे- पोटच्या दहा आणि आठ वर्षांच्या दोन मुलांचा गळा आवळून हत्या करून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.शुभम दीपक बर्मन (10) आणि रुपम दीपक बर्मन (8) असे हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत तर दीपक बर्मन (35) असे आत्महत्या करणार्या वडिलांचे नाव आहे.शनिवारी सकाळी दीपक बर्मन आणि त्यांची पत्नी ड्युटीवर निघाले होते. परंतु दीपक दुपारी घरी आले. आधी दीपक यांनी शुभम आणि रुपम या दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या केली. नंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीपक यांची पत्नी दुपारी जेवणाला घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
पोटच्या दोन मुलांचा गळा दाबून खून : वडिलांची गळफास घेवून आत्महत्या …
Date: