शास्त्र आणि शस्त्राचा अभ्यास करून जेते व्हा !
अनुष्का शर्मा, सॉफ्टलाइन लेगिंग्सचा नवा चेहरा
मुंबई: सॉफ्टलाइन लेगिंग्स या भारतातील लोकप्रिय लेगिंग्स ब्रँडने आपल्या ब्रँडचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले आहे आणि ब्रँड अम्बेसिडर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या अनुष्का शर्मा यांचीच निवड केली आहे.
भारतातील एक सर्वात मोठी निटवेअर कंपनी असलेल्या रुपा अँड कंपनी लिमिटेडचा भाग असलेल्या सॉफ्टलाइन लेगिंग्सने नेहमीच नावीन्य, वैविध्य व आरामदायीपणा या बाबतीत चाकोरीबाहेर विचार केला आहे. या प्रमिअम लेगिंग्ज आकर्षक फॅशन अपेक्षित असलेल्या महिलांच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या, अशा आहेत. या ब्रँडचे ग्राहक प्रामुख्याने तरुण, फॅशनप्रेमी महिला असून, ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा अतिशय समर्पक आहेत. त्यांचे चैतन्य व पॅशन ग्राहकांच्या एकंदर मानसिकतेशी एकदम साजेशी आहे.
‘एफर्टलेस यू’ या नवा विचार सादर करणारा ब्रँड, सहजपणे, स्वच्छंदपणे जगणाऱ्या तरुणींपर्यंत पोहोचणार आहे. सॉफ्टलाइन त्यांची आरामदायी, पण स्टायलिश कपड्यांची अपेक्षा पूर्ण करणार आहे आणि त्यांच्या आवडींनुसार त्यांच्यासाठी 100+ रंग उपलब्ध करणार आहे.
ब्रँडच्या नव्या ओळखीविषयी बोलताना, रुपा अँड कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष व ब्रँड डायरेक्टर विकास अग्रवाल यांनी सांगितले, “सॉफ्टलाइन हा प्रीमिअम लेगिंग्ज ब्रँड आहे. हे कापड उत्कृष्ट आहे व दिले जाणारे रंगांचे वैविध्य कमालीचे असून, अन्य कोणताही ब्रँड ते देत नाही. ‘एफर्टलेस यू’ ही नवी विचारसरणी ब्रँडचे प्रतिक आहे व हेच साधर्म्य असलेली अनुष्का शर्मा यांचे आमच्या परिवारात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांबरोबर त्यांचा भावनिक बंध आहे व आमच्या नव्या विचारसरणीसाठी त्या साजेशा आहेत.”
ब्रँड अम्बेसेडर अनुष्का शर्मा यांनी नमूद केले, “प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा कपड्यांमध्ये आरामदायीपणा अपेक्षित असलेल्या युवतींशी जोडलेल्या असलेल्या सॉफ्टलाइन लेगिंग्स या ब्रँडशी सहयोग करणे, ही आनंदाची बाब आहे. ग्राहक या ब्रँडच्या केंद्रस्थानी आहेत व त्यांच्यासाठी ब्रँड आधुनिक व आकर्शक डिझाइन देतो.”
इन एव्हरीथिंग यू डू, बी एफर्टलेसली यू
तरुणींसाठी तयार केलेला सॉफ्टलाइन लेगिंग्स हा भारतातील सर्वात पसंतीचा प्रीमिअम लेगिंग्ज ब्रँड आहे. व्यवसायाच्या 10 हून अधिक वर्षांमध्ये, ब्रँड भारतभर विस्तार व वितरण जाळे निर्माण केले आहे. पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारच्य लेगिंग्ज असून त्या अधिक स्ट्रेच असणाऱ्या व अधिक आरामदायी असणाऱ्या विशेष 4डी कॉटन स्ट्रेच फॅब्रिकपासून तयार केल्या आहेत. या लेगिंग्ज पुढील शैलीमध्ये उपलब्ध आहेत: केप्री, चुडिदार, अँकल लेंथ, शिमर, प्रिंटेड, विंटर, इ.
अद्ययावत प्रकल्पामध्ये उत्पादन करण्यात आलेला हा खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ ब्रँड आहे; सातत्याने दर्जेदार उत्पादने देत आहे व वितरणामध्ये विस्तार करण्याचा, आणखी नावीन्य आणण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे.
सॉफ्टलाइन लेगिंग्स हा भारतातील एक सर्वात मोठी निटवेअर कंपनी असलेल्या रुपा अँड कंपनी लिमिटेडचा (BSE: 533552 | NSE: RUPA) भाग आहे. अनुष्का केवळ सॉफ्टलाइन लेगिंग्सचा चेहरा असणार असून, हा ब्रँड इनरवेअर व अॅथलिजर यामध्येही कार्यरत आहे.
कंपनीचे लाख समाधानी ग्राहक असून, कंपनीने आपल्या वाटचालीमध्ये भारतात अग्रेसर व जागतिक बाजारात आघाडीचे स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी, “ही कवळ सुरुवात आहे”, असे विकास अग्रवाल म्हणतात.
‘संतूर धून मंतरलेली’ने प्रेक्षकांना जिंकले
पुणे -पुणे फेस्टिवलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ख्यातनाम संतूर
वादक श्री. मदन ओक(अमेरिका) आणि जेष्ठ तबलावादक पं.रामदास पळसुले यांनी सादर केलेल्या
‘संतूर धून मंतरलेली’कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
प्रख्यात कलावंत पं.शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असणारे जेष्ठ संतूरवादक पंडित मदन ओक हे
या कार्यक्रमासाठी आवर्जुन अमेरिकेहून आले.त्यांनी सुरुवातीस रागपुरिया कल्याण मध्ये आलाप
जोड,रुपक मध्य व द्रुत तीनतालमध्ये अनवट रचना व नंतर मिश्र पहाडी रागात दादरा व अति
जलद लयीत तीनतालात रचना सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.पं.रामदास पळसुले यांनी
तबल्यावर केलेली साथ अतिशय कसदार ठरली.प्रत्येक रागानंतर प्रेक्षकांची’क्या बात हे’ही दाद
मिळत गेली व पुणेकरांसाठी एक सुरेल मैफिल पर्वणीच ठरली.जेष्ठ निवेदिका नीरजा आपटे यांनी
या मैफिलीचे सूत्रसंचालन केले.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व त्यांचे पती या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित
होते.त्यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला.त्यावेळी पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक
कृष्णकांत कुदळे,सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू,उगवते तारे व इंद्रधनुचे संयोजक रवींद्र
दुर्वे उपस्थित होते.पुणे फेस्टिवलचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह प्रमुख अतुल गोंजारी यांनी
आभार प्रदर्शन केले. रोहन बिल्डर्स व परांजपे स्कीम्स कन्सट्रकशन लि हे याचे प्रायोजक होते.
पुणे फेस्टिवलमध्ये हशा आणि टाळ्यांनी बहरला ‘हास्योत्सव एकपात्रींचा’
पुणे-प्रवासातले किस्से ,बायकांच्या गप्पा,आडनावांच्या गमती,दररोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना
रंगतदारपणे सादर करत बंडा जोशी,मकरंद टिल्लू,चैताली भंडारी,श्रीप्रकाश सप्रे,धनंजय जोशी,दिलीप हल्याळ
या एकपात्री कलाकारांनी मैफिल रंगवली. ३० व्या पुणे फेस्टिवलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘हास्योत्सव
एकपात्रींचा’ हा एकपात्री कलाकारांचा बहारदार कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला.’हसायदान
फाउंडेशन’ने याचे आयोजन केले होते. ‘हसायदान फाउंडेशन’चे प्रमुख मकरंद टिल्लू यांनी
सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ एकपात्री कलावंत बंडा जोशी, दिलीप हल्ल्याळ, चैताली
माजगावकर-भंडारी, श्रीप्रकाश सप्रे,धनंजय जोशी हे सहभागी झाले होते. प्रख्यात एकपात्री कलावंत
बंडा जोशी यांचे 5000 जाहीर कार्यक्रम पूर्ण झाल्याबद्दल पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक
कृष्णकांत कुदळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव
याप्रसंगी केला गेला.यावेळी कृष्णकांत कुदळे म्हणाले,'एकपात्री ही काळाची गरज आहे.गेली १५
वर्षे ५०हून अधिक कलावंतानी या व्यासपीठावरून कला सादर केली. अप्रतिम सादरीकरणाने
एकपात्री हा पुणे फेस्टिव्हलचा अविभाज्य घटक बनला आहे.सत्काराला उत्तर देताना प्रख्यात
एकपात्री कलावंत बंडा जोशी म्हणाले’पुणेकरांच्या वतीने होणारा हा सन्मान मनाला उभारी
देतो.रसिकांच्या चेहऱ्यावरचे हास्य आम्हा कलाकारांना खरा सत्कार असतो.पुणे फेस्टिव्हलमध्ये
दर्जेदार प्रेक्षक मिळतो याचा आनंद वाटतो.’हसायदान फाउंडेशन’चे प्रमुख व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद टिल्लू आपल्या स्वागत व
प्रास्ताविकात ,रसिकता आणि कला यांचा परस्पर समन्वय कसा आहे याबद्दल बोलताना
म्हणाले,’श्वास संपल्यावर रहाते त्याला म्हणतात ‘कलेवर’अमर होतात ते जे प्रेम करतात’कले’वर
!!! या त्यांच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.या कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठी गर्दी
होती.
नीता ट्रॅव्हल्स च्या बस मधून पाच हजार किलोचा भेसळयूक्त खवा जप्त
पुणे- नीता ट्रॅव्हल्स च्याप्रवासी बसमधून विक्रीसाठी आणलेला तब्बल पाच हजार किलोचा भेसळयूक्त खवा पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई काल शुक्रवारी (दि.21) रात्री दहाच्या दरम्यान स्वारगेट येथील पौर्णिमा टॉवर येथे करण्यात आली.
याप्रकरणी चालक हिंमतसिंग गोपालसिंग राठोड (वय 45, रा.अहमदाबाद) व इतर दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथे गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी शंकर संपते यांना स्वारगेट येथील पौर्णिमा टॉवर येथे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये भेसळयूक्त खवा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मदतीने पौर्णिमा टॉवर येथे सापळा रचून पोलिसांनी निता ट्रॅव्हल्स या खाजगी प्रवासी बसमध्ये झडती घेतली असता बसमध्ये त्यांना तब्बल 4 हजार 852 किलो भेसळयूक्त खवा मिळाला.
चाचणी करण्यासाठी खव्याचा सॅम्पल औषध व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढून घेऊन सर्व खवा जप्त केला आहे. या प्रकरणी खव्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालका विरुद्ध कारवाई करण्यात आली असून निता ट्रॅव्हल्सची बसही ताब्यात घेतली आहे. गणेशोत्सव निमित्ताने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार भेसळयुक्त खवा पुणे, नागपूर व हैदराबाद या ठिकाणी विक्रीसाठी आणले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहे.
शिक्षण-रोजगार हक्क व डी.बी.टी विरोधी परिषद संपन्न
पुणे-कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त छात्रभारती आयोजित शिक्षण-रोजगार हक्क व डी.बी.टी विरोधी परिषद साने गुरुजी स्मारक, पुणे येथे पार पडली. परिषदेची सुरवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमापुजनानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाने करण्यात आली.यावेळी शिक्षण-रोजगार तसेच डी.बी.टी योजनेच्या अनुषंघाने जेष्ठ मार्गदशकांबरोबर विद्यार्थी वक्त्यांनी अभ्यासपुर्ण भाषणे केली. मदन पथवे यांनी डी.बी.टी योजनेबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी करुन सरकार दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्या भाषणातुन पटवुन दिले. तर वचिष्ट बढे यांनी बेराजगारीच भयाण विदारक चित्र मांडल. शिक्षणाच खाजगीकरण-बाजारीकरण करुन सरकारी शिक्षण संपवण्याचा सरकारचा डाव आहे. तसेच लाखो पदे रिक्त असतांना देखील ती भरली जात नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न देखील गंभीर होत आहे. अशावेळी सर्व विदयार्थ्यांनी तसेच समविचारी संघटनांनी एकत्र येवुन न्याय हक्कांच्या मागण्यासाठी मोठे आंदोलन करण्याची गरज आहे. असा सुर शर्मिला येवले, निलेश निंबाळकर यांच्या भाषणामधुन उमटला. छात्रभारती, राष्ट्र सेवा दल तसेच समातावादी संघटनांतर्फे लवकरच शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर 11 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर फुलेवाडा ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँगमार्च काढण्यात येईल याची घोषणा परिषदेत करण्यात येणार आहे.
यावेळी विचारपीठावर अल्लाउद्दीन शेख, प्रा.सुभाष वारे,प्रमोद दिवेकर, उपेंद्र टण्णु, विनय सावंत सारंग पुणेकर, मदन पथवे,शर्मिला येवले, निलेश निंबाळकर ,वचिष्ट बढे होते तर कार्यक्रमाची सांगता डॉ.शरद जावडेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकश लाटे यांनी केले तर योगेश वाघ यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी संदिप आखाडे, तुकाराम डोईफोडे, समृद्धी जाधव, लिंग्गाम्मा, रशीद मणियार, सुरज दाभाडे, लोकश लाटे, योगेश वाघ यांनी प्रयत्न केले.
बँक ऑफ महाराष्ट्राला राजभाषेचा सर्वोच्च सम्मान ‘राजभाषा कीर्ति पुरस्कार’
नवी दिल्ली-बँक ऑफ महाराष्ट्राला राजभाषा हिन्दीच्या श्रेष्ठ कार्यान्वयन साठी ‘राजभाषा कीर्ति पुरस्कार’ प्रदान केला गेला. 14 सप्टेंबर, 2018 रोजी हिन्दी दिवसाच्या वेळी विज्ञान भवन, नवी दिल्ली मध्ये आयोजित समारंभात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारताचे माननीय उप राष्ट्रपति श्री. वेंकैया नायडू यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ए.सी. राउत यांना हा पुरस्कार दिला गेला. कार्यक्रमाची अध्यक्षता भारताचे माननीय गृह मंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी केली. कार्यक्रमात भारताचे माननीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज गंगाराम अहीर, माननीय गृह राज्यमंत्री श्री. किरेन रिजीजू आणि अन्य सन्माननीय व्यक्ति उपस्थित होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक (मा.सं.प्र. व राजभाषा) श्री. राजकिरण भोईर, सहाय्यक महाव्यवस्थापक (राजभाषा) डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव आणि दिल्ली क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) श्री. दिनेश गुप्ता उपस्थित होते.
राष्ट्रवादीची नवी शहर कार्यकारिणी जाहीर …
पुणे : आपले राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची भक्कम बांधणी व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी या मतदारसंघांसाठी अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षही नेमले आहेत.
संघटना मजबूत करण्यासाठी शहराध्यक्ष चेतन तुपेंनी आपली नवी टीम जाहीर केली असून, तीन शहर उपाध्यक्षांसह, आठ मतदारसंघांचे अध्यक्ष, कार्याध्यांच्या नावांची घोषणा केली. तेव्हाच, सामाजिक न्याय आणि “ओबीसी’सेलचे अध्यक्षही निवडले आहेत.
शहर उपाध्यक्षपदावर नारायण गलांडे, शशिकांत तापकीर, आनंद तांबे यांना संधी मिळाली आहे. तर, पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नितीन कदम आणि कार्याध्यक्ष म्हणून दिलीप कांबळे यांच्याकडे देण्यात आली आहे. कसब्यासाठी विनायक हणमघर, गणेश नलावडे, तर कोथरुडमध्ये स्वप्नील दुधाणे, नितीन कळमकर यांना संधी दिली आहे. शिवाजीनगरची जबाबदारी माजी नगरसेवक निलेश नीकम, राजेश सानेंकडे दिली आहे.
हडपसर मतरसंघाच्या अध्यक्षपदी नारायण लोणकर आणि कार्याध्यक्ष म्हणून आबा कापरे यांना निवड झाली आहे. खडकवासल्यात माजी नगरसेवक काका चव्हाण आणि संतोष फरांदे यांना संधी मिळाली आहे. वडगावशेरीच्या अध्यक्ष राजेंद्र खांदवे-पाटील, कार्याध्यक्षपदी रमेश आढाव यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघातून भोलासिंग अरोरा आणि कार्याध्यक्ष म्हणून फहिम शेख यांच्या नावांची घोषणा झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्षपद विजय डाकले तर, “ओबीस’ विभागाची जबाबदारी संतोष नांगरेंकडे दिली आहे.
नवी कार्यकारिणी जाहीर करताना संघटनेच्या कामाचा अनुभव, शहराच्या प्रश्नांची जाण यांना प्राधान्य दिल्याचे तुपे यांनी सांगितले. केवळ पदे घेऊन मिरविणाऱ्यांना मात्र, कार्यकारिणीपासून लांब ठेवल्याचे दिसून आले. तुपे म्हणाले, “”पुढील निवडणुका जिंकण्यासाठी अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. ज्याचा फायदा लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल. तरुण मतदारांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न असून, त्याकरिता काही जणांना संधी दिली आहे.”
अल्झायमर्स रुग्णांसाठी दिनचर्येचे नियोजन व कुटुंबियांची जबाबदारी महत्वाची – प्रा चेतन दिवाण
कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये जागतिक अल्झायमर्स दिवस साजरा
पुणे- विसरभोळेपणा दिवसेंदिवस वाढतच जाणार्या अल्झायमर्स च्या रुग्णांमध्ये त्यांच्या दिनचर्येच्या गोष्टीदेखील विस्कळीत होत असल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये काळजी घेण्याची मोठी जबाबदारी ही रुग्णाच्या सतत जवळ व संपर्कात असणार्या कुटुंबीयांवर असून या अवस्थेमध्ये कुटुंबियांनी अल्झायमर्स रुग्णांच्या दिनचर्येचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागृती समितीचे सचिव प्रा. चेतन दिवाण यांनी व्यक्त केले.
जागतिक अल्झायमर्स दिवसाचे औचित्य साधून कर्वे सामाजकार्य महाविद्यालयाच्या वैद्यकीय आणि मनोवैज्ञानिक सामाजिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये प्रा. दिवाण बोलत होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ दीपक वलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये प्रा. दादा दडस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वैद्यकीय आणि मनोवैज्ञानिक सामाजिक कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी चर्चेमध्ये सहभाग घेऊन अल्झायमर्स म्हणजे काय तसेच अल्झायमर्स ची कारणे व उपाययोजना यावर चर्चा केली तसेच अल्झायमर्स संदर्भात विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या माहिती बद्दल देखील सदर्भासाहित चर्चा करण्यात आली. चर्चासत्रामध्ये संदीप मोटे, मदन पथवे, श्रद्धा पवार, योगिता मेंगाल, मोहिनी अग्निहोत्री, प्रसनजीत साखरे, पूजा मडके, सुजाता दडस, रश्मी साळवे, आशंका नखाते, नम्रता पेंढारकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पुणे फेस्टिवलमध्ये डॉ. शशिकला रवी यांचे भरतनाट्यम सादर
पुणे-पुणे फेस्टिवलमध्ये जेष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ.शशिकला रवी यांनी बालगंधर्व
रंगमंदिर येथे ‘देवी पार्वती’ कार्यक्रम सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात
देवी पार्वतीची विविध रूपे त्यांनी नृत्य विश्काराच्या आधारे सादर केली. त्यामध्ये हिमालयाची
मुलगी देवी पार्वती, शिवाची आराधना करणारी देवी पार्वती, शिवाची पत्नी देवी पार्वती, गणेशाची
आई देवी पार्वती, महिषासुराचा वध करणारी देवी पार्वती, आदिशक्ती देवी पार्वती या बरोबरच
अर्धनारेश्वरी असणारी देवी पार्वती ही विविध रूपे डॉ. शशिकला रवी यांनी भरतनाट्यम नृत्यांच्या
आधारे प्रेक्षकांसमोर सादर केली. त्यांच्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. देवी
पार्वती ही हिंदू पुराणांमध्ये सर्वात प्रभावी व प्रबळ मानली जाते. तिची ही विविध रूपे साकारताना
डॉ. शशिकला रवी यांचे नृत्यचापल्य विलक्षण होते.
या कार्यक्रमास पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,
सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू उपस्थित होते. नंदिता कलमाडी यांच्या हस्ते डॉ.
शशिकला रवी यांचा सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत
कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सिंहगड इन्सटीट्युट व सुमा शिल्प लि. हे
प्रायोजक होते.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते
आयुषमान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते रविवारी ई-कार्ड वाटप
पुणे-प्रधानमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते 23 सप्टेंबर,2018 रोजी आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन रांची ( झारखंड ) येथून होणार आहे. उद्घाटनाचा कालावधी दुपारी 1.30 ते 4 दरम्यान होणार आहे. राज्यस्तरावर मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते तसेच जिल्हास्तरावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या योजनेच्या लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात आयुषमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर या योजनेंतर्गत, पालकमंत्री यांच्या हस्ते दु. 3.45 ते 4 या कालावधीत आयोजित कार्यक्रमात अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करुन सेवा चालू करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना अंगीकृत रुग्णालयात ई-कार्ड साठी नोंदणी करता येईल.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ 2011 मध्ये झालेल्या सामाजिक-आर्थिक जणगणनेमधील लोकांना मिळणार आहे. या योजनेमध्ये आपल्या कुटुंबाचे नाव आहे का, हे जाणून घेण्यासाठी www.abnhpm.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा 14555/1800111565 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे यांनी केले आहे.
वृक्षलागवड मोहीम यशस्वी करा- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे- जिल्ह्यातील वनाच्छादीत क्षेत्राचे प्रमाण कमी असून ते वाढण्यासाठी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी योग्य ते नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षलागवड नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याला या वर्षी 1 कोटी 42 लक्ष 52 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून प्रत्येक विभागाने उपलब्ध रोपे, लागवडीची जागा, वृक्षसंरक्षक जाळी याबाबतचे नियोजन तयार करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. प्रत्येक विभागाला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीच्या 0.5 टक्के निधी वृक्षारोपणासाठी लागणा-या बाबींवर खर्च करता येऊ शकतो. त्यातून खड्डे खोदणे, वृक्षसंरक्षक जाळ्या आदींचा खर्च भागवता येईल. जिल्हा परिषद, कृषी विभागासह इतर सर्व विभागांनी योग्य ते नियोजन करुन हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राम यांनी केले.
गतवर्षी लावण्यात आलेल्या रोपांच्या सद्यस्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी, लागवड अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आभार सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव यांनी मानले.
